प्रेमासाठी काहीही ७| मराठी ❤ स्टोरी, मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रेमासाठी काहीही ७ |
मला माझ्या पहिल्या जीवना विषयी काहीच आठवत नाही. तेव्हा पोलिसांच्या द्यानात आले की मिराचा खरोखरच स्मृतिभ्रंश झाला आहे, मग त्यांनी तिला फार काहीही न विचारता. सोडून दिले. मग पोलिसांनी मोहन निर्दोष असल्याची सरकार ला दिली त्याची सुटका व्हावी अशी विनंती ही केली. आणि त्या प्रमाणे मोहन ची निर्दोष म्हणून सुटका पण झाली. सूंदर आणि त्याचा मित्र मदन ह्या दोघांना पोलिसांची दिशाभूल केली म्हणून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा त्या मिळालेल्या मृतदेह वळविला. त्या बाईचा खून कोणी आणि का केला ?
आता इथून पुढे
तुरुंगातुन सुटून जसा मोहन बाहेर आला तर त्याच्या
आई-वडिलांच्या सोबत राधा सुध्दा होती. राधाला पाहून
त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला की ही इथं कशी ? मागे
तर तुरुंगात मला भेटायला म्हणून आली नि भरपूर काही
ऐकवून गेली आणि आता मी निर्दोष आहे हे समजल्यावर
मला भेटायला आली आहे. जे नाते स्वतःच तोडून गेली ते
नाते पुन्हा कशासाठी जोडायला आली आहे. ज्यांना आपल्या प्रेमावर अजिबात विश्वास नाही त्यानी प्रेम तरी का करावे कुणावर ? असा मनात विचार सुरू असताना राधाने त्याला विचारले," हाय मोहन कसा आहेस ?" मोहन उद्गारला," जाहीर आहे तुरुंगात कुणी खुश तर नसणार ना ?" त्यावर राधा म्हणाली ," सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं पण जाऊ दे सोड तो विषय आज मला इतका झालाय की.. तिने आपले वक्तव्य पूर्ण करण्या अगोदरच मोहन उद्गारला," रियली ?" राधा समजली की तो असा का म्हणाला म्हणून ती पुढे म्हणाली," मला कल्पना आहे, तुझा माझ्यावरचा राग. पण त्याला माझा ही नाईलाज
होता रे, परिस्थिती तशी होती.माझ्या जागी दुसरी कुणी
जरी असती तरी तिने ही तसेच रिअँक्ट केलं असतं. त्या
मुळे मी काही चुकीचे केले असे काही मला वाटत नाही आणि आता तू माझ्यावर रागावला आहेस त्याचं ही मला वाईट वाटणार नाही, कारण तुला पूर्ण हक्क आहे माझ्यावर रागवण्याचा ! परंतु तूच विचार कर माझ्या जागी जरी तू असता तर तू सुध्दा माझ्या प्रमाणेच आपला राग व्यक्त केला असतास." त्यावर मोहन म्हणाला ," मी विचारलं का तुला काही नाही ना , मग कशाला स्पष्टीकरण देतेस आहेस मला ?" असे म्हटल्यावर मोहन ची आई म्हणाली " असं का रे बोलतो आहेस तिला ? "
" आई, रागावू दे त्याला. माझ्यावर रागावण्याचा पूर्ण
अधिकार आहे त्याला."
" मोहन , आज जो तू आमच्या समोर उभा आहेस ना,
तो केवळ राधा मुळेच बरं का ?" असं आईने म्हटल्यामुळे
मोहन ला मोठं आश्चर्य वाटलं आणि प्रश्न ही पडला की आपली आई असं का बरं म्हणते , म्हणून ने विचारले,
" हिच्या मुळे ते कसं काय आई ?" मग त्याच्या आईने त्याला सविस्तर माहिती दिली की राधानेच पोलिसांना सांगितले की मीरा जिवंत आहे म्हणून. कारण सर्व प्रथम राधानेच मीरा ला पाहिलं होते. मग पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा सत्य उघडकीस आलं. तो मृतदेह मीरा चा नसून दुसऱ्याच कुण्या स्त्री चा आहे. असे सांगितल्यावर मोहन ने राधाची माफी मागितली. त्यानंतर सर्वजण घरी परतले.
पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली. म्हणजे
तिचा नवरा जर खुनी नसेल तर नक्कीच त्या स्त्री चे कुणीतरी लग्ना पूर्वीचा प्रियकर असावा. अर्थात तिच्या
माहेरचा कुणीतरी असावा असा विचार करून पोलिसांनी
शेजाऱ्या पाजाऱ्या कडे चौकशी केली. तेव्हा माहिती
मिळाली की त्यांच्याच गावात एक राहणारा तरुण त्याचे
नाव मंगेश होते. त्याचे नि सीमा चे अफेर सुरू होते. परंतु
सीमा च्या आई-वडिलांना तो मुलगा अजिबात पसंत नव्हता. म्हणून त्यांनी तिचे लग्न गुरवली गावातील श्रीकांत
गुडेकर या मुलाशी करून दिले. ही जशी पोलिसांना
माहिती मिळाली. तसे पोलिसांनी प्रथम मंगेश ला ताब्यात
घेतले. प्रथम तर कबुलच होत नव्हता. परंतु पोलिसांनी
आपला खास खाक्या दाखविला तसा तो पोपटावाणी
बोलू लागला आणि त्याने कबूल केले की त्याने सीमाची
हत्या केली. खून करण्या मागचे कारण विचारले असता
पुढील माहिती उजेडात आली ती अशी-
सीमाचे लग्न झालं तरी दोघांचे अफेर सुरूच होते. परंतु
काही दिवसानंतर मात्र सीमा त्याला टाळू लागली होती.
आणि त्या मागचे कारण हे होते की , सीमाचा नवरा फार प्रेमळ होता. त्याचे आपल्या पत्नीवर फार प्रेम होतं. त्याचं प्रेम पाहून सीमा ला वाटू लागले की आपण आपल्या नवऱ्याचा विश्वासघात करतोय. हे योग्य नाही. हे जसे तिला जाणवले तसे तिने मंगेश ला तशी समज दिली की आता माझे लग्न झाले आहे तर या पुढे तू मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. पण त्याने तिला धमकी दिली जर तू मला भेटली नाहीस आणि आपले संबंध कायम सुरू राहीले नाहीत तर मी तुझ्या नवऱ्या ला अफेर विषयी सर्वकाही सांगेन. त्यावर ती म्हणाली ," बेशक सांग. मी माझ्या नवऱ्याला अगोदरच सांगितले आहे." त्याला त्यावर विश्वास बसला नाहीं म्हणून त्याने तिच्या नवऱ्याची भेट घेतली. तर तिचा नवरा म्हणाला," तिने आपल्या पाष्ट बद्दल मला अगोदरच सांगितले होते आणि मी तिला माफ ही केले होते. तेव्हा या पुढे तू माझ्या बायकोला भेटायचं
नाहीस. पण तरी देखील मंगेश तिला भेटण्याचा प्रयत्न
करायचा. परंतु सीमा काही त्याला दाद देईना. म्हणून शेवटी त्याने ठरविले की सीमाला चांगली अद्दल घडवायची आणि त्या प्रमाणे सीमा आपल्या माहेरी येणार हे अगोदरच त्याला कळलं होतं. मग काय त्याने तिला नदीच्या पुलावर गाठली नि तिचा तिच्याच ओढणी ने
तिचा गळा आवळून तिला ठार केले नि पाण्यात टाकून दिले. तेंव्हा इन्स्पेक्टर जयदेव ने विचारले की सीमा आपल्या माहेरी येणार आहे ही तुला खबर कोणी दिली ? तेव्हा मंगेश म्हणाला ," मला एक निनावी कॉल आला. त्याने फोन वरून माहिती दिली की सीमा आज आपल्या माहेरी येणार आहे, मग काय मी नदीच्या पुला पाशी तिची वाट पाहत बसलो. मग पोलिसांनी विचारले ," कोणत्या क्रमांक वरून तुम्हाला कॉल आला होता त्याचा नंबर देता का ?" त्याने तो नंबर दिला. पोलिसांनी तो नंबर कोणाचा आहे हे सिमकार्ड च्या कंपनीतून माहिती मिळविली नि तिच्या नवऱ्याचा नंबर आल्याचे सिद्ध झाल्याने पोलिसांनी तिच्या नवऱ्याला ही अटक करून पोलीस स्टेशनला आणले. त्याला ही पोलिसांनी आपला खास खाक्या दाखवताच त्याने ही कबूल केलं की मला ही तिचा काटाच काढायचा होता. कारण तिच्या पोटात जे बाळ होतं ते माझे नसून ह्या मंगेश चे होते. मग मी विचार केला की हिला हिच्या पापाची शिक्षा हिला द्यायची परंतु त्यात आपण अडकलो नाही पाहिजे म्हणून मग मी तिच्याशी फार प्रेमाने वागायचे नाटक केले. तिच्याशी मी कधीच भांडण केले नाही. जेणे करून कुणालाही कळू नये की आमचं आपसात पटत नाहीये. तिला एक दिवस विश्वासात घेऊन मी म्हणालो की तुझ्या अफेर विषयी मी कोणालाच काही सांगणार नाही. परंतु तू तुझ्या प्रियकराशी असलेले संबंध तोड त्या प्रमाणे तिने तोडले. त्यामुळे मला अपेक्षित असलेले घडले. त्या दोघांचे भांडण झाले मग ह्याने तिला जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली आणि त्या प्रमाणे पुढे घडले ही सारे!" त्यावर इन्स्पेक्टर जयदेव म्हणाला," पण एक चूक घडली ना तुमच्या कडून मंगेश ला फोन करून जी खबर तुम्ही दिली. त्यामुळे तुम्ही पण तेवढेच दोषी आहात. असे म्हणून तिच्या नवऱ्याला पण तुरुंगात डांबले. लवकरच त्यांच्या केस चा निकाल लागला. नवऱ्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तर प्रियकराला सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली.
मोहन ची आणि राधाची प्रेम कहाणी परत सुरू झाली.
मोहनच्या आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी राधाला
रीतसर मागणी घातली. राधाची आई अगोदर तयार नव्हती परंतु मुलीच्या जिद्द पुढे तिला माघार घ्यायला लागली. लवकरच दोघांचे लग्न ठरले. मोहन म्हणाला
की लग्न आपण नंतर करू कारण मला सध्या जॉब नाहीये. नशिबाने म्हणा नाहीत आणखीन कशाने म्हणा
पण लवकरच मोहन ला डोंबिवली एमआयडीसी मध्ये एका चांगल्या कपड्याच्या कंपनीत जॉब लागला.
आणि लवकरच चांगला सा मुहूर्त पाहून दोघांचे
थाटामाटात लग्न झाले.
मीरा चा स्मृतिभ्रंश झाल्याने ती कोणाला ओळखत
नव्हती. जेव्हा मदन सांगितले की हे तुझे आई-वडील
आहेत. खरे वाटत नसेल तर हा तुझा फमेली सोबत
असलेला फोटो बघ.तेव्हा कुठं तिला खात्री पटली.
त्यानंतर सुंदरच्या आई ने तिला सांगितले की तुझा जीव
ह्या मदन ने वाचविले आहेत. म्हणून तुला मदन शी लग्न करायला हवे आहे.मीरा ने मान्य केले नि तिने मदन शी
लग्न केले. त्यावेळी सूंदर तुरूंगातून सुटून आला होता
नि योग्य संधी चा वाट पहात होता.कारण राधा मुळे
त्याचे प्लॅन ही फेल झाले होते नि राधा ही त्याच्या तावडीतून निसटली होती.मोहन नोकरी निमित्त घरात
नव्हता नि मोहन चे आई-वडील शेतात गेले होते.राधा
एकटीच घरात होती. बाहेरचा दरवाजा ही उघडाच होता. फक्त आड केला होता. सुंदर ला हवी असलेली संधी प्राप्त
झाली.तो दरवाजा लोटून आंत शिरला.राधा स्वयंपाक
घरात असल्याने तिला कळले देखील नाही घरात कोणी
शिरले आहे.दरवाजा बंद करताना दरवाजा आवाज झाल्याने तिने आतूनच विचारले ," कोण आहे बाहेर ?"
परंतु उत्तर न मिळाल्याने ती स्वतःच बाहेर आली नि
समोर सुंदर ला पाहून तिने हसून विचारले," सुंदर तू कधी
आलास तुरूंगातून सुटून ?" त्यावर सूंदर हसून म्हणाला,
" तुरुंगातून सुटून तर कधीच आलो परंतु तुला माहीत
असेल तेव्हा ना ?"
" मला माहीत कसं असणार रे , तुझं घर त्या टोकाला
नि आमचे घर गावच्या ह्या टोकाला.त्यात करून तुझी
आई आता माझ्याशी बोलत ही नाही."
" का ते माहीत नाही का तुला ?"
" माहीत आहे रे, मी तुझ्याशी लग्न केलं नाही म्हणून."
" हो अगदी बरोबर."
" पण तुला तर माहीत आहे ना, माझं प्रेम मोहन वर
होतं मग मी तुझ्याशी लग्न कशी करणार होती बरं ?"
" पण तुझं माझं लग्न आपल्या बालपणीच आपल्या
आई-वडिलांनी ठरविलं होतं हे तर तुला मान्य आहे ना ?"
" हो रे मान्य आहे, परंतु बालपणीच लग्न ठरविणे योग्य आहे का ? पुढे त्यांच्या जीवनात काय घडणार
आहे हे माहीत असते का कुणाला ?"
" अगदी बरोबर बोललीस बघ तू."
" तुला पटतंय ना हे ?"
" अग पटणार म्हणजे काय पटलंच पाहिजे.कारण
आता पुढच्या जीवनात आपल्या जीवनात काय घडणार
आहे हे आपल्याला कुठं माहीत आहे ? पण आज घडणार
खास ?"
" म्हणजे ? मी नाही समजलो तुला काय म्हणावयाचे
ते."
" मी सांगतो ना, काय घडणार आहे ते आता ?"
" मला अजूनही कळलं नाही."
" मग स्पष्टच सांगतो की आज तुझी इज्जत फार
चोळामोला करून टाकणार आहे मी ! तू भले कपाळी
कुंकू मोहनच्या नावाचं पण तुझ्या उदरात अंकुर वाढेल
माझ्या नावाचा.आता कळलं मी तुझ्या सोबत काय
करणार आहे ते." राधा समजली हा कशासाठी आला आहे
इथं.परंतु ह्याला इथून घालवायचा कसं ? ह्याच्यावर आग
पाखंड केली तर हा इथून जाणार नाही.त्या पेक्षा गोडी
गुलाबी ने इथून त्याला एकदाचं घालवू .कारण ह्याने बाहेरचा दरवाजा बंद केला आहे.मी आरडाओरडा केली
तर हा म्हणेल मीच ह्याला इथं बोलविले होते.मग बदनामी
आपलीच होणार त्या पेक्षा ह्याला कसं तरी घालवू इथून.
असा विचार करून ती म्हणाली," असं रे काय करतोस तू मित्र आहेस ना माझा? मग मैत्रिणी सोबत असं करणं
शोभतं का तुला ?"
" हे बघ एक मित्र जेव्हा दुसऱ्या मित्राला धोका देतो तेव्हा काय होतं माहीत आहे का तुला ? नाही ना ? मी सांगतो दोघा मित्रांमध्ये वैर सुरू होते आणि मग ते एकमेकांचे हाडवैरी असतात. मग ते वैर त्या दोघांना असं काही करायला भाग पाडते त्याचा त्यांनी कधी विचार ही केलेला नसतो. जसा की मी आता तुझ्या सोबत जे करणार आहे ना, त्याचा तू कधी विचार ही केलेला नसशील. तेव्हा काय म्हणतोय त्या कडे नीट लक्ष दे, जर तू स्वखुशीने माझ्या हवाली होत असशील तर मी माझं काम करून निघून जाईन. आणि कुणालाच काही कळणार नाही. तुझ्यात नि माझ्यात फक्त सिक्रेट राहील ते. तेव्हा काय विचार आहे तुझा ? जबरदस्ती का स्वखुशी ?"
" तू काय मला वेश्या समजलास की काय ?"
" वेश्या नाही गं वेश्या ला पैसे दिले जातात.मी तुला थोडेच पैसे देणार आहे ? ह्याला म्हणतात एक्स्ट्रा अफेर
जे लग्नानंतर होते आणि आज काल ची फँशन आहे ही !
नवऱ्याचे बाहेर अफेर सुरू असतं तसे बायकोचंही अफेर
सुरू असतं नवऱ्याच्या मित्रा सोबत अथवा शेजाऱ्या
बरोबर.ही वास्तविकता आहे.त्यात लाजयचं काय ? चल
आटपून घेऊ लवकर."
" तू अगोदर चालत हो इथून."
" जाणारच आहे मी परंतु मला जे हवे ते मिळवून.पण
मला वाटतं तू अशी ऐकणार नाहीस.कारण तुला गोड
भाषा कळत नाही.पण कडू भाषा नक्की कळेल." असे
म्हणून तिला पकडायला तो पुढे सरसावतो तशी ती
मागे सरकत म्हणाली,"मला अपवित्र नको करुस रे."
" ते आता जुने शब्द झाले.नवीन शब्द काय माहीत आहेत आओ डार्लिंग मुझे अपने बाहो में लो ! " असे
म्हणत पुढे सरकतो आवो ना, देर मत करो !" असे म्हणून
तिला पकडतो नि पलंगावर टाकतो. " असे म्हणून तिच्या
अंगावर स्वार होतो. ती त्याच्या हातून सुटण्याची खूप
दडपड करते पण व्यर्थ त्याच्या ताकती पुढे तिची ताकद
कमी पडते.मग काय त्याला हवे ते साध्य करतो नि मग
तिच्या पासून बाजूला होत म्हणाला," सॉरी डार्लिंग !
तुझ्यावर मी जबसदरस्ती करू इच्छित नव्हती पण करावी लागली. चांगले फिगर आहेत हां तुझे मला फार आवडले
परत येईन आठव आल्यावर." असे म्हणून त्याने दरवाजा
उघडला नि बाहेर पडला. राधा ने मुसमुसत आपले कपडे
सारखे केले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा