Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र -२६

कुरुक्षेत्र -२६
कुरुक्षेत्र -२६

 


      मग पप्पांनी आजोबांना विचारलेे. तेव्हा आजोबांनी विचारले ," तू मुलगी पाहिलीय का ?" पप्पा म्हणाले ," हो." मग  आजोबांनी विचारले की , बरं.कधी बघायला जायचंय  मुलीला ?" पप्पा म्हणाले की , आधी मी मुलीच्या बापाला
फोन करून विचारतो की कधी यायचं मुलगी पाहायला ?"    
       त्यावर आजोबा उत्तरले ," ठीक आहे आधी त्यांना विचार , आणि  मला तसे सांग . मग सर्व जाऊ पाहायला." 
       " सर्वजण म्हणजे ?" पप्पानी गोंधळून विचारले.
       " तू मी , तुझी बायको , तुझा धाकटा भाऊ ,भावजय आणि नवरा मुलगा. बस्स !" तेव्हा माझ्या मनात आले होते की सरळ बोलुन टाकावे  की काका काकी नकोत म्हणून. पण नाही बोलु शकलो. पण माझे काम पप्पानी केले. पप्पा म्हणाले ,"  त्याला कशाला उगाच त्रास ?"
      " त्यात कसला आलाय त्रास ?"
      " पण नकोच तो आमच्या बरोबर. "
      " असं बोल  ना , तुला तो सोबत नको म्हणून. उगाच
कारणे सांगू नकोस." त्यावर पप्पा काहीच बोलले नाहीत. परंतु त्यांच्या मनात ही  तेच होते , जे माझ्या मनात होते. पप्पानी  दामिनीच्या वडिलांची परवानगी काढली. दोन
दिवसांनी रविवार होता. म्हणून सुट्टीच्या दिवशी या असे ते म्हणाले होते.

दामिनी

      मी कपडे काढून बाहेर जाण्याच्या तयारीला लागली होती. तेवढ्यात आई माझ्या खोलीत आली  नि म्हणाली ,
      " कुठे बाहेर निघालीस का ?" मी म्हणाले ,"  हो ."
      "  जाऊ नकोस."
      "  का ?"
      " तुला बघायला पाहुणे येणार आहेत."
      " कोण पाहुणे ?"
      " तुझ्या बाबांचे कॉलेज  मित्र आहेत ते ."
      "  नाव काय त्यांचे ?"
      " धुर्तराज घोरपडे ." असे म्हणताच तिच्या डोळ्यासमोर
धीरज चा चेहरा उभा राहिला. तसे तिच्या लक्षात आले की
असा होकार दिला नाही तर असं काय ? त्याचा डाव तिच्या द्यानी आला . तशी ती ठाम पणे म्हणाली ," मग नको येऊस म्हणून सांग त्याना."
     " पण का गं ?"
      " मला नाही लग्न करायचे त्या चिरकूट बरोबर."
      " तू ओळखतेस त्याला ?"
      " हो. माझ्याच कॉलेज मध्ये शिकतोय तो."
      " अगं पण पाहायला काय हरकत आहे ?"
      "  अनेक वेळा पाहिलंय त्याला. अजून काय पाहायचे त्यात ?"
     " अगं पण तुझ्या बाबांना काय सांगू ?"
      " मला पसंत नाही म्हणून."
      " अगं पण पाहुणे यायची  वेळ झालीय. आता कसं नाही म्हणायचं ?"
      "  मला न विचारता लग्न कसे ठरविले तुम्ही ?"
      " अगं ठरविले कुठे आहे अजून ? ते फक्त आज पाहायला येणार आहेत. आधी बघ ना , मग नकार दे आम्ही
तुझ्यावर जबरदस्ती करत नाहीये."
     " ठीक आहे येऊन दे त्यांना. चांगलीच हजेरी घेते मी त्यांची. मी रागाने म्हणाली. तशी आई मला समजावत म्हणाली ," अगं घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करू
नये.आमची काय प्रतिष्ठा राहिल समाजात." त्यावर मी काहीच बोलली नाही. आई माझ्या खोलीतून उठून बाहेर गेली. तशी माझ्या पायाची आग मस्तकाला भिडली. मी त्याला भाव देत नाही , म्हणून त्याने अशी चाल खेळली काय ? पण हरकत नाही. ये तू तुझी बिनपाण्याची कशी हजामत करते बघ. असा विचार करत होती. तेवढ्यात पुन्हा आई आली आणि म्हणाली ," पाहुणे आलेत घरी. तयारी करून बाहेर ये लवकर. मी तोपर्यंत चहा-नाश्ता तयार करते."
एवढे सांगून आई निघून गेली. मी कपडे घातलेलेच होते . फक्त केस विंचरले. ओठावर लिफ्टिक लावली आणि   तशीच मी बाहेर आली. धीरज आपल्या आजोबांना आणि आई-वडिलांसह आला होता. वडीलधाऱ्या माणसांचा माझ्याकडून अपमान व्हायला नको , म्हणून मी त्यांचे चरणस्पर्श  केले आणि मग  लगेच सोफ्यावर त्यांच्या समोर जाऊन बसली. तेव्हा धीरज माझ्याकडे मिश्कीलपणे पाहत होता. मला त्याचा भयंकर राग आला होता ; परंतु मी रागाला आवरले. तेवढ्यात त्याच्या आजोबांनी मला प्रश्न विचारला की,  मुली नाव काय तुझं  ?"  माझे नाव दामिनी आहे. परंतु माझी आपणा सर्वांस विनंती आहे. आपण ती ऐकण्याची कृपा करावी."
     तेव्हा त्याच्या आजोबांनी मला विचारले ," सांग काय म्हणणं आहे तुझं ?" तेव्हा मी उत्तरली," आजोबा ,  माझी बालपणापासूनची एकच एकच इच्छा आहे की , माझा होणारा भावी नवरा हा सर्वगुण संपन्न असावा. म्हणजे असे की , तो अभ्यासात तर हुशार असावाच ; परंतु  खेळा मध्ये ही  एक नंबर असावा आणि मला वाटतं आपला नातू त्या मध्ये बसत नाहीये ." असे  मी म्हटल्याबरोबर धीरज ताडकन उठला आणि म्हणाला,"  मी बसत नाहीये काय ? आणि तो बरोबर बसतो."लगेच  त्याच्या आजोबांनी त्याला विचारले," तो कोण ? कुणा संबंधी बोलतो आहेस तू ?" पण तो गडबडलाच म्हणजे बोलण्याच्या ओघात पट्कन सत्य बोलून गेला. परंतु त्यामुळे माझे आयते फावले. परंतु मी काही  न बोलता चुपचाप राहिली.आता बिघडलेली गोष्ट  सुधारायची कशी  असा प्रश्न त्याला पडला असावा कदाचित. म्हणू न तो गप्पच राहिला. परंतु त्याचे  आजोबा कुठं गप्प बण्यातले होते त्यांनी त्याला विचारलेच की कुणाशी संबंधी बोलतो आहेस तू ? सांग ना ?" तेव्हा नाईलाजाने तो म्हणाला ," अमर
बद्दल बोलतोय मी !"
      " काय ? आपला अमर ! " आजोबांनी आश्चर्याने
विचारले. धीरज बोलला ," हां !"
         मला जे सांगायचं होतं ते तो स्वतःच्याच तोंडाने वदला.  याला म्हणतात की स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे. बोलण्याच्या ओघात चट्कन बोलून
गेला खरा पण  त्याने  स्वतःच सर्वाना जाणीव करून दिली. त्यामुळे माझे काम झाले होते. तरीदेखील मी त्याला आणखीन जळविण्यासाठी म्हणाली ," अमर माझा चांगला मित्र आहे आणि माझा भावी नवरा होण्यास ही त्याच्या मध्ये सर्व गुण आहेत  परंतु आम्ही अजून एकमेकांना प्रपोज केलेलं नाहीये. पण पुढे मागे ते पण होऊ शकतं आणि तेवढ्यातच आई चहा घेऊन आली. मी तो चहा  सर्वाना देऊ लागली होती.  तेव्हा धीरज बोलला ," नको आम्हाला तुमचा चहा- नाश्ता . झाली तेवढी शोभा पुरे झाली. चला पप्पा मला
आता इथं क्षणभर ही थांबायचं नाहीये." तो उठून जाऊ लागतो. तेव्हा आजोबा ," धीरज थांब. हे सभ्य पणाचे लक्षण
नाहीये." तसा धीरज चिडून बोलला ," तुम्ही थांबा. तुम्हाला
थांबायचं तर ,आम्ही नाही थांबणार. "असे बोलून उत्तराची
प्रतीक्षा न करता सरळ उठून चालू लागला. त्याच्या बाप ही
उठून जाऊ लागतो. तशी त्याची आई त्याच्या वडिलांना म्हणाली ," अहो , असं काय करताय जरा थांबा ना ?" तसा
त्याचा बाप म्हणाला ," झाला तेवढा अपमान कमी झाला
का ? जे अजून थांबायला सांगते आहेस मला ? "
     " चूक तुमच्या मुलाची आहे. "
     " मला तुझ्या कडून काहीच ऐकायचं नाहीये. तुला यायचंय का माझ्या सोबत ? का तुला सुध्दा बाबा प्रमाणेच थांबायचंय इथं ? " त्याच्या आईचा जसा नाईलाज झाला.
तशी ती मुकाट्याने उठून त्यांच्या मागोमाग निघून गेली.
आजोबा मात्र माझ्या पसंती वर खुश होत म्हणाले ," शाब्बास
पोरी तुझी निवड एकदम परपेक्ट आहे. अमर आहेच सर्वगुणसंपन्न." असे म्हणताच मी त्यांचे पुन्हा चरणस्पर्श केले. त्यावर ते हसून म्हणाले ," अगोदर निवड कर अमरची
मग पाहू." तशी लाजली नि पटकन तेथून निघून आली
आपल्या खोलीत.

धीरज

     आम्ही सर्वजण घरी आलो. पण आजोबा काही आले नाहीत. त्यांचा पाहुणचार घेऊनच मग घरी आले आणि जसे
आले तसे ते माझ्यावर भडकले म्हणाले ,"  मूर्ख माणसा !  जर तुला अगोदरच  माहीत होते की ती मुलगी अमर वर प्रेम करतेय तर  मग आम्हाला तिथे घेऊन जाण्याचे प्रयोजन काय ? " त्यावर मी उत्तरलो ,"  अपमानित तर आम्ही झालोय
आजोबा. तुम्ही तर त्यांचा पाहुणचार घेऊन आलात. तुम्हाला
कसला आला आहे मान पान.?
     " झालं तुझं बोलून का अजून बोलायचं आहे काही ?"
     " हो आहे. "
     " मग बोलून टाक ना ? कशाला ठेवतो आहेस मागे ?"
     " बोलणारच आहे मी. परंतु या क्षणी नाही."
     " मग कधी ?" तसे  मध्येच पप्पा म्हणाले ," बाबा , खरं
सांगायचं तर मला ही आवडलं नाही तुमचं ते वागणं."
      " काय चुकीचा वागलो मी ? सांग ना ."
      "  तुम्ही तिथं थांबायला नाही पाहिजे होतं. आमच्या
पाठोपाठ तुम्ही पण निघून यायला हवं होतं."
     " वा छान ! तू पण आपल्या मुलाच्याच तालावर नाचतोयेस की काय ?  अरे चुकी अगोदर आपण करायची आणि त्याचा सारा दोष दुसऱ्याच्या माथी मारायचा. ?"
      " बरोबर बोलताहेत बाबा. एकतर ह्याने तिच्या बद्दल काहीच सांगितले नाही आपल्याला. की ती ह्याला नाही तर
अमरला पसंत करते म्हणून."
      " तू पण त्यांचीच साईड घे."
      " इथं प्रश्न कुणाची साईड घेण्याचा नाहीये. तर प्रश्न पसंतीचा. आपली पसंती कुणावर जबरदस्तीने लादू शकत
नाहीये . दोन्ही कडून सारखीच प्रतिक्रिया पाहीजेल."
     " अगदी बरोबर बोललीस तू सुनबाई ! या बाप बेट्याची
अक्कल घास खायला गेलीय." तसे पप्पा माझ्यावर चिडत बोलले," तुला अगोदर नाही सांगता आलं ? स्वतःचा अपमान तर करून घेतलासच  आणि आमचाही करविलास."
      " पप्पा  तुम्ही सुद्धा .....?
      " हो. मी सुद्धा !  कारण तुझ्याकडून चुकलंय सारं."  मला तिथे फार काळ थांबणे मुश्कील झाले . तसा मी उठलो. आणि सरळ  आपल्या खोलीत  निघून आलो  आणि खूप उशिरापर्यंत  विचार करत होतो की काय करावे ? आपल्या
अपमानाचा बदला कसा घ्यावा. पण काही मार्ग सापडत नव्हता. दामीनीशी  आपल्या अपमानाचा बदला घ्यायचाय पण कसा  ? खूप विचार करून डोक्यात  काही प्रकाश पडेना. पण अचानक मला शनिमामाची आठवण झाली.
शनिमामा इथं असता तर त्यातूनही काही मार्ग सुचविला असता. मग मामला फोन करून बोलवून घेऊ का ?  हो असेच करतो असा विचार करून मी शनिमामाला फोन केला.
आणि बोलवून घेतले. मामा आल्यानंतर मामाला सर्वकाही
सविस्तर सांगितले. तेव्हा शनिमामा म्हणाला ," अरे हे तू आता सांगतोहेस सर्वकाही होऊन झाल्यावर ? पण काही
हरकत नाही यातूनही काहीतरी मार्ग काढु ! " मी शनिमामाला
म्हटलं की ती  माझी नाही झाली तर अमरची ही होता कामा नये. त्यावर शनिमामा म्हणाला ," तू चिंता करू नकोस भाच्या ती तुझीच होईल. " मी म्हटलं ," पण कशी ?" तेव्हा शनिमामा
म्हणाला ," थांब. मला जरा विचार करू दे." असे म्हणून
शनिमामा विचारमग्न झाला. विचार करता करता शनिमामा
अचानक बोलला की ,"  तू जे मघाशी बोललास ते खरं आहे
का ?" शनिमामा ला नेमके काय म्हणावयाचे आहे ते मला
कळले नाही. म्हणून मी मामाला विचारले ," मामा तुला नेमके
काय म्हणायचं आहे ?" त्यावर शनिमामा उद्गारला ,"  अरे भाच्या तू मघाशी म्हणालास की अमर ने अजून तिला प्रपोज
नाही केले म्हणून.
    " हां ! म्हणजे असे ती म्हणाली."
    " अरे ती म्हणाली काय आणि तो म्हणाला काय अर्थ एकच."

   " म्हणजे पुढेमागे करण्याची शक्यता आहे. " असे ती म्हणाली.
     " याचा अर्थ अजून चान्सेस आहेत. तिला अमर पासून दूर करायचे. ?
     " कसे ?"
     " मग त्याला आपली योजना ऐकविली. आणि ती योजना
म्हणजे  माझा प्रिय मित्र कुंज म्हणजेच कल्याण. या कामी उपयोगी येईल तो आपल्या. त्याची ताबडतोब भेट घ्यायला हवी. बस्स आता अपमानाचा सुड घ्यायचाच.

कुंज उर्फ कल्याण

    मी कुंज  संजय बिहारीचा पुत्र परंतु माझे जन्मदाते आई-वडील कोण आहेत, त्या बद्दल मला काहीच माहीत नाही. मी संजय बाबांना कचरा कुंडीत सापलोय. अर्थात मी कुणाच्या तरी पापाची निशाणी असणार . म्हणूनच मला कचरा कुंडीत फेकण्यात आले असावे. आणि माझी आई नक्की कुमारिका असावी. म्हणून तिला माझा त्याग करायला लागला असावा.
नाहीतर कोणतीही आई आपल्या तान्हा बाळाचा त्याग कदापि करणार नाही. नक्कीच तिला कुणीतरी माणसाने धोका दिला असावा. अश्या धोकेबाज माणसाला मी बापाचे
स्थान कदापि देऊ शकणार नाही. परंतु माझी आई कोण होती
हे कळायला हवे होते. म्हणजे तिला विचारता आले असते की तिने माझा त्याग का केला ? पण नशीब माझे संजयबाबा त्याच वेळी तेथून जात होते. म्हणून त्यांनी मला उचलून आपल्या घरी आणले. तेव्हा त्यांच्या पत्नीला म्हणजेच माझ्या आईला मुलंबाळं नव्हते. पण कालांतराने त्याना बाळ
झाले म्हणा. ते लोक माझा पायगुण समजतात. म्हणूनच की
काय मला कुंज या नावाने हांक मारण्या ऐवजी कल्याण म्हणतात.आईचं नाव देखील कल्याणी तसे तिचे ही खरे नाव
कल्याणी नसून राखी आहे. परंतु बाबा तिला प्रेमाने कल्याणी
म्हणतात. असो.
   आज धीरज  मला कशाला बोलविले तातडीने ते कुणास ठाऊक ? काय मनात आहे त्याच्या भेटूनच पहावे काय म्हणतोय ते.  असा विचार करून मी त्याने  मला बोलविलेल्या ठिकाणी मी पोचलो. तो आणि त्याचे ते फालतू दोस्त  तिथे जमा झाले होते. मी संभ्रमात पडलो . काय योजना आहे या चांडाळ चौकटीची ? पण पाहू तर खरं ! असा विचार करून मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो.
तसा धीरज मला म्हणाला ," आलास बरे झाले. माझे तुझ्याकडे एक काम होते आणि ते काम फक्त आणि फक्त तूच करू शकशील." तो मला म्हणाला. मी त्याच्याकडे पहात विचारले," असे कोणते काम आहे बाबा ? जे  मीच करू शकतो." मग त्याने मला त्याच्या बरोबर घडलेला कालचा प्रसंग सांगितला. त्यावर मी त्याला म्हणालो ," मग त्यात मी काय मदत करू शकतो तुझी ?" धीरज उत्तरला ," तूच करू शकतोस मित्रा."
      " ते कसं ? "
      " तू तिला ,जाऊन सरळ मागणी  घाल."
      "  अरे पण ती अमर शी प्रेम करते ना ?"
      "  नाही. अमर  फक्त तिचा मित्र आहे. "असे ती स्वतःहून म्हणाली.
      " तरीपण ती माझ्याबरोबर लग्न करीन हे कशावरून ?"
मी विचारले . त्यावर धीरज म्हणाला ," कारण तू अमर प्रमाणे   चॅम्पियन आहेस. आणि  तिला एका चॅम्पियन्स बरोबर  लग्न करावयाचे आहे "
     " हो ;पण माझ्यापेक्षा ही क्रिश चॅम्पियन आहे की !"
     तसा धीरज वैतागून बोलला ,"  तुला स्वतःचा  अभिमान
नाही का रे ?"
    " आहे ना पण तो फाजील आत्मविश्वास नसावा ;  तो
हताश  स्वरात बोलला."
     " तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये." तेव्हा मी त्याला म्हणालो ,"  तुझे म्हणणे तरी काय आहे ते अगोदर सांग मला." धीरज बोलला.
      "  माझे म्हणणे असे आहे असे आहे की तू तिच्या बरोबर लग्न करून माझ्या अपमानाचा सूड घ्यावा."
      " मीच का ? "
      " तू माझा मित्र आहेस म्हणून. मित्रासाठी एवढे पण करू शकत नाहीस का तू ? " मी विचारात पडलो. काय करावे ?
मित्रत्वाच्या नात्याला जागलेच पाहीजेल. पण ती का करेल  माझ्या शी लग्न ?  मी एका गरीब ड्रायव्हरचा मुलगा.आणि ती एका श्रीमंत बापाची मुलगी. ती करेल एका गरीब मुलाशी लग्न ?  तिची अट फक्त चॅम्पियन नवरा पाहिजेल. असे जर
असेल तर ती कदाचित करेल आपल्याशी लग्न. आणि
प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे .आणि समजा
जर तिने आपल्याला पसंत नाहीच केले तर राहिले. आपले कुठे अडणार आहे तिच्यामुळे आणि मला तरी कुठे हौस तिच्याशी लग्न करण्याची ! फक्त मित्राची मदत म्हणून एवढे तर आपण करू शकतोच त्याच्यासाठी ! " असा विचार मनात येताच मी त्याला होकार देणारच होतो. तेवढ्यात त्यानेच मला हलवून विचारले की एवढा  वेळ लागतो तुला विचार करायला.? एका झटक्यात सांगून टाकायचे असतं हो  किंवा नाही म्हणून. माझी जबरदस्ती नाही कोणावर." मी हसून म्हणालो ," बाबा , बघतो प्रयत्न करून पण फक्त तुझ्यासाठी  म्हणून."  तेव्हा त्याने हर्षभराने मला एकदम मिठी मारली. आणि मला म्हणाला ," यह हुई ना ,मर्दोवाली बात. दे ताली. सर्वजण एकमेकाच्या हातावर हात मारून टाळी देतात .तसा मी पुढे म्हणालो ,"  पण एक सांगतो. तिने जर मला ही नकार
दिला तर मग तू तिचा नाद सोडून द्यायचा. आहे तुला हे कबूल ?" त्यावर तो निरुउत्साहित मनाने बोलला ," हो मंजूर आहे मला." पण का कुणास ठाऊक त्याच्या स्वरात निरुत्साह
जाणवला. परंतु मी त्याला काही न बोलता घरी जायला
निघालो घरी आल्यावर आईला आणि बाबांना माझ्या लग्नाविषयी म्हणालो. त्यावेळी बाबा मला म्हणाले ," पोरा अगोदर नोकरी तर लागायला  पाहिजेल ना ?  त्याशिवाय का  कुणी आपली मुलगी द्यायला तयार होईल   ?" धीरज ने मला आपल्या कंपनीत नोकरी देण्याचे कबूल केले होते ,म्हणून मी बाबांना म्हणालो," धीरज  देणार आहे मला आपल्या कंपनीत नोकरी." त्यावर बाबा म्हणाले , " मग अगोदर नोकरीला लाग. मग लग्नाचे पाहू." त्यानंतर ही गोष्ट मी धीरजला सांगितली. तेव्हा धीरज म्हणाला ," ठीक आहे." असे बोलून त्याने आपल्या वडिलांकडे हट्ट धरला की कंपनीची सर्व सूत्रे
आपल्या हातात घेतली. आणि लगेच मला अपॉइंटलेटर दिले. मी त्याच्या ऑफिसमध्ये कामाला लागताच बाबांना
म्हणालो ," बाबा, आता मी कामाला सुध्दा लागलोय. तेव्हा तुम्ही आता दामीनीच्या घरी जाऊन माझ्यासाठी तिला मागणी घालू शकता." तेव्हा बाबा म्हणाले ," दामिनीचे वडील
श्रीमंत आहेत. ते कसे देतील आपली मुलगी तुला ? शिवाय
त्यांची मुलगी अमर साहेबांशी प्रेम करतेय. ती का करेल तुझ्याशी लग्न?"
      " बाबा तिचं अमर शी प्रेम नाहीये. फक्त तिचा तो मित्र
आहे."
     " ते काही असो ; परंतु हे काम होणार नाही आपल्या कडून."
    " बाबा माझ्याशी एवढं करा प्लिझ ! "
    " अरे पोरा  ती मोठी लोकं आहेत ,आपल्या सारख्या गरीब लोकांना गरीबाचीच मुलगी बरी. नाही का ?"
     " ते काय सोन्याचा चमचा तोंडात  घेऊन जन्माला आले
होते की काय ? आपण पण एक दिवस श्रीमंत होऊ."
      तेव्हा बाबा म्हणाले ," पोरा , नको हा वेडा हट्ट करुस.त्यांच्या शी आपली बरोबरी कशाने ही होणार नाही. "
     मग आई मध्येच म्हणाली ," का होणार नाही ? माझा
मुलगा पण आता श्रीमंत  होईल. " तेव्हा बाबा म्हणाले ," कल्याणी  त्याला नको ती स्वप्ने दाखवू नकोस.मृगजळाप्रमाणे आहेत ती स्वप्ने." तेव्हा मी त्यांना म्हणालो ," बाबा ,फक्त एकदा माझ्या इच्छेखातर जा तुम्ही त्यांच्या घरी. तिने जर
मला ना पसंत केले तर यापुढे मी कधीच तुमच्या जवळ पुन्हा
हट्ट धरणार नाही. तुम्ही सांगाल त्या मुलीशी मी काही एक तक्रार न करता लग्न  करेन मी तिच्याशी ! ,अजिबात हूं की चू
करणार नाही. " त्यावर आई म्हणाली ," तो एवढ्या खात्रीने
सांगतोय तर एकवेळ जाऊन बघायला काय हरकत आहे ,
झाला तर आपला अपमानच होईल ना , आपण तो आपल्या
मुलांसाठी सहन ही करू . काय ?" तेव्हा मी म्हणालो, " तुमचा तिथं अपमान होणार असेल तर तिथं न जाणेच योग्य."
       तेव्हा आई म्हणाली ," अपमान होईलच असा त्याचा अर्थ नाहीये. कदाचित स्वागतच होईल आमचे. कुणी सांगावे ? "
      " म्हणजे सारे जर आणि तर वर अवलंबून आहे तर !"
      " अर्थात. त्या दोन शब्दा शिवाय वाक्य पूर्ण होणे शक्य
नाहीये."
     " खरंय. मग मी दामिनी शी लग्न करायचा विचार सोडून
देतो तर !"
    " नाही. एकदा प्रयत्न करून पाहू . झाली तर झाली तयार नाहीतर नाही त्यात काय ? " बाबा उद्गारले. आणि खरे सांगायचे तर दामिनीचे अलौकिक सौन्दर्य माझ्या  ही मनाला भुरळ घालीत होते. अर्थात माझ्यातील कला कौशल्य पाहून
कदाचित माझ्याशी लग्न करण्यास ती होकार ही असे वाटत
होते मला. म्हणूनच हा प्रयत्न दुसरं काय ?
 
   
  

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..