Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र -४६| मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

कुरुक्षेत्र -४६
कुरुक्षेत्र -४६

 


                              धीरज


       " काय झालं धीरज ?  तयार झालेत का ते. पप्पानी मला प्रश्न केला.
     "  कसले होताहेत तयार ? उलट त्यांनी आपल्याला कोंडीत पकडले आहे ."
    " म्हणजे ?" शनी मामांनी  विचारले.
   "  ते फ्लॅट द्यायला तयार आहेत. परंतु त्याबदल्यात फार मोठी रक्कम मागताहेत आपल्याकडे. "
     " देऊन टाक. मागतील तेवढे पैसे ." पप्पा म्हणाले.
    "  ते पैसे नाही मागत आहेत ."
    " मग ?" पप्पानी विचारले. सर्वजण गोंधळलेल्या स्थितीत माझ्याकडे पाहू लागतात. तसा मी पुढे म्हणालो ," प्लॅट च्या त्याबदल्यात आपली केमिकल कंपनी मागताहेत. शिवाय यापुढे एकमेकांचे व्यवसाय करायचे नाहीत . अशी त्यांनी
अट पण ठेवलीय. " तसा आजोबा खुश होत म्हणाले ," मग चांगले आहे ना, मान्य करून टाक." तेव्हा  त्याच्यांवर
धीरज नाराज होत म्हणाला ,"  मला वाटलंच होतं की तुम्ही  असं म्हणाल ते."
     " अरे मग  वाईट काय आहे त्यात ? त्यांना त्यांचा व्यवसाय करू दे . आपण आपला व्यवसाय करू . कल्याण
बोलला.
      " मला वाटतं कल्याण  म्हणतोय ते अगदी बरोबर आहे." पप्पा म्हणाले ," मला वाटतं की हा प्रस्ताव स्वीकारायला तुला काहीच हरकत नाहीये. "
      " तुम्हाला नाही कळणार कोणाला ,  माझ्या मनाची व्यथा."  मी नाराज होत म्हणालो.
      " त्याशिवाय दुसरा इलाज आहे का काही ?" कल्याण बोलला. तसा शनी मामा म्हणाला ," भाच्या बिकट प्रसंगी असे प्रस्ताव स्वीकारावे लागतात आणि तू अजिबात चिंता करू नकोस.  आता मी आलोय ना ? आता तुला एक सोडून अनेक उपाय सुचविन  परंतु आता आपला हात दगडाखाली सापडला आहे. त्याला सहीसलामत बाहेर काढण्याची जर तुला सुसरींन ताई  तुझी पाठ मऊ  , असे जरी तुला म्हणावे लागले तरी ते चालेल. कळलं  का ?  मी काय म्हणतोय ते."
      "  पण मामा .....?
      " बोललो ना , फक्त एकदाच वाकायचे त्यांच्यापुढे पुन्हा नाही. " शनिमामा म्हणाला.
      "  मामा तुम्ही उगाचच आगीत तेल ओतण्याचे काम करू नका. आधीच भोगलेय ते  काय कमी आहे ?"  कल्याण बोलला.
       " कल्याण तू  नक्की माझाच मित्र आहेस ना ?"
       "  अशी एक शंका येण्याचे कारण ?"
       " नाही आजकाल पाहतोय मी तू त्यांच्याच वाणी ने बोलू  लागला आहेस. तू आता पूर्वीचा मित्रा राहिला नाहीस. " मी   कल्याण वर नाराज होत म्हणालो. तेव्हा कल्याण उत्तरला,
     "  हे बघ धीरज ,एकदा ठोकर लागल्यावर माणसाने नीट
डोळे उघडून चालायला हवंय नाहीतर तोंडघशी पडण्याची शक्यता आहे ."
     " हे उपदेश तुझ्या जवळच ठेव. मला गरज नाहीये त्याची." धीरज चिडून बोलला.
      " दादा ,कल्याण म्हणतोय ते बरोबर आहे त्यात वावगे
काहीच नाहीये." धीरज प्रथमच बोलला.
    " आता भाषणबाजी बंद करा सगळ्यांनी." धीरज गर्जला ," मला विचार करू दे थोडासा. मग कुणीच काही बोललं नाही. परंतु यावेळीचा पराभव माझ्या फार जिव्हारी लागला होता . प्रत्येक वेळी त्यांनी जिंकावे आणि मी मात्र पराभव स्वीकारावा. असे का बरे व्हावे ?  जिंकण्याचा मक्ता काय त्यांनीच घेतलाय  का ?  माझ्याच वाट्याला नेहमी अपयश  यावे  का ? काय अपराध केला होता मी नियतीचा ? काही कळत नाहीये . शेवटी सर्वांच्या इच्छेनुसार मला निर्णय घ्यावा लागला . त्यांच्या सर्व अटी मान्य करून करार पेपरवर
हस्ताक्षर केले. केमिकल कंपनी त्याना देऊन टाकावी लागली आणि यापुढे एकमेकांचे  व्यवसाय करायचा नाही.
या करार पेपरवर ही मी  हस्ताक्षर केले. त्याची संपूर्ण जीत झाली होती आणि माझी संपूर्ण हार झाली होती . यापेक्षा मानहानी ती  दुसरी कोणती असावी बरे ?  पण मी  माझ्या ध्येय्यापासून यत्किंचितही मागे सरकलेलो नाही. जीवात जीव असेपर्यंत मी दुश्मनी विसरणार नाहीये . प्रयत्न सुरूच राहतील. अखेर मरेपर्यंत ! 
     मी व्यक्तीशःविचार केला की फक्त केमिकल कंपनी मी
सुरू करू  शकणार नाही. परंतु दुसऱ्या  कंपन्या तर सुरू करूच शकतो ना ?  आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. कापड  गिरणी सुरू करायच. परदेशात ही  खूप मागणी आहे
कपड्यांची. खूप पैसा कमवायचा आणि मग ह्यांचे शेअर विकत घ्यायचे  आणि मग  त्यांची कंपनी  टेक ओव्हर करायचा बस्स !  हाच उपाय करायचा आता.



                               अमर



     " अभिनंदन ."
     " कुणाचे ?"
     " अर्थात  तुम्हां तिघा  भावांचे. आजोबा दरवाज्यातून आत प्रवेश करत असतानाच  बोलले.
     " कशाबद्दल ?"
     " अरे , तुम्ही लोकांनी धीरज ला चारीमुंड्या  चित केले. "
     आता माझ्या लक्षात आलं की आजोबांना काय म्हणावयाचे आहे ते .आम्ही धीरज चा पराभव केला. त्या संदर्भात बोलत होते बाबा. पण त्यांचा खरा मानकरी क्रिश होता , कारण क्रिश ने सुचविला होता हा उपाय. म्हणून मी आजोबांना म्हणालो ," आजोबा ,अभिनंदनाचा खरा हकदार
क्रिश आहे. आम्ही नाहीत बरे."
      "  कुठे आहे तो क्रिश ?"
      " आता  तो आपल्या घरी असेल ." मी म्हणालो.
      "  तो तुला जेव्हा भेटेल तेव्हा व्यक्तीश: मी त्याचे अभिनंदन  करीनच ; परंतु   तुमचे ही अभिनंदन ."
     "  ते का ? " यशदादा ने विचारले .
     " अरे का म्हणजे ? तुम्ही क्रिश चे ऐकून जो मार्ग
चोकाळला. त्याबद्दल तुमची बुद्धी वाखाणण्याजोगे आहे."
      " आजोबा , उगाच स्तुती करताय तुम्ही आमची . आमचे  काहीच कौशल्य नाही. क्रिश  जसे सांगितले  तसेच आम्ही केले . तेव्हा  हे सारे श्रेय क्रिशलाच  मिळाला पाहिजे. बळीदादा  बोलला ," वाहवा ! किती प्रामाणिक आहात  तुम्ही पोरं. आपल्या बापावाणीच !"
        आजोबांनी डॅडींची  केलेली स्तुती मला फार आवडली.  आम्ही आमच्या डॅडी सारखे म्हणजे डॅडींचे  सुंदर विचार आमच्या अंगी होते . मी एकदम सुखावून गेलो. तेव्हा ते पुढे म्हणाले ," आता माझी खात्री झाली की प्रत्येक युगात कुठे ना कुठे  दुर्योधन असतो आणि  अर्जुन ही असतो आणि वेगवेगळ्या नावात आणि वेगवेगळ्या रूपात  कृष्ण ही असतो. महाभारतात पांडवांचा पाठीराखा कृष्ण होता. तर
कलियुगी  महाभारतात तुमचा पाठीराखा क्रिश रुपात कृष्णच आहे. अर्थात विजय तुमचाच होईल.  तेवढ्यात  तिथे आई आली आणि मी म्हणाली ,"  आता प्रशंसा बस करा आणि जेवायला चला बरं . "
       " आजोबा , तुम्ही पण चला ."  मी म्हणालो.
       " त्यांना आता जेवल्याशिवाय कुठे जाऊ देणार आहे मी !" आई म्हणाली .
      " नाही म्हटले म्हणून तू ऐकणार आहेस का  ?" आजोबा हसतच म्हणाले.

       आम्ही सर्वजण डायनिंग टेबल पाशी आलो आणि डॅडींच्या खुर्चीच्या जागेवर आज आम्ही आजोबांना बसायला लावले. आजोबा बसायला तयार नव्हते . ते म्हणाले ,"
      " अरे हा आता यशराजचा मान आहे. " तेव्हा यश दादा म्हणाला ," नाही आजोबा . हा मान घरातील प्रमुखाचा आहे. आणि आमच्या घरात सर्वात वडीलधारी तुम्हीच आहात. अर्थात तुम्हीच बसायला पाहिजे.
       " अरे हा कुटुंब प्रमुखाचा मान आहे."
       " असू दे , तुम्ही बसा. आमच्या इच्छेखातर ,"
       "  बराय. बसतो मी."
       त्यांतील आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवून
जसे झाले तसे आपापल्या  खोलीत निघून गेलो.

     दुर्गाचा मला फोन आला होता आणि ती आपल्या नवऱ्याच्या धोकेबाजी बद्दल माझ्या जवळ क्षमा मागत होती. मी तिला म्हणालो ," जे काही झाले  ते चांगल्यासाठीच झाले असे म्हणायला हरकत नाही. तुझ्या नवऱ्याची जी आगळीक केली  ती आमच्यासाठी फायदेशीर ठरली.तू  अजिबात चिंता करू नकोस." तिला विश्वास न झाल्याने तिने मला विचारले,
       " तू हे काय सांगतोयस दादा ,खरंच का ?"
       " हां माझ्या ताई हां."
      " खरं सांगतोस ? का ? माझे मन राखण्यासाठी काहीतरी बहाणा करतोयेस ?"
      " नाही गं ताई मुळीच बहाणा करत नाहीये मी . बिलिव्ह मी !"
    " बरं बरं. तू एवढ्या  आपुलकीने सांगतोयेस तर मला विश्वास करणे भागच आहे."
        " अगं एवढंच नाहीतर मी त्याला कामावरून सुध्दा
काढणार नाही."
       " ठीक आहे दादा. पण सावध रहा त्याच्यापासून."
       " ओके ओके माय सिस्टर."  पण काही दिवसानंतर तो
स्वतःहून काम सोडून निघून गेला. कदाचित त्याला केलेल्या
कृत्याची लाज वाटत असावी.  पुढे काही महिने चांगले गेले. कुठेच काही घडले नाही . धीरज ने  आता गारमेंट कपड्याचा व्यापार सुरू करण्याचा विचार असावा त्याचा . म्हणून की
बँकेने लिलावात काढलेली कंपनी त्याने विकत घेतली होती. आणि पूर्ण जमीनदोस्त करून पुन्हा नव्याने बांधायला सुरुवात केली .


        त्यानंतर अजून एक केमिकल बंद कंपनी बँकेने
लिलावात काढली होतील आणि आम्हाला ती घ्यायची होती. आम्ही तिघेही भाऊ आणि क्रिश लिलावाच्या दिवशी तेथे म्हणजे लिलावाच्या ठिकाणी उपस्थित होतो . तेव्हा धीरज आणि कल्याण हे दोघे सुद्धा उपस्थित होते तेथे. त्याना
तेथे उपस्थित होऊन यश दादा मला हळूच म्हणाला," धिरजला  जर ही कंपनी घ्यायची असेल तर ती त्याला  घेऊ दे ." त्यावर मी यशदादा ला म्हणालो ,"असे कसे म्हणतोस रे दादा. मागच्या वेळीस एक कंपनी घेऊ दिली ना त्याला.  आता आमची पाळी आहे ."
     " जाऊदे . घेऊ दे त्याला ."
     " पण दादा ...?"
     " घेऊ दे म्हटलं ना ? "
     " ठीक आहे ;  पण दादा त्याला  एक वेळ विचारून बघ."
     " बरं  बघतो विचारून." असे म्हणून यशदादा धीरज जात
बोलला ," धीरज तू  घेणार आहेस का ही कंपनी ?"
     " अरे हा लिलाव आहे. कुणी पण घेऊ शकतो कंपनी.  लिलाव आहे. जो सर्वात जास्त बोली बोलेल,त्यालाच
मिळेल कंपनी. " धीरज उपहास पूर्ण स्वरात बोलला.
    " तू घेत असशील तर आम्ही नाही बोली बोलणार."
    तेव्हा धीरज खवचट बोलला ," का घाबरलास ? "
      " घाबरण्याचे काय कारण ? जरुरी नाहीये ना , तूच जिंगशील किंवा मी ? नाही म्हणजे दुसरी पण एखादी पार्टी जिंकू शकते ना  ?"
      " हो तेही खरं ! परंतु  तू जर ह्यात ,भाग घेतलास तर सर्वात मोठी बोली माझीच असेल."
     " तुला पाहिजे तर तू घे ना . मला नकोस ."
     " यशदादा हा धीरज भिकारी नाही. तू दिलेली भीक
घ्यायला . मी घेईन तर तुला हरवूनच घेईन."
      " अरे कशाला आपसात चढा ओढ पाहिजे ?"
      "  अरे चढाओढी चे सोड. तुझ्यात हिंम्मत नाही हे कबूल कर ना ?" मघापासून दोघांचे संभाषण ऐकत असलेला बळी
चिडून म्हणाला ,"
        " सुंभ  जळले तरी त्याचे वळ नाही गेले. हरकत नाही. तुला आज मी हरवून दाखवितो."
       " चल लागली तुझी माझी. जर तू हरलास तर तू मला पाच लाख द्यायचे आणि मी हरलो तर मी  पाच लाख देईन तुला. कबूल ?"
      " कबूल."  बळी उत्तरला.
      " अरे मूर्खासारखा  तू काय  त्याच्या नादाला लागतोयस ? " यशदादा  बळी वर रागवत बोलला.
       बळी  म्हणाला ," नाही . दादा आता शर्थ  लागलीच आहे तर   होऊन जाऊ दे  त्याचा नि माझा सामना ." दोघेही
हुज्जतीर आले. शेवटी लिलावाची बोली दहा कोटी वरून
सुरुवात झाली. पन्नास कोटी वे पोहोचली. यशदादा नि मी बळीदादा ला बस कर म्हटले. परंतु त्याच्यावर जणू जिंकण्याचे भूत संचार झाले होते . धीरज ला कल्याण  बस कर असे सांगत होता. पण तोही जिद्दीलाच पेटला. दोन चुलत भावांचे युद्ध जुंपले होते .बाकीचे लिलावात आलेले
मोठं मोठे शेठ मोठ्या कुतूहलाने त्या दोघांकडे  आळीपाळीने पाहत होते. काही जणं तर आपापसात कुजबुजत होते . त्यांचे म्हणणे असे होते की, दोन भावांच्या दुश्मनीत जमिनीचा भाव  आकाशाला भिडला. २० कोटींची जमीन ५० कोटी पर्यंत  पोहोचली. अजून किती  पुढे जाईल  ते कुणास ठाऊक ?  तेव्हा क्रिश दादाने एक विशिष्ट प्रकारची खूण केली. त्या खुणेचा अर्थ बळी समजला. परंतु  धीरज चट्कन ५५ करोड बोलला .बस्स ! बळी गप्प बसला. तसा लिलाव ५५ करोड वे वर थांबला. तसा धीरज ला विजयी घोषित करण्यात आले. तसं धीरज बळी दादा कडे पहात म्हणाला, काय हरवले की नाही मी तुला." कुत्सितपणे हसत म्हणाला,
   " जा . आता हातात  बांगड्या बायकांच्या ! चांगल्या शोभून दिसतील त्या तुला ." तेव्हा बळीदादा खोचकपणे म्हणाला ," बांगड्या मला नाहीत तुला भरायला लागणार आहेत.  २० कोटींची जमीन  मी तुला ५५  करोडला घ्यायला लावली. आता  ५५ कोटी भर नाही तर घर गहाण ठेवून लिलावाची रख्खम  भर."  आणि  हा घर  चेक पाच लाखाचा आहे. असे म्हणून बळी दादाने एक चेक फाडून त्याच्या
समोर धरत बोलला आणि  तिथून निघून गेला. धिरच्या
डोळ्यावरील जिंकण्याची नशा एकदम उतरली. तसा कल्याण
बोलला ," बरोबर बोलला तो.......धीरज तू जिंकूनही हरलास आणि बळी हरवून ही जिंकला. त्यावर धीरज काही बोलला नाही. कारण बोलण्या सारखे नव्हतेच काही !


क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..