कुरुक्षेत्र ४८| मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र ४८ |
मी आमच्या काकांच्या घरी फोन करून दुर्घटनेची खबर दिली. थोड्याच वेळात आमच्या परिवार आणि काकांचा परिवार इस्पितळात पोहोचले. परंतु आजोबा तर बेशुद्धावस्थेत होते. त्याना दुरून पाहण्याखेरीज दुसरे काहीच करू शकत नव्हतो आणि आमच्या डोक्याला बांधलेले बँडेज पाहून आईने विचारले ," अरे तुम्हाला कसा मार लागला ? तुम्ही तर तिघे दुसऱ्या गाडीतून गेले होते ना ?"
" हो .आमच्या ही कार ला अपघात झाला ." मी म्हणालो.
" अरे , देवा ! असे रे कसे झाले ? " आईने विचारले,"
दोन्ही कार चे ब्रेक फेल. ? कुण्या वाद्या दुश्मनाचे तर हे काम
तर नव्हे ना ?" आई अगदी सहजच बोलून गेली. परंतु त्यावेळी धीरेन च्या डोळ्यात मला भीती दिसली. त्याचे अंग भीतीने थर थर कापत असल्याचे मला जाणवले. तसा लगेच माझ्या संशय आला की आई म्हणते तसेच तर घडले नसेल ना ? मी स्वत:लाच प्रश्न केला. बहुधा तसेच घडले असावे. नाही तर एकाच वेळी दोन्ही कार चे ब्रेक फेल कसे होतील ?
दाल में काला जरूर है. वर्ना उसके आँखों में भय कैसा ? और क्यों ? याचा अर्थ एकच असू शकतो. खरे तर हे आम्हाला ठार मारायचे प्लॅन होते ते. परंतु चुकून आमच्या ऐवजी आजोबा गेले त्या कार मधून. म्हणून आजोबांचे अँक्सिडंट झाले आणि दोन्ही कार चे ब्रेक फेल करण्यामागचा त्याचा हेतु हाच असावा की आम्ही कोणतीही कार घेऊन गेलो तरी आमचे अँक्सिडंट व्हायलाच हवे. बाप रे ! केवढं मोठं प्लनिग असेल त्याचे. पण एकट्या धीरेन चे प्लॅन नसणार. जरूर त्यांचा गुरू कल्याण त्याचेच मार्गदर्शन असेल. यात तिळमात्र शंका नाही. एवढ्यात इन्सपेक्टर विनय सावंत ही चौकशी साठी तेथे आले . परंतु आकोबा बेशुद्ध आहेत आणि कार चा चालक जागीच ठार झाला होता. त्याची कोणी दखल देखील घेतली नव्हती . क्षणभर आम्हालाही विसर पडला त्याचा. परंतु नंतर त्याच्याच मोबाईल वरुन त्याच्या घरच्यांशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्याचीही पत्नी रुग्णालयात आली होती. इन्स्पेक्टर विनय सावंत सर्वांची कसून चौकशी केली. आम्हाला त्याने विचारले ," तुमचा कुणावर संशय आहे का ? " मी धीरेन चे नाव घेणारच होतो . पण तेवढ्यात यशदादा म्हणाला ," नाही. आमच्या कोणावर ही संशय नाहीये . पण बळी दादा चूप राहण्यातला नव्हता. तो लगेच म्हणाला ," इन्स्पेक्टर साहेब,
" माझा संशय धीरज आणि धीरेन वरच आहे. "
तेव्हा धीरज दात ओठ चावत म्हणाला,
" काय म्हणालास ? " असे म्हणून तो सरळ अंगावर चालून आला म्हणून बळी दादा ने सुध्दा आपल्या शर्टाची बाहे वर करून पवित्रा घेतला. मी समजलो की यांची आता जुंपणार . तसे मी लगेच दोघांच्या मध्ये पडत म्हणालो ," अरे हे काय चालले तुम्हा दोघांचे ? हे हॉस्पिटल आहे. कुस्ती खेळायचे मैदान नाहीये."
" ते तुझ्या भावालाच समजावून सांग. जेव्हा तेव्हा तो माझच नाव घेतो." धीरज रागाने म्हणाला. आता मलाही सहन झाले नाही त्याचे म्हणणे. म्हणून मी म्हणालो," खर्या-खोट्या ची शहानिशा लवकरच होईल. मिस्टर धीरज."
" आधी पुरावा घेऊन ये आणि मग बोल माझ्याशी !"
" पुरावाही मिळेल आणि तोही आजच !" यशदादा एकदम ठामपणे म्हणाला . आम्ही सर्वजण आश्चर्याने यशदादा कडे पाहू लागलो. तेव्हा इन्सपेक्टर विनय सावंत विचारले ," मिस्टर यशराज घोरपडे सांगा बरं कसा मिळेल
पुरावा ?"
" इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आताच्या आता आमच्या घरी जा आणि आमच्या गेटवर सी. सी. टीव्ही कॉमेरा बसविलेला आहे . त्या मध्ये कारचे ब्रेक फेल करणाऱ्याचे फुटेज नक्कीच आली असतील. तो तेवढा तुम्ही पाहून घ्या." असे बोलून नंतर माझ्याकडे वळवर मला म्हणाला ," अमर इन्स्पेक्टर साहेबां सोबत आपल्या घरी जा नि त्याना दाखव दाखव कुठे
कुठे आपण लोकांनी सी. सी. टीव्ही. कॉमेरा लावले आहेत ते. " मी मान हलवून " हो " म्हटले . आम्ही जसे निघालो तसा धीरेन ,धिरजला म्हणाला ," दादा चल आपण पण दोघे जाऊ ......ह्यांच्या सोबत. " धीरज ला अगोदर समजले नाही. धीरेन असं का बोलतोय ते. म्हणून तो म्हणाला ," कशाला ?"
तेव्हा धीरेन त्याच्या कानात काहीतरी पुटपुटला. ते ऐकल्यानंतर धीरज चा चेहरा एकदम पडला. जणू चोरी करत
असताना रंगेहात पकडला गेला आणि त्याचा चेहरा पडलेला पाहून मी काय समजायचे समजलो . म्हणजे धीरज आणि धीरेन ह्यात हात असावा. असा विचार करून मी इन्स्पेक्टर विनय सावंत सोबत आमच्या घरी जायला निघालो.
धीरज
इस्पितळात माझ्या कानात धीरेन कुजबुजला. तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली . माझ्या डोळ्यापुढे अंधार दाटला. काय करावे ते क्षणभर सुचलंच नाही आणि सूचना तरी कसे ? कारण खबर च तशी भयानक होती. बळीने धीरेन वर केलेला आरोप खरा होता. धीरेन च त्यांच्या कार चे ब्रेक फेल केले होते. तेही मला न विचारता प्रथमच तो असा वागला होता. यापूर्वी त्याने असे कोणतेही कृत्य मला न विचारता कधी केले नव्हते . मग आजच त्याला ही दुर्बुद्धी का सुचली ? ते कोण जाणे ? पण आता काहीतरी उपाय करायला हवा होता. म्हणून बाबाना ही काही न सांगता मी, धीरेन आणि कल्याण तेथून ताबडतोब निघालो घरी यायला.
पण तरी सुध्दा पप्पाना आमचा संशय आलाच . म्हणूनच
की काय त्यांनी आम्हांला विचारले की, कुठे निघालात तुम्ही लोक ? " त्यावर मी वेळ मारून नेण्याचा बहाणा करत त्यांना म्हणालो ," कुठे नाही . एक जरुरी काम आठवले ते आधी करतो आणि मग येतो इथे. "
" नको येऊस इथं. घरीच रहा. आम्ही निघणार आहोत आता ." मी मनात म्हणालो ," बरं झालं बाबांनीच सांगितले ते.नाहीतर आम्ही घरीच जाणार होतो. परंतु आता घरी जाऊन चालणार नाही. त्या पेक्षा अमरच्या घरी जाऊ. म्हणजे खरे काय ते कळेल . असा विचार करून मी धीरेन आणि
कल्याण ला म्हणालो ," चला लवकर मोटार मध्ये बसा. पाहू
तर खरं पोलिसांना खरंच पुरावा सापडतोय का आपल्याला
पुरावा नष्ट करायची संधी मिळेल. आम्ही सर्वजण मोटार मध्ये
बसलो नि घरी निघालो. तेव्हा मी धीरेन वर रागवत म्हणालो,
" धीरेन काय केलेस बरं हे ?" त्यावर तो दिलगिरी व्यक्त करत म्हणाला ," मला क्षमा कर दादा. मी चुकलो. " असे म्हणताच माझा राग अनावर झाला मी त्याला म्हणालो," लाज नाही वाटत चुकलो म्हणून सांगायला. कोणाला विचारून केलेस हे ?"
" कोणाला नाही."
" अरे , पण एक वेळ मला विचारावासं पण वाटलं नाही
तुला ? मी सांगितले नसते का तुला ? मला मला न विचारता सारे करून झालास ,आता मी काय करू ते सांग बरं." तेव्हा कल्याण मला समजावत म्हणाला ," आता त्याच्या वर रागावून काही फायदा आहे का ? त्यापेक्षा त्याला त्यातून आता बाहेर काढायचे कसे याचा विचार कर ." माझा राग शांत झाला नव्हता . मी रागातच त्याच्यावर चिडत म्हणालो ," आता कसला विचार करू डोंबल्याचा ! हा जिवंत पुरावा सोडून आलाय तिथं. तो इन्स्पेक्टर विनय सावंत सोडेल काय आता ?"
तेव्हा कल्याण शांत पणे म्हणाला," अरे हो .पण त्यावर ही काही उपाय असेल की नाही ? "
" ते आता वकील च सांगेल."
" मग फोन कर त्याला का पकडून नेल्यावर इलाज करणार आहेस ? " कल्याण ने सुचविले. मग मलाही त्याचे म्हणणे पटले .मी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वकील सुभाष ला फोन केला नि त्याला प्रसंगाचे गांभीर्य सांगितले.
आम्ही जेव्हा तेथे पोहोचलो. इन्स्पेक्टर विनय सावंत सी.सी. टीव्ही कॉमेरा चेक करत होते.
अमर
आणि कॉमेरा चेक केला असता दिवसभर आपल्या घरी कोण कोण येऊन गेले. या सर्वांचे त्यात फुटेज होते. त्या फुटेज मध्ये धीरेन चे ही फुटेज होते. ते सुद्धा कार च्या खाली शिरून काहीतरी करत असल्याचा त्याचा फुटेज होता आणि बाहेर आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य ही उमटलेले स्पष्ट दिसत होते . इन्स्पेक्टर विनय काय समजायचे ते समजला. त्याने लगेच पोलिसांना धीरेन ला अटक करण्याचा आदेश दिला. धीरज ने इन्सपेक्टर विनय ला खूप समाजविण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु इन्स्पेक्टर विनय सावंत म्हणाले," तुम्हाला जे काय सांगायचे आहे ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा. " असे म्हणून ते पोलिसांकडे
पाहत बोलले ," चला रे त्याला घेऊन." त्यानंतर धीरेन च्या
विरुध्द कोर्टात खटला दाखल केला. परंतु धीरज ने कोर्टाला जामीन देऊन धीरज सोडवून आणले खरे ! पण पोलिसाकडे
धीरेन च्या विरोधात भक्कम पुरावा होता. शिवाय पोलिसांच्या खास खाक्या पुढे धीरेन पोपटावाणी बोलू लागला. त्याने
स्वतःच कबूल केले की दोन्ही कारचे ब्रेक त्यानेच नादुरुस्त केले. त्यामुळे केस पोलिसांची बाजू स्ट्राँग झाली. त्यामुळे धीरेन ला शिक्षा यात तिळमात्र शंका नाही . परंतु आमच्या दयावान दादाला मात्र त्याची दया येत होती. आम्हाला ज्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आमच्या दयापणाला अंत नव्हता. इतके सारे घडून ही त्यालास दया दाखवत होता. मला म्हणत होता की , झाले ते झाले .आता काय त्याचे ? आणि झाले त्यात काही बदल होणार नाहीये. तेव्हा आपण त्याला सुधारण्याची एक संधी देऊ या. परंतु दादाचे म्हणणे मला अजिबात पटलेले नाही. म्हणून मी दादाला म्हटले देखील अरे दादा हा गुन्हा माफ करण्या जोग
नाहीये. कारण सापाला किती दूध पाजलं तरी ही त्याच्या शेपटीवर पाय डसतोच तो आणि हे लोक सापा पेक्षा ही डेंजर आहेत. कारण साप त्याच्या शेपटीवर पाय दिला तरच
तो दंश करतो. परंतु हे मानव रुपी साप तर त्या सापांना पण
मागे टाकतील. इतके महाभयंकर आहेत. रक्षण करणाऱ्या माणसालाच डसतील. तेव्हा अश्या लोकांना माफ करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे ते
आणि मला ते मान्य नाहीये. त्यावर यशदादा , म्हणाला,
" अरे कसा झाला तरी तो आपला भाऊच आहे ना ? त्याला असे कसे मरू द्यायचे बरं ?"
" भाऊ नाही वैरी आहेत ते आपले आणि त्यांना क्षमा करणे कदापि शक्य होणार नाही हे मला दादा तू व्यर्थ प्रयत्न करतोय. ते होणे नाही जा तू इथून. यशदादा जड अंतकरण्याने तिकडून निघून गेला.
एक ५५ वय असलेली एक महिला मला मघापासून
एका कोपऱ्यात बसलेली मला दिसली. तिच्याकडे कोणाचेच
लक्ष गेले नाही. हे खरे तर तिचे आभार मानायला हवे होते आम्हाला. तिनेच आजोबा ना जखमी अवस्थेत इस्पितळात
आणले होते. हे कुणालाच माहित नाही. डॉक्टरांनी सांगितले नाही आणि आम्ही ही जाणून घेतले नाही. परंतु ती वृध्द महिला आजोबांच्या प्रकृतीची चौकशी करायला रोज इस्पितळात येत होती. कोण असावी बरं ही ? आणि आजोबा
ना भेटायला का येते ? तिचा नि आजोबांचा काय संबंध ?
नक्कीच ती आजोबांना ओळखत असणार. म्हणून ती रोज इस्पितळात येऊन डॉक्टरा भेटायची नि आजोबांची चौकशी
करून तिथेच बसलेली दिसायची. म्हणून मी डॉक्टरा जवळ त्या महिला विषयी चौकशी केली की डॉक्टर या
आजीबाईचे कोणी नातेवाईक आहेत का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ? " तेव्हा अभय ओशाळून बोलले , " सॉरी ! मी सांगायचाच विसरलो की तुमच्या आजोबांना ह्या बाई च जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन आल्या. " मी म्हणालो,
" काय सांगता डॉक्टर ! या बाईने आणले आजोबां ना ? " तेव्हा डॉक्टर अभय म्हणाले ," होय आणि रोज त्यांची चौकशी करायला त्या इस्पितळात येतात."
" आश्चर्य आहे ना ओळख ना पाळख ! तरीदेखील एवढी आपुलकी ! ती पण या जमान्यात ? मला नवल वाटल्याने मी तसे म्हणालो. "
" मिस्टर अमर या पृथ्वीतलावावर अशीही काही माणसे आहेत की लोकाबद्दल आपुलकी आहे , प्रेम आहे , लोकांच्या मदतीसाठी सतत झटत असतात."
" हो , खरे आहे तुमचे म्हणणे. " भावनावश होत मी म्हणालो. डॉ. अभय तिकडून निघून जातात. तसा मी त्या
वृध्द महिला जवळ गेलो आणि त्यांना आपुलकीने विचारले,
" आजीबाई कुठे राहता तुम्ही ? मी त्यांना आजी म्हटल्याने त्यांना खूप आनंद झाला असावा. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर तसे भाव उमटलेले मला जाणवले. कारण त्या एकदम खुश दिसत होत्या. त्या मला म्हणाल्या," बाळ,
मी इथं जवळच गोळवली गावात राहते. पण तू का मला हे विचारतोयस ? " मी उत्तरलो की, मी यासाठी विचारतोय
की तुम्ही रोज आजोबांना पाहायला इस्पितळात येता. तेव्हा
तुमचं नि आजोबांचे .......? मी बोलण्या अगोदर त्याच बोलल्या ," माझे नि तुझ्या आजोबांचे नाते काय ? हेच विचारायचे होते ना तुला ?" तसा मी गडबडलो काय बोलावे
ते क्षणभर सुचलच नाही. परंतु लगेच स्वतःला सावरून बोललो की, तसं नाही. पण इतकं कोण कुणासाठी करतो ना ? म्हणून म्हटलं." त्यावर त्या म्हणाल्या ," प्रत्येक माणसा
बरोबर नातच असावं लागतं का ? माणुसकीचे नाते असू शकत नाही का ?" मी दिलगिरी व्यक्त करत म्हटले ," माफ
करा आजीबाई ,मला तसं नव्हतं म्हणायचंय काही. पण....
" थांब. आता तू विचारलेच तर मग ऐक आता. तुझ्या
आजोबांचे नि माझे काय नाते आहे ते." असे म्हणून त्या
किंचित थांबल्या. एक दिर्घ सुस्कारा सोडून त्या पुढे म्हणाल्या," आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो.
अर्थात आम्ही एकमेकांचे मित्र मैत्रिणी आहोत. समजलं."
" असे होय. मी वेगळच काहीतरी समजलो होतो." मी
नकळत चट्कन नको ते बोलून गेलो. तसा त्याच्या चेहऱ्यावर
रागाची चिन्हे उमटली आणि त्या रागानेच उद्गारल्या ,
" म्हणजे ? " त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरील उमटलेले भाव पाहून मी दचकलो . पण लगेच स्वतःला सावरत मी म्हणालो नाही म्हणजे असे कोण कुणासाठी करतो ? ते पण
या युगात ?"
" का ? माणुसकी नाहीच आहे का या जगात ? एक
माणूस दुसऱ्या माणसासाठी काहीच करू शकत नाही का ?
इतक्या लवकर संपली का या जगातली माणुसकी ?"
मी समजलो की आजीबाई आता खूप चिडल्या आहेत. त्यांच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. तेव्हा मी म्हणालो ," तसे नाही आजी ! मला म्हणायचे होते की....." मला पुढे ना बोलू देता त्या म्हणाला ," मी समजले आहे तुला काय म्हणायचे आहे ते. पण जाऊदे ते आता. सोडून दे तो विषय." त्यावर मी काहीच बोललो नाही. परंतु आजीबाई खूप नाराज झाल्या होत्या माझ्यावर. हे बाकी खरे ! फक्त
मैत्रीचे नाते तर असू शकत नाही आणि आजोबांची प्रियशी
म्हणावी तर त्यांनी लग्नच नाही केले. पण लग्न का नाही केले
ते मात्र कळले नाही. त्याना कुण्या स्त्री ने धोका तर दिला नसेल ना ? असेल ही म्हणूनच त्यांनी लग्न नाही केले आणि
ह्या आजीबाई त्याच तर नसतील ना ? कोण जाणे ? पण
हे कळणार कसे ? बहुधा आईला माहीत असावे. तिलाच विचारायला हवे. सध्या तर हेच धरून चालावे की ह्या आजीबाई आजोबांच्या कॉलेज जीवनातील मैत्रिणी आहेत बस्स ! बाकी आजोबांचे आणि तिचे काय नाते होते ते देव जाणे ! पण मी मात्र उगाच त्याना उगाच नाराज केले. पण माझाही काही स्वार्थ नव्हता त्यात . मी त्यांच्या भल्यासाठीच मी तसे म्हणालो होतो. पण त्यांना ते आवडले नाही. त्यात माझा काय दोष? आणि नाहीतरी म्हाताऱ्या माणसाची अशीच अवस्था असते. त्यांना आजची नवीन पिढी बोललेली चालत नाही आणि आजच्या पिढीला उद्याची पिढी बोललेली चालणार नाही. हे असेच असते जीवन रथचक्र आणि ते तसेच चालत राहणार अगदी जगाच्या अंतापर्यंत.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा