कुरुक्षेत्र -४३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र -४३ |
" काय ?" मी जवळ जवळ किंचाळलोच. मला भोवळ यायची तेवढीच शिल्लक राहिली होती. तरी पण मी हिंम्मत करून त्याला विचारले ," विलास आणि मुलं कुठे आहेत? म्हणजे सुखरुप तर आहेत ना ? " त्यावर फोन करणारी व्यक्ती अडखळत म्हणाली ," स..स..र ते त्या - च इमारतीत गेले होते. कसेबसे एवढेच तो म्हणाला. मी समजलो की काय झाले असेल ते. माझ्या नजरेसमोर अंधार दाटला. मला पुढील काहीच दिसेना . माझ्या तोंडातून " नाही " अशी जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि माझ्या हातातून रिसिव्हर आपोआप गळून खाली पडला. क्षणभर मला वाटलं माझे शरीर प्राणहीन झाले की काय ? माझी अवस्था अशी झालेली पाहून माझ्यासमोर बसलेल्या तिघांच्याही चेहर्यावर एक अनामिक भीतीची छाया उमटली . कल्याण लगेच माझ्या हातातून गळून पडलेला रिसिव्हर उचलून " हॅलो " म्हटले .परंतु तोपर्यंत समोरून फोन कट झाला होता .फोन कुठून आला होता आणि फोन वरून काय खबर आली होती याची त्यांना काहीच कल्पना येईना ; पण क्षणभरच. त्यांनी त्या साईटवर फोन केला. पण तिकडून ही फोन कुणी उचलेना. तेव्हा माझ्या खांद्याला पकडून गदागदा हलवत कल्याण बोलला ," धीरज अरे काय झाले ते आम्हाला पण सांग ना ." तेव्हा कुठे मी भानावर आलो आणि फक्त " अं ss " म्हटले.
" अरे काय झाले , ते बोल ना."
" संपले सारे ! " आणि माझ्या डोळ्यातून झरझर अश्रूधारा वाहू लागल्या होत्या. आम्ही सर्व साइटवर पोहोचलो . इमारत खाली अनेक कामगार गाडले गेले होते. त्यात माझा भाऊ आणि आम्हा तिघां भावांची मुलेही सापडली होती . मदतकार्य सुरू झाले होते. माती खाली गाडले गेलेले कर्मचारी त्यांचे मृतदेह बाहेर काढले जात होते .जखमी लोकांना इस्पितळात पोहोचविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचले .त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला . मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. आम्हा तिघांनाही पोलिसांनी अटक केली ; परंतु आम्ही अटकपूर्व जामीन मिळविला होता. त्यामुळे आमची सुटका झाली. आम्ही सारे आपला श्वास रोखून होतो. कारण आमच्या मुलांचे शेव अजून सापडले नव्हते .म्हणुन मनातून ईश्वराचा धावा सुरू होता. आमच्या मुलांचे आणि भावाचे रक्षण कर अशी मी देवाजवळ विनवणी करत होतो. परंतु व्हायचे ते झाले. त्या तिघांचेही मृतदेह मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले . शेवटी भावाचाही मृतदेह सापडला . मी त्यां चारांच्या ही मृतदेहाकडे अचल पुतळ्या प्रमाणे फक्त पाहतच उभा राहिलो. जणु काही माझ्या शरीरातील रक्त गोठले असावे. कल्याणचा हात माझ्या खांद्यावर पडताच मी भानावर आलो आणि ओक्साबोक्शी रडू लागलो होतो.
आमचे संपूर्ण कुटुंब शोक सागरात डुबले. १३ दिवस आम्ही घरातून बाहेर पडलो नाही. दूरचे नातेवाईक आमचे
सांत्वन करायला येत होते. तसेच आमचे चुलत भाऊ काकी आमच्या दुःखात सामील झाले ; परंतु मला तर ते सारे नाटकच वाटत होते. त्यांना दु:ख होण्या ऐवजी आनंदच झाला असावा. पत्रकार लोकांनी तर आम्हाला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले होते . त्यांच्या विचित्र प्रश्नाना उत्तर देता- देता आमचे नाकी- नऊ आले होते. मी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक एक लाख रुपये देण्याचे कबुक केले होते . जखमींना त्यांच्या रुग्णालयातील संपूर्ण खर्च देण्याचे कबूल केले. तरी पत्रकारांचे समाधान होईना. त्यातील एक जण म्हणाला," मिस्टर धीरज ह्या संपूर्ण हत्याकांडाला जबाबदार कोण ? " त्यावर मी म्हणालो,
" तपास कार्य सुरू आहे .लवकर दोषी व्यक्तींना पकण्यात येईल आणि त्यांच्या वर योग्य ती कार्यवाही होईल. तेव्हा तो कुत्सितपणे म्हणाला ," तुम्ही काय स्वतःला साव समजता.?"
