कुरुक्षेत्र - ५१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र - ५१ |
आई म्हणाली ," हा सारा खेळ आपल्या दैवाचा आहे बाळ.
आपल्या हातात काहीच नसते . आपण फक्त निमित्त असतो . तेव्हा यशदादा म्हणाला ," हे जरी खरे असले तरी तू आमच्यापासून एवढे मोठे रहस्य लपविले नसते तर कदाचित आता जे घडले ते मात्र निश्चित झाले नसते . त्यावर आई उत्तरली ," जे झाले यायला उपाय नाही आता. चल मला त्याच्याकडे घेऊन."
" हो. चल आम्ही पण येतो तुझ्या सोबत." मग आम्ही सर्वजण जायला निघालो.
कल्याणला इमर्जन्सी वार्ड मध्ये दाखल केलेले असते. आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू झालेले असतात.
मोठे आई- बाबा सुध्दा तेथे उपस्थिती असतात. त्यांनी अगोदर कल्याण च्या घरच्यांना फोन करून इस्पितळात
बोलविले असते. कल्याण चे पालन कर्ते आई-वडील, वैशाली वहिनी आणि दोन मुले आलेली असतात. आम्हाला
इस्पितळात आलेले पाहून मोठ्या बाबांना आणि मोठ्या आईला मोठं आश्चर्य वाटत होते आणि मोठी खाऊ की गिळू ना नजरेने आमच्याकडे पाहत असते . शिवाय त्या दोघांना असा प्रश्न पडला असावा की आम्ही कशासाठी आलोय इस्पितळात आता ? कदाचित धीरज जिवंत आहे का मृत्यू
पावला हे पाहण्यासाठी आलो असे वाटले असावे. म्हणूनच की काय मोठ्या आईचा राग अनावर झाला. तशी ती रागाने आमच्याजवळ आली आणि म्हणाली ," आता काय बघायला आले तुम्ही ? माझा धीरज जिता आहे का मेलाय ते. तिच्या या बोलण्याने आम्ही चपापलोच. पण काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा मग ती आमच्या आईला उद्देशून बोलली,
" कुंदा पाहिलेस तुझ्या मुलांनी माझ्या मुलांसोबत काय केले ते ?" त्यावर आई शांतपणे म्हणाली ," ताई कसे घडले ? कोणी घडविले हे सारे तुलाही चांगलं माहिती आहे.
तरी देखील मलाच विचारतेस ? '" त्यावर मोठी आई काहीच बोलली नाही. तेवढ्यात डॉक्टर अभय ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येतात. तसे आम्ही त्यांच्या भोवती गोळा झालो. तेव्हा आम्ही त्याना विचारले की , कसा आहे आमचा भाऊ ?" परंतु त्याना वाटले की आम्ही धीरज बद्दल चौकशी
करत आहोत. म्हणूनच की काय ते आम्हाला म्हणाले ," तुमचा भाऊ धीरज अजून बेशुद्ध आहे . गोळी काढली आहे त्याच्या शरीरातून ; परंतु ......
" परंतु काय ?" मोठ्या बाबांनी अधीरतेने विचारले.
" परंतु तो वाचणार नाहीये."
" काय ? " मोठ्याने किंचाळली मोठी आई.
डॉक्टर म्हणाले ," हां ."
" आणि कल्याण डॉक्टर ?" मी विचारले .
" तो शुध्दीवर आला आहे. तुम्ही त्याला भेटू शकता."
आम्ही जसे त्याला भेटायला निघालो तसे इन्सपेक्टर विनय
सावंत म्हणाला , " थांबा . अगोदर मला साक्ष दे उद्या त्याची." असे म्हणून इन्स्पेक्टर विनय सावंत कल्याणच्या वार्ड मध्ये शिरला आणि थोड्या वेळात बाहेर आला. त्यानंतर आम्ही आत गेलो. कल्याणची पालन करते आई-बाप अगोदर आत प्रवेश करतात. त्यानंतर आम्ही सुध्दा आंत
प्रवेश केला. वैशाली वहिनी आणि दोन मुलं असतात. तेव्हा
पालनकर्ती आई कल्याण ला बिलगली नि म्हणाली ," पोरा
काय झालं हे ?" तेव्हा कल्याण तिची समजूत काढत म्हणाला ," आई रडू नकोस . मला माहितेय की मी तुझा ऋणी आहे. तुझे ऋण या जन्मात फेडू शकलो नाही. परंतु पुढल्या जन्मी मात्र तुझे ऋण नक्की फेडेन मी तुझ्या पोटी जन्म घेऊन ' त्यावर त्याची आई म्हणाली ," नाही रे पोरा , तू माझ्या ऋणी नाही. उलट मीच तुझी ऋणी आहे. मूलबाळ नसलेली निपुत्रीक स्त्री होती मी .परंतु तू माझ्या घरी आल्या मुळे मला आई होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. माझ्या घराचे नंदनवन तुझ्या मुळे झाले. जवळच वैशाली वहिनी उभी होती.
तिच्या डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहत होत्या. तिच्याकडे पाहत कल्याण म्हणाला," वैशाली तुझ्या पासून एक सत्य लपविले आहे. ते मी तुला आज सांगणार आहे. असे बोलून त्याने आईकडे खुण करत म्हटले ," ही माझी जन्मदात्री आई आहे . आणि हे तिघे माझे लहान भाऊ आहेत .अधिक बोलल्याने त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागते. तेव्हा वैशाली वहिनी बोलली ," बोलू नका तुम्ही प्लिज ! "
" बोलू दे वैशाली आज मला रोखू नकोस. आज बोललो नाही तर पून्हा कधीच बोलू शकणार नाहीये. पुन्हा रक्ताची वांती होते. बळीदादा डॉक्टरांना बोलवायला बाहेर पडतो. कल्याणला आता शब्दही उच्चारता येत नव्हते. म्हणून त्याने आपल्या दोन्ही मुलांना खुणेने आपल्या जवळ बोलविले. ते दोघे जवळ येतात तसे त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि आईकडे पाहत बोलला ," आई ,तुला मी दिलेले
वचन पाळले. तुझ्या तिन्ही मुलांना मी काही होऊ दिले नाही.
मात्र मी तुला चाललोय सोडून .असे म्हणताच त्याची प्राण ज्योत मालवली. तेवढ्यात बळीदादा डॉक्टरला घेऊन आला. परंतु तोपर्यंत सारा खेळ संपलेला असतो. तेव्हा डॉक्टर ,अभय खबर आले कीं धीरज शुध्दीवर आला म्हणून. तशी मोठे आई-बाबा त्याला भेटायला गेले. त्याने कल्याण बद्दल प्रथम चौकशी केली. कल्याण हे जग सोडून गेल्याचे कळताच. त्यांनी स्वतःचे डोळे मिटून घेतले .ते कायमचे . त्यानंतर मोठे आई-बाबांनी त्याला खूप हाका मारून पाहिल्या परंतु त्याने ओ दिला नाही . तेव्हा मग ,मोठ्या आईने एकदम हंबरडा फोडला. आम्ही काय समजायचे ते समजून गेलो. तेवढ्यात आजोबांना कोणीतरी जाऊन खबर दिली. आजोबांना हा आघात सहन झाला नाही. त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला . एकाच दिवशी तीन अंतयात्रा निघाल्या घरातून. परंतु झाले ते फार वाईट झाले होते. पण हा खेळ कुणाचा होता ? प्रक्तनाचा की स्वतःच्या अहंपणाचा ? का प्रॉपर्टी च्या लालसेचा ? परंतु कुणाला तरी याचे उत्तर देता येईल का ? प्रश्नच आहे. नाही का ?
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा