कुरुक्षेत्र ४१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र ४१ |
देवधर
मला जेव्हा अमर कडून समजले की, अपहरण कर्त्याचा फोन अगोदर धीरजला आला होता. आणि धीरज ने अपहरण कर्त्याला धिरजने दिलेले उत्तर मला अजिबात आवडले नव्हते. मी घरी येतात सर्वांना हॉल मध्ये यायला सांगितले. तसे एकेक करून सर्वजण हजर होतात. मी मी धीरज कडे पहात त्याला विचारले ," धीरज तुला अपहरण
कर्त्याचा फोन आला होता का ?"
" नाही."
" खोटं बोलू नकोस. मला सत्य कळले आहे सारे ."
त्यावर तो बेफिकीरपणे म्हणाला ," कळले आहे तर मग
विचारता कशाला ?" मी संतापाने म्हणालो ," धीरज , हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाहीये ." त्यावर तो उत्तरला ," मी आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील नाहीये. आजोबा ," तेव्हा गायत्री चिडून म्हणाली ," नालायक ! उलट उत्तरे देतो मोठ्या माणसांना." तेव्हा धुर्तराज मध्येच म्हणाला," गायत्री तू शांत रहा . मी विचारतो त्याला."
तेव्हा मी धुर्तराज ला म्हटले ," तू काय विचारणार ? आतापर्यंत विचारलेस का काही ?"
" पण मला सांगाल तरी काय झालं ते ?"
" का ? तू घराच्या बाहेर असतो का ? जे तुला आत्तापर्यंत जे घडलं ते कळतच नाही ." माझ्या या प्रश्नाने तो चांगलाच वरमला. तसा मी पुढे म्हणालो ," मुले आपली बाहेर काय करतात याची फार पूर्वी जर दख्खल घेतली असती तर आज ही वेळ आली नसती घोरपडे कुटुंबावर." तेव्हा गायत्री ने मला विचारले ," बाबा नक्की काय झाले ते कृपा करून सांगा मला." मग मी सारी हकीकत गायत्रीला ऐकविली. सर्व
हकीकत ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर संताप दिसू लागला. ती रागाने धीरज कडे पाहत म्हणाली,"होय रे नालायका तू असे सांगितले अपहरण कर्त्याला ? पण धीरज काहीच उत्तर देत नाही. तशी की अजूनच चिढली नि बोलली ," अरे बोल ना बेशर्म आता तोंड का शिवलंय तुझे ?" पण धीरज हूं की चू करत नाहीत.याचा अर्थ मी त्याच्या विषयी जे काय बोलत आहेत. ते एकदम सत्य आहे. हे तिच्या द्यानात आले. मग काय तिला त्याचा भयंकर राग आला नि त्या रांगा सरशी गायत्री ने धिरजच्या श्रीमुखात लागोपाठ दोन-तीन थप्पड ठेवून दिले. तसा तो संतापाने म्हणाला ," हो. आला होता अपहरण कर्त्याचा फोन मला. आणि मीच त्याला तसे उत्तर दिले. धीरज च्या तोंडचे हे उत्तर ऐकून सर्वच आवाक होतात.
तशी गायत्री स्वतःला दोष देत म्हणाली ," माझ्या सारख्या
स्त्री च्या पोटी तुझा सारखा कुलांगारच जन्माला यायचा. मीच
पापिणी आहे. जेव्हा तू जन्माला आलास ना तेव्हाच तुझ्या
नरडीचा घोट घ्यायला हवा होता. म्हणजे हे दिवस पाहण्याची
वेळ माझ्यावर आली नसती." असे बोलता बोलता तिचा स्वर एकदम कातर झाला.आणि तिला नि तिला हुंदका आवरता आला नाही. एकदम रडूच कोसळले. तेव्हा मी तिचे सांत्वन करत म्हटले ," गायत्री तू आता स्वतः ला दोष देऊ नकोस. मुलं जन्माला येतेवेळी वाईट म्हणून जन्माला येत नाही. ती वाईट होतात त्यांच्यावर झालेल्या वाईट संस्कारामुळे. आणि त्यांच्यावर संस्कार घडविण्याची संपूर्ण जबाबदारी माता-पित्यांची असते . अर्थात तुम्ही दोघांनी ती जबाबदारी व्यवस्थित पणे पार पाडलेली नाहीये. त्यामुळे आज ही फळे मिळताहेत." त्यावर गायत्री बोलली ," हो. खरंय बाबा तुमचे म्हणणे ! धीरज च्या बापाने असे घडवलेय त्याला."
" गायत्री तोंड सांभाळून बोल. काय बोलतेस आहेस ते तुझं तुला तरी कळते काय ?" तेव्हा मी म्हणालो ," एकदम बरोबर बोलते आहे ती.काय चुकलंय तिचे ?"
" बाबा तुम्ही पण .......?
" हो. मी पण तेच बोलतोय. कारण काय माहितेय. त्या
कीडनँपरला तुझ्या मुलाच्या मुलांना किडनँप करायचं होते. परंतु चुकभुलीने त्यांची मुलं त्यांच्या हाती सापडली. त्या जागी जर तुझ्या मुलाची मुलं त्यांच्या हाती सापडली. असती तर काय झालं असतं याचा विचार कर." तेव्हा धुर्तराज दिलगिरी व्यक्त करत म्हणाला," हो. मला मान्य आहे बाबा. माझ्या महत्वकांशी चे हे विषारी फळ आहे. क्षमा करा बाबा मला."
" क्षमा माझी कसली मागतोस क्षमा मागायची झाली तर
प्रेमाच्या परिवाराची माग . त्यांचा तुम्ही गुन्हा केला आहे. आज तुमच्या अपराधाची शिक्षा त्या निष्पाप बालकांना मिळाली आहे. त्यांचा काही अपराध नसताना."
" हो ; बाबा मागतो मी माफी त्यांची."
तेव्हा तसा धुर्तराज च्या चेहऱ्यावर पश्चातापाच्या छटा स्पष्टपणे जाणवत होत्या. परंतु धीरज चेहऱ्यावर मात्र यत्किंचितही पश्चाताप झाल्याची एक पण चिन्ह जाणवत नव्हते. उलट त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा हर्षानंद उमटलेल्या जाणवत होता. जणू त्याची मनकामना पूर्ण झाली. तेव्हा मी त्याला उद्देशून बोललो," धीरज एक गोष्ट
लक्षात ठेव. जो दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतोय त्या खड्ड्यात एक दिवस तो स्वतःच कोसळतो. तेव्हा त्याला तेथून बाहेर काढायला तेथे कुणी नसते. म्हणून सांगतोय वेळ अजून
गेलेली नाही. तेव्हा स्वतःला सुधार नाहीतर मग पश्चातापा शिवाय दुसरं काही हाती लागणार नाही." परंतु तो कसला
ऐकतोय बेफिकीर पणे तो तेथून निघून गेला. तसा त्याच्या पाठोपाठ धीरेन सुध्दा निघून गेला. मात्र विलास तेथून हलला
नाही. त्याच्या डोळ्यात मात्र अश्रू आलेले दिसत होते. आणि
घरातील सर्वच स्त्रिया चे डोळे पाणावलेले दिसत होते. मग
सर्वांनीच प्रेमराज च्या घरी जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी
होण्याचे निश्चित केले.
मी मात्र बेचैन होतो. मला कळत की असे काय करावे जेणे करून या दोन परिवार मधली दुश्मनी संपुष्टात येईल. पण
काही ना काही उपाय शोधायलाच पाहिजे. नाहीतर दुश्मणीची आग दोन्ही परिवाराला जाळून भष्म करील. त्या
अगोदर उपाय शोधायला हवा. बराच वेळ विचार केल्यानंतर आशेची एक किरण दिसू लागली. तशी माझ्या चेहऱ्यावर विलक्षण हर्ष उमटला. तसे मी व्यक्तीश: म्हणालो ,
" कल्याणला त्याचा जन्म रहस्य सांगून त्याला धीरज घरापासून दूर करायला हवे. धीरज ची खरी ताकद कल्याणच
आहे. तेव्हा कल्याण लाच दूर करायला लागेल त्याच्यापासून. परंतु कल्याण ला त्याचे जन्म रहस्य सांगेल कोण ? मी सांगू का ? पण तो माझ्यावर विश्वास करेल का ? शक्यता कमी आहे . त्यापेक्षा त्याच्या आईला म्हणजे कुंदा लाच सांगू . तीच हे काम योग्य प्रकारे करील. विचार पक्का होताच मी त्या संदर्भात कुंदा शी चर्चा केली. तेव्हा प्रथम ती नाही म्हणाली. परंतु त्याचं महत्त्व पटवून देताच ती हो
म्हणाली.
कुंदा
माझी अजिबात इच्छा नव्हती कल्याणला त्याचे जन्मरहस्य करावे .पण नाईलाज होता . दोन कुटुंबात धुमसत असलेली
आग विझवायची असेल तर कल्याण ला त्याच्या जन्माचे रहस्य कळायला पाहिजेल. शिवाय बाबांच्या आदेशाचे पालन करणे हे माझे प्रथम कर्तव्य होते . म्हणून मग मी निश्चय केला की समाजा पुढे मला जरी अपमानित व्हावे लागले तरी चालेल. परंतु आता सत्य सर्वांना कळायलाचं पाहिजेल.
असा विचार करून मी कल्याणला फोन केला. पण नशीब फोन कल्याणनेच सुचलला होता. त्याने मला फोन करण्याचे प्रयोजन विचारले. क्षणभर मला काय बोलावे ते कळलेच नाही. परंतु लगेच स्वत:ला सावरून म्हणाले ,
" कल्याण बाळ , मला भेटायचे आहे तुला ."
" काही विशेष ? " त्याने मला विचारले .
" हो .विशेषच आहे ते. भेटायला येशील का मला ?"
" अवश्य ."
" कुठं येशील ?"
" तुम्ही म्हणाल तिथे."
" सुंदर विहार रेस्टॉरंट मध्ये."
" चालेलं. कधी येऊ ?"
" आज वेळ आहे का तुला ?"
" आता येऊ का ?"
" हो .चालेल ."
" मग या तुम्ही ! मी वाट पाहतो तेथे तुमची ! "
" हो .चालेल." मी असे म्हणून फोन कट करते .
त्यानंतर मी लगेच कपडे चेंज केले. आणि हातात हॅन्डपर्स
घेतली. आणि घराच्या बाहेर पडली. रस्त्यावर येताच एका आटो रिक्षाला हात दाखवून ती उभी केली. आणि त्यात मी बसली. आणि सुंदर विहार रेस्टॉरंट चा पत्ता सांगितला. आणि थोड्या वेळातच रिक्षा सुंदर रेस्टॉरंट समोर येऊन थांबली. तशी मी रिक्षावाल्याला पैसे दिले आणि रिक्षातुन खाली उतरलो. त्यानंतर मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला.
आणि सर्वत्र म्हणजे चोहीकडे नजर फिरविली. तेव्हा कल्याण एका कोपऱ्यात ल्या एका खुर्चीवर बसलेला मला दिसला. अर्थात तो माझ्य अगोदर येऊन माझी वाट पाहत होता. तशी माझी पाउले त्याच्या दिशेने वळली. मी त्याच्या जवळ पोहोचताच त्याने माझे स्वागत करत म्हटले ," या आईसाहेब बसा." त्याच्या तोंडून आई हा शब्द ऐकून मला
बरं वाटलं. माझे मन एकदम सुखावून गेले .मला नेहमी वाटायचे की , कल्याण ने आपल्याला कधीतरी आई म्हणून हाक मारावी. आणि देवाने माझी ही प्रार्थना ऐकली असावी. त्याने मला चक्क आई म्हटले होते . पण त्याच्या ते द्यानात आले तसा तो दिलगिरी व्यक्त करत म्हणाला ," माफ करा. मी
आपल्याला आई म्हणून संबोधले. नकळत घडले ते माझ्या हातून . " त्यावर मी उत्तरले ," काही हरकत नाही. नकळत ज्या गोष्टी आपोआप घडून येतात. त्यात ईश्वराची मर्जी सामील असते ."
" काय घेणार आपण ? म्हणजे चहा कॉफी दूध ?"
" चहा चालेल." तसे त्याने एका वेटरला दोन चहा ची ऑर्डर दिली . आणि मग माझ्याकडे वळून पाहत म्हणाला,
" आता बोला , काय काम काढलेत माझ्याकडे ?"
मला कुठून सुरुवात करावी ते कळेना. मी त्याला म्हणाली," तुला तुझ्या जन्माचे रहस्य माहित आहे का काही ?" त्यावर तो उत्तरला ," नाही. फक्त एवढंच माहित आहे की बाबांना मी कचरा कुंडीत सापडलो .कुणाचे तरी पाप होते ते. म्हणून बेवारस कचराकुंडीत फेकून दिले मला." त्याचा एक एक शब्द माझ्या हृदयावर घाव घालत होता. असंख्य यातना होत होत्या माझ्या हृदयाला. तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाली ," जर तुला आई कोण आहे हे कळले तर ?" तेव्हा तो म्हणाला ," त्याला आता काय फायदा आहे? जिने मला स्वतःच्या जीवनातील अडसर समजून स्वतःपासून दूर केले. अशा आई बद्दल मला जाणून घेण्यात काही लाभ नाहीये. आणि इच्छाही नाही . त्याचा एक
एक शब्द माझ्या हृदयावर खोलवर जख्यमं करत होते. पण त्याची तरी काय चूक होती म्हणा. आणि ज्या मातेने जन्मताच आपल्या पोटच्या गोळ्याला कचराकुंडीत फेकले. त्या माते विषयी आपुलकी तरी का वाटावी त्याला ? अर्थात मी फेकले नव्हते त्याला .पण समज तर तसाच झाला होता ना त्याचा. कुणीतरी त्याला खरं सांगायला हवं होतं की, तुझ्या माते तुझ्या त्याग केलेला नाहीये. तिला तर माहीत ही
नव्हते की आपला मुलगा जिवंत आहे ते . पण हे कोण सांगणार होते त्याला . आपली तरी हिंमत झाली का इतक्या वर्षात ? नाही ना ? आणि त्याला कारण आहे समाज. आणि त्याची बंधने. अर्थात कुठल्याही स्त्रीला समाजाने इतके स्वातंत्र्य दिले नाहीये. की ती समाजाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू शकेल. मग मी तरी कशी त्या नियमांचे उल्लंघन करू शकणार होती ? मी विचारात गर्क असल्याचे पाहून त्याने मला विचारले ," तुम्ही मला काही तरी सांगायला आले होते ना ? " तेव्हा मी
म्हणाली की, मी विचार करते की तुला सांगू की नको ."
" तुम्ही जे सांगायला आलात ते निश्चिंत मनाने सांगा .मी ऐकायला तयार आहे."
" मी तुला तुझ्या आई बद्दल सांगायला आली होती परंतु तुझी तुझ्या आई बद्दलची असलेली भावना ऐकून मी
माझा विचार बदलला."
" असे काय सांगणार होता माझ्या आई बद्दल .....सांगा बरं ."
" तुझ्या आईने तुझ्या तुझा त्याग केलेला नाहीये.
तिला बिच्चारीला तर माहित ही नाही की तिचा बाळ जिवंत आहे."
" म्हणजे ? "
" तिला सांगण्यात आले की तीच मूल जन्माला आले
ते मृत म्हणूनच."
" पण असे का आणि कोणी केले ?"
" तिच्याच हितचिंतकांनी."
" आई तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते जरा स्पष्ट सांगाल का मला ? कारण मला काहीच कळत नाहीये."
" बाळ, स्त्री ही नेहमी पराधीन आहे . तिला नेहमी दुसऱ्याच्या मर्जीनुसार वागावे लागते . जन्माला आल्या पासून ती लग्न होई पर्यंत तिला आपल्या आई-वडिलांची मर्जी सांभाळावी लागते. लग्न झाल्यानंतर तिला आपल्या नवऱ्याची मर्जी सांभाळावी लागते.आणि म्हातारपणी तिला आपल्या मुलांची पण मर्जी सांभाळावी लागते. अशा परिस्थितीत कुमारिका अवस्था मध्ये जर ती माता झाली तर ती काय करू शकते ? ते तूच सांग बरं. " मला काय म्हणायचे आहे ते आता तो नक्कीच समजला असावा. म्हणूनच की काय तो सहज म्हणाला ," तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. आई माझ्या आईची पण काहीतरी मजबुरी असावी. म्हणूनच कदाचित तिने माझा त्याग केला असावा. म्हणून दोष देत नाही मी तिला ; परंतु तुम्हाला माझ्या आईबद्दल इतके सारे कसे माहिती आहे. अर्थात तुम्ही माझ्या आईला नक्कीच ओळखत असणार. "
" हो . चांगलीच ओळखते मी तिला."
" मग मला तिचा पत्ता द्याल ?
" देईन पण कशासाठी ?"
" मला तिची एकवेळ भेट घ्यायची आहे."
" फक्त भेटच घ्यायची आहे का ? तोंड सुख घ्यायला ?
" नाही नाही मला फक्त एकदा माझ्या आईला भेटायचं आहे." तेव्हा एकदम दु:खी अंतकरणाने म्हणाली ," मग
ऐक . तुझी आई दुसरी तिसरी कुणी नसून ती दुर्देवी आई मीच आहे रे. "
" काय ? तू माझी आई ! "
" होय बाळ ."
" तेव्हाच उपदेशाचे पाठ देत होतीस मला."
" नाही. बाळ ,उपदेश नाही.... मी माझी करून कहाणी आहे .अर्थात माझीच नाही तर माझ्या सारख्या अनेक स्त्रियांची आहे. तुझ्या विश्वास बसणार नाही त्यावर.माहितीये ते मला. परंतु हीच स्त्री जीवनाची वास्तविकता आहे . की तिला आपल्या मुलाला सुध्दा त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागतो." असे म्हणताना माझा स्वर एकदम कातर झाला. त्यावर तो एकदम विरघळला.आणि दिलगिरी व्यक्त करत म्हणाला ," नाही आई ! मी तुझ्यावर अविश्वास दाखवत नाहीये . तू म्हणते ते शब्दश: खरे आहे . आणि आई मी तुला हे पण विचारणार नाही तू माझा का त्याग केलास म्हणून. असेल तुझी पण काहीतरी लाचारी ! पण आई ,मला माझा जन्मदाता कोण होता हे कळेल का ? अर्थात तुझी इच्छा असेल तर सांग . नसेल तर काही माझी बळजबरी नाहीये." तेव्हा मी म्हणाली ," सांगते. बाळ तुला सारं काही सत्य घटना सांगते." असे बोलून माझ्यावर घडलेल्या प्रसंगाची इत्यंभूत संपूर्ण हकीकत त्याला मी ऐकविली . सर्व ऐकल्या नंतर तो मला म्हणाला ," आई ,आता माझी काहीच तक्रार नाही, तुझ्या बद्दल . तू खूप सोसले आहेस. यात शंका नाही ; पण मी आता काय करू ते मला तू सांगशील का ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा