प्रेमासाठी काहीही ३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रेमासाठी काहीही ३ |
पोलीस पथकाने नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी लोकांकडे चौकशी केली; परंतु मिराच्या कुठंच सुगाव लागला नाही.मोहन ने अगदी बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगितले की मी काहीच केलं नाही. परंतु पोलिसांनी त्याचे काहीच ऐकून घेतले नाही. त्याला पोलीस कोठडीत डांबून ठेवले. पोलिसांनी नदीच्या किनाऱ्यावर
कोळीवाडा मध्ये चौकशी केली.परंतु कोणालाही नदीत
वाहणारे प्रेत दिसले नाही किनाऱ्याला लागलेले दिसले.
आणि एक दिवस अचानकपणे नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी लोकांना पोलिसांना खबर दिली की एका स्त्री चा मृतदेह किनाऱ्यावर सापडला. पोलिसांचे एक
पथक खबर दिलेल्या ठिकाणी पोहोचले. मृतदेह पाण्याने फुगला होता. आणि त्या मृतदेहाला कुबट वास सुटला होता. शरीर फुगल्यामुळे कळत नव्हते.तो मृतदेह महिलेचा
आहे का मुलीचा ? चेहऱ्यावर अनेक जखम झाल्या होत्या.
त्यामुळे चेहरा ही नीट ओळखू येत नव्हता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला नि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. पण त्या अगोदर मृतदेहाची ओळख पटावी
म्हणून पोलिसांनी मीरा च्या घरच्यांना इस्पितळात बोलविले. सुंदर आणि त्याचे आई-वडील रुग्णालयात आले त्यांनी तो मृतदेह पाहिला. परंतु त्यांना ही ओळखता आले नाही. पण तो मृतदेह मीराचाच असावा. असे तिच्या
शरीरावर असलेल्या कपड्यावरून मानण्यात आले.त्या
शिवाय गावात दुसरी कोणतीही घटना घडलेली नव्हती. म्हणजे आत्महत्या अथवा कुणी बेपत्ता झाल्याची तक्रार
पोलीस स्टेशनमध्ये नोंद नव्हती. आजूबाजूच्या गावात ही
चौकशी केली की कुणी मिसिंग आहे का ? पण तशी काहीच खबर नव्हती. शिवाय मृतदेह मीराच्या वयाचा होता. पोष्टमार्टमच्या रिपोर्ट नुसार मयत झालेली मुलगी तीन महिन्यांनी प्रेग्नंट असल्याचे ही सिध्द झालं. त्यावरून एक गोष्ट समोर आली की मीरा प्रेग्नेंट होती तीन महिने झालं होतें तिला. त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की
मीरा आणि मोहन या दोघांचे नक्कीच अफेर असावे. भावनेच्या आहारी जाऊन त्या दोघांनी मर्यादा ओलांडली
असावी.ती गोष्ट मीरा ने मोहन ला सांगितल्या नंतर दोघांमध्ये वाद झाला असावा.आणि त्या वादातूनच हे कांड
झाले असावे.अथवा असे ही असू शकते.राधाने स्वतःहून मोहन ला प्रपोच केल्यामुळे मोहन ला वाटू लागले
की मीरा त्या दोघांच्या मार्गातील काटा आहे , तो दूर करणे गरजेचे आहे, म्हणून त्याने संध्याकाळी मीरा ला नदीच्या पुलावर बोलविले असावे. कारण संध्याकाळच्या वेळी पुलावर कोणी नसतो. त्यावेळी जर मीरा ला नदीत लोटून देऊन तिचा जीव घेतला तर कोणाला कळणार ही नाही. आणि त्या प्रमाणे योजना पूर्वक मोहन ने मीरा ची हत्या केली. असे गृहीत धरून मोहन विरुध्द कोर्टात खटला दाखल करण्यात आला. मोहन चे आई- वडील मोहनला
भेटायला पोलीस स्टेशनला आले. मोहन ची आई अर्थात
देवयानी मोहन ला म्हणाली," मोहन बाळा काय करून
बसलास तू हे ? "
" मी काहीच केलेलं नाहीये आई !"
" मग काय पोलीस खोटं का सांगताहेत ?"
" पोलीस खोटं सांगत नाहीत; परंतु पोलिसांना मिळालेली डेड बॉडी मीरा ची नाहीये."
" काय सांगतोस ?"
" खरं तेच सांगतोय मी आई ! पण कोणीच विश्वासच ठेवत नाहीये माझ्यावर."
" अरे कसा ठेवणार ? मीरा ने जे कपडे घातले होते तेच
कपडे होते त्या डेटबॉडी वर , मग कोण कसा विश्वास ठेवील तुझ्या बोलण्यावर. परंतु मला एक सांग ती डेटबॉडी
मीरा ची नाहीये, हे कशावरून वाटलं तुला ?"
" अगं आई , मीरा प्रेग्नेंट नव्हतीच !"
" प्रेग्नेंट नव्हती तर पोष्टमार्टम च्या रिपोर्ट मध्ये तिच्या
पोटात तीन महिन्याचा गर्भ मिळाला तो कसा ?"
" तेच तर सांगतोय ती डेड बॉडी मीरा ची नाहीच आहे."
" हे तू खात्रीपूर्वक कसं सांगू शकतोस ? नाही म्हणजे
तिच्या पोटात बाळ आहे, हे तिने तुला सांगितले नसेल
कदाचित. किंवा तिला स्वतःलाही कळलं नसेल."
" असं कसं कळणार नाही.पाळी चुकली लगेच ध्यानात
येते बायकांच्या."
" हो रे , ते जरी खरं असलं तरी कधी कधी नाही कळत एखाद्याला त्यात पहिली वेळ असल्यावर बऱ्याचशा जणींना कळत नाही आपण प्रेग्नेंट आहोत ते.आणि काहींना तर मासिक पाळी दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी पण येते त्यामुळे तिला कळलं नसेल कदाचित !"
" तुला काय म्हणायचंय मीरा प्रेग्नेंट होती."
" असं मी सांगत नाही तर पोष्टमार्टम रिपोर्ट सांगतोय.
ते तर खोटं सांगत नाही ना ?"
" अगं पण ते कसं शक्य आहे ? आमचे शारीरिक संबंध
झालेच नव्हते तर !"
" मग एकच कारण असू शकतं तिचे दुसऱ्या कोणा
बरोबर तरी अनैतिक संबंध असावेत."
" आई, काय बोलतेस तू हे ? ती त्यातली मुलगी नव्हतीच ."
" हे तू खात्री ने कसं सांगू शकतोस ? नाही म्हणजे तू
तिच्या सोबत सतत असायचास का ? नाही ना ? मग ?
अरे आजकालच्या पोरीचं काही सांगू नकोस.प्रेम करतात
एका बरोबर नि पळून जातात दुसऱ्याच बरोबर.तुला काय
तिचे आणखीन किती बॉयफ्रेंड असतील ते.पकडला गेला
तर चोर नाहीतर सावच ना ?"
" आई, तू काही पण बोलू नकोस मीरा बद्दल.तिचे
दुसऱ्या कुणा बरोबर ही अनैतिक संबंध नव्हते.तिचं फक्त माझ्यावर प्रेम होतं."
" मग तिच्या पोटात पोरं कसं मांडलं ?"
" मग मी मघापासून तुला काय सांगतोय की ती डेड बॉडी मीरा ची नाहीये म्हणून."
" ती मीरा ची डेड बॉडी नाही असं जर तू म्हणतोस , तर मग ती आहे कोणाची बॉडी ?"
" ते आता मला कसं माहीत असणार ?"
" बरं, मग मला हे सांग त्या दिवशी नेमकं घडलं तरी
काय ?" तेव्हा मोहन ने थोडक्यात सविस्तर माहिती आपल्या आईला दिली. ते ऐकून देवयानी बाईंनी आपल्या
मुलाला विचारले," म्हणजे तुझं प्रेम नव्हतं तिच्यावर ?"
" नाही ना ?"
" तू तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाहीस म्हणून तिने
पुलावरून खाली उडी मारून जीव दिला ?"
" हां आई !"
" मग तू हे पोलिसांना का नाही सांगायचं ?"
" सांगितले सारेकाही !"
" मग काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब ?"
" काय म्हणणार ? त्याना मी सांगतो ते खरंच वाटत नाहीये. त्यांचं म्हणणे आहे की, प्रत्येक अपराधी पकडल्या
गेल्यावर असंच सांगतो की , तो मी नव्हेच !"
" असं कसं म्हणू शकतात ते, थांब. मी सांगून पाहते त्याना."
" काहीही फायदा होणार नाहीये त्याचा."
" असं कसं म्हणतोस मी सांगून पहाते ना ?"असे बोलून
त्या इन्स्पेक्टर जयदेव जवळ जात म्हणाल्या," साहेब , माझा मुलगा गुन्हेगार नाही हो ! त्याने काहीच केलेलं नाहीये."
" मी समजू शकतो.तुम्ही त्याच्या मातोश्री आहात. अर्थात तुम्हाला वाटणारच की आपला पोरगा निर्दोष आहे.
पण कायदा भावनांवर चालत नाही. तुमचा मुलगा गुन्हेगार
आहेत, याचे सबळ पुरावे आहेत आमच्याकडे.त्यामुळे
तुमच्या मुलाला शिक्षा होणारच आहे."
" अहो, तर सारे पुरावे खोटे आहेत."
" असं कशावरून म्हणता ?"
" जी डेटबॉडी पोलिसांना मिळाली ती मीरा ची नाहीये."
" असं कोण म्हणतोय ?"
" माझा पोरगा म्हणतोय."
" अहो तो तर म्हणणारच, चोर कधी म्हणतो का मी
चोरी केली म्हणून."
" अहो साहेब मीरा प्रेग्नेंट नव्हती."
" हे तुम्हाला कोणी सांगितले ?"
" कोणी सांगितले म्हणजे ? माझ्या मुलाने मला सांगितले."
" अहो मोहनच्या आई, तो तर सांगणारच असं.परंतु
मीरा ने स्वतःआपल्या बंधू समोर कबूल केलं होतं की
तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप मोहन आहे म्हणून."
" साहेब तो खोटं बोलतोय."
" आणि तुमचा मुलगा खरं बोलतोय असं म्हणायचं का
तुम्हाला ?" तेव्हा मोहन चे वडील दामोदर म्हणाले," तसं
नाही साहेब, तिला म्हणायचंय की तसं काही असतं तर
मोहन ने आम्हाला सांगितले असते.असं तिला म्हणायचे
आहे."
" हो का ? मग मला सांगा त्याचं प्रेम दोन दोन मुलींवर
होतं हे सांगितले होते का तुम्हांला ?" इन्स्पेक्टर जयदेव
ने विचारले.त्यावर मोहन चे वडील निरुत्तर झाले.परंतु
देवयानी एकदम कळकळीने सांगत होत्या की , माझा मुलगा निर्दोष आहे हो !"
" असे तुम्ही म्हणता परंतु मिळालेले पुरावे तुमचा मुलगा गुन्हेगार असल्याचे सिध्द करतात."
" कोणते पुरावे ?"
" मुख्य गोष्ट म्हणजे घटनेच्या जागी तुमच्या मुलाची
उपस्थिती काय दर्शविते. ते तुम्हीच सांगा बरं."
" अहो, त्या मुलीनेच माझ्या मुलाला बोलविले होते
तिथं."
" असे तुम्ही म्हणता, पण पुरावे वेगळंच काही सांगतात."
" कोणते पुरावे नि कसले पुरावे ?"
" ते आम्ही कोर्टातच सादर करू."
" म्हणजे तुम्ही माझ्या मुलाला सोडणार नाही तर !"
" कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तर नाहीच सोडणार, आणि
त्यानंतर ही सरळ तुरुंगातच रवानगी होईल त्याची. माफ
करा आईसाहेब मी आपली कोणतीच मदत करू शकणार
नाहीये." तेव्हा दामोदर ने विचारले," साहेब त्याची बेल तरी
होईल का ?"
" नाही. आम्ही त्याला घटनास्थळी अटक केली आहे
तरी पण तुम्ही कोर्टात जाऊन बेल मिळविण्याचा प्रयत्न
अवश्य करू शकता. परंतु आज शनिवार आहे, कोर्ट बंद असेल. आणि उद्या रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. तेव्हा सोमवार शिवाय तुम्हांला बेल मिळणार नाहीये." त्यानंतर मोहन चे आई-वडील घरी जायला निघाले तशी मोहन ने आपल्या आईला हांक मारली. तशी देवयानी मोहन जवळ गेल्या नि त्याला विचारू लागल्या की काय झालं बाळ ? काही हवं का ?" त्यावर मोहन म्हणाला," आई राधाला माझा एक निरोप सांगशील."
" काय सांगू राधाला ?"
" तिच्या मनात माझ्या विषयी गैरसमज झालाय तो
दूर करायचाय , म्हणून तिला म्हणावे मला फक्त एकदा
भेटून जा."
" पण येईल का ती भेटायला ?"
" अवश्य येईल.तू फक्त माझा हा निरोप सांग."
" सांगते हो , पण मला नाही वाटत ती येईल अशी ! बरं येऊ मी आता ?" देवयानी बाईंनी विचारले. तेव्हा मोहन ने होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर दामोदर कदम आणि देवयानी तेथून निघून निघाले ते थेट राधाच्या घरी गेले.
देवयानी बाईना पाहून राधाच्या आईने त्या दोघांना आदराने आंत यायला सांगितले.तेव्हा राधाच्या आई म्हणाल्या," आता नाही येत, पुन्हा येईन केव्हातरी ! आता
फक्त राधाला एक निरोप द्यायला आली होती." त्यावर
राधाच्या आईने विचारले की, कशाचा निरोप आणि कुणी
दिला ?" त्यावर देवयानी म्हणाल्या," राधाला माझ्या मोहन
ने पोलीस स्टेशनला बोलविले आहे भेटायला." तेव्हा राधाची आई म्हणाली," मोहन च्या आई, राग मानू नका.
पण खरं तेच सांगतेय, मोहन ने असं करायला नको हवं होतं."
" म्हणजे तुम्हांला सुध्दा वाटतं की मोहन केलंय हे सारं?"
" अहो, मग सांगा त्याचे जर मीरा सोबत अनैतिक संबंध
नव्हते तर एवढ्या संध्याकाळी नदीवर कशाला गेला होता ?"
" अहो , माझ्या पोरांने सांगितले नाही का ? की त्याला
मीरा ने बोलविले होते भेटायला."
" अहो मग त्याने त्या बिच्चारीचा जीव कशासाठी घेतला
त्याने केलेलं पाप लपविण्यासाठीच ना ?"
" राधाच्या आई, काय बोलता तुम्ही हे ? माझा मुलगा
असं नीच काम कदापि करणार नाही."
" अहो, मोहनच्या आई , प्रत्येक मुलाच्या आई-बापाला
असंच वाटतंय की आपला पोरगा गुणांचा आहे, पण बाहेर
काय गुण उधळत असतो हे थोडंच माहीत असतं आई बापाला ?"
" राधाच्या आई, फार बोललात, नि मी मुकाट्याने ऐकून
घेतलं आता या पुढे एक अक्षर ही ऐकून घेणार नाही मी
माझ्या मुला विषयी !"
" मला तरी कुठं वेळ आहे, तुमच्याशी वाद घालत
बसायला ? " आपल्या मुलीकडे पाहत म्हणाल्या," चल गं
आंत चल.आणि काही जायचं नाही भेटायला त्याला."
असं म्हणून झंकाऱ्याने निघून गेल्या. तश्या मोहन च्या
आई म्हणाल्या ," " चला हो उगाच आलो आपण इथं ?
नको ते ऐकून घ्यायला."
" अगं आता लोकं बोलणारच किती जणांनी तोंड बंद
करशील."
" कोण बोलले एका एका जीभ हासडून देईन मी हातात.आणि काय हो तुम्ही काहीच बोललात नाही.
मुकाट्याने ऐकून घेतलांत सारं."
" आता दोन बायकांच्या मध्ये पुरुषांनी योग्य दिसलं
असतं का ? म्हणून मी गप्प बसलो."
" इथलं जाऊ दे, पण पोलीस स्टेशनला पण बोललात
नाही तुम्ही काही ? का तुम्हाला ही वाटतं की आपला
मोहन गुन्हेगार आहे म्हणून."
" असं म्हटलं का मी ?"
" तुम्ही म्हटलात नाही काही म्हणून मला आपलं तसं
वाटलं."
" आता तू बोलत असताना मी काय बोलणार बरं ?
म्हणून मी मुकाट्याने ऐकायचं काम करत होतो.आणि
तसं पण तू मला काही बोलू दिलं आहेस का कधी ?"
" वा ! म्हणजे मी तुम्हांला बोलायला बंदी केली वाटतं."
" तसं नाही गं, तू बोलत असतांना मी काय बोलणार
दुसरे ?"
" बरं चला आता घरी ! ती बया मोहन ला भेटायला
जाईल असं काय आता वाटत नाहीये."
" आपलं सांगायचं काम होतं ते आपण केलं.आता
जाणं अथवा न जाणं सारं तिच्या हातात आहे नाही का ?"
" माझा पोरगा कसा सुटेल काही कळत नाही."
" त्यासाठी वकील करायला लागेल आपल्याला ?"
" पण वकील करायला पैसे कोठून आणायचे ?"
" काही तरी करायला हवं.म्हणजे जमीनचा एक तुकडा
गहाण टाकावी लागेल सावकाराकडे." बोलत बोलत दोघेही आपल्या घरी पोहोचले.
राधाच्या मनात मोहन ला भेटण्याची अजिबात इच्छा नव्हती; परंतु मनात खदखदत असलेला राग बाहेर पडणे
आवश्यक होते. म्हणून ती मोहन ला भेटायला पोलीस
स्टेशनला गेली. इन्स्पेक्टर जयदेव जवळ विनंती केली की
मला मोहन ला भेटू द्या. इन्स्पेक्टर जयदेव ने तिला भेटण्याची परवानगी दिली. तेव्हा मोहन जिथं कोठडीत
बंद होता. तिथं एका लेडीज कॉन्स्टेबल ने तिला आणून सोडले. राधाला पाहून मोहन तिच्या जवळ आला नि
म्हणाला," राधा , कधीपासून वाट पाहतोय तुझी ?"
" कशासाठी ?" राधा एकदम नाराजी स्वरात बोलली.
" कशासाठी म्हणजे ? तुला खरंच वाटतं का मी तसं
काही करेन."
" त्यात वाटायचं काय ? तू जे केलेस ते सर्वांसमोर आले."
" काय केलं मी ?"
" तुला माहीत नाही केलेस ते ? वरून मलाच विचारतोस
मी काय केलं म्हणून."
" अगं राधा मी खरच काही नाही केलंय."
" मग काय पोलीस खोटं बोलतात की तुझ्या विरुद्ध
मिळालेले पुरावे खोटे आहेत?"
" ते सर्व खरं आहे, परंतु पोलिसांना डेट बॉडी सापडली
ती मीराची नाहीये."
" मग कोणाची माझी आहे ?"
" काहीतरीच काय बोलतेस राधा ?"
" मग काय बोलू ? तू काही बोलण्यासाठी शिल्लक
ठेवले आहेस का ? का नाही सांगितलेस मला की तुझं
प्रेम मीरा वर आहे म्हणून."
" माझं खरंच प्रेम मीरा वर नव्हतं. तू तरी विश्वास
कर माझा."
" कसा विश्वास करू तुझा ? तुझं जर मीरा वर प्रेम
नव्हतं तर मीरा ला भेटायला बीच वर कशाला बोलविलेस तू ?"
" मी नाही बोलविले तिला.उलट तिनेच मला बोलविले."
" अरे हे कसं शक्य आहे ? तुझं तिच्यावर प्रेम असल्या शिवाय कशाला बोलविल ती तुला बीच वर ? ती पण इतक्या संध्याकाळी ?"
" अगं खरं तेच सांगतोय मी."
" होय का ? मग सांग कशासाठी बोलविले होते तिने तुला ?"
" प्रपोच करण्यासाठी !"
" कोणाला प्रपोच करायचं होतं म्हणजे तुला का तिला ?"
" ती मला करणार होती प्रपोच !"
" मग केलं तिनं प्रपोच !"
" हो, केलं."
" मग तू काय केलंस ?"
" मी स्पष्ट शब्दात सांगून टाकले की माझं प्रेम राधावर
आहे म्हणून."
" मग ती काय म्हणाली ?"
" म्हणाली मी तुझ्या शिवाय जगू शकणार नाही. तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. मी नाही म्हटलं म्हणून तिने
पुलावरून खाली नदीत उडी मारली."
" आणि तिच्या पोटात बाळ होतं ते कोणाचे होते ?"
" पोलिसांना जी डेटबॉडी मिळाली ना ती मीरा ची
नाहीये."
" मोहन अरे किती खोटं बोलशील. स्वतःच पाप लपविण्यासाठी त्या निर्दोष मीरा ला ठार मारलेस तू
आणि आता मणघडत कहाणी ऐकवितो आहेस मला.
तुला काय वाटतं तुझ्या बोलण्यावर मी विश्वास करीन."
" कुणालाच कसं खरं वाटत नाहीये माझं सांगणं."
" कसं खरं वाटणार चक्क खोटं बोलतो आहेस तू .
दोन निष्पाप जीवांचा बळी घेतलास तू."
" हे खरं नाहीये राधा."
" मग काय पोलीस खोटं बोलतात ? का मिळालेले पुरावे
खोटे आहेत ?"
" पुरावे सगळे खरे आहेत; परंतु ती डेटबॉडी मीरा ची
नाहीये."
" मग मला सांग मीरा कोठे गेली ? तिची डेटबॉडी कोठे
आहे ? माशां नी खाल्ली तिला ? का नदीने खाल्ली ?" त्यावर मोहन निरुत्तर झाला. तशी राधा म्हणाली," आता का गप्प झालास. उत्तर नाही तुझ्या जवळ. ? कसं असणार ? तुझं प्रेम जर मीरा वर होतं तसं सांगायचंस मला. मी आली नसती ना तुमच्या दोघांच्या मध्ये ? पण नाही. दुसरी मिळाली की पहिलीची काय गरज ? म्हणून हटविलीस ना तिला आपल्या मार्गातून ? तू माणूस नाही रे राक्षस आहेस. मला आता स्वतःची लाजू वाटू लागली आहे, मी अश्या नराधम माणसांशी प्रेम केलं याचं."
" नाही राधा हे सर्व खोटं आहे गं ? कसं समजावू तुला ?"
" काहीही समजावू नकोस मला ? मी काही कुक्कुल
बाळ नाही तू सांगशील ते खरं मानायला.आणि बरं झालं
लवकरच तुझा असली चेहरा माझ्या समोर आला तो. चल
येते मी !"
" अगं ऐक ना जरा ! "
" हे बघ तू आता कितीही काही सांगितलंस तरी ते मला
पटणार नाही. तेव्हा ही आपली भेट शेवटची !" असे म्हणून राधा तेथून निघाली. मोहन फक्त इतकंच म्हणत
राहिला की राधा तू समजतोस तसं नाहीये." असे बोलून
राधा तेथून निघाली तसा मोहन ये राधा जरा ऐक ना ?
पण राधा कशाची ऐकते. तिने एकदा पण मागे वळून पाहिलं नाही.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा