अखंड सौभाग्यवती भव ४ |मराठी ❤ स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा, मराठी स्टोरी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अखंड सौभाग्यवती भव ४ |
मधुचंद्र साजरा करून एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर प्रिया ने अगोदर स्नान केले. किचनमध्ये जाऊन चहा-नाश्ता तयार केला नि मग राज ला उठवायला गेली. पण राज काही उठेना म्हणून त्याच्या गालात चावायला गेली तशी राज ने तिला पकडून आपल्या मिठीत घेतले. तशी प्रिया म्हणाली,
" मिस्टर उठा आता, वाजले किती ते बघा अगोदर."
" ते वाजू देत गं , ते काय आपल्यासाठी थांबणार आहे
का ?"
" ते नको थांबू दे, तुम्ही अगोदर चहा नाश्ता करून घ्या."
" ते नाश्ता कोणाला पाहिजे ? तू जवळ असताना ?"
" पुरे हां हा चावटपणा ! सकाळी सकाळी देवाचे
नाव घ्यायचे सोडून हे काय नको ते."
" देवाचं नाव मंदिरात हे काय मंदिर आहे ?" असे
म्हणून तिला किस करतो.तेवढ्यात बाळ उठलं.तशी
म्हणाली ," सोडा मला.बाळ उठलं बघा."
" हे बाळ पण ना, नको तेव्हाच उठते."
" शी ss असं बोलतात आपल्या बाळा बद्दल."
" बरं राहिलं आमचं." असे म्हणत आळस देत उठला.
चादर एका बाजूला भिरकावली नि वाँश रूम मध्ये शिरला.
आता इथून पुढे -
प्रिया ने बाळाला घेतले आणि त्याला स्तनपान करविले
तसे ते खेळायला लागले. प्रिया उठली नि किचनमध्ये गेली
आणि चहा-नाश्ता डायनींग टेबल वर घेऊन आली. तेवढ्यात राजाराम पण फ्रेश होऊन आला. त्यानंतर दोघांनी मिळून चहा- नाश्ता केला नि मग फेरफटका
मारण्यासाठी ते दोघेही बाळाला घेऊन निघाले. प्रथम
पुढील डोअर ओपन केला. तेव्हा बाळाला घेऊन प्रिया
बसली. त्यानंतर मोटारीच्या दुसऱ्या बाजूला येऊन राज
मोटारीत बसला नि मोटार निघाली. काही वेळातच राज च्या ध्यानी आले की मोटारीचा ब्रेक फेल आहे. मग राज
घाबरला आणि प्रिया ला म्हणाला," प्रिया , गाडीचा ब्रेक
फेल आहे." तशी प्रिया घाबरून म्हणाली ," आता काय
करायचं ? " तेव्हा राज म्हणाला," तू एक काम कर. दरवाजा उघड नि बाळाला घेऊन बाहेर उडी मार."
" आणि तुम्ही ?"
" तू माझा विचार करू नकोस. स्वतःचा नि आपला बाळाचा प्राण वाचव."
" नाही. मेलो तर आपण तिघेही एकसाथ मरू ?"
" अगं काय वेड्या सारखं बोलतेस तू ? माझा नाही
निदान आपल्या बाळाचा तरी विचार कर."
" नाही तुम्ही नाही तर मला ही जगायचं नाही. जे काही
होईल ते सोबतच होईल." प्रिया काही ऐकायला तयार नाही हे पाहून राज ने तिच्या बाजूचे डोअर ओपन करून
तिला जबरदस्तीने बाहेर लोटून दिले. प्रिया बाळा सहित
बाहेर फेकली गेली. मार लागला पण जीव वाचला
दोघांचा ही राज मात्र गाडीतच होता. ह्यांना बाहेर लोटण्याच्या नादात त्याचे समोरून येणाऱ्या ट्रक लक्ष नव्हते. पण जेव्हा लक्ष गेले तेव्हा फार उशीर झाला होता. आता दोघांची टक्कर तर होणारच होती. ती वाचविण्यासाठी स्टेरींग गर्रकन फिरविली त्यामुळे मोटर गर्रकन वळून सरळ उंचनावरून दरीत कोसळली. ते भयानक दृश्य पाहून प्रिया मोठ्या ने किंचाळली. चक्कर येऊन खाली कोसळणार तोच तिथं जमलेल्या लोकांनी तिला सावरली. बाळ मोठ्या ने रडू लागले. कोणीतरी पाणी आणले नि तिच्या तोंडावर मारले. तेव्हा ती हळूहळू शुध्दीवर आली. कुणीतरी पोलीस स्टेशनला फोन करून घडलेल्या घटनेची खबर दिली थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी राजचा शोध घेण्यास सुरुवात केली. मोटार जिथं पडली होती तिथं पेट घेतला होता. परंतु डोअर ओपन असल्याने राज बाहेर फेकला गेला होता. मोटारी पासून काही अंतरावर जख्मी आणि बेशुध्द अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी लगेच त्याला इस्पितळात घेऊन जाण्याची व्यवस्था केली. प्रिया देखील पोलिसांच्या जीप मध्ये बसून इस्पितळात आली. राजला इमर्जन्सी वार्ड मध्ये शिफ़्ट करण्यात आले. प्रिया आणि बाळ ह्या दोघांच्याही जखमांवर इलाज करण्यासाठी त्या दोघानाही अपघात वार्ड मध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी प्रियाच्या मोबाईल वरून मुंबईला फोन केला. अरुंधती ने तो फोन उचलला. तेव्हा पोलिसांनी घडलेल्या दुर्घटने बद्दल ची माहिती त्याना दिली. ते ऐकून अरुंधती च्या हातातील रिसिव्हर गळून खाली पडला. तेव्हा तिथं उभे असलेले कचेश्वरांनी ते पाहिले नि तिच्या जवळ येत त्यांनी विचारले, " अरु कोणाचा होता गं तो फोन ?"
" पोलिसांचा."
" पोलिसांचा ....काय म्हणत होते पोलीस ?"
" राजाराम च अक्सिडेंट झालंय."
" काय ? राजचं अक्सिडेंट झालं ? कसं आणि कुठं
आहे तो ?"
" इस्पितळात आहे, ऑपरेशन सुरू आहे आपल्याला
जायला हवं."
" हो जाऊ या आपण. पण कंदन कुठं आहे ?"
" ऑफिसमध्ये गेला वाटतं."
" मग एक काम कर, लवकर कपडे बदली कर आपल्याला निघायला हवं."
" बरं मी आताच कपडे बदली करून येते." असे म्हणून
त्या कपडे बदली करण्यासाठी आपल्या बेडरूम मध्ये
गेल्या तसे कचेश्वर ने कंदनला फोन करून त्याला विचारले
की तू आता आहेस कोठे ?"
" मी ऑफिस मध्ये आहे, पण आपण असं का विचारता
आहात मला ?"
" राज चे अक्सिडेंट झालंय त्यात तुझा हात तर नाही
ना ?"
" माझा हात ....काहीतरी काय बोलताय पप्पा ? मी
असं का करेन ?"
" मी आता चालतोय इस्पितळात तेव्हा खरं काय ते
कळलंच मला ." एवढं बोलून फोन कट केला. तेवढ्यात
तिथं अरुंधती आल्या आणि म्हणाल्या," चला निघायचं ना ?"
" हो , चल." असे म्हणून दोघेही बाहेर पडले. मोटारी
जवळ ड्रायव्हर उभा होता त्याने पटकन मागचा डोअर
ओपन केला. तसे अरुंधती आणि कचेश्वर आंत बसले.
तसा ड्रायव्हर ने त्यांचा दरवाजा बंद केला नि दुसऱ्या
बाजूला जाऊन पुढील डोअर ओपन करून ड्रायव्हर
सीट वर बसला. प्रथम सेफ्टी बेल्ट लावला नि मोटार
स्टार्ट केली.
ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन सुरू होते आणि
बाजूच्या वार्ड मध्ये प्रिया आणि बाळ ह्या दोघांच्याही
जखमांवर बँडेज केले होते. तेवढ्यात तेथे कचेश्वर आपल्या पत्नी सह पोहोचले आणि सर्व प्रथम ते रिसेप्शननीस ला विचारले की इथं राजाराम परब ना कोणत्या वार्ड मध्ये ऍडमिट केलं आहे ते सांगा. तेव्हा ती रिसेप्शनीसने सांगितले की ते ओटीपी मध्ये आहेत. त्यांचे ऑपरेशन सुरू आहेत. तेव्हा कचेश्वर विचारले की त्यांच्या सोबत त्यांची पत्नी प्रिया नि एक बाळ पण होते ते कोणत्या वार्ड मध्ये आहेत सांगा. " तेव्हा ती रिसेप्शनीस म्हणाली," त्याना बाजूच्या वार्ड मध्ये दाखल केले आहे. त्या सुखरूप आहेत. कचेश्वर आणि त्यांची पत्नी अरुंधती तिने सांगितलेल्या वार्ड मध्ये जातात आणि प्रियाला जाऊन भेटतात आणि विचारतात काय झालं नि कसं झालं ? वगैरे वगैरे
कंदन आपल्या केबिन मध्ये असतो तो कोणाला तरी
फोन वर दम देत असतो. " अरे मूर्ख माणसा ! तुला मी काय सांगितले होते नि तू काय करून बसलास ? आज
जर त्या बाळा ला काय झालं असतं तर माझ्या साऱ्या
मेहनतीवर पाणी पडले असते." तेव्हा पलिकडील व्यक्ती
म्हणाली," काय करू साहेब, त्या मॅडम सतत त्याच्या सोबत असतात. त्या परब साहेबांना एकटे कधी सोडतच
नाहीत मग मी माझं प्लॅन यशस्वी कसं करणार म्हणून मी
म्हटलं सुख्या सोबत ओलं ही जळतच ना, मग काय
करून टाकले काम फत्यं ! " त्यावर कंदन म्हणाला," जर कामं बरोबर करता येत नाहीत तर सुपाऱ्या घेता कशाला
रे ?" कंदन चा राग अजूनही कमी झालेला नव्हता.परंतु
कॉन्ट्रॅक्ट किलर ला हे कळत नाही की कंदन साहेब ना
त्या बाई आणि मुला विषयी इतकी आपुलकी का ? परंतु
त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर कसे मिळणार होते ? म्हणून
अंदाज लावला की कंदन साहेबांचे त्या बाईशी नक्कीच
अनैतिक संबंध असावेत आणि ते बाळ त्यांच्या अनैतिक
संबंधातून ते बाळ जन्माला आले असावे. बहुदा हेच कारण असावे. असा विचार करून त्याने आपले बाकीचे पैसे मागितले तर कंदन रागाने म्हणाला," एक पैसा मिळणार नाही सांगितलेले काम नीट करता येत नाही मग पैसे कशाचे मागताय? " त्यावर कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणाला," मी माझं काम व्यवस्थित पार पाडलं आहे,आता त्यात कोण मरेल नि कोण जगेल ते मला माहित नाही मी माझं काम केलं आहे तेव्हा मला माझे पैसे पाहिजेत बस्स !" तेव्हा कंदन देत म्हणाला ," आणि नाही दिले तर ?"
" हे बघा , पैसे नाही मिळाले तर जवळच पोलीस स्टेशन
आहे तिथं जाऊन सगळं सांगून टाकीन अक्सिडेंट कसं
झालं नि कोणी केलं ते." तेव्हा कंदन म्हणाला," तुझ्या
अकाउंट ला पैसे ऑनलाईन ने ट्रान्सफर करतो. असे
म्हणून त्याने फोन कट केला. पण गोष्ट कोणा जवळ बोलू
नकोस."
दोन तास ऑपरेशन सुरू होतं. बाहेर कचेश्वर , अरुंधती आणि प्रिया बसलेली असते. ऑपरेशन थिएटर म्हणून नर्स बाहेर येते तेव्हा तिला सर्वजण घेरतात नि तिला राजाराम बद्दल विचारू लागतात तर नर्स म्हणाली,
" ऑपरेशन सुरू आहे, त्यांची कंडिशन्स फार क्लिटिकल आहे सध्या तरी काही सांगता येत नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत असतात. काही
वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात तशी प्रिया डॉक्टराना विचारू लागते की डॉक्टर सांगा राज कसे आहेत " तेव्हा डॉक्टर म्हणाले ," सॉरी ! आम्ही त्याना वाचवू शकलो नाही." असे म्हणताच प्रिया एकदम किंचाळली " नाही असं होणार नाही " असे म्हणून वार्ड मध्ये शिरली. राजाराम जवळ जाऊन म्हणाली, " तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही. असे म्हणून त्याच्या छातीवर मोठ्या ने डोके आपटते तोच एकदम त्याचा अडकलेला श्वास सुरू होतो तशी ती मोठ्या ने ओरडून डॉक्टराना बोलवून घेते. डॉक्टराना त्याचे मोठे आश्चर्य वाटते. बंद झालेला श्वास पुन्हा कसा चालू झाला ? डॉक्टरांनी ऑक्सिजन वगैरे लावला नि ते प्रिया ला म्हणाले ," तुम्ही आता जरा बाहेर जा आम्ही पाहतो काय करायचं ते." प्रिया वार्ड च्या बाहेर आली.
इतक्यात कंदन ही पोचला आणि आपल्या वडीलांकडे
राजाराम ची चौकशी करू लागला. जणू काही राजाराम ची त्याला फार चिंता आहे. कचेश्वरांनी जे डॉक्टरांनी जे
सांगितले तीच माहिती दिली आणि त्याला एका बाजूला
नेऊन विचारले की खरे सांग ह्यात तुझा काही हात तर नाही ना ? " तसा कंदन म्हणाला," मी आपल्याशी कधी खोटं बोलणार नाही, म्हणून खरं तेच सांगतोय की हे मीच घडवून आणलंय ." असे म्हणताच त्याच्या एक कानाखाली
चपराक देऊन ते म्हणाले की मी तुला सांगितले होते ना
इतक्यात काही करू नकोस म्हणून तरी केलेस."
" अजून किती वाट पहायची मी ?"
" अरे पण मूर्ख माणसा ! राज एकटा नव्हता गाडीमध्ये त्याच्या सोबत प्रिया आणि बाळ पण होतं गाडीत बाळाला काही झालं असतं म्हणजे ? इतक्या वर्षे वाट पाहीली ती वाया गेली असती ना तुझ्या ह्या क्षुल्लशा चुकी मुळे कसं कळत नाही रे तुला ?" त्यावर कंदन म्हणाला," पप्पा ही
सारी चुकी त्या कॉन्ट्रॅक्ट किलर ची मिस्टिक ! मी त्याला
सांगितले होते पण तरी देखील त्याने ही चूक केली."
" परंतु तुझी ही चूक आपल्याला किती महागात पडली
असती. कळतंय का तुला काही !"
" सॉरी पप्पा !"
" अतिघाई संकटात नेई हे माहीत असूनही पुन्हा तीच
चूक करायची. तू आता काहीच करू नकोस मी करतो
सगळं काही. समजलं का ? " कंदन ने मुकाट्याने आपली
मान डोलावली. इतक्यात डॉक्टर बाहेर आले नि म्हणाले
की हा चमत्कारच म्हणायला हवा. आता धोका टळला आहे तुम्ही आता त्याना भेटू शकता. पण एका एकाने
म्हणून सर्वात प्रथम प्रिया आपल्या बाळाला घेऊन आंत गेली तर परंतु राजाराम ने तिला काही ओळखले नाही तिला विचारले की कोण आपण ? " तेव्हा प्रिया म्हणाली, " मी आपली पत्नी ?" त्यावर तो म्हणाला," पत्नी पण माझं तर अजून लग्नच झालं नाही." तेव्हा प्रियाच्या ध्यानात येते की स्मृतिभ्रंश झाला आहे. म्हणून ती डॉक्टराना बोलवून घेते. तेव्हा डॉक्टर म्हणाले," तुम्ही जरा बाहेर जा मी बोलावतो तुम्हाला आंत." डॉक्टर पुन्हा चेकप करतात आणि बाहेर येऊन सांगतात की मधल्या
काही वर्षांपूर्वीच्या साऱ्या घटना ते विसरले आहेत.परंतु तुम्ही त्याना आठवून देण्याचा प्रयत्न करू मात्र नका. त्याना हळूहळू आठवेल किंवा त्याच जागी पुन्हा मार लागल्यावर स्मरण शक्ती परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कचेश्वर प्रियाला सांगतात की तू काही दिवस राज समोर जाऊ नकोस."
" असं कसं म्हणताय मामा मी त्यांची पत्नी आहे."
" मान्य आहे परंतु गेल्या काही वर्षा मधल्या साऱ्या
घटना तो विसरला आहे आणि आता डॉक्टर काय म्हणाले ते ऐकलेस ना त्याला मागचं काही आठवून देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या डोक्यावर विपरीत
परिणाम होऊ शकतो तेव्हा तूच विचार कर तुला काय मान्य आहे ते."
" मी तर म्हणते की तू काही दिवस आपली माहेरी जाऊन का राहत नाहीस ?"
" एकदम बेस्ट आयडिया ! प्रिया तू असंच कर, तू आपल्या मामा कडे जाऊ रहा. बरेच दिवस तू आपल्या मामाकडे गेली पण नाहीयेस.आता त्या निमित्ताने तुझं
जाणं पण होईल नि तुझ्या मामाला पण बरं वाटेल. अगदी
थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, राज ची स्मृती वापस येताच
आम्ही तुला बोलवून घेऊ. बघ काय करायचं ते तूच ठरव.
तोपर्यंत आम्ही राज ला भेटून येतो. चला रे !" तसे सर्वजण राजला भेटायला जातात. प्रिया मात्र विचारात पडते की काय करावे ? " जसा अरुंधती मामी सासू ने सुचविलेला उपाय आठवला. तसा प्रियाच्या डोळ्यासमोर मामीचा चेहरा उभा राहिला. तशी ती मनात म्हणाली की मामा कडे तर जायलाच नको. म्हणजे मामा काही बोलणार नाही उलट मामा ला मी गेल्याने आनंदच होईल. पण मामी आपल्याला नको नको ते बोलेल. त्या पेक्षा
तिथं न जाणेच योग्य शिवाय माझं असं म्हणायला या जगात राज आणि मामा शिवाय दुसरे कुणीच नाहीये. मग
काय करायचं ? जायचं का प्रशांत मामा कडे ? मामा कडे
जायला काही हरकत नाही.परंतु मामी आपल्याला बोलून
बोलून आपलं जगणं मुश्किल करील. तेही आपण सहन
केले असते.परंतु राज ना कोणाच्या भरवसा वर सोडून
जाऊ ? मामी सासू तर अंध आहेत त्याना काय माहीत पडणार ह्या कसाई लोकांच्या मनात काय सुरू आहे ते. राज ना ते एकटे सोडून चालणार नाही. म्हणजे इतकी वर्षे साध्य झाले नाही ते आता नक्कीच साध्य करण्याचा प्रयत्न ते जरूर करतील. पण मी असं होऊ देणार नाही. पण मी त्याना रोखणार कशी ? त्यासाठी मला या घरातच राहायला हवे. पण ह्या घरात मी राहणार कशी ? नाही
म्हणजे काहीतरी नाते हवे ना या घरात राहण्याचे. असं
काय करू म्हणजे मला घरात राहता येईल. जेणे करून
मला त्यांची सेवा ही करता येईल नि ह्या दोघांवर नजर
पण ठेवता येईल ? असा विचार करून किंचित विचारमग्न
झाली नि अचानक तिची ट्यूब पेटली. तशी तिने हर्षभराने
दोन बोटांची चुटकी मारली नि म्हणाली," हां हा उपाय सगळ्यात बेस्ट ! " असा विचार करून ती घरी परतली.
राज ला भेटायला सर्वजण वार्ड मध्ये गेले. तेव्हा राज ने फक्त कचेश्वर मामा ना बरोबर ओळखले. कारण
ते कधी कधी आजोबांना भेटायला यायचे म्हणून त्याना तो ओळखत होता. मग कचेश्वर मामांनी आपल्या पत्नी ची
मुलाची ओळख करून दिली. मामा म्हणाले," ही तुझी मामी आणि हा तुझा मामेभाऊ कंदन." राज ने विचारले,
" मघाशी जी बाई मला भेटायला आली ती कोण होती? तसा कंदन चट्कन म्हणाला," माझी बायको ." त्यावर राज ने विचारले," तुझी बायको पण तू कधी लग्न केलेस ?
नाही म्हणजे तू लग्न केलेस नि आम्हाला बोलविले ही
नाहीस म्हणून म्हटलं." तसा कंदन गडबडला. तसे कचेश्वर मामानी सावरून घेत म्हणाले," म्हणजे त्याला असे म्हणायचंय की ती अजून त्याची बायको झाली नाही आहे
पण लवकरच होईल. " असे म्हणून ते कंदन कडे पाहून
आपल्या डोळ्यांनी इशारा करत म्हणाले," हो ना रे, असंच म्हणायचं होतं ना तुला ?" तसा कंदन चट्कन म्हणाला,
" अगदी बरोबर , असंच म्हणायचं होतं मला."
" पण ती तर मला आपला नवरा सांगत होती ?"
" त्याचं काय ती जरा वेडसर आहे. तिचा नवरा तिला
सोडून गेल्यापासून तिला कधी कधी असे वेड्याचे झटके
येतात नि मग समोर दिसेल त्याला आपला पती समजते."
" असं काय ? फार वाईट घडलं त्या बिच्चारी सोबत."
" म्हणूनच मी तिच्या लग्न करून तिला आधार द्यायचा
विचार केला आहे."
" वाहवा ! फार चांगली गोष्ट आहे, परंतु ती इथं काय
करते ? म्हणजे मला म्हणायचंय की इस्पितळात का आली
आहे ? " तसे त्याच्या ध्यानात येते की तिच्या डोक्याला
बँडेज बांधलेले होते. याचा अर्थ तिला देखील मार लागल्या
मुळे इस्पितळात आणले असेल. असा विचार करून तो
म्हणाला," मी पण किती बुध्दू आहे , तिच्या डोक्याला
बँडेज बांधलेले असून सुध्दा विचारतोय ती इथं कशाला
आलीय ? जाहीर शी गोष्ट आहे इथं इलाज करायला
आली असेल ना ?" असे म्हटल्यामुळे कंदन ला पुढे काय
बोलावे ते सुचले. तो म्हणाला," सकाळी जिन्यावरून पाय
घसरून ती खाली पडली नि तिच्या डोक्याला मार लागला
म्हणून आम्हीच आणलं तिला इस्पितळात."
" बरं झालं तू तिला घेऊन आलास ते, बिच्चारी चे कोणीच नसेल ना ?"
" हो ना ? म्हणून तर आणलं.शिवाय आपली ती जबाबदारी होती कारण आपल्याच घरी काम करते ना ती ? म्हणजे घरकाम ...कोणाचाही आसरा नाही ना तिला ?"
" फार चांगले केलेस हो ! " तेवढ्यात अचानक त्याला
आजोबांची आठवण झाली. तसे त्याने विचारले ," पण
आजोबा कोठे आहेत ? ते का नाहीत आलेत मला
भेटायला ?" आता काय करायचं ? काय सांगावे बरं ?
असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला ? कोणीच काही बोलत
नाही म्हणून राज सर्वांकडे पहात म्हणाला," अरे असे काय
बघताय माझ्याकडे ? बोला ना काहीतरी ? तेव्हा कचेश्वराना जे सुचले ते बोलून मोकळे झाले.म्हणाले की,
आता तुला कसं राज त्याना काय झालं ते ?"
" सांगा ना ?"
" तुझ्या सोबत बाबा सुध्दा त्या मोटारीत होते.त्यात तू
वाचलास पण बाबा देवाघरी गेले."
" अरे देवा काय घडलं हे माझ्या हातून ? मी इतका कर्म
दरिद्री की मला त्यांचं अखेरचे दर्शन ही झालं नाही."
" जाऊ दे घडायचं होतं ते घडलं. त्याला तू काय करणार ?" कचेश्वर उद्गारले
एक खोटे पचविण्यासाठी किती खोटे बोलावे लागते.
खोट्यावर खोटे आणि त्यातही काही माणसे इतकी
तरबेज असतात कि समोरच्या व्यक्तीला ते कळत ही नाही
समोरचा माणूस आपल्याशी खोटे बोलतोय आणि खोटे
काय खोटे बोलावे ते पण पट्कन सुचतं. त्या उलट खरे बोलणाऱ्याला मात्र खोटे बोलताच येत नाही.म्हणजे त्याला ते सुचत ही नाही पट्कन त्यामुळे होतं काय तो पट्कन खरेच बोलून मोकळा होतो. त्यामुळे कधी कधी तो अडचणीत पण येतो. पण असं म्हणतात की उद्देश चांगला असेल तर खोटं बोलले तर हरकत नाही. आता इथंच पहा ना कंदन इस्पितळातून घरी आल्यानंतर तो सरळ प्रियाच्या बेडरूम मध्ये गेला त्याला पाहून प्रिया भयंकर त्याच्या वर चिडली ती त्याला म्हणाली," तुझी हिंम्मत कशी झाली माझ्या बेडरूम मध्ये येण्याची ?"
" मी तुला काही महत्वाचे सांगायला आलोय राजच्या
हितासाठी तुला सावध करायला आलोय की राज समोर
तू कधी येऊ नकोस कारण राज तुला पूर्णतः विसरला
आहे, म्हणजे तुला तो भेटण्यापासून ते आतापर्यंतच्या काळात काय घडलं ते सारे राज विसरला. तेव्हा तुला तो
ओळखत नाहीये. तेव्हा त्याला ते आठवून देण्याचा तू प्रयत्न करू पण नकोस, हेच सांगायला आलो होतो मी इथं. तुझी ओळख सांगताना मी सांगितले आहे की तू ह्या घरची नोकरांनी आहेस. तेव्हा मोलकरीणीचे काय काम असते तेवढंच फक्त तू करायचं आणि आजपासून तू इथं राहायचं नाही तर आमच्या जुन्या घरी जाऊन राहायचं."
" ते का म्हणून ? मी हे घर सोडून कुठंही जाणार नाही."
" राज साठी पण जाणार नाही." त्यावर ती काहीच
बोलत नाही हे पाहून तो म्हणाला,"चिंता करू नकोस.
काही ना काही मार्ग काढून मी तुला ह्या घरात पुन्हा
घेऊन येईन. पण तोपर्यंत तू आमच्या जुन्या घरीच रहा."
" मला तुझ्या मेहरबानीची गरज नाहीये." प्रिया चिडून
म्हणाली.पण ती विचार करू लागली की आपल्याला
इथं राहण्याची परवानगी मिळेल असं काय करायला हवं
आपल्याला ? पण तिला उपाय सुचत नव्हता.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा