कुरुक्षेत्र - ४७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र - ४७ |
आम्ही घरी आल्यांतर यधदादा बळीदादावर रागवत म्हणाला ," अरे तो एक मूर्ख माणूस आहे ; पण तू का लागला त्याच्या नादाला ? "
" अमर आता तूच सांग रे , मी त्याला आव्हान दिले की त्याने मला आव्हान दिले.?"
" ठीक आहे,त्याने तुला आव्हान दिले. परंतु थोडक्यात
बाजी लावून मागे हटवायचे होते ना ? त्याला बरबाद करून
तुला काय मिळाले ?"
" घमंडी माणसाचे घमंड तोडल्याचा आनंद झालाय मला. "
" हे तू चांगले नाही केलेस .आता एवढे पैसे कुठून आणणार आहे तो ?" यश दादा बोलला.
" कुठन का आणे ना ? आपल्याला काय त्याचे .बळी दादा बेफिकीर पणे बोलला. तेव्हा यशदादा म्हणाला ," अमर आपण त्याला मदत करूया थोडी शी ? "
" पण ते घ्यायला तयार होईल का?"
" बघू प्रयत्न करून." तेव्हा बळीदादा यशदादा वर नाराज होत म्हणाला ," दादा शर्थ झाली तुझ्या या दयाळू पणाची !" त्यावर यशदादा बळीदादाला समजावत म्हणाला,
" अरे कसे झाले तरी तेआपले भाऊ च आहेत ना ?
पाण्यावर काठी मारल्याने पाणी दूर होते. परंतु क्षणभरच.
लगेच दुसऱ्या क्षणी पुन्हा एकरूप होते ते .तसेच रक्ताचे नाते आहे आपले त्यांच्याशी ! ते कितीही विसरायचं म्हटलं तरी विसरता येते का ? " तेव्हा मी मध्येच म्हणालो ," दादा
समज हा प्रसंग आपल्यावर ओढवला असता तर त्यांनी केला असता का असा विचार ? " तेव्हा यशदादा मला समजावत म्हणाला ," अरे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये तिचे. "त्यावर मी काहीच बोललो नाही. कारण मला माहित होते की यशदादा ला जे योग्य वाटेल तेच तो करणार. तेव्हा त्याच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून मी गप्प राहिलो.
त्यानंतरच यशदादा स्वतःहून गेला होता त्याला मदत करायला ; पण त्याने मदत न स्वीकारता दादाचाच अपमान केला. तो म्हणाला ," आधी जखम देऊन नंतर त्यावर मलम लावायची पद्धत चांगली आहे तुझी. पण मला अशा भिकेची गरज नाहीये. मी तुला दाखवून देईन की मार्केटमध्ये अजून, ही माझी वट आहे. अरे, ५५ कोटीच काय पण मला शंभर कोटी जरी द्यावे लागले असते ना , तरी ते एका क्षणात उभे
केले असते. तेव्ह मला तुझ्या दयेची गरज नाहीये. पण हां उद्या तुलाच त्या पैशाची गरज भासेल. तेव्हा ते पैसे जपून ठेव. " मला त्याचे हे बोलणं अजिबात आवडलं नाही. त्याच्या
वक्तव्यातून त्याला काय सुचवायचे आहे ? मी स्वत:शीच
विचार करू लागलो की तो असं का म्हणाला ? पुढे येणाऱ्या
संकटाची ही सूचना तर नव्हे ना ? कुणी सांगावं ,? असेल ही.
कारण एवढा मोठा पराजय झाल्या नंतर तो स्वस्थ बसेल असं अजिबात वाटत नाहीये. म्हणून मी मुद्दाम त्याला विचारले ,"
" तुला नेमके काय म्हणावयाचे ? ते जरा स्पष्ट सांगशील ?"
" तुझं नि माझं आता हे अंतिम युध्द सुरू आहे. त्यात कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सध्या तरी सांगणे कठीण आहे ? तेव्हा तयार रहा. कारण जो जिंकेल तोच ह्या भूतलावर राहील . ही केवळ धमकी समजू नकोस. लास्ट वार्निंग समज .आजोबांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांचा अपमान केला आणि तो म्हणाला ,"तुम्हाला जर त्यांचा जास्त पुळका येत असेल तर आज पासून त्यांच्याकडे जाऊन राहा ना ? उगाचच घरामध्ये वैरी पाळून ठेवले आहेत मी. "
मोठ्या बाबांनी काहीतरी बोलायला पाहिजे होते. परंतु ते गप्पच .आजोबांचा होत असलेला अपमान उघड्या डोळ्यांनी पाहत होते ते . मला राहवले नाही मी धिरजला म्हणालो ," तू उगाचच राग काढतोहेस सर्वांवर. खरे तर
तुझंच चुकतंय . तुला काय गरज होती बळी दादाला आव्हान देण्याची ! आम्ही म्हटले होते ना की कंपनी घेत असल्यास आम्ही त्यात भाग घेणार नाही. पण नाही. तुझ्यात समजूतदार नाहीच आहे. आडात नसेल पोऱ्यात येणार कुठून ? त्यावर धीरज बोलला ," झालं तुझं बोलून ?"
" हो ."
" मग उचल तुझी ही भीक आणि फुटायचं बघ इथून."
" अरे पण ...?"
" मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. जाऊ शकता तुम्ही! "
" अरे , ऐक ना ?"
" तू वेडा आहेस का रे ? एकदा बोललेलं कळत नाहीये का ?"
" चल दादा . आता तिथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. त्यात तेवढा अपमान पुरेसा आहे. " यश दादा पैशाची बॅग उचलत म्हणाला चल." मग आम्ही काहीएक न बोलता
मुकाट्याने तेथून निघून आलो. धीरज ने आमच्या समोर
मोठ्या बढाया तर मारल्या .परंतु पैशांचा बंदोबस्त तो करू शकला नाही. शेवटी स्वतःचे घर गहाण ठेवावे लागले आणि त्याचा परिणाम इतर धंद्यावर झाला . बिल्डिंग कंट्रक्शन ची कामं खोळंबलीत. कंत्राटदारांना पहिल्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांनी पुढचे काम थांबविले. आमची मदत तर त्याने नाकारली होती. त्यामुळे आमचाही नाईलाज झाला. आता स्वतःच्या घरात भाड्याने राहण्याची पाळी आली होती. गाड्या ही सर्व विकून टाकल्या होत्या. आता कचेरीत जायलाही ऑटोरिक्षा चा सहारा घ्यावा लागेल. हे एका शुल्लकशा गोष्टीवरून घडले होते .पण जे घडले फार भयानक आणि दु:खदायक होते नि क्लेशदायक पण होते.
आमची मधील दुरी वाढतच जात होती. धीरज आणि धीरेन आम्हाला खुनशी नजरेने पाहायचे. त्यांच्या मनात आमच्या बद्दल आपुलकी तर नव्हतीच. उलट तिरस्कार , द्वेष भावना होती. आमच्या विरुद्ध कट कारस्थाने तर सुरूच होती. आता पुढील डाव कोणता असणार आहे ते देवच जाणे !
आम्हाला सदैव जागृत राहायला हवे. हेच खरे ! पण तरी देखील मनाला सारखी हुरहुर लागलेली असायची .कधी काय होईल ते काही सांगण्यासारखे नव्हते, म्हणून एक एक पाऊल ठेवून विचार करून आणि सावधानपणे उचलायला हवे होते .
आज मंगळवार होता आणि आजोबांना नेहमी प्रमाने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला मुंबईला जायचे होते. धीरज ने
सर्व गाड्या विकल्यामुळे त्याना आमच्याकडे यावे लागले. आम्ही ऑफिसला जायच्या तयारीला लागलो होतो . तेवढ्यात तिथे आजोबा आले आणि यशदादाला म्हणाले,
" यश मला आज तुझी गाडी पाहिजेल." यशदादा
हसतच म्हणाला ," हां हां बिनधास्त घेऊन जा .पण सोबत ड्रायव्हरला पण घेऊन जा ," तेवढ्यात आई बाहेर आली. आजोबांना पाहून ती म्हणाली ," बाबा बसा तुम्ही ! मी तुम्हाला चहा आणते."
" चहा नका. आताच घेतलाय."
" मग दूध देऊ का ?"
" काही नको . आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन येतो. मग दे तुला काय द्यायचं असेल ते."
" बरे ." असे बोलून ती आतमध्ये निघुन गेली. तसे आजोबा ही उठले आणि माझ्याकडे पाहून म्हणाले ," मी निघतो बरं का ? इथंच उशीर केला तर मग दर्शनाला खूप रांग लागलेली असेल. मग दर्शन लवकर मिळणार नाही."
" बरं मग निघा तुम्ही ! पण येताना खूप सारा प्रसाद घेऊन या."
" अरे प्रसाद काय पोट भरण्या वस्तू आहे ? "
त्यावर कुणीच काही बोलले नाही. आजोबा जसे बाहेर निघून गेले. तसे आम्हीही कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलो. कारमध्ये बसलो होतो . तेवढ्यात तिथे क्रिश धापा टाकत पळत आला. तसे मी त्याला विचारले ," आज सकाळीच कुठे निघाली सॉरी म्हणायची ?"
" तुझ्याकडे आलोय."
" माझ्याकडे का बरं ?"
" अरे माझी कार रस्त्यामध्येच नादुरुस्त झाली. गॅरेज वाल्याला फोन करून सांगितले आहे की, कार गॅरेज मध्ये घेऊन जा म्हणून. "
" बरं मग माझ्याकडून काय सेवा ? "
" मला थोडे बँकेत काम आहे आणि बँक रस्त्यामध्येच पडते. मला जरा तिथे सोड." तेव्हा मी हसुन म्हणालो ,
" बस्सं इतकच ना ? चल बैस गाडीत. नेऊन सोडतो
तुला ." असे बोलून मी चालक सीटवर बसलो. क्रिश दुसऱ्या
बाजूने येऊन माझ्या बाजूच्या सीटवर बसला. यशदादा आणि बळीदादा दोघे ही मागच्या सीटवर बसले . मी कार स्टार्ट केली. गिअर मध्ये टाकताच कार पळू लागली होती.
थोडे अंतर जाताच मला जाणवले की कार चे ब्रेक फेल आहेत. तसा मी घाबरून म्हणालो ," अरे कार चे ब्रेक फेल
आहेत. आता काय करायचे ? कार थांबवायची कशी ?
आमच्या पोटात एकदम धस्स झले. काय करावे ते सुचेना.
भीती ने अँक्सिलेटर वर चा पाय आणखीन दाबला जाऊन कार अधिक वेगाने पळू लागली. तेव्हा क्रिश निर्विकार
चेहऱ्या ने म्हणाला ," असा भांबावून जाऊ नकोस आणि आता मी काय सांगतो त्याकडे नीट लक्ष दे." असे म्हणून
क्रिश किंचित थांबला नि मग पुढे म्हणाला ," सर्वात अगोदर
तू अँक्सिलेटर वरचा पाय उचल. "
" उचलला. पुढे."
" आता मागून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन कार अगोदर एका साईडला म्हणजे रस्त्याच्या किनाऱ्यावर
घे." मी हळूहळू कार रस्त्याच्या कडेला घेतली. तसा क्रिश
म्हणाला ," आता क्रमाक्रमाने गिअर बदली करत ने म्हणजे थर्ड वरून सेंकड वर आण आणि सेंकड वरून फस्ट वर आण. पण रेस अजिबात करू नकोस. " मी क्रिश सांगितल्या प्रमाणे केले. रेस अजिबात न केल्याने कार चा वेग फारच कमी झाला होता. रस्त्यावर वाहतूक तुरळक असल्याने हे सहज शक्य झाले होते . त्यानंतर मी क्रिश विचारले ," कार चा वेग तर कमी झाला. पण थांबणार कशी ?"
" त्यासाठी एक छोटासा अपघात करायला लागेल."
" म्हणजे ? " मी न समजून विचारले.
" पुढे एखादा ट्रक किंवा मोटार उभी असेल त्याला धडक दे . नाही तर विद्युत खांबाला."
" आणि मग रे ?"
" थांबेल गाडी. थोडासा मार लागेल आपल्याला.
पण जीव तर वाचेल. " आणि मग मी एका विद्युत खांबाला धडक धडक दिली. कार थांबली. कार चा बोनट तुटून
रेडिरेटर ही तुटले आणि आमच्या डोक्याला थोडा थोडा मार लागला होता. जवळच असलेल्या क्लिनिकमध्ये जाऊन जखमेवर मलमपट्टी केली. तोपर्यंत पोलिसांची जीप तेथे येउन पोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
आम्ही महाराष्ट्र विद्युत मंडळाचा दंड भरून तिकडून निघणारच होतो. एवढ्यात मोबाईल ची बेल वाजून लागली. फोन उचलून कानाला लावून मी म्हटले , " हॅलो ss कोण बोलतोय आपण ? "
" मी शिटी हॉस्पिटल मधून डॉ. अभय बोलतोय."
" बोला डॉक्टर."
" आपण अमर घोरपडेच बोलताय ना ?"
" येस डॉक्टर."
" देवधर घोरपडे यांचा कार अपघात झालाय."
" काय ? " माझ्या हातातून मोबाईल गळून खाली
पडला नि स्विच ऑफ झाला. मला सर्वजण विचारू लागले
की ,काय झालं अमर ? आणि कुणाचा फोन होता ?"
" फोन इस्पितळातून आला होता."
" कुणाचा ?"
" डॉक्टरांचा."
" काय म्हणत होते डॉक्टर ?"
" आपल्या प्रमाणेच आजोबांच्या कार ला सुध्दा अपघात झाला."
" आँss काय सांगतोय काय अमर ?" यशदादा बोलला.
" होय दादा.."
" आता आजोबा कुठे आहेत ? आणि कसे आहेत ?"
" ते विचारायचं राहील."
लगेच मोबाईल ऑन करून नंबर डायल केला. तसा पलिकडून डॉक्टर अभयचा आवाज आला. हां बोला मिस्टर
अमर घोरपडे.
" सॉरी माझ्या हातून फोन खाली पडला नि स्वीच ऑफ
झाला."
" आता मी काय सांगतो ते ऐका........देवधर घोरपडे याना
जखमी अवस्थेत रुग्णालयात आणले गेले .त्यांची अवस्था फार गंभीर स्वरूपाची आहे. तुम्ही ताबडतोब इस्पितळात हजर व्हा. "
" आम्ही आता लगेच येतो. तोपर्यंत तुम्ही उपचार सुरू करा . " असे बोलून मी फोन कट केला.
" दादा आपल्याला लगेच इस्पितळात जायला हवे आहे."
" मग चल ना ? "
" क्रिश ,तू येतोयस आमच्या बरोबर का बँकेत जाणार आहेस."
" बँकेत नंतर पण जाता येईल. अगोदर इस्पितळात जाऊ
चल."
" बर चालेल ." त्यानंतर आम्ही एका आटोरिक्षात बसलो आणि इस्पितळात पोहोचलो. आजोबांना इमर्जन्सी वार्ड मध्ये
ऍडमिट केले होते नि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. आम्ही ऑपरेशन थिएटर च्या बाहेर बाकावर बसून डॉक्टर येण्याची वाट पाहत होतो. थोड्या वेळाने डॉक्टर अभय ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले तसे आम्ही त्यांच्या भोवती गोळा झालो. यशदादाने डॉक्टर अभय ना विचारले,
आता कशी तब्बेत आहे आजोबांची ?"
" ऑपरेशन यशस्वी झालेय. परंतु धोका अजून टळलेला नाहीये. "
" म्हणजे ? "
" चोवीस तासाच्या आत जर त्याना शुध्द आली तर धोका टळला म्हणून समजावे." डॉक्टर म्हणाले .
" आणि शुध्द नाही आली तर ?" यशदादा ने विचारले.
तेव्हा डॉक्टर उत्तरले ," काही ही होऊ शकते."
" म्हणजे काय डॉक्टर ?"
" त्यांचा स्मृतिभ्रश होऊ शकतो किंवा ते कोमात पण
जाऊ शकतात. अथवा मृत्यू ही होऊ शकतो. निश्चित काही सांगता येत नाहीये."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा