कुरुक्षेत्र-२४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र-२४ |
पात्र परिचय -
धुर्तराज आणि गायत्री ची मुलं अनुक्रमे- धीरज ,धीरेन , विलास, दुर्वा इत्यादी
प्रेमराज आणि कुंदाच्या मुलांची नावे अनुक्रमे - यशराज बळीराज, अमरराज इत्यादी.
कुंदा चा लग्नापूर्वी चा पुत्र - कल्याण उर्फ कुंज
कुंदा च्या भावाचा मुलगा- क्रिश
संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालयांचे सामने भरविले होते. त्यात सरस्वती महाविद्यालयाच्या संघांमध्ये कल्याण कर्णधार
होता , तर ज्ञान मंदिर विद्यालयाच्या टीम मध्ये अमर कर्णधार होता. सामने अटीतटीचे होते. अमर आणि कल्याण दोघेही चांगले बॅटमन होते , शिवाय चांगले गोलंदाज पण होते ; पण या दोघांपेक्षाही संस्कार महाविद्यालयची टीम अगोदरच फायनल मध्ये पोहोचली होती. त्या संघाचा कर्णधार क्रिश नावाचा तरुण होता. तो खेळण्यात पटाईत होता. सेमीफायनलमध्ये अमर आणि कल्याण प्रतिस्पर्धी होते. तरीही दोघेही चांगले खेळले. दोन्ही संघाच्या धावा पण सारख्या च झाल्या. त्यामुळे पंचाना न्याय देता येईना. शेवटी रणरेट वरून सरस्वती महाविद्यालयाचा संघ विजयी घोषित करण्यात आला ; पण फायनल मध्ये मात्र संस्कार महाविद्यालयाची टीम जिंकली. मँन आँफ द सीरीजचा किताब क्रिश ला मिळाला.
ज्ञानमंदिरचा संघ हरला आणि सरस्वती महाविद्यालयाचा संघ जिंकला. त्यावेळी धिरजला कोण आनंद झाला होता. स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास झाला होता. परंतु फायनल ला
सरस्वती महाविद्यालयाचा संघ हरल्याने धीरज च्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या चेहऱ्यावर चा आनंद क्षणात मावळला. तो कल्याण वर नाराज होत म्हणाला ," काय फायदा झाला ? शेवटी तुझी पण टीम हरली." त्यावर कल्याण हसत बोलला," अरे हा खेळ आहे खेळात शेवटच्या क्षणापर्यंत नाही सांगता येत ,कोण जिंकेल ते आणि खेळामध्ये आपणच सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे असे कोणी ही समजू नये. कधी कधी काय होते , कधी न खेळणारे खेळाडूच खेळून दाखवितात आणि सामना जिंकतात. म्हणून कुणी कुणाला कमी लेखू नये." तेव्हा धीरज त्याच्यावर
चिडत बोलला ," अरे , पण तो स्वतःला चॅम्पियन समजतोय त्याचं काय ? " कल्याण ला न समजल्याने त्याने धिरजला
विचारले ," कुणा संबंधी बोलतोय तू ?"
" अरे त्या अमर संबंधी बोलतोय मी."
" अरे , पण तो तर तुझा भाऊ आहे ना , तुला उलट
अभिमान वाटायला पाहिजेल त्याचा."
" त्याला माझा भाऊ बोलू नकोस , वैरी आहे तो माझा." तेव्ह कल्याण बोलला ," बरे नाही बोलत ; पण हे तर मान्य करावेच लागेल की आजच्या मॅच चा सर्व उत्कृष्ट खेळाडू आहे म्हणून."
" ते का म्हणून ? मॅच तर हरला ना तो ." धीरज बोलला.
" मँच आँफ द मँच चा ' किताब त्यालाच मिळाला ना ?"
" हो ; पण का ?"
" का म्हणजे ?" कल्याण त्याला समजावत बोलला," तो
शेवटपर्यंत खेळत राहिला. नाबाद राहिला. संघ हरला. तो हरला नाही. हे त्याच्या सर्वश्रेष्ठ खेळाडू होण्याचे प्रतीक आहे."
यावर धीरज नाराज होत म्हणाला ," तुझ्याकडून त्याची प्रशंसा मला नाही आवडली. " तेव्हा त्याला कल्याण समजावत म्हणाला," हे बघ ,धीरज जे सत्य आहे ते नाकारून चालत नाही. ते मान्यच करावे लागते. कारण त्या सत्याला ना तू बदल घडू शकत आणि नाही मी बदलू शकत. तेव्हा अश्या छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज व्हायचे नसते. आणि खेळत तर अजिबात नाही."असे बोलून कल्याण तिथून निघून गेला. मला धन्यता वाटली आणि माझ्या मुखातून उदगार निघाले ते असे , जशी खाण तशीच माती ! अर्थात मी कुंज विषयी बोललो हे वक्तव्य. असो. तेवढ्यात माझी नजर अमर वर गेली . अमर थोडा नाराज दिसला. एवढे चांगले खेळून ही शेवटी संघ मॅच हरला. म्हणून असेल कदाचित . पण चषक कप क्रिश जिंकलेला पाहून त्याची नाराजी थोडी
कमी झाली होती. त्याने क्रिश शी हस्तांदोलन केले. नंतर
जिंकलेला चषक कप प्रेक्षकांना अभिवादन करतो. प्रेक्षक टाळ्या पिटुन त्याला दाद देतात. त्यानंतर तो आपल्या आई-वडिलांचे चरणस्पर्श केले आणि शेवटी आपल्या आते चे म्हणजेच कुंदा चे चरणस्पर्श केले. म्हणजे क्रिस कुंदा च्या भावाचा मुलगा होता तर आणि एका अर्था ने बरेच झाले म्हणावयाचे की ही मॅच क्रिस जिंकला ते. नाहीतर त्या दोघात
अजूनच वितुष्ट वाढले असते. असा माझ्या मनात विचार सुरू
असतानाच प्रेक्षकां मध्ये बसलेली त्याची बहीण उठून त्याच्या जवळ येत बोलली," काँग्रेशच्युशन्स ब्रो !"
त्यावर स्मित हास्य करत क्रिस बोलला, " थँक्स !"
धीरज
मी धीरज अर्थात धुर्तराज घोरपडेचा मोठा मुलगा. मला अजून दोन भाऊ आहेत , धीरेन ,विलास आणि एक बहीण दुर्वा तिचे नाव. मी आपल्या मित्राशी गप्पा मारण्यात दंग झालो होतो. एवढ्यात एक कार समोरुन येऊन उभी राहिली. त्यातून एक सुंदर तरुणी खाली उतरली. तिचे केस आखुड होत ; परंतु व्यवस्थित चापात अडकविलेले होते. डोळ्यावर निळा गॉगल , हातात पट्टा असलेले घड्याळ , उंच खोटेचे पायात घातलेले सॅंडल, रुबाबात खाली उतरली आणि एक कटाक्ष आम्हां चौकटी वर टाकून पाहून न पाहिल्यासारखे करत त्यांच्या समोरून निघून गेली.
" कोण रे ही ?" शरद विचारले.
" कोणाला विचारतोस ? " अजय त्याच्याकडे पाहत म्हणाला. तेव्हा शरद त्याच्याकडे पाहत म्हणाला ," कुणाला काय ......तुम्हां लोकांना विचारतोय." अशोक त्याची खिल्ली उडवत म्हणाला ," आम्ही काय ,तिचे शेजारी वाटतोय तुला ?" सर्वजण हसू लागतात. शरद ओशाळला. त्याच्या लक्षात आले की आपण चुकीचा प्रश्न विचारला . तसे अजय पुढे म्हणाला ," नाहीतर काय ......काहीतरीच प्रश्न विचारतोय." शेवटी मी म्हणालो ," पत्ता काढला काढला पाहिज हिचा, ॲटम लय भारी आहे ." तेव्हा धीरेन ने विचारले , " ॲटम म्हणजे ?"
" म्हणजे माल रे ." लगेच शरद ने पुस्ती जोडली .
" पटवायला पाहीजेल."
" हा पटणारा माल नव्हे ! " अशोक बोलला.
" का ?"
" अं sss"
" अरे का नाही पटणार ?"
" आता पाहिले नाहीस कशी तोऱ्यात गेली ती."अशोक
म्हणाला.
" तोऱ्यात जाऊ दे रे , तिचा तोरा उतरविता येतो आम्हांला." मी म्हणालो.
" मग आज घ्यायची का तिला " शरद ने विचारले.
मी उत्तरलो ," इतक्यात नको. अगोदर पाणी किती खोल आहे हे जोखायला हवे. मगच गाळ्यात घेऊ चल."
तेव्हा विलास मला समजावत बोलला ," दादा, उगाच नको त्या फंदात पडू नकोस. बाबा रागवतील." तेव्हा मी त्याच्यावर रागवत म्हणालो ," अरे,चल हट डरपोक कुठला . म्हणे बाबा
रागावतील. बाबांना सांगायचं का हे ?" तेव्हा धीरेन म्हणाला," दादा ,आता तो सांगेलच. मोठा चुगल खोर आहे तो." त्यावर अशोक चिडवत म्हणाला ," धीरज हा नक्की
तुझाच भाऊ आहे ना ?"
" म्हणजे काय म्हणायचे तुला ?" लगेच मागे हटत म्हणाला," मस्करी केली रे तुझी मी." धीरज एकदम गंभीर
स्वरात बोलला ," अशी फालतू मस्करी केलेली मला आवडत नाही." तसा अशोक दिलगिरी व्यक्त करत बोलला ," सॉरी यार. पुन्हा नाही करणार." त्यावर मी म्हटले," ही शेवटची
वार्निग ! कळलं."
देवधर
संध्याकाळी घरी आल्यावर विलास ने सार वृतांत माझ्या जवळ कथन केला . त्याच्या पोटात काहीच गुप्त गोष्ट जात नसे. दिवसभरात जे काय घडेल ते सर्व घरी आल्यावर तो मला सर्व सांगत असे. त्यामुळे त्याच्या पाशी कोणतीही गोष्ट करायला सर्वजण घाबरत असत. धीरज ने त्याला अनेक वेळा दम देऊन ही पाहिले ; पण त्याच्यात काही बदल झाला नाही, म्हणून मग त्याच्या समोर धीरज कोणतीही गोष्ट करीना ; पण कसे कुणास ठाऊक त्याला खबर लागायचीच. मग तो सर्व माझ्याजवळ कथन करायचा.
पण आजची गोष्ट निराळी होती. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्या कारण हे वयच तसे असते आणि कॉलेजात असे प्रकार नित्याचेच घडत असतात. म्हणून मी कुणालाच काही बोललो नाही. ही गोष्ट हसण्यावर नेली.
दामिनी
मी दामिनी ...दयानंद माजंरेकर यांनी मुलगी. मी दिसायला फार सुंदर होती. त्यामुळे मला माझ्या सौंदर्याचा गर्व असला तर त्यात नवल असे काहीच नाहीये. तो सर्वांनाच असतो. तसा मलाही आहे. मला नेहमी वाटत असे की , आपल्याला जोडीदार मिळावा तो आपल्या सौंदर्याला शोभेल असाच. तो दिसायला तर सुंदर हवाच शिवाय त्याचे नाव लौकिक असायला पाहीजेल मग ते खेळामध्ये असो वा अभ्यासामध्ये, नंबर वन असायला पाहिजे होता. या कॉलेजचे नाव बऱ्यापैकी ऐकले होते. म्हणून मी इथे प्रवेश मिळविला. पहिल्या दिवशी काही सडक छाप माजनू दिसले ; पण त्याना मी भाव दिला नाही. त्यांच्यावर तिरपा कटाक्ष टाकून न पाहिल्यासारखे केले . असे घोळक्या- घोळक्यांनी राहिलेले सडक छाप मजनुच असतात. अशी माझी पक्की समजूत होती .
इथं आल्यानंतर काही मैत्रिणीकडून समजले की या कॉलेजमध्ये खेळात आणि अभ्यासात एकच तरुण हुशार आहे आणि तो म्हणजे अमरराज घोरपडे. दिसायलाही सुंदर आहे . असे कळले . मग मी ठरविले की या तरुणाची भेट घ्यायलाच पाहिजेल. मी योग्य त्या संधीची वाट पाहत होते. आणि तशी संधी पण स्वतःहून माझ्याकडे चालते आली. मागील वर्षी अमरचा प्रथम क्रमांक आल्याने त्याचा सत्कार करून कॉलेजतर्फे पारितोषिक दिले जाणार होते. मी त्याच्या जवळ जाते आणि त्याचे नाव माहीत असूनही माहीत नसल्याचा अभिनय करत म्हणाले ," अभिनंदन मिस्टर.....
अमरराज घोरपडे." त्याने माझे अपूर्ण वाक्य पुर्ण केले .मी स्वतःची ओळख करून देत म्हणाली ," मी दामिनी पानसरे."
" ओके ओके गुड नेम."
" थँक्स !"
" बाय !" एवढे बोलून तो तेथून निघून जाण्यास वळला.
क्षणभर मला त्याचा रागच आला. मी कोणालाही भाव न देणारी मुलगी ह्याला भाव देतेय ; परंतु त्याला त्याची किंमतच नाही. स्वतःला काय समजतो हा ? तू असशील चॅम्पियन ; पण मी पण काय टाकाऊ नयेय . चांगली वटआहे माझी. माझ्याशी दोस्ती करण्यासाठी पोरं नुसती तडफडत आहेत. पण मी त्यांना भाव देत नाहीये आणि ह्याला स्वतःहून भाव द्यायला आली हा माझ्या दोस्ताला ठोकर मारून चाललाय. क्षणभर मनात आले की , याला जाब विचारवा की तू स्वतःला काय समजतोस ? पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या
क्षणी मला जाणवले की , मला असाच तरुणाची गरज आहे. नाहीतर लाळ घोटत पाठी मागून येणार्या सडक छाप मजनूची काही कमी नाही. मला असाच स्वाभिमानी व्यक्तिमत्व असलेल्या तरुणाचा शोध सुरू होता. हाच तो
तरुण माझ्या योग्यतेचा आहे. असा विचार करून मी त्याला पाठीमागून आवाज दिला. मिस्टर अमरराज ss " तो थांबला
आणि मागे वळून माझ्याकडे पाहत नजरेच्या खुणेनेच काय म्हणून विचारले.तशी मी त्याच्या जवळ जात म्हणाली ,"माझ्याशी दोस्ती कराल ?"
" आफकोर्स ! आवडेल मला."
" मलाही आवडेल तुमच्या शी मैत्री करायला."
" व्हेरी गुड !"
" कॉपी पिणार का ?"
" आता ?"
" मग काय कॉफी पिण्याच्या पिण्याचा पण काही ठराविक टाईम असतो का ?"
" तसं नाही. पण ?"
" आता पण बिन काही नाही. नवीन दोस्तीची सुरुवात कॉपी पिऊनच करू. कसं ?"
" हो. चालेल."
" मग चल तर !"
आम्ही दोघेही कॅन्टींग च्या दिशेने चालू लागली. तसे सडक छाप मजनु आमच्याकडे आश्चर्याने पाहत असल्याचे मला जाणवले. मग त्यांना अजून हिणविण्यासाठी मी अजून
अमर ला चिटकून चालू लागली. तशी ती त्या सडक छाप मजनू ना आणखीनच धडकीच भरल्याची मला जाणवली.
धीरज
" बघ यार आपल्याला कशी जळवतेय ती." शरद बोलला.
" जळवू दे रे , एक दिवस तिला आपण दाखवून देऊ की
अपुन क्या चिज है ।" अशोक आपल्या शर्टाची कॉलर पकडत बोलला. त्यावर मी चिडून म्हणालो ," चूप रे भडव्या !
सर्वांच्या अगोदर तूच नश्तर लाविलेस."
" कोणी मी ?" अशोक ने विचारले.
" हां भडव्या तूच बोलला होतास. आठवतं ?"
" हा पटणारा माल नाहींये म्हणून." लगेच अजय ने त्याला
पुस्ती जोडली.
" हो मग मी खोटा ठरलो ना ? " अशोक त्याना
स्पष्टीकरण करून देत बोलला , " माल पटला ना त्याला ?"
" त्याला पटून काय फायदा ? मला तर नाही ना पटला ?"
मला चिडविण्याच्या हेतूने अशोक बोलला ," तुझ्यात ते
गट्स नाहीत रे." रागाने दात ओठ मी म्हणालो , " काय
म्हणालास भडव्या ? माझ्यात ते गट्स नाहीत काय ?" असे
म्हणत मी त्याच्या पाशी जातो. तसा तो तेथून पळ मारतो .
तसा मी म्हणालो ," आता पळू नकोस भडव्या थांब."
तेव्हा लगेच अजय मध्ये पडत म्हणाला ," अरे , त्याच्यावर का उगाच चिडतोयस ? तो बोलला ते खोटं तर नाही ना ?" तेव्हा मी वैतागुन म्हणालो ," म्हणून काय असे चिडवायचे असते ?" तेव्हा अजय गंभीर स्वरात म्हणाला," तो चिडवत नाहीये. सत्यस्थिती सांगतोय. तू उगाचच गैरसमज करून
घेतो आहेस. त्याचे म्हणणे खरे होते. मला ही त्याचे म्हणणे पटत होते ते ; परंतु स्वत: वर राग काढता येत नाही ना ?
म्हणून मी त्याच्यावर काढत होतो. बस इतकेच काय ते. अमरचा तर मनस्वी राग आला होता मला. प्रत्येक वेळी अमरच आपली स्वप्न उध्वस्त करतोय. काय करू मी रे याचे ? मी स्वतःलाच प्रश्न केला. तेव्हा माझे मन मला म्हणाले ," तुला अमर ने नाही ना हिनवले तिला जन्म आठवणीत राहील अशी अद्दल घडवायाला पाहीजेल. मग माझ्या मनात तिच्या विषयी कट शिजू लागला. काहीतरी करावे लागणार हे निश्चित पण मला मार्ग सुचत नव्हता. मी विचारात मग्न असल्याचे पाहून धीरेन मला म्हणाला ," दादा , काय विचार करू लागला आहेस ?"
" काही सुचतय का ?" अजय ने विचारले.
" नाही."
" मी सांगू ?" अशोक बोलला.
" काही गरज नाहीये त्याची ! "असे बोलून मी तेथून उठून जाऊ लागलो.
अमर
मी अमरराज, प्रेमराज घोरपडे चा यांचा तीन नंबरचा मुलगा , मला अजून दोन मोठे भाऊ आहेत त्यांची नावे यशराज आणि बळीराज माझ्या आईचे नाव कुंदा.अर्थात मी पहिल्या
दिवसापासूनच दामीनीच्या प्रेमात पडलो. का कुणास ठाऊक ? मला दामिनी फार आवडू लागली होती. तिच्या सहवासात मला फार बरे वाटायचे. मी अजून प्रपोज नव्हते केले होते तिला म्हणा . पण आता वाटू लागले की जीवन संगिनी दामिनी व्हायला हवीय. आज विचारतोच मी तिला. असा मी स्वतः शी निश्चय केला. तेवढ्यात धीरजचा एक मित्र जतीन त्याचे नाव. तो त्याच्याच बहिणीची म्हणजे दुर्वाची छेडखानी करताना मला दिसला . मला राहवले नाही कारण ती माझी सुध्दा बहिणच होती. मी लगेच त्याच्या जवळ पोहोचलो आणि जतींनची कॉलर पकडून एक थप्पड त्याच्या श्रीमुखात भडकवली. मग आम्हां दोघांनी जुंपलीच. मी त्याची चांगलीच धुलाई केली . तेवढ्यात तेथे धीरज आला. वाटले असावे की मी मुद्दाम त्याच्या मित्राला मारत आहे. तसा यो त्याचा मदतीला धावून आला आणि त्यांनी माझ्या शर्टची कॉलर पकडली आणि मला म्हणाला ," काय रे एकटा पाहून मारतोस काय त्याला ? फार मांज आलाय वाटतं." तसा मी एक जोरदार हिसका देऊन स्वतःच्या शर्टाची कॉलर सोडवून घेत म्हटले ," हे मला न विचारता स्वतःच्या बहिणीलाच विचार. मी त्याला का मारतोय ते." तेव्हा दुर्वा म्हणाली ," धीरज दादा अमर दादा उगाच मारत नव्हता त्याला. त्याने...... " तिचे म्हणणे पूर्ण ऐकून न घेताच तो मध्येच बोलला " तुला हजारवेळा सांगितले आहे की तुझा दादा फक्त मी आहे. तू त्या अमर ला दादा म्हणू नकोस."
" का नको म्हणू ? दादा आहे तो माझा म्हणणार मी त्याला
दादा."
" काय म्हणालीस ? " असे म्हणून रागाने तिला मारायला हात उगारतो. तसा मध्येच अमर पुढे येऊन त्याचा हात पकडतो. तसा धीरज बोलला ," अमर माझा हात सोड."
अमर त्याचा हात सोडून देत म्हणाला," बहिणीची छेड काढणाऱ्या ला मारायचे सोडून धाकट्या बहिणीवर हात उगारतोस. लाज वाटायला पाहिजे होती तुला." तसा तो
आपल्या मित्रांकडे वळून बोलला ," होय रे भडव्या ? तू
माझ्या बहिणीची छेड काढत होतास ?"
" नाही मित्रा हा खोटं बोलतोय." जतीन खोटेच बोलला.
" मी खोटं बोलतोय तर दुर्वालाच विचार." अमर बोलला.
" तिला काही विचारायची गरज नाही. मला माहितेय.
ती सुध्दा तुझीच साईट घेणार."
" जर तुझा सख्ख्या बहिणीवर विश्वास नाही तर तुझ्या शी
बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. " असे बोलून अमर तेथून निघून जात असतो ; परंतु जाता जाता जतीन ला धमकी देऊन जातो. म्हणाला ," ऐक रे कान देऊन. आज सोडलंय तुला ; परंतु द्यानात ठेव. पुन्हा जर माझ्या बहिणीच्या वाट्याला गेलास तर तुझे दोन्ही हात खांद्यातून उखडून काढेन आणि फेकून देईन रस्त्यावर. ही फस्ट अँड लास्ट वार्निग ! लक्षात असू दे. " असे बोलून तेथून निघून गेला.
अमर जसा त्याच्या पासून दूर गेला तसा धीरज गर्रकन वळून जतीन च्या शर्टाची कॉलर पकडून बोलला," आता खरं सांग." तसा जतीन बोलला ," अरे खरं तेच सांगितले ना मी !" धीरज बोलला ," ते खरं नव्हते. अमर च्या समोर मी तसं बोललो. बस्स !"
" अगदी खरं सांगू ?"
" हो अगदी खरं."
" मी तुझ्या बहिणीवर प्रेम करतोय. अगदी मनापासून,"
" पण मी तुझ्यावर प्रेम करत नाहीये."
" मी बोलतोय ना त्याच्या बरोबर. तू कशाला मध्ये बोलते
आहेस." असे म्हणून तो जतीन कडे वळत म्हणाला," अरे मग हे अगोदर नाही का सांगायचं ?"
" दादा मी तुला परत सांगतोय मी ह्याच्यावर प्रेम करत नाहीये."
" ठीक आहे. आपण नंतर करू त्याचा विचार." असे म्हणून तो आपल्या मित्रांकडे वळून बोलला ," याद राख पुन्हा
माझ्या बहिणीच्या वाट्याला गेलास तर !" असे म्हणून हळूच
डोळे मिचकावले. दुर्वाच्या नजरेतून ते सुटले नाही.
" तू सख्खा भाऊ असून सुध्दा एखाद्या वैऱ्यां सारखा वागतोस माझ्याशी आणि अमर दादा चुलत भाऊ असून सख्खा भावा सारखा वागतोय माझ्याशी . त्यामुळे मला तुझ्या पेक्षा अमर दादाच जास्त जवळचा वाटतो आणि मला भाऊ म्हणून शोभून ही दिसतो." असे बोलून ती तेथून निघून गेली.
तसा धीरज मनात म्हणाला , माझ्या पेक्षा तुला अमर दादा जास्त प्रिय आहे काय ? थांब. तुझं आता लग्न तुझ्या मना विरुध्द ह्या जतीनशीच करून देतो बघ."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा