अखंड सौभाग्यवती भव १
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अखंड सौभाग्यवती भव १ |
अघटित घडलं कसं कथेचा दुसरा भाग काही वाचकांची
रिक्वेस्ट आली की या कथेचा पुढील भाग कथा अपुरी
वाटते.कंदन हार मानून गप्प बसण्यातला नव्हता.अर्थात
तुरुंगातुन सुटल्यानंतर त्याने काहीतरी केलं असेलच ना ?
शिवाय प्रिया ने त्याला जो धोका दिला त्याची शिक्षा तिला
नको का द्यायला ? वगैरे पाहू या तुरूंगातून सुटून आल्यानंतर नवीन प्लॅन काय करतो ते. पण त्या अगोदर
अघटित घडलं कसं चा शेवटचा भाग पुढे देत आहे.
न्यायाधिक्षांनी आपला निकाल जाहीर केला. आम्हाला निर्दोष करार देऊन कंदनला आमची मानहानी केल्याबद्दल त्याला दंड करण्यात आला. आणि त्याला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मला मात्र आनंद गगनात मावेनासा झाला. कारण आज अघटीत गोष्ट घटीत घडली होती.याचे आश्चर्य मला जरूर होते की हे अघटीत घडले कसे ? कारण आम्हा पती-पत्नीचे शारीरिक संबंध कधी झालेच नव्हते. मग हा चमत्कार घडला कसा ? खूप विचार केल्यानंतर एक रात्रीचा प्रसंग मला आठवला. मधुचंद्राला गेल्या वेळीच्या एका रात्री राजने मलादेखील अर्धा ग्लास नशावाले दुध पाजले होते. त्या रात्री आम्हा दोघात काय महाभारत घडले ते आम्हा दोघांना पण आठवत नव्हते. कदाचित त्या रात्रीचा हा प्रताप असावा. हो त्या रात्रीचा हा चमत्कार आहे हा . कारण आम्ही जेव्हा सकाळी उठलो. तेव्हा आमच्या अंगावर अंतर्वस्त्र नव्हती. याचा अर्थ आम्हा दोघामध्ये शारीरिक संबंध जरूर झाले असावेत. पण त्यावेळी आठवत मात्र काहीच नव्हते . त्यामुळेच हा सारा घोळ झाला. पण जे झाले ते पण एका अर्थाने चांगलेच झाले म्हणावयाचे.कारण त्यामुळेच आज माझी अब्रू वाचली. खरेच ! मी भाग्यवान ठरली आज. आणि खरे सांगायचे तर त्या विधात्याचेच आभार मानायला हवेत. कारण त्यानेच हा चमत्कार घडविला. आणि कोणीतरी म्हटलेच आहे ना , कोणी किती जरी कुणाचे वाईट करण्याचा प्रत्यन जरी केला तरी देखील घडणार मात्र तेच जे विधात्याने प्रत्येकाच्या विधीलिखीतात लिहीलय . खरेच त्या विधात्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.” आता या कथेचा पुढील
भाग वाचा. कथेचे शीर्षक आहे- अखंड सौभाग्यवती भव !
कंदन दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा भोगून
तुरुंगातुन सुटला. जेलच्या बाहेर पडताच त्याची नजर
जेलच्या बाहेर उभ्या असलेल्या आपल्या पित्याकडे तर
गेलीच पण त्या आधी राजाराम वर गेली.राजाराम ला तिथं
पाहून त्याला आश्चर्य तर वाटलेच पण मनात एक शंका
येऊन गेली की हा इथं कशासाठी आलाय ? म्हणजे मला
आपल्या घरी नेण्यासाठी का माझी माफी मागण्यासाठी !
कशासाठी पण येऊ देत परिणाम तोच होणार आहे, जे माझं आहे ते मला मिळायलाच हवं.मग त्यासाठी मला
तुझ्या किंवा तुझ्या मुलाची मला आहुती द्यावी लागली
तरी हरकत नाही.पण त्या अगोदर मला प्रिया कडे पाहायचंय जिने माझा विश्वासघात केला.केसाने गळा
कापला माझा. हे मी कसे विसरेन." असे म्हणून त्याने
सरळ आपल्या वडिलांचे अर्थात कचेश्वर चे चरण स्पर्श
केले.त्यांनी त्याच्या दोन्ही खांद्याना पकडून वर उठविले
नि त्याला आपल्या गळ्याशी लावले.त्यानंतर तो काही
बोलण्या अगोदर कचेश्वर म्हणाले," तुला न्यायला कोण
आलाय बघ." तेव्हा त्याने राजाराम कडे पाहत कंदन
म्हणाला," हाय राज कसा आहेस ?"
" आय अँम फाईन ! पण तुझा आहेस ?"
" जाहीर आहे मी जेल मध्ये कसा असणार हे तुला मी
सांगायला नकोच म्हणा. कारण जेल मध्ये मजेत असत
नाही."
" झालं गेलं विसरून जा आता आणि पुन्हा नव्याने
नाती जोडू आपण !"
" तुलेला धागा पुन्हा जोडता येतो गाठ मारून ; परंतु
नाती कशी जोडणार ? नात्यांना गाठ मारता आली असती
तर कदाचित ते शक्य झालं असतं त्यामुळे मला असं वाटत नाही जो आपल्या नात्यांमध्ये कडवट पणा आलाय
तो पुन्हा गोड होईल असं."
" हे बघ करायचं म्हटलं तर सर्वकाही शक्य असतं. कारण अशक्य असं काहीच नाही या जगात. मला कल्पना
आहे तुझ्या मनात माझ्या बद्दल राग आहे.त्या मागचे कारण जाणून घेशील तर हा कुठच्या कुठे गायब होईल."
" कदापि नाही.मी तुझा नि तू माझा वैरी हेच आपले
खरे नाते!"असे म्हणून त्याने मोटार चा दरवाजा उघडला
नि आंत बसला.राजाराम ने आपल्या मामाकडे पाहिले.
तेव्हा कचेश्वर ने हाताच्या खुणे ने सांगितले.तू जरा शांत
रहा.घरी गेल्यावर त्याची समजून काढतो तू त्याची चिंता
नको करुस." असे त्यांनी पुढील दरवाजा नि मोटार मध्ये
बसले.त्यानंतर राजाराम मोटर च्या पुढच्या बाजूला
वळून ड्रायव्हिंग सीट कडे गेला.दरवाजा उघडला.नि प्रथम
सेफ्टी बेल्ट लावला.त्यानंतर किल्ली फिरवून मोटर स्टार्ट
केली नि गाडी गिअर मध्ये टाकली.तशी मोटार जागची
हलली.आणि थोड्याच गाडीने वेग घेतला.गाडीत कोणीच
कुणाशी बोलले नाही.कंदन काचेतून बाहेर पाहत होता.
मात्र त्याच्या मनात वादळ सुरू होते.तो आपल्या वडिलांवर पण नाराज झाला होता.कारण त्याचे वडील
राजाराम सोबत राजाराम च्याच मोटार मधून आले होते
हे त्याला अजिबात आवडलं नाही.त्याचं म्हणणं होतं.
आपली मोटार असताना ती का नाही आणली.बरा आले
ते आले; त्याला ही सोबत घेऊन आले.मला त्याच्या
चेहऱ्याशी नफरत आहे, हे बाबाना माहीत नाही की काय ? माझा संशय तर खोटा नाही ना ? म्हणजे बाबांनी
पुन्हा राजाराम ची गुलामगिरी पत्करली नाही ना ? बहुधा
असेच असावे काहीतरी आता घरी गेल्यावर कळलेच
म्हणा.परंतु मोटार जेव्हा त्याच्या बंगल्या जवळून जशी
पुढे जाऊ लागली.तसा तो म्हणाला," बाबा, आपले घर
आले राज ला गाडी थांबवायला सांगा."
" परंतु आता आम्ही इथं राहत नाही."
" मग कुठं राहाता य ? नवीन ब्लॉक घेतला की काय ?"
" आता आपण सर्वजण राजच्या बंगल्यावर राहतोय."
" व्हास्ट्स राज च्या बंगल्यावर ?"
" हां बेटा !"
" मी नाही येणार , तुम्हाला जायचं तर जा.मी इथंच
उतरा मला खाली."
" अरे पण बेटा, ह्या बंगल्यात दुसरी माणसं राहतात."
" बाबा आता काय म्हणून मी तुम्हांला."
" काहीही म्हणू नकोस.मुकाट्याने चल तिकडे तुझी आई वाट पाहत आहे." कुंदन चिडून म्हणाला," बाबा हे तुम्ही चांगलं नाही केलं.ज्या माणसांनी मला तुरुंगात टाकले त्यांच्या घरी राहायला गेले तुम्ही !" तेव्हा राजाराम मध्येच म्हणाला," त्यात मामांचा काही दोष नाही मीच घेऊन गेलो त्याना."
" हे उपकार कशासाठी केलेस आमच्यावर ?"
" हे उपकार नाहीत रे, तुमचा अधिकार होता तो मी
तुम्हाला दिला."
" अधिकार ....फार लवकर सुचलं हे तुला."
" अरे, जब जागो वही सबेरा ।"
" मैं सोया ही कब था, जो जागने जरूरत है मुझे जेल में
दिन रात मैं यहीं सोचता रहता था कि जब मैं रिहा हो जाऊंगा तो सबसे पहले मैं एक ही काम करूंगा अपने
अपमान का बदला लूंगा ।"
" जरूर लेना लेकिन अब घर तो चलो."
" घर अवश्य चलूंगा लेकिन यह गलतफहमी में मत
रहना की मैं हमेशा के लिए तुम्हारे घर रहूंगा । बस आज की रात कल सबेरे मैं अपने लिए एक किराया का मकान ढूंढ लूंगा समझे !"
" अवश्य ढूंढ लो, लेकिन मामीजी की सामने कोई तमाशा मत खड़ा करना प्लीज !"
" ओके नही करूँगा !"
मोटार बंगल्याच्या समोर मोकळ्या जागेत येऊन उभी
राहिली. एक एक करून सगळे मोटार मधून खाली उतरले.
मुख्य दरवाजा वर कंदन ची आई अरुंधती आरती घेऊन उभी होती. म्हणजे प्रिया ने ते ताट तिच्या हातात दिले होते. कंदन ला आरतीने ओवाळून आंत घेतले. तेव्हा त्याने आपल्या आई ला विचारले की गेस्ट रूम कोठे आहे ?"
" गेस्ट रूम कशाला पाहिजे तुला ?"
" आजची रात्र गेस्ट रूम मध्ये राहणार आहे."
" आणि मग ?"
" मी माझ्या राहण्याचा बंदोबस्त दुसरीकडे करणार आहे." त्यावर त्याच्या आई ने विचारले की , काय बोलतोस काय तू हे ?"
" तू ऐकले नाहीस मी काय बोललो ते ?" तेव्हा कचेश्वर
आपल्या पत्नीस म्हणाले ," अरु तू जरा शांत रहा पाहू !
" कशी शांत राहू तुमचा पोरगा काय म्हणतोय ते ऐकलात
ना ?
" हो ऐकलं. मी बघतो काय ते ; पण तू शांत रहा."
तसा कंदन म्हणाला," बाबा , आता तुम्ही तरी सांगणार आहात का ? का मी परत जाऊ ?" कचेश्वर म्हणाले,
" इथून असा पुढे गेलास ना की ,मग डाव्या हातावर
वळायचं.जिन्याच्या बाजूचीच रूम !" कंदन तिकडे निघून गेला तशी त्याची आई म्हणाली," हा असा काय वागतोय ?
काय झालंय ह्याला ?" त्यावर कचेश्वर म्हणाले," काहीही झालंल नाहीये. जरा रागात आहे , राग थंड झाला की
येईल लायनीवर." असे म्हणून ते राजाराम कडे पाहत म्हणाले," राज काहीही टेन्शन घेऊ नकोस.मी समजवितो त्याला."
" ठीक आहे." असे म्हणून राजाराम आपल्या बेडरूम
च्या दिशेने निघाला. तशी त्याच्या पाठोपाठ प्रिया पण
बेडरूम मध्ये आली नि राजाराम ला उद्देशून म्हणाली,
" पाहिलंत ना आता काय म्हणाला तो. म्हणून मी तुम्हाला सांगत होते की ह्या पिता-पुत्रांना इथं आणू नका
म्हणून.पण तुम्ही माझं ऐकलं नाही.पण आता तरी ऐका.
उद्या स्वतःहून जात असेल तर जाऊ द्या अजिबात अडवू
नका त्या दोघांना."
" दोघांना कोणाला ?"
" आपले मामाश्री ! म्हणजे शकुनी मामा हो !"
" त्याना शकुनी काय म्हणतेस ? इतकं काही वाईट
नाहीत ते."
" तर तर ! म्हणे वाईट नाहीत.सासूबाईंचा जीव कुणी
घेतला ?"
" जाऊ दे गं पुरलेली मढी पुन्हा उकरून नाही काढायची.तेच तेच उगाळत बसने चांगले आहे का ?"
" असं तुम्ही म्हणता, पण त्यांच्या ते आहे का गावी ?"
" अग चालायचंच हाताची बोटे सारखी आहेत का ?
नाही ना ? माणसं सारखी कशी सापडणार ? "
" तुमचा हा परोपकारी स्वभाव ना एक दिवस आपल्यालाच गोत्यात आणायचा ?"
" असं नाही होणार , मी सर्व काही ठीक करीन चिंता
करू नकोस."
" तुम्ही काय माझं ऐकणार आहात ? तुम्हाला योग्य
वाटतं तेच करणार ?"
" कसं आहे, त्या दोघांवर म्हणजे मामाश्री नि आमचे
बंधूराज ह्यांच्या वर अन्याय झालाय.म्हणून तसे वागले."
" अन्याय आपण केलाय काय ?"
" आपण नाही केलाय पण करणारे ही आपलेच होते
नि त्याला विरोध करणारे ही आपले होते.तेव्हा दोष कोणाला देणार ? म्हणून मी ठरवलं आहे की कंदन ला
मी प्रॉपर्टी मधील अर्धा हिंसा देऊ इच्छितोय.कारण त्यावर
त्यांचा कायदेशीर हक्क आहे."
" मागच्या वेळी पण तुम्ही त्याना अर्धा हिस्सा दिला होता ना, पण त्यांनी त्याचा गैरफायदा कसा घेतला हे
पाहिलं ना तुम्ही ? आणि पुन्हा चूक करताय.एकदा
ठोकर लागल्यावर चूक सुधारायची असते माणसाने."
" मग काय करू म्हणतेस ?"
" सध्या तुम्ही प्रॉपर्टीचे विभाजन करण्याच्या भानगडीत
पडू नका.आणि तशी पण सारी प्रॉपर्टी दीपक च्या
नावावर आहे जोपर्यंत तो अठरा वर्षाचा होत नाही तोपर्यंत
ती प्रॉपर्टी तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही.आणि हेच
कारण तुम्ही त्या दोघां समोर करू शकता."
" ते सर्व ठीक आहे गं, पण मामाश्री ना काय सांगू ?.
अर्धी प्रॉपर्टी मी तुम्हाला देतो हेच सांगून तर त्याना मी
आपल्या घरी आणले होते.आता जर त्याना असं सांगितलं
तर ते काय म्हणतील ? की राजाराम ने आपला शब्द फिरविला."
" त्याना खरं आहे ते सांगून टाकायचं.आणि तरीही त्याना खोटे वाटत असेल तर वकिलांकडे जाऊन चौकशी
करा म्हणून सांगायचं.त्यात काय आपण थोडंच काही
लपवितोय."
" अरे वा ! तू तर माझ्या प्रश्नांचे उत्तर लगेच दिलेस."
" मग बायको कोणाची आहे ?"
" माझी !" आणि दोघेही खळखळून हसू लागतात.
तेवढ्यात तिथं अरुंधती ली दरवाजा वर थाप मारत
म्हणाली," सुनबाई !" तशी प्रिया आवाज देत म्हणाली,
" हो मी आले. मी जरा स्वयंपाकाचे पाहते." असे
म्हणून प्रिया घाईघाईने निघून गेली.ती गेलेल्या दिशेकडे
पाहून राजाराम म्हणाला," प्रियाच्या म्हणण्या प्रमाणे मी
ह्या दोघांना इथं आणून चूक तर केली नाही ना ? छे छे छे !
चूक कशी असेल ? आजोबांची इच्छा होती की त्यांच्या
मुलाला न्याय मिळावा.मी आजोबांची इच्छा तर पूर्ण
करण्याचा प्रयत्न करतोय.भले ही या प्रॉपर्टी वर त्यांचा
कायदेशीर हक्क नाही.कारण ही प्रॉपर्टी आजोबांच्या
स्वकमाई ची नव्हतीच ! आईच्या आजोबांची प्रॉपर्टी
होती ती त्यांनी आपली सारी प्रॉपर्टी आपल्या एकुलत्या
एक मुलीच्या नावावर करून टाकली. अर्थात माझ्या
आजीच्या नावावर.पण आजी अकाली पण मरण पावल्याने पणजी ती माझ्या आईच्या नावावर न करता
माझ्या मुलाच्या नावावर केली.त्यामुळे ती मामला मागच्या
वेळी हस्तगत करता आली नाही. परंतु का कुणास ठाऊक
मला अजून ही वाटतं की त्यांना द्यावी प्रॉपर्टी कारण कसे
झाले तरी ते माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत.त्यांच्या
जिवंत पणी त्यांची पूर्ण नाही झाली.निदान मृत्यू नंतर तरी
त्यांच्या मुलांना मिळावी.म्हणजे त्यांच्या आत्माला शांती
तरी लाभेल. पण त्यासाठी सुध्दा त्याना दीपक अठरा
वर्षाचा होईपर्यंत वाट पहावी लागेल.काय करणार इलाज
नाही दुसरा.
कंदन गेस्ट रुम मध्ये बसला होता.तेवढ्यात त्याचे
वडील कचेश्वर तेथे आले.त्याना पाहून त्यांच्यावर रागवत
म्हणाला," बाबा तुमचा हा निर्णय मला अजिबात आवडला
नाहीये."
" कोणत्या निर्णय बद्दल बोलतो आहेस तू ?"
" आपलं घर सोडून इथं का येऊन राहिलेत तुम्ही ?"
" हे सुध्दा आपलंच घर आहे."
" नाही.हे माझ्या वैऱ्यांचे घर."
" अरे हळू बोल वैरी काय म्हणतोस ?"
" वैरीच आहे तो माझा.तो पण असा तसा नाही माझं
सर्वच खेचून घेतलं आहे त्यानं."
" म्हणजे मी नाही समजलो."
" प्रिया माझी बायको होणार होती; परंतु ती झाली
कोणाची पत्नी ?"
" तूच करून दिली होती त्या दोघांची ओळख."
" हो ; पण काय माहीत होतं प्रिया माझ्याशी धोका
करेल ती ."
" धोका नाही म्हणत त्याला."
" मग काय म्हणतात ?"
" ती भारतीय नारी आहे, हे कसं विसरलास ?"
" म्हणजे मी नाही समजलो."
" भारतीय नारी ज्या पुरुषा बरोबर लग्न करते त्याचीच
ती होऊन जाते.अगोदर जरी करत नसली तरी ती नंतर
करू लागते आणि आपल्या नवऱ्याला धोका देणे तिला
अजिबात आवडत नाही."
" असं थोडंच आहे, अश्या कितीतरी बायका धोकेबाज
आहेत."
" असतील.परंतु संस्कारात वाढलेली मुलगी असं काम
कदापि करणार नाही."
" हे तुम्ही आता सांगताय , तेव्हा सांगायचं ना ?"
" तेव्हा मला तरी कुठं माहीत होतं तिच्या मामाने तिला
लहानाची मोठी केली आहे ती.शिवाय तिची आई संस्कारी
असेल.कारण संस्कार आई कडूनच मिळतात."
" माझी आई पण तर संस्कारी आहे, मग मी असा कसा
झालो ?"
" तू तुझ्या बापावर अर्थात माझ्यावर.आणि तुझी आई
आंधळी असल्याने तुझ्यावर ती चांगले संस्कार करू शकली नाही.तिला माहीत नव्हते पडत की तिचा मुलगा
आणि नवरा काय खेळ खेळताहेत ते."
" आणि या पुढे ही तिला काही माहीत पडता कामा नये."
" आता तिला सर्व माहीत पडले आहे.मघाशी तू जसा
वागलास त्यावरून तर तिची पूर्ण खात्री झाली की तू
तुरुंगात जाऊनही सुधारला नाहीस."
" मग आता काय करायचं ?"
" तुझ्या डोक्यात जे खूळ आहे इथं राहायचं नाही
ते डोक्यातून आधी काढून टाक.मगच तिची समजूत
काढता येईल."
" पण बाबा इथं राहिलो तर रोज मला त्या राज चे दर्शन
होईल.त्याला पाहिलं ना की माझ्या अंगाची कायली होते.
म्हणून मी दुसरीकडे जाऊन राहू इच्छित होतो."
" मूर्ख आहेस.जे इथं राहून करता येईल ते बाहेर राहून
करता येणार नाही."
" म्हणजे आपलं अपुरे काम पूर्ण करायचंच !"
" मग काय उगाच राहायला आलोय का मी ?"
" बाबा तुम्ही एकदम ग्रेट आहात हां बाकी !"
" आता मी काय सांगतो ते ऐक.राज संशय येणार नाही
असे वागून दाखव.कारण राज एकदम भोळा आहे रे, त्याला माहित नाही की त्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या
पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. सापाच्या पिल्लांना
दूध पाजून काही फायदा आहे का ? त्याच्या शेपटीवर
पाय पडल्यावर चावा घेणारच तो. असो.
" अगदी बरोबर बोललात तुम्ही बाबा.राज स्वतःच
स्वतासाठी खड्डा खणला.आता स्वतःच पडणार आहे त्यात."
" म्हणून सांगतोय डोकं जरा शांत ठेव.मग मार्ग आपोआपच मिळतो."
" खरं आहे बाबा तुमचं."
" मग आता एक काम कर."
" कोणतं ?"
" आपल्या आईची जाऊन माग ?"
" आईची माफी परंतु ....?".
" मघाशी आपल्या आईचं मन दुखविलेस.तू इथं आल्यावर ती विचारत होती की हा असा काय वागतो
म्हणून."
" मग तुम्ही काय सांगितलेत ?"
" काय सांगणार , कशीतरी समजूत घातली.पण जर
तू आता जाऊन माफी मगितलीस ना, तर ती चांगली
झोपेल.नाहीतर रात्रभर विचार करत बसेल."
" ठीक आहे,आता जातो.परंतु आई आता कोठे असेल ? म्हणजे मला म्हणायचंय की किचनमध्ये का
बेडरूम मध्ये ?"
" शक्य तो ती आपल्या बेडरूम मध्येच असेल.कारण
सुनबाई ....?"
" काय म्हणालात तुम्ही तिला ....सुनबाई ?"
" हो सुनबाईच नाही का ती ?"
" झालेली का होणारी ?"
" काय म्हणायचंय तुला ?"
" काही नाही हो, थोडी मस्करी केली.असे म्हणून तो तेथून बाहेर पडला. जेव्हा तो हॉल मध्ये आला तशी त्याची
आई आपल्या बेडरूममध्ये जाताना दिसली.तशी त्याने
हांक मारली.तशी थांबली नि मागे वळून म्हणाली,"काय रे,
काय हवंय का तुला ?"
" मला काही नको मी माफी मागायला आलोय ?"
" कशाबद्दल माफी ?"
" मघाशी मी तुला जे बोललो त्याबद्दल."
" अंगात शिरलेले भूत गेलं वाटतं ?"
" हो.बाबांनी समजावले मला."
" अरे,थोडे राजाराम चे गुण घे. तो कसा वागतोय आणि
तू कसा वागतोयेस ?" खरं तर कंदन ला राग आलेला असतो आपल्या आईचा.कारण ती त्याच्या वैऱ्यांचे गुण गात होती ती पण त्याच्या समोर.पण तो त्यावेळी काहीच
बोलला नाही.कारण तसं करणं त्याच्या पुढील चालीस
धोकेदायक ठरलं असतं. म्हणून तो गप्प राहिला.फक्त
इतकंच म्हणाला," हो आई, तू सांगशील तसाच वागेन मी !" असे म्हणताच अरुंधती खुश होत म्हणाली," माझे
गुणांचे बाळ ते." असे म्हणून त्याला आपल्या हाताने
चाचपून त्याच्या तोंडावरून आपला प्रेमळ हात फिरवला.
त्याच वेळी जर तिला पाहता आलं असतं तर तिला
जाणवलं असतं की त्याच्या डोळ्यात या क्षणी किती
अंगार भरला आहे तो.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा