प्रेमासाठी काहीही ५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रेमासाठी काहीही ५ |
" अरे देवा , आता तूच काहीतरी चमत्कार कर बाबा.आणि कसं ही करून माझ्या मुलाची निर्दोष सुटका कर. पांढुरंगा तूच आमचा वाली रे आता !"
माणूस पण फार विचित्र प्राणी आहे पहा ! म्हणजे सुखात कधी देव आठवत नाही त्याला.पण दुःख आले की देवा धाव ! जणू देव त्यांच्या नोकरच आहे.दिवसातून एकदा तरी श्रद्धेने देवाचे नाव घेतलं तरी पुरेसे आहे.परंतु
तेवढा ही वेळ नाही लोकां जवळ.हां मोबाईल वर गेम
खेळण्यासाठी मात्र खूप वेळ आहे.मग तो भूक तहान
देखील विसरतो. एवढा मग्न होतो तो खेळामध्ये ! तेवढा
मग्न ईश्वर नामात मग्न झाला तर कल्याणच होईल को
त्याचे ! असो आता पुढे काय ते पुढच्या भागात वाचा
मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.आपल्या कमेंट
म्हणजेच आपल्या सारख्या वाचकांकडून आम्हाला
मिळालेले पारितोषिक आहे.
आता मात्र मोहनच्या द्यानात आलं की आपल्याला
मुद्दामहून ह्या केस मध्ये अडकवू पाहतोय पण कोण?
मी कोणाचेच काही वाईट केलेलं नाही. आणि माझं
कोणाशी वैर ही नाही मग माझ्याशी असं कोण आणि
का वागतोय. काही कळत नाही.मोहन एकदम चिंतेत
होता. तर दुसऱ्या सूंदर फार खुश होता. लवकरच त्यांच्या
मार्गातील काटा कायमचा निघणार होता. राधाने त्याला
लग्नासाठी होकार नव्हता. पण नकार ही दिला नव्हता.
फक्त एक विनंती केली होती तिने ती विनंती म्हणजे
मला विचार करण्यासाठी थोडीशी अवधी द्या म्हणून.
आज ना उद्या तिला होकार तर द्यावाच लागणार होता.
हे त्याला माहित होते.म्हणून त्याची इच्छा होती की मोहन
च्या केस चा निकाल लागून मोहन तुरुंगात जावा.परंतु
कोर्ट ही दिरंगाई करत होती.केस ची तारीख डिक्लर कर
नव्हती.त्यामुळे तो बेचैन होता.इतक्यात त्याच्या फोन ची
रिंग वाजली.त्याने स्क्रीन पर नाव पाहिले नि एका बाजूला
जाऊन हळू आवाजात परंतु रागात म्हणाला," तुला एकदा
सांगितलेले कळत नाही का ? घरी फोन करत जाऊ नकोस म्हणून." तसा पलिकडून आवाज आला की, पण
मला कसं माहीत असणार तू घरात आहेस का बाहेर ? सुंदर म्हणाला," अरे मग फक्त मिस्ड कॉल द्यायचा म्हणजे मी फोन करेन ना तुला ? नाहीतर सरळ व्हाट्सएप वर मॅसेज पाठवायचा. कळलं. बोल आता कशाला फोन केलास ?"
" तुला यायला जमेल का माझ्या घरी ?"
" आत्ता ?"
" हो !"
" काही विशेष ?"
" हो, विशेष च आहे म्हणून तर !"
" मीरा ने काही गोंधळ घातला का ?"
" हो ना ? ती ऐकतच नाहीये."
" काय म्हणणं आहे तिचं."
" ती म्हणते मला माझ्या घरी जायचंय."
" अरे मग तू सांगायचंस हेच आहे तुझं घर !"
" सांगितले."
" मग काय म्हणाली ती ?"
" म्हणते मी कोण आहे हे मला माहित नाही मग हे माझं
घर कसं असेल ?"
" अरे मग तिला सांगायचं की तुझा स्मृतिभ्रंश झाला
आहे, त्यामुळे तुला काही आठवत नाही. हेच आहे तुझं घर !"
" सांगितले. नाही मान्य करत ती. बाहेर जायचं म्हणते."
" बाहेर पाठवू नकोस तिला , कुणी पाहिलं तर तिला
तर माझे सारे प्लॅन फ्लॉप होईल."
" मग काय करू म्हणतोस ?"
" मी येईपर्यंत तिला घरातच खोलीत बंद करून ठेव.
मी आलोच." असे सांगून त्याने फोन कट केला नि झटपट
कपडे परिधान केले नि लगेच निघाला. आईला सांगितले
की एक जरुरी कामासाठी मी बाहेर जात आहे, तेव्हा मला
उशीर होईल. तुम्ही माझी वाट पाहत बसू नका. जेऊन घ्या." असे सांगून घरातून बाहेर पडला. बाईकला किक मारली नि स्टार्ट केली नि निघाला , आणि थोड्याच वेळात तो आपल्या मित्राच्या घरी पोहोचला. तेव्हा त्याचा मित्र त्याची वाटच पाहत होता. सुंदर ला पाहून तो म्हणाला," तू आलास ते बरं झालं फार डोकं खाल्लं रं तिनं." असे म्हणून सुंदर ला त्याचा मित्र मीरा बंद असलेल्या खोलीत
घेऊन गेला. सुंदर ला पाहून ती म्हणाली, " कोण आहेस तू
आणि इथं का आलास ?" त्यावर सुंदर म्हणाला," मी एक
डॉक्टर आहे." असे म्हणताच ती त्याच्या जवळ पळत
आली नि सुंदर ला म्हणाली," डॉक्टर, मला काही झालं
आहे का ?" तेव्हा सूंदर म्हणाला," नाही."
" मग ह्याला तुम्हीच सांगा. मला हा अजिबात बाहेर
जाऊ देत नाही."
" बाहेर कशासाठी जायचं आहे तुम्हांला ?"
" दिवसभर घरात बसून मला कंटाळा येऊ लागला आहे,
म्हणून मला बाहेरच्या मोकळ्या वातावरणात फिरायचं आहे."
" हे बघा तुमची तब्बेत अजून पूर्ण ठीक झालेली नाही. म्हणून तुम्हाला बाहेर जाता येणार नाहीये. परंतु काही काळजी करू नका. मी तुम्हाला मुंबईला घेऊन जायला सांगतो. तिथं तुमची मोठ्या डॉक्टर कडून ट्रीटमेंट होईल.
मग डॉक्टर ने सांगितले तर तुम्हांला तिला रमणीय स्थळांना भेट देता येईल." तशी ती खुश होऊन म्हणाली,
" खरंच मला मुंबईला नेणार ? "
" हां पण तोपर्यंत इथंच राहायचं नि उगाच त्रास द्यायचा
नाही त्याला."
" पण आहे कोण तो आणि मला सारखा अडवत का असतो ?"
" तो तुझा नवरा आहे."
" माझा नवरा मग मी कशी ओळखत नाही त्याला ?"
" तुझ्या डोक्याला मार लागला आहे, त्यामुळे तुझा
स्मृतिभ्रंश झाला आहे. तुला पूर्वीच काहीचा आठवत नाहीये."
" मग डॉक्टर तुम्हीच मला सांगा की माझी स्मरण शक्ती पुन्हा कधी येणार ?"
" लवकर येईल. आमचे तसे प्रयत्न सुरू आहेत."
" डॉक्टर मी आपली आभारी आहे." मीरा उद्गारली.
" ओके ! आता एक काम कर , मला मदनशी थोडे बोलायचे आहे, तेव्हा मी त्याला माझ्या सोबत घेऊन
जातोय पण चिंता करू नकोस, तो परत येईलच लवकर."असे म्हणून मी मदनला घेऊन तो त्याला एका निर्जन वस्ती आलो नि त्याला म्हणालो ," आता पुढचं प्लॅन काय आहे तुझं ? कारण तू जर इथं राहिला तर आज ना उद्या मीरा ला कुणी पाहिलं तर आपले
सारे प्लॅन फ्लॉप होईल. कारण मोहन ला अजून शिक्षा झालेली नाही.ती होईपर्यंत तरी मी कोणतीही रिक्स घेऊ इच्छित नाही. म्हणून तू तिला या एक दोन दिवसात मुंबईला घेऊन जा.
" मुंबईला नेऊन काय करू ?"
" काय करू म्हणजे ? लग्न कर , प्रेम करतोस ना तिच्यावर ?"
" हां रे, पण ती नाही ना करत माझ्यावर प्रेम ?"
" राधा माझ्यावर अगोदर प्रेम करत होती का ? नाही
ना ? पण आता करू लागली ना ? तशीच मीरा सुध्दा तुझ्यावर प्रेम करायला लागेल.थोडा धीर धर."
" हो ते कळतंय मला. पण मला काय म्हणायचंय की
तिचा स्मृतिभ्रंश झालेला असतांना असं परस्पर तिच्याशी लग्न करणे योग्य ठरेल का ?"
" तुला काय वाटतं, ती स्मृतिभ्रंश म्हणून बाहेर आल्या
नंतर ती तुझ्याशी लग्न करेल ?"
" माहिती आहे मला तिचं माझ्यावर प्रेम नाहीये ते.परंतु
ही फसवणूक नाही का होणार तिची ?"
" काहीही फसवणूक नाहीये. लग्न करून मोकळा हो.
एकदा का ती तुझ्या बाळाची आई झाली की मग तुला
ती सोडणार नाही. तिची स्मरण शक्ती परत आली तरीही !"
" एवढं खात्रीनं कसं सांगू शकतोस तू ? नाही म्हणजे
तिची स्मरण शक्ती परत आल्यावर तिला समजलं की ती निशा नसून मीरा आहे, मग काय करायचं ?"
" तसं काही होणार नाहीये. कारण आदर्श भारतीय नारी
आहे ती. एकदा ज्या पुरुषाची पत्नी झाली की ती कायम
त्याचीच पत्नी बनून राहणार."
" अरे हे पूर्वी होतं आता नाही हं असं ! म्हणून तर कितीतरी घटस्फोट होताहेत."
" हे जरी खरं असलं तरी घटस्फोट झालेल्यांचे पुढे
काय होते ते पाहिले नाहीस का ? कोणीही त्यांच्याशी
लग्न करायला तयार होत नाही. आई-वडिलांसाठी बोज
बनतात त्या. शिवाय समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेनं
पाहतो ते माहीत आहे ना ? काय नाव पडतं त्याना तर नवऱ्याला सोडून आलेली बाई ! ही उपमा चांगली आहे का ? काय इज्जत राहते मग त्याना ? म्हणून बाया ना खुशीने का होईना त्या आपल्या नवऱ्या सोबत राहतात. म्हणून उद्या काय होईल याचा विचार तू करू नकोस. तू तिला लवकरात लवकर इथून घेऊन जा. मग पुढं
काय करायचं ते नंतर पाहू !" त्यावर मदन राजी झाला
तिला मुंबईला न्यायला.
मदन हा सुंदर चा मित्र तो मीरा वर जिवापाड प्रेम करत
असतो. परंतु मीरा त्याला कधी भाव देत नव्हती. उलट ती
त्याचा इन्सल्ट करायची म्हणायची कुठं मोहन राजबिंडा
स्वप्नातील राजकुमार आणि कुठं तू खाणीतील कोळसा!
आणि माझ्या बरोबर लग्न करण्याचे स्वप्न पाहतोस ? तुझी लायकी तरी आहे का ?" मदन ला त्यावेळी भयंकर राग आला त्याने तिचा हात पकडून म्हटलं ," माझी लायकी काढतेस. थांब आता मी दाखवतोच तुला."
" काय दाखवणार आहेस ?
" तुला काय पाहिजे ते. म्हणजे चित्रपट वगैरे ?" एकदम नॉर्मल आवाजात बोलला.
" झालं.गेली हवा !"
" तू समोर असलीस ना,की मला काय बोलावे ते सुचत
नाही."
" म्हणूनच तू मला आवडत नाहीस. पुरुष कसा पाहिजे
एकदम जोशीला काहीपण करायची तयारी पाहिजे त्याची !"
" माझी आहे ना, काय पण करण्याची तयारी !"
" हो का ? मग एक काम कर."
" काय करू ते सांग. आता करून दाखवतो."
" ती बघ एक बाई चालली आहे, तिने आपल्या केसात
गजरा माळला आहे, तो घेऊन ये माझ्यासाठी !" ती असं
मुद्दामच म्हणाली. कारण तिला माहीत होतं की हा काही
तिच्या केसातील माळलेला गजरा आणायला जाणार नाहीये. कारण तेवढे धाडस तोच काय कुणीच करू शकणार नाही म्हणून ती बोलली.
" काय ? तिच्या केसात माळलेला गजरा .....मार खायचा का मला ?"
" बस्स ! फुस्स..... गेली हवा ! हाच तुझा पुरुषार्थ !" असे म्हणून खळखळून हसली. असं म्हटल्यामुळे त्याच्या अंगात एकदम चेव आला. कारण तिचं बोलणं त्याच्या पुरुषार्थाला आव्हानच होतं. म्हणून ऐटीत तिच्या मागे तर गेला. परंतु तिच्या आंबाड्याला हात घालून त्यातून अलगद गजरा काढण्याची त्याला हिंमत काही होईना. पण नंतर त्याने हिंम्मत करून तिच्या त्या आंबाड्यातून गजरा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गजरा काही आबड्यातून निघाला नाही. पण त्या बाईने त्याच्या कानाखाली थप्पड ठेवून दिली. वरून शिवी पण दिली. मेल्या मूडद्या
दिवसाढवळ्या बाईवर हात टाकतोस म्हणजे काय ?
तुला आई-बहीण नाही का रे !" त्यावर तो आपला गाल
चोळत पटकन म्हणाला," अहो ताई, असं नका बोलू ! मला फ़क्त तुमच्या केसातील गजरा हवा होता." त्याने तिला ताई म्हटल्यामुळे तिचा राग क्षणात थंड झाला. ती हसून म्हणाली," अरे तुला फुलांचा गजरा हवा होता तर माझ्या
कडे मागायचास ना ? आणि काय रे, गजरा तू माळणार
आहेस का आपल्या केसात ?"
" मला नको हो, माझ्या मैत्रिणीला पाहिजे आहे."
" तुझ्या मैत्रिणीला ...? कुठं आहे ती तुझी मैत्रीण ?"
" ती बघा हसते आहे." त्याने आपले एक बोट दाखवून
मीरा कडे इशारा केला. त्या बाईने मीरा कडे पाहिले. मीरा
अजूनही हसत होती. ती बाई त्या मीरा कडे पाहून म्हणाली," काय गं पोरीनो मुलांना असली कामं करायला
सांगता काय ? जवळपास कुणी नव्हतं म्हणून ठीक नाहीतर किती मार पडला असता त्या पोराला." त्यावर
मीरा म्हणाली," अहो मावशी आम्ही त्याची गंमत केली.
आम्हाला माहीत होतं तो असं काही धाडस करणार नाही."
" अगं पोरीं समोर हिरो बनण्यासाठी पोरं काही वाट्टेल ते
करायला तयार होतात."
" सॉरी हं मावशी !"
" इट्स ओके !" मावशीने इंग्लिश मधून उत्तर दिल्याने
त्या दोघी एकदम चकित झाल्या. त्यातील एकजण म्हणाली ," वाव ! मावशीला इंग्लिश येतं."
" मग तुला काय वाटलं मी अशिक्षित आहे ? बारावी
पास आहे मी !"
" मग मावशी पुढं का नाही शिकलात ?"
" कसं शिकणार आई-बापानं लग्न करून दिलं ना ?"
" आई-वडिलांना आपल्या मुलींच्या लग्नाची फारच
घाई असते.नाही का ?"मीरा म्हणाली.
" आमच्या आगरी लोकांत मुलींना फार शिकवीत बसत
नाही.मुलगी एकदा वयात आली की तिचं लग्न करून मोकळे होतात.आणि तसं पण जास्त शिकून आम्हां बायकांना कुठं ऑफिसमध्ये नोकरी करायची आहे.?
घरची कामे करतांनाच जीव अगदी मेटाकुटीला येतो."ती बाई उद्गारली.
" हो खरंय.बाईच्या जातीला खूपच कामे असतात.
सर्व्हिस करणाऱ्या महिला घर आणि ऑफिस कसे
सांभाळतात ते देवच जाणे !"
" हो पण हे करून कुणी घेतलं स्वतः बाईनच ना ? म्हणे
नवऱ्याची गुलामगिरी करायची नाही आम्हांला. स्वावलंबी
व्हायचंय.झाल्या स्वावलंबी ! पण आता त्यांनाच ते जाचक
ठरू लागलंय."
" ते कसं ?" मीरा ने विचारलं.
" नवऱ्या कडे सारखे सारखे पैसे मागायला नकोत
म्हणून धरली नोकरी. पण झालं काय पुरुषांचे फावले त्यात. त्यांचा पगार त्यांच्याकडे सेफ राहतो,आणि ते
बायकांचा ही पगार मागून घेतात. किंवा तुझ्या कडे आहेत
ना पैसे ते आधी खर्च कर , मग लागले तर देईन.असं सांगून नवरा मोकळा होतो. शिवाय ऑफिस मधून घरी आल्यानंतर घरची कामे वाट बघतच असतात तिची ! भांडीकुंडी, कपडेलते , जेवण वगैरे ? परत जेवण केलेली भांडी घासणे. परत रात्री नवऱ्याला खुश करायचंच असतं मग आता मला सांग काय परवडतं बाईच्या जातीला. जाऊ दे, आज काल च्या पोरांना आमचं सांगणं पटणार नाही. भरपूर शिका पदवीधर व्हा आणि पहा नोकरी करून काय परवडतेय ते कळेलच तुम्हाला. येते मी परत असं काय करू नका. जीव जाई पर्यंत मार खाईल बिच्चारा ! " असे म्हणून त्या तिकडून निघून गेल्या. तशी मीरा मदन कडे पाहत म्हणाला," आज फार डेरिंग केलीस हं तू !"
" डेरिंग कसली मार खाल्ला ना मी ?"
" अरे पण वेड्या तुला कळायला पाहिजे ना, बाईच्या
अंगाला हात लावल्यावर ती मारल्याशिवाय राहील काय ?
तरी बरं पटकन तिला ताई म्हटलंस ते,नाहीतर अजून मार
खाल्ला असतास "
" बरं ते जाऊ दे,तू सांगितलेस ते मी करून दाखविले
आता करशील माझ्यावर प्रेम ?"
" अरे प्रेम म्हणजे खिरापत आहे का सर्वांना वाटत
सुटायला. हे बघ प्रेम एकदाच होतं आणि ते पण एकावरच
होतं, आणि माझं ऑलरेडी झालंय एका मुलावर."
" कोण आहे तो मुलगा नाव तरी सांग."
" त्याचं नाव आहे मोहन."
" मोहन .....पण त्याचं तर प्रेम राधावर आहे."
" त्याचं असेना कोणावरही प्रेम पण माझं त्याच्यावर आहे ना ?"
" आणि माझं तुझ्यावर आहे त्याचं काय ?"
" हे बघ मी तुझ्यावर प्रेम करत नाहीये.ते तू माझ्या मागे
पडू नकोस एखादी! आणि दुसरी कुणी नाहीच मिळाली.
तर मग ह्या मेघाशी कर." त्यावर तिची मैत्रीण मेघा तिच्यावर चिडून म्हणाली," मेघाशी कर काय ? मेघा
अगोदरच एकाच्या प्रेमात पडली आहे."
" अय्या खरंच ! कोण आहे तो ?"
" तो कॉलेज मधला नाही काही !"
" मग ?"
" आहे कोकणातलाच पण तो आमच्या तिथं राहतो.
आणि बँकेत कामाला सुध्दा आहे."
" हे कसं जमलं बुवा ?"
" आमच्या घरा समोर घर आहे त्याचं ..….मग काय
येता जाता आम्हां दोघांची नजरानजर व्हायची ! झालं प्रेम
.....प्रेम व्हायला काय शिंग थोडीच लागतात.? आज काल
विवाहित स्त्री-पुरुषांची सुध्दा एक्स्ट्रा अफेर सुरू असतात." तेवढ्यात मदन म्हणाला," म्हणजे माझा पत्ता
कटच तर !"
" सध्या तर तुझा पत्ता कटच समज.पुढचं पुढं पाहू !"
" म्हणजे चान्स आहे तर !"
" फक्त एक परसेंट !"
" एक परसेंट पण चालेल मला." त्यानंतर पिरियड
सुरू व्हायची वेळ झाली तसे सगळेजण आपापल्या
वर्गात जाऊन बसले.राधा नि मोहन एकाच बेंचवर बसले
होते नि त्यांच्या मागे सुंदर बसला होता.परंतु एकटक तो
राधा कडे पाहत होता.हे पाहून मदनच्या ध्यानात आलं की सुंदर चं राधावर प्रेम असावं.जसं आपलं मीरा वर आहे.सुंदर ला राधा नि मला मीरा मिळवायची असेल तर
मोहन चा पत्ता कट करावा लागेल.पण मोहन चा पत्ता
कट करायचा म्हणजे नेमके काय करायचे ? त्याला
जीवानिशी ठार मारायचं. छे छे छे ! असं करून कसे चालेल. कारण तसे केले तर पोलिसांच्या बेड्या पडतील
की आपल्या हातात.मग काय करायचं ? असा काहीतरी
उपाय शोधायचा की साप भी मरे और लाठी भी नही तुटे !
असा कोणता उपाय असेल बरं ? शोधा म्हणजे सापडेल
असं कोणीतरी म्हटलं आहे ते काय उगाच ? पण असं
आपल्याला करायची काय गरज आहे ? नाही म्हणजे
राधा नि मोहन एकमेकांवर जिवापाड प्रेम करतातच
आहेत तर आज उद्या त्या दोघांचे लग्न होईलच. मग
मीरा ला आपल्या शिवाय दुसरा पर्याय आहेच कोठे ?
शिवाय ती म्हणाली सुध्दा आहे फक्त एक टक्का चान्स
आहे ना आपल्याला ? उगाच कशाला खून बिन करायच्या भानगडीत पडायचं ? पण सुंदर मध्ये आडवा आला तर ?
पण सुन्दर कशाला आड येईल आपल्या प्रेमाच्या ? कारण
त्याचं प्रेम यशस्वी नाही झालं तर तो आपलं कसं यशस्वी
होऊ देईल ? शिवाय आपलं एकतर्फी आहे, अचानक मीरा
नाही म्हणाली तर ? त्या पेक्षा आपण असं करू ? सुंदरला
जर राधा मिळवून दिली तर सुंदर आपल्याला नक्कीच
सपोट करेल.पण त्यासाठी मोहन चा पत्ता कट होणे
आवश्यक आहे ? म्हणजे खून खराबा न करता मोहन ला
राधा पासून दूर केलं तर ! तर सहज शक्य आहे.म्हणजे
राधा मोहनचा तिरस्कार करायला पाहिजे.आणि हे तेव्हाच
शक्य होईल.जेव्हा मोहनच्या जीवनात दुसरी कोणी येईल ?" असा विचार करून किंचित विचारमग्न होतो.
लगेच त्याची ट्यूब लाईट पेटते.दोन बोटांची चुटकी वाजवून तो म्हणाला," येईल काय आलीच आहे त्याच्या
जीवनात कोण माहितेय ? अरे मीरा ....मीरा नाही का
त्याच्यावर प्रेम करत.तिच्या प्रेमाचा आपण वापर करून
घेऊया परंतु आपल्यासाठी ! सुटलं कोडं ! " असे म्हणून
तो स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत असतो. तेवढ्यात
प्रोफेसरांचे लक्ष पडते त्याच्यावर.तसे ते त्याला विचारले,
" स्टँड अप मदन !" मदन उठून उभा राहिला.तसे प्रोफेसर ने विचारले की,लक्ष कुठं आहे तुझं ?"
" सॉरी सर !"
" इथं काय टाईमपास करायला येतो का तू ? सीट डाऊन !" तसा तो खाली बसला.त्यानंतर सरांनी
पुढील प्रकरण शिकवायला सुरू केले. आता मदन चे लक्ष
सरांकडेच होते.पण डोक्यात मात्र विचारांचे काहूर मांजले
होते. कॉलेज सुटल्यानंतर मदन ने सुंदर ला गाठले नि त्याला म्हटलं," मला आज एक तुझं गुपित कळलं."
" गुपित ...काय कळलं तुला गुपित ?"
" खरं सांग.तुझं राधावर प्रेम आहे किंवा नाही ? फ़क्त
एका शब्दात उत्तर द्यायचे.येस वा नो !"
" येस !"
" आता सांग मला कसं कळलं ?"
" तुला कुणी तरी सांगितले असेल."
" कोण सांगेल ? माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाला माहीतच नाही."
" मग तूच सांग तुला कसं कळलं ते."
" मी आज क्लासरूम मध्ये पाहिलं.तू कसा राधाकडे
एक टक लावून पाहत होतास."
" माझं प्रेम राधावर आहे ; परंतु राधाचं प्रेम मोहन वर
आहे."
" मग प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेस का ?
केवळ मजनू बनून राहणार आहेस."
" प्रेम तर मिळवायचं आहे,पण कसं मिळवू ते कळत
नाहीये मला."
" मी एक उपाय सुचवू ?"
" अवश्य !"
" पण त्या बदल्यात मला काय देशील ?"
" जे मागशील ते."
" बघ हो, नाहीतर नंतर नाही म्हणशील."
" असं काय मागणार आहेस जे मी तुला देऊ शकणार
नाहीये."
" प्रेम ss!"
" व्हाट्स प्रेम काय ? म्हणजे हे काय वस्तूचे नाव आहे ?"
" नाही."
" मग ?"
" जसं तुझं राधावर प्रेम आहे, तसं माझं प्रेम आहे मीरा
वर ?"
" कोण मीरा ?"
" तुझी बहीण."
" आणि तिचं तुझ्यावर आहे का प्रेम ?"
" नाही."
" मग कसं होणार हे ?"
" तू सांगून बघ ना तिला."
" मी सांगेन रे, पण तिचं दुसऱ्या कोणावर प्रेम असेल तर ?"
" मोहन वर आहे तिचं प्रेम !"
" व्हाट्स ? मोहन वर ?"
" हां ! आणि मोहनचं राधावर ."
" आता हा गुंता कसा सुटायचा ?"
" माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्या प्लॅन नुसार आपण
दोघे एकमेकांची मदत करू शकतो."
" प्लॅन तर सांग."
" चल कुठंतरी एकांत मध्ये आणि प्लॅन बद्दल डिस्कस
करू."
" ओके ! " कॉलेज पासून थोड्याच अंतरावर एक गार्डन
होते.तेथे ते दोघेही एका गार्डनमध्ये जाऊन बसले.आणि
प्लॅन विषयी दोघांनी चर्चा केली.मदन ने आपले संपूर्ण प्लॅन
सुंदर ला ऐकविले.प्लॅन संपूर्ण ऐकल्यानंतर सुंदर म्हणाला,
" प्लॅन तर खूप सुंदर आहे, परंतु मीरा तर मोहन वर प्रेम
करते ती तुझ्या बरोबर का लग्न करेल ?"
" आपण मोहन ला इतकं बदनाम करू की तो मीराचा
तिरस्कार करेल. मग तिच्या पुढे माझ्या शिवाय दुसरा
कोणता पर्याय आहे?"
" हूँ प्लॅन तर छान आहे, परंतु त्यात एक धोका पण आहे."
" कसला धोका ?"
" आपल्या प्लॅन प्रमाणे मीरा पुलावरुन उडी मारून
आत्महत्या करण्याचं नाटक करेल.परंतु रात्रीच्या
अंधारात तू मीरा ला वाचवण्यास अयशस्वी झालास तर
फुकटच जीव जायचा मीरा चा."
" अरे कसा जाईल मी तिथंच असेन ना ? तिला चट्कन
बाजूला घेऊन जाईन आणि मोहन शोधत बसेल रात्रभर.
पण त्याला काही ती सापडणार नाही. मोहन ला कोर्ट
शिक्षा देईपर्यंत मी तिला माझ्या घरी लपवून ठेवीन.परंतु
ही गोष्ट आपल्या तिघांशीवाय अन्य कोणाला माहीत
पडता कामा नये."
" अरे कसे पडेल , मी मीरा ला विश्वासात घेऊन मी आपलं प्लॅन समजावून सांगेन.आईला देखील यातलं
काही माहीत नसेल."
" ठीक आहे, मग कधी करतोस प्लॅन ला सुरुवात ?"
" आजच मीरा ला विश्वासात घेऊन तिला प्लॅन समजावून
देतो.बघू या काय म्हणते ती."
" ती आपल्या प्लॅन मध्ये नक्की सामील होईल ; परंतु
आपले प्लॅन तिच्या पुढे असे काही कथन कर, की तिला
ही वाटलं पाहिजे आपले प्रेम प्राप्त करण्यासाठी अन्य
दुसरा कोणताही मार्ग नाही. ह्या प्लॅनचीच गरज आहे.मग बघ ती आपोआपच तयार होईल." त्यानंतर दोघेही तेथून
उठले नि घरी जायला निघाले.सुंदर जेव्हा घरी पोहोचला.
त्याच्या बाजूचीच खोली मीरा ची होती.मीरा आपल्या
खोलीत बन्या बापू या मराठी चित्रपटातील एक गाणं
गुणगुणत होती.ते सुंदर ने ऐकलं.तसा तिच्या खोलीत
गेला.पाहतो तर काय त्याची बहीण आरसा समोर उभी
राहून आपलं रूप न्याहाळत होती आणि मुखाने गाणं सुध्दा गुणगुणत होती कि
मी कशाला आरशात पाहू गं
मीच माझ्या रूपाची राणी गं !
त्याला पाहून ती गप्प झाली.तसा सुंदर म्हणाला,
" अरे वा ! बहिणीला माझ्या कुणावर तरी प्रेम झालं." तशी आपल्या भावावर रागवत म्हणाली," असं चोरून ऐकायचं नसतं दादाटल्या." तेव्हा सुंदर म्हणाला," चोरून
कुठं ऐकलं तू एकदम खुशीत म्हणत होतीस ते मी ऐकलं."
अगोदर सांगायला तयार नव्हती.पण नंतर सविस्तर
तिने आपल्या भावाला सांगून टाकले.तेव्हा मग सुंदर ने
तिला आपले प्लॅन ऐकविलं. प्लॅन ऐकून खुश तर झाली
पण लगेच म्हणाली," मोहन माझ्या मुळे जेल मध्ये गेल्यावर तो माझ्यावर प्रेम नाही तिरस्कार करेल तो
माझा."
" अग कसा करील ?
" तू बुडून मेल्याचे फक्त नाटक करायचं आहे.एकदा का
माझं राधाशी लग्न झालं की तू स्वतःपोलीस स्टेशन ला
जाऊन सांगायचं की मी जिवंत आहे.आणि मला मोहन ने
मारले नाही मी स्वतःच पाण्यात उडी घेतली."
" मग पोलीस विचारतील की एवढी दिवस होतीस कुठं ? मग काय सांगायचं ?"
" सांगायचं की मी पाण्यात पडले तेव्हा माझे डोके
एका शिळेवर आपटले नि माझा स्मृतिभ्रंश झाला होता.
मला माझं नाव गांव काहीच आठवत नव्हतं.मी एका
कोळ्याच्या घरात होती. माझ्या डोक्यावर डबा पडला नि
माझी स्मृति वापस आली नि मला सर्व आठवलं.बस इतकं
सांगितलं की त्यांना पटलंच म्हणून समज."
" ते ठीक आहे, पण मोहन माझ्याशी लग्न करेलच
याची शाश्वती काय ?"
" मी सांगतो ना , तुझ्यामुळे त्याची तुरुंगातुन सुटका
झाली म्हणून तो तुझ्याशी लग्न करेल.कारण राधा तर
तेव्हा माझी पत्नी झालेली असेल ना, मग त्याच्या पुढे
दुसरा पर्याय आहे काही ? आणि तसं पण तो राधाशी
लग्न करणार नाही.का माहीत आहे ? सांग बरं ?"
" कारण राधा ने त्याच्या सांगण्यावर विश्वास केला नाही."
" एकदम करेक्ट ! आता एक काम करायचं ....मोहनला
नदीच्या पुलावर बोलवायचं पुढे काय करायचे आहे ते
तुला माहीतच आहे. चल मी आता जातो.आपल्या खोलीत
तू नीट विचार करून ठरव काय करायचं ते." असे म्हणून
मोहन निघून गेला तिच्या खोलीतून.मीरा खूप विचार करत
बसली शेवटी तिला तिच्या भावाने सुचविलेला मार्गच
आवडला.कारण असं केलं तरच दोघांचेही जीवनसाथी
दोघांना मिळतात. फक्त त्यासाठी छोटंसं नाटकच तर
करायचं आहे.प्रेम आणि युध्दामध्ये सर्वकाही क्षम्य असतं
अर्थात प्रेमासाठी काहीही करायची तयारी असायला लागते.तेव्हाच अपेक्षित प्रेम प्राप्त होते. त्या प्रमाणे तिने
नाटक केले खरे ! परंतु घडलं मात्र असिलियत मध्ये.म्हणजे स्मृतिभ्रंश करण्याचे नाटक करायचे होते.
परंतु तिने पाण्यात उडी मारल्यानंतर तिचे डोके खरोखरच
एका शिळेवर आपटले.ठरल्या प्रमाणे मदन ने तिला वाचवले.परंतु तिचा खरोखरच स्मृतिभ्रंश झाला. तिचा
भाऊ जेव्हा तिला भेटायला आला तेव्हा तिने त्याला ओळखले नाही.उलट तिने विचारले ," कोण तुम्ही मी
तुम्हाला ओळखत नाही." हे ऐकून सूंदर तर दुःखी झाला.
परंतु मदन मात्र खुश झाला. कारण ती पाहिलं सारे विसरली होती. पण गोष्ट विचित्र घडली.ती म्हणजे मीरा च्याच वयाची एक मुलगी सापडली. नदीच्या किनाऱ्याला
तिच्या तोंडावर मोठी जखम असल्याने तिचा चेहरा ओळखू येत नव्हता.म्हणून पोलीस त्या मृतदेहाला मीरा चा मृतदेह समजले. आणि तिची ओळख पटण्यासाठी
पोलिसांनी मीरा च्या घरच्यांना बोलविले तेव्हा सुंदर ने
त्या गोष्टींचा फायदा घायचा ठरविला.आणि तो मृतदेह
मीरा चाच आहे, असे सुंदर ने सांगितले. परंतु पोष्टमार्टम
मध्ये तिचा गळा घोटून तिला ठार मारल्याचे सिध्द होताच
सूंदर खुश तर झाला.परंतु तिच्या गळ्यावर कोणाच्याही
हाताचे ठसे न सापडल्याने मोहन निर्दोष सुटेल असे
वाटले सुंदरला.परंतु ती तीन महिन्यांनी प्रेग्नेंट असल्याचे
सिद्ध झाल्यावर सुंदर ने दुसरी चाल खेळली.डॉक्टर ना
पैशांचे अमिश दाखवून डी एन ए टेस्ट रिपोर्ट बदली करून
मोहन त्या बाळाचा बाप असल्याचे सिध्द करविले.शेवटी
काय मोहनच गुन्हेगार असल्याचे सिध्द होऊन मोहनला
१४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. इकडे
सुंदर खुश कारण त्याच्या मार्गातील काटा कायमचा दूर
झाला.आणि तिकडे मदन खुश झाला.कारण मीरा चा
स्मृतिभ्रंश झाल्याने तिला मागील काही आठवत नव्हतं
त्याचा फायदा मदन ने घेतला.मदन तिला घेऊन मुंबईला
गेला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा