कुरुक्षेत्र -१९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र -१९ |
मला हुंदका आवरता आला नाही. मनात साठवलेले दुःख
अश्रुधारा माझ्या डोळ्यातून वाहू लागले. माझ्या डोक्यावरून हात फिरवत बाबा मला म्हणाले ," बाळ असे वेड्यासारखे नाही करायचे बरे.असे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येत असते बरे.असे कुणी कुणासोबत जात नसतं
बरं , म्हणूनच माणूस येतो ही एकटाच आणि जातो ही एकटाच. त्याच्यासोबत कोणी जात नाही. " किंचित थांबून दीर्घ श्वास घेत ते पुढे म्हणाले ," पोरी , असे अविचाराने वागू नकोस. एवढेच सांगू शकतो मी तुला. येतो मी." असे बोलुन
ते निघुन ही गेले. तसा माझा पुत्र देव माझ्या जवळ येत म्हणाला ," आई , स्वतःला सांभाळ बरं. अगं आई तू असे जर करू लागलीस तर आम्ही कुणाकडे पहायचे गं ? माझी आई तर माझ्या लहानपणीच मला सोडून देवा घरी गेली. आईची माया काय असते ते मी अनुभवले नाही गं आणि
कित्येक वर्षांनी तू माझ्या आईच्या रुपात या घरात आलीस. मला वाटलं की माझी आई मला पुन्हा मिळाली आणि आता तू ही मला सोडून जायची वार्ता करतेस. " देवाच्या या करुणामय शब्दांचा माझ्या हृदयावर खोल परिणाम झाला.
माझं हृदय एकदम घायाळ झाले. मी आवेगाने पुढे झाली आणि त्याला मिठीत घेत म्हणाली ," नाही देव , मी तुला सोडून कुठं कुठं जाणार नाही. आम्ही दोघे मायलेक किती वेळ तरी एकमेकांना सांत्वन देत राहिलो. आम्हां दोघां मायलेकाचे अनोखे प्रेम पाहून देवानेही स्वर्गातून फुलांचा वर्षाव केला असावा जणू ! असे क्षणभर मला वाटले.
दशक्रिया विधी झाल्यानंतर एके दिवशी मी वकील सुबोधला घरी बोलविले नि त्याला प्रॉपर्टी चे कागदपत्र बनवायला सांगितले आणि आपली सारी प्रॉपर्टी देवधरच्या
नावावर करून त्या कागदपत्रावर मी आपले हस्ताक्षर केले नि
कागदपत्र वकील सुबोध च्या स्वाधीन करीत म्हटले ," हे पेपर
लवकरात लवकर नोटरी करून आण." तेव्हा वकील सुबोध
ने मला विचारले ," मॅडम एक विचारू ?"
" अवश्य , विचारा."
" आपल्या दोन मुलांच्या नावावर काहीच ठेवले नाही तुम्ही ! "
" ही प्रॉपर्टी देवधरच्या आईची आहे , अर्थात त्यावर फक्त
देवधरचाच अधिकार आहे."
" परंतु तुमच्या मुलांचं काय ?"
" ती देवधरची लहान भावंड आहेत. देवधर त्यांच्या वर अजिबात अन्याय होऊ देणार नाही. याची मला पूर्ण खात्री आहे."
" सॉरी ! मला वाटलं ते मी बोललो. बाकी तुमचे म्हणणे
तितकेच सत्य आहे. जितके सत्य सूर्य पूर्वेलाच उगवतो.
बरं येतो मी ! मी होकारार्थी मान डोलावली. तसा तो तेथून
निघाला कित्येक दिवसापासून माझ्या मनावर एक दडपण होते ते काही प्रमाणात का होईना पण आता दूर झाले. परंतु मला काय माहीत होते की देवधर हा नुस्ता देवधर नाहीतर पक्का भीष्मांचाच अवतार निघेल तो . त्याने प्रॉपर्टी घेण्यास चक्क नाकारले. तो मला म्हणाला,
" आई , ज्या प्रॉपर्टी मुळे माझ्या बाबांचे प्राण गेले ती प्रॉपर्टी मला अक्षय नकोय."
" पण त्यांची तीच इच्छा होती ना ,की ही प्रॉपर्टी फक्त
तुझीच असावी."
" नाही आई , त्यांची इच्छा कळायला त्यांनी संधीच नाही
दिली मला. "
" आणि चूक सुधारण्याची संधी मला ही नाही दिली त्यांनी. परंतु झालेली चूक मी आता सुधारत आहे. त्याला तू
विरोध करू नकोस."
" नाही आई त्या प्रॉपर्टी चा स्वीकार मी कदापि करणार नाही. कारण या प्रॉपर्टी मुळेच मी माझ