Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

पुत्र असावा ऐसा ( भाग तिसरा )

 

पुत्र असावा ऐसा ( भाग तिसरा )
पुत्र असावा ऐसा ( भाग तिसरा )


         "तुम्ही सुद्धा बाबा सोबत गार्डन मध्ये फिरायला जा . तिथ तुमच्या वयाचा . खूप बाया असतात. त्यांच्या सोबत मैत्री करा. मग त्यांच्या सोबत तुमच्या पण टाईमपास होत जाईल. असं ?

        " एकदम बरोबर . बोललीस तू सूनबाई ! मी हिला किती दिवसापासून तेच सांगतोय की तू माझ्या सोबत फिरायला चल . तर मला बोलते की, हे काय वय आहे का आपलं , फिरायचं ?" गणपतराव म्हणाले .

        " मग बरोबर तेच बोलली मी . हे काय जोडयानं फिरायचं वय आहे का आपलं ? उगाच आपलं काय पण बोलायचं ." सुमतीबाई लटक्या रागानेच म्हणाल्या .

        " काय पण आई, बाबा अगदी बरोबर बोलताहेत . आणि आपल्याच नवऱ्याबरोबर फिरायला कसली लाज आहे ? आणि मी म्हणते का लाजायचं  नि कुणाला लाजायचं ?"

       " बघ ना, मी पण तेच म्हणतोय ."

       " तुम्ही तर बोलूच नका. म्हातारपणी नको ते चाळे सुचतय तुम्हाला "

        तेवढ्यात तेथे विशाल येतो . त्याने आपल्या आईचे बोलणे किंचित असावे . तो आपल्या आईला म्हणाला, " आई , तू त्याच्या नादाला नको लागूस . मी काय सांगतो ते ऐक."

       " तू काय संगतोयस आता. सांग बरं."

       " आई तू ना, टिव्हीवरचे प्रोग्राम बघत बैस . चांगला टाईमपास होऊन जाईल तुझ्या नाहीतर मोबाईल मध्ये गेम खेळत  बैस !

       " अरे' गेम खेळायला , मी काय लहान आहे का आता ?" उगाच काय पण संगतोयस ."

       " आई , गेम फक्त लहान मुलच खेळत नाहीतर तुमच्यासारखी मोठी माणसं पण खेळतात. हो की नाही हो बाबा?"

       " अरे बाबा, तिला नाही कुणी सांगितलेलं सुटायचं. करू दे तिला तिच्या मनासारखं ." गणपतराव उद्गारले .

       " बरं आई तुझं काय म्हणणं आहे?" विशाल ने एकदम प्रमळपणाने  विचारले.

       " मला ना, नुसतं बसून राहायला नाही आवडत रे, आणि तुझी बायको मला काहीच काम करू देत नाही रे, काय करू मी?" सुमतीबाई बोलल्या ."

       " मी सांग."

       " हो तू सांग."

       " आता ना थोड्याच दिवसांनी आपल्या घरात एक नवीन पाहुणा येणार आहे. मग त्याला खेळवत बस . हे तर जमेल ना तुला ?"

        तश्या त्या एकदम खूष होत म्हणाल्या, "कितवा महिना आहे सूनबाईला ?"

       " हा तिसरा महिना आहे ." प्राजक्ता लाजून म्हणाली.

       " अरे वा, फार गोड बातमी दिलीस तू ---- पण---- त्या बोलता -बोलता मध्येच बोलायच्या थांबल्या नि त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंद क्षणात मावळला . ते विशालच्या ध्यानात आलं तसा तो म्हणाला , " आई, काय झालं? एकदम चेहरा पडला का तुझा?"

        त्यावर त्या म्हणाल्या, " काही नाही रे, तुझी बायको बाळंत होईल तेव्हा मी इथं नसणार आहे. याच वाईट वाटलं मला."

        " इथे नसणार . म्हणजे कुठं जाणार आहेस तू ?" विशाल ने न कळल्याने विचारले .

        " अरे आम्ही तुझ्या थोरला भावाजवळ असणार ना ?"

       " नाही. तुम्ही दोघे या पुढे कुणाच्याच घरी जायचे नाही. माझ्याकडे कायम राहायचं ."

       " अरे , पण असं कसं करून चालेल? आपलं काय ठरलं आहे अगोदर ."

        त्यावर गणपतराव म्हणाले," अंग ते आपण बदल पण करू शकतो . आम्ही कुणाकडे राहावं नि कुणाकडे नाही हे ठरविण्याच्या सर्वस्व अधिकार आमचा आहे . तू काही चिंता करू नकोस . आपण इथंच राहू ."

        " अहो, पण तो काय म्हणेल ?"

        " त्याची चिंता तू करू नकोस . ते मी पाहीन काय करायचं ते ." गणपतराव म्हणाले .

        " आणि आई, तू इथं राहिलास तरी दादा काहीही म्हणणार नाही . कारण त्याला फक्त तुमच्याकडून मिळणारे तीन हजार रुपये पाहिजेत. ते त्याला मी देवून टाकीन . मग काय बोलणार नाही तो."

         अगदी तसेच झाले . विशालकडे त्या दोघांना येऊन चार महीने झाले. तसे पाचवा महिना सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर नी दोघ नवऱ्याबायको विशालकडे येऊन थडकले नि विशालला त्याच्या थोरला भाऊ म्हणाला .

       " विशाल , मी आई-बाबांना माझ्याघरी न्यायला आलोय."

         तेव्हा विशाल त्याला म्हणाला, " आई-बाबा आता इथंच राहणार कायमचे !"

        " हे ठरविणारा तू कोण ?" जयंत चिडून बोलला .

        " हा माझा निर्णय आहे." गणपतराव म्हणाले.

        " बाबा तुम्ही सुद्धा असं म्हणता?"

        " हो."

        " य्यानेच तुम्हाला आमच्याबद्दल काही ना काही सांगून भडकवले असेल." जयंत म्हणाला. त्याच बोलणं बोलून होत नाही तेवढ्यात जयंता म्हणाली, " तीन हजार मिळतात ना दरमहा . मग का ठेवुन घेणार नाहीत ते स्वतःकडे."

        " वहिनी, ते पैसे तुमचे तुम्हीच घ्या. मला त्यातला एक पैसा  नको. हा ध्या बारा हजाराचा चेक. आणि आता निघा तुम्ही इथून."

         तसा तो आपल्या पत्नीकडे पाहू लागला. त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, विशाल असं काही करेल. चेक घेऊ का नको असे विचार त्याच्या मनात सुरू असतानाच जयंता ने त्याला खुनावलं की चेक ध्या . तसा त्याने चेक घेतला . आणि साळसूद पणाचा आव आणत  म्हणाला, " खरं म्हटलं , मला आई-बाबानांच घेऊन जायचं. पण बाबांनीच इच्छा आहे तुझ्याकडे राहण्याची तर त्यांची इच्छा पण मी मोडू इच्छित नाही. म्हणून आम्ही तू दिलेले पैसे नायलाजाने घेतोय."

       " ठीक आहे. या तुम्ही आता."

        तेव्हा गणपतराव म्हणाले, " अरे, पण तू का दिलेस पैसे ? मी दिले असते ना ?"

        त्यावर विशाल म्हणाले "अहो हे पण तर तुमचेच पैसे आहेत ना बाबा, मी कमवले म्हणून काय झाले? त्यावर तुमचा अधीकार नाही आहे का ?"

        " अरे पण तू चार महिन्याचे पैसे पण घेतले नाहीस आमच्याकडून."

        " बाबा, ते पैसे तुमच्या खात्यावर जमा राहू धा. तुम्हाला गरज पडेल तेव्हा ते काढा . पण आता त्या विषयावर पुन्हा चर्चा नको आहे मला."

         तेव्हा जयंत म्हणाला, " विशाल मी काय म्हणतो, तुला सध्या पैशाची गरज नाही आहे ना,मग ते पैसे मला दे ना, ?"

        " का ? तुला का देवू ?"

        " मला रे, जरा पैशांची अडचण आहे. म्हणून सांगतोय मला ते वापरायला दे. मी परत देऊन टाकीन तुझे ते पैसे."

        " अजिबात मिळणार नाहीत. ते आई-बाबांचे पैसे आहेत. तुला मिळाले ना, तुझ्या हिस्साचे . मग निघ आता." विशाल बोलला. नि तेथून निघून गेला. तशी जयंता आपले कोपर मारून जयंतला खुणवते की, ते पैसे तुम्ही बाबाकडे मागा म्हणून. जयंत ने तिचा इशारा ओळखला . तसा तो एकदम भावुक होत म्हणाला " बाबा, मला खरचं पैशांची फार गरज आहे . हो तुम्ही विशालला सांगा ना ते पैसे धायला."

        " तुला मघाशी त्याने सांगितलेले कळलं नाही का ? नाही देणार तो ते पैसे आणि मी तर ते पैसे देवूच शकत नाही. कारण ते त्याचे आहेत. त्यामुळे त्या पैशाचे काय करायचं ते त्याचा तो ठरवेल कळलं ?"

        शेवटी नाईलाज झाला तसे ते दोघं नवरा - बायको आपल्या घरी जायला निघाले. त्यानंतर दोन महिने उमटले आणि प्राजक्ताला नऊ महिने पूर्ण झाले . लवकरच प्रसूत झाली. नि तिला कन्यारत्न झाले. बाळाचा बारसा एकदम धुमधंद्याक्यात साजरा झाला . त्यावेळी त्याचे दोन्ही मोठे भाऊ बारशाला आले होते. पण मोठा भाऊ फारसा काही बोलला नाही. पाहुण्यासारखा आला नि पाहुण्यासारखाच निघून गेला . याचा अर्थ त्याच्या मनात विशाल बद्दल अजून ही राग होता. पण विशाल ने त्याच्या कडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यानंतर चार महिन्याचा अवधी पूर्ण होताच दुसरा दोन नंबरचा भाऊ विनय आई-बाबा ना न्यायला आला. तेव्हा विशाल त्याला नदुखविता म्हणाला, " विनुदादा माझे बाळ लहान आहे तेव्हा आई -बाबांना माझ्याकडे राहू दे."
 
          त्यावर तो विनय भयंकर चिडला नि म्हणल्या " वा! म्हणजे माझ्या हिस्साचे पण पैसे खायला बघतोयस तू पण मी असे होऊ देणार दादा गप्प बसला असेल. पण मी गप्प बसणार नाही."

         तेव्हा विशाल म्हणाला, " तुझा दादा काय फुकट गप्प बसला नाही. पैसे घेतले आहेत. त्याने त्याच्या हिस्साचे . आणि तुला ही तुझ्या हिस्साचे पैसे मी देवुन टाकतो." असे बोलून त्याने बारा हजार रुपराचा चेक फाडला नि त्याच्या तोंडावर मारत तो बोलला, "हा घे बारा हजार रुपयांचा चेक आणि आता इथून कल्टी मार."

         तसा विनयने तो चेक नीट निरखून पाहिला नि मुखात्याने आल्या पावली निघून गेला. त्यानंतर प्रत्येक वेळा त्यांच्या हिस्साचे पैसे त्यांना देत राहिला . नि आपल्या आई -वडिलांना कायम आपल्याच घरी ठेवुन घेतले. त्याची नीट काळजी पण घेतली. विशालला अजून एक बाळ झालं. त्यामुळे नातू आणि नात या दोघाना खेळविण्यात आता त्या दोघांचा वेळ जाऊ लागला .

        पण नियतीला हे त्यांचे सुख पाहावले नाही किंवा नियतीच्या मनात काही दुसरेच होते, असे म्हणा हवेतर. विशाल ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीला आग लागली नि त्यात त्याची ती कंपनी जळून भस्म झाली. त्यात करून त्या आगीत इन्सुरेन्सचे पेपर ही जळून खाक झाल्याने नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही अर्थात कामगाराना सुद्धा पैसे मिळणे जवळ-जवळ अशक्यच झालं.

        विशालने दुसऱ्या कंपनीत जॉब शोधण्याचा प्रयत्न केला. पण इतक्या सहजा सहजी नोकरी थोडीच मिळते. त्यामुळे विशाल च्या आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली मात्र त्याच्या दोन भावाना खूप आनंद झाला. ते मनात म्हणाले, "बरं झालं . फार उड्या मारत होता. आता बघतोना, कसे पैसे देतो ते आम्हाला .?

        त्यावर त्याची बायको म्हणाली, " अहो आनंद कसला प्रकट करताय . आता सासू-सासऱ्यांना सांभाळायची पाळी आपल्यावर येईल. शिवाय ते पैसे देखील देणार नाहीत."

       " पैसे का देणार नाहीत ते तर पैसे बाबाचे आहेत ना ?

       " हो, पण अशा वेळी बाबा त्यांना मदत करणार नाही का?

       " हो गं हे माझ्या ध्यानातच नाही आलं."

       " म्हणून सांगते. माझं जरा ऐकत जावा. पण नाही.


   क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..