पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत -३० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत -३०   महाभारत ३०        आचार्य द्रोणाचार्य हस्तिनापूर च्या साऱ्या राज कुमारांना शत्रविद्या शिकवत होते. त्याच वेळी झाडाच्या आड उभा राहून एक युवक ते ऐकत असे नि मग बाजूलाच एक झोपडी जवळ जाऊन त्याचा सराव करत असे. आणि तेथेच झाडाखाली द्रोणाचार्यांची  त्याने प्रतिमा तयार केली होती. त्या युवकाने आणि त्या प्रतिमेला साक्षी मानून तो शिकण्याचा प्रयत्न करत असे. गुरू द्रोणाचार्य आज भीम आणि दुर्योधन या दोघांना गदा युध्द कसे खेळायचे ते सांगत होते नि त्याचे नियमही सांगत  होते .ते म्हणाले ,      "  गदा युध्दामध्ये कमरेच्या खाली वार करणे वर्ज आहे ,जर असे कोणी तसे केले तर तो त्याच्या गुरूचा अपमान आहे,असे म्हणून भीम आणि दुर्योधन या दोघांच्या हातात एक एक गदा दिली नि सराव करायला सांगितला. परंतु हे दोघे सराव पण असे करायचे  की ते जणू युद्ध करत आहेत की काय ? असे वाटायचे ?  तेव्हा युधिष्ठिर गुरू द्रोणाचार्यांना म्हणाला  की, माझा हा धाकटा भाऊ प्रिय दुर्योधन गदा युध्दात प्रवीण होईल ना गुरुदेव ?त्यावर आचार्य द्रोणाचार्य म्हणाले की, अवश्य होईल. परंतु तू आपल्या अनुज विषयी बोललास नाही काही !"

महाभारत -२९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
  महाभारत -२९ महाभारत २९          " मी आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो का ?"       " अवश्य !" अश्वत्थामा कडे खूण करत विचारले,      " तो तरुण कोण आहे ?"      " अश्वत्यामा माझा मुलगा !"      " अर्थात तो ना राजकुमार आहे नाही क्षत्रिय .....पुढेच वक्तव्य न बोलताच तडक  निघून जातो. अधिरथ  ने आपल्या मुला तर्फे आचार्य द्रोणाचार्यांची माफी मागितली आणि  अधिरथ सुध्दा आपल्या मुलाच्या अर्थात कर्णच्या मागोमाग निघून गेले. आचार्य द्रोणाचार्य आश्चर्यकारक नजरेने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतात. पण बोलत काहीच नाही. ते पुन्हा अश्वत्थामा जवळ येऊन बसतात नि त्याला चक्रव्यूहा विषयी माहिती देत असतात. ते अर्जुन पाहतो. तसे तो खेळायचं टाकतो नि सरळ आचार्य द्रोण जवळ आला. नि म्हणाला ," मी इथं बसू शकतो का गुरुवर्य ?"     " तुझं खेळामध्ये मन रमत नाही का ?"     " जर गुरुजी काही शिकवत असतील तर ती वेळ निश्चितच खेळाची नसणार."      " मला वाटतं तू माझ्या जवळ शिल्लक काही ठेवणार नाहीस बैस !" अर्जुन बसला तेथे.          

महाभारत - २८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
  महाभारत - २८                                २८      सांदीपनि ऋषींच्या आश्रमात स्वतः ईश्वर जो विद्याचा सागर आहे तो नदीकडून विद्या शिकण्यासाठी गेलाय. ऋषी सांदीपनि एक श्लोक म्हणतात तो असा,  एको देव: सर्व भूतेषु गुढ: सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा! कर्माध्यत्यक्ष: सर्वलोकाधिवास ,! साक्षी चेता केवलो निर्गुणश्च!!      श्रीकृष्ण सुदाम शी मुद्दाम बोलला की, गुरूंनी शिकविलेला आज चा श्लोक मला समजला नाही. तू ब्राम्हण आहेस ,अर्थात तुला नक्कीच माहीत असेल याचा अर्थ ?"     तसा सुदाम अभिमानाने श्लोकचा अर्थ सांगू लागला की, अर्थात ईश्वर एक आहे,  सर्व पदार्थामध्ये ही त्याचा वास आहे. आणि सर्व जिवा मध्येही तोच विराजमान आहे. तो सर्वाला व्यापून आहे, तोच सर्व प्राण्यांचा अन्तरात्मा आहे, तोच सर्व कर्मांचा ज्ञाता आणि निर्णयक आहे, तोच सर्व प्राण्यांची चेतना ही आहे आणि निर्गुण आहे. ज्या मध्ये ना काही  मनोभाव ना काही गुण !" असे म्हणून  बोलता-बोलता मध्येच थांबला.       तेवढ्यात श्रीकृष्ण त्याचे अपूर्ण वाक्य पूर्ण करत म्हटले, साक्षी ला विसरलास तू ! सर्व कर्माचा तोच साक्षी आहे, तो सर्वकाही पाहत असतो

महाभारत - २७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत - २७                महाभात - २७             युधिष्ठिर ने भीम ला पुढे बोलू दिले नाही ; परंतु विदुर ने अर्धवट वक्तव्याचा देखील पूर्ण अर्थ लावला. आणि त्याने ही गोष्ट गंगापुत्र भीष्मां पाशी  कथन केली. तेव्हा गंगापुत्र भीष्म उद्गारले," हे ऐकल्यानंतर मला असं वाटू लागलंय की माता सत्यवतीला दिलेले वचन मी पूर्ण करण्यात असमर्थ ठरलोय. होय ना ?" त्यावर विदुर बोलला ," नाही तातश्री तुम्ही  कुठं ही कमी पडलेले नाहीयेत."       " नाही कसा ?  माता सत्यवती ने पांडू पुत्राना माझ्या हवाली करून गेली होती. मी आपली पूर्ण जबाबदारी पार पाडू शकलो नाही असेच मला आता वाटू लागलंय.      " एवढं मनाला लावून घेऊ नका तातश्री!"      " मग काय करू ?"      " दुर्योधन ला बोलवून घ्या. आणि त्याला थोडी समज द्या."      " तुला काय वाटतं दुर्योधन समजून घेईल .....कदापि नाही. त्याला कारण काय माहितेय. दुर्योधन धृतराष्ट्रा ने लिहिले हस्ताक्षर आहे , त्याचं स्वतःच असं काहीही असित्व नाहीये. आणि धृतराष्ट्र त्याच्या डोळ्यांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण करू इच्छितो

महाभारत २६ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत २६                          महाभारत -२६      कुंती ने आपल्या मुलांसाठी खीर बनविली होती. त्यातले अर्धे भांडे खीर तर एकट्या  भीमालाच द्यावी लागे आणि उरलेली अर्धे भांडे खीर बाकीच्या चार भावांसाठी होती. परंतु खीर एकदम स्वादिष्ट बनली होती म्हणून अर्जुन ने भीमाला ठेवलेल्या खिरी मधून थोडीशी खीर खाल्ली ! मग भीमाचा पारा चढला. तो त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. तशी अर्जुन ने सुध्दा धूम ठोकली. म्हणून भीमाने त्याच्या पाठलाग सुरू केला. अर्जुन पळत पळत पितामह भीष्मांच्या मांडीवर जाऊन बसला. तेवढ्यात भीम पण तेथे पोहोचला. नि त्याने अर्जुनाला पितामह भीष्म च्या मांडीवरुन खाली उतरायला सांगितले. तेव्हा पितामह भीष्म ने भीम ला त्याच्या क्रोधाने कारण विचारले. तेव्हा भीम ने सांगितले की, पितामहा ,अर्जुन ने माझी खीर खाल्ली ! " तेव्हा पितामहा भीम ला समजावत बोलले ," अरे भीम बेटा, अर्जुन लहान भाऊ आहे ना तुझा ? मग खाऊ दे ना खाल्ली तर !"     " पण त्यामुळे  माझे पोट रिकामी राहिले त्याचे काय पितामहा ?"     " अरे खीरच खाल्ली ना ! उद्या तुझ्यासाठी मी खूप सार

महाभारत २५ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत २५                                 २५            धृतराष्ट्र    मला वाटलं होतं पांडू प्रमाणे पांडू पुत्र सुध्दा हस्तिनापूर ला कधी येणारच नाहीत. अर्थात माझ्या नंतर ह्या राज सिंहासन वर माझ्या पुत्राचा म्हणजेच दुर्योधनाचा अधिकार असे मी धरून चालत होतो. परंतु म्हणतात ना, म्हटलेले साधेल तर द्रारिद्रता का बाधेल ? अगदी तसेच घडले माझ्या बाबतीत. ज्याची अपेक्षा केली नव्हती तेच घडले. नियती सुध्दा माझ्या सोबत असा का डाव खेळतेय ते कोण जाणे ? आता पांडु पुत्र आले. नियमानुसार त्याना सुध्दा गुरुकुलात पाठवायला हवं. परंतु मुद्दामच त्या विषयी काही चर्चा केली. कारण माझी अशी इच्छा होती की त्याना शिक्षण मिळूच नये. कारण माझा पुत्र श्रेष्ठ ठरला तर राज सिंहासन मिळणार ना ? परंतु आज तातश्रीनी पांडू पुत्राना गुरुकुलात पाठवून माझ्या स्वप्नांवर पाणी ओतले. पण हरकत नाही. कुलगुरुला इथं बोलवून घेतले आहे, अधिरथ चे कारण पुढे करून. त्यांना थोडीशी समज देवू की पांडू पुत्रा पेक्षा दुर्योधन जास्त लक्ष द्या. कारण तो उद्याचा हस्तिनापूर चा नरेश होणार म्हणून. अर्थात ही माझी इच्छा आहे, त्यात तातश्री नि विदुर अडथ

महाभारत -२४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत -२४                           २४ महाभारत -२४         कुंती आपल्या मुलांना परमेश्वराचे नाव घेऊन झोपायला सांगते. आईची आज्ञा शिरसावंद्य असे मानून भीम सोडून बाकीचे भाऊ झोपी जातात.परंतु भीम काही झोपत नाही.तो बसून आपल्याच विचारात मग्न असतो, म्हणून युधिष्ठिर उठून बसत बोलला ," प्रिय भीम आईने झोपायला सांगितले आहे आपल्याला." त्यावर भीम उद्गारला ," कसा झोपू मला झोपत येत नाहीये."      " झोप न येण्याचे कारण ?"      " ते काही विचारू नकोस तू मला ."      " म्हणजे ?"      " अरे दादा, तो दुर्योधन पाहिलास ना ,आपल्याशी कसा वागतोय तो. असं वाटतं की सरळ त्याची मानगुटी पकडून त्याला जमीन आणि आसमानचे दर्शन एकदम घडवावे."      " अनुज असं आपल्या बंधू विषयी बोलू नये."      " बंधूं कुणाचा बंधू ? "      " कुणाचा म्हणजे ? आपल्या सर्वांचा !"      " भाऊ ....त्याला कोण भाऊ म्हणेल ! भावा सारखा वागतो तो नेहमी माझ्याशी वाद घालत असतो."      " अरे एकदा भाऊ खट्याळ स्वभावाचा  असतो तर त्याला आपण माफ

महाभारत - २३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत - २३                                          २३    महर्षी व्यास यांचे हस्तिनापूर ला आगमन झाले. जेव्हा त्यांनी माता सत्यवती च्या कक्षेत प्रवेश केला तेव्हा माता सत्यवती फार मोठ्या विवंचनेत होती. त्यांनी आपल्या मातेला संबोधित करीत म्हंटले ," प्रणाम माते !" तश्या त्या खडबडून उठत म्हणाल्या ," या महर्षी व्यास !"     " माते माझ्या साठी उठून उभं राहायची गरज नाही."     " मी माझा पुत्र आला म्हणून उठून  उभी राहिली नाही तर महर्षी व्यास माझ्या दारी आले म्हणून उठून उभी राहिली."     " आईपुढे तर कधी कधी ईश्वरला  सुध्दा नतमस्तक व्हावे लागते. आईच्या पुढे कुणी मोठे नाही.ना ईश्वर ना ऋषी !"      " आज आपल्या आईची आठवण कशी झाली पुत्र ?"      " मला आई साठी एक  शेटवचे कर्तव्य करायचं राहिलंय ते करायला  आलोय ."       " शेवटचे कर्तव्य ?" न समजून त्या उद्गारल्या.      " हां शेवटचे कर्तव्य !"      " काळ एका नदी प्रमाणे फक्त वहात असतो. आणि शरीर एक होडी समान आहे,आणि त्या होडीत आत्मा एक प्रवाशी आहे तो ने