कुरुक्षेत्र -२५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र -२५ |
दुर्वा तिकडून निघून गेल्यावर मी जतीन कडे वळत म्हणालो ," मघाशी अमर समोर होता म्हणून मी तसे बोललो. आता मला खरे काय ते सांग."
" माझ्यावर विश्वास नाही का तुझा ?"
" जर खोटं बोलत असशील ना तर मग दातच पाडीन तुझे."
" धीरज जतीन खरे बोलतोय." अशोक ने दुजारा दिला.
" आम्ही तुझे मित्र ना ,म्हणून अमर राग काढतो आमच्यावर . " शरद ने पुस्ती जोडली.
" त्याची एकदा तरी जिरवायला पाहीजेल." अजय बोलला.
" ती वेळ लवकरच येईल." मी म्हणालो.
" त्याला अद्दल एकाच गोष्टी ने घडविता येईल." जतीन
बोलला.
" कोणत्या ?"
" दामीनीला त्याच्या पासून दूर करायचे."
" म्हणजे ?"
" तू हस्तगत कर तिला."
" ती कशी ?'
" अगोदर चारा घालुन बघ तिला. नाही फसली जाळ्यात तर उचलायची जबरदस्तीने जो चिज मांगकर नही मिलती है उसे छिन लेना ही बहादुरी है .अशोक बोलला.
मला ही आता त्याचे म्हणणे पटू लागले होते. जी गोष्ट
प्रेमाने मिळत नाही ती जबरदस्तीने मिळवायलाच पाहीजेल.
हीच खरी मर्दांगी आहे." असे मी स्वतःशीच म्हणालो. परंतु
जबरदस्ती करण्या अगोदर एकवेळ विचारून पाहीजेल तिला. ऐकली तर ठीकच आहे, नाहीतर मग आहेच शेवटचा
उपाय. असा मनात विचार केला आणि मग योग्य संधीची
वाट पाहू लागलो होतो. ती संधी पण लवकरच मला मिळाली. ती कॅन्टीन मध्ये एकटीच बसलेली दिसली.
तिच्याजवळ अमर नव्हता. ह्या संधीचा फायदा घ्यायचा मी विचार केला नि चटकन मी तिच्या जवळ जात म्हणालो ," हाय " मग तिने देखील मला " हाय " बोलून प्रतिसाद दिला.
तसे मी तिला विचारले की , मी इथं बसू शकतो का ?"
" अवश्य !" मग तिच्या समोरच्या खुर्चीवर बसत तिला म्हटले ," काय घेणार ? म्हणजे चहा कॉफी....
" नो थँक्स ! " असे म्हणून ती तेथून उठून जाऊ लागते तसा मी उठून तिचा हात पकडत म्हटले ," अगं बैस ना ?"
तिने रागाने माझ्याकडे पाहत म्हटले ," माझा हात सोड. "
" का ? अमर ने हात पकडला तर चालतो. मग आम्ही
पकडला हात तर का चालत नाही ?" ती अजूनच भडकून
रागाने माझ्याकडे पाहत बोलली की, ऐकायला येत नाही का
तुला ? हात सोड माझा." हात सोडून मिश्कीलपणे हसत म्हटले ," ओके ओके सोडला." तशी ती मला बोट दाखवत
बोलली ," आपल्या मर्यादितच राहायचं. जास्त आगाऊगिरी करायची नाही. ती फार महागात पडेल. हे द्यानात ठेवायचे."
मला ते सहन झाले नाही तिला म्हटले ," असं अमर मध्ये
काय आहे ,जे माझ्यात नाही ?"
" खूप काही! " एवढेच बोलून ती थांबली नि मग माझ्या कडे जळजळीत नेत्र कटाक्ष टाकत बोलली," अमर समोर
एकदम शून्य आहेस तू. " तिने आपल्या उजव्या हाताचे बोट
गोलाकार फिरवून सांगितले ते. त्यावेळी मला तिचा भयंकर राग आला. असे वाटले की तिचे ते बोट पकडावे आणि मोडून टाकावे. पण मनात असूनही ते नाही करू शकलो.
कारण त्याचवेळी अमर समोरून येताना दिसला. तसा मी
तेथून काढता पाय घेतला. परंतु मनात सुड भावना ठेवूनच.
हिला बेइज्जत करायचे असते तर ते कधीच केले असते ;
परंतु मला लग्न करायचे होते तिच्याशी , म्हणून तिने केलेला सारा अपमान मी सहन केला. तिला हस्तगत करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार मी करू लागलो होतो.
अमर
मला तिकडे येताना पाहताच धीरज तिथून सटकला. हे
मी माझ्या प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहिले होते,म्हणून दामिनी ला मी विचारले ," काय म्हणत होता धीरज ?" दामिनी हसून म्हणाली ," मला दोस्ती करायला सांगत होता स्वतः बरोबर."
मी तिला चिडविण्याच्या हेतूने म्हणालो की , मग चांगली ऑफर होती की का नाही स्वीकारलीस तू ?"
" माझ्या खेटरा जवळ पण उभी राहण्याची त्याची
लायकी नाही आणि तू मला त्याच्याशी मैत्री करायला सांगतोस ? तुला बोलायला वाटले तरी कसे हे ?"
तेव्हा मी तिला म्हणालो ," असं का म्हणतेस ? भाऊ आहे
तो माझा ."
" तुझा भाऊ आहे , म्हणूनच गुमाने सोडले त्याला. नाहीतर मी त्याची माझ्या खेटराने च पूजा केली असती मी."
तेव्हा माझ्या लक्षात आले की तिचा आवाजात क्रोध जाणवत
आहे. ह्याचा अर्थ धीरज ने नक्कीच कहीतरी आगळीक केली असणार . परंतु त्याने केले काय हे जाणून घेणे अति आवश्यक आहे. असा विचार करून मी तिला म्हणालो ," असे काय केले त्याने तुझे ?"
" माझा हात धरला होता त्याने ."
" काय म्हणतेस ? त्याची ही हिंम्मत ?
" हो ना !"
" पण अजून काही केले नाही ना त्याने ?"
" त्याची हिंम्मतच तरी आहे काय अजून काही करण्याची ?"
" नाही ते माहिततेय मला."
" त्याचे पुन्हा नाव काढू नकोस माझ्या समोर."
" ओके ओके !....बस्स !"
" चल. कुठंतरी निवांत पणे जाऊन बसू."
" हो , चालेल." असे म्हणून दोघेही गार्डनच्या दिशेने
चालू लागतात.
धीरज
मी अमरला पाहून तिथून सटकलो तो सरळ आपल्या मित्रापाशी आलो. माझे मित्र माझी वाटच पाहत होते. मी
त्यांच्या पाशी येताच त्यांनी मला गराडा घातला आणि मला
दामिनी विषयी विचारू लागले. माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण
करत अशोक म्हणाला ," तुझा चेहरा सांगतोय की तेथे काय घडले असेल ?" मी एकदम चपापलो की माझ्या चेहऱ्यावर
काही भीतीयुक्त चिन्ह तर उमटलीत नाही ना ? म्हणून मी
माझा चेहरा चाचपून पाहू लागलो. परंतु माझ्या या कृतीने
त्याना अधिकच संशय आला. एकजण हसतच म्हणाला,
जाहीर आहे की तिथं तुझा सन्मान तर मुळीच झाला नसेल.
बरोबर ना ? " तसा मी स्वतःला सावरून म्हणालो ," कोण म्हणतं असं ? उलट तिने माझ्या हाताशी आपला हात मिळविला आणि मला बसायला ही सांगितले." तसा जतीन
बोलला ," उगाच भाऊ खाऊ नकोस. आम्ही पाहिलं तिने तुझ्याशी हात मिळविला की नाही ते ? तेव्हा खरं काय ते सांग." तेव्हा मी म्हटले की , साली जास्त भावमारु लागली. मला सरळ झिडकारले तिने." तेव्हा अजय ने मला विचारले ," काय सांगतोयेस ...तुला झिडकारले तिने ? म्हणजे तुझी दोस्ती नाकारली तिने ?"
" हां यार !"
" शी ! फार कचरा करून टाकला तिने तुझा. होय ना ?"
अशोक मला चिडविण्याच्या हेतूने म्हणाला. मी रागाने म्हणालो , " मी सुड घेईन माझ्या अपमानाचा." तेव्हा शरद
मला समजावत बोलला ," जर तुला तिला हासिल करायचं असेल तर सुडाची भाषा वापरून नाही."
" मग ?" मी न समजून त्याच्याकडे पाहत म्हटले.
" प्रेम.....प्रेमाची भाषा जास्त समजते त्यांना. कारण प्रेमाने
साऱ्या जगाला ही जिंकता येईल." शरद बोलला.
" म्हणजे कशी ?" मी विचारले.
" म्हणजे अगोदर हाय म्हणून स्वतःची तिला ओळख करून द्यायची असते."
" ते झालं सर्व."
" मग काय म्हणाली ती ?"
" तिने पण मला हाय केलं "
" अरे वा ! हे तर फारच छान."
" छान काय उठून जाऊ लागली ती."
" मग तू काय केलेस ?" शरद ने विचारले.
" मी दुसरं काय करणार ? तिचा हात धरला."
" बस्स हीच तर चूक केलीस तू ? "
" मग काय तिची आरती ओवाळायला हवी होती."
" आरती नाही रे , जाऊ दे तुला सांगून काही फायदा
नाही त्याचा ."शरद उत्तरला.
" म्हणजे ?" मी समजून विचारले.
" अरे गुंडा सारखा तिच्याशी वागशील तर ती तुझ्याशी
ती काय गोड बोलेलं. "
" मग काय हवं होतं मी ?"
" पहिल्या दिवशी फक्त हाय हॅलो वगैरे बस्स !"
" आणि मग ?"
" नंतर हळूहळू तिच्याशी आपला परिचय वाढविण्याचा प्रयत्न करावा. "
" ती साधी बोलायला तयार नाही माझ्याशी ती काय परिचय वाढविणार माझ्याशी ! उगाच काहीपण सांगू नकोस.
तिला हस्तगत कसं करायचं तेवढं फक्त सांग."
" त्यासाठी दोन गोष्टी करावे लागतील."
" कोणत्या ? "
" एकतर तिच्या समोर एकदम साधा सुधा आणि सदैव
दुसऱ्यांची मदत करणारा."
" ते शक्य नाहीये. दुसरं बोल."
" दुसरा एकच उपाय आणि तो म्हणजे तिला सरळ मागणी घाल लग्नाची." अजय म्हणाला. तसा मी वैतागून
म्हणालो ," तुम्ही सर्वजण उलटे जन्मात का रे ?"
" का ? काय झालं ?" अजय ने विचारले.
" अरे जी मुलगी धड माझ्याशी बोलायला तयार नाही.
ती का करेल लग्न माझ्याशी ?"
" अरे बावळट तू जाऊ नकोस तिच्या आई-वडीलापाशी !"
" मग ?"
" तुझ्या वडिलांना पाठव तिच्या आई-वडीलापाशी ! आई
एक लक्षात ठेव. एक बिझनेसमेन दुसऱ्या बिझनेसमेन शी
सोयरीक करतात कधी पण !" अजय बोलला.
" हां यार. तू तुझ्या बाबांनाच पाठव तिच्या घरी !" शरद ने
दुजोरा दिला.
" अरे पण मला पाहताच ती नाही म्हणून सांगेल."
" ती सांगू दे रे,पण तिचे आई-वडील तिचं ऐकायला
हवेत ना ?" जतीन बोलला. मला पण पटलं माझ्या मित्रांचे
म्हणणे. मी ठरविले की बाबांनाच पाठवू तिच्या वडिलांकडे.
आणि तसे पण काकासाहेब यशाच्या लनाची जोरदार तयारी
करताहेत मग मी माझ्या लग्नाची गोष्ट बाबा जवळ काढायला
काही हरकत नाही आणि आता शिक्षण ही संपत आलंय.
म्हणजे पदवीधर झालोच आहे मी ! फक्त मास्टरकी करायची
तेवढी शिल्लक आहे. ती नाही केली तरी चालेल. आपल्याला
कुठं नोकरी करायची आहे ? आणि बाबा तर कधी पासून
आपल्या मागे लागलेत की कंपनी जॉइन कर म्हणून पण
मीच हा ना करतोय. पण आता वेळ करून चालणार नाही. तो अमर तिला पटविण्यापूर्वी आपण तिला आपली राणी बनवायला पाहीजेल.
पण बाबा रागावणार तर नाही ना ? म्हणजे मी अजून
काहीच करत नाही . म्हणजे काम ना धंदा लग्न करायचं
म्हटलं तर अगोदर घरचा बिझनेस सांभाळायला पाहीजेल.
नाही का ? असा विचार करून मी एक दिवस बाबांना म्हणालो ," बाबा ,मला आता आपले ऑफिस जॉईन करायचंय." बाबा एकदम हर्षभराने म्हणाले , " अवश्य कर."
" मग मी उद्या पासून येऊ ऑफिसला ?"
" उद्या पासून का ? आजच चल ना."
" आज नको. मी शेवटचं मित्रांना भेटून येतो माझ्या."
" शेवटचं म्हणजे ?"
" पुन्हा जाणार नाही ना कॉलेजला म्हणून म्हणतोय."
" हरकत नाही. उद्या पासून ये." बाबा ऑफिसला निघून गेले. मी मात्र विचारात पडलो की दामिनी माझ्याशी लग्न
करायला तयार होईल का ? नाही म्हणजे ती अमरला पसंत
करते ना म्हणून म्हटलं. लगेच दुसरं मन म्हणाले ," होईल.
आई-वडिलांच्या मर्जीच्या पुढे तिचं काही चालणार नाही.
मग नाईलाजाने लग्न करावेच लागेल तिला माझ्याशी आणि तसे पण मुलींची मर्जी कुठं चालते ? आई-वडील जबरदस्तीने
लग्न लावून देतात. त्यांच्या पसंतीच्या मुलाशी ! हां आता काही आई -वडील मुलांच्या अथवा मुलींच्या इच्छेनुसार करतात म्हणा. पण असे फार थोड्या प्रमाणात घडते म्हणा.
आणि समजा जर नाहीच झाली तयार. तर तिला सरळ पळवून नेऊ नि जबरदस्तीने लग्न करू तिच्याशी ! पण मग
तिरस्कार करील ती आपला.......हरकत नाही. किती दिवस
नकरे करील ? एक ना एक दिवस स्वीकार कायलाच लागेल
तिला आपला. कारण पळून पळून पळणार कुठे ? सरड्याची
धाव कुंपणापर्यँत नि बायकांची धाव चुली पर्यंत. असा विचार करून स्वत: शीच हसलो. तसे माझे मित्र मला हलवत
म्हणाले ," कुणाच्या स्वप्नात रंगून गेलास एवढा ? नाही म्हणजे आम्ही सारे तुझ्या शेजारी उपस्थित आहोत. हे देखील तू विसरलास ? म्हणून म्हणतोय. " अजय बोलला.
" अरे आणखीन कुणाच्या स्वप्नात गेला असेल ?.....दामिनी वहिनीच्या ! हो की नाही रे ?" शरद ने
मला चिडविलं. पण त्यावेळी मला त्याचे चिडविणे ही आवडले.
मी घरी आल्यावर पप्पांच्या कानावर माझ्या लग्नाची गोष्ट घातली. तेव्हा पप्पा म्हणाले ," आधी कॉलेज चे शिक्षण तर पूर्ण कर." त्यावर मी म्हणालो ," ते आता पूर्ण झाल्यातच जमा आहे." त्यावर पप्पा म्हणाले ," मग आधी ऑफिस जॉईन कर. काम धंदा आधी सांभाळायला लाग मग लग्नाचं पाहू."
" तुमच्या नंतर तुमचा बिझनेस मीच सांभाळणार आहे ना ? "
" हो रे,ते खरंय. पण अगोदर मुलगी तर पाहायला हवीय."
" मुलगी आहे माझ्या पाहण्यातली."
" ओह ! म्हणजे प्रेम वगैरे आहे का तुम्हां दोघांचे ?"
" नाही. प्रेम नाही. पण ती मुलगी मला आवडली."
" फक्त तुला आवडून काय ? तिला पण तू आवडायला
पाहिजेस ना ?"
" ते लग्न झाल्यानंतर सर्व होईल बरोबर."
" बरं. मुलगी कुणाची आहे , ते तर सांग."
" दयानंद मांजरेकरांची. तिचे नाव दामिनी." तसे त्यांच्या
चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. ते हसून म्हणाले ," दयानंद ची
मुलगी आहे. मग हरकत नाही."
" तुम्ही त्याना ओळखता ?"
" नुस्ता ओळ्खतच नाही तर तो माझा जीवश्कंठष्य मित्र
आहे." मी हर्षभराने म्हणालो ," मग तर प्रश्नच मिठला. नाही
म्हणणार च नाही ते तुम्हांला ."
" प्रश्न त्याच्या होकाराचा नाहीये."
" मग ?"
" मुलीचा होकार मिळायला पाहिजेल." मी मनात म्हणालो , ती तर होकार देणारच नाही. पण प्रयत्न करायला
काय हरकत आहे. मी विचारात पडल्याचे पप्पांच्या द्यानात आले तसे ते मला म्हणाले ," चिंता करू नकोस. मी बोलतोय
तुझ्या आजोबाशी !"
" आजोबाशी !"
" हो . त्यांची संमत्ती घ्यायला पाहीजेल." मी चिडून म्हटले ," लग्न मला करायचे आहे. मग त्यांची संमत्ती कशाला
पाहीजेल ?"
" कशाला पाहिजे म्हणजे ? ह्या घरातील सर्वात वडीलधारी व्यक्ती आहेत ते. त्यांच्या संमत्ती शिवाय काहीच
घडण शक्य नाहीये." त्यावर मी काहीच बोललो नाही.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा