Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र -२०

कुरुक्षेत्र -२०
कुरुक्षेत्र -२०

 


       एवढ्या वर्षांची मक्तेदारी मोडीत निघते की काय अशी ही त्याच्या मनात भीती निर्माण झाली असावी. कारण आज एका मुलीने आपली टिंगल टवाळी केली. उद्या दुसरा कोणी तरी करेल आणि मग हळूहळू कॉलेज करू लागेल. नाही नाही.  काही करून त्या चेतनला धडा शिकवावा च लागेल. असा विचार करून तो  योग्य संधीची वाट पाहू लागला.
चेतन ला रस्टिकेट करण्यासाठी त्यांनी वरून कॉलेज वर दबाव आणून पाहिला. परंतु कॉलेज मधील अत्यन्त हुशार विद्यार्थी असल्याने कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांच्या चेतनला
पूर्ण  पाठींबा असल्याने  महेश चा  प्रयत्न फसला. म्हणून मग त्यांनी वेगळाच डाव रचला.
    शालेय निवडणुकीत चेतन जिंकल्याने तो आपल्या मित्रांना हॉटेलमध्ये जंगी पार्टी देत होता. त्या हॉटेलमध्ये महेश ने आपल्या मित्रांसोबत येऊन राडा केला. चेतनच्या कानशीलावर पिस्तुल   ठेवून म्हणाला ,"  ज्याला कुणाला आपला जीव प्यारा नसेल त्यांनीच थांबायचे. बाकीच्यांनी
इथून फुटायचे. "  असे त्यांनी म्हणताक्षणीच चेतन चे सारे मित्र त्याला  एकट्याला सोडून पळाले. कारण  कोणालाही लवकर मरायची   इच्छा नव्हती. तसा माया  खोचकपणे हसत म्हणाला ," पाहिलेस , ज्यांच्या जीवावर उड्या मारत होतास ते सारे उंदीर निघाले. " असे बोलून तो मोठ्या ने खळखळून हसला . तेव्हा चेतन निर्भयपणे बोलला ,"तुझ्यात खरोखर हिंम्मत असेल तर पिस्तुल बाजूला कर आणि माझ्याशी एका मर्दा सारखे लढ . पिस्तुल च्या बळावर कुणी  स्त्री सुद्धा शेरणी बनू शकेल. "  त्यावर तो हसून म्हणाला ," वा रे मर्दा हीच काय तुझी मर्दुकी ? पिस्तुल  पाहून फाटली तर तुझी ? इतक्या लवकर संपला म्हणायचा  तुझा जोश ? होय ना ?"    
        असे बोलून महेश चाप ओढला. पिस्तूलातून गोळी निघाली ती सरळ चेतनच्या  डोक्यातून आरपार गेली. चेतन
धाडकन  जमिनीवर कोसळला  आणि  क्षणभर तडपडला आणि   थोड्याच वेळात त्याच्या शरीराची हालचाल बंद झाली.  लगेच त्यांच्या कुण्या  मित्रांने धावत जाऊन विश्रामला खबर दिली. विश्राम  पळतच आपल्या भावा जवळ आला ; परंतु तोपर्यंत खेळ संपला होता. त्यानंतर  पोलिसांना  खबर देण्यात आली आणि थोड्याच वेळात  पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी  सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला.  महेश पराडकरला पोलीस पकडून घेऊन गेले. पण थोड्याच वेळात त्याची सुटका पण झाली. कारण त्याच्या वडिलांनी राजकीय बळाचा वापर केला होता. मला जेव्हा विश्राम ने कॉलेज मध्ये  घडलेली हकिकत सविस्तर पणे सांगितली तेव्हा
मला धक्काच बसला. एवढे सारे घडले ठरले तरी आम्हाला कशाचीच खबर  नाहीये. मी विश्राम वर  चिडलो नि  म्हणालो,     
     " तुला अगोदर सांगता नाही आले मला?"
      विश्राम म्हणाला ,"  दादासाहेब , कॉलेजच्या गोष्टी घरी कशा सांगायच्या बरे ? आणि अश्या गोष्टी कॉलेजमध्ये नित्याचाच घडत असतात आणि  मी त्याला समजाविले नाही अशातला ही भाग नाही. मी  त्याला म्हणालो होतो की आपण शिक्षण घ्यायला आलोय इथं .राजकारण  करणे हा आपले काम नाहीये. पण त्यांने  माझे सांगणे नाही ऐकले तर त्याला मी काय करू ?" त्यावर मी  त्याला म्हणालो ," अरे मग मला सांगायचं ना ? मी समजावले असते त्याला."
     " दादासाहेब मला वाटलं नव्हतं की इतक्या छोट्या गोष्टी एवढ्या  मोठ्या थराला जातील." मग मी काय बोलणार , मला गप्प बसावे लागले. शिवाय सर्वकाही घडून गेल्यानंतर
त्याची चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये. असा विचार करून मी मानसी आईला घेऊन इस्पितळात पोहोचलो. आणि शवविच्छेदना नंतर चेतन चा मृतदेह ताब्यात घेतला.
आणि विधिपूर्वक त्यावर अंत्यसंस्कार करविला. पुढे कोर्टात खटला दाखल  झाला. परंतु खटल्याचा निकाल ही महेश पराडकर च्या बाजूने लागला नि महेश निर्दोष सुटला. कारण त्याच्या बापाने राजकीय बळ वापरले आणि आम्ही काहीच
करू शकलो नाही. फक्त हात मळत बसलो.
 
       मानसी आई ने मात्र त्याचा एवढा धसका घेतला की बस्स ती मला म्हणाली ," देव  याला सुद्धा कॉलेज मधून काढून टाक. खूप झाले शिक्षण जास्त शिकून काय करायचे , त्याला नोकरी थोडीच करायची आहे त्यांना ?"  मला ही तिचे म्हणणे पटले.  मग मी  विश्राम ला मध्येच कॉलेजमधून काढून टाकले आणि त्याला आता माझ्याबरोबर ऑफिस मध्ये घेऊन जाऊ लागलो आणि ऑफिस मधले काम त्याला समजावून देवू  लागलो होतो. थोड्या दिवसात तो सर्व कामात तरबेज ही झाला.

      मानसी आई आता त्याच्या लग्नाचा विचार करू लागली होती. एके दिवशी तिने आपला हा विचार माझ्या कानावर घातला. मी ही  लगेच होकार देऊन टाकला आणि त्यानंतर मी त्याच्यासाठी एका योग्य वधू चा शोध  सुरू केला. त्याच दरम्यान मला असे समजले की अलकाच्या अजून दोन
लहान बहीण आहेत . त्या दोघी ही आता  लग्नाच्या वयाच्या
झाल्या आहेत. परंतु  त्यांची मोठी बहीण एका तांत्रिकाचा खून करून घरातून पळून गेल्यामुळे त्यांच्यासाठी योग्य वर
मिळेना. म्हणजे एक प्रकारचा कलंक त्यांच्या माथी लागला. होता. कसं असतं ना ? मोठ्या मुली कडून नकळत काही
अपराध घडला तर त्याची शिक्षा तिच्या लहान भावंडाना मिळते. म्हणूनच अलकाचे वडील अर्थात मनोहर मांडवकर
सारा दोष अलकाला देत होते. परंतु अलका जेव्हा पळून गेली तेव्हा त्या  दोघींचा जन्म सुध्दा झाला नव्हता.  त्याचे कारण अलकाचे वडील पंधरा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगून घरी आले नि त्या नंतर त्याना ह्या दोन मुली झाल्या. आता त्यांचे लग्नाचे वय झाले तरी ही त्या दोघीना योग्य वर मिळेना.
म्हणून मी  विचार केला की अलका आपल्यामुळे घरातून पळून गेली. याचा अर्थ आपण त्या सर्वास्वाला कारणीभूत आहोत.  मग मी निश्चय केला की अलकाच्या बहिणीशीच आपल्या भावाचे लग्न करावे. माझी ही इच्छा मानसी आईजवळ मी बोलून दाखविली. मानसी आई ने देखील लगेच आपली संमत्ती दर्शविली. मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ही आटोपला. विश्रामला अर्चना पसंत आली. त्यानंतर थाटामाटात दोघांचे लग्न झाले . मधुचंद्राला ही उठीला जाऊन आले.  परंतु   त्यांच्या लग्नाला किमान चार वर्षे उलटली तरी ही त्यांना मूलबाळ झाले नाही . म्हणून अर्चनाच्या धाकट्या बहिनीशी म्हणजेच अपर्णा शी विश्राम चे पुन्हा लग्न करण्यात आला व तिलाही होईना म्हणून मग त्या
तिघांची ही  वैद्यकीय तपासणी करून घेतली असता दोष त्या
दोघी मध्ये दोष नसून माझ्या भावा मध्येच दोष आढळला.  पुरुषसत्व नव्हते त्याच्या मध्ये ; पण त्याला  ते मान्य नव्हते. तो त्या दोघींशी जास्तच  लैंगिक संबंध करू लागला. त्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि आता क्षयरोग ही पूर्ण बरा होतो ;  परंतु जगण्याची त्यांची इच्छाच मरून गेली होती . त्यामुळे  त्यातच  त्याचा अंत झाला.
        मानसी आईला त्याचे फार दुःख झाले. किती दिवस तरी त्या दुःखात डुबून  राहिली. त्यानंतर तिला घराण्याला वारस नाही याची फार चिंता होऊ लागली. तशी ती माझ्या मागे  विवाहासाठी तगादा करू  लागली. म्हणाली ," देव ,
आता  घरण्याची लाज तुझ्याच हाती आहे. तेव्हा तू विश्राम च्या पत्नीशी पुनर्विवाह कर ."
      " आई , काय बोलतेस तू हे ? त्या दोघी  माझ्या लहान भावाच्या पत्नी आहेत. त्या शिवाय मी प्रतिज्ञाबद्ध आहे."
     " ते मला आठवत नाही. मला घराला वारस हवाय बस्स !"
     " पण हा व्याभिचार आहे."
     "  लग्न  न करता अनैतिक संबंध केले तर  आणि आता
कायद्याने ही विधवांना पुनर्विवाह करण्याची मुबा दिलेली आहे. त्यामुळे तुला त्यांच्या शी लग्न करण्यास काहीच हरकत नाहीये." त्यावर मी म्हणालो ," नाही आई , ते काही जरी असले तरी मी अलका शिवाय दुसऱ्या कुणाशी विवाह करणार नाहीये."
      " मग काय आपल्या घराला वंश हीन करायचे आहे का तुला ?"
     " आपण एक दत्तक पुत्र घेऊ. " मी हा उपाय सुचविला.
      त्यावर मानसी आई म्हणाली ," मला आपल्या मुला पासून वंश पाहिजे ."
      " मग तर तुझी इच्छा अपुरीच राहील."
      " माझ्या झोळीत एवढे दान नाही टाकणार का तू ?"
      " आई मला क्षमा कर ,ही तुझी इच्छा मी पूर्ण करू शकत
नाही आणि शकणार ही नाही." असे बोलून मी माझ्या खोलीत निघून गेलो.

मी संध्याकाळी ऑफीसमधून घरी आलो तेव्हा माझ्या खोलीत एक  लेटर पॅड वर लिहीलेले पत्र मला मिळाले.
मला  कुणी बरं लिहिलं  असेल  हे पत्र ? मी स्वतः शीच प्रश्न
केला नि ते पत्र उचलले. ते पत्र मानसी आईनेच लिहिले होते. आम्ही दोघे एकाच घरात राहतो म्हटल्यावर एकमेकांना पत्र लिहिण्याची काय आवश्यकता पडली ,असा विचार ही माझ्या मनात येऊन गेला.
  
चि. देवधर यास ,
  आईचे  अनेक शुभ आशिर्वाद ,आपण दोघे  ही एकाच घरात
राहतोय ; पण तरी ही मला तुला पत्र लिहावे  असे वाटते. त्याला कारण यापुढे मी जे  पत्रात लिहिणार आहे , ते मी तुला उघडेपणे सांगू शकत नाही आणि बोलू ही शकत नाही. कारण काही गोष्टी अशा असतात की , त्या तोंडाने कधी सांगता येत नाहीत ; पण त्याच गोष्टी  पत्राने अधिक चांगल्या प्रकारे सांगता येतात. माझेही तसेच झाले आहे , तुला आठवतेय मागच्या वेळी जेव्हा आपण दोघेही पुण्याला गेलो
तेव्हा तू मला  विचारले होतेस ना , की पुण्याला काय काम आहे म्हणून ?  आणि त्यावेळी मी तुला म्हणाले होते की, दगडूशेठ च्या  गणपतीचे  मला दर्शन घ्यावयाचे आहे म्हणून.
पण ते  सारे खोटे होते. आता तू म्हणशील असे करायचे काय कारण  होते ? कारण एकच होते  आणि ते म्हणजे प्रतिष्ठा !  तू माझी घराण्याची....... नव्हे !  माझी स्वतःची , अब्रू मला वाचवायची होती . त्यासाठी मला तुझ्याशी खोटे बोलावे लागले ; पण  मीच काय जगातल्या कोणत्याही आईने तेच केले असते. जे मी केले , पण आज लाज शर्म सोडून , तुला मी माझ्या व्याभिचाराची कथा सांगणारा आहे. व्याभिचार ..... हो त्याला व्याभिचार च म्हणायला हवे. पण
जगाच्या  दृष्टीने. पण माझ्या दृष्टीने म्हणशील तर तो व्याभिचार  नव्हता. मी निस्सीम  प्रेम केले होते त्याच्यावर.
पण त्या हरामखोर परेश ने माझ्यावर प्रेम नव्हते केले. फक्त माझे शरीर हवे होते त्याला आणि त्याने त्याचा वापर करून घेतला आणि  फेकून दिले मला कचरा कुंडीत , उष्टावळ
केलेल्या एखाद्या पत्रावळी सारखे. मला दिवस गेलेे. मी कुमारिका माता झाले. समाजात अशा स्रियांना कुलटा  म्हणतात ; पण तरी देखील मी त्या मुलाचा त्याग करू शकले नाही. मी त्याला बोर्डिंग मध्ये शिकायला ठेवले आणि अधून
मधून त्याला भेटायला जात असे. तशीच त्या दिवशी ही मी
गणपतीचे दर्शन घ्यायचं आहे असे खोटे सांगून  त्यालाच भेटायला गेली होती. त्याचे नाव योगी आहे आणि त्याच्या
बापाच्या नावाच्या जागी मी स्वतःचे नाव दिले आहे.
     पण का कुणास ठाऊक त्याला कशी  त्याला साधू फकिरांची संगत लागलीय . त्याला संसारात गोडी नाही. त्याला वैराग्याचे जीवन फार आवडू लागले होते. त्याच्या संगतीत म्हणजे मठात तो राहतोय. आज मला माझा अंशवेल  वाढविण्यासाठी त्याची गरज भासू लागलीय. जरी
तो तुझ्या वडिलांच्या अंश नसला  तरी तुझ्या आईचा अंश आहे त्याच्यात. तेव्हा तू त्याला इथे घेऊन ये . ही   तुला मी  आज्ञा करत नसून विनंती करत आहे. एवढी आपल्या आईच्या पदरात भिक घाल.
    

                                                     तुझीच लाचार आई
                                                       मानसी आई

      पत्र वाचून पूर्ण झाले होते. मला आईवर क्रोध करायला हवा होता का करुणा ? तेच काही कळत नाही. पण लगेच
माझया विवेक बुद्धी ने  उत्तर दिले की त्यात मानसी आईचा काय दोष बरे ?  प्रेम करणे हा काय अपराध नव्हे ! प्रेम कधीही पवित्र असते. त्याला अपवित्र करतात ,समाजातील
काही समाजकंटक लोक. खरे तर अश्या लोकांनाच सुळावर
चढवायला हवे ; परंतु समाज त्याना मुक्त सोडून देतेय आणि शिक्षा मिळतेय त्या निष्पाप स्त्री ला पापाची निशाणी तिच्या
उदरात वाढू लागतंय आणि पुरुष मात्र मोकाट सुटतोय दुसऱ्या कळीच्या शोधार्थ ! कळी उमलण्यापूर्वीच कुस्करून
पायदळी तुडविण्यासाठीच !

     मी पुण्याला जाण्याचे निश्चित करताच मानसी आई ने मला आहे अजून एक पत्र दिले. आर्थत योगीला देण्यासाठी.
मानसी आई ने दिलेल्या पत्रावर त्या आश्रमाचा पत्ता लिहिलेला होता. मी त्या आश्रमात पोहोचलो नि योगीला
भेटलो आणि मानसी आई ने त्याला देण्यासाठी दिलेले पत्र
मी त्याला दिले आणि त्याने ते वाचले.

चि. योगी यास ,
    आईचे अनेक आशिर्वाद , पत्र लिहिण्यास कारण की, आज  तुझ्या आईला तुझ्या मदतीची फार गरज आहे. तुला
पत्र आणून देणारा  दुसरा कुणी नसून तुझाच मोठा सावत्र भाऊ आहे. सावत्र यासाठी त्याने माझ्या उदरातून  जन्म नाही घेतला आहे. पण सख्ख्या मुलाचे नाते निभावले आहे त्याने. त्यामुळे तो  माझा सर्वात मोठा मुलगा असल्याचे सिद्ध झाले. तुझे दोन भाऊ घराला वारस न देताच निघून गेले आणि तुझा मोठा भाऊ वचनबद्ध आहे. अर्थात  माझ्याच महत्वकांक्षेला बळी पडलाय तो , त्यामुळे माझ्या वंशाची वंशवेल वाढविणे  आता केवळ तुझ्या  हातात आहे. तेव्हा मातेची आज्ञा समजून ती तू पूर्ण  करायची आहेस. त्यासाठी तुला तुझ्या भावाच्या पत्नीची विवाह करावा लागेल. पण पत्र मिळताच
ताबडतोब इथं निघून येणे. ही विनंती नव्हे ! आदेश समजावा.
                                              तुझीच दुर्दैवी आई
                                                  मानसी घोरपडे

     पत्र वाचून होतात त्याने प्रथम माझी चरणस्पर्श केले.नंतर ते पत्र त्याने  आपल्या गुरूला दाखविले. गुरूने त्याला तेच सांगितले. की  आईची इच्छा पूर्ण करणे हे मुलाचे प्रथम कर्तव्य आहे ; परंतु आईची इच्छा पूर्ण होताच संसारात रमू नये.  त्या सर्वांचा त्याग करून पुन्हा आपल्या आश्रमात  हजर व्हावे. ही गुरूची आज्ञा आहे.

     योगी माझ्या सोबत आमच्या घरी आला. आईची इच्छे प्रमाणे त्याने त्या दोघींशी विवाह केला. काही दिवस त्याने त्या
दोघींशी प्रणय क्रीडा केली आणि त्या दोघींना जसे दिवस गेले. तसे त्याने पुन्हा आश्रमाची वाट धरली.  पण जाते वेळी तो आपल्या आईला म्हणाला ," आई तुझ्या मोठ्या सुनेच्या मनात  छोटी विषयी फार दुष्ट भावना आहेत. तेव्हा ती तिच्या गर्भाला घात करण्याचा प्रयत्न करील. तेव्हा तिच्या पासून धाकटी  च्या बाळाचे रक्षण कर. दोघींनाही पुत्र होतील ; परंतु दोघांच्या पुत्रा मध्ये आकाश पाताळाचा फरक असेल "
       " म्हणजे ?" आईने गोंधळुन विचारले. तेव्हा तो म्हणाला,"  मोठी चा मुलगा  तिच्या प्रमाणेच दुष्ट आणि मत्सर स्वभावाचा  असेल . आणि धाकटीचा मुलगा तिच्या प्रमाणे मनमिळावू आणि सात्विक बुद्धीचा असेल ."
      " पण दोघी सख्ख्या बहिणी आहेत ना मग दोघांमध्ये इतका फरक कसा ? "
      " प्रॉपर्टीचे लालच ! जसे  तुला झाले होते. "
      त्यावर मानसी आई निरुउत्तर झाली.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..