Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र -४२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी.

कुरुक्षेत्र -४२
कुरुक्षेत्र -४२

 


       " होय बाळ." मी म्हणाले ," तू आपल्या लहान भावंडा सोबत राहायला ये."
     " नाही आई, मी च्या निपुत्रिक आई-वडिलांना सोडून देऊ शकत नाहीये."
      "  का बरं ?"
      "  आई , तुझ्या जवळ माझ्या व्यतिरिक्त अजून तीन मुले आहेत. परंतु  त्या दांपत्या जवळ माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नाही . त्यांना दोन मुलं झाली होती पण ती जगली नाहीत. शिवाय ते माझे पालन कर्ते  आहेत. त्यांना अशा अवस्थेत सोडून आलो तर उद्या माझ्यासारख्या अनाथ  बालकांचा सांभाळ करायला कुणीही तयार होणार नाहीये. शिवाय ती कृतज्ञता होईल. तुझी अशी इच्छा आहे का ? की उद्या तुझ्या मुलाला बेईमान म्हणून साऱ्या जगाने ओळखावे."  
   " नाही बाळ. मी अशी कधीही अपेक्षा करणार नाही तुझ्याकडून ."
      " मग मी जिथे आहे तिथेच राहू दे मला. आता तेच माझे माता पिता आणि तेच माझे घर आहे कायमचे ."
      " धन्य आहेस. तू आज मी धन्य झाले तुझ्यासारखा कर्तव्यनिष्ठ मुलाला जन्म देऊन ."
      " एक काम करशील माझ्यासाठी!"
      "  काय करू मी तू माझी आई आहे आणि मी तुझा हे तुझ्या माझ्या व्यतिरिक्त कोणालाही करता कामा नाही तुझी बदनामी होईल मी बदनामीला घाबरत नाही बाळा तुझी इच्छा तशीच असेल तर मग नाही मी सांगणार कुणाला परंतु तुझ्या माझ्या व्यतिरिक्त अजून काही माणसांना माहिती आहे. त्यात तुझे आजोबा पण आले."
       " आणि माझ्या लहान भावंडांना ?"
       "  नाही . त्यांना अद्याप काही ठाऊक नाहीये."
       "  मग त्यांना माहिती पडू देऊ नकोस."
       " का बरं ?"
        " त्यांना गिल्टी फिल्ट  होईल. की आपण आपल्या थोरल्या भावांशी असभ्य पणाचे वर्तन केले  याबद्दल ."
       " बरं  नाही सांगत अजून देखील माझे एक काम करशील ?"
       " आज्ञा कर आई. "
       "  तू फक्त धीरज शी तुझी  असलेली  संगत तू सोड."
       "  नाही आई , तो माझा जिवलग मित्र आहे. शिवाय माझ्या बिकट प्रसंगी त्यानेच प्रथम  माझी मदत केली आहे. त्याने  माझ्यावर केलेले उपकार मी कसे विसरु ? शिवाय उद्या तुझ्या मुलाला स्वार्थी म्हणून कोणी म्हटले तर चालेल का तुला ? उपकार विसरा व्हायचे नाही मला आई ."
      " ठीक आहे . बाळा तू त्याची साथ नको सोडू . परंतु तुझ्या भावांची  तो वैरत्व करतोय त्याच्यापासून तरी त्याला परावृत्त कर तेवढे  केलेस तरी पुरे आहे मला."
     "  आई काही लोक जन्मताच अवघून  घेऊन जन्म घेतात. धीरज पण त्यातलाच एक आहे . त्यात बदल होणे शक्य नाही ; परंतु त्याच्या कोणत्याही कुटील कटात मी सामील होणार नाहीये . आणि मी जिवंत असेपर्यंत तुझ्या कोणत्याही मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाही . याची हमी मी देतो तुला . "
      " बस बाळ एवढेच हवंय मला. तुझ्याकडून."
तेव्हा त्याने माझे चरणस्पर्श केले . मी  त्याला आशीर्वाद दिला .आणि त्याचे माथे चुंबत म्हटले ," यशवंत हो ! कुलवंत हो ! आणि आम्ही दोघं तिथुन बाहेर पडलो.


कल्याण


मी घरी परतलो होतो ; परंतु माझे मन बेचैन झाले होते .मी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य ? मी माझ्या आई आणि भावंडांना सोडून येथे राहण्याचा निर्णय घेतला. तो अयोग्य तर नाही ना ? अयोग्य कसा असेल ? आज पर्यंत ज्यांनी माझे लालन- पालन केले .त्यांचे उपकार माझ्यावर फार आहेत. नाही का ? ऋणी आहे  मी  त्यांचा. मी त्यांच्या उपकाराचे ऋण ह्या  जन्मातच काय पुढचे सात जन्म जरी घेतले तरी त्यांचे ऋण फिरणार नाहीत.कारण  त्यांनी जर त्यावेळी  मला कचरा कुंडीतून उचलून घरी आणले नसते तर
आज मी या जगात जिवंत नसतो. कारण  कचरा कुंडीत खायला शोधणाऱ्या कुत्र्यानी मला फाडून खाल्ले
असते. आपले भक्ष्य समजून . हे केवळ त्या बाबा मुळे घडू
शकले नाही. नाहीतर आपल्याला कचरा कुंडीत कचरा समजून फेकणाऱ्या ने  कोणतीच  कसर  सोडली नव्हती. आईच्या मामाने फेकले होते आपल्याला.  सर्व मामा असेच असतात का ? छे ! काहीच कळत नाही. कंस  मामाने पण आपल्या भाच्याला म्हणजेच कृष्णाला अनेक वेळा मारायचा प्रयत्न केला होता. पण हा माझा मामा नाही तर आईचा मामा होता. छे  मी हा विचार का करतोय बसलोय ? मामा असो
नाहीतर आणखीन कोणी असो. जोपर्यंत विधात्याची  इच्छा नसेल तोपर्यंत किनीच काही करू शकत नाही. म्हणूनच की
काय  देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले आहे. ते काय
उगाच ?  मी असा विचार करून  स्वतः स्वतःची समजूत घालत होतो. तेवढ्यात मोबाईलची बेल वाजू लागली. मोबाईल उचलून त्याच्या स्क्रीन वर नजर टाकली असता. माझ्या ध्यानात आले की , हा  नंबर  धीरज चा आहे. मी लगेच कॉल घेतला. हॅलो , ,मी कल्याण बोलतोय."
     " आता कुठे आहेस तू ? "
     " घरीच आहे का ?"
     "  आता येऊ शकतोस का ?"
     " हां ! पण काय काम आहे ?"
     " अगोदर इथं ये मग  सांगतो."
     " काही विशेष तर नाही ना ?"
     " विशेष च आहे . येणार ना ?"
     " आता तू  बोलविलेस तर यावेच लागेल ना मला ."
     " मी कधी बळजबरी केली का तुझ्यावर ?"
     " तसं नाही रे ."
     " मग निघ  लवकर, मी वाट पाहतोय तुझी."  मी फोन कट करत स्वत:शीच म्हटले  की ,  आता आणखीन काय काम काढलेय ह्याने ? काही कळत नाहीये. प्रत्यक्ष  तेथे जाऊन पाहायला हवे."



धीरज


 

     आज खरं तर मला हर्षानंद व्हायला हवा होता ; परंतु माझी जीत   आणि माझ्या वैत्यांची  हार झाली होती ; परंतु मला आनंद कसला तो होईना . का बरे व्हावे असे ? कदाचित ही छोटीशीच जीत  होती म्हणून असेल. खरी जीत तर  त्यावेळी होईल ज्या  दिवशी माझ्या वैऱ्यांचा सर्वनाश होईल.


पण हे होणार कसं ? कुणास ठाऊक ? माझ्या दुश्मनांचा तर दिवसेंदिवस उत्कर्ष होत चाललाय तो थांबायला पाहिजेल. पण कसा ? काहीतरी फक्कड अशी योजना बनवायला पाहिजे .पण कोणती ? त्यासाठी मला कल्याण ची मदत घ्यायला लागेल. आज त्यासाठीच बोलवले आहे, मी त्याला.
पण तो   येईल का ?  नक्कीच येईल . मी माझ्या मनाची समजूत घालत होतो. तेवढ्यात तिथे  धिरेन आला. आणि मला विचारमग्न अवस्थेत  असलेला पाहून माझ्या शेजारी बसत मला म्हणाला,"  दादा ss
   " अं sss  " मी भानावर आलो."
   " काय विचार करू लागला आहे दादा ?"
   " विचार ......हो विचारच करतोय मी ."
    " कसला ?  मला कळेल का ?"
    "  हो. पण त्यासाठी ही जागा नव्हे !"
    "  मग ?"
    " बाहेर ......दुसरीकडे कुठेही ! पण  इथं नको. "
    " का अरे ?"
    " का म्हणून काय विचारतो भिंतीला पण कान असतात म्हटलं."
    " हो . आलं लक्षात......आजोबाss
    "  नाव घेणे जरुरी आहे ? "
    " सॉरी दादा !"
    " आणि आजोबाच  नाही . तुमचे बंधुराज काय कमी आहेत ?"
     " कोण विलास ?"
     "  बघ ,घेतलीस पुन्हा नाव ."
     " लक्षात राहत नाही."
     "  चल. कार्यालयात ठरवू काय ते."
     " पण तेथे विलास पण तर असेलच ना ?"
     " अरे हो. विसरलोच होतो मी. त्याला कुठेतरी पाठवायला हवे . कामानिमित्त." मी म्हणालो.
      "  साईट वर पाठवू." धीरेन बोलला.  जिथे ५ स्टार हॉटेल चे बांधकाम सुरू आहे ना ." मी एकदम खुश होत म्हणालो,
      "  एकदम बेस्ट आयडिया शोधून काढलीस तू थँक्स हं !"
       तेव्हा  एकदम नाराज होत धीरेन म्हणाला ," हे काय रे दादा ? मी कोणी परका आहे का ? माझे आभार मानायला."
      तसा मी त्याला समजावत म्हणालो ," प्रश्न परके पणाचा नाहीये.  प्रश्न आहे योग्य वेळी योग्य मार्ग सुचविण्याचा. तुला नसेल आवडत तर पुन्हा घेतो मी माघारी ! "
     "  ते कसे ,घेणार  ?"
     " एकदम सोपे आहे." असे म्हणून ते  त्याच्या डोक्याला मी हात लावून हात माझ्याकडे घेतल्या सारखे करत म्हटले ," बस आला माझ्याकडे." या कृतीवर  तो ही हसू लागला.आणि मी ही  हसु लागलो. एका रुसलरल्या मुलाची
समजूत जशी काढली जाते अगदी त्यातलाच हा प्रकार झाला. आम्ही दोघेही अगदी मनमुराद हसू लागलो. तेवढ्यात तिथे शनि मामा येतात. आईचा सावत्र भाऊ वय ४० असेल.
एकदम कपटी स्वभावाचा. ते आज-काल आमच्याकडेच असतात. काय  काम करत नसत, म्हणून आजोबांनी म्हणजे आईचे वडील . त्यानी त्यालाव घरातून हाकलून दिले. तेव्हा पासून तो इथंच आहे. आईने पण भाऊ म्हणून ठेवून घेतले. त्याचा कुटील कारस्थान करण्यात नंबर वन आहे .बघूया आम्हाला त्यांचा  काही फायदा होतो का ?  त्याचे नाव पण किती सुरेख ठेवलंय. शनी कुमार ग्रहामध्ये  शनिग्रह श्रेष्ठ पण हे शनी आमच्यासाठी किती फायदे मंद होतात. ते पाहू !  ते येताच आम्ही हसायचे एकदम थांबलोे . ते पाहून ते म्हणाले,
    "  काय झाले भाच्यानो ? मला पाहताच हसायचे का थांबला ? हसा.  पोटभर हसा. आणि मला पण सामील करून घ्या त्यात." तेव्हा मी म्हणालो ," हो . तुम्हाला पण सामील करायचे आहे ."
     " नक्की !"
     " एकदम नक्की !" त्यानंतर मीटिंग ठरल्या प्रमाणे  कार्यालयातच घेण्याचे निश्‍चित झाली. विलास ला  साइटवर पाठवले.  शाळांना उन्हाळी सुटी असल्याने मुले ही घरीच होती. त्यांनी हट्ट धरला की आम्हाला पण ५ स्टार हॉटेल बघायचे आहे . तिथला स्विमिंग पूल ही पाहायचा आहे. मी विलासला म्हटले ," विलास तू ह्या साऱ्यांना घेऊन जा सोबत."
     "  हो. दादा ! मी घेऊन जातो साऱ्यांना." विलास सर्व मुलांना सोबत घेऊन साईट वर निघून गेला.

       कल्याण जसा आला तसा आम्ही त्याला पुढील योजने विषयी चर्चा केली. तेव्हा कल्याण बोलला , "  हे बघ ,धीरज यापुढे तू तुझ्या चुलत भावांशी दुश्मनी करायची सोडून दे.  कारण दुश्मनी करून काही साध्य होणार नाहीये.-झालाच तर विनाश होईल." 
     "  तू बोलतोस हे ?"
     "  हो .मीच  बोलतोय."
     " तुझ्याकडुन तरी ही अपेक्षा नव्हती ."
     " मी तुझ्या हिताचे बोलतोय."
      " माझे हित कशात आहे , हे मला चांगले ठाऊक आहे.
मला  तुझ्या उपदेशाची गरज नाहीये."
     "  मग मला कशाला बोलविलेस ?  तुला माझे म्हणणे ऐकायचे नाही तर !"
     " मी तुला मला उपदेश देण्यासाठी नाही बोलविले होते. काहीतरी मार्ग सुचवण्यासाठी बोलविले होते."
    "  तू जो मार्ग स्वीकारला आहेस त्यात नुकसान व्यतिरिक्त दुसरे कोणतेही  हित साद्यायचे नाहीये."
    "  वन सेकंद  मी बोलू ? "  शनी मामानी मध्येच प्रश्न केला.
    "  बोला मामा." मी म्हणालो.
     "  हे बघा . असे आपसात भांडत राहिलात तर काहीच शक्य होणार नाहीये. जे काय ठरवायचे आहे ते पूर्ण विचार करून ठरवायला पाहिजे .एकमेकांची संमती घेणे फार आवश्यक आहे . शनिमामा म्हणाले.
     "  कल्याण दादा तुझ्याच मदतीवर आम्ही हे युध्द पुकारले
आहे. आणि आता तूच जर माघार घेऊ लागलास तर आम्ही कोणाकडे आशेने पाहावे."
     " जाऊदे त्याला त्याच्या मार्गाने.कुणी रोखू नका त्याला." त्यावर कल्याण काहीच बोलला नाही. निमूटपणे उठला
नि थेट बाहेर  निघून गेला .मला काय करावे ते सुचेना. कल्याण शिवाय कोणतेही लढाई खेळणे आम्हाला शक्यच नव्हते . काय करावे याचा विचार करत होतो मी . तेवढ्यात फोन ची बेल वाजली. मी लगेच रिसिव्हर उचलला नि " हॅलो " म्हटले. तेव्हा पलिकडून एक घाबरा घुबरा आवाज आला. फोन करणारी व्यक्ती भीत भीतच म्हणाली ," धीरज सर घात झाला . त्याच्या या बोलण्याने तर मला धडकीच भरली. मी त्याला भीत भीत विचारले ," काय झाले ?"
      " आपली ५ स्टार हॉटेल ची बांधत असलेली इमारत
खेळातील  पत्त्यासारखी कोसळली.


क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..