Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

प्रेमासाठी काहीही ६ | मराठी स्टोरी, मराठी कथा,मराठी शॉट स्टोरी, मराठी ❤ स्टोरी

प्रेमासाठी काहीही ६
प्रेमासाठी काहीही ६

 


      परंतु तिने पाण्यात उडी मारल्यानंतर तिचे डोके खरोखरच
एका शिळेवर आपटले.ठरल्या प्रमाणे मदन ने तिला वाचवले.परंतु तिचा खरोखरच स्मृतिभ्रंश झाला. तिचा
भाऊ जेव्हा तिला भेटायला आला तेव्हा तिने त्याला ओळखले नाही.उलट तिने विचारले ," आपण  कोण ? मी
आपल्याला ओळखत नाही." हे ऐकून सूंदर तर दुःखी झाला. परंतु मदन मात्र खुश झाला. कारण ती पहिल्या
जीवना विषयी सारे काही विसरली होती. पण गोष्ट मात्र  विचित्र घडली आणि  ती गोष्ट  म्हणजे मीराच्याच वयाच्या एका  मुलीचा मृतदेह मु नदीच्या तीरावर सापडला. परंतु त्या मृतदेवाच्या तोंडावर अनेक जखमा झाल्याने तो मृतदेह कोणाचा आहे हे कळायला  काही  मार्ग नव्हता. म्हणून पोलिसांनी मीरा च्या घरच्यांना बोलविले तेव्हा सुंदर ने त्या गोष्टींचा फायदा घायचा  ठरविला आणि तो मृतदेह मीरा चाच आहे, असे सुंदर ने सांगितले. परंतु पोष्टमार्टम मध्ये तिचा गळा घोटून तिला ठार मारल्याचे सिध्द होताच सूंदर खुश तर झाला. परंतु तिच्या गळ्यावर कोणाच्याही हाताचे ठसे न सापडल्याने मोहन निर्दोष सुटेल असे वाटले सुंदरला. परंतु ती मुलगी तीन महिन्यांनी प्रेग्नेंट असल्याचे ही सिद्ध झाल्यावर सुंदर ने दुसरी चाल खेळली. डॉक्टर ना पैशांचे अमिश दाखवून डी एन ए टेस्ट रिपोर्ट बदली करून मोहन त्या बाळाचा बाप असल्याचे सिध्द करविले. शेवटी
काय मोहनच गुन्हेगार असल्याचे सिध्द होऊन मोहनला
१४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. इकडे
सुंदर खुश कारण त्याच्या मार्गातील काटा कायमचा दूर
झाला.आणि तिकडे मदन खुश झाला. कारण मीरा चा
स्मृतिभ्रंश झाल्याने तिला मागील काही आठवत नव्हतं
त्याचा फायदा मदन ने घेतला. मदन तिला घेऊन मुंबईला
गेला.
     

   
आता इथून पुढे


    मीरा ला मुंबईला तातडीने घेऊन यायचे कारण म्हणजे
राधा ने मीरा बस स्थानक वर पाहिले. नशीब तेवढ्यात
बस आली नि मीरा त्यात चढली नि बस सुटली. नाहीतर
फार मोठा घोटाळा झाला असता आणि सर्वांत महत्त्वाचे
म्हणजे राधा ने ही गोष्ट सुंदर ला सांगितली अन्  सुंदर ने
मला म्हणून मी ताबडतोब मीरा ला मुंबईला घेऊन आलो. परंतु मीरा त्याला पत्नी मानण्यास तयार नव्हती. तिचं असं होतं की जोपर्यंत माझी स्मृती परत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आपला नवरा म्हणून स्वीकार करणार नाही. त्यामुळे मोहन ची फार पंचाईत झाली. मीरा चं प्रेम मिळविण्यासाठी त्याने सूंदर ला साथ दिली. परंतु फायदा काय त्याचा ? स्मृती वापस आल्यावर ती त्याचा थोडीच स्वीकार करणार आहे ? म्हणून तो मोठ्या चिंतेत पडला. तिकडे सूंदर राधाशी लग्न करण्यासाठी राधाच्या घरच्याना राजी केलं. परंतु अजून राधा लग्नाला होकार देत नव्हती. कारण तिचं मन अनु ही हे मान्य करायला नव्हतं की मोहन असं काय करील म्हणून. कारण तिने त्याला प्रपोच केल्यानंतर ही त्याने कधी त्याचा  गैरफायदा नाही घेतला. साधं किस देखील घेतले नाही त्याने कधी तिचे. असा व्यक्ती खुना सारखा मोठा गुन्हा कसा काय करू शकेल ? ह्या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नव्हता. पण मग पोष्टमार्टम चे रिपोर्ट ? ते खोटे पण तर असू शकतात ना, शिवाय आज काल पैशांची सगळं काही विकत घेता येतं.
असा ही एक विचार तिच्या मनात येऊन गेला. पण लगेच
दुसरा विचार मनात आला की  पण मग पोलिसांना मिळालेली डेटबॉडी मीरा ची नव्हती तर दुसऱ्या कुणाची होती ? काही ही कळत नाहीये आणि दुसरे ह्या गावात कुणी बेपत्ता झाल्याची बातमी ही कुठं ऐकण्यात नव्हती
अश्या परिस्थिती मध्ये कसे काय ओळखायचे. म्हणजेच याचा अर्थ खरे काय नि  खोटे काय  कसे ओळखायचे काहीच कळत नाहीये. म्हणून राधा अजून लग्नास तयार होत नव्हती. परंतु तिची आई म्हणाली," तुला सुंदरशी लग्न करावे लागेल. कारण तुम्हां लोकांचे लग्न तुमच्या बालपणीच ठरलं आहे."


    " पण आई, मी मोहन शी प्रेम करते."
    " मोहन.....पुन्हा नाव काढून नकोस त्याचं ह्या घरात.
एका मुलीचं जीवन बरबाद तर केलंच आणि शेवटी जीव
पण घेतला त्याने. अश्या नीच माणसाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती."
     " आई , काय बोलतेस तू ? तुला माहीत तरी आहे काय मोहन कसा आहे तो ?"
    " आणि मला तो जाणून घ्यायची गरज देखील वाटत
नाहीये."
    " अगं पण आई , तू माझा विचार का करत नाहीयेस ?"
    " तुझा विचार करते म्हणूनच तर तुझं लग्न मी सुंदर
शी ठरविलं आहे."
      " पण मला सुंदर शी लग्न करायचं नाहीये."
      " अगं पण अगोदर तूच म्हणालीस ना , की तुला  सुंदरशी लग्न करायचं आहे म्हणून.मग आता काय झालं ?
कुठं माशी शिंकली ?"
    " आई, अगोदर   इतरां प्रमाणे मला ही वाटलं की मोहन
च अपराधी आहे म्हणून. परंतु त्या दिवशी मीरा ला पाहिलं.... ?" असे म्हणताच त्यांनी आश्चर्याने विचारले,
     " मीरा ला पाहिलेस कुठं ?"
     " अगं बस स्थानक वर उभी होती. मी तिला भरपूर
हाका मारल्या पण तिने माझ्या कडे पाहिलं देखील नाही.
म्हणून मी तिच्या जवळ जात होते इतक्यात बस आली
तशी ती बस मध्ये चढली नि बस सुटली."
    " पण ती नक्की मीराच होती ना ?"
    " हो गं आई मी ओळखत नाही का तिला ?"
    " पण मग ही गोष्ट सूंदर ला सांगितलंस ?"
    " सांगितली पण तो ही तुझ्यासारखाच म्हणाला. ती
मीरा कशी असेल नि ती जर मीरा होती तर ती घरी का
आली नाही?"
    " त्याचं ही म्हणणं खरं आहे, ती जर मीरा असती तर
आपल्या घरी आली असती ना ?"
    " तेच गौडबंगाल काय आहे ते मला कळत नाहीये."
    " अगं पण तो भास पण तर असू शकतो ना ?"
    " भास ....छे मला नाही वाटत तो भास होता."
    " ते काही मला माहित नाही. पण तुझं लग्न सुंदरशीच
होणार ."


    " आणि  पण मी तुला स्पष्ट शब्दात सांगते की जोपर्यंत
मिराच्या मृत्यू बद्दल रहस्य उघड नाही तोपर्यंत मी सुंदर शी
करणार नाहीये." असे म्हणून तेथून निघून गेली. राधाची
आई तिच्या पाठमोरी आकृती कडे पाहत म्हणाली," आता काय।करू मी ह्या पोरीचं ? लग्नाच्या साऱ्या तयारी झाल्या नि ही आता नाही म्हणते." राधा पोलीस स्टेशनला गेली नि
तिने आपली तक्रार नोंदविली की मीरा जिवंत आहे मी
तिला बस स्थानक ला पाहिले. पोलिसांनी तक्रार नोंदवून
घेतली. पण त्यांना ते खरं वाटलं नाही. कारण नदीच्या
तीरावर सापडलेला मृतदेह मीराचाच होता हेही सिध्द
झालं नि तिच्या खुन्या ला शिक्षा पण झाली आणि ही
मुलगी सांगते की हिने मीरा ला पाहिले. हे कसं शक्य आहे ? पण तरी  इन्स्पेक्टर जयदेव ने कॉन्स्टेबल शिंदे ला तक्रार नोंदवून घ्यायला सांगितली. आणि लवकरच आम्ही त्याचा तपास करू असे आश्वासन ही दिले. राधा निघून गेल्यानंतर  ४० ते ४५ वर्षाच्या आसपास असलेले एक जोडपे पोलीस स्टेशनला आले नि त्यांनी पोलिसांकडे  तक्रार केली की आमची मुलगी गेल्या महिन्यापासून बेपत्ता आहे. तिचा शोध घ्या साहेब. तेव्हा इन्स्पेक्टर जयदेव ने विचारले की जर मुलगी महिन्यापासून बेपत्ता आहे तर तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार तुम्ही इतक्या उशिरा का नोंदवायला आलात आहात पोलीस स्टेशनला ?" त्यावर ती महिला म्हणाली , " आमच्या जावई बापूनी त्यांच्या गावच्या पोलीस स्टेशनला पोलीस कप्लेट दिली आहे साहेब. त्यावर इन्स्पेक्टर जयदेव ने कोणत्या पोलीस स्टेशनला ?" त्यावर ती म्हणाली," ते आता आम्हाला
कसं माहीत असणार साहेब ?" त्यावर इंस्पेक्टर जयदेव
म्हणाला," बरं त्यांच्या गावाचं नाव सांगता का ?"


    " हो गुरवली !"
     " बरं आता तुमच्या जावई बापूचे नाव सांगा नि
त्यांच्या घरचा पत्ता ?" त्या महिलेने जावयाचे नाव आणि
त्यांच्या घरचा पत्ता सांगितला.
    " मग तिकडच्या पोलिसांनी काय सांगितले ?"
    " काय सांगणार , पोलीस तपास सुरू आहे म्हणतात
बस." इन्स्पेक्टर जयदेव म्हणाले," बरं तुमच्या मुलीचा
एखादा फोटो वगैरे आहे का आता तुमच्या जवळ ?"
   " हो आणला आहे." असे म्हणून त्या  माणसाने
आपल्या मुलीचा फोटो काढून इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात दिला. तो फोटो पाहून इन्स्पेक्टर जयदेव च्या
डोळ्यासमोर मीरा चा मृतदेह उभा राहिला. तेव्हा इन्स्पेक्टर जयदेवच्या मनात एक विचार आला
की तो मृतदेह मीरा चा नसून ह्यांच्या मुलीचा तर नसेल
ना ? पण पोष्टमार्टमचा रिपोर्ट तर तो मृतदेह मीराचा आहे.
असं सिध्द झाले होतं. डॉक्टर ला पैसे देऊन खोटा रिपोर्ट
तर करून घेतला नसेल ना ? पण असं कोण कशाला करील ? पण मोहन चं म्हणणं होतं की तो मीरा चा मृतदेह
नाही म्हणून. कुठंतरी पाणी मुरतंय हे खास. ह्याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे." असा मनात विचार करून
इन्स्पेक्टर जयदेव त्या दांपत्यास विचारले ," तुमची
मुलगी प्रेग्नेंट होती काय हो मावशी ?" लगेच ती  महिला म्हणाली," होय. नुकतेच तीन महिने झाले होते तिला ?" इन्स्पेक्टर जयदेवची लगेच विचारचक्र फिरली. म्हणजे पोष्टमार्टम चे रिपोर्ट खोटे होते की काय ? नक्कीच
काहीतरी घोळ आहे त्याचा शोध घ्यावाच लागेल.असा
मनात विचार करून इन्स्पेक्टर जयदेव म्हणाले," मावशी
हे एक सांगा तुमचे जावई बापू कोणत्या गावचे ?"
    " आमचे जावई ना, पडले गावचे."
   " हो का त्यांचे नाव आणि त्यांचा घरचा पत्ता देता का तेवढा."
    " हो देते ना !" असे म्हणून त्या म्हातारीने जावई बापूचे
नाव आणि घरचा पत्ता दिला." तेव्हा इन्स्पेक्टर जयदेव
म्हणाले ," मावशी तुमचा कोणावर संशय वगैरे आहे का ?"
   " नाही."
   " मावशी स्पष्ट विचारतो म्हणून राग मानू नका."
   " काय विचारायचं आहे ते विचारा ?"
   " तुमचा जावई आणि  तुमची मुलगी यांचे वैवाहिक जीवन कसे होते ? म्हणजे आपसात त्यांचा काही वाद तर नव्हता ना "
     " नाही हो, माझा जावई फार देव माणूस आहे, त्या
दोघांमध्ये कसलाच वादविवाद नव्हता."
     " बरं या तुम्ही या आम्ही शोध घेतो त्यांचा ?"
त्यानंतर ते दांपत्य निघून गेल्यानंतर इन्स्पेक्टर जयदेव
म्हणाला," कॉन्स्टेबल शिंदे मला वाटतं आपली दिशाभूल केली गेली आहे."
     " ती कशी काय साहेब ?"
     " मघाशी जी मुलगी पोलीस स्टेशनला आली तिचे
म्हणणे आहे की तिने मीरा ला पाहिलं आणि आता जे
दांपत्य आलं त्यांचं म्हणणं आहे की त्यांची मुलगी बेपत्ता
आहे. शिवाय त्यांची मुलगी ती महिन्याची प्रेग्नेंट होती.
आणि आपल्याला जी डेटबॉडी मिळाली ती तरुणी सुध्दा
प्रेग्नेंट होती. आणि मोहन चे म्हणणे होते की मीरा प्रेग्नेंट
नव्हती. याचा अर्थ काय ?"


    " साहेब आपले म्हणणे असे तर नाही ना की आपण
ज्या डेटबॉडी ला मीरा ची डेटबॉडी समजलो ती मीरा ची
नव्हतीच !"


    " अगदी बरोबर मला तेच म्हणायचंय."
    " असे जर असेल तर नक्कीच मिराच्या भावाचा काहीतरी बनाव असावा."


     " तू एक काम कर, सुंदर विषयी माहिती काढ.मोहन
ला केस मध्ये अडकविण्या मागचा उद्देश काय ? तोपर्यंत
मी  टिटवाळा पोलीस स्टेशनला फोन करून चौकशी करतो. असे म्हणून त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला तर त्यांनी उत्तर दिलं अजून पोलीस तपास सुरू आहे. घरातून जाताना ती माहेरी जाते म्हणून सांगून गेली ती ना माहेरी पोहोचली. ना घरी परत आली. " तुम्ही तिच्या नवऱ्या रिमांड मध्ये घ्यायचं होतं ना ? म्हणजे
खरं खोटं काय ते कळलं असतं ?" त्यावर तिकडचे इन्स्पेक्टर म्हणाले ," तिच्या नवऱ्याचा हात नाहीये त्यात."


    " हे कशावरून सांगताय तुम्ही ?"


    " आम्ही तिच्या नवऱ्या बद्दल शेजाऱ्या पाजाऱ्या कडे
चौकशी केली.परंतु कोणाकडून ही कळले नाही की त्या
दोघांमध्ये कधीच भाडणं वगैरे झालेले नाही.त्या दोघांचा
सुखाचा संसार  सुरू होता. मग मला सांगा कोणत्या
आरोपा खाली त्याला अटक करायची ? "


    " साहेब बऱ्याच वेळा असं आढळून येते की तिचा नवराच तिचा खुनी असतो." एवढं बोलून त्याने फोन कट केला. त्यानंतर पोलिसांनी शोध चौकशी सुरू केली तशी बरीचशी माहिती समोर आली. तेव्हा मग पोलिसांनी संशया वरून सुंदर ला अटक केली. अगोदर तर काहीच सांगायला तयार नव्हता पोलिसांनी आपला खास खाक्या दाखवताच तो पोपटानी बोलू लागला. त्याने कबूल केले. त्याची बहीण जिवंत आहे नि मुंबईला त्याच्या मित्राच्या घरी आहे आणि मोहन निर्दोष आहे , त्याने हे देखील कबूल केलं की खोटे पुरावे त्यानेच डॉक्टर ला पैसे देऊन तयार करून घेतले गेले होते. हे सर्व करण्या मागचे कारण
विचारले असता. तेव्हा एक नवीन महिती उजेडात आली
की केवळ राधा मोहन पासून दूर व्हावी ! हाच त्या मागचा
खरा उद्देश होता. बाकी पोलिसांना मिळालेला मृतदेह कोणाचा आहे ते माहीत नाही. मग त्याच्या मित्राच्या घरचा पत्ता घेऊन पोलिसांचे एक पथक मुंबईला आले नि मदन आणि मीरा या दोघांनाही अटक करून गावाला घेऊन आणले आणि त्या  दोघांची कसून चौकशी केली तेव्हा एक नवीन माहिती पुढे आली की हे सारे आपले प्रेम मिळविण्यासाठी हे सारे कुभांड रचले गेले . मिराला जेव्हा तिचं नाव विचारण्यात आले तेव्हा मीरा ने सांगितले की
मला माझे नाव आठवत नाहीये.परंतु माझा नवरा म्हणतोय की माझं नाव नीरा आहे म्हणून. परंतु मला खरोखरच काही आठवत नाही. शिवाय तिने आपल्या आई-वडिलांना ही ओळखले नाही परंतु  सूंदर ला पाहताच मात्र त्याला डॉक्टर या  नावाने हांक मारली.त्याच्या जवळ जाऊन म्हणाली, डॉक्टर आता तुम्हीच सांगा की मला माझ्या पहिल्या जीवना विषयी काहीच आठवत नाही. तेव्हा पोलिसांच्या द्यानात आले की मिराचा खरोखरच स्मृतिभ्रंश झाला आहे, मग त्यांनी तिला फार काहीही न विचारता. सोडून दिले. मग पोलिसांनी मोहन निर्दोष असल्याची सरकार ला दिली त्याची सुटका व्हावी अशी विनंती ही केली. आणि त्या  प्रमाणे मोहन ची निर्दोष म्हणून सुटका पण झाली. सूंदर आणि त्याचा मित्र मदन ह्या दोघांना पोलिसांची दिशाभूल केली म्हणून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा त्या मिळालेल्या मृतदेह वळविला. त्या बाईचा खून कोणी आणि का केला ?

  क्रमशः





    
  



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..