पुत्र असावा ऐसा ( भाग चौथा )
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुत्र असावा ऐसा ( भाग चौथा ) |
अखेर तसेच झाले .विशालच्या वडिलांनी विशाल लाच पैसे देऊ केले.परुंतु त्याने घेण्यास नकार दिला. विशाल बरोजगार झाला. त्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती फारच बिकट झाली. दुसरी नोकरी ही मिळेना. दुसरी गोष्ट म्हणजे घर कसे चालवावे हाच मोठ प्रश्न होता. धंदा करायचा म्हटला तरी त्यासाठी भांडवल कुठून आणावयाचे ? त्यात करून आई-वडीलांचीही जबाबदारी त्याच्यावरच होती
कारण दोन्ही मोठ्या भावांकडे चार चार महीने राहून आता तीन नंबरच्या घरी राहायला आले होते. तेव्हा त्याने दोन्ही भावाना विनंती करून पाहीली की यावेळी आई-बाबाना तुमच्याच घरी राहूं दे. जरा माझीआर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून आई-बाबाना तुमच्या पैकी कुणीतरी ठेवून घयावे. " त्यावर त्याचा मोठा भाऊ कुत्सितपणे म्हणाला," का ? सगळी अकड निघाली ? म्हणे आई-बाबांच्या खानावळीचे पैसे घ्यायचे नसतात कळलं. आता किती कठीण आहे ते घर चालविने. "
" दादा मी माझ्या मताशी अजूनही ठाम आहे तुम्हा दोघांना फक्त एकच विनित आहे की फक्त हे चार महीने आई-बाबांची जबाबदारी घ्या. वाटल्यास आई-बाबा कडून मिळणारे पैसे तुम्ही घ्या पण त्याना सांभाळा " असे म्हटल्याने दोन्ही भावांच्या तोडाला पाणी सुटलं. मग त्यातील एकजण म्हणाला," आतापर्यंत तू न घेतलेले पैसे आम्ही घ्यायचे ?" मोठ्या भावाने विचारले।
शेवटी नाईलाजाने विशाल बोलला," हां !"
तसे त दोघेही तयार झाले. आपल्या घरी आई-बाबाना ठेवायला दोघांनी पैसे अर्ध -अर्धे वाटून घ्यायचेही ठरले. पण त्याच वेळी बाबा म्हणाले," आम्हाला विशालच्याच घरी राहायचंय. ''
" पण बाबा माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे, अशा परिस्थिती मध्ये मी आपला कसा सांभाळ करणार ? "
" अरे बाळा अशी परिस्थिती येते कधी कधी म्हणून डगमगून जायच नसंतं. बेधडक सामोरी जायचं नि आलेल्या संकटावर मात करायची. "
" पण बाबा ---?
" तू काही चिता करू नकोस सर्व काही ठीक होईल. "
त्याचे दोन्ही भाऊ रागाने निघाले तेव्हा त्याना।म्हणाले," या पुढं तुम्ही दोघेही आम्हांला न्यायला येऊ नका. कारण आम्ही विशालकडेच राहणार मरेपर्यंत जा चालते व्हा इथून. "
तेव्हा विशाल म्हणाला ," अहो बाबा असं केलं तुम्ही ?" त्यावर बाबा म्हणाले," योग्य तेच केलं. तुला पण आम्ही जड झालो असेल, तर सांग आम्ही इथून पण कुठंतरी निघून जाऊ ?" असे ते मुद्दामच म्हणाले.
" अहो बाबा असं का बोलता तुमही ? तुम्ही मला कसे जड व्हाल बरं ? माझ्या शरीराच्या चामड्याचे जोड करून तुमच्या पायात घातले तरी तुमचे ऋण फिटणार नाही. "
" मग विशू बाळा आम्हाला इथंच राहू दे. "
" जशी तुमची इच्छा!"
त्यानंतर तो आपल्या आई-वडिलांना कधीच बोलला नाही की माझ्या दोन्ही मोठ्या भावाकडे राहायला जा, म्हणून पण घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.
आणि मुख्य म्हणजे तो आपल्या आई-वडिलांचे पैसे तो कधी घेत नसे. परंतु आता परिस्थिती फार बिकट होती म्हणून त्याचे वडीलच त्याला म्हणाले," बाळ विशू आता तरी पैसे घे रे बाबा ,आमच्या खानावळीचे " त्याची आई म्हणाली.
" अग आई तू नकोस चिता करू मी करेन कुठूण तरी पैशाची सोय. " त्यावर त्याचे वडील म्हणाले ," कुठूण कशाला सोय करतोयेस ? माझ्या नावावर जे पैसे आहेत ते तुझे आहेत की काढून घे ते. "
" नको बाबा ,तुमच्या खानावळीचे पैसे मी जर घेतले तर माझ्या सारखा नालाईक मुलगा नाही दुसरा. "
" अरे मग कर्ज समजून घे. तुझ्याकडे पैसे आले की परत आमच्या नावे ठेऊन दे बॅकेत एवढं तर करू शकतोयेस ना तू ?
बाबांचा विचार त्याला पटला. मग त्याने आपल्या आई-वडिलांच्या नावावर असलेले पैसे काढले. नि छोटासा धंदा सुरू केला. घाऊक बाजातून भाजी विकत आणून ती रोडवर गाडी लावून विकू लागला हळूहळू धंद्यात जशी वाढ होत गेली तशी त्याने एक दुकानाचा गाळा भाडयाने घेतला. धंद्यात अजून वाढ झाली. तसे त्याने बीशीत पैसे गुंतवले जशीे बीशी लागली. तसे ते पैसे आई-वडिलांचे जे बॅकेतून काढले होते, ते परत त्यांच्या नावावर ठेवून दिली. एक दिवस त्याच्या आईने त्याला विचारले," अरे बाळा आमचा सर्व खर्च तूच करतोस मग ते पैसे तुलाच ठेव ना ?"
" नको गं आई आहेत माझ्याकडे पैसे आणि लागले तर पुन्हा घेईन ना?" असे बोलून तो वेळ मारून न्यायचा जसं वय वाढत जातं तसं माणसाचं शरीर सुध्दा थकत जातं विशालचे आई-वडिलांचे देखील आता वय झालं होतं त्याना आता पुर्वी सारखं चालता. पण येत नव्हतं, म्हणून मग कुठं न्यायचं झालं, तर फार पंचाइत व्हायची पण त्यावेळी विशाल आपल्या आईला लहान बाळा सारखे उचलून घेत, असे आणि गाडी मध्ये बसवत, असे विशालची पत्नी सुध्दा विशाल प्रमाणेच आपल्या सासू-सासऱ्याची फार काळजी घ्यायची दररोज तिला आंगोळ घालून स्वच्छ कपडे घ्यालायची. त्यामुळे तिची आल्या गेलेल्याना सांगायची की मागील जन्मात मी जरूर काहीतरी पुण्य केले असावे, म्हणून लेकीच्या मायेची सून मिळाली खूप भाग्यवान आहे. मी त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची लोकं त्या दोघांचे गूणगाण गातात. आणि खरंच आहे ते चांगलं करणाऱ्या माणसाचे गुण गायलेच जातात.
आणि आई-वडीलांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावावर बॅकेत असणारे पैसे स्वतः न घेता आई-वडिलांच्या नावाने वृद्धाश्रमला दान केले म्हणूनच म्हणावेसे वाटते की, विशाल सारखा सर्वाच पुत्र असावा ऐसा
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा