कुरुक्षेत्र -२३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र -२३ |
प्रेमराजअजून दोन मुलं झालीत त्यांची नावे अनुक्रमे, बळीराज आणि अमरराज अशी होती. धुर्तराज अजून तीन मुलं झाली. त्यांची नावे अनुक्रमे , सर्वात मोठा धीरज दुसरा धीरेन ,तिसरा विलास आणि मुलीचे नाव दुर्वा असे होते. तसेच त्यांचे स्वभावही वेगवेगळे होते. सर्वात मोठा आपल्या वडिलांसारखा परोपकारी आणि शांत स्वभावाचा होता. बळीराज तापट होता. चट्कन राग येत असे त्याला. लगेच मारामारी करायला उठे. आणि अंगाने पण मजबूत होता. ताकद शीर होता. अमरराज तापट नव्हता. लवकर राग ही येत नसे त्याला. परंतु अन्याय मात्र सहन होत नसे त्याला. बाकी अभ्यासात हुशार प्रथम क्रमांक त्याचा असे आणि खेळात ही हुशार चॅम्पियन गणला जायचा शाळेमध्ये. हे झाले प्रेमराज च्या मुलाचे स्वभाव गुण.
धुर्तराजच्या मुलाचे स्वभाव गुण एकदम भिन्न होते. सर्वात मोठा धीरज आपल्या वडिलांप्रमाणे धुर्त आणि कपटी
होता आणि राग ही लवकर येत असे. शिवाय त्याचे नि बळीराजचे अजिबात पटत नसे. छोट्या , छोट्या गोष्टीवरून ही दोघेही मारामारी करायला उठत असत. पण दोघांची ही ताकद जवळजवळ सारखीच होती. अभ्यासात हुशार पण गणित विषय कच्चा होता दोघांचाही. त्यामुळे हिशोबात गफलत होत असे कधी-कधी ! खेळात ही तरबेज होते. पण नेहमी दुसरा क्रमांक मिळे दोघांना ही . धीरेन ,धीरजच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होता. त्याला स्वतःचे मत असे नव्हतेच. विलास चा स्वभाव मात्र त्याच्या आईवर गेला होता. तो कुणाशी भांडण करत नसे. सर्वांशी मिळून मिसळून वागे. अभ्यासात हुशार नव्हता; पण उत्तीर्ण होण्या एवढे मार्क त्याला नक्कीच मिळत असत. दुर्वा चा स्वभाव ही आपल्या आई साखच होता. सर्वांशी ती गोडी- गुलाबीने राही. ती आपल्या चुलत भावाशी प्रेमाने वागत असे . धीरज ने कितीही विरोध दर्शविला तरी ही ती त्याचं ऐकत नसे. त्यामुळे धीरज चे तिच्याशी कधीच पटत नसे. अभ्यासात मात्र हुशार , मुलींमध्ये प्रथम क्रमांक तिचाच असे. खेळत ही प्रथम क्रमांक
तिचाच असे.
मी धुर्तराज घरी राहायला होतो. परंतु दिवसभरात काय काय घडले , याची खडानखडी माहिती मला यशराज कडून
मिळे. मग चूक कुणाची पण असो. तो योग्य तो न्याय निवाडा
करीत असे. आपल्या भावांचे ही चुकले असेल तर त्यांना सुध्दा दम देवून समज देत असे. हे पाहून मला बरे वाटत होते. आपल्या घराण्यात एक न्याय प्रिय मुलगा झाला म्हणून अभिमानही वाटत असे.
सर्व मुलांचे आता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले
होते. सर्व मुलं आता कॉलेजात जाऊ लागली होती. यशराज
एम. काँम च्या लास्ट ईअरला होता. बळीराज आणि धिरज
बि. काँम च्या शेवटच्या वर्षाला होते. अमरराज आणि. धीरेन
बि. काँम च्या दुसऱ्या ईअरला म्हणजे एस. व्हाय. बि. काँम तर विलास एच. एच. सी. ला होता. आणि दुर्वा ने अकरावीला
कला शाखा निवडली होती. तिला शिक्षिका बनायची फार
इच्छा होती.
कॉलेजात दरवर्षी निरनिराळ्या स्पर्धा घेतल्या जायच्या . निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा , कबड्डी ,क्रिकेट ,लगंडी , खो-खो १०० किलो मीटर धावणे वगैरे. सर्व खेळात प्रथम क्रमांक नेहमी प्रमाणे अमरचाच असे. धीरज ही क्रिकेटमध्ये चांगला बल्लेबाज होता ; परंतु शतक कधीच केले नाही त्याचे. कधी ९७ कधी ९८ रणवरत आउट व्हायचा. बळीराज ही तीच अवस्था ; पण बळीराज चांगला गोलंदाज होता. झटपट विकेट घ्यायचा.
मुलीमध्ये दुर्वा प्रथम क्रमांकावर असायची. त्यामुळे
धीरज आणि त्यांचे चुलत भाऊ त्यांच्यामध्ये वितुष्ट वाढत चालले होते. शिवाय त्यात भर त्यांचा मामा शनी घालत होता.
जेव्हा कधीही आपल्या बहिणीला भेटायला येत असे तेव्हा तो आपल्या बहिणीच्या मुलांना हीच शिकवण देत असे की,
आपली भावंड हीच खरी आपली असतात. ते तुमचे चुलत
भाऊ आहेत नि तुम्हां तिघांपेक्षा सगळ्यात बाबतीत पुढे आहेत. तर असे चालणार नाही. तुम्हां लोकांना त्यांच्याही
पुढे जायला हवे आहे." तेव्हा धीरज ने विचारले ," पण कसे ?" त्यावर शनिमामा उद्गारला ," चिंता करू नकोस ते
मी शिकवींन." त्यामुळेच की काय धीरज सदैव आपल्या
चुलत भांवाशी वैरत्वाच्या भावनेने वागत असे. बळीराज तर तो पाण्यातच पहायचा. आज ही तसेच झाले . कुस्तीची स्पर्धमध्ये दोघांनीही भाग घेतला होता. अगोदर काही मुलांच्या कुस्त्या झाल्या . त्यात ते दोघेही विजयी ठरले. शेवटी दोघांची कुस्ती जुंपली. कोणी कोणाला मागे हटेना. दोघेही तेवढेच ताकतवर पण डावपेचात बळीराज भारी पडला त्याच्यावर. बळीराज ला
विजयी करण्यात आले. धीरज ला ही हार सहन झाली नाही.
त्याने जाता जाता बळीराजच्या डोळ्यात धूळ फेकली. आणि पाय खेचून खाली पाडले त्याला. दोघांची पुन्हा जुंपली
असती ; पण पंच मध्ये पडले आणि दोघांना एकमेकांपासून वेगळी केले. तेवढ्यात गर्दी मधून कुणीतरी आव्हान केले. की, हिम्मत असेल तर माझ्याशी सामना करून दाखव.
सर्वांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या. एक बलदंड
शरीराचा नवयुवक समोर आला. तेव्हा पंच म्हणाले की , ह्या कॉलेजच्या स्पर्धा आहेत .यात बाहेरच्या खेळाडूंना प्रवेश नाही. " त्यावर तो युवक बोलला," फक्त कॉलेजच्याच मुलांच्या स्पर्धा काय घेता ? कधी तरी आमच्या कॉलेजच्या
मुलांशी स्पर्धा घेऊन बघा. कशी धूळ चारतो एकेकाला. "
अमर ला त्याचे बोलणे सहन झाले नाही. तो पुढे सरसावून
म्हणाला ," मी आव्हान स्वीकारले तुझे ." त्यावर तो नवयुवक
बोलला ," शाब्बास ! कोई तो मर्द है , इस मैदान में !"
एवढ्यात पंच म्हणाले ," थांबा. ही स्पर्धा इतरांसाठी नाहीये. तुमच्या पुढच्या वेळेस मात्र सर्वाना प्रवे दिला जाईल." असे म्हणून त्यांनी स्पर्धा संपल्याची घोषणा केली. आणि विजयी स्पर्धकांना पारितोषिक द्यायला सुरुवात केली. एकेकार चे नाव घेऊ लागले. प्रेक्षकांमध्ये कुंदा बसली होती. तिने त्या नवयुवक ला पाहिले मात्र तोच तिला भोवळ आली
नि ती मूर्च्छित पडली. प्रेमराज ने तिच्या मुखावर पाणी शिंपडले. थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली . तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या मुलाला पाहून कुंदा बेशुद्ध का झाली असेल ? काय नातं असेल तिचं त्या मुलाशी वगैरे.. मी विचार करू लागलोच होतो. तेवढ्यात तो नवयुवक पुढे आला आणि त्याने संजय चे चरण स्पर्श केले.
मी आश्चर्यचकित होऊन संजय ला विचारले ," हा मुलगा कोण ? तो तर नव्हे ?" माझा संकेत संजय समजला. नि
लगेच बोलला ," हां सर , हा तोच मुलगा आहे." मी लगेच
दुसरा प्रश्न केला की ,नाव काय ह्याचं ?" संजय बोलला," कल्याण . हा मुलगा माझ्या घरी आला नि आमचे कल्याणच
झाले." मी न समजून विचारले ," म्हणजे ?" त्यावर संजय
बोलला ," हा आमच्या घरी आला नि आमच्या निपुत्रिकांच्या
घरी बाळ जन्मले. खरे नाव त्याचे कुंज आहे ; परंतु आम्ही
त्याला कल्याण संबोधतो. तेव्हा संजय त्याला म्हणाला, बाळ
कल्याण हे माझे बॉस बरं का ? चरण स्पर्श कर त्यांचे ."
आज्ञाधारक मुला प्रमाणे त्याने माझे चरण स्पर्श केले. मी त्याला आयुष्यमान भव ! असा आशिर्वाद दिला . तेवढ्यात
तेथे धीरज आला नि त्याच्या समोर आपला उजवा पुढे करत
बोलला ," अभिनंदन." हाताला हात न मिळविता विचारले,
" कशाचे ?" तेव्हा धीरज स्मित हास्य करत बोलला," माझ्या वैऱ्याना आव्हान केल्या बद्दल." त्यावर कल्याण बोलला ," तो खेळ आहे. आणि खेळात दुश्मनी नसावी."
" हो ; पण खेळात गर्व पण असू नये ? "
" गर्व जरूर असावा. पण मत्सर नसावा."
" पण अर्थ एकच ना ?"
" नाही. वेगळे- वेगळे आहेत."
" जाऊ दे. मला वाद नाही घालायचा त्या विषयी. पण...
" पण काय ?"
" आपण दोस्त तर बनू शकतो ना ?"
" बनू शकतो ,पण मी ओळखत नाही तुम्हाला."
" सॉरी ! प्रथम ओळख करून देतो...... मी धीरज घोरपडे. " माझ्याकडे बोट करत पुढे बोलला," ह्यांचा नातू."
" ओह ! सॉरी ! मला माहित नव्हते. "
" काही हरकत नाही. पण आता ओळख झाली ना ?"
" हो नक्कीच!"
" मग आज पासून आपली मैत्री पक्की !"
" हो ; पण आधी ओळख करून देतो माझी." असे बोलून तो किंचित थांबला. नि मग पुढे म्हणाला ," माय सेल्फ
कुंज बिहारी !" हस्तांदोलन साठी आपला हात पुढे करतो. धीरज त्याच्याशी हस्तांदोलन करत बोलला ," नाईस टू मीठ यु !"
मी मात्र मोठ्या सम्रमात पडलो नि मनात विचार करू लागलो. की ह्याला पाहून कुंदा बेशुध्द का झाली असेल ?
ह्याला फक्त एकच कारण असू शकतं. आणि ते म्हणजे हा
मुलगा दुसरा कुणी नसून कुंदा च्या मामा ने कचरा कुंडीत
फेकलेलाच असावा. माझी एकदम खात्रीच झाली .परंतु
धीरज आणि कल्याण मध्ये झालेल्या दोस्तीला विरोध करावा
असे ही एकदा मनात येऊन गेले. म्हणावे की मालक आणि
नोकर यांच्या मध्ये कधी मैत्री होऊ शकत नाही. परंतु मनात
असूनही मी त्याला बोलू शकलो नाही. कारण त्याचे पालन पोषण जरी आमच्या ड्रायव्हर ने केले असले तरी तो मुलगा
कुंदा चा होता. अर्थात आमच्याच घरचा सदस्य असायला हवा
होता तो. पण तसे झाले नाही. दैवाचा खेळ आहे हा सारा .
परंतु धीरज आणि कल्याण मध्ये झालेली दोस्ती पुढे घातक
ठरणार होती. पण करणार काय ? दुसरा इलाज नव्हता मुळी.
पण का कुणास ठाऊक ? कसे माझ्या मनात आले ,मी
एकदम बोलूनच टाकले. मी धीरज कडे पाहत बोललो की,
मैत्री कधी ही आपल्या बरोबरीच्या माणसा शीच करायची
असते. नोकर आणि मालक यांच्या मध्ये मित्रता कदापि असू
शकत नाही."
त्यावर धीरज बोलला , " आजोबा , नोकर त्याचे वडील
आहेत. आणि ते सुध्दा काकांच्या मोटारीचे ड्रायव्हर आहेत.
आमच्या नाही."
त्यावर मी निरुत्तर झालो. धीरज त्याचा पकडून त्याला बाजूला घेऊन गेला . मी फक्त असाहाय्य पण दोघांकडे पाहत राहिलो. मी घरी आल्यानंतर प्रेम च्या घरी निघालो
होतो. तेवढ्यात मी एका सतग्रहस्ताला त्यांच्या बंगल्यातून
बाहेर पडताना पाहिले. यापूर्वी त्याला कधीच पाहिल्याचे मला आठवत नाही. तो बाहेर पडून गेल्यानंतर , मी दरवाजावरील बेल दाबली. थोड्याच वेळात दरवाजा उघडला. अर्थात दरवाजा कुंदानेच उघडला होता. पण मला
पाहून ती चपापली. चोरी करत असताना पकडली गेली असेच तिच्या चेहऱ्यावर भाव उमटले होते जणू ! मी आंत
प्रवेश करत म्हटले ," सुनबाई ,पाहुणे कोणे म्हणायचे बरे हे ?" माझ्या या अकस्मात प्रश्नाने ती गोंधळलीच होती.
पण लगेच स्वत:ला सावरून बोलली ," प - प- पा- हूं णे ?
" होय. आता जस्ट बाहेर गेलेत ते."
" ते होय " हसून पुढे बोलली ," माझे मामा आहेत ते."
" पाहिल्यांदाच मी पाहतोय त्याना."
" माझ्या लग्नात ही आले होते ना !"
" आले होते .....? मग मला कसे आठवत नाही ?"
" आले होते ; परंतु जास्त वेळ थांबले नाहीत ते .लगेच निघून गेलेत."
" असं होय .तरीच म्हटलं." कुंदा च्या चेहऱ्यावर समाधानाची चिन्ह उमटली. जणू तिच्या उत्तराने माझे समाधान झाले असावे असे तिला वाटले असावे. परंतु तिच्या
उत्तराने माझे समाधान झाले नव्हते. उलट कुंदा च्या प्रथम
पुत्रा विषयी सत्य जाणून घेण्याची उत्सुकता मनात निर्माण
झाली. त्यासाठी मला कुंदा च्या मामाची भेट घेणे जरुरीचे होते. म्हणून मी तिला लगेच प्रश्न केला," कुठं राहतात ते ?"
" पनवेल ला वाजे गावात."
" वाजे गाव का ?"
" हां पण आपण का विचारता ?"
" काही नाही ग अशीच आपली चौकशी केली." मी कुत्रीम
हास्य चेहऱ्यावर आणत बोललो. परंतु माझ्या या उत्तराने तिच्या मनात उत्पन्न झालेली भीती थोडीशी दूर। झाली असावी . असे एकंदरीत तिच्या चेहर्यावर उमटलेल्या चिन्हावरून वाटत होते ; पण मी जास्त चौकशी न करता विषय बदलण्याचे नाटक करत म्हणालो ," प्रेम नाही का अजून ?"
" एवढ्या लवकर कुठे येतात ते."
" बरे . मुले कुठे दिसत नाही ती ?"
" यावेळी कॉलेजमध्ये असतात नाहीका ? " अडाणचोट प्रश्न विचारल्याचेे मलाच कसेतरी वाटले नंतर. काय बोलावे त्याचा विचार मी करत होतो. एवढ्यात ती स्वतःच बोलली ," तुम्ही बसा ते येतीलच एवढ्यात. तोपर्यंत मी चहाच बघते ." असे बोलुन ती स्वयंपाक घरात निघून गेली. मी सोफ्यावर बसलो नि कुंदा विषयी विचार करू लागलो होतो. कुंदा ने तातडीने आपल्या मामाला का बोलून घेतले का असेल बरे ? कल्याण बद्दल तर नसेल ना ? म्हणजे
कल्याण ला पाहताच मूर्च्छित झाली ती. याचा कारण तेच तर नसेल ना, मी जे समजतोय. बहुतेक करून तेच कारण असावे . म्हणूनच तिने आपल्या मामाला ताबडतोब बोलावून घेतले. तिला विचारून पाहू का ? नाही, नको. ते विचारने सोयीचे ही नाहीये. आणि शोभणार ही नाही . त्यापेक्षा आपण तिच्या मामा कडूनच माहिती मिळवू . परंतु त्यासाठी त्याच्या गावी जावे लागेल. आणि त्यांच्या गावी जाणे काही कठीण नाही. असे मी स्वतःशीच म्हणालो. एवढ्यात कुंदा नीट चालला ती मला आणि मला दिला मी घेतला नाही प्यायला लागलो की निमूटपणे उभी राहिली बाजूला तसे मी चहा पिता-पिता तिला विचारले ," तुझ्या मामाचे नाव काय ग ?"
त्यावर ती बोलली ," बाळासाहेब जगे."
मी म्हटले ," जगे का ?"
" तुम्हाला जायचे का त्यांच्याकडे ?" तिच्या या प्रश्नाने मी हादरवलोच. तिला कसे कळले की मी तिथे जाणार आहे
म्हणून. बहुतेक मी त्यांची कसून चौकशी करत असल्याचे पाहून तिने हे ओळखले असावे. मी लगेच तिला म्हणालो," नाही गं मी कशाला जाऊ तिकडे."
" बाबा , तुम्हाला कल्याण बद्दल माहिती पाहिजे असेल तर ती मी देते तुम्हाला ." तिने सरळ सरळ विषयाला हात घातला. मला काय बोलावे ते सुचेना. मी स्तब्द राहिलो. काही बोललोच नाही. तशी तीच म्हणाली ," बाबा कल्याण माझ्या पहिल्या प्रेमाची निशाणी आहे. " माझ्या अंगावर वीज कोसळल्याने जाणवले मला. पण क्षणभरच. लगेच मी तिला
विचारले की , तुला कसं माहित , तुझ्या मामाने तुझ्या मुलालाला कचराकुंडीत फेकले आणि तुझ्या मामानेच फेकलेला मुलगा तो हाच आहे ?" त्यावर ती म्हणाली ," त्याला दोन कारणे आहेत."
" कोणती ?"
" एक म्हणजे कचराकुंडीतुनच कल्याण ला आणलं गेलंय. "
" आणि दुसरे कारण ?"
" दुसरे कारण हे आहे की, कल्याण हुबेहूब दिनकर सारखाच दिसतोय. त्याचा डी एन ए टेस्ट केल्यात तर लगेच
माहिती मिळेल." तिचा स्पष्टीपणा मला एकदम भावला. मी
तिची प्रशंसा करत बोललो ," पोरी धन्य आहेस तू आणि धन्य
आहेत आई-वडील. ज्यांनी तुझ्या सारख्या सत्यवादी मुलीला
जन्म दिला. " त्यावर ती बोलली ," बाबा जे सत्य आहे ते कधीही लपणार नाही. ते कधी ना कधी समोर येईलच
सर्वांच्या. नंतर शरमेने मान खाली घालण्यापेक्षा अगोदरच
सत्याची जाणीव करून दिलेली काय वाईट आहे ?"
" खरंय पोरी !" असे मी म्हटले. नि अचानक मला
गहिवरून आहे. डोळे पाण्याने भरले. परंतु आनंदाश्रू होते ते.
मला पुढे बोलवलेच नाही. माझ्या डोळ्यात असलेले अश्रू
पाहून तिने मला न समजून विचारले ," बाबा तुमच्या डोळ्यात
पाणी ?" त्यावर मी म्हटले ," हे आनंदाश्रू आहेत पोरी ! तुझ्या
सारखी सत्यवादी सून लाभली म्हणून."
" मग डोळे पुसा आधी. नाहीतर मला रडू येईल."
तिच्या या वक्तव्यावर मला हसू आले. मग ती पण हसू लागली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा