अखंड सौभाग्यवती भव २
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अखंड सौभाग्यवती भव २ |
" हो , बाबांनी समजावले मला." कंदन उद्गारला.
" अरे,थोडे राजाराम चे गुण घे. तो कसा वागतोय आणि
तू कसा वागतोयेस ?" खरं तर कंदन ला राग आलेला असतो आपल्या आईचा.कारण ती त्याच्या वैऱ्यांचे गुण गात होती ती पण त्याच्या समोर.पण तो त्यावेळी काहीच
बोलला नाही.कारण तसं करणं त्याच्या पुढील चालीस
धोकेदायक ठरलं असतं. म्हणून तो गप्प राहिला.फक्त
इतकंच म्हणाला," हो आई, तू सांगशील तसाच वागेन मी !" असे म्हणताच अरुंधती खुश होत म्हणाली," माझे
गुणांचे बाळ ते." असे म्हणून त्याला आपल्या हाताने
चाचपून त्याच्या तोंडावरून आपला प्रेमळ हात फिरवला.
त्याच वेळी जर तिला पाहता आलं असतं तर तिला
जाणवलं असतं की त्याच्या डोळ्यात या क्षणी किती
अंगार भरला आहे तो.
आता इथून पुढे-
अगं दुसऱ्या दिवशी कंदन उठला नि स्नान वगैरे करून
डायनींग टेबल पाशी आला.कारण नाश्ता करायची
वेळ झाली होती. सगळे अगोदरच डायनींग टेबल पाशी
जमा झाले होते. कंदन ला पाहून राज म्हणाला," नाश्ता
करून घे. आजपासून तू माझ्या सोबत ऑफिस ला चालायचे आहे."
" पण मी काय करणार तेथे ?"
" पाहिल्यादां काय करायचास ?"
" पहिल्यांदा मी आकाउंड सांभाळत असे."
" मग आता ही अकाउंट च सांभाळायचं आहे."
" पण मी कसं आकाउंड सांभाळू शकतो ?"
" का ? काही प्रॉब्लेम आहे."
" तसा प्रॉब्लेम नाही काही.परंतु....?" बोलता-बोलता
मध्येच बोलायचा थांबला.तसे लगेच राजाराम ने विचारले
" परंतु काय ?"
" मला वाटतं माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी नको.
त्या पेक्षा मी ज्या पोष्ट काम करत होते ती पोष्ट मी
सांभाळेन. अर्थात तुझी काही हरकत नसेल तर !"
" माझी काहीच हरकत नाहीये तुला जे आवडेल ते कर."
" थँक्स राज !"
" थँक्स कशाबद्दल ?"
" तू माझ्यावर जो विश्वास दाखविल्यास त्या बद्दल.
कारण एकदा जो तुरुंगात जाऊन आला तो धोका धडीच्या
केस मध्ये त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही; परंतु
तू ठेवलास.मी तुझ्याशी बेईमानी केली हे देखील तू विसरलास ? ही काही सामान्य गोष्ट नव्हे ! तुझ्या जागी जर कोणी असता तर त्याने मुळीच माझ्यावर विश्वास
केला नसतास. आणि मागचे सारे विसरून त्याने माझ्यावर
एवढी जबाबदारी सोपविली नसती. म्हणून म्हणतोय तू माझ्यावर एकदम विश्वास कसा काय करू शकतोस ?"
" विश्वास काही बाजारात विकत मिळत नाही. तो
कमवावा लागतो. आणि माझी अशी खात्री आहे की
तू गमलेला विश्वास पुन्हा प्राप्त करशील यात तिळमात्र
शंका नाहीये. फक्त तू एकच करायचं आणि ते म्हणजे
माझ्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी तू
घ्यायची आहेस."
" राज तुझे मन फार मोठे आहे.परंतु तेवढे मोठे मन
माझ्याकडे नाहीये.परंतु तरी ही तू माझ्यावर दाखविलेल्या
विश्वासाचे मी सार्थक करीन.'
" बस्स एवढंच मला ऐकायचं होतं तुझ्या तोंडून. आता
माझी पूर्ण खात्री झाली की मी तुझ्यावर दाखविलेला विश्वास व्यर्थ नाही जाणार."
" व्हेरी गुड ! आता झालं गेलं विसरून जायचं आणि
काही झालंच नाही असं समजून एका नव्या उमेदीने काम
करायचं बस ! "
" हे सारं कसं जमतं तुला ? मी जर तुझ्या जागी
असतो तर मला अजिबात जमलं नसतं असं करायला ?
" मी हे माझ्या आजोबा कडून शिकलो. त्यांनी जीवनात
भरपूर काही सोसलं ; पण दोष नाही दिला कुणाला."
" खरंय , आजोबांचा सहवास तुला फार लाभला. मला
तर आजोबा आजीचे प्रेमच मिळालं नाही. किती कमनशिबाचा आहे मी ! माझं बोट धरून मला शिकविलेच नाही कुणी , कारण आई ! जन्मांधळी आणि बाबा आपल्या कंपनीच्या कामात व्यस्त ! मग माझ्या कडे पाहायला कोण होतं दुसरे ? "
" जाऊ दे रे प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणत्यातरी
गोष्टींची कमतरता असतेच. आता माझंच बघ ना, माझे
आई- बाबा मला जन्मतःच सोडून गेले. माझे लालन पालन दोन आजींनी केले. आजोबा होते. पण ते कंपनीच्या कामात व्यस्त असल्याने माझ्या कडे लक्ष द्यायला तेवढा वेळ नव्हता त्यांच्याकडे. पण मी त्यांचे
बोट धरून मी चालायला शिकलो. दोन आजींची माझ्यावर खूप माया होती. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा असतोच असतो.परंतु अपयश आले म्हणून त्यात
खचून न जाता प्रयत्न करतच राहायचं.कधीतरी प्रयत्नाना
यश येईलच की ! तेव्हा आता झालं गेलं विसरून जा नि नव्या जोमाने परत कामाला लाग."
त्यानंतर सर्वांनी झटपट नाश्ता केले. कंदन राजाराम च्या
मोटार मध्ये बसून निघून गेला. कंपनीत आल्यानंतर राजाराम ने कंदन ला आपल्या केबिनमध्ये बोलविले नि
त्याला सांगितले की , तू माझा भाऊ नंतर आहेस ; पण
मित्रत्वाचे नाते अगोदरचे आहे आपले. म्हणून मित्रत्वाच्या नात्याने तुला सांगतोय की योग्य वेळ येताच तुझा हिस्सा तुला मिळेलच पण त्यासाठी तुला अठरा वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. कारण ही सारी प्रॉपर्टी दिपकच्या नावावर आहे. दीपक अठरा वर्षाचा होईपर्यंत मी चालक म्हणून काम करणार आहे. तेव्हा त्यासाठी मला तुझ्या मदतीची पण गरज आहे. माझं फक्त तुला इतकंच सांगणे आहे की मागील इतिहासाची पुनरावृत्ती करू नकोस. बाकी राहिला प्रॉपर्टी चा प्रश्न दीपक एकदा अठरा वर्षाचा झाला की सारी प्रॉपर्टी त्याच्या नावावर होईल. मग मी त्याच्याशी बोलणी करून तुझ्या हिस्साची प्रॉपर्टी तुला द्यायला लावीन त्याला. तोपर्यंत आपण दोघांनी पण कंपनीचे कर्मचारी म्हणून ह्या कंपनीचे काम सांभाळायचे आहे." त्यावर कंदन म्हणाला," मला आता हिस्सा वगैरे काही नकोय. मी फक्त बाबांच्या जागी प्रामाणिक पणे काम करू इच्छितोय ; परंतु तुझा माझ्यावर विश्वास असेल तरच बरं का ?"
" विश्वास आहे रे तो जर तो नसता तर तुला मी स्वतःच्या घरी का आणले असते बरं ?"
" तुझ्या विश्वासाला तडा जाईल असे मी कोणतेच
काम करणार नाहीये."
" ओके ! तू आता आपल्या केबिनमध्ये जाऊ शकतोस ." तसा कंदन उठला नि राजच्या केबिन मधून बाहेर पडला नि आपल्या केबिनमध्ये शिरला.त्याची केबिन
राजच्या केबिनच्या बाजूलाच होती. आपल्या चेअर वर
बसत स्वतःशीच म्हणाला," अठरा वर्षे कोण वाट पाहणार रे, इथं घटकेचा भरवसा नाही आणि अठरा वर्षे चातक पक्षा सारखे वाट पाहत बसू का ? कदापि नाही. मला हवंय
ते मी मिळविणारच. मग त्यासाठी कोणाचा जीव जरी घ्यावा लागला तरी चालेल. क्योंकि खेल खेलने का मजा तब आता है, जब कोई अपने ज्यादा विश्वास करता है
तब उसके विश्वास की धज्जियां उड़ाना बहुत मजा आता
हैं राज तुमने मुझपर विश्वास करके बहुत बड़ी गलती की
है, अब देखो मैं क्या करता हूं । तुम्हांरा सबकुछ छीन लूंगा मैं तुमसे ना बीवी रहेगी ना जायदाद । सिर्फ आखों में आंसू
रहेंगे । लेकिन उन आँसुओ कों पोछनेवाला कोई न होगा ।
आ हा हा हा sss "
कंदन ला कंपनीत पाहून कर्मचारी लोकांमध्ये कुजबुज
सुरू झाली. ते आपसात बोलत होते. एकजण म्हणाला,
" मला हे कळत नाही की राज सरांनी कंदन सरांना पुन्हा
का चान्स दिला असेल , एकदा धोका खाल्ला ना ?"
" हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे, शिवाय ते नात्याने
एकमेकांचे भाऊ लागतात." पाटील साहेब म्हणाले.
" हो सर, मान्य आहे, पण मागच्या वेळी कंदन सरांनी
काय केलं होतं ते माहीत आहे ना ?" दिशा म्हणाली.
" आपल्याला काय करायचं आहे, आपण नोकर माणसं
शेठ लोकांच्या भानगडीत पडा कशाला ?" पाटील म्हणाले.
" हे बाकी बरोबर बोललात सर !" राखी म्हणाली.
" काही पण म्हणा पण आपले राजाराम सर ! एकदम
चांगल्या स्वभावाचे आहेत. म्हणून ना कंदन सरांना पुन्हा
ठेवलं त्याच पोष्टवर." टीना म्हणाली.
" त्याच पोष्टवर कुठं ? आता त्यांना कचेश्वर सरांची
पोष्ट मिळाली.
" कचेश्वर सर राजाराम सरांचे मामा ना ?"
" हां पण कंस मामा !" त्यावर सगळे खळखळून हसले.
तेवढ्यात राजाराम आपल्या केबिन मधून आले. त्याना
पाहताच सगळे आपापल्या डेक्स वर गेले.सर्वत्र शांतता
पसरली. त्यावेळी सुई जरी जमिनीवर पडली असती ना, तर तिचा ही आवाज आला असता. राजाराम सर त्या सर्वांना उद्देशून म्हणाले," कसली मिटिंग चालली होती इथं ?"
" मिटिंग नाही सर !" अभय पाटील लगेच म्हणाले.
" पाटील ऐकलं आहे मी !"
" सॉरी सर !"
" कंपनीत काम करायला आला आहेत ना , मग काम
करा. उगाच फालतू गोष्टीत लक्ष घालू नका."
" सॉरी सर !" सर्वांनी आपल्या माना खाली घातल्या.
राजाराम परत आपल्या केबिनमध्ये निघून गेले. तशी
टीना म्हणाली ," सरांना कसं समजलं ?"
" सी सी टीव्ही कॅमेऱ्यात पाहिलं असेल त्यांनी ?" राखी
हळूच म्हणाली.
संध्याकाळी कंदन राजच्या मोटारीतून घरी आला.
बंगल्यात प्रवेश करताच दीपक धुडधुड धावत आला. राज
ने त्याला लगेच उचलून घेत म्हटलं," कसा आहे माझा
राजा बेटा ?" तसा दीपक एकदम तोतऱ्या आवाजात बोलला," पप्पा माझ्यासाठी काय आणलं तुम्ही ?"
" काय पाहिजे तुला सांग.....मी आता हजर करतो ."
" मला भरपूर सारी खेळणी पाहिजेत."
" खेळणी तर भरपूर आहेत ना आपल्याकडे दुसरं काय
हवं असेल तर ते माग."
" ती खेळणी फार जुनी झाली आहेत पप्पा मला नवीन खेळणी पाहिजेत खेळायला."
" बरं बरं उद्या घेऊन येतो हां "
" उद्या नाही......मला आताच पाहिजेत."
" आताच कशाला पाहिजेत ? उद्या आणू ना ?"
" उद्या नको आत्ताच पाहिजेत."
" बरं बरं ! मग चल जाऊ खेळणी घ्यायला.पण कपडे
दुसरे घाल हो.जा आपल्या मम्मा कडे ....आणि मम्माला सांग , नवीन कपडे घालायला." असे म्हणून त्याने प्रिया
कडे इशारा केला. तेव्हा तो आपल्या आई कडे पाहत
म्हणाला," मम्मा मला नवीन कपडे घाल ना ?"
" कशाला ?" प्रिया
" मम्माला सांग , आम्ही नवीन खेळणी आणायला
चालतोय म्हणून."
" काही गरज नाही त्याची ! घरात भरपूर खेळणी पडली आहेत त्या खेळण्या बरोबरच खेळ अगोदर."
" नाही. मला नवीन खेळणी पाहिजेत." तेव्हा प्रिया
त्याला आपल्या कडे घेण्यासाठी आपले दोन्ही हात पुढे करत म्हणाली," बरं ये इकडे. नवीन कपडे घालते." तशी
त्याने प्रिया कडे एकदम झेप घेतली. ती त्याला आपल्या कडेवर घेत म्हणाली, " तू माझं शहाणं बाळ आहेस ना ?"
" हां मम्मा !"
" मग शहाणी बाळं कधी हट्ट करत नसतात. ते आपल्या मम्मानं सांगितलेले ऐकतात. मग तू ऐकणार ना माझं ?"
" हां मम्मा ऐकणार मी तुझं."
" पप्पा ,आताच थकून भागून घरी आलेत की नाही ?"
" हो मम्मा !"
" मग त्यांना त्रास नाही द्यायचं बरं! नवीन खेळणी
आणायला उद्या जाऊ आपण पप्पा सोबत. चालेल ना ?"
तशी त्याने होकारार्थी आपली मान डोलावली. तशी ती पुढे म्हणाली," माझं शाहांन बाळ ते." असे म्हणून त्याच्या गालाचा एक गोड पापा घेतला. आणि त्याला खाली सोडत ती पुढे म्हणाली," जा आता त्या घोड्यासंग खेळ बरं !" तसा तो पळतच लाकडी घोड्या जवळ गेला नि त्याच्या पाठीवर जाऊन बसत म्हणाला," चल रे घोड्या टिक टिक टिक !" राजाराम दीपक कडे पाहून नंतर प्रिया कडे वळत म्हणाला, " तुम्ही बाया म्हणजे गोड बोलून एखाद्याला कटविण्यात फार हुशार!"
" एखाद्याला नाही काही फक्त बाळाला.आणि त्याला
कटविणे म्हणत नाहीत.तर समजूत काढणं म्हणतात. आणि ते काम फक्त आम्हां बायांनाच जमतं . हे खरं की नाही ?"
" असं नाही काही , आम्हाला पण येतं."
" ते आता आम्ही पाहिलंच की ! कशी नवीन खेळणी
घेऊन द्यायला निघाला होता ते .
" ते फक्त आम्ही नुसतं नाटक करत होतो."
" नाटक....कशासाठी ?"
" तू किचन मधून बाहेर येण्यासाठी !"
" ती तर मी अगोदरच आली होती."
" हो , पण अशी जवळ आली नव्हतीस ना ?" असे
म्हणून तिला जवळ ओढून आपल्या मिठीत घेतले .तशी
ती त्याच्या वर रागवत म्हणाली," अहो, हे काय तुमचं
भलतंच. कुणी पाहिलं म्हणजे ?"
" पाहिलं तर पाहू दे."
" काय पाहू दे काही लाज शर्म आहे की नाही ?"
" त्यात शर्म कसली ? आपण दोघे पती-पत्नी आहोत
म्हटलं."
" हो, पण त्यासाठी मोठी रात्र दिलीय देवाने." दात चावून म्हणाली ," सोडा ना ?" तसा राज तिला सोडून देत
म्हणाला," सोडली....पण काय गं तुला भीती कुणाची वाटते ? पहिल्यांदा तर अजिबात घाबरत नव्हतीस. मग आताच का असं ?
" अगोदरची गोष्ट फार वेगळी होती , आपण दोघेच होतो इथं. परंतु आता तसं नाहीये. मामी सासूबाई आहेत, मामाश्री आहेत आणि तुमचा तो कुटील कारस्थानी बंधू !"
" कुटील का म्हणतेस त्याला ? तो आता बऱ्यापैकी
सुधारला."
" कुत्र्याची शेपुन कधी सरळ होत नाही.नळीत घातली
तरी ती तेवढ्या पूर्ती सरळ नळीतून बाहेर काढली की
ती वाकडीच.म्हणून सावध रहा त्याच्या पासून."
" अगं सावध तर आहेच मी पण तुला असं का वाटतं की
तो सुधारला नाही म्हणून."
" सापाचे पिल्लू सापच असणार, साप कधी दंश करणे
सोडतो का ? नाही ना ? मग हे बाप - लेक त्यापैकी आहेत. म्हणून अति विश्वास करू नका.कारण ज्यांनी
प्रॉपर्टी साठी आपल्या बहिणीचा बळी घेतला.त्यांच्या बद्दल कोणत्याच गोष्टीची खात्री देता येत नाही.बरं ते जाऊ
दे.त्या विषयावर नंतर बोलू. आता तुम्ही एकच करा. कपडे
चैंज करा नि फ्रेश व्हा ! तोपर्यंत मी आलेच चहा घेऊन." ती जाऊ लागते. तसा राज ने तिचा हात पकडला नि म्हणाला," मग त्या साठी किचनमध्ये कशाला जायला हवं ? तो पण चहा इथंच असतांना ?" तिने आपल्या
आजूबाजूला पाहून म्हटलं , " इथं कुठं चहा आहे ?"
" तुझ्या ओठात आहे ना, तो पिऊ दे मला चहा दुसरा
कशाला पाहिजे चहा ?" असे म्हणून तिच्या दोन्ही खांद्याना पकडून तिच्या ओठा जवळ आपले ओठ नेले तशी प्रिया त्याच्या ओठांवर आपला हात ठेवून म्हणाली, " अंहुं ss त्यासाठी ही वेळ योग्य नाही. जा अगोदर कपडे चैंज करा. " असे म्हणून त्याच्या दोन्ही हात आपल्या हातात
घेत एकदम विनंतीच्या स्वरात म्हणाली," मी आहे ना इथंच, कुठं जाणार आहे का ? आता जा... ना प्लिज !"
" ओके माय डार्लिंग !" असे म्हणून तो आपल्या बेडरूमच्या जायला निघाला. तशी प्रिया किचनमध्ये
जायला निघाली.
दुसऱ्या दिवशी मात्र कंदन साठी शो रूम मधून नवीन कोरी करकरीत कार दरवाजात येऊन उभी राहिली. त्या कार ची किल्ली कंदन कडे देत राज म्हणाला," ही कार तुझ्यासाठी घेतली." कंदन ने खुश झाल्याचे वरकरणी नाटक केले. उगाचच बोलायचं म्हणून कंदन बोलून गेला की काय गरज होती कार ची ? मी तुझ्या मोटातीतून गेलो
असतो ऑफिस ला , उगाचच हा खर्च का केलास माझ्यासाठी !
" उगाचच नाही .....गरज होती त्याची !" असे म्हणून राज आपल्या बेडरूमच्या दिशेने निघून गेला. त्याच्या पाठोपाठ प्रिया सुध्दा गेली.राज आपल्या गळ्यातील
टाय काढतच होता तेवढ्यात प्रिया पुढे झाली नि तिने
त्याच्या गळ्यातील टाय काढला.तसा राज तिला म्हणाला
म्हणाला," बोला, राणी सरकार काही हवंय का आपल्याला ?" लटक्या रागाने म्हणाली," काही नका लाडी गोडी लावू आम्हांला ?"
" आमचं काही चुकलं का राणी सरकार ?"
" हो चुकलंच मुळी !"
" काय ते सांगाल ?"
" मला आधी सांगा त्या कंदन ला नवीन मोटार का घेऊन दिली ?"
" अच्छा म्हणून राग आलाय होय आमचा ?"
" रागवू नको तर आणखीन काय करू ? राग येण्या
सारखेच काम करता तुम्ही ? त्या बाप-लेकान आणू नका
या घरात म्हटलं तरी आणलात. आज कार आणली उद्या
आणखीन काहीतरी , अश्याने अजून हाव नाही सुटणार
का त्याला ?"
" अगं त्यानं काहीच मागितलं नाही.मी आणून दिली त्याला कार ."
" तेच म्हणते मी काय गरज होती ?"
" गरज कशी नाही , ऑफिस मध्ये जाईल कसा तो ?
म्हणून नवीन कार मागविली त्याच्यासाठी तर बिघडलं
कुठं ?"
" मामाश्री आता ऑफिस मध्ये जात नाहीत ना, मग त्यांची मोटार असेल ना ? ती द्यायची होती ना त्याला."
" आणि मामाश्री ना कुठं जायचं असेल तर ! त्याना
नको का गाडी ? आणि जेवढा आपला ह्या प्रॉपर्टी वर
अधिकार आहे, तेवढा त्याचा ही आहे."
" तर तर म्हणे अधिकार ! मागच्या वेळी नाही का
तुम्ही त्याला दिला होता अधिकार ,अर्थात अर्धी प्रॉपर्टी
त्याच्या नावी करून. पण त्याने त्या संधीचा कसा
गैरफायदा करून घेतला हे सारे माहीत असूनही पुन्हा तीच चूक करायला निघालात तुम्ही ! काय म्हणावे तुम्हांला ? आणि काय हो इतक्या लवकर कसे विसरता तुम्ही अश्या लोकांना ?"
" अगं मी काहीच विसरलेलो नाहीये. परंतु तोच कित्ता
परत परत गिरवत बसलो तर कसं चालेल बरं ? आणि
काय आहे , ती माणसं कशी जरी असली तरी ती ह्याच
घरची आहेत हे कसं विसरून चालेल आपल्याला ? शिवाय असं म्हणतात की प्रत्येक गुन्हेगाराला एक संधी
मिळायलाच पाहिजे.जसे सरकार चोरांना देते सुधारण्याची
तशीच एक वेळ संधी आपण ही द्यायला हवी असे मला
वाटते.असं माझं मत आहे.आता त्यावर तुझं मत काय
आहे ते बोल."
" माझं मत इतकंच आहे की संधी देताना हे अवश्य पाहिलं पाहिजे की ज्याला आपण देणार आहोत.तो त्यास
पात्र आहे का ? नाहीतर माकडाच्या हातात दिली कोलीत
माकड निघाला सर्वत्र आग लावत तसं नको व्हायला.
एवढंच माझं म्हणणं आहे."
" मी त्या गोष्टींचा सारासार विचार केला आहे प्रिया
असं नाहीये की मी अंधविश्वास करून सर्व काही करत
नाहीये. त्यात करून माझ्यासाठी माझ्या आजोबांची इच्छा
फार महत्वाची आहे. त्यांची हीच इच्छा होती ना की त्यांच्या एकुलत्या एक मुलांवर आजवर जो अन्याय होत
आला तो भविष्यात होऊ नये.मग त्यांच्या इच्छेखातर मी
त्यांचा अधिकार त्याना देवू केला तर बिघडलं कुठं ?"
" तुम्ही माझं म्हणणे अजूनही समजून घेत नाही आहात.
अहो विश्वास करायचा असतो पण कुणावर ? जे लोक मिळालेल्या संधीचा दूर उपयोग करत नाहीत अश्या लोकांवर . हे लोक म्हणजे डूख धरलेले सापा सारखे.... कधी दंश करतील याचा काही नेम नाही. अश्या लोकांपासून जरा सावध असायला पाहिजे. असं मला
आपलं वाटतं. आता तुम्हाला ते नाही त्याला माझा
नाईलाज आहे."
" इथं पटण्याचा प्रश्न नाहीये तर नात्यांचा प्रश्न आहे.
रक्ताचं नातं आहे ते, असं कसं विसरता येईल.दातांनी
ओठांना कुरतडलं म्हणून दातांना काढून टाकता येत
नाही ना ? कारण दोन्ही आपलेच दोष कुणाला देणार !
पण तू अजिबात चिंता करू नकोस.ह्या वेळी मागची
सारखी पुनरावृत्ती होणार नाही याची हमी मी देतो.
कारण यावेळी मी बेसावध नाहीये. तेव्हा मागच्या सारखी चूक पुन्हा होणार नाही एवढा तरी विश्वास ठेव माझ्यावर."
" तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा.परंतु त्या बाप
लेका वर माझा अजिबात विश्वास नाहीये. कसं आहे ना एकदा दुधाने तोंड पोळल्या नंतर माणसं ताक सुध्दा फुकुन पितात म्हटलं .कारण सद्याची परिस्थितीच आहे तशी !"
" हो दोन्ही कडे लक्ष आहे माझं. तू अजिबात चिंता
करून नकोस त्याची !" असे म्हणून तिला जवळ ओढत
म्हणाला, " आता तोंड गोड कर माझं." असे म्हणून आपले तोंड तिच्या ओठा जवळ नेतो तशी ती आपलं तोंड बाजूला फिरवत म्हणाली," तोंड गोड करायची ही
वेळ नाहीये. मग रात्री करते तोंड गोड तुमचं. तोपर्यंत बाय
बाय ! " असे म्हणून ती पळायला पाहत असते. पण राज
तिला पकडून आपल्या कडे एकदम ओढतो. तशी ती त्याच्यावर आदळली. त्यामुळे दोघांचाही एकदम तोल गेला
नि दोघेही पलंगावर कोसळले. राज खाली आणि प्रिया वर आणि दोघांचे ओठ ही एकमेकांच्या समोर असतात. मग अशी संधी राज जाऊन देणार आहे थोडीच तो पटकन तिच्या ओठांचे किस घेतो. तसे तिच्या सर्वांगात गोड शहारे येतात. त्यामुळे तिला ही वाटते की अशीच राज च्या मिठीत पडून राहावे. तेवढ्यात मामी सासूबाईचे स्वर कानी पडला .तशी ती भानावर आली आणि त्याला प्रिया म्हणाली," सासूबाई हांक मारतात मला. सोडा मला." असे म्हणून ती त्याच्या मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न करते. परंतु राज काही तिला सोडत नाही. उलट तो तिला जास्तच गच्च पकडून म्हणाला," ओरडून दे गं ओरडून ओरडून गप्प बसेल. अजून तर काय ?" त्यावर ती त्याला
म्हणाली ," अहो, असं काय करताय दरवाजा उघडा आहे,
आपल्याला नको त्या अवस्थेत पाहतील ना त्या ?" त्यावर
राज खुदकन हसला. तशी ती त्याच्या वर चिडत म्हणाली,
" आता हसायला काय झालं ?"
" अगं हसू नाहीतर आणखीन काय करू ? त्या बघायला त्याना दिसायला तर हवं ना बेबी !" असे म्हणताच तिच्या लक्षात आलं की सासूबाई आंधळ्या आहेत. तेव्हा ती एकदम खजील होतं म्हणाली," सोडा ना प्लिज ! मला कामं आहेत भरपूर !"
" कामं करायला नोकर आहेत ना ? ते करतील सारं काम तू फक्त एकच काम करायचं आणि ते काम म्हणजे तू फक्त प्रेमच करायचं माझ्यावर."
" रात्र कमी पडते का आपल्याला ?"
" अगर हमारे बस में होता ना, तो हम ऑफिस में कभी
भी न जाते!"
" तो क्या करते घर में ?"
" बीवी की गुलामी करते."
" वो लोग आपको झोरु का गुलाम कहते तो चलता था
क्या आपको ?"
" बिल्कुल चलता क्योंकि सारी दुनिया झोरु का गुलाम
है ! वैसे झोरु का गुलाम बनने का कुछ अलग ही मजा है।"
" अच्छा क्या मजा है , बताईए ।"
" थांब. सांगतो. इकडे तोंड कर ना ! " त्याच्या कडे न
पाहता तिने विचारलं ," कशाला ?"
" त्याशिवाय मी सांगतो ते कळणार कसं तुला ?"
" कळत बरोबर सांगा." तेवढ्यात अरुंधती दरवाजा
समोर आल्या. प्रियाचं त्यांच्यावर लक्ष जाताच ती पटकन
त्याच्या पासून दूर होत म्हणाली," त्या बघा मामी सासूबाई आल्याच शेवटी मला शोधत , शोधत. आता तरी जाऊ द्या
मला." असे म्हणून प्रिया पटकन पलंगावरून उठली
नि दरवाजा कडे जात उद्गारली," आले सासूबाई , काय
म्हणता ?" त्यावर अरुंधती म्हणाल्या," काही नाही गं,
माझ्या डायबिटीस च्या गोळ्या कुठं सापडत नाहीयेत मला. तू पाहिलेस का कुठं ?" त्यावर प्रिया म्हणाली," हो हो मी उचलून ठेवल्यात त्या. मघाशी तुमचा रूम मी नीटनेटका करत होते ना , तेव्हा सापडल्या त्या मला.चला मी देते तुम्हाला." असे म्हणून प्रिया त्यांच्या सोबत निघून गेली.राज बसला हात चोळीत.
प्रिया बेडरूम च्या बाहेर निघून गेल्यावर तिच्या
पाठमोरी आकृती कडे तो स्वतःशीच म्हणाला," हीच एके
काळी कंदन वर जिवापाड प्रेम करत होती. त्याच्या वरील
प्रेमापोटी ती त्याच्या कुटील कारस्थानात सामील झाली
आणि माझ्याशी लग्नही केलं. परंतु ती मला पतीचा अधिकार देऊ इच्छित नव्हती. कारण त्यात त्या दोघांचे प्रेम आडवं येत होतं. म्हणून ती रोज दुधात नशेली औषध टाकून ती ते दूध मला पाजत असे. आणि मी झोपी गेल्यावर कंदन आणि प्रिया दोघेही लैंगिक मजा लुटत असत . आणि त्याची मला यत्किंचितही कल्पनाही नसे. आणि असं करण्या त्या मागचा त्यांचा उद्देश एकच होता आणि तो म्हणजे तिच्या पोटी जन्माला येणारे
बाळ ही त्यांचेच असावे. दोघांचा प्लॅन जर जबरदस्त होता.
पण म्हणतात ना , किसी के चाहने या न चाहने से क्या होता है, होता वही हैं जो मंजूरे खुदा होता हैं याचा प्रत्यय
तेव्हा आला जेव्हा आम्ही दोघे हनिमून ला गेलो होतो. झाले असे की आम्ही हनिमूनला कोठे आणि केव्हा जाणार
आहोत. याची खबर कंदन ला प्रिया मार्फत समजली
होती. मग त्यानंतर त्या लोकांनी योजना बनविली. आणि
योजने नुसार कंदन आपल्या मित्राला घेऊन आम्ही
जाणार होतो तेथे पोचला. आणि त्याने हॉटेलच्या
रिसेप्शनिस कडून माहिती मिळविली. आम्ही बुक
केलेली रुम किती नंबरची आहे वगैरे ...त्यानंतर त्या
लोकांनी आमच्या अगदी शेजारचीच रूम बुक केली.
मला जेव्हा तो आपल्या मित्रा सोबत त्या हॉटेल मध्ये
दिसला तेव्हा मी त्याला विचारले की तू इथं कसा ? तर
तो मला म्हणाला की मी माझ्या मित्रा सोबत आम्ही इथं पिकनिक करायला आलोय. मला वाटलं की हा योगायोग असावा. परंतु तो योगयोग नव्हता. तर ते कुटील कारस्थान होते. आणि त्यात प्रिया ही सामील होती हे विशेष ! त्या
दोघांचे प्लॅन असं होतं की जेव्हा वेटर दूध घेऊन येईल
तेव्हा त्या वेटर ला टीप देऊन त्याच्या कडून हे काम
करून घ्यायचे.आणि त्या प्रमाणे ते यशस्वी पण झाले.
माझ्या मणी ध्यानी काही नसल्यामुळे मी त्या वेटर ने
आणून दिलेले पीत असे.आणि दूध पिल्यानंतर थोड्याच
वेळात मला झोप येत असे आणि मी झोपून जात असे.
आणि त्यानंतर पूर्ण रात्र त्या दोघांचा लैंगिक खेळ सुरू राहात असे. मला मात्र त्याबद्दल काहीच माहीत नसे. मी सकाळी उठल्यावर ती म्हणे की आज खूप मजा आली नाही का ? त्यावर मी म्हणे कसली मजा मला तर काहीच आठवत नाहीये. मी तिला विचारत असे की रात्री काय
झालं आपल्या मध्ये ? त्यावर ती हसून म्हणे की अजून
काय होणार ? जे नवरा-बायको मध्ये होते तेच. त्यावर
मी म्हणे मला तर काहीच आठवत नाहीये."
" कसं आठवणार ? तुम्ही शुध्दीत असाल तेव्हा ना ?"
" म्हणजे मी शुध्दीत नसतो तेव्हा !''
" शुध्दीत असता हो, पण नसल्या सारखे."
" म्हणजे मला कळलं नाही तुला काय म्हणावयाचे आहे ते."
" अहो तुम्ही दूध पिता ना, त्याने तुम्हाला झोप येते.
मग झोपेत तुम्ही काय करता हे तुम्हाला आठवत नाही.
जसे रात्री झोपेत चालणारी माणसं बघितले असाल चित्रपटांमधून.अगदी तसेच सकाळी उठल्यावर.मात्र त्यांना
काहीच आठवत नाही.अगदी तीच परिस्थिती तुमची आहे."
" म्हणजे मला कसला तरी आजार झाला आहे, असेच
म्हण ना ?"
" हो."
" मग तर मला मुंबईला गेल्यावर आपण त्याचा इलाज
करू पण आता आलोच आहोत तर हनिमून साजरी
करूनच जाऊ ,काय म्हणते मी !" त्यावर मी ओके म्हणालो.पण का कुणास माझ्या मनात एक संशय आला
की ह्या दुधा मुळे तर मला झोप येत नसेल ना , असेल ही !
मगआज एक काम करायचं दूध प्यायचच नाही बघू काय
होतं ते.आणि रात्री मी त्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला
पण प्रिया ने मला जबरदस्तीने दूध पाजलं.परंतु मी ते दूध
पूर्ण न पिता अर्धे दूध बळजबरीने प्रिया ला पण पाजलं.
आणि प्रिया मला मनाई ही।करू शकली नाही. कारण तिला त्याचे कारण सांगावे लागले असते आणि तेच तिच्या जवळ नव्हते. त्यानंतर आम्ही दोघेही नशेमध्ये धुंद होतो. आणि त्या नशेमध्येच आम्हां दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. आणि त्यानंतर आम्ही एकमेकांच्या मिठीतही झोपून गेलो. मी पूर्ण नशेत नसल्याने मला रात्री
काय घडलं ते सारे आठवत होते. मात्र प्रियाला काहीच
आठवत नव्हते. कारण तिला नशा करायची सवय नसल्याने अर्ध्या ग्लासातच तिला फार नशा झाली.
आणि देवाची करणी आणि नारळात च्या आंत पाणी असे म्हणतात.ते खरंय. म्हणजे बघा ना , ते दोघेही रोज रात्री शाररिक संबंध करत होते.परंतु तरीही कंदनचा बीजांकुर तिच्या पोटात वाढला नाही. पण माझ्या एक दिवसाच्या प्रयत्नात तिच्या पोटात बीजांकुर बस्थान मांडले. नि हळूहळू तो पोटामध्ये आकार घेऊ लागला नि नऊ महिने
पूर्ण होताच त्या बळाने जन्म घेतला. त्या दोघांना तर
अतिशय आनंद झाला.म्हणजे त्या दोघांना असे वाटत होते
की ते बाळ त्या दोघांचे आहे.परंतु मला त्या दोघांच्या
नात्या विषयी काही कल्पना नसल्याने मला वाटले ते बाळ
माझे आहे. परंतु त्या दोघांना मात्र वाटत होतं की ते बाळ
त्याचे आहे. परंतु म्हणतात.पाप करणाऱ्या ला परमेश्वर
अशी अद्दल घडवितो की त्यांची त्यांनी कधी कल्पना
देखील केलेली नसते. पण का कुणास तिला आपल्या
कृत्याची लाज वाटू लागली.आणि त्यामुळे तिच्यात बदल
होत गेला. तिला स्वतःला जाणवू लागले की आपण
जे करतोय ते पाप आहे, असे जाणवल्या नंतर मात्र
तिने कंदन ला टाळू लागली. तशी कंदन ला पण त्या
गोष्टीची जाणीव झाली की प्रिया आता बदलली आहे,
अर्थात ती आता राजाराम वर प्रेम करू लागली आहे.हे
त्याच्या लक्षात येताच तो तिचं गुपित सर्वांसमोर
आणण्याचा त्याने एक डाव खेळला. परंतु तो स्वतःच त्यात तोंडघशी पडला. प्रियाचा अपराध माफ करण्या
योग्य तर नव्हता. परंतु एक चान्स देणे गरजेचे आहे असा
विचार करून मी तिला माफ केले. ते म्हणतात ना
देर आये लेकिन दुरुस्त आए ऐसी कहावत है सुबह का
भुला अगर श्याम को घर लौट आये तो उसे भुला नहीं
कहते.असा विचार करून मी तिला मोठ्या मनाने माफ
केले. त्यानंतर तिने देखील प्रामाणिक पणा दाखविला.
आणि माझ्याशी एकरूप झाली. म्हणूनच आज ती मला उपदेश करू लागली आहे की कंदनला पुन्हा चान्स देऊ नका म्हणून. परंतु असे करणे अयोग्य ठरणार नाही का ? म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं कसं बरं मी कसं करू शकतो ? एक संधी तर त्याला मिळायलाच हवी ना, म्हणून मी त्याला माझ्या घरी आणलं. आता पाहू तो परीक्षेत पास होतोय का ते.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा