Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

कुरुक्षेत्र - २१

कुरुक्षेत्र - २१
कुरुक्षेत्र - २१

 

                         
     योगी निघून गेला. तो पुन्हा पाच वर्षानंतर आला आणि आपल्या आईला म्हणाला ," आई , तू आता चल माझ्याबरोबर ."
     "  कुठं ? "
     " आश्रमात."
     "  कशाला ?"
     "  पापाचे परिमार्जन करायला."
     " पाप...    मी कुठे केले केलंय  पाप ?" मानसी आईने न
समजून गोंधळून विचारले.
     " देव दादाचे जीवन उद्ध्वस्त केलेस ते पाप नव्हे का ?"
योगीने विचारले. तेव्हा मानसी आई दुःखभऱ्या स्वरात बोलली ," खरंय तुझं. मी तुझ्या बरोबर आश्रमात यायला
तयार आहे. परंतु इथल्या सुरक्षा बद्दल काय ?कोण पाळत
ठेवणार मोठीवर ? तुझ्या म्हणण्या प्रमाणे तिने अनेकदा धाकटी वर विष प्रयोग केला. मी सावध असल्यामुळे ती वाचली. त्यावर योगी म्हणाला ," बाळ जन्माला आलंय. तेव्हा
आता इतक्यात काही होणार नाही. परंतु जे होणार आहे ते
महाभयंकर होणार आहे." तेव्हा मानसी आई घाबरून म्हणाली," म्हणजे काय होणार आहे पुढे ?"
     " ते इतक्यात सांगणे इष्ट नाहीये."
     " का इष्ट नाहीये."
     " आई ,भविष्यात काय घडणार आहे ,हे जर अगोदरच
कळलं तर मनुष्य एक दिवस सुध्दा सुखाने आणि शांती पूर्वक
जीवन जगू शकणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच
झालेली योग्य नव्हे काय ?"
     " मला तुझ्या ह्या रहस्यमय बोलण्याचा अर्थ लागत नाही."
      " आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न ही करू नकोस.
हेच तुझ्या हिताचे आहे. तेव्हा मागची चिंता सोड आणि चल
माझ्या सोबत."
     " मी तुझ्या सोबत यायला तयार आहे,परंतु त्या दोघीचं
काय ?"
     " त्याना सुध्दा सोबत घ्यायचंय आपल्या."
     " त्या येतील? "
     " ते काम माझ्यावर सोड आई."
     " पण एवढ्या लहान  बाळांना सोडून त्या कश्या येतील ?"
     " बाळांच्या भल्यासाठी यावे लागेल त्याना ."
     " म्हणजे ?"
    " आई , तू हजार प्रश्न विचारत राहू नकोस. मी त्या दोघींना
काय सांगायचे ते सांगेन. तू फक्त हो म्हण. त्यावर मानसी आई  ने होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर योगी त्या दोघींना
एकांतात भेटून सांगितले की , तुमच्या बाळाच्या भल्यासाठी
तुम्हां दोघीना माझ्या सोबत यावे लागेल." अगोदर त्या तयार
नव्हत्या. त्या म्हणाल्या , " आम्हाला आमच्या बाळा सोबतच
राहू द्या." त्यावर योगी म्हणाला ,"  तुम्हाला तुमचं बाळ हवंय
का नको ते आधी सांगा." त्या एकदम म्हणाल्या ," हवंय ना ?"
     " मग मी सांगतो ते ऐकायचं. " असे बोलून योगी किंचित
थांबला. त्या दोघींच्या चेहऱ्यावर चे भाव वाचले नि मग पुढे
म्हणाला," तुम्हां दोघीना बाळाच्या उज्जवल भविष्यासाठी
माझ्या सोबतच चालावे लागेल. नाहीतर जे काय होईल त्या
गोष्टीला तुम्ही दोघी जबाबदार असणार आहात. तेव्हा तुम्हां
दोघीना काय मान्य आहे ते बघा."
     " स्वामी आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. परंतु एवढ्या लहान बाळांना सोडून यायला आमचे मन
तयार नाहीये." अर्चना म्हणाली.
     " हां स्वामी ! बाळ थोडे मोठे होऊ दे ,मग आम्ही निश्चतच
तुमच्या सोबत येऊ." अर्पणा बोलली.
    " अजून पाच वर्षे तुम्ही तुमच्या बाळा सोबत राहण्याची
अनुमती देतो. त्यानंतर नाही." योगी बोलला.
     " आम्हाला मान्य आहे." त्या दोघी एकदम बोलल्या.
     त्यानंतर त्या दोघी आणखीन पाच वर्षे त्या आपापल्या
बाळा सोबत राहिल्या. पण त्या पाच वर्षात अर्चनाने आपल्या
मुलावर संस्कार जे घडविले. ते त्याच्या भविष्य काळासाठी
तर चांगले नव्हेतच. तो आपल्या धुर्तराज या नावाप्रमाणेच
महाधुर्त निघाला आणि दुसरीचा प्रेमराज तिच्या सारखा सौजळ , मन मिळाऊ होता. असे म्हटले जाते मुलं तशीच
घडतात जसे त्यांच्यावर संस्कार करविले जातात. सज्जन
माणसाची मुलं पण सज्जन असतात. तर दुर्जन माणसाची
मुलं सुध्दा दुर्जनच बनतात. हे त्रिवार सत्य आहे. असो.
      दहा वर्षे पूर्ण होताच पुन्हा योगी आला नि त्या दोघीना आपल्या सोबत घेऊन गेला. त्यामुळे त्यांच्या संगोपनाची
सारी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. अधून मधून या दोघी आपल्या बाळांना भेटायला येत असत , किंवा मी त्या दोघांना त्यांच्या आईची भेट करायला घेऊन जात असे.मोठ्या मुलाचे नाव  धुर्तराज होते, तर धाकट्या मुलाचे नाव प्रेमराज असे होते. तसे दोघांच्या स्वभावात भिन्नता होती. धुर्तराज आपल्या नावाप्रमाणेच धूर्त आणि महत्त्वाकांक्षी होता. तर त्याच्या उलट प्रेमराज होता. सौजळ , मन मिळाऊ , स्मित भाषी होता. कुणाशी ही वैर भावना न ठेवणारा  होता. एकदम आपल्या आईवर म्हणजे अर्पणा वर गेला होता आणि  धुर्तराज तो त्याच्या आईवर गेला होता. म्हणजे अर्चना वर
गेला होता. परंतु अर्चना मध्ये आता बराच बदल झाला होता.  आता पहिल्यासारखी तिची दुष्ट भावना राहिली नव्हती. कदाचित योगी सोबत राहिल्याने त्याच्या स्वभावात फरक पडला असावा . आता कधीही भेटायला आली तर मायेने ती त्या  दोघांना जवळ घ्यायची  आणि  कोणीही म्हटलंच आहे  ना की  सज्जनांच्या संगतीत राहिल्याने  दुर्जन माणूस देखील त्या सज्जन माणसासारखाच  सज्जन माणूस बनतो हेच खरे ! दिवसामागून दिवस गेले नि वर्षा मागून वर्षे गेली. आता ते दोघे भाऊ आता नवयुवक बनले होते. दोघांचाही विवाह करण्याचा माझ्या मनात विचार आला. मी तो विचार मानसी आईजवळ बोलून दाखविला. मानासी आईने  लगेच त्यास संमती दिली . धुर्तराज चे तर लग्न एका उद्योगपतीच्या मुलीची लावून दिले. त्या मुलीचे नाव गायत्री असे होते. तिच्या वडिलांचे नाव गंगाधर असे होते आणि गायत्री स्वभावाने एकदम मनमिळावू होती.  तिच्या चेहर्‍यावर नेहमी स्मित हास्य असायचे. परंतु तिला भाऊ होता. त्याचे नाव होते शनीकुमार शनिवारी जन्मला म्हणून त्याचे नाव शनी
असे ठेवले खरे ! परंतु त्याच्या मनात दुसऱ्या बद्दल नेहमी
दृष्ट भाव असायचा. अर्थात आपले आहे ते आपलेच परंतु दुसऱ्याचे कसे आपल्याला मिळेल या प्रयत्नात सदैव असणारा. अर्थात इथं बहिणीच्या घरी सुध्दा तो दोन भावांमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू करतो. ते कसे ते नंतर पाहू !

   धुर्तराज च्या लग्नाला मानसी आई अर्चना , अर्पणा , योगी,  आणि त्यांच्या आश्रमातील काही संत मंडळी आली होती .सर्वांची आदराने  त्यांची ऊठा- बस काढण्यात आली. योग्य तो सन्मान त्यांना देण्यात आला.    
      त्यानंतर प्रेमराज साठी माझ्या एका मित्राची नात मी पसंत केली. माझ्या मित्राचे नाव कमलाकर तळवळकर असे होते. त्याच्या मुलाचे नाव कमल असे होते. आम्ही मुलगी पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा कमलाकर घरीच होता. मला पाहता त्याने प्रेमाने आलिंगन दिले.  त्यानंतर इकडच्या तिकडच्या चर्चा झाल्या. त्यानंतर मी सरळ मुद्यालाच हात घातला. त्याला त्याच्या घरी येण्याचे प्रयोजन सांगतात . तो मला म्हणाला ," बघ मित्रा ती माझी नात जरी
असली तरीही मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही ."  मी मोठ्या संभ्रमात पडलो  आणि  मनात विचार केला की, ह्याला नेमकं काय सांगावयाचे आहे ? मी उघडपणे म्हटले ," तुला जे
काय सांगावयाचे आहे ते एकदम स्पष्टपणे सांग. म्हणजे तुला
जर  ही सोयरीक मान्य नसेल तर तसं स्पष्ट सांग. मला अजिबात राग येणार नाहीये." त्यावर तो म्हणाला ," सोयरीक
मान्य नसण्याचा प्रश्नच उदभवत नाही. खरं सांगायचं तर तुझ्या घरी माझी नात सून म्हणून गेली तर मला आनंदच होईल. परंतु .....
     " परंतु काय ?"
     "  तिच्या पूर्व आयुष्या बद्दल जाणून घेतल्यानंतरच. ते
शक्य आहे."
     " असं काय घडलंय तिच्या भूतपूर्व आयुष्यात ?"
     " सांगतो ऐक." असे म्हणून त्याने तिच्या पूर्व आयुष्यात
घडलेल्या घटने विषयी  माहिती देण्यास सुरुवात केली. तो
बोलला ," माझ्या नातीचे म्हणजेच कुंदाचे एका दिनकर नावाच्या मुलाशी निस्सीम प्रेम होते. आमचीही पसंती होती
त्या दोघांच्या लग्नाला  नि तिकडे मुलाच्या वडिलांनी त्याला कुंदा बरोबर लग्न करण्याची परवानगी देऊन टाकली. त्यामुळे ते दोघेही इतके खुश झाले की एकमेकांना शुभ वार्ता
देण्याची इतकी घाई झाली की दोघांनी एकदम लँण्डलाईन
फोन डायल केला. एकदम डायल केल्यानंतर फोन लागणार कसा फोन बिझीच येणार ना ? अगदी तीच अवस्था झाली
दोघांची. पण दोघेही इतके उतावीळ झाले होते की बस्स ! कधी एकदाची खुश खबर देतो एकमेकांना असे झाले होते
दोघांना ही. म्हणून एकमेकांच्या फोन ची वाट न पाहता सरळ एकमेकांना भेटण्यासाठी घरून निघाले.
     अति घाई संकटात घेऊन नेई , असे कुणीतरी म्हटलं आहे. किंवा ठीक-ठिकाणी रस्त्याच्या कडेला लिहिले फलक आढळतात. पण तरी देखील चालक त्या फलका कडे दुर्लक्ष
करतात आणि संकटाला बळी पडतात. अगदी तसेच इथे झालेय बघा. दिनकर आपल्या बाईकवर स्वार होऊन भरधाव वेगाने निघाला तिच्या घरी यायला आणि इकडून कुंदा तिकडे म्हणजे त्याच्या घरी जायला रिक्षाने निघाली.
      दिनकर भरधाव वेगाने बाईक चालवत होता. इतक्यात
काय झाले , मध्येच एक म्हातारा रस्त्यामध्ये आडवा आला.
त्या म्हाताऱ्याचा जीव वाचविण्यासाठी त्याने अर्जंट ब्रेक घेतला असावा. बाईक स्लीप होऊन डिवायडर वर जाऊन
आदळली नि दिनकर दूर फेकला गेला आणि त्याच वेळी
पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅकच्या चाकाखाली
चिरडला गेला. त्यामुळे  दिनकर जागच्या जागी ठार झाला.
परंतु त्याच वेळी समोरून दुसऱ्या बाजूने कुंदा येत होती.
तिने तो अपघात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता.
त्यामुळे  किंकाळी मारून ती बेशुध्द झाली.
     ट्रक चालकाला पब्लिक ने पकडले नि बेदम मारहानी
केली. तो जिवाच्या आकांताने ओरडून सांगत होता की, माझी काही सुध्दा चूक नाही. " परंतु लोक थोडेच ऐकतात.
जो तो येऊन  त्याच्यावर आपले हात साफ करून घेत होता. नशीब  तेवढ्यात तेथे पोलिसांची जीप आली. म्हणून बिच्चारा वाचला. तेव्हा लोकांनी त्या ट्रक ड्रायव्हरला पोलिसांच्या स्वाधीन केले.
      पोलिसांनी घटना स्थळाचा पोलीस पंचनामा केला.
ट्रक चालकाला अटक केली आणि दिनकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठवून देण्यात आला. एवढं
बोलून ते किंचित थांबले. तसा मी म्हणालो ," बापरे ! एवढी मोठी दुर्घटना , ती पण शुल्कशा चुकीमुळे."  त्यावर तो म्हणाला ," अहो , हे तर काहीच नाही. पुढे आमच्या वर काय
प्रसंग ओढवला ते पहा." असे बोलून त्याने पुढील घटने विषयी तो सविस्तर माहिती देऊ लागला. म्हणाला ," कुंदा ने
अपघात होताना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला होता.
म्हणून ती बेशुध्द झाली. तिला बेशुध्द झालेली पाहून रिक्षा
चालक घाबरला नि सरळ इस्पितळात घेऊन गेला. डॉक्टरांनी
तिला इस्पितळात दाखल करून घेतले नि तिच्यावर उपचार
सुरु केले. पण नशीब तिथले डॉक्टर माझ्या ओळखीचे होते.
म्हणून आम्हाला तरी कळले. आम्ही लगेच इस्पितळात धाव
घेतली. तेव्हा ती शुध्दीवर आली होती ; परंतु तिच्या डोक्यावर फार परिणाम झाला. ती एकदम पुतळ्यागत स्तब्द झाली. कुणाशी बोलेना , चालेना. घरात स्वतःला कोंडून घेतले होते. आम्हाला काय करावे ते सुचेना , आम्ही डॉक्टरा
जवळ त्या विषयी चर्चा केली तर डॉक्टर म्हणाले ," तिने अपघात होताना प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. जोपर्यंत अगदी तसाच प्रसंग पाहत नाही तोपर्यंत ती पूर्वत
नॉर्मल होऊ शकणार नाही." त्यात करून तिला दिवस गेले
होते. चौथा महिना सुरू होता. आता गर्भपात ही होऊ शकणार नाही, असे डॉक्टर च म्हणाले. काय करावे ते आम्हाला सुचेना .
       मग लोक लज्जेच्या आणि प्रतिष्ठेच्या भीतीने म्हणा. मी तिला तिच्या आजोळी  म्हणजे तिच्या मामाकडे पाठवून देण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या आई सोबत तिच्या माहेरी भावाच्या घरी पाठवून देण्यात आले ; परंतु मामाच्या घरी जात असताना दैव योगाने म्हणा. पुन्हा तसाच प्रसंग तिने पाहिला नि मोठ्या ने किंकाळी मारून ती बेशुध्द झाली. परंतु तोंडावर पाणी मारतच ती शुध्दीवर आली तेव्हा पूर्वत झाली होती.
        नवं महिने पूर्ण होताच तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला ; परंतु तिच्या पुढील भावी जीवनात त्या मुलाचा
अडसर होऊ नये म्हणून त्या मुलाला तिच्या मामाने कचरा कुंडीत फेकून दिले. कारण जवळपास अनाथालय नव्हते.
    असे म्हणताच मला सहा महिन्या पूर्वीचा प्रसंग आठवला.
असाच काही  कामानिमित्त मी पनवेलला गेलो होतो. तिथून
परतत असताना मी रस्त्यात प्रेमाला पाहिले. मी लगेच ड्रायव्हर ला मोटार थांबवायला सांगितली. संजय ने  मोटार थांबविली. मोटारीची काच खाली करून मी प्रेमाने विचारले,
     "  कुठून निघालीस ?"
      तेव्हा ती म्हणाली ," मी  इथेच काही अंतरावर एका कॉम्प्लेक्स मध्ये राहते.  चला तुम्ही येताय का माझ्या घरी ?"
      मी म्हणालो ," हो ."  असे बोलून मी माझ्या बाजूच्या मोटारीचा दरवाजा उघडून तिला आंत बसायला सांगितले. तशी ती आंत बसली . मोटार पुढे चालू लागली. तिने सांगितलेल्या पत्त्यावर आम्ही पोहोचलो. मी आणि ती कार मधून खाली उतरलो नि  चालत चालत तिच्या घराजवळ पोहोचलो. दरवाजा वरील बेल चे बटन दाबताच एका  ५० वर्षीय व्यक्तीने दरवाजा उघडला. प्रथम तिने आंत प्रवेश केला
नि  मला म्हटले की आंत या . " मी आत मध्ये प्रवेश करताच मला बसायला खुर्ची दिली. त्यानंतर आपल्या नवऱ्याशी माझी   ओळख करून देत म्हणाली ," हे माझे मिस्टर
राजाराम दळवी आणि माझी ओळख करून देताना ती आपल्या नवऱ्याला  म्हणाली, "  हे देवधर घोरपडे आम्ही ज्या चाळीत राहात होतो ना त्या चाळिचे मालक. तिने माझ्या बद्दल खोटेच सांगितले. पण तिने असे का केले ते मात्र मला समजले नाही. माझ्या बद्दल तिच्या नवऱ्याच्या मनात संशय निर्माण होऊ नये म्हणून तसे सांगितले असेल कदाचित. आणि तशी पण माझी काय  म्हणून ओळख करून देणार होती. माझे तिच्या बरोबर काहीच नाते नव्हते. मैत्रिणीचे मिस्टर म्हणावे तर माझे तिच्या मैत्रिणी शी लग्न ही झाले नव्हते. म्हणून तिने हा सोपा मार्ग निवडला असावा. मी सुद्धा हसून लगेच तिला प्रतिसाद दिला. म्हणालो, " हो " ह्यांच्या घराशी आमचे जुने ऋणानुबंध आहेत. त्यानंतर तिने मला चहा - नाश्ता दिला. थोड्या गप्पा- गोष्टी करुन मी निघालो.  ती  मला पोहोचवायला दरवाज्यापाशी आली , तेव्हा हळूच माझ्या काना जवळ तोंड करून बोलली , " एके दिवशी सवड काढून या तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे अलका विषयी ! आता सांगितले असते पण माझे मिस्टर आज घरात आहेत." मी समजलो तिला  काय म्हणायचे आहे ते . मी फक्त " ठीक आहे " इतकेच म्हणालो. मी निघालो. मोटार जवळ येतात मला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून मी आपल्या आजूबाजूला पाहिले. पण कुणीच लहान  मुल  दिसले नाही .  म्हणून मी माझ्या ड्रायव्हरला विचारले ,
      " संजय तुला ऐकू येतो का रे, लहान बाळाचा रडण्याचा आवाज ?"  संजय म्हणाला ,"  हा काय आपल्या गाडीत आहे."
     " आपल्या गाडीत कुठून आला हा बाळ ?"
     " आला  नाही , मी आणला त्याला ."
     " कुठून ?"
     "  इथेच कचराकुंडीत फेकला होता कोणीतरी ! "
     " अरे मग ती कोणाच्या तरी पापाची निशाणी  आहे , फेकून दे त्याला."
      " साहेब , लहान मुले ही निष्पाप असतात. त्यांना  फेकून
देणारे पापी असतात . तेव्हा मी म्हटले ," ते खरे रे  पण याचं त्याचा करणार काय तू ? "
      तेव्हा संजय उत्तरला ,"  मी त्याचं पालन-पोषण करणार." तेव्हा माझ्या द्यानात आले की, संजच्या पोटी मुलंबाळं नाहीये. निपुत्रिक आहे बिच्चारा. या बेवारस  मुलाचे
जर ह्याने पालनपोषण केले तर चांगलंच आहे ना ? मुलाला
आई-बाप मिळतील आणि संजयला संतान प्राप्त झाल्याचा
आनंद होईल. दोन्ही कामे तर  पुण्यांचीच आहेत म्हणा. असा विचार करून मी मनात म्हणालो ,  चांगली  गोष्ट आहे घे त्याला आपल्या सोबत . " संजय ने पाळलेला मुलगाच कुंदाचा नसेल ना ? बहुधा तोच  असावा. असा विचार माझ्या मनात आला. तेवढ्यात कमलाकर  मला हलवत विचारले,
  " तू पण विचारात पडलास ना , वाटलंच होतं मला."
  मी लगेच भानावर येत म्हटले ,"  काय वाटलं तुला ? "
   " हेच की की तू पण इतरां प्रमाणे नाही म्हणशील ते."
   " असं का वाटलं तुला ?"
   " आतापर्यंतचा अनुभव."
   " मग हा अंदाज चुकला म्हणायचा तुझा ."
  " म्हणजे माझी नात पसंत आहे तुला ?"
  " ओ येस !"
  " थँक्स यु  माय फ्रेंड !" असे म्हणून तो मला घट्ट मिठी मारली.

क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.