" म्हणजे ? "
" अहो , मागील महिन्यात तुमच्या चुलत बंधूंच्या मुलांचे
अपहरण ही झाले आणि त्याना जीवानिशी ठार मारण्यात आले. पण त्या साऱ्या घडनेला तुम्ही जबाबदार होता. हो
की नाही ?" मी रागाने चिडून त्यांच्या अंगावर धावून जात म्हणालो ," काय पुरावा आहे तुमच्याजवळ ?" कल्याण ने
मला जर पकडून ठेवले नसते तर त्या पत्रकाराची मी
गचण्डिच पकडली असती. परंतु कल्याण मुळे तो अनर्थ होता होता राहिला. परंतु तो पत्रकार अजिबात विचलित न होत निर्भयपणे म्हणाला," मिस्टर धीरज पुरावा हवा ना तुम्हाला , तो लवकरच मिळेल तुम्हाला. पण एक लक्षात ठेवा. मांजर जरी आपले डोळे झाकून दुध पीत असलीे तरी जगाचे डोळे झाकलेले नसतात. सत्य जरी किती ही झाकून
ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकले जात नाही. केव्हा ना केव्हा उघडकीस येतेच ते. तुमच्या पापाचे घडे भरलेत आता." तेव्हा खरं सांगायचं तर माझ्या माझ्या तळ पायाची आग मस्तकाला जाऊन भिडली होती. त्या फाजील पत्रकाराचे काय करू नि काय नको असे झाले होते. परंतु
कल्याण ने मला घट्ट पकडून ठेवले होते. म्हणून मी त्याचे काहीच बिघडवू शकलो नाही . कल्याण त्याला " नो कमेंट " असे बोलून त्यांची बोळवण केली होती . परंतु जाता जाता तो म्हणालाच की , अहो , तुमच्यासारखे धनिक लोक पैशाने न्याय विकत घेतात नि मरतात मात्र गरीब लोक. पण हे फार दिवस चालणार नाहीये . " त्यावर मी चिडून म्हणलो ," आता बऱ्या बोलाने जातोस का इथून ."
" याचे परिणाम चांगले होणार नाहीत मि.धीरज घोरपडे. असे तो जाता जाता म्हणालाच. पण मी मात्र हतबल होऊन तसाच उभा राहिलो .
बिल्डिंग बांधण्यासाठी वापरत असलेल्या मालाची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा पुढील सत्य समोर आले की हलक्या दर्जाचे सिमेंट आणि त्यात वाळूचे प्रमाण जास्त वापरल्यामुळे इमारतीचे बांधकाम एकदम कच्या दर्जाचे झाले. त्यामुळेच इमारत कोसळली. असे निष्पन्न झाले . दोषी व्यक्तीवर खटले भरण्यात आले. परंतु खरा अपराधी अद्याप सापडलाच नव्हता. तपास कार्य सुरू होते.
इंजिनिअर ला बोलावून विचारणा केली असता , त्याने कंत्राटदाराचे नाव सांगितले . परंतु कंत्राटदार स्वतःच मातीच्या ढिगाऱ्या सापडून मृत्युमुखी पडला होता .त्यामुळे खरा अपराधी कोण आहे हे कळू शकले नाही. परंतु माझा संपूर्ण संशय माझ्या चुलत भावावरच होता . परंतु त्यांच्याविरुद्ध आमच्याजवळ कोणता ही पुरावा नसल्याने
आम्हाला गप्प बसणे भाग होते . पण राहून राहून माझा संशय त्यांच्यावर जात होता. कल्याण चे म्हणणे होते की हा देवाचा प्रकोप होता . आपण त्यांच्या मुलांना मारले, म्हणून त्यांनी आपल्या मुलांना मारले. परंतु मला हे पटले नव्हते.
इमारत कोसळल्याने आमच्या धंद्यावर फार वाईट परिणाम झाला. मार्केटमध्ये आमच्या कंपनीचे नाव खराब झाले. कुणी हीे गिऱ्हाईक आमचे फ्लॅट घायला तयार होईना. पूर्ण धंदा उदध्वस्त झाला होता. पुन्हा धंदा सावरायला काही तरी नवीन मार्ग नवीन व्यवसाय सुरु करायला पाहिजे होता. पण कोणता व्यवसाय करावा यावर चर्चा सुरू होती. आणि शनी मामाने एक चांगला उपाय सुचविला. त्यांचे म्हणणे असे होते की , दुश्मन ला शह द्यायचा असेल तर त्याच्या व्यवसाय करावा . म्हणजे काट्याने काटा काढता येईल. तेव्हा मी त्यांना विचारले ," ते कसे ?" त्यावर ते म्हणाले , " हे बघ त्यांचा व्यवसाय करून त्यांच्यावर मात
करावी. म्हणजे त्यांच्या कंपनीचे शेअर्स जास्तीत जास्त खरेदी करून त्यांच्या कंपनीला टेकवर करावे. अर्थात त्यांची कंपनी आपल्याला सहजता हस्तगत करता येईल. असे बोलून त्यांनी आपली योजना आम्हाला नीट समजावून सांगितली . मी ती अमलात आणायची ठरविली. परंतु कल्याणचा मात्र त्या गोष्टीला विरोध होता. त्याचे म्हणणे होते
की आजोबांनी अगोदरच एक अट ठेवली आहे की दोघां भावांनी पण एकमेकांचा व्यवसाय करायचा नाही. मग हा
व्यवसाय केला तर त्यांची अट आपण मोडल्याची आरोप
नाही होणार का ? शिवाय ते लोक सुध्दा आपला व्यवसाय
करणार नाहीत हे कशावरून ?" त्यावर धीरज बोलला, " खुशाल करू देत. त्याना आपला बिझनेस. पण आता माघार
नाही. मग कल्याण गप्प बसला. मला ही योजना एकदम पसंत पडली होती. यश , अमर ला एकदम भुईसपाट करणे याहुन अन्य मार्ग नव्हता.
आजोबांनी आज सर्वानाच थांबायला सांगितले आहे. आणि आमच्या वैऱ्यांना देखील आमंत्रण दिले होते. त्यांचा हेतू आम्हां दोघांत समेट घडवून आणावयाचा होता. परंतु ते शक्य नाहीये . मी त्यांना कधीच आपले मानणार नाही. ते आमचे अगोदर पासूनच वैरी आहेत आणि कायम वैरीच राहणार. त्यांच्याशी मित्रता कदापि शक्य नाहीये. एका म्यानात दोन तलवारी कधी राहिल्या आहेत का ? ते आता राहतील. उगाचच आजोबांचा खटाटोप सुरू आहे. करींनात बापडे. आपल्याला काय त्याचे ? मी स्वतःशीच बोलून स्मित हास्य केले.
यशराज
विलास आणि त्या तीन मुलांचा अपघाती झालेला मृत्यूने आमचेही मन हेलावून गेले . आम्ही स्वप्नातही अशी अपेक्षा केली नव्हती. की अजाण बालकांचा वाईट व्हावे .भले आमच्या मुलांच्या मृत्यू ला धीरज जबाबदार होता. परंतु आम्ही मात्र कधीही त्यांच्या विषयी वाईट भावना मनात आणली नाही . परंतु देवाच्या दरबारी न्याय असतो . अन्याय नाही. बापाने केलेल्या कर्माची फळे मूलांना भोगावी लागतात. हे जरी खरे असले तरीही अजाण बालकांना त्याची शिक्षा मिळू नये. पण म्हणतात ना की इथंच करा नि इथंच फेडा. ते यालाच . कारण परमेश्वराचा न्याय फार वेगळा असतो. तो कधी कुणाला आणि कोणत्या प्रकारची शिक्षा देईल याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. पण
धीरज सारख्या माथेफिरू ला त्याचे काहीच सोयरसुतक नाहीये. तो पुन्हा कट कारस्थान रचण्यात मग्न झाला झालाय. त्याने आता आजोबांनी बनविलेल्या नियमाचे उल्लंघन करायला सुरुवात केली आहे . त्याने आता एका केमिकल कंपनीचे निर्माण करायचे काम हाती घेतले आहे. त्यासाठीच
की काय आज आजोबांनी मीटिंग घ्यायची ठरविली आहे. आम्हालाही तिथे बोलविले आहे म्हणा. दोन्ही परिवारातील
वैर कायमचे नष्ट करण्यात व्हावे. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू
आहेत. खूपच चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला तर वैर नकोच आहे. त्यामुळे आम्ही कधीही समेट करायला तयार आहोत. मात्र त्यांनी सुध्दा तशी तयारी दर्शविली पाहिजे. दोन्ही परिवार पुन्हा एक होत असतील तर याहून सुंदर
ते काय असावे ? परंतु धीरज तयार होईल का ? वैर विसरायला ? कदापि नाही हेच उत्तर असेल त्याचे.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा