कुरुक्षेत्र ४५ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र ४५ |
अमर
आज पायल हॉटेल मध्ये धीरज ने मोठी पार्टी ठेवली होती. टेंडर मिळल्याच्या खुशीने का आमच्या हातून टेंडर हिचकावून घेतल्याच्या खुशीने ते काही कळत नव्हते .पण असे कसे घडले यावर आम्ही विचार करू लागलो होतो.
राहून राहुन आमचा संशय जतीनवर जात होता. टेंडर बद्दलची गोपनीय माहिती जतीनेच तर पुरविली नसेल ना ? कुणास ठाऊक ? असेल ,ही ! म्हणजे धीरज ने त्याला कामावरून काढले. हे सर्व नाटक होते का ? असेल ही ! पण दुर्वा कशी सामील झाली त्यात ? नाही ,नाही दुर्वाला
या बद्दल काही माहितच नसावे. त्यांनी फक्त दुर्वा चा वापर करून घेतला असावा. कारण धीरज ला माहीत होते की, दुर्वाला आम्ही सख्ख्या बहिणी सारखे मानतो. त्याचाच त्याने फायदा उचलला असावा . दुर्वा समोर जतीनेने हे नाटक केले असेल. धीरज ने जतीनला कामावरून अपमानित करून काढून टाकले म्हणून . त्या बिच्चारीला त्याच्या कारस्थानाबद्दल काहीच माहिती नसेल . म्हणून ती नवऱ्याच्या नोकरीसाठी माझ्याकडे आली .कारण तिला विश्वास आहे, मी कधी रिकामी हाताने तिला वापस पाठविणार नाही . याची पूर्ण खात्री होती त्या दोघांना . म्हणूनच हा डाव खेळला दोघांनी . पण हरकत नाही .नाही
तुम्हाला पाणी पाजीन नावाचा अमर नाही मी."
त्याच वेळी तिथे शिपाई आला आणि त्यांनी मला यशदादा ने आपल्या केबिनमध्ये बोलविल्याचे सांगितले. मी उठलो नि यश दादांच्या केबिनच्या दिशेने निघालो .आणि मी
जेव्हा तेथे पोहोचलो तेव्हा माझ्या अगोदर बळी दादा नि क्रिश तेथे उपस्थित असल्याचे मला दिसले . मला पाहताच
यश दादा म्हणाला ," अमर ये बैस ! " मी बाजूलाच रिकामी असलेली खुर्ची जवळ ओढून घेत त्यावर बसलो. नि यश दादा कडे पाहत म्हणालो ," मला बोलविलेस तू दादा ?"
" हो .तुम्हां साऱ्या लोकांशी मला थोडीशी चर्चा करायची आहे. "
" कोणत्या संदर्भात ?" मी विचारले.
" टेंडर संदर्भात." यश दादा म्हणाला ," टेंडर आपल्याला
न मिळता धीरज ला मिळाले. त्या मागचे कारण काय ? "
" केवळ एक रुपयाचा फरक आहे ." मी म्हणालो.
" हा योगायोग तर असूच शकत नाही. जरुर आपल्या
ऑफिस मधून ही गोपनीय माहिती तिथं पर्यंत पोचवली गेलीय. याचा अर्थ आपल्या ऑफिस मधील कुणीतरी
व्यक्ती धीरज शी संपर्कात आहे. "
बळी दादा म्हणाला ," मला वाटते दादा ." आपले मत व्यक्त करत ,पुढे म्हणाला " हे काम जतीन शिवाय अन्य कुणाचे नाहीये." मी लगेच बळी दादा त्या बोलण्याला दुजोरा
देत म्हटले , " मी ही बळी दादांच्या मताशी सहमत आहे."
" असे कशावरून वाटते तुम्हाला ? " यश दादांनी विचारले."
" त्याच्या कळपातील गाय आमच्या कळपात आली आहे. ती काय उगाच आलेली नाहीये. आणि मला तर वाटत
ही धीरज ची एक चाल असावी."
" हां. मला ही असेच वाटतंय." क्रिश बोलला.
" यशदादा माझेही असेच मत आहे ." बळी म्हणाला.
" शक्यता नाकारता येत नाहीये. परंतु अजून कोणी असला तर त्याचा शोध घ्या. कारण जतीन आपला मेव्हणा आहे. बहिणीचा नवरा . त्याच्यावर अन्याय होता कामा नये."
" दादा मला वाटतं दुर्वाला यातले काहीच माहीत नसणार. मी म्हणालो.
" शक्यता आहे ." क्रिश बोलला.
" म्हणूनच ,तर म्हणतोय शोध घ्या. मग त्यावर कार्यवाही करता येईल."
" मी काय म्हणतो.' मध्येच क्रीश म्हणाला. तश्या सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. तेव्हा क्रिश पुढे म्हणाला ," ते चोर झालेच ना ? त्यांच्याकडे आपण मोर
होउ या . "
" ते कसे ?' यशदादांनें विचारले.
" त्यांना जिथे टेंडर मिळाला आहे. त्याच्या समोर
एक मोठा रिकामी प्लॅट पडला आहे. त्याला खरेदी कर."
" बरं पुढे ."
" तिथे एक छोटंसं ऑफिस बांधा. आणि फलक लावून
त्यावर असे लिहा की इथं अतिसुंदर कॉलनी बांधल्या जातील. आणि फ्लॅटची किंमत बाजार भावा पेक्षा निम्म्या किमतीत असतील .असे क्रिश सांगताच आम्ही त्याच्यावर गरम झालो . यशदादा तर त्याच्यावर चिडून म्हणाला ." काय ? वेडा आहेस का रे तू ? अर्ध्या किमतीत फ्लॅट विकल्यावर किती करोडो रुपयाचे नुकसान होईल आमचे. याची कल्पना तरी आहे का तुला ?"
" आहे ,म्हणूनच तर बोलतोय."
" तू कसे काय बोलतोयेस तेच कळत नाहीये मला ."
" आधी पुरते ऐकून तर घ्या. मग आपले विचार मांडा."
क्रिश बोलला.
" बरे सांग कसे शक्य आहे ?"
" दादा फक्त फक्त हवा निर्माण करायची आहे ."
" म्हणजे ?"
" फक्त जाहिरात करायची आहे . फ्लॅट बांधायला नाही सांगितलेत तुम्हाला."
" मला अजूनही नाही कळले ते." यश दादा म्हणाला.
" पण मला कळलय." मी म्हणालो.
" मग तू सांग बरं."
" अरे दादा, क्रिश म्हणतोय ते बरोबर आहे . फ्लॅट काय लगेच त्या जाग्यावर बांधले जात नाहीत. सर्व पेपर तयार होईपर्यंत सहा महिने निघून जातील. तोपर्यंत आपल्या दुश्मनांच्या पायाखालील वाळू सरकलीच समज. आणि मग ते स्वतः येथील आपल्याकडे तडजोड करायला. तेव्हा आपण त्यांच्याकडे अट ठेवायची."
" कोणती अट ?" मग मी यश दादांच्या कानात सांगितले की कसे काय करायचे ते ." तेव्हा यशदादा एकदम खुष होऊन क्रिश ची प्रशंसा करत म्हणाला ," यु आर ग्रेट क्रिश ! थँक्यू व्हेरी मच !
" वेलकम." क्रिश उत्तरला.
आम्हाला क्रिश ने सुचविलेली योजना एकदम पसंत पडली. आम्ही त्या योजनेप्रमाणेच काम करायचे ठरविले. मिळेल त्या किमतीत तो संपूर्ण प्लॅट खरेदी केला. क्रिश सांगितल्याप्रमाणे त्या जागी एक फलक लावून त्यावर जाहिरात लिहिली . हा हा म्हणता ही वार्ता धिरजच्या
कानावर पोहोचली. तसे त्याचे धाबे दणाणले आणि लवकरच आमच्याशी संपर्क साधण्याचा तो प्रयत्न करू लागला. परंतु आम्हीच त्याच्याशी संपर्क साधण्यास टाळाटाळ केली. तेव्हा
तो स्वतः च आम्हाला भेटायला आमच्या ऑफिस वर आला. आम्ही सारे कॉन्सफरन्स हॉलमध्ये उपस्थित होतो. जेव्हा तो गेटवर आला त्यावेळी सिक्युरिटी ऑफिसर ने आमच्याशी संपर्क साधला. तेव्हा मी सिक्युरिटी ऑफिसरला त्याच्या हातात फोन घ्यायला सांगितला. त्याने फोनवरून " हॅलो "
म्हणायच्या अगोदर मीच म्हटले , " मिस्टर धीरज आय ॲम बिझी नाउ यू हॅव टू वेट फॉर समटाईम.'
" आय कॅन यु आर नॉट बिझी , यु आर जस्ट वेस्टिंग माय टाईम !"
" ओके ओके ! कॅन यु कम विथ मी प्लिज गिव्ह फोन टू द सिक्युरिटी !" त्यांनी सिक्युरिटीच्या हातात फोन दिला. सेक्युरिटी जेव्हा " हॅलो " म्हटले . तेव्हा त्याला ऑफिसमध्ये पाठवण्याची परवानगी दिली . सिक्युरिटी ने व्हीसीटर पास बनवून त्याला आत सोडले . त्यांनी दरवाज्यावर नॉक करत विचारले ," मी आय कम इन सर ! "
" येस कम इन ! " त्यानर जसे आंत पाऊल टाकले. तसे त्याचे स्वागत करत म्हटले ," वेलकम टू माय ऑफिस डिअर ब्रदर्स "
" नो थँक्स !" असे असे बोलून तो तिथे असलेल्या रिकामी खुर्चीवर बसला . तेव्हा त्याला उद्देशून यशदादा म्हणाला ,
" बोल ,काय काम काढलेस आमच्याकडे ?"
" तू जो पोरकटपणा चालविला आहेस ना तो
प्रथम बंद कर."
" कसला पोरकटपणा केलाय मी ?" यश दादा ने चिडून
विचारले.
" आम्ही मिळविलेल्या टेंडर च्या समोरचा रिकामी प्लॅट खरेदी करून जो पोरकटपणा सुरू केला आहेस त्यासंबंधी बोलतोय मी." तेव्हा यश दादा एकदम निर्विकार चेहऱ्याने म्हणाला , " त्यात कसला आलाय पोरकटपणा ? जमीन आमची आहे . त्याचा आम्ही वाटेल तसा वापर करू तुला काय प्रॉब्लेम आहे ? " त्यावर तो म्हणाला ," मग जो बाजार भाव आहे त्या बाजार भावात फ्लॅट विक्रीला काढ."
" हे सांगणारा तू कोण ? जमीन आमची आहे. त्यावर फ्लॅट आम्ही बांधणार आहोत. आम्हाला परवडतील त्या भावाने आम्ही त्यांची विक्री करू. तुला काय करायचे आहे त्याच्याशी ?" मी म्हणालो.
" त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत."
" परिणामाची चिंता तू कारावीस. आम्हाला त्याची गरज नाहीये."
" तू हे मुद्दाम करतो आहेस. आमचे करोडो रुपये गुंतले आहेत या प्रोडेक्ट मध्ये ."
" आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाहीये. ज्याचे त्याने पाहावे. " त्यावर तो एकदम नरम पडला आणि नरमाईच्या सुरात म्हणाला ," यश दादा असे करू नकोस. आम्ही बरबाद
होऊ."
" त्यासाठी एक मार्ग आहे. "
" कोणता ?"
" तह करूया."
" म्हणजे ?"
" वाटाघाटी !"
" कसल्या वाटाघाटी ?"
तेव्हा यस दादा म्हणाला ," माझे म्हणणे सोपे नि सरळ आहे. परंतु समजून घेतले तर !" त्यावर धीरज बोलला ," सांग ऐकतो मी ."
" तू विकत घेतलेली केमिकल कंपनी आम्हाला द्यावी. आणि त्या बदल्यात आम्ही खरेदी केलेल्या प्लेट तुला देऊ.
आणि पूर्वी ठरलेला नियमाप्रमाणे एकमेकांचे व्यवसाय करायचे नाहीत. हे जर तुला मान्य असेल तरच हे व्यवहार होतील." तेव्हा धीरज म्हणाला ," नाही. कंपनी मिळणार नाही. प्लॅटच्या बदल्यात प्लेटच मिळेल."
" आणि आम्हाला हे मान्य नसेल तर ?" मी म्हणालो.
" मान्य नासायला काय झालं आम्ही जमिनीच्या बदल्यात जमीन देतोय ना तुम्हाला."
" अट ठेवायचा अधिकार केवळ आम्हाला आहे .आणि आमची अट तुझ्या समोर ठेवली आहे. मान्य असेल तर ठिकच आहे , नाहीतर रस्ता मोकळा आहे बाहेर जाण्याचा! खुशाल जाऊ शकतोस तू ."
" ही अडवणूक आहे ."
" नो . ओन्ली बिजनेस ! अर्थात तू काही समजत. आमच्यासाठी फक्त नि फक्त हा बिजनेस आहे."
" तरी पण ?" तेव्हा बळी दादा चिडून बोलला," तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ? "
" मी एकटा असलोय म्हणून तुम्ही सारे दबवू पाहताय."
धीरज तक्रारी स्वरात बोलला.
" मग सर्वाना घेऊन ये जा , मगच वाटाघाटी होतील." बळी दादा बोलला. तेव्हा आज प्रथमच भावाचे नाते लावत
बोलला," यशदादा तू काहीच बोलत नाहीस. हे दोघेच बोलताहेत मघापासून."
" माझे ही म्हणणे तेच असेल तर ?"
" मला विचार करावा लागेल थोडा."
" दिला . घरी जा. आणि सर्वांना नीट समजावून सांग. आणि इतरांचा विचार घे आणि मगच वाटाघाटी करायला ये. आम्हाला काही घाई नाही.
" हो तुझा तो हितचिंतक आहे ना , काय नाव त्याचे ते ?" आठवल्यागत करत म्हणाला ," हां. आठवलं. कल्याण अर्थात
तुझं कल्याण करणारा तोच आहे. तेव्हा त्याचा विचार आधी
घे. आणि मग वाटाघाटी करायला. काय ? जमेल ना ?" अमर
एकदम कुत्सितपणे बोलला. खरे तर राग आला होता. परंतु
आपल्या रागावर लगाम घालीत म्हणाला ,
" ठीक आहे विचार करून उत्तर देतो."
" अवश्य ." यश दादा बोलला. धीरज च्या चेहऱ्यावर भयंकर राग दिसत होता. परंतु त्याचा हात दगडाखाली सापडला होता. आणि आम्हाला त्याच संधीचा फायदा उचलायचा होता. त्याला आमचा करार मान्य भागच होते. कारण दुसरा उपायच नव्हता. अर्थात त्याच्या कुलपाची किल्ली आता आमच्या हातात होती. अर्थात त्याला आमच्या अटी मान्य केल्या शिवाय दुसरे गत्यंतर नव्हतंच त्याला. जसे की, मरता क्या नही करता ? या हिंदी म्हणीनुसार त्याला आमचे म्हणणे म्हणणे मान्य करणे भागच होते .तो जसा केबिन मधून बाहेर गेला. तसे आम्ही एकमेकांच्या हातावर हात मारून टाळी दिली . आणि आनंद व्यक्त केला. अखेर विजय आमचा होणार होता यात तिळमात्र शंका नाही.
कल्याण
आज मी धिरजला पाठविले आहे, यशराज जवळ . दोघां
मध्ये समेट घडवून आणण्यासाठी ! तसा यशराज समक्जदार
आहे. तो नक्की वैर विसरून धीरज ला माफ करील. कारण
वैर केल्याने नुकसान दोघांचे तितकेच होणार आहे.त्या पेक्षा
मधला मार्ग का स्वीकारू नये.भाऊ नको मानू स पण दोस्तीचा हात पुढे करूच शकतोस ना ? आगीदर तयार नव्हता. म्हणे मी त्यांच्या कडे जाणारच नाही." तेव्हा मी त्याला समजावले की तुझ्या साठी आता काय महत्वाचे आहे ? तुला जे टेंडर मिळाले आहे.ते पूर्ण करणे. आणि ते
तेव्हाच शक्य आहे. जेव्हा ते लोक आपली कॉलनी उभी
करणार नाहीत. नाहीतर ते तर बरबाद होतीलच. पण तू
सुध्दा आबाद राहणार नाही. तेव्हा विचार कर. कभी कभी
अपने मकसद के लिए अपमान भी सहना पड़े तो सहना जरूरी होता है! और वैसे भी वो लोग गैर थोड़े ही है तुम्हारे भाई तो है!"
" उन लोगोको भाई मत कहो मेरे.उनके साथ मेरा सिर्फ एक ही रिस्ता हो सकता है और वो है दुश्मनी का ! धीरज
खूप रागात होता. आणि त्यांच्याकडे जायला तयार नव्हता. पण मी त्याला समजावले की कधी माघार घेण्यातच
आपलं हित असते. ना , होय करत करत शेवटी तयार झाला.
आता तिथं जाऊन काय केलंय ते कुणास ठाऊक ?
एका बाजूला मित्र तर दुसऱ्या बाजूला माझे भाऊ होते.
भले माझ्या भावंडाना मी त्यांच्या मोठा भाऊ असल्याचे ठाऊक नाही. परंतु मला तर ठाऊक आहे ना ? ते माझे भाऊ
आहेत. मग मी कसा बरं भावा विरुध्द कट कारस्थान करणार ? जेव्हा माहीत नव्हते तेव्हाची गोष्ट वेगळी होती.
पण आता माहीत झाल्यावर ही तसेच केले तर आईला काय
वाटेल बरं ? " असा माझ्या मनात विचार सुरू असतानाच
धीरेन ने विचारले ," कल्याण दादा तुला काय वाटतं ? ते तयार
होतील ? आपण त्यांच्या समोर ठेवलेले प्रपोजल स्वीकार करायला ? " त्यावर मी म्हणालो ," हो . नक्की होतील. कारण त्याना सुध्दा ठाऊक आहे ,की त्यात भले कुणाचेच नाहीये. शिवाय ते समजदार आहेत." तसा धीरज नाराज
होत म्हणाला ," दादा,तुला असं तर नाही म्हणायचंय की आम्ही मूर्ख आहोत ."
" अस कुठं म्हटलं मी ?"
" पण अर्थ तोच होतो ना ?"
" कसा काय ?"
" ते समजदार याचा अर्थ आम्ही नासमज.होय ना ?"
" धीरेन तू शब्दार्थी अर्थ काढू नकोस. कधी कधी गाढवाला पण काका म्हणायचं असतं. कळलं.
ऑफिसमध्ये बसून आम्ही सर्वजण त्याचीच वाट पाहत
होतो. तो आला तो रागातच होता. आल्या आल्या माझयावरच चिडला. मला म्हणाला," हे सारं तुझ्यामुळे घडले." मी म्हटलं ," काय घडलं ते तर सांगशील ?
मग घडलेली हकीकत सांगितली. त्यावर मी हसून म्हणालो,
मग त्यात राग मानण्यासारखे काय आहे ? धीरज हा बिजनेस
आहे. आणि बिजनेस मध्ये अश्या गोष्टी घडतच असतात.
आणि मुख्य आपण त्यांच्याकडे गेलो होतो. अर्थात ते काय
आपले द्वारापाशी फुलांची माळा घेऊन आपले स्वागत करण्यासाठी उभे राहणार आहेत का ?"
" ते न कळण्या एवढं मी मूर्ख नाहीये."
" ठीक आहे. पण मला हे त्यांनी आपले प्रपोजल मान्य
केलं की नाही ?"
" केलं पण अट ठेवली."
" कोणती अट ?"
" हीच की ते आपल्याला प्लॅट देतील. नि त्या बदल्यात
आपण त्याना नवीन घेतलेली केमिकल कंपनी द्यायची ."
" हां .मग ठीक आहे ना ?"
" पण इतकेच नाही. अजून एक अट आहे त्यांची."
" कोणती ?"
" दोघांनी पण एकमेकांचा बिजनेस करायचा नाही."
" उत्तम ! "
" काय उत्तम ?"
" अरे ही तर अट सुरुवाती पासून आजोबांनी ठेवली होती
ना ?"
" हो. पण आम्ही ती मोडली होती."
" आता पुन्हा सुरू होऊ दे. म्हणजे आजोबांचा ही मान
राखल्या सारखा होईल ."
" तुला आजोबांच्या मानाचं पडलंय इथं माझा अपमान
झाला त्याचं काहीच नाही."
" अरे त्यात अपमान कसला ? वाटाघाटीच केल्यास ना ?"
" हो ; पण त्यांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागल्या.
निमूटपणे. तो अपमान नव्हे का ?"
" ह्याला अपमान नाही.बिजनेस म्हणतात. आणि बिजनेस
करायचा असेल. मानापमान घरीच सोडून यावा लागतो. कारण जिसके हाथ में लाठी होती है भैस भी उसीकी होती है धीरज। इस बात को समझो । तो सबकुछ समझ में आ जायेगा .
" मान्य आहे मला. एक्का त्यांच्या हातात होता.
अर्थात बाजी त्यांच्या हातात च असणार ना ?"
" हं ! आता समजलास." दोघेही एकमेकांना आलिंगन देतात.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा