Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र - ४९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

कुरुक्षेत्र - ४९
कुरुक्षेत्र - ४९

 


    आम्ही वकील सुभाष सोबत पोलीस स्टेशनला पोहोचलो. आणि जामीनीवर सोडून घरी आणले घरी. त्यावेळी बाबा घरी आले होते. धीरेन ला पाहता त्याच्यावर कडाडले नि मग  म्हणाले ," अरे , मूर्ख माणसा ! त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कार चे ब्रेक करायला कुणी सांगितले तुला ?"
     " नाही सांगितले कुणी. मीच केले."
     " लाज नाही वाटत मीच केले म्हणून सांगायला."
     "  चुकून झाले ."
     " चुकून झाले .असे कोर्टात सांगणार आहेस का ?"
     " पप्पा कशाला त्याच्यावर रागवता.  आता झाली ना चूक त्याच्या हातून ? आता त्याला त्यातून बाहेर कस काढायचं ते बघा."
     " बाहेर ते कसं काढणार ?"
     " काहीतरी उपाय करायलाच हवा ना ?"
     " अजिबात नाही. कुणी सोडवायचं त्याला ."
     " अगं गायत्री असं कसं बोलू शकतेस तू ?"
     " तुम्ही अजिबात त्याला पाठीशी घालू नका. त्यानं लहान
सहान नाही. फार मोठा अपराध केला. त्या अपराधाची शिक्षा
त्याला मिळायलाच पाहिजे."
     " तु नक्की त्याचीच आई आहेस ना ?"
     "  हो. त्याचीच आई आहे  आणि त्याच्याच कल्याणासाठी म्हणून सांगतेय. त्याने केलेल्या अपराधाची शिक्षा  भोगू दे.
तेव्हाच त्याला. दुसऱ्याच्या जीवाला ही तेवढीच किंमत असते. त्याने आपल्या आजोबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला."
     " नाही गं आई ,मी आजोबांसाठी नव्हते केले ते."
     " माहितेय मला अमर आणि त्याच्या भावांसाठीच ना ? "
त्यावर कुणीच काही बोलत नाही. तश्या त्या पुढे म्हणाल्या,
     " आता काय झालं ? बोल ना ? ते भाऊ नाहीत तुझे ?"
     " नाहीत ते माझे भाऊ." धीरेन संतापाने म्हणाला.
    असे म्हणताच एक सनकन चपराक धीरेन च्या कानशीलावर बसली. तसे धुर्तराज ओरडून म्हणाले ," अगं
काय करतेस तू गायत्री ?"
      " बरोबर करतेय. या पूर्वीच ते मला करायला हवं होतं.
आज ही पोरं ज्या रस्त्यावर चालताहेत ना तो रस्ता तुरुंगा जवळच घेऊन जातोय आणि तेथून परतीचा मार्ग नाहीये.
आणि हे केवळ तुमच्या मुळे घडलंय. तुमची महत्वकांक्षा आज पोरांना कुठं घेऊन चाललीय याची कल्पना तरी आहे का  तुम्हांला ? "
     " आता मी काय केलं ?"
     " तुम्हीच तर या सर्वा ला कारणीभूत आहात. जेव्हा मुलांना योग्य तो मार्ग दाखवायचा असतो. तेव्हा तो दाखविला नाही. त्यांच्या प्रत्येक अपराधावर पांघरूण घालत
आले. त्याना प्रोत्साहन देत राहिले. आज त्याचीच ही फळे
मिळताहेत तुम्हांला . जे पेरलं तेच उगवलं. आता दोष कुणाला देणार ?"
      " तू जरा शांत राहशील का ?"
      " मी शांतच राहिली म्हणून हे घडलं सारं."
      " गायत्री शांत हो अगोदर."
      " कशी शांत होऊ ? तुमच्या मुलांची एवढी मजल गेली
की आता ते दुसऱ्यांचे सुध्दा प्राण घ्यायला निघाले.


      मी समजलो की आईला आता शांत करणे मुश्कील काम आहे तसा मी तिथून काढता पाय घेतला. आई- पप्पावर  गरम झाली होती. तिचे  म्हणणे होते की , बाबांनीच आम्हाला बिघडविले आणि ते खरेही होते ते. खरे तर  बाबांनीच लहानपणापासून आमच्या मना मध्ये दुश्मनीची बीज रुजविले होते. आता त्याचे रूपांतर विशाल वृक्षांमध्ये झाले होते. आमच्या नसा-नसातून दुश्मनीचे विष रक्तात  भिनले होते. आता त्यामध्ये बदल होणे अशक्य आहे .


      आम्ही दुसऱ्या दिवशी वकील सुभाष ची  भेट घेतली. त्याला केस बद्दल विचारले ,"  धीरेन निर्दोष सुटेल ना ?"    तेव्हा तो उत्तरला ," सर तुम्ही दुसरा वकील  शोधा."
      "  का ? "
      " तुमची केस लढण्यास  मी असमर्थ आहे ." असे  म्हणता क्षणी मी त्याची गंचण्डि पकडली नि रागाने म्हणालो,"  काय म्हणालास रे भडव्या ? तू केस लढण्यास असमर्थ आहेस . मग पैसे कशाचे घेतोस केस लढण्याचे
ना ? " हो, सर पण इथेच जिंकू शकत नाही आपण."
    " का ?....... का जिंकू शकत नाहीस ?"
    "  सर्व पुरावे धीरेन सरांच्या  विरुद्ध आहेत सर !"
    " ते मला सांगू नकोस .खोट्याचे खरे मी खऱ्या चं  खोटं करायचे काम तुझं आहे. मी त्याचेच पैसे देतो तुला.
     " अहो ,पण सर ते कसे शक्य आहे ?"
     " ते शक्य कसं करायचं ते ते तुझे तू बघ. माझा भाऊ निर्दोष सुटला पाहिजे बस !"
     " पण कसे शक्य होणार आहे ते ?"
     " वकील तू आहेस का मी ?"
     " नाही. वकील मीच आहे. पण.....सर ऐका ना जरा."
     " काहीही सांगू नकोस मला. मला काही ऐकायचं नाही तुझं."
     " सर मी ही केस लढू शकत नाही."
     " लढू शकत नाहीस. तर ही वकिलगीरी करायची सोड
नि उद्या पासून दलाली सुरू कर. ती चांगली जमेल तुला."
असे बोलून मी कल्याण कडे वळून म्हणालो," आता काय
करायचं रे कुंज ?"
       " दुसरा वकील शोधायचं त्यात घाबरायचं काय कारण  ?
      " पण माझा भाऊ सुटेल ना निर्दोष ?"
      " ते आता मी कसं सांगू ?"
    
      शहरातील मोठ्यात मोठ्या  वकीलाची मी भेट घेतली आणि धीरेन च्या केस बद्दल  त्याच्याशी चार्चा केली. परंतु
तो  देखील इतर  वकीला प्रमाणे म्हणाला ,"  धीरज  साहेब आपल्या भावाला शिक्षेपासून  कोणीही वाचवू शकणार नाही.
तुम्ही व्यर्थ  प्रयत्न करता आहात."


      " असे कसे म्हणता वकील साहेब ? भाऊ आहे तो माझा !" मी म्हणालो . त्याला म्हणाला ," गुन्हा करायला तुमच्या भावाला स्वतःच  जायची  गरज काय होती ? भाड्याने माणसे मिळत नाहीत का ? "
      " मग यावर काहीच उपाय नाही का ?"
      "  आहे ना , पण फार अवघड . अशक्य म्हणा की !"
      "  म्हणजे ? " मी न समजून विचारले .
      " इन्स्पेक्टर विनय सावंतना ओळखता का तुम्ही ?" त्याने मला असे विचारता चवताळून  म्हणाला,"  तो हट्टी ,अभिमानी अहंकारी, इंस्पेक्टर तो त्याला कोण ओळखणार ? चांगलाच ओळखतो मी त्याला."
      " हां , फार इमानदार इन्स्पेक्टर आहे तो आणि तुमच्या भावाची केस त्याच्या हातात आहे आणि त्याने तुमच्या भावाचा विरोधात भक्कम पुरावे गोळा केले आहेत.'
     " हो. पण त्या पुराव्याना  तुम्ही खोटे पण सिध्द करू
शकता ना ?"
      " नाही. सी. सी . टीव्ही कॉमेरा मध्ये  तुमच्या बंधु चे फुटेज आहेत. ते कसे खोटे ठरविणार ?"
  त्यावर मी समजलो की आता काही ही होऊ शकत नाही.
पण  तरी देखील शेवटचा प्रयत्न म्हणून इन्स्पेक्टर  विनय सावंत ची भेट घेतली . पैशांची  लालच दाखविली. पैशांचं नाव ऐकताच तू माझ्यावर गर्जला ," आत्ता बोलणार ते बोललात पुन्हा जर अशी फाजीलपणा केलात तर सरळ आंत  टाकीन आणि वरुन चार्जेस लावीन. विनय  सावंतला लाच द्यायला आलाय म्हणून. समजलं . फार मुश्कील पणे मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो.  नाही तर भयंकर राग आला होता मला  त्याचा . असे वाटत होते की, सरळ जावे नि त्याची गंचण्डि  पकडावी  आणि कोंबडी सारखी  त्याची मान मुरगाळून टाकावी . पण मनात हां. पण व्यक्तीशः असे करू शकलो मी. कारण आधीच माझा त्यात त्यांच्या सापळ्यात अडकला होता आणि मी ही अशी आगळीक करून बसलो असतो तर मलाही अडकून टाकला असता त्यांने  एखाद्या खोट्या केसमध्ये . म्हणून गप्प राहणेच योग्य आहे. असे समजलो मी .


   अखेरचा उपाय म्हणून त्याला गयावया करत म्हणालो ,"  बघा ना साहेब , काय होते असेल तर ?" त्यावर तो म्हणाला,
     माझ्या समोर स्वतःचे  जरी नाक रगडीले तरी  त्याचा काही फायदा होणार नाहीये . तुमचा भाऊ गुन्हेगार आहे आणि त्याला  त्याच्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि मी खात्रीने सांगतो की  तुमचा भाऊ कायद्याच्या   हातून सुटू नये , याची मी पूर्ण तयारी केलेली आहे . मला एकदा वाटले की त्याचा गळा पकडावा. पण मला तसे न  करण्याचे  आपल्या नजरेच्या खुणेने कल्याण ने सांगितले. मी हताश होऊन तेथून निघालो होतो.


                             अलका


      मी नेहमीप्रमाणे आज देखील  हॉस्पिटल  आली होती. मला पाहताच कुंदा  उठून माझ्याजवळ येत म्हणाली
       " आजीबाई ! तुम्ही या तुम्ही आलात. बरे झाले ."
       " काय गं झालं ?"
       " काही नाही मी जर घरी जाऊन येते ."
       " काही प्रॉब्लेम ?"
       " नाही. काही नाही ."
       " मग  ?"
       " आज धीरेन च्या केसचा  निकाल लागणार आहे. मुलांना जरा समजावून येते."
       " ये ये सावकाश ये मी आहे तोपर्यंत." कुंदा निघून गेली आणि मी देवधरच्या अगदी शेजारी बसले. तेवढ्यात देवधरच्या हाताची बोटे मला हललेली दिसली. म्हणून मी नीट निरिक्षण करु लागली होती. देव हळूहळू शुध्दीवर येत होता. मी हर्षभरीत नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. इतक्यात देव ने आपले डोळे उघडले आणि माझ्याकडे गोंधळलेल्या स्थितीत पाहत म्हणाला,"  कोण आपण ? आणि मी इथे कसा आलो ? "
      " मला ओळखले नाहीस " त्यांनी नकारात्मक मान डोलावली.
    " मी अलका."
    " कोण अलका ? "  असे म्हणताच माझ्या द्यानात आले की माझा चेहरा बदली झाला आहे. अर्थात माझा नवीन चेहरा
देव कसं बरं ओळखणार ?"
     " मी अलका पानसरे तुझी कॉलेज मैत्रीण."
     " तु अलका आहेस तर मग तुझा चेहरा.....
     " बदली झालाय ना ? त्या मागचा फार मोठा इतिहास
आहे. तो सवढीने सांगेन. परंतु आता हाच माझा चेहरा."
      " बरं मग इतके दिवस कुठे होतीस तू ?"
     " इथंच या शहरात."
     "  मग भेटायला का नाही आलीस ?"
      "  त्याचा फायदा .....?
     "  प्रेम फक्त फायद्यासाठी केले जाते का ?"
     " तसं नाही पण .....
     "  पण काय ? "
      " तुझे प्रेम अजूनही आहे आहे का माझ्यावर ?"
      " अर्थात ."
      " हे ऐकून बरे वाटले ."
      " आणि तुझे ?"
      " ते सांगायची गरज आहे ? "
      " नाही . गरज तर नाहीये ."
      " बस्स ! मग तर  झालं."
      "  एक विचारू ? "
      " जरूर."
       "  लग्न करशील ?"
      "  या वयात ."
       " त्यात गैर काय आहे .?"
       " लोकं शेण घालतील आपल्या तोंडात."
       " खरंय तुझं."
       " आता फक्त प्रेमच करत बसायचं ......मरेपर्यंत ."
       " पुढे नको ?"
       " पुढे ही  करू ......पुन्हा जन्म मिळाला तर !"
        आमचे एवढे संभाषण झाले होते. तेवढ्यात तिथे डॉक्टर अभय येतात. आम्हाला बोलताना पाहून ते म्हणाले,
        "  अरे, वा ! कोमातून  बाहेर आलात तुम्ही !"
        " कोमातून देव ने गोंधळून  विचारले .
        " होय. गेले कित्येक दिवस तुम्ही  कोमात होते."
        "  पण मला काहीच कसे आठवत नाहीये."
        "  कसे आठवणार तुम्हाला जेव्हा इथं आणले , तेव्हा तुम्ही बेशुद्ध अवस्तेत होता . डॉक्टर अभय  म्हणाले.
      त्यानंतर मी थोडक्यात  अपघात झाल्यानंतर काय काय घडले ते सांगितले.


                        देवधर


      म्हणजे अपघात घडल्यानंतर अलकानेच मला इस्पितळात आणले  होते तर अलकाची आणि माझी भेट घडावी आणि  ती पण अशी   किती चमत्कारिक गोष्ट आहे
ही. त्या दिवशी अलका तर माझ्या कार समोर आली होती. तिला वाचविण्यासाठी ड्रायव्हर ने स्टेरिंग  एकदम फिरवली. कार गर्रकन वळली नि ट्रक वर आदळली. त्यामुळे  ड्रायव्हर जागीच ठार झाला. माझे नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. त्यामुळे तर अलकाची भेट झाली माझी. नाहीतर जन्मभर
मनात खंत जरूर राहून गेला असता की अलकाची  भेट झालीच नाही म्हणून.


      पण एका गोष्टीचे दुःख मात्र होतेय आणि ते म्हणजे आमच्या घोरपडे कुटुंबात उठलेले वादळ.  कसे शांत होणार होते ते कुणास ठाऊक ? धीरेन ने ब्रेक फेल केले होते .
हे ऐकून  धक्काच बसला होता मला. सख्खे चुलत भाऊ
एकमेकांच्या जीवावर उठले आहे. हे ऐकून तर मला फार दुःख झाले. यासाठीच केला होता का हा अट्टहास ! स्वतःच्या प्रेमाची आहुती दिली मी. ती यासाठीच का ? काही कळेनासे झालंय.

 
       आज कोर्ट  काय निर्णय घेणार आहे ते देवच जाणे ! मी मात्र अयशस्वी झालो.  का व्हावे असे ? कोणी केला हा आमच्याशी दुष्टपणा ?  देवाने का दैवा ने ? छे ! काहीच कळत नाहीये .  माझ्याही जीवनात तसेच का घडावे ? जसे देवव्रत गंगापुत्र भीष्म च्या जीवनात घडले होते. त्यांनी सुध्दा आपल्या  वडिलांच्या  सुखा करता  आजीवन  ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली होती आणि त्यांनी पाळली देखील.


मी प्रतिज्ञा  नव्हती केली. लग्न न करण्याची !  पण मला सुध्दा आजीवन ब्रम्हचारी राहावे लागले.  म्हणजे त्या काळातील मी भीष्म आहे का ? छे !  असे कसे होईल ?
नावात साम्य असले म्हणून काय झाले ? म्हणून का माझ्या जीवनात ही तेच घडावे. ? छे ! काहीच कळत नाहीये. पण
घडलं खरं ! माझ्यात बाबतीत घडलं. अशातला भाग नाहीये. रोज कुठे ना कुठे थोडा अधिक फरकाने घडतच  असते . फक्त आपलं ते ठाऊक नसते. इतकेच काय तो फरक आणि प्रत्येकाला वाटत असते की आपल्याच बाबतीत असे का घडले ? पण ते खरे नाहीये.


      महाभारतात घडलेली भाऊबंदकीची लढाई तेव्हाच संपली आहे का ? असे  कोणी जर मला विचारले, तर मी म्हणेन  मुळीच नाही. महाभारतात  घडलेली कहाणी तेव्हा होती. आताही आहे आणि उद्या ही असणार कधी न संपणारी संभवता युगे न युगे सुरूच राहील.

               क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..