Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र-४४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

कुरुक्षेत्र-४४
कुरुक्षेत्र-४४



     पाहू काय निष्पन्न होतंय ते. असे मी व्यक्तीशः म्हटले.
तेवढ्यात तिथे अमर येताना मला दिसला. मी अमर ला
म्हटले की , तुझी झाली का तयारी ?"
     " हो ."
     " मग चल . निघायला हवे आहे."
     " बळी दादा कुठे आहे ?"
     " येतोय. कपडे बदली करतोय."
      " अरे कपडे कशाला बदली करायला हवे आहेत ? आपण कंपनीत थोडेच चाललोय ?"
      " पण दादा आजोबांनी आपल्याला तिथे कशाला बोलविले आहे ?"
      " ते तिथे गेल्यानंतरच कळेल. परंतु मला असे वाटतंय की आजोबांनी आपसातील वैर संपविण्याबाबत काहीतरी
काहीतरी मार्ग निश्चितच काढला असावा."
    " मी एक विचारु दादा ?"
    " अवश्य ."
    " आजोबांनी आपल्याला धीरज बरोबर असलेली दुश्मनी
विसरायला सांगितले तर ?"
    " त्याहून सुंदर ते काय असावे ? " यश
    " माझा पण तोच विचार आहे." अमर ने दुजोरा दिला.
    " पण माझा विचार तसा बिल्कुल नाहीये .तेवढ्यात तेथे आलेल्या बळीने त्यांचे संभाषण ऐकून म्हटले होते . मी आणि दादा दादा दोघेही चमकून त्याच्याकडे पाहिले. पुढे यश दादाने त्याला विचारले ," बळी तू असं बोलतोस हे ?"
     " हां दादा मी बोलतोय .  पण का ते नाही विचारलेस ?"
     " मग  आता विचारतो. सांग बरं का ते ?"
     " अरे दादा, आम्ही कितीही वैर संपायला तयार असलो तरी  धीरज तयार होणार नाही."
     "  होईल तयार . आजोबांनी हा निर्णय घेतलाय तर तो पूर्ण विचारा अंतीच घेतला असेल ना ? "
     " भले आजोबांनी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला असेल परंतु ते समजण्याची पात्रता तर त्याच्या अंगी असायला पाहीजेल ना ? "
    " हां  हे बाकी बरोबर . मी तुझ्या मताशी सहमत आहे."
अमर बोलला.
     " बरं बरं आपण तेथे जाऊ  नि आजोबांनी सुचविलेल्या उपायांवर त्याची काय प्रतिक्रिया आहे ते पाहू आणि त्यानंतर आपण  पुढील  निर्णय घेऊ. कसे ? " त्यावर अमर ने होकारार्थी मान डोलावली. परंतु बळीराज ने काहीच प्रतिक्रिया दिली नाही म्हणून मी त्याला म्हणालो ,"  बळी मी
तुला काय ते ऐक. तू आजोबांच्या वक्तव्याला अजिबात काही बोलू नकोस .कारण    आपल्याकडून त्यांचा अजिबात अनादर  होता कामा नये. कळले. " आम्ही दोघांनी आपल्या माना हलवून " हो " म्हटले. आम्ही निघालो होतो. तेवढ्यात तेथे आई आली नि आमच्याकडे पाहत म्हणाली,
    "  तिथे जाताय तर असभ्यपणाचे  वर्तन तुम्हां तिघांपैकी कोणाकडूनही होता कामा नये. आजोबा  काय सांगताहेत यावर नीट विचार करा आणि आपल्या काकांचा ही अपमान करू नका. कळले. लक्षात राहील ना ?."
      " हो ; आई !"  आम्ही तिघांनी ही एकदम म्हटले. एवढे बोलून आम्ही निघालो आणि जेव्हा आम्ही काकांच्या घरी पोहोचलो. तेव्हा सर्वजण आमचीच वाट पाहत असल्याचे मला जाणवले.  त्याचबरोबर आपल्याला यायला उशीर झाला हेही जाणवले. तसे मी दोन्ही हात जोडून म्हटले ," यायला उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी. माझा नम्र पणा पाहून आजोबा म्हणाले , "  काही हरकत नाही या आंत आणि बसून घ्या.  प्रथम मी  आजोबांचे चरणस्पर्श केले. त्यांनी मल दीर्घायुष्य व्हा आणि यशस्वी व्हा ! " असे आशिर्वाद दिला. त्यानंतर काकांच्या म्हणजे मोठ्या बाबांच्या पाया पडलो. तेव्हा त्यांनी फक्त आयुष्यमान व्हा !" असा आशिर्वाद दिला. त्यानंतर आम्ही मोठ्या आईच्या पाया पडलो. तेव्हा त्यांनी मात्र मला दिर्धायुष्य चा आशिर्वाद दिला.  आणि यशस्वी व्हा ! म्हणाली. त्यानंतर माझे अनुकरण अमर ने आणि बळी ने केले. त्यानंतर  आम्ही सर्वांनी  बसून घेतले. तेव्हा  आजोबांनी बोलायला सुरुवात केली .ते म्हणाले ," आज आपण येथे का जमलो आहोत याची सर्वांना कल्पना असेलच. परंतु तरीदेखील मी पुन्हा सांगत आहे त्याकडे नीट लक्ष देऊन ऐका आणि त्यावर नीट विचार करून उत्तर द्याल. अशी मी सर्वांकडून  अपेक्षा करतो. " एवढे बोलून क्षणभर  आजोबा थांबले नि सर्वांकडे नजर फिरवून पुढे म्हणाले ," आतापर्यंत जे काही घडले. ते एक  वाईट स्वप्न समजून साऱ्यांनी विसरायचे आहे आणि यापुढे सर्वांनी सामोपचाराने आणि गोडीगुलाबी राहायचे आहे . कुणी कुणाशी वैर अजिबात करायचे नाहीये आणि धीरज तू जी केमिकल कंपनी  सुरू करू इच्छितोयस ती सुरू करू नकोस.  कारण  अगोदरच ठराव झालेला आहे की दोघांनी एकमेकांचे व्यवसाय  नाहीयेत म्हणून. मग तू हा नियम मोडलास कसा ?" असे बोलून पुन्हा एकवार सर्वत्र नजर टाकत विचारणा केली की,  कुणाला या विचारायचे आहे का काही ?"  पण  कोणीच काही बोलत नाही. मात्र धीरज उठून उभा राहत म्हणाला ," मला बोलायचे आहे." आजोबा उद्गारले ," बोल. आज्ञा आहे."  आजोबा म्हणाले .
      " मी यांच्याशी समेट कधीच करणार नाहीये. काय वाट्टेल ते  झाले तरी ही !  आणि आता राहिला केमिकल कंपनी
सुरू करण्याचा तर ऐका. मी तुमच्या कोणत्याही नियमाचे पालन करणार नाही. तेव्हा कंपनी सुरू होणारच."  असे बोलून तो तेथून जाऊ लागतो. तसे आजोबा  त्याला ओरडत म्हणाले , " निघालास  कुठे ? मीटिंग अजून संपलेली नाहीये." त्यावर तो म्हणाला ,"  मला त्यात अजिबात रस नाहीये."
       असे बोलून तो न थांबता तिथून निघून गेला. त्याच्या पाठोपाठ धीरेन पण निघून गेला. तसे आजोबा मोठ्या बाबांना उद्देशून म्हणाले,"  अरे , धुर्तराज पाहतोस काय ?  थांबव तुझ्या मुलाला ." तेव्हा मोठे बाबा म्हणाले ," बाबा तो ऐकणार नाहीये . त्याचा नाद सोडा ." तेव्हा एकदम चिडून म्हणाले ,"  अरे मूर्ख माणसा ! एवढे झाले तरी डोळे  उघडत  नाही तुझे. पुत्र मोहात एवढा पडला आहेस की तुला चांगले काय वाईट काय यातला फरक ही जाणवत नाही काय ? " त्यावर मोठे बाबा काहीच बोलले नाहीत. तसे आजोबा पुढे म्हणाले,"  शुंभ जळला तरी त्याचा पीळ जात  नाही.  विनाश कालीन  विपरीत बुद्धि !"असे बोलून हताशपणे खाली सोफ्यावर बसतात. तसे मी यशदादाला खूणविले आणि खुणेनेच यशदादाला सांगितले की , आपला काय आदेश आहे  ,आमच्यासाठी ?"
      परंतु  आजोबांनी आम्हाला काहीच उत्तर न देता हताशपणे हातानेच खुणा करून सांगितले की तुम्ही जा आता आणि आम्ही निमूटपणे उठलो नि पुन्हा आजोबांचे चरणस्पर्श केले. यावेळी हात उंचावून आशीर्वाद दिला. परंतु तोंडाने ते काहीच बोलले नाहीत. आम्ही समजलो की त्यांना फार दुःख झाले आहे म्हणून  ते बोलत नाहीयेत. आम्ही देखील काही न बोलता तेथून निघून गेलो.

    घरी येताच  आईने  मला विचारले ," काय रे  सर्व व्यवस्थित पार पडले ना ? " आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. काय बोलावे ते सुचेना. पण आई  समजली.
ती  म्हणाली ," बोलणी फिस्कटली ना ?" तेव्हा यशदादा ने थोडक्यात घडलेली सारी हकीकत सांगितली. तेव्हा आई म्हणाली,"  बिच्चाऱ्या बाबांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना न केलेली बरी. ती पण  या वयात ? " तेव्हा बळी दादा म्हणाला ," आई मला अगोदरच माहीत होते तिथे काहीच नवीन निष्पन्न होणार नाहीये."
     " आजोबांचे सर्व प्रयत्न वाया गेले." मी म्हणालो. तेव्हा
अमर  म्हणाला ," जोपर्यंत त्याच्या सोबत तो कल्याण  आहे तोपर्यंत शहानपणासाच्या गोष्टी  त्याला रुचणार नाहीत. " त्यावर आई बोलली ," तो पण होता का तिकडे ?"
     " नाही ."  मी म्हणालो . तेव्हा  आई म्हणाली ," त्या बिच्चाराला कशाला  दोष देता तुम्ही ? त्याने काय केलंय
तुमचं ?"
     " अगं आई  तुला नाही माहीत. धीरज त्याच्या जीवावर
उड्या मारतोय. नाहीतर त्याची काय हिंम्मत झाली असती
आमच्या शी सामना करण्याची !"
    " ठीक आहे. कल्याण त्याची मदत करतोय. पण एक
मित्र या नात्याने करतोय. नाहीतर त्याच्या काय बरं स्वार्थ आहे त्यात ?" त्यावर आम्ही आई शी हुज्जत न घालता
गप्प राहीलो. परंतु  उगाचच असं का वाटते की आईचं  त्याच्याशी  काय बरं नाते आहे ? का त्याच्या पक्ष नेहमीच
घेत असते. का ?  ते कळत नाहीये .

     त्यानंतर काही दिवस शांत वातावरण होते . त्यामुळे असे वाटले की धीरज सुधारला असावा. आजोबांचे  बोलणे त्याने मनावर घेतले असावे . सुधारला तर त्यासाठी नि  आमच्यासाठी दुग्धशर्करा योग आहे . असे म्हणायला हरकत
नाही. असे मी व्यक्तीश: म्हणालो . सुमन प्रसूत झाली. तिला
पुत्र रत्नाचा लाभ  झाला. त्याचा नामकरण विधी मोठ्या थाटामाटात पार पडला. मोठे बाबांच्या घरची सर्व मंडळी आली होती बारशाला. फक्त धीरज आणि धीरेन उपस्थित नव्हते. सर्वांनी तोंड भरून आशीर्वाद दिला नवजात शिशुला. मुलाचे नाव अभिषेक ठेवण्यात आले. त्याच दिवशी नवीन बातमी मिळाली . ती म्हणजे कल्पना वहिनी हर्षदा वहिनी या दोघीना ही पुन्हा दिवस गेले होते. घरात नवं चैतन्य संचारले होते. तिकडे धीरज आणि धीरेन च्या ही पत्नींना दिवस गेले होते . आमची अपघातात गेलेली मुलं पुन्हा देवाने वापस
दिली. असंच वाटत होतं साऱ्यांना. मात्र एकाच गोष्टीचे दुःख होते  आणि  ते म्हणजे विलाच्या पत्नीची कुश रिकामीच  राहणार होती. दैवाने तिच्याबरोबर वाईट खेळ खेळला होता. देव चांगल्या माणसांनाच दुःख का  देतो ? ते मात्र न कळण्या सारखे  कोडेच होते.

      धीरज  पुन्हा दुर्बुद्धी सुचली का ते देव जाणे ! त्याने परत
कारस्थान रचायला सुरुवात केली. त्याने आजोबांनी दोन  परिवाराच्या मध्ये बनविलेला नियम मोडला.  केमिकल कंपनीचे स्थगित केलेले काम पुन्हा सुरू केले . आता आम्हालाही त्याचा व्यवसाय केल्यावाचून दुसरा पर्याय उरला नव्हता. निदान त्याने  आपला विचार बदलावा. यासाठी तसे करणे जरुरीचे होते . मी यश दादाशी आणि बळी दादाशी या संदर्भात विचार विनिमय केला. मी सर्वांच्या विचारानुसार आम्ही देखील तशी पावले उचलली सरकारी टेंडर आम्ही देखील भरले.

                             धीरज

     " त्याचा तुला कळले काही धीरेन माझ्या केबिनमध्ये येत म्हणाला. तेव्हा मी न समजून त्याला विचारले ," कशाबद्दल
बोलतो आहेस तू ?"
     " अमर ने पण आपला व्यवसाय सुरू केला. आणि त्यांनी
पण  सरकारी टेंडर भरले आहे.
     " भरू दे. आपण त्याला धडा शिकवू . तू एक काम कर.
जतीन ला  माझ्या केबिन मध्ये पाठव. "
     " बरं. पाठवितो." असे म्हणून तो गेला आणि थोड्या वेळाने जतीन माझ्या केबिन मध्ये आला. तो आत येताच मी त्याला बसायची खुण केली.तो बसताच मी त्याला सांगितले
की जतीन तू आता घरी जा नि दुर्वाला सांग की  मी तुला कामावरून काढून टाकले म्हणून. "तो माझ्याकडे गोंधळलेल्या अवस्थेत पाहता होता. तसा मी पुढे म्हणालो," मनाचा गोंधळ उडाला ना ? तो उडणारच ! गोष्टच तशी आहे. पण ती करणे फार जरुरीचे आहे. "
      " का ?"  त्याने मला विचारले. मग मी त्याला त्याच्या कानात सांगितले . तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. एका दगडात दोन पक्षी मारायचे आहेत मला. तुझ्या  अपमानाचा सूड उगवता येईल आणि आमचे काम बिनबोभाट होईल."
     "  पण तो  मला ठेवील का कामावर ?"
     "  अर्थात. दुर्वाला ते तिघे आपली बहीण मानतात. अर्थात तिच्यासाठी ते काहीही करायला तयार होतील.  मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. दुर्वाला याची चाहूल लागता कामा नये .त्याने होकारार्थी मान डोलावली. आणि तो तिथून निघून गेला.

       दुसऱ्या दिवशी त्याने मला खुशखबर दिली की तुझी योजना यशस्वी झाली म्हणून. तो मला म्हणाला की अमर ने
माझी कसली ही चौकशी न करता  लगेच कामावर ठेवून घेतले आणि काम ही माझ्यावर तेच सोपविले.  ज्याची आपण अपेक्षा केली होती. " तेव्हा   मी त्याला म्हणालो ," तू यापुढे ऑफिस मध्ये येत जाऊ नकोस. नाहीतर त्यांना तुझा संशय येईल. तू फक्त टेंडर बद्दलची गोपनीय माहिती आम्हाला पुरवीत जा.  तुझे घर  मी नोटांनी भरतो. "
     " मग मी निघू आता."
     "  हो . निघ. नाहीतर तुला  इथे आल्याचे कोणी पाहिले तर सारा घोटाळा होईल. जतीन  उठला तिथून निघून गेला.

      आणि  जतीन ने आम्हाला त्यांच्या टेंडर ची पूर्ण माहिती पुरविली आणि आम्ही त्या त्यांच्या पेक्षा एक रुपयाने कमी किंमत भरली आणि  टेंडर आम्हाला मिळाले. कल्याण ने माझे अभिनंदन केले. परंतु त्याच्या चेहऱ्यावर पाहिजे तितका आनंद मात्र दिसला नाही. काय कारण  असावे ? ते मात्र समजले नाही आणि मीही त्याला त्याचे कारण विचारले नाही. माझी प्रथमच जीत झाली. यश अमर वर  मी मात केली.  पराभव केला होता मी आज  त्या निमित्ताने मी आज जंगी पार्टी ठेवली होती.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..