Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

अखंड सौभाग्यवती भव ३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, मराठी ❤ स्टोरी

अखंड सौभाग्यवती भव ३
अखंड सौभाग्यवती भव ३

 


     देवाची करणी आणि नारळाच्या आंत पाणी असे जे
म्हणतात ते खरंय. म्हणजे बघा ना , ते दोघेही रोज रात्री शाररिक संबंध करत होते.परंतु तरीही कंदनचा बीजांकुर  तिच्या पोटात वाढला नाही. पण माझ्या एक दिवसाच्या प्रयत्नात  तिच्या पोटात बीजांकुर बस्थान मांडले. नि हळूहळू तो पोटामध्ये आकार घेऊ लागला नि नऊ महिने
पूर्ण होताच त्या बळाने जन्म घेतला. त्या दोघांना तर
अतिशय आनंद झाला.म्हणजे त्या दोघांना असे वाटत होते
की ते बाळ त्या दोघांचे आहे.परंतु मला त्या दोघांच्या
नात्या विषयी काही कल्पना नसल्याने मला वाटले ते बाळ
माझे आहे. परंतु त्या दोघांना मात्र वाटत होतं की ते बाळ
त्याचे आहे. परंतु म्हणतात. पाप करणाऱ्या ला परमेश्वर
अशी अद्दल घडवितो की त्यांची त्यांनी कधी कल्पना
देखील केलेली नसते. पण का कुणास तिला आपल्या
कृत्याची लाज वाटू लागली. आणि त्यामुळे तिच्यात बदल
होत गेला. तिला स्वतःला जाणवू लागले की आपण
जे करतोय ते पाप आहे, असे जाणवल्या नंतर मात्र
तिने कंदन ला टाळू लागली. तशी कंदन ला पण त्या
गोष्टीची  जाणीव झाली की प्रिया आता बदलली आहे,
अर्थात ती आता राजाराम वर प्रेम करू लागली आहे.हे
त्याच्या लक्षात येताच तो तिचं गुपित सर्वांसमोर
आणण्याचा त्याने एक  डाव खेळला. परंतु तो स्वतःच त्यात तोंडघशी पडला. प्रियाचा अपराध माफ करण्या
योग्य तर नव्हता. परंतु एक चान्स देणे गरजेचे आहे असा
विचार करून मी तिला माफ केले. ते म्हणतात ना
देर आये लेकिन दुरुस्त आए ऐसी कहावत है सुबह का
भुला अगर श्याम को घर लौट आये तो उसे भुला नहीं
कहते.असा विचार करून मी तिला मोठ्या मनाने माफ
केले. त्यानंतर तिने देखील प्रामाणिक पणा दाखविला.
आणि माझ्याशी एकरूप झाली. म्हणूनच आज ती मला उपदेश करू लागली आहे की कंदनला पुन्हा चान्स देऊ नका म्हणून. परंतु असे करणे अयोग्य ठरणार नाही का ? म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं कसं बरं मी कसं करू शकतो ? एक संधी तर त्याला मिळायलाच हवी ना,  म्हणून मी त्याला माझ्या घरी आणलं. आता पाहू तो परीक्षेत पास होतोय  का ते.


     आता इथून पुढे


    कंदन ला राज ने शोरूम मधून नवीन गाडी आणून दिली. तेव्हा राज समोर तर आपल्याला अत्यन्त आनंद झाल्याचा दिखावा केला. परंतु व्यक्तिशः त्याला आनंद
नव्हता झाला. कार की किल्ली घेऊन कंदन आपल्या
रूम मध्ये येताच त्याने किल्ली अशी काही टेबलावर फेकली. जणू ती किल्ली नसून टाकाऊ वस्तू आहे.ते पाहून
कचेश्वर म्हणाले," काय झालं एवढा रागात का आहेस ?"
    " राज ने मला कार गिफ़्ट दिली."
    " वा फार चांगली गोष्ट आहे ?"
    " फार चांगली गोष्ट काय ? माझी वस्तू मला गिफ़्ट
कसं वाटते ते ?"
    " किती वेळा सांगायचं की राग आवर. राग दाखवायचा
नसतो तो मनात ठेवायचा असतो आपल्या. त्याचा योग्य
वेळी वापर करायचा असतो."
   " म्हणजे मला कळलं नाही ?"
   " अरे, नुसती प्रॉपर्टी -प्रॉपर्टी बोंबलून मिळणार आहे
का तुला ती  ? जरा धीर घर ना ?"
    " अजून किती धरायचा धीर ? आपलं सारं आयुष्य
गेलं वाट बघण्यात तसं  आता माझं ही जाईल. "
    " असं नाही होणार ?"
    " कसं नाही होणार ,सांगा ना मला ?"
    " राज म्हणाला दीपक अठरा वर्षाचा होईपर्यंत वाट
पहा म्हणून. मग पाहू या ?"
    " मला नाही जमणार अठरा वर्षे वाट पाहायला ?"
    " दुसरा पर्याय आहे का काही ? "
    " तोच तर वांदा झालाय ना ? दुसरा कोणताच पर्याय
ठेवला नाही त्या थेरडी ने. मला अगोदर जर मला माहित
असतं ना तर जीवच घेतला असता मी त्या थेरडीचा."
    " त्यानं काय झालं असतं ? तुरुंगात गेलास असतास
पंधरा वीस वर्षासाठी फार काही वाकडं झालं नसतं."
    " मग मी करू तरी काय ?"
    " काहीही करू नकोस शांत रहा. जमल्यास सज्जन
माणूस बनण्याचा प्रयत्न कर."
   " सज्जन आणि मी ....काहीतरीच काय बाबा ?"
   " मग निदान तसं नाटक तरी कर."
   " नाटक...?"
   " हो, नाटक."
    " नाटक करायला जमेल मला."
    " सध्या तेवढं केलंस तरी पुरेसे आहे."
    " मी ग्यारंटी देत नाही पण तसा प्रयत्न जरूर करेन."
     " हां मग प्रयत्नच कर."
त्या दिवसा नंतर कंदन ने खरंच स्वतः मध्ये बदल घडवून
आणला. ऑफिस ला नियमित जात असे आणि कंपनीतल्या कामात ही बारकाईनं लक्ष घालू लागला.
ते पाहून राज ला अत्यानंद झाला. कारण राज ला वाटलं की कंदन मध्ये काहीतरी परिवर्तन घडून आलेय. परंतु
ते खरे नव्हते.फक्त तसा तो दिखावा करत होता. त्याचे
वडील म्हणजे कचेश्वर म्हणत होते की अजून अठरा वर्षे
वाट पहा. परंतु त्याला ते मान्य नव्हते. अठरा वर्षे अजून
वाट पहायची म्हणजे तोपर्यंत मी म्हातारा होईन. मग कसली मजा करणार ? जेव्हा जे काय करायचं ते आत्ताच
करायचं ? पण नेमकं काय करायचं ते मात्र कळत नव्हतं.


    राज मात्र समजत असतो की कंदन आता सुधरला
होता. गेल्या दोन वर्षात त्याने कामामध्ये  भरपूर इंटरेस्ट
घेतला होता. कोणतेही काम हाती घेतले नि ते पुर्णत्वाला
नेले नाही असे कधी झाले नाही. आणि राज ही मुद्दामहून नवीन , नवीन प्रोजेक्ट त्याला करायला दिले. खरं तर राज त्याला जज करत होता. त्याला पहायचे होते की कंदन खरंच सुदरला आहे का नुसते नाटक करतोय आणि कंदन ने सुध्दा ओळखले होती की राज आपल्याला जज करतोय. म्हणून मग त्याने देखील राजचा विश्वास पात्र बनण्यासाठी आपले कसब वापरले नि सर्व प्रोजेक्ट सक्सेलफुल करून दाखविले. त्यामुळे राजची आता पूर्ण खात्री की कंदन खरोखरच सुदरला म्हणून. पण तो सुदरला नव्हता तर  सुधरल्याचे फक्त नि फक्त नाटक
करत होता आणि राज तेथेच फसला. अजून काही प्रोजेक्ट राज ने त्याला दिले आणि त्याने ही हाताळले आणि पूर्वी प्रमाणेच यशस्वी करून दाखविले. आता राज निर्धास्त झाला होता आणि त्याच्या मनात एक विचार आला की प्रिया ला घेऊन कुठंतरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊ ! कारण बरेच दिवस कंपनीचे काम सोडून कुठं गेलो ही नाहीये. सेकंड हनिमून चे नाव सांगून प्रिया ला मनालीला घेऊन जाऊ ! तसं पण पहिलं हनिमून काही खास झालेलं नाहीये. कारण तेव्हा प्रिया आपल्यावर प्रेमच नव्हती करत. त्यामुळे हनिमून ची मजा काही अनुभवता आली नाही. तेव्हा आता जायला हरकत नाही. दीपक ही थोडा मोठा झाला होता. आता सेकंड चान्स घ्यायला हरकत नव्हती. तशी पण दोघांनाही आता मुलगीच हवी होती. परंतु मुलगी होईल का मुलगा हे कोणी सांगावे ? देव जे देईल ते घ्यावे. ह्या  एकाच गोष्टीवर दोघांचेही एकमत झाले. परंतु प्रियाचे मन मनाली ला तयार होईना, तिचे म्हणणे असे की आपण काय आता नवीन दांपत्य आहोत का ? हनिमून ला जायला हवा पालट म्हणून इथंच मुंबईच्या आसपास कुठं तरी रमणीय ठिकाणी जाऊ !" तेव्हा राज म्हणाला," असं म्हणतेस तर मग ठीक आहे, आपण आपल्या फार्म हाऊस वर जाऊ ?" तेव्हा प्रियाने विचारले ," कोठे आहे हा फार्म हाऊस ?"
    " खंडाळ्याला."
    " मग ठीक आहे,कधी जायचं ?"
    " उद्याच निघायचं."
    " बाळाला पण सोबत न्यावं लागेल ना ?"
    " बाळाला कशाला , आपण दोघंच जाऊ !"
    " मग बाळ इथं एकटा कसा राहील ?"
    " एकटा कुठं ,  दुसरी माणसं आहेत ना घरी ?"
    " त्या माणसांच्या भरवसावर ठेवणार तुम्ही त्याला इथं ?"
    " मग काय झालं ? ती परकी माणसं थोडीच आहेत."
    " परकी जरी माणसं  नसली तरी मी त्यांच्यावर अजिबात भरवसा करत नाही. तेव्हा माझा बाळ माझ्या सोबतच राहील."

    " तू काय ऐकायची नाहीस घे त्याला सोबत ."
    " सगळी तयार करून ठेव. आयत्या वेळी गोंधळ नको
व्हायला."
     " नाही व्हायचा गोंधळ. तुम्ही एकदम निर्धास्त रहा."
 
    तेवढ्यात राज ला कोणाचा तरी फोन आला राज फ़ोन
वर बोलत साईटला गेला. तेव्हा राज फोन वरून त्या व्यक्तीला सांगत होता  की मी दोन दिवस फँमेली ला घेऊन खंडाळ्याला जाणार आहे , तेव्हा तुम्ही कंदन सरांशी संपर्क करा नि सर्व डिटल्स जाणून घ्या. समोरच्या व्यक्ती ने 'ओके ' म्हणून फोन कट केला. त्यांचं बोलणं प्रिया ने ऐकलं तशी ती राज ला विचारू लागली की फोन बोलणारी कोण होती व्यक्ती ? "
    " आहे एक क्याइंट पण काय गं तू का विचारतेस असं ?"
     " अहो, तुम्ही एकदम कंदन वर विश्वास करू नका. धोकेबाज माणूस आहे तो."
    " नाही गं तो आता पूर्वी सारखा नाही राहिला."
    " असं तुम्हाला वाटतं पण माझा अजिबात विश्वास
नाही त्याच्यावर."
    " पण माझा आहे."
    " केसाने गळा कापील तो फार विश्वास करू नका
त्याच्यावर."
      " ओके ! मी असं करतो ऑफिस मध्ये जाऊन येतो
तोपर्यंत तू सगळी पॅकिंग करून ठेव." असे म्हणून राज
लगेच निघाला देखील आणि थोड्याच वेळात ऑफिस ला
पोचला देखील. घाईघाईने आपल्या केबिनमध्ये पर्यंत
पोहोचलाच होता. तेवढ्यात कंदन त्या व्यक्ती सोबत बाहेर
आला राजाराम ला पाहून स्मित हास्य करत म्हणाला," अरे वा ! राज आला तू बरं झालं तू आलास ते." राज ने विचारले ," काही प्रॉब्लेम झालं का ?"
    कंदन म्हणाला," प्रॉब्लेम काही नाही डील फायनल
झाली."
    " हो ना ? ऊत्तम !" राजने देवधरशी हस्तांदोलन करत
म्हटलं," नाईस तू मिट यु !"
    " पुन्हा भेटू !  ओके बाय !" असे म्हणून देवधर  निघून गेल्यानंतर राज कंदन कडे बोलला," कंदन जरा माझ्या केबिनमध्ये ये मला  थोडं बोलायचं आहे तुझ्याशी " असे म्हणून राज आपल्या केबिनमध्ये शिरला तसा कंदन ही त्याच्या पाठोपाठ केबिनमध्ये शिरला राज आपल्या चेअर बसून  कंदन ला म्हणाला," बैस !"
    " मला एक तुला विचारायचं होतं ?"
    " काय ?"
    " तू कुठं तरी बाहेर जाणार होता ना ? म्हणजे असं तो
देवधर म्हणत होता."
   " हो, मीच सांगितले त्याला पण मग म्हटलं मला तर
उद्या जायचंय तर आज कशापाई घरी राहायचं म्हणून आलो."
    " नाही आलास तेही बरंच झालं. बरं तुला काय सांगायचं होतं ना ?"
    " हो , उद्या जेवढ्या साऱ्या मिटिंग आहेत, त्या साऱ्या
मिटिंगस तू अटेंन करायच्या ?"
    " मी ?"आश्चर्य व्यक्त केलं."
    " का ? जमणार नाही. नाही जमायला काय झालं ?
करेन मी सर्वकाही तू बिनधास्त जा इथली चिंता करू
नको." त्यावर राजाराम हसून म्हणाला," तू असल्यावर
मला कसली चिंता ?"
   " तू माझ्यावर जो विश्वास दाखविला आहेस तो मी सार्थक  करिन."
    " मला तुझ्या कडून हीच अपेक्षा होती. चल येऊ मी ?"
   " लगेच निघालास ही ?"
   " हो थोडी शॉपिंग करायची आहे."
   " ओके ! तू जाऊ शकतोस आता !"
   अगोदर कंदन उठला नि केबिनच्या बाहेर पडला. त्याच्या मागोमाग राजाराम ही बाहेर पडला. बाहेर ब्लॅक कलर ची गाडी उभी होती. राज ला पाहून ड्रायव्हर गाडीतून खाली उतरला नि पटकन गाडीचा मागील डोअर
ओपन केला. राज आंत बसला. तसा त्याने डोअर बंद
केला नि दुसऱ्या बाजूला येऊन ड्रायव्हर सीट वर बसला.
नंतर सेफ्टी बेल्ट लावला नि गाडी गियर मध्ये टाकली.
आणि थोड्याच वेळात गाडी मालवणकर बंगल्याच्या
समोर येताच सिक्युरिटी ने गेट ओपन केला नि मोटार
सरळ आंत शिरली. ड्रायव्हर मोटार उभी केली आणि खाली उतरला नि मागील डोअर ओपन केला. तसे राजाराम खाली उतरला नि बंगल्याच्या मुख्य द्वार जवळ आला नि त्याने बेल चे बटन दाबलं. थोड्याच वेळात दरवाजा उघडला. दरवाजात प्रिया पाहून राज ने विचारले, 

 
     " झाली का पॅकिंग करून."
     " हो !"
    " मग चल आता !"
    " कुठं ?"
    " शॉपिंग करायला."
   " आता कशाची शॉपिंग ?"
   " सेकंड हनिमून करायला चाललोय नवीन कपडे नकोत
का घ्यायला ?"
   " हो का ? मग चला जाऊ या !"
   " हां पण तुझ्या हातची कॉफी घेऊन ये बरं."
   " आता आणते." असे म्हणून प्रिया किचनमध्ये गेली.
गॅस पेटवून कॉफी करायला घेतली. कॉफी तयार झाली
तशी दोन कपात कॉफी भरली नि बाहेर घेऊन आली.
राज ला एक कप दिला नि एक स्वतःला घेतला. कॉफी
पिल्यानंतर दोघेही शॉपिंग करायला गेले. तिकडून शॉपिंग
करून घरी आले. तेव्हा हॉलमध्ये कचेश्वर आणि अरुंधती
बसले होते. त्या दोघांना आलेले पाहून कचेश्वर ने विचारले,
    " राज तुम्ही दोघे कुठं बाहेर जाणार आहात का ?"
    " होय. खंडाळ्याला आपल्या फार्म हाऊस वर चाललोय मामाश्री !"
   " सहज ना ?"
   " हो सहजच."
   " मग इथल्या मिटिंग चे काय केलेस ? नाही म्हणजे
मी जाऊ का ऑफिसला."
    " नाही नाही त्याची काही गरज नाही. कंदन करेल
साऱ्या मिटिंग अटेंन ! "
    " हो ना मग हरकत नाही."
    " बाळा ला पण नेणार आहात सोबत." मामी ने विचारले.
   " त्याला तर न्यावंच लागेल सोबत.अजून लहान आहे
ना ?"
   " नाहीतर सांभाळेन मी त्याला."
   " नको मामी तुम्हांला फार त्रास देईल तो."
   " त्रास कशाचा ? आता जर  तुम्हां दोघांची इच्छा नसेल....तर .?"


   " तसं काही नाही मामी गैरसमज करून घेऊ नका."
राज म्हणाला. त्यानंतर कोणीच काही बोलले नाही.खरं
तर प्रिया ला बोलायचं होतं की तो अजून छोटासा बाळ आहे, त्याला इथं ठेवून मी कशी राहू शकते त्याचा विना. शिवाय माझ्या शिवाय तो देखील राहणार नाही. पण मामीला वाईट वाटू नये म्हणून प्रिया म्हणाली," मामी तो अजून खूप लहान आहे, म्हणून नेतोय त्याला सोबत थोडा मोठा झाला की मग तुम्हालाच सांभाळायचं आहे त्याला. मग मी तुमच्याच स्वाधीन करणार आहे त्याला." असे म्हंटल्यावर मामीच्या चेहऱ्यावर थोडंस स्माईल दिसलं त्यानंतर प्रिया आणि राज शॉपिंग केलेल्या थैल्या आपल्या
बेडरूम मध्ये घेऊन गेले. बाळ शांत झोपला होता. पण झोपेतच खुदकन हसला. प्रिया ला वाटलं की बाळ आपल्या आवाजानं उठला की म्हणून ती त्याच्या जवळ गेली ; परंतु तो गोड झोपेत होता. तेव्हा तिच्या मन
एक विचार आला की बाळ कुणा सोबत हसतोय  झोपेत स्वप्न पहातोय का  तो ? कुणास ठाऊक ? कदाचित देवासंग खेळत असावा. आता ह्यातलं खरं काय आहे  ते फक्त देवच जाणे ! तिने त्याच्या कडे स्माईल केलं  नि मागे वळणार तोच मागून राज ने हळूच कमरे कडून हात घातला नि तिला आपल्या मिठीत घेतले.

  

     दुसऱ्या दिवशी दुपार नंतर खंडाळ्याला जायला निघाले. राज , प्रिया आणि त्यांच्या सोबत दीपक होता. राज स्वतः ड्राईव्ह करत होता. मध्येच चहा कॉफी साठी गाडी उभी केली. खाली उतरले नि रेस्टॉरंट मध्ये शिरले. कॉफी मागविली. बाळासाठी कॅटबरी चॉकलेट घेतले. कॉफी पिऊन झाल्यानंतर पुन्हा गाडीत बसले. तशी गाडी निघाली. राज ने fm रेडिओ सुरू केला. त्यावर एक लव्ह सॉंग लागले होते. त्यानंतर थोड्याच वेळात ते फार्म हाऊस वर पोहोचले. तेवढ्यातच चौकीदारला त्याच्या घरून फोन आला. त्याची आई फार आजारी असल्याचा फोन होता तो. त्याने राज कडे घरी जाण्यासाठी परमिशन मागितली. आणि राज ने हसत हसत देऊन  टाकली. त्याला काही पैसे ही दिले आणि त्याला म्हटलं, " अजून पैशाची गरज असेल तर नि:संकोच पणे  माग माझ्याकडे." असे म्हणून त्याला घरी जाण्याची परवानगी दिली. प्रिया ने कपडे चैज केले नि मस्तपैकी पहिला चहा बनविला आणि दोघांनी घेतला. दूध गरम केले नि बाळालाही पाजले. त्यानंतर प्रिया म्हणाली,
   " तुला काय मी इथं स्वयंपाक करायला आणली ?
बाहेर हॉटेलमध्ये जाऊ नि मस्तपैकी डिनर करून येऊ.
   " पण कशाला ?  मी इथं तयार करते ना जेवण ?"
   " काही नको इथं फक्त मजा करायची बस्स !" असे
म्हणून तिचा हात पकडून आपल्या बाजूला बसवत म्हणाला," बैस इथं मला ना तुझ्याशी भरपूर काही बोलायचं आहे ."
    " खरंच ! असं काय बोलणार आहात ?"
    " काहीही !"
    " काहीही ....म्हणजे ?"
    " म्हणजे आपल्या दोघांच्या काही जुन्या आठवणी जसे
की ... असे म्हणून मध्येच थांबला. तसे प्रिया ने  विचारले,
   "  जसे की.......पुढे बोला ना मध्येच का बोलायचं थांबलेत ? "
    " तुला आपली पहिली भेट आठवते का ?"
   " पहिली भेट.....कोणती ?"
    " पहिल्यांदाज भेटलो म्हणजे ओळख झाली."
   " कॉलेज मध्ये असताना चे बोलताय काय ?"
   " ओबेसली पहिली भेट आपली कॉलेज मध्ये झाली ना ,
कॉलेजातील तो पहिला दिवस होता माझा. मी आपल्या मोटारीत बसून कॉलेजात निघालो होतो. माझी कार कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ पोहोचली. पावसाळ्यातले दिवस असल्याने सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्या मध्ये असलेले छोटे खड्डे डोळ्यांनी दिसत नव्हते . त्यामुळे अचानक मोटारीचे चाक एका छोट्याश्या खड्यात उतरले नि त्याचक्षणी खड्यात साचलेले घाण पाणी रस्त्यांच्या कडेने चालणाऱ्या एका कॉलेज कुमारीच्या अर्थात तुझ्या संपूर्ण अंगावर उडाले. तुझे कपडे तर खराब झालेच शिवाय तुझ्या चेहऱ्यावर ही ते घाण पाणी उडाले. म्हणून तू एक शिवी हासडलीस." असं राज
ने म्हणताच प्रिया च्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला. तिने त्याला दिललेली शिवी देखील आठवली.
“ मेल्या sss , फुटले का तुझे डोळे ? रस्त्यावरून चालणारी माणसं सुद्धा दिसत नाहीत का तुला ?” हे जसे
तिला आठवले तशी ती लाजली. तसे राज ने विचारले,
काय गं लाजायला काय झालं काय ?"
    " लाजायला काय झालंय म्हणून काय विचारताय ?
नको त्या आठवणी आठवायला सांगता ? मग लाज
नाही येणार का ?"
    " त्यात लाजायचं काय जे घडून गेले ते गेले ? आणि
ते जर घडलं नसतं तर तुझी माझी ओळख कशी झाली
असती ? " तशी प्रिया म्हणाली," पण तेव्हा मी तुम्हाला एक शिवी दिली होती."
    " काय दिली होती शिवी आठवते."
    " हो."
    " मग सांग बरं काय दिली होतीस तू शिवी ?"
    " चल्ला काहीतरीच असतं तुमचं. तेव्हा दिली होती
म्हणून आता देऊ का ?"
    " दे ना, काय हरकत आहे ?"
     " अंहं मुळीच नाही जमणार ते."
     " का जमणार ?"
     " एकदा सांगितलं ना जमणार म्हणून.नाही म्हणजे
नाही." असे म्हणून उठून जाऊ लागते.तसा तो तिला
जबरदस्तीने बसत म्हणाला ," अगं बैस कुठं निघालीस ?"
   " एकाच अटीवर बसेन."
    " कोणत्या ?"
    " तुम्ही तसलं काही म्हणायला मला लावू नका."
    " बरं ठीक आहे.शिवी नको देऊस पण त्यानंतर काय
झालं ते सांग ना ?"
     " पुढे काय तुम्ही गाडी थांबवली नि काच करून
माझ्या कडे पाहून सॉरी म्हटलं. परंतु मी भयंकर चिडली
होती. म्हणून रागातच म्हटलं की “व्हॉट सॉरी ! फक्त सॉरी म्हटल्यानं सर्व काही भरून येतं का ?” तुम्ही म्हणालात की “आय एम व्हेरी व्हेरी सॉरी !” परंतु माझा राग काही
शांत झाला नाही. मी म्हटलं की , म्हणे सॉरी! माय फुट !” असे म्हणत असतानाच माझी नजर मोटारच्या बाहेर असलेल्या आरशात गेली. चेहऱ्यावरील मेकअप खराब झाल्याने मी वैतागून म्हणाली , “ शी sss” असं थोबाड घेऊन मी कॉलेजला जाऊ ? छट !” असे मी म्हणाले.


  " मग आला तुझा हिरो .....कंदन बरोबर ना ?"
राज ने कंदन ला तिचा हिरो म्हटल्याने तिला राग आला.
ती त्याला म्हणाली , " तुम्ही त्याला माझा हिरो नका बोलू !
तेव्हा ही तो माझा हिरो नव्हता नि आता ही नाही ! माझे
हिरो फक्त तुम्ही आहात." असे म्हणून ती त्याला बिलगली. तेव्हा बाळाचा रडण्याचा आवाज आला. तशी
ती त्याच्या पासून दूर होत म्हणाली," बाळ उठलं वाटतं."
असे म्हणून लगबगीने उठली नि बाळाला घ्यायला गेली.
बाळ खरोखरच उठलं होतं. तिने त्याला उचलून आपल्या
छातीशी धरून थोपटून म्हणाली," उगी उगी बाळ का
उठला तू ? तुला भूक लागली आहे का ?" असे म्हणत ती
पलंगावर बसून त्याला स्तनपान करू लागली. बाळाने
दूध पिले तसे तो खेळू लागला. तसा तिच्या जवळ राज
आला नि म्हणाला," बाळ उठलाच आहे तर चल आपण
जेवण करून येऊ." तशी प्रिया म्हणाली," जरा बाळा घेता
का ? म्हणजे मी कपडे बदली करीन म्हणते."
    " काय करायचेत दुसरे ? हे छान दिसतात."
    " काही नको  मी दुसरे घालते."
    " बरं बाबा ! घाल दुसरे कपडे तोपर्यंत मी घेतो बाळाला." तसे राज ने बाळा घेतले.प्रिया ने कपाटातून
एक मस्तपैकी पिंक कलर ची साडी काढली नि त्या साडीला मॅचिंग ब्लाउज ही घातले. कानात रिंग पण
कपड्याना मॅचिंग होतील असे घातले. एका हातात
घड्याळ नि दुसऱ्या हातात सोन्याचे कडे.केस विंचरले
चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला. ती तयार झाली
तसे राज ने पण मॅचिंग होतील असेच कपडे घातले.
आणि निघाले.मोटारीत बसले नि एका चांगल्या शा
रिसॉर्ट मध्ये गेले. तिथं डिनर केला नि पुन्हा फार्म हाऊस
वर परतले. बाळ झोपला होता. त्याला अलगद बिछान्यावर ठेवले. त्यानंतर दोघांनीही कपडे बदली केले
नि मग मस्तपैकी मधुचंद्र साजरा करून एकमेकांच्या
मिठीत झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर प्रिया ने अगोदर
स्नान केले. किचनमध्ये जाऊन चहा-नाश्ता तयार केला
नि मग राज ला उठवायला गेली. पण राज काही उठेना
म्हणून त्याच्या गालात चावायला गेली तशी राज ने तिला
पकडून आपल्या मिठीत घेतले. तशी प्रिया म्हणाली,
   " मिस्टर उठा आता, वाजले किती ते बघा अगोदर."
   " ते वाजू देत गं , ते काय आपल्यासाठी थांबणार आहे
का ?"
    " ते नको थांबू दे, तुम्ही अगोदर चहा नाश्ता करून घ्या."
     " ते नाश्ता कोणाला पाहिजे ? तू जवळ असताना ?"
     " पुरे हां हा चावटपणा ! सकाळी सकाळी देवाचे
नाव  घ्यायचे सोडून हे काय नको ते."
     " देवाचं नाव मंदिरात हे काय मंदिर आहे ?" असे
म्हणून तिला किस करतो.तेवढ्यात बाळ उठलं.तशी
म्हणाली ," सोडा मला.बाळ उठलं बघा."
     " हे बाळ पण ना, नको तेव्हाच उठते."
     " शी ss असं बोलतात आपल्या बाळा बद्दल."
     " बरं राहिलं आमचं." असे म्हणत आळस देत उठला.
चादर एका बाजूला भिरकावली नि वाँश रूम मध्ये शिरला.


   क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.