कुरुक्षेत्र ५० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र ५० |
धीरज
मी मोठ्या विवंचनेत सापडलो होतो. कारण ड्रायव्हर ची
पत्नी केस मागे घ्यायला तयार नव्हती. आम्ही तिला पैशाचे
लालच दाखविले. परंतु ती ऐकायलाच तयार नव्हती. तिचे
म्हणणे होते की माझ्या नवऱ्याचा प्राण तुमच्या दुश्मनी मुळे
गेला. मला न्याय पाहिजे. जे पैसे तुम्ही देऊ केलंत त्या पैशाने
माझ्या नवऱ्याचा प्राण परत येत असेल तर मी केस मागे घ्यायला तयार आहे. पण तिच्या या प्रश्नाचे उत्तर कुणापाशी ही नव्हते. त्यावर मी म्हणालो," मरण पावलेल्या माणसाला
परत जिवंत करता येत नाही. परंतु मी देत असलेल्या पैशाने
तुझं नि तुझ्या मुलांचं भविष्य उज्जवल होईल. तेव्हा विचार
कर नि मला उत्तर दे. " त्यावर ती म्हणाली ," माझ्या मुलांचे
भवितव्य घडविण्यासाठी माझ्या सासुरवाडीची शेतीवाडीच पुरेशी आहे. त्यात मी धान्य पिकवून मी माझं नि माझ्या
मुलांचे उदरनिर्वाह नक्कीच होईल. त्यासाठी मला तुमची दयेची भीक नकोय आणि त्याच बरोबर माझ्या नवऱ्याचा जीव घेणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. शेवटी माझा नाईलाज झाला. मला मुकाट्याने माघारी परतावे लागले.
पण नंतर मला कळले की माझ्या वैऱ्यांनी माझ्या अगोदर
तिच्या घरी जाऊन तिला आपल्या बाजूने साक्ष द्यायला लावली. त्या बदल्यात तिला ऑफिसमध्ये हाऊस किपिंग चे
नोकरी दिली आणि तिचा नवरा ऑन ड्युटी मध्ये मरण पावला म्हणून त्यांच्याकडून दहा लाख नुकसान भरपाई
म्हणून दिली आणि वरून पाच लाख भक्षीस म्हणून दिले.
अर्थात ती माझ्या बाजूने साक्षी का म्हणून देईल. म्हणजे इथं ही त्या दोघांनी च बाजी मारली.
कोर्टात आम्ही सर्व हजर होतो. कोर्ट काय निकाल देते यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. दोन्हीकडच्या वकीलानी आप-आपला युक्तिवाद मांडला होता. दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती आपला निर्णय जाहीर करायला सुरुवात केली आणि शेवटी म्हणाले, मिळालेल्या सर्व पुराव्याने हे सिध्द होतेय की यशराज घोरपडे आणि त्याचे दोन्ही भाऊ अमर घोरपडे आणि बळीराज घोरपडे याना जीवानिशी ठार मारण्याचा हेतूने त्यांचे चुलत बंधू धीरेन घोरपडे यांनी त्यांच्या कार चे ब्रेक फेल केले होते. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रिश यांनी कौशल्य पूर्वक कार नियंत्रणात आणून थांबविली आणि अपघात होण्यापासून स्वतःला नि घोरपडे कुटुंबियाना वाचविले आणि दुसऱ्या कार मध्ये देवधर घोरपडे होते. त्यांच्या ही कार चे अँक्सिडंट झाले नि त्यात ड्रायव्हर जागच्या जागी ठार झाला. देवधर इस्पितळात मृत्यूशी सामना करताहेत. तेव्हा धीरेन घोरपडे याना दोषी करार देऊन कलम ३०२ च्या अंतर्गत कोर्ट मरेपर्यंत फाशी देण्याचा आदेश देत आहे. एवढे बोलून न्यायाधीश महाशयांनी आपले पेन मोडले.
निकाल जाहीर होताच सर्व लोक उठून बाहेर जाऊ लागले होते. नेहमीप्रमाणे आणि यशराज ,अमर बळी यांचाच विजय झाला होता आणि माझी हार झाली होती. मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. याची खंत मला जरूर होती. परंतु माझे वैरी आपल्या आसनावरून उठले नि बाहेर जाऊ लागले. तेव्हा अमर ने माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकला. त्याच वेळी आम्हां दोघांची नजरानजर झाली. त्यावेळी अमर ने आपल्या शर्टाची कॉलर उडविली. जणू तो मला सांगू इच्छित होता की हा डाव ही मीच जिंकला. माझ्या तळ पायाची आग मस्तकाला भिडली. माझ्या नेत्रातून अग्नीच्या
ज्वाळा निघू लागल्या होत्या. मला असे वाटत होते की एका
क्षणापूर्ती महादेवांनी तिसरा डोळा माझ्यासाठी उघडावा आणि माझ्या वैऱ्यांचा जाळून भष्म करावा. पण ते कसे शक्य होते ? मी महादेवांचा परम भक्त नव्हतोच ! मग माझ्यासाठी देव असं का करतील बरं ? परंतु मी मग मी
निश्चय केला की काय वाटेल ते झाले तरी या तिघांना जिंकू द्यायचे नाही आज अगदी शेवटचा डाव खेळावा लागणार आहे मला. असा विचार करून मी पेटून उठलो आणि धीरेन जवळ गेलो. धीरेन आरोपी पिंजऱ्यात उभा होता आणि माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होता. मी त्याच्या
जवळ जाताच तो हताश पणे मला म्हणाला ," दादा मी तर आता संपलोच आहे. परंतु तू मात्र हार मानू नकोस आणि
आपल्या वैऱ्यांना जिवंत सोडू नकोस . नाहीतर माझ्या आत्म्याला शांती लाभणार नाही. तो तडपडत राहील."
तेव्हा मी त्याला आश्वासन देत म्हणालो ," तू अजिबात चिंता करू नकोस. तुझ्या अगोदर त्या तिघांना यमसदनास पाठविण्याची व्यवस्था मी करतो. कारण आज अखेरचा डाव
खेळणार आहे मी. अगदी अखेरचा." असे म्हणून मी माझ्या आजूबाजूला पाहू लागलो . तेवढ्यात माझी नजर इन्स्पेक्टर विनय सावंतच्या कमरेला लटकत असलेल्या पिस्तुलावर पडली . लगेच मनात एका भयंकर विचारा ने जन्म घेतला. इन्सपेक्टर विनय सावंत कोर्टातून नुकताच बाहेर पडत होता . मी पळत त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या
पिस्तूलावर एकदम झडप घालून त्याचे पिस्तुल हस्तगत केले आणि यशराज,अमर,बळी, गेलेल्या दिशेकडे पळत सुटलो. पोलिसांच्या लक्षात येतात ते माझ्या मागे धावले. तसा मी गर्रकन मागे वळून म्हणालो ," खबरदार , माझ्यामागे
जर कोणी याल तर एकेकाला गोळ्या घालून ठार करीन." असे बोलून पुन्हा वळून यश,अमर,बळी गेलेल्या दिशे कडे धावलो. तेवढ्यात माझी नजर त्या तिघांवर पडली .ते तिघेही आपल्या वकिलाला बरोबर बोल बोलत उभे होते. त्यांना पाहताच माझ्या अंगातील रक्त एकदम सळसळून उसळी मारून लागले होते . डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळां निघू लागल्या होत्या . मी एकदम गर्जना करत म्हणालो ," थांबा.
जाताय कुठे पळपुट्यानो ! अजून केसचा निकाल लागायचा आहे . मी कोर्टाची एक एक पायरी खाली उतरत म्हणालो होतो . माझ्या हातातील पिस्तुल पाहून त्या तिघांची तर गाळणच उडाली. तिघेही भांबावून माझ्याकडे पाहू लागले होते. मी त्यांच्यावर पिस्तुल रोखून त्यांच्या जवळ जात म्हणालो ," आजच्या खटल्याचा वकील पण मीच आणि
न्यायाधीश ही मीच." तेव्हा यश मरणाच्या भीतीने एकदम
चाचरत म्हणाला ," हे रे काय करतोयस तू ? " मी हसत म्हणालो ," का फाटली ! फक्त पिस्तुल पाहून ? "
त्याचे भयभीत झालेले चेहरे पाहून मी पुन्हा हसलो. मग त्याची कुचेष्टा करत म्हणालो," मग गोळी लागल्यावर काय होईल रे तुमचं ? " तेव्हा अमरच्या तर गोट्या कपाळातच गेल्या असणार. कारण त्याला माहीत असणार की मी काही ही करू शकतो. म्हणूनच की काय घाबरुन तो मला म्हणाला,
" धीरज असं करून तुही वाचणार नाहीस. तेव्हा बऱ्या बोलाने ते पिस्तुल इन्स्पेक्टर विनयच्या स्वाधीन कर. "
" अरे चल हट. पिस्तुल इन्स्पेक्टरच्या हाती द्यायला मी
खास मूर्ख नाहीये आणि इथे जगायचे आहे कुणाला सर्वांना म्हणायचा एक ना एक दिवस. पण तुम्हां तिघांना मानण्यात जी मजा आहे , ती अन्य कशात नाही. म्हणून मरायला तयार व्हा." असे बोलून मी चाप ओढणार काही तोच कल्याण माझ्या अंगावर येऊन धडकला. त्याला कुणीतरी मागून धक्का दिला होता. माझ्या हातातील पिस्तुल खाली
जमिनीवर पडले. त्याच संधीचा फायदा त्या दोघांनी घेतला. बळी ने मला पकडले आणि अमर ने कल्याणला पकडले. आमच्यात हाणामारी सुरु झाली . माझ्या हातातून पडलेले पिस्तुल शिताफीने अमर ने उचलले होते .परंतु कल्याण त्याचा हात पकडला त्यानंतर दोघांच्या झटापटीत पिस्तुलचा
चाप ओढला गेला आणि पिस्तूलातून निघालेली गोळी कल्याणला लागली. कल्याण किंकाळी मारून जमिनीवर कोसळला आणि त्याच क्षणी अमरच्या हातातून पिस्तुल खाली पडले. परंतु ते पिस्तुल शनीमामांनी उचलले आणि बळीवर नेम धरून चाप ओढला. बळी चट्कन खाली बसला आणि त्याच्या मागे मी उभा होतो. ती गोळी मला लागली.
माझ्या तोंडून एक करून किंकाळी बाहेर पडली नि जमिनीवर कोसळलो. तेवढ्यात पोलिसांनी गराडा घालून
शनीमामाला पकडले.
अखेरचा डाव सुध्दा मीच हरलो होतो. विजय त्या तिघांचाच झाला होता. आम्हा दोघांना बाबांनी ताबडतोब इस्पितळात घेऊन गेले असावेत. कारण त्यावेळी मी ग्लानीत होतो. मी एकदा डोळे किलकिले करून उघडले . तेव्हा मला जाणवलं की मी रुग्णवाहिका मध्ये आहे . त्यानंतर जे मिटले
डोळे ते पुन्हा उघडले नाहीत. त्यामुळे आम्ही इस्पितळात कधी येऊन पोहोचलो . ते आम्हाला देखील कळले नाही.
अमर
मला एक गोष्ट कळत नव्हती . ती ही की कल्याण मला का वाचविले असावे ? का पोलिसांना त्याने खोटे का सांगितले की पिस्तुलचा चाप त्याच्या हातून ओढला गेला म्हणून . पिस्तुलाचा चाप तर माझ्या हातून ओढला गेला होता. मग माझे नाव पोलिसांना न सांगता सारा अपराध स्वतःवर ओढवून घेतला . असे का बरं केले त्याने ? काही कळत नाहीये.
घरी आल्यानंतर कोर्टात घडलेला सारा वृतांत मी
आईला ऐकविला. सर्व ऐकता क्षणी आईने हंबरडा फोडला. मला काहीच कळेना. आईला अचानक काय झाले होते ?
ती का रडत होती ? तिला तर खुश व्हायला हवे होते. नेहमी
धीरज ला मदत करणारा आज शेवटची घटका मोजत होता.
परंतु आईला रडताना पाहून आम्हाला कसे तरीच वाटले . तेव्हा यश दादाने विचारले ," आई तु का रडते आहेस ?
तेव्हा आई रडतच म्हणाली ," मी रडते माझ्या बाळासाठी! कल्याण साठी ! आम्ही तिघेही आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहू लागलो. तुझ्या बाळासाठी ! म्हणजे ? "
तेव्हा आई स्फुंदत स्फुंदत म्हणाली ," कल्याण तुम्हां तिघांचा सर्वांचा मोठा भाऊ आहे ." आम्हाला एकदम धरणीकंप झाल्याचा भास झाला जणू ! आम्ही एकदम ओरडलोच ," काय ? कल्याण आमचा मोठा भाऊ ?"
" हां कल्याणच तुमचा मोठा भाऊ आहे ."
" मग तू आमच्या पासून हे सत्य का लपविलेस ?"
" ती फार मोठी कहाणी आहे . माझे लग्नापूर्वी दिनकर नावाच्या तरुणाशी प्रेम होते . आम्ही लग्नही करणार होतो . पण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि मग माझे तुमच्या बाबांशी लग्न झाले . पण त्यापूर्वीच कल्याण ने माझ्या पोटी जन्म घेतला होता . माझ्या भावी जीवनात त्याचा अडथळा व्हायला नको , म्हणून माझ्या बाबांनी माझ्या मामा च्या मदतीने त्याला कचराकुंडीत फेकून दिले. पण त्याचे नशीब मोठे, म्हणून तो तुमच्या बाबांच्या ड्रायव्हरच्या हाती सापडला. त्याने त्यांचा सांभाळ केला . म्हणून तो त्यांचा मुलगा ठरला आणि लग्नानंतर तुम्ही सगळे जन्मले ,म्हणून
तुम्ही घोरपडे ठरलेत." त्यावर मी म्हणालो ," आई मग हे तू आम्हाला अगोदर का नाही सांगितले ? म्हणजे हा अनर्थ टळला असता ना ?"
" कसे सांगणार होते मी आपल्याबद्दल बदनामीची गाथा ? समाजाने आखून दिलेल्या चाकोरी बाहेर स्त्रियांना पाऊल ठेवायला अधिकार नाही." तेव्हा यशदादा दिलगिरी व्यक्त करत म्हणाला ," पण आई तुझ्या यत्किंचित
चुकीमुळे आमच्या कडून फार मोठा अनर्थ घडला. आमच्या वडील भावाचे आम्ही खुनी ठरलोय आज. आई फार मोठी चूक केलीस तू. फार मोठी !
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा