Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र - २२

कुरुक्षेत्र - २२
कुरुक्षेत्र - २२

 


         " मी खोटे सांगेन असे वाटलंच कसं तुला ?"
         " सॉरी यार !"
         " व्हॅट्स  सॉरी  ? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."
       "  प्लीझ  माफ कर ना आता."
       " माफ करीन पण  एका अटीवर ."
       " कोणत्या ?"
       " मला आता जे काय सांगितले ते पुन्हा  कोणाला ही सांगू नकोस. "
       " मान्य . नाही सांगणार."
       " आता आपली पसंती झाली. आता फक्त मुलांची पसंती राहिली  ती एकदा झाली की मग लग्नाचा मुहूर्त काढायला मोकळे झालेत आपण." त्यावर तो म्हणाला ," चल,  बाहेर जाऊन आधी खुशखबर देऊन सर्वांना. आणि मुलांची पण  पसंती विचारु ,  कसं ? "
      " हो ."  मी म्हणालो. मग आम्ही दोघेही त्याच्या खोलीतून हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये आमची सर्वजण वाट पाहत होते. कमलाकर ने  हिरवा कंदील देताच सर्वांचे चेहरे उजळले. मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. प्रेमला आणि कुंदाला एकांत मध्ये भेटण्याचे आम्ही परवानगी दिली. मला खात्री होती की प्रेमराज माझी निवड डावलणार नाही. आणि तसेच झाले. त्याने लगेच आपली पसंतीची पावती दिली. म्हणजे  ते त्याला थोड्या वेळात दोघे बाहेर आले आणि आम्हाला अपेक्षित असलेली खुशखबर त्या दोघांनी दिली. मग आम्ही लगेच मुहूर्त पाहून  साखरपुड्याची तारीख आणि लग्नाची तारीख निश्चित केली. आणि १५ दिवसाच्या आत लग्नही झाले . लग्नाला मानसी आई ,अर्चना , अपर्णा ,योगी आणि त्याच्या मठातील काही संत मंडळी. लग्नाला येतात नि वधु-वरांना शुभ आशिर्वाद देतात आणि पुन्हा ते आपल्या स्थानी निघून जातात.

    एकंदरीत सर्वत्र असे चित्र दिसून येते की ,दोन स्त्री,या एका घरात एकत्र नांदत नाहीत. काही ना काही कारणावरून त्या दोघींमध्ये वाद सुरु होतात. मग  घरात  वादविवादाचे  वातावरण निर्माण होऊ लागते. छोट्या छोट्या कुरबुरी नंतर मोठ्या होऊ लागतात आणि मग एकत्रित असलेले कुटुंब विभक्त होते आणि हे सारे दोन स्त्रिया मुळे  घडते. पण  आमच्या घरात मात्र उलटा प्रकार होता.  दोघी जाऊ कधीही एकमेकांशी भांडत नसतं. आणि  काही कारणास्तव कधी भांडण झालेच तर एकमेकांना सॉरी बोलून लगेच भांडण ही विसरून जायच्या. त्यामुळे दोघींमध्ये मोठा वाद कधीच होत नसे. पण त्या दोघींचे यजमान मात्र आपसात नेहमीच भांडत असत. एका बापाची  दोन मुलं.पण दोघांचे स्वभाव मात्र भिन्न एकमेकांना पूरक नसणारे.
     प्रेम नावाप्रमाणे  प्रेमळ  आणि परोपकारी होता.  त्याच्या एकदम उलट होता धुर्तराज होता. नावाप्रमाणे कपटी आणि तापट होता. हवी असलेली कोणतीही वस्तू कोणत्याही मार्गाने मिळविण्यात त्याचा हातखंडा होता. त्यामुळे दोघांचे कधीच पडत नसे. दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे.
        धुर्तराज इतर बिल्डर्स प्रमाणे  सरकारी अधिकार्‍यांना लाच लुचपत देऊन तो आपली कामे करून घ्यायचा. पण प्रेमराज  ते मान्य नसायचे .  त्याचे म्हणणे असे होते की ,  कायदेशीर जे काय होईल ते करायचे .  गैरकानूनी कोणतेही काम करायचे नाही.  मग ते धुर्तराज ला कसे पटणार , म्हणून मग ते तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला ," बाबा मला प्रेम बरोबर बिझनेस करायचा नाहीये." मी त्याला विचारले ,"  का बरं ?" तो उत्तरला ," तो नेहमी आपलेच म्हणणे खरे करतोय."
      " म्हणजे नेमकं काय करतो तो ?"
      " मी घेतलेल्या निर्णयाला नेहमीच विरोध करतो."
       " का ?"
       "  कारण त्याला वाटते की बिझनेस इमानदारीने  होतो."
       " मग इमानदारीने होतो ना कुठं चुकलंय त्याचं ."
       " इमानदारीने दोन वेळेचे जेवणच जेवू शकतो माणूस.
मोठा बिझनेस मेन नाही बनता येत."
       " ओह ! म्हणजे तुला मोठा बिझनेस मेन बनायचे आहे.
होय ना ?"
       " ते तर सर्वांचेच स्वप्न असते. मी काही वेगळे केले असे मला वाटत नाहीये."
      " आम्ही सुद्धा इमानदारीनेच  बिझनेस केला आजपर्यंत.
बेईमानी नाही करावी नाही लागली कधी !"
       "  म्हणूनच तुम्ही आहात तिथेच राहिलेत कायम."
        त्यावर मी चिडून म्हणालो ," म्हणजे तुला काय म्हणायचेय तुझ्या आजोबांना आणि मला बिझनेस  करता येत नाहीये." तेव्हा तो  आपली मान खाली घालत एकदम
मृदू आवाजात म्हणाला ," मला तसे नव्हते म्हणायचे."
      " मग म्हणणे काय आहे तुझे ?"
      " मला प्रेम सोबत बिझनेस नाही करायचा ."
      " याचा अर्थ ?"
      " वेगळा व्यवसाय द्या मला."
      " कोणता धंदा करू इच्छितोय ?"
      " बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचा ."
      " थांब जरा . मला प्रेम चे काय म्हणणे आहे ते पण ऐकू दे जरा." असे बोलून मी प्रेमला हांक मारली. प्रेम ने  आतून " " ओ " दिला. आणि थोड्याच वेळात माझ्यासमोर येऊन हजर झाला. मी त्याच्याकडे पाहत विचारले," प्रेम तुझ्या दादाला तुझ्याबरोबर बिझनेस करायचा नाहीये. तेव्हा तुझे  म्हणणे काय आहे ते सांग बरं." त्यावर प्रेमराज बोलला ," बाबा  माझे ,काहीच म्हणणे  नाहीये . तुम्ही जे सांगाल ते मी प्रामाणिकपणे करीन." मला अपेक्षित असलेले उत्तर त्यांच्याकडून मिळाले. मी एकदम समाधाना ने त्याच्याकडे
पाहत म्हणालो ,"  ठीक आहे. मग आज पासून तू फक्त केमिकल कंपनीचे व्यवहार पाहायचेस. " प्रेमराज ने मानेनेच  " हो " म्हटले. मग मी  धुर्तराजला उद्देशून म्हणालो ,"  आणि तू फक्त आपल्या कन्ट्रक्शन लाईनच पहायचीस. आणि दोघांनी ही एकमेकांच्या व्यवसायात अजिबात हस्तक्षेप करावयाचा नाहीये. कळले. " दोघांनी ही आपल्या माना डोलावल्या. दोघांना ही  व्यवसाय वेगळे करून दिले  तरी धुर्तराज चे समाधान काही झाले नाही. त्याला आता घरी ही वेगळे करून पाहिजेल होते. मी त्याला म्हणालो ," मी घराचे
दोन भाग करतो. एका भागात तू रहा. आणि दुसऱ्या भागात प्रेम राहील. तेव्हा तो म्हणाला ," मला एका आड्याखाली घायचे नाहीये. "
     " मग ?"
     " त्याला वेगळे घर घेऊन द्या."
     " त्यापेक्षा तूच का  वेगळे घर घेत नाहीयेस ?"
     "  नाही. मला वडिलोपार्जितच घर हवंय. "
     " तुला वडिलोपार्जित घर हवंय ना , मग हरकत नाही. इथेच जवळच एक चाळ आहे. त्या चाळीत आपले जुने घर आहे. आणि ते वडिलोपार्जितच आहे. ते तू घे." त्यावर तो
चिडून बोलला," ते छोटंसं घर मी घेऊ ? एवढा मूर्ख वाटलो
मी  का तुम्हाला ?" तेव्हा मी उत्तरलो ," अरे,आता तूच तर म्हणाला होतास ना की मला वडिलोपार्जित घर हवंय म्हणून." त्यावर तो म्हणाला ," हां वडिलोपार्जित घर हवंय मला .परंतु ते नव्हे ! मी या घरा संबंधी बोलतोय."
  " तुला हे घर देऊन मी कुठं जाऊ ?"
  " तुम्ही कायम इथंच राहू शकता. मला काहीच प्रॉब्लेम नाही."
    " ते का ?"
    " तुम्ही या घरचे सर्वस्व आहात. तुम्हाला कसे हाकलून
देऊ शकतो मी बरे."
     " जसे भावाला हाकलतो आहेस तसाच. " त्यावर तो  काहीच बोलला नाही. मग मी प्रेम ला  माझ्या खोलीत बोलविले. प्रेम आला तसे मी त्याला स्वतः जवळ बसवून म्हणालो ,"  हे बघ प्रेम  तुझ्या दादाला आता हे घर पण पाहिजेल."
     "  मग विचार कसला करताय बाबा देऊन टाका त्याला हे घर."
     "  आणि तू कुठे राहणार ?"
     " जगाच्या पाठीवर कुठे ही !"
     "  म्हणजे तुझी काहीच तक्रार नाहीये."
     " नाही."
     " तुला हे घर सोडावे लागले तरी  !"
     " हो ."
     " मग  माझं एक ऐकशील जरा."
     " हो. नक्कीच ! "
     " आपल्या भाड्याच्या चाळी आहेत ना , त्या चाळीत एक
खोली होती. त्यात तुझे आजोबा आणि पणजी राहायची.
ती चाळ तू पाड आणि त्या जागेत टूंबदार बंगला बांध."
     " आणि त्या चाळीतील भाडोत्री   कुठे जातील ?"
     "  त्यांना आपण दुसऱ्या चाळीत राहायला देऊ ." मी त्याला म्हणालो.
     "  हो. चालेल."  तो म्हणाला.
बंगला बांधण्याचे काम  धुर्तराजला देऊ केले .परंतु त्याने सरळ नकार देऊन टाकला. म्हणून मग बाहेरच्या कंत्राटदाराला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले. घर बांधून होईपर्यंत प्रेमचे कुटूंब तेथेच राहिल असे मी अगोदरच जाहीर केले होते. एकाच घरात वेगवेगळ्या स्वयंपाक बनवला जायचा . परंतु बनविले जेवणाचे पदार्थ मात्र दोन्ही कुटुंबात फिरायचे याचे कारण दोन्ही जाऊ बाईचे चांगले पटायचे. त्यामुळे जेवणाला  फार लज्जत येई. वेग- वेगळे पदार्थ खायला मिळत असत. त्यामुळे आमची चंगळ सुरू होती. बंगला बांधायला दोन वर्षे लागली. त्या दोन वर्षात दोन्ही कुटूंबात पाळणे हलले. प्रथम कुंदाला  मुलगा झाला. त्याचे नाव यशराज  ठेवले. त्यानंतर गायत्रीला  मुलगा झाला. त्याचे नाव धीरज ठेवले. घर बांधुन होताच घराचा गृहप्रवेश करण्यात आला. प्रेमराज आपल्या परिवारा सह नव्या घरात राहायला गेला.     
        ग्रहप्रवेशाच्या वेळी  मानसी आई आणि त्या दोघी बहिणी पण आल्या होत्या .  मुलांचा वेगळाचार झालेला पाहून त्या दोघीना तर  वाईट वाटलेच परंतु मानसी आईला त्याचे फार दुःख झाले.  त्यातच ती आजारी पडली. त्यांचा आजार  विकोपाला गेला आणि त्यातच तिचा अंत झाला. तिचा अंत्यसंस्कार योगीच्या हातून करविला. कारण तो तिचा सख्खा आणि सर्वात मोठा मुलगा होता. घरात सर्वात मोठा
मी  आहे , म्हणून योगी ने मला आग्रह केला होता. परंतु हा तुझा अधिकार आहे माझा नव्हे ! असे मी त्याला सांगितले.

    त्यानंतर एके दिवशी असाच एका कामानिमित्त मी पनवेलला गेलो होतो. तेव्हा मला अचानक आठवण झाली की प्रेमा इथंच  राहते आणि मागे मी तिच्या जवळ गेलो होतो. त्यावेळी ती मला म्हणालीे होते की , अलका बद्दल काही तरी सांगायचे आहे म्हणून. मी माझ्या मनात विचार केला की इथे आलोच आहे तर आल्या सारखे तिला भेटून जावे. कदाचित अलका बद्दल नवीन काहीतरी माहिती मिळेल. असा विचार करून ड्रायव्हरला म्हणालो," संजय मोटार  त्या बिल्डिंगशी घे. जिथे आपण मागच्या वेळी घरी गेलो होतो. आठवतं ?
       " हो ; चांगलेच. " संजय म्हणाला. त्यानंतर  संजयने बरोबर तिच्या बिल्डींगजवळ  मोटार नेऊन उभी केली. मी मोटार मधून खाली उतरलो आणि चालत चालत तिच्या फ्लॅट जवळ आलो  आणि  दरवाजा वरील बेलचे बटन दाबले.
थोड्याच वेळात  दरवाजा उघडला. तेव्हा समोर प्रेमा उभी होती ; परंतु  तिच्या चेहऱ्यावर पाहताच मला भला मोठा धक्का बसला . तिचे पांढरे फटीक कपाळ झाले होते . तिच्या कपाळावर कुंकू नाही. तेव्हाच मी ओळखले की ती आता विधवा झालीय. मी आंत प्रवेश करत म्हणालो ," केव्हा घडले हे ? "
       " झाले एक वर्ष ! "
       " त्यांना आजार होता काही ?"
       " नाही ना , दिवसभर घरीच होते ते. एकदम ठणठणीत
तब्बेत होती त्यांची. संध्याकाळच्या वेळी ते मला म्हणाले, जरा पाय  मोकळे करून येतो म्हणून सांगून गेले मला. परत
आले  तेव्हा तब्येत एकदम बिघडलेली .  अचानक त्यांच्या
छातीत दुखू लागलंय , म्हणून मी त्यांना इस्पितळात घेऊन जायला निघाली. परंतु रस्त्यातच त्यांनी प्राण  सोडला. बोलता-बोलता  तिचा स्वर मंदावला आणि तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. मला कसे तरीच झाले. सुखलेल्या जखमेवरील खपली काढल्या सारखे  जाणवले मला . मी तिचे सांत्वन करण्याच्या उद्देशाने म्हणालो ," फार वाईट घडले
गं असं घडायला नको होते. " ती आपल्या पदराने डोळे पुसत म्हणाली ," नशीब आपले , दुसरं काय ? " तेव्हा मी उत्तरलो ," जाऊदे वाईट वाटून घेऊ नकोस तू ." त्यावर ती कुत्रीम हास्य आपल्या चेहऱ्यावर आणत म्हणाली ," माझं राहू दे मेलीचे  नेहमीचेच आहे ते रडगाणे ! तुमचे सांगा कसे चालले आहे ?"
     " ठीकच  आहे म्हणा. मागच्या महिन्यात मानसी आई पण देवाघरी गेली."
     " आजारी  होत्या का त्या ?"
     "  हो.पण गंभीर आजार नव्हता .  पण होता आजार ....
     " अलीकडे   काही सांगता येत नाहीये कुणाला कधी काही होईल ते ."
      " हो , खरंय." असे म्हणून विषय बदलण्याचा हेतूने ती म्हणाली ,"  काही काम होते का ? का  सहज म्हणून आलेत माझ्याकडे ?"
      " हो. कामच आहे."
     " कोणतं ?"
     " "तू मागे म्हणाली होतीस ना , की अलका बद्दल काही सांगणार आहेस म्हणून." ती एकदमच आश्चर्य  व्यक्त करत म्हणाली ,"  बापरे ! एवढ्या दिवसां नंतर आठवण होतेय तुम्हाला ." तेव्हा मी दिलगिरी व्यक्त करत म्हणालो ,"
     "  कामाच्या व्यापात आठवण राहिली नाही बघ मला ."
      " मागे एकदा मी माहेरी गेली होती तेव्हा ती भेटली होती
मला. तेव्हस ती मला म्हणाली , चौदा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगून सुटून आली म्हणून."
      " म्हणजे एवढी वर्षे तुरुंगात होती तर ! आणि मी शोधतोय इथं तिथं. बरं ते जाऊ दे. आता कुठं राहते ते सांगितले आहे का काही ?"
      " नाही ना ."
      " तू विचारले नाहीस ?"
      " विचारले पण सांगितले नाही."
      " या जन्मात तिची पुन्हा भेट कधी होईल असं आता वाटत नाही. " मी एकदम निराशमय स्वरात बोललो. त्यावर
प्रेमा उत्तरली ," होईल , होईल कधीतरी नक्कीच भेट होईल
तुमची तिच्याशी ! माझी एकदम खात्री आहे." मी एकदम खिन्न स्वरात बोललो ," आता फक्त त्या आशेवरच जगायचेय. "
      " माणसाचे जीवन तसं आहे , फक्त आशा करायची ती
पूर्ण   होईल की नाही हे ठाऊक नाहीये." मला तिचे म्हणणे पटले. तिचा पाहुणचार स्वीकारला. आणि मग मी घरी परतलो.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..