प्रेमासाठी काहीही ४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रेमासाठी काहीही ४ |
राधा निघून गेल्यानंतर मोहन स्वतःशीच विचार करू
लागला की ती डेटबॉडी मीराचीच तर नसेल ना ? म्हणजे
मी समजतोय तसं नसेल तर ? म्हणजे मीरा खरंच प्रेग्नेंट होती का ? जर प्रेग्नेंट होती तर तिने मला तसं सांगितले कसे नाही ? शिवाय ती प्रेग्नेंट झाली कशी ? मी तिला स्पर्शच केला नाही तर ! छे, छे , छे ! मी भलताच काहीतरीच विचार करतोय आपला ? ती प्रेग्नेंट कदापि नसेल ? मग तिने स्वतःच्या भावाला खोटं का सांगितलं ?
ती प्रेग्नेंट आहे आणि ती पण माझ्यापासून.तिचा भाऊ
म्हणजे सूंदर खोटं तर बोलत नाहीये ना ? छे छे छे ! तो
खोटं का बोलेल ? जर तो खोटं बोलत नाहीये आणि मीही
खोटं बोलत नाहीये. मग खोटं कोण बोलतेय ? " किंचित
विचारमग्न झाला. तशी त्याच्या डोक्याची ट्यूब पेटली.
तसा तो स्वतःशीच बोलला की मग मीराच खोटी बोलत
आहे. पण प्रश्न असा पडतोय ती का खोटं बोलत आहे नि
कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे ? असं तर नसेल
तिचा कुणीतरी बॉयफ्रेंड असावा आणि त्याने तिला धोका
दिला असावा. तिच्याशी लग्न करावे लागेल म्हणून तो
पळून गेला असावा. आणि तिच्या पुढे दुसरा काही पर्याय
नसल्याने आणि आपला भाऊ खूप चिडेल.वेळ पडल्यास
आपला जीव पण घेईल म्हणून कदाचित तिने माझे नाव
घेतले असावे. पण तरी देखील एक प्रश्न उरतोच तो म्हणजे
तिने माझ्यापासून तरी लपवायला नाही पाहिजे होते.जर
तिनं सत्य काय सांगितले असते तर कदाचित मी तिचा
स्वीकार केला ही असता.परंतु तिने मला काहीच सांगितले
नाही, मला ही अंधारात ठेवले . कदाचित मी तिचा स्वीकार
करणार नाही म्हणून असेल. परंतु आता माझं काय होईल
म्हणजे स्वतः तर मरून गेलीच परंतु माझ्याही गळ्यात
पाश अडकवून गेली. मला एका अशा अपराधाची शिक्षा
मिळणार की जो अपराध मी केलाच नाही.सूंदर माझा
जिगरी दोस्त होता.आता तोही मला आपला दुश्मन समजेल. काय करु ? कसं समजावू त्याला ? काही कळत
नाही. परमेश्वरा मी कोणाचे काही वाईट केले होते जे हे
भोग माझ्या नशिबी आले.कदाचित मागील जन्माचे भोग
असावेत हे.हो असेच असेल.ह्या जन्मात तर मी कोणाचेही
वाईट केलेलं माझ्या स्मरणात नाही.याचा अर्थ मागील
जन्मात नक्कीच कोणाचे तरी घोडे मारले असावेत. त्याचीच फळे आहेत.मोहन आपल्या मनाची कशीतरी
समजूत काढत होता. तेवढ्यात कॉन्स्टेबल विजय शिंदे
आला नि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाला," सर , पोष्टमार्टम
रिपोर्ट आले आहेत." त्यावर इन्स्पेक्टर कदम म्हणाले,
" इकडे आण पाहू ! काय रिपोर्ट म्हणतोय ?" असे म्हणून इन्स्पेक्टर कदम रिपोर्ट आपल्या हातावत घेतात
आणि तपासून पाहतात.तर पोष्टमार्टम रिपोर्ट मध्ये लिहिलं असतं की गळा घोटून जीव घेण्यात आला नि नंतर
डेटबॉडी पाण्यात फेकण्यात आली. याचा अर्थ अगोदर तिचा गळा आवळून तिला ठार मारण्यात आले आहे. परंतु तिच्या मानेवर खुनी माणसाच्या हाताचे ठसे कसे नाहीत.
बहुधा तिच्या ओढणी ने तिचा मागून गळा आवळला असावा. ती मृत पावली अशी जेव्हा त्याची खात्री झाली असेल तेव्हा तिला पुलावरून खाली टाकून दिले असेल नि मग आपल्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिच्या मृतदेहाच्या मागोमाग तिच्या हत्याऱ्याने पाण्यात उडी
घेतली असेल नि तिला शोधण्याचे फक्त नाटक केले
असेल......ओ येस असंच केलं असणार परंतु त्यावरून मोहन नेच तिचा खून केला आहे, असे सिध्द नाही करता येणार आपल्याला.कारण त्यासाठी काहीतरी भक्कम पुरावा पाहिजे."
" म्हणजे सर ?" कॉन्स्टेबल शिंदे न समजून विचारले.
" मीरा चा खुनी मोहनच आहे, हे सिध्द करण्यासाठी
ठोश पुरावा पाहिजे. कारण त्याच्या हाताचे ठसे तिच्या गळ्यावर सापडले नाहीत."
" अहो कसे मिळणार ठसे ? त्याने तिचा तिच्याच ओढनी ने आवळा असं तुम्हीच म्हणालात ना आता थोड्या वेळापूर्वी !"
" हो बरोबर आहे तुझं. केवळ संशयाने कुणाला गुन्हेगार
ठरविता येत नाही. कोर्टाला भक्कम पुरावा लागतो."
" मग तर एकच उपाय आहे."
" कोणता ?"
" तिच्या पोटात बाळ होतं त्याचा डीएनए टेस्ट केला तर
माहीत पडेल बाळाचा बाप मोहन आहे,आणि तसं झालं
तर मयत झालेली मुलगी मीरा च होती हे सिध्द होईल. आणि त्याच बरोबर मोहन आणि मीरा ह्या दोघांचे अफेर
सुरू होते हे सिध्द होईल."
" एकदम करेक्ट ! जा आताच्या आता आणि डॉक्टराला
जाऊन सांगा की त्या बाळाचा डीएनए मोहनच्या डीएनए शी मँच करून पहा.जर दोघांचा डीएनए मँच झाला तर मग मोहनला कोणीच वाचवू शकणार नाही. या दोघांचे संभाषण सुरू असतांनाच सुंदर पोलीस स्टेशनला इन्ट्री
केली होती. परंतु दोघां मधले संभाषण ऐकून त्याच्या
काय मनात आले कुणास ठाऊक तो माघारी वळला.
पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने कोणाला तरी फोन
केला. आणि पोलीस स्टेशनमध्ये शिरला. इन्स्पेक्टर कदम
ना भेटून त्याने आपल्या मित्राला अर्थात मोहन ला भेटण्याची परवानगी मागितली.तेव्हा इन्स्पेक्टर कदम ने
विचारले," सुंदर एक गोष्ट विचारू ?"
" अवश्य विचारा ।"
" तुमच्या बहिणीचा त्या मोहन ने खून केला.आणि
तुम्ही त्यालाच भेटायचं म्हणता. मला कळलं नाही तुम्ही
कशा करता आरोपी ला भेटू इच्छिता ?"
" इन्स्पेक्टर साहेब , तो आरोपी जरी असला तरी तो
एके काळचा माझा जिवलग मित्र होता. मी त्याला भेटून
एवढंच विचारू इच्छितोय की माझ्या बहिणीला त्याने का
फसविले ? असा काय अपराध माझ्या बहिणीने केला होता त्याचा ?"
" आणि तुम्हांला काय वाटतं तो खरं सांगेल ?"
" कबूल तर नाहीच करणार तो परंतु माझ्या मनातील
जे आहे ते बोलल्याशिवाय मला ही चैन पडणार नाही."
" हे बघा तुम्ही फक्त भेटू शकता.बाकी तुमचं जे काय
असेल ते बाहेर निपटवा. हे पोलीस स्टेशन आहे, इथं गुन्हेगाराला भेटण्याची कोणाला ही परवानगी नाहीये."
" इन्स्पेक्टर साहेब मी गैरकानुनी कोणतंही काम करणार
नाहीये.त्याबद्दल खात्री बाळगा.मी फक्त त्याला भेटणार
आहे नि काही प्रश्न माझ्या मनात आहेत, त्याची उत्तरे मला
त्याच्या कडून पाहिजेत."
" ठीक आहे." असे बोलून त्यांनी एका कॉन्स्टेबल ला
आवाज दिला नि त्याला सांगितले की ह्यांना मोहन
कडे घेऊन जा. तो कॉन्स्टेबल मोहन ज्या कोठरीत ठेवले
होते नेऊन सोडले. सुंदर ला मोहन एक्दम खुश झाला नि
म्हणाला," मला माहित होतं तू मला जरूर भेटायला येणार
कोणाचा जरी माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तरी
तुझा नक्की बसेल , हे ठाऊक होतं मला." त्यावर सुंदर
कुत्सित पणे म्हणाला," चुकीचा अंदाज बांधतो आहेस तू ?"
" म्हणजे ?"
" माझा तुझ्यावर विश्वास आहे,म्हणून मी तुला भेटायला आलेलो नाहीये."
" मग ?"
" तुला सांगायला आलोय की तुझी माझी सारी आता
संपली या पुढे आपण दोघेही एकमेकांचे शत्रू असू !"
" हेच सांगायला इथवर आलास तू ?"
" हां , कारण हे सांगणे फार जरुरीचे होते."
" म्हणजे तू पण मला गुन्हेगार समजतोस ? मला वाटलं
इतर कोणीही समजू शकले नाही तरी माझा यार मला नक्की समजून घेईल."
" अरे कसं समजून घेऊ मी तुला ? जिला तू ठार मारलीस ती माझी धाकटी बहीण होती रे , तिला मारताना
तुला एकदा देखील जाणवलं नाही का ? जिला आपण
मारतोय ती आपल्या जिवलग मित्राची बहीण आहे असं
एकदाही वाटलं नाही का तुला ?"
" सुंदर तू तर विश्वास कर माझा. मी तुझ्या कसं बरं
मारू शकतो मी ?"
" कसं म्हणजे ओढणी ने आवळलास ना गळा तिचा ?'"
" सुंदर काय बोलतोस तू हे ?"
" खोटं नाहीये बोलत मी ! पोष्टमार्टम चा रिपोर्ट सांगतोय."
" अरे मग ऐक ती डेटबॉडी मीरा ची नाहीच आहे."
" अरे किती वेळा सांगशील ते.शंभर वेळा नाही म्हणालास म्हणून का ते खोटं ठरणार आहे ? सत्य हे
शेवटपर्यंत सत्यच राहते.ते कधीही बदलत नाही."
" आता कसं समजावू मी तुला ."
" मला काहीही समजावू नकोस.मला सर्वकाही माहीत
आहे, फक्त वाईट वाटतं ते एकाच गोष्टीचे तू आपल्या
मैत्रीची लाज नाही राखलीस. कृतज्ञ निघालास.या पुढे
आपली भेट होईल मैत्री म्हणून होणार नाही तर शत्रू म्हणूनच ! येतो मी ! " असे म्हणून सूंदर तेथून चालता
झाला.
इस्पितळातुन कॉन्स्टेबल विजय शिंदे डीएनए टेस्ट
रिपोर्ट घेऊन आला. आणि त्याने तो रिपोर्ट इन्स्पेक्टर
जयदेवच्या हाती दिला.इन्स्पेक्टर जयदेव ने रिपोर्ट चेक
केला असता.त्याच्या द्यानात आले की डीएनए टेस्ट रिपोर्ट मध्ये ते बाळाचा डीएनए मोहनच्या डी एन ए शी मँच झाला. मग मयत स्त्री मीरा च होती यात काहीही संशय
नाही.परंतु मोहन मात्र समजला की हा रिपोर्ट खोटा आहे,
कुणीतरी आपल्याला केस मध्ये अडकवू पाहयोय पण
कोण हे काही केल्या कळेना. त्याने कितीही ओरडून
सांगितले की हा रिपोर्ट खोटा आहे,कारण मीरा शी त्याचे
शारीरीक संबंध झालेच नव्हते तर तो त्या बाळाचा बाप मी
कसा काय होऊ शकतो ? पण कोण ऐकणार त्याचं ?
आणि कोर्ट तर मिळसलेल्या पुरव्या वरूनच समोरील
व्यक्ती अपराधी आहे किंवा हे ठरवते.त्यामुळे मोहन
पूर्णतः अडकला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी
एक वकील पाहिला होता. परंतु वकिलाने स्पष्ट शब्दात
सांगितले की सर्व पुरावे तुमच्या मुलाच्या विरुध्द आहेत. अर्थात मीच काय दुसरा कोणताही वकील तुमच्या मुलाला निर्दोष ठरवू शकणार नाही. असे बोलून त्याने मोहन ची केस घेण्यास त्यांनी नकार दिला. मग दामोदरानी आणखीन एक दोन वकिलांकडे चौकशी केली. पण त्यांचे ही म्हणणे तेच होते. शेवटी थकून भागून घरी परतले. तेव्हा त्यांच्या पत्नी ने त्याना विचारले," वकील काय म्हणाले , आपला मोहन निर्दोष सुटेल ना ?" त्यावर दामोदर म्हणाले," नाही."
" म्हणजे ?" न समजून देवयानी ने विचारले.
" कोणताच वकील आपली केस घ्यायला तयार नाही."
" का बरं ?"
" त्यांचे असे म्हणणे आहे की पोलिसांकडे त्याच्या
विरुध्द भक्कम पुरावे आहेत."
" पण ते सारे खोटे आहेत, असं सांगायचं नाही का तुम्ही ?"
" सांगितले."
" मग काय म्हणाले ?"
" दुसरे काय म्हणणार ? ते सारे पुरावे खोटे आहेत असे
तुम्ही कशावरून म्हणता ?"
" मग सांगायचं त्याना की आमचा आमच्या मुलावर
पूर्ण भरवसा आहे म्हणून. तो असं नीच काम कधीच करणार नाही."
" अगं हे आपल्याला माहीत आहे, त्याना कसं पटवून देणार आपण ?"
" म्हणजे आमच्या मुलाला निर्दोष ठरविण्याचा काहीच
उपाय नाहीये ?"
" सध्या तर कोणताच उपाय नाहीये. आता एखादा
चमत्कार घडला तरच काही होऊ शकतं !"
" आता चमत्कार कसा घडणार . इथं कोणी देव आहे का ? आपण सामान्य माणसं !"
" आता देवानेच काहीतरी चमत्कार केला तर !"
" अरे देवा , आता तूच काहीतरी चमत्कार कर बाबा. आणि कसं ही करून माझ्या मुलाची निर्दोष सुटका कर. पांढुरंगा तूच आमचा वाली रे आता !"
माणूस पण फार विचित्र प्राणी आहे पहा ! म्हणजे सुखात कधी देव आठवत नाही त्याला.पण दुःख आले की देवा धाव ! जणू देव त्यांच्या नोकरच आहे.दिवसातून एकदा तरी श्रद्धेने देवाचे नाव घेतलं तरी पुरेसे आहे.परंतु
तेवढा ही वेळ नाही लोकां जवळ.हां मोबाईल वर गेम
खेळण्यासाठी मात्र खूप वेळ आहे.मग तो भूक तहान
देखील विसरतो. एवढा मग्न होतो तो खेळामध्ये ! तेवढा
मग्न ईश्वर नामात मग्न झाला तर कल्याणच होईल को
त्याचे ! असो आता पुढे काय ते पुढच्या भागात वाचा
मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.आपल्या कमेंट
म्हणजेच आपल्या सारख्या वाचकांकडून आम्हाला
मिळालेले पारितोषिक आहे.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा