प्रेमासाठी काहीही २
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रेमासाठी काहीही २ |
एके दिवशी हिंम्मत करून मीरा ने मोहन ला ठीक
पांच वाजता बीच वर भेटायला बोलविले.तेव्हा मोहन ला
प्रश्न पडला की, मीरा ने त्याला बीच पर कशाला बोलविले असेल ? कारण बीच वर जास्त करून प्रेमी युगल जातात.
तिच्या मनात तरी काय आहे ? माझ्यावर ती प्रेम तर करत
नसेल ? असेल ही कुणी सांगावे. छे छे छे ! असं कसं होईल ? मी कधी त्याला त्या नजरेने पहिलंच नाही.आणि तसं पण आपलं प्रेम राधा वर आहे. राधा व्यतिरिक्त आपल्या जीवनात अन्य कुणी येऊ शकणार नाही. पण
तिच्या मनात असं काही असेल असं आपल्याला का वाटतंय बरं ? असं पण तर असू शकतं ना ? म्हणजे ती गावातील कुठल्या तरी तरुणावर प्रेम करत असेल परंतु ती गोष्ट सुंदर समोर सांगायला घाबरत असेल. कदाचित ते सांगण्यासाठीच तर तिने आपली निवड केली नसेल ना ?
हां असं पण असू शकतं. म्हणून अगोदर तिला भेटून
तिच्या मनात काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. हा
विचार करून मोहन तिला भेटायला नदीवर गेला. तेव्हा
येण्यापूर्वीच मीरा वरती पुलावर उभी होती म्हणून मोहन
सुध्दा पुलावर गेला. तेव्हा त्याने मीरा ला नदीच्या पाण्यावर
पडलेल्या सुर्यकिरणावर गेले. संध्याकाळ ची वेळ असल्याने सूर्य मावळतीला झुकलेला होता. त्याची सूर्य
किरण मात्र अजूनही लाटांवर तरंगत होते. त्यामुळे त्या
पाण्याला तांबूस पणाचा रंग आला होता. त्या किरणांकडे
मीरा एकटक पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या
चिन्हावरून असं वाटत होतं की तिच्या मनात फार मोठं
वादळ उठले आहे. ती त्या वादळाला थांबविण्याचा प्रयत्न
करत आहे. परंतु तिच्या मनात कोणते वादळ उठले आहे
कोण जाणे ? असा त्याच्या मनात विचार सुरू होता.त्याच
वेळी तिच्या ही मनात विचार सुरू होता की मोहन माझे
प्रेम ऍक्सेफ्ट करेल किंवा नाही ? का नाही करणार ? मी
काय काळी आहे का पांगळी आहे ? दिसायला पण सुंदर आहे मग ना पसंद करण्याचा प्रश्नच कुठं येतो ? पण तो
समोर आल्यावर मला माझं मन व्यक्त करता येत नाही?
एकदम मौन का होते. काही कळत नाही. आता आपण त्याला बोलविले आहे हे खरंय पण त्याच्या समोर आपल्याला बोलायला जमेल का ? जमवायला हवं. आज जर आपल्याला बोलायला जमलं नाहीतर कधीच आपल्याला जमणार नाही म्हणून आजची संधी व्हाया
घालावयाची नाही. कसंही करून बोलायचंच. असा विचार
असतानाच तिच्या कानावर मोहन चा आवाज पडताच ती भानावर येत म्हणाली ," अं ss तू म्हणालास का काही ?" त्यावर मोहन उद्गारला," एवढ्या कोणत्या विचारत मग्न झाली आहेस ? जे मी आल्याचेही कळलं नाही तुला ?" त्यावर ती पुरती गोंधळली काय बोलावे ते चट्कन सुचले नाही तिला. पण लगेच स्वतःला सांभाळत म्हणाली,
" सॉरी मोहन मी काहीतरी विचार करत होती."
" तेच तर विचारतोय कसला विचार करत होती ?"
" काही नाही रे, असंच आपलं काहीतरी !"
" हो का ? मग आता मला सांग मला का इथं बोलविलेस ?"
" त्याचाच विचार करतेय तुला कसं सांगू ?"
" कसं सांगू म्हणजे ? काही गुपित आहे का ?"
" गुपित असं काही नाही रे, पण कुठून सुरू करू तेच
कळत नाहीये मला."
" कुठून ही कर, काय फरक पडतोय कुठूनही केलेस म्हणून."
" ठीक आहे, सांग लवकर, संध्याकाळ होत आली आहे.
आपल्या दोघांना घरी जायला हवं." त्यावर ती काहीच
बोलली नाही. तिच्या मनात तर फार इच्छा होती जे मनात
आहे ते बोलून टाकावे. पण तिला हिंम्मत होत नव्हती.कसं
बोलू नि काय बोलू ? या पुढे तिची गाडी सरकतच नव्हती.
शेवटी मोहन उद्गारला," अगं मीरा तुला जे काय बोलायचे
आहे ते बोल लवकर. संध्याकाळ झाली आहे,थोड्या वेळानंतर अंधार ही पडेल. तेव्हा जे बोलायचे आहे ते
पटकन बोलून टाक. नसेल जमत तर तसं सांग. माझ्या
जवळ फालतू वेळ नाहीये. मी चाललो घरी !" असे मोहन
ने म्हटल्यानंतर तिच्या पुढे बोलण्या व्यतिरिक्त अन्य पर्याय
नव्हता. महणून ती घाईघाईने म्हणाली," मोहन मी प्रेम
करतेय........तुझ्यावर हा शब्द मात्र ती बोललीच नाही.
त्यामुळे मोहन ला वाटलं मीरा कुणावर तरी प्रेम करतेय.
म्हणून तो म्हणाला, " अरे वा ! ही तर फार मोठी गुड न्यूज
आहे. बरं आता त्या भाग्यवंतांचे नाव तरी सांग." मीरा
लाजून म्हणाली," मला त्याचं नाव घ्यायला लाज वाटते."
" त्यात लाजायचं काय ? तो नवरा झाला नाही अजून.
आणि आज काल बायका आपल्या नवऱ्याची नावं घेतात
तेव्हा लाजायचं काही कारण नाही. नाव सांग त्याचं."
" पण मला अजून माहीत नाहीये ना, त्याचं माझ्यावर
प्रेम आहे की नाही ?"
" म्हणजे एकतर्फी प्रेम आहे तुझं त्याच्यावर."
" हां !"
" अगं मग सांगून टाक त्याला."
" त्यासाठीच तर हिंम्मत होत नाही ना माझी !"
" अगं मीरा त्याच्या समोर तू आपलं मन मोकळं केलं
नाहीस तर त्याला कळणार कसं ? तेव्हा त्याच्या समोर
आपले मनोगत व्यक्त कर."
" तेच तर जमत नाहीये ना मला ?"
" हे बघ मीरा, ते तुझं तुलाच करावं लागेल मी त्यात
तुझी मदत करू शकणार नाही. म्हणून तुला हिंम्मत करावीच लागेल. त्या शिवाय तुला कळू शकणार नाही
त्याच्या मनात काय आहे ते. म्हणून एकदाचं बोलून टाक.
कदाचित तो सुध्दा तुझ्या प्रमाणेच तुझ्यावर प्रेम करत असेल पण तो तुझ्या समोर आपलं प्रेम व्यक्त करायला
तुझ्या प्रमाणेच कचरत असेल. हिंम्मत कर नि बोलून टाक.
त्याच्या मनात काय आहे ते तरी कळेल त्याला."
" आणि त्याने नाही म्हटलं तर !"
" नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. तुझ्या सारखी
रूपवान बायको दुसरी मिळणार आहे का त्याला ?"
असं म्हणताच तिला थोडा धीर आला. ती कशीतरी
हिंम्मत करत म्हणाली," मोहन मी तुझ्यावर प्रेम करते."
" एकदम बरोबर बोललीस असंच त्याच्या समोर बोल."
मोहनचा गैरसमज झाला की ती बोलण्याचा प्रयत्न करते.
म्हणून तसा तो बोलला. आणि ते मिराच्या ही ते ध्यानात आलं. म्हणूनच की काय ती म्हणाला," मोहन तुझा गैरसमज झालाय."
" तो कसा ?"
" अरे ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तू आहेस."
" काय ?" शॉक बसल्यागत झाला मोहन - मी ?"
" हां मोहन तूच! मी तुझ्यावरच जीवापाड प्रेम करते."
" पण मी तुझ्यावर प्रेम करत नाही."
" आता तूच तर म्हणालास मी लाखात एक आहे, माझ्यावर कुणीही प्रेम करेल."
" हो म्हणालो मी ! परंतु...?"
" परंतु काय ? मी दिसायला सुंदर नाही का ?"
" मीरा सुंदर आहेस, लाखात एक आहेस. परंतु तू
माझी पसंद तू नाहीस."
" मग कोण आहे तुझी पसंद ?"
" मीरा माझं राधा वर प्रेम आहे."
" खोटं बोलतो आहेस, कारण राधाचं प्रेम माझ्या
दादावर आहे."
" हे कुणी सांगितले तुला ?"
" स्वतः दादा ने."
" तू आणि दादा दोघेही एक सारखेच आहात."
" ते कसे ?"
" दोघांचे ही प्रेम एकतर्फी आहे. आणि प्रेम एकतर्फी
असून चालत नाही मीरा ! दोन्ही कडून सारखेच असावे
लागते."
" मोहन मला एक मी राधा पेक्षा कमी सुंदर आहे का ?"
" नाही. तू राधा पेक्षा लाख पटीने सुन्दर आहेस. परंतु
प्रेम शरिराची सुंदरता पाहून केलं जात नाही, कारण प्रेम
केलं जात नाही ते आपोआपच होतं."
" ते काही मला माहित नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे,
माझी इच्छा आहे की तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावा."
" मीरा मला समजून घेण्याचा प्रयत्न कर, मी तुझ्यावर
प्रेम करत नाही माझं प्रेम फक्त राधावर आहे."
" आणि माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. आणि तुझ्या
शिवाय मी जगू शकणार नाहीये. प्लिज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर."
" तुला कळत का नाहीये. प्रेम फक्त एकदाच होतं आणि
ते पण एकावर होतं."
" ठीक आहे, तू त्या राधालाच मिठी मार मी इथं मृत्यूला
मिठी मारते." असे म्हणून क्षणांचा ही विलंब न करता
तिने सरळ पुलावरुन खाली स्वतःला झोकून दिले. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोड्या वेळापूर्वीच पावसाची जोरदार सर येऊन गेली होती. त्यामुळे नदीच्या पाण्याला वेग आला होता . मीरा ने पाण्यात उडी मारल्याने वहात गेली. तिच्या पाठोपाठ मोहन ने सुध्दा पुलावरून खाली पाण्यात उडी मारली. आणि सपासप पाणी कापत
तिच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला.पण ती
अचानक कुठं दुसेनाशी झाली.खूप शोध केला.परंतु मीरा
काही सापडली नाही.म्हणून नाईलाजाने तो किनाऱ्यावर
आला नि विचार करू लागला की आता त्याच्या पुढे
मोठा प्रश्न उभा राहिला होता की सुंदर ला काय सांगावे ?
तेवढ्यात सारे गावकरी नदीच्या दिशेने येताना दिसले.
झाले असे की मीरा ला पुलावरून खाली उडी घेताना
एका मुलाने पाहिले होते तो पळत गावात गेला नि ओरडून
सर्वांना खबर दिली की मीरा ताईने पुलावरून उडी मारून
आत्महत्या केली. हा हा म्हणता सारा नदीच्या दिशेने लोटला. जेव्हा ही खबर सुंदर ला मिळाली तेव्हा सुंदर च्या
पाया खालची जमीनच सरकली. त्याचे हातपाय एकदम गोटल्यागत झाले. मिराच्या आईने तर हंबरडा चा फोडला. सुंदर ला समजायला यत्किंचितही वेळ लागला नाही की हे सारे मोहन मुळेच घडले असावे. कारण ती मोहनला भेटायला गेली होती हे त्याला माहित होते. मोहन
ने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नसेल म्हणूनच तिने
आत्महत्या केली असावी. परंतु ते असं काही करेल याची
त्याने कल्पना सुध्दा केली नव्हती. नाहीतर त्याने तिला नदीवर पाठविलेच नसते. पण आता पश्चात्ताप करून फायदा होणार आहे. परंतु आता मोहनला मात्र मी सोडणार नाही. असा निश्चय करूनच तो नदी किनाऱ्यावर
पोहोचला. आपल्या बहिणी जवळ खाली बसून म्हणाला,
" मीरा काय केलंस हे तू ?" असे म्हणून रडू लागला.
तेव्हा मोहन एकदम चुपचाप तिच्या बाजूला बसला होता.
सुंदर क्षणभर रडला नि एकदम संतापाने मोहन च्या शर्टाची कॉलर पकडून त्याला उठवत म्हणाले," हरामखोर
बोल काय केलंस माझ्या बहिणीच्या सोबत." असे बोलून
त्याला बोलण्याची संधी न देता त्याला मारत सुटला.तेव्हा
राधा दोघांच्या मध्ये आली मी म्हणाली," अरे त्याला बोलण्याची संधी तरी दे."
" माझ्या बहिणीच्या आत्महत्येला हाच कारणीभूत आहे."
" तो कसा ?" राधाने विचारले.
" ह्याने माझ्या बहिणीला धोका दिला. ती ह्यांच्यावर प्रेम करत होती." ते ऐकून राधा एकदम गोंधळून गेली. तिने सुंदर ला विचारले," असं नाही होऊ शकत, कारण मोहनचं माझ्यावर प्रेम आहे."
" आणि मीराचं ह्याच्यावर प्रेम होतं."
" मोहन खरं काय ते आता तू सांग." राधा उद्गारली.
" तिचं माझ्यावर प्रेम होतं हे खरंय परंतु मी तिच्यावर
प्रेम करत नव्हतो. माझं प्रेम फक्त तुझ्यावर." मोहन खरे
बोलतोय हे माहीत आहे मला कारण मीरा ने कधी त्याच्या समोर आपलं प्रेम जाहीर केलंच नाहीतर त्याला कसं
माहीत असणार हे जरी खरं असलं तरी ते मी इथं जमलेल्या लोकांना सांगू शकत नाही. कारण तसे सांगितले
तर लोक मलाच दोष देतील की तुला जर मोहन ,राधाच्या
प्रेमा विषयी माहित होते तर तू आपल्या बहिणी ला
का नाही समजविलेस ? असं विचारलं तर काय उत्तर देऊ
मी लोकांना त्या पेक्षा मिळालेल्या संधीचा आपण फायदा
उचलू नि मोहन आणि राधा या मध्ये गैरसमज पसरवू म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जातील. साप ही
मरेल नि काठी ही तुटणार नाही. मग काय मिळालेल्या
संधी चा फायदा उचलू ! असा मनात विचार करून मी
पुढे म्हणालो ," हा चक्क खोटे बोलतोय राधा । ह्याने
स्वतः मीरा ला फोन करून बोलवून घेतले मिराला."
कारण मीरा जेव्हा नदीवर यायला निघाली तेव्हा मी विचारले तिला की कोठे चाललीस म्हणून. तेव्हा तिने
मला सांगितले की मोहन ने मला भेटायला बोलविले.
तेव्हा मी तिला म्हटलं ," तू जाऊ नकोस त्याला भेटायला."
तेव्हा तिने मला विचारले," का ?" मी म्हटलं," मोहन चे
प्रेम राधावर आहे." असे म्हणताच ती माझ्यावर चिडली
म्हणाली," खोटं बोलतो आहेस तू दादा ! मोहन चे प्रेम
फक्त माझ्यावर आहे." मी म्हटलं," आज मी मोहन आणि
राधा ह्या दोघांना हातात हात घालून फिरताना पाहिले.
परंतु तरी ही तिला विश्वास होईना. ती मला म्हणाली,
" तुझं राधावर प्रेम आहे ; परंतु राधा तुजग्यावर प्रेम करत नाही , म्हणून म्हणतोस ना असं ? " तशी सुंदर ची आई मध्येच म्हणाली," प्रेम करत नाही म्हणजे ? तुझं नि राधाचं लग्न तुम्ही दोघेही लहान असतांनाच ठरलं आहे."
" लगेच राधाची आई म्हणाली," हो हे खरंय !" असे
म्हणताच राधा नि मोहन आश्चर्यकारण नजरेने सुंदरच्या
नि आपल्या आईकडे पाहू लागले.हे ऐकून सुंदर ला मात्र
फार अत्यानंद झाला.परंतु मोहन आणि राधाच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजले.पण तरी राधाला विश्वास न
झाल्याने तिने आपल्या आईला विचारले , " आई, काय बोलतेस तू हे ? " तेव्हा राधाची आई म्हणाली," हो ही
गोष्ट खरी आहे. तुझे बाबा नि सुंदर चे बाबा बालपणाचे जिवलग मित्र म्हणून त्या दोघांनी आपली मैत्री नात्यांमध्ये बांधायची ठरविली.त्यावर राधा विरोध करत म्हणाली," पण असं कसं आम्हाला काही न विचारता तुम्ही हे ठरविलंत लग्न ?"
" तुम्हांला काय विचारायचं ? आणि विचारायचं म्हटलं
तरी काय विचारणार ? आणि तुम्हां दोघांना ते कळलं असतं का ? म्हणजे मला म्हणायचंय की तुम्ही दोघेही तेव्हा लहान होता काय कळणार होतं तुम्हां दोघांना ? "
हे ऐकून तर सुंदर एकदम खुश झाला. हे जर अगोदर
माहीत असतं तर किती बरं झालं असतं. परंतु तसे न
दाखविता त्या दोघांमध्ये गैरसमज फसरविण्याच्या हेतूने सुंदर म्हणाला ," ऐका आता ह्याचं ....ह्याचं जर माझ्या बहिणीशी प्रेम नव्हतं तर ह्याने तिला भेटायला नदी किनारी
का बोलविले. ते पण इतक्या संध्याकाळी ! त्या मागचा ह्याचा हेतू काय होता हे कळलं का तुम्हां लोकांना ? "
" मी नव्हते बोलविले तिला उलट तिनेच मला बोलविले."
" खोटं ! साफ खोटं आहे. मी साक्षी आहे त्याचा.जेव्हा
मिराला तुझा फोन आला.तेव्हा मी तिथंच उभा होतो.मी ऐकलं तुम्हां दोघांचे संभाषण." हे ऐकून राधाच्या मनात
संशयाने प्रवेश केला. तिच्या मनात मोहन बद्दल विचार
आला की, सुंदर म्हणतोय ते खरं असेल का ? असू पण
शकतं ? कारण मोहन ने कधी आपलं प्रेम जाहीर केलं
नाही. मी स्वतः जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तो हो म्हणाला. म्हणजे अगोदर तो मिरावर प्रेम करत असावा.
आणि जसे त्याला समजले की मी त्याच्यावर प्रेम करत
आहे तसे त्याने मिराला आपल्या मार्गातून हटविण्यासाठीच इथं आणलं असावं. हो असेच असावं.
तिच्या मनाची खात्री होताच ती मोहन ला म्हणाली,
" मोहन मला स्वप्नात ही असं वाटलं नव्हतं की तू इतका
नीच असशील ते.माझी निवड चुकली हेच खरं !" असे
म्हणून ती तेथून जाऊ लागली.तसा सुंदर तिला म्हणाला,
" राधा , तुझ्यासमोर सत्य उघडकीस आलं आता तरी
माझ्या प्रेमाचा स्वीकार कर." असे म्हणताच राधा सुंदरचा
हात आपल्या हातात घेत म्हणाली," सुंदर माफ कर मला
मी तुझं खरे प्रेम ओळखू शकले नाही." तेव्हा मोहन
म्हणाला," राधा हे खरं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव."
तेव्हा गावकरी म्हणाले ," मोहन तुझ्या मुळे आज एका
मुलीचा जीव गेला.आता तुझी खरी जागा तुरुंगातच !"
असे म्हणून पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना
घडलेल्या घटनेची कल्पना दिली.थोड्याच वेळात पोलीस
तेथे पोहोचले. नदी किनारी राहणाऱ्या लोकां जवळ
विचारपूस करण्याची जबाबदारी एका पोलीस पथकाला
देऊन पुढील कार्यवाही ला सुरुवात केली. प्रथम
घटना स्थळाचा पंचनामा करून संशयी आरोपी म्हणून मोहनला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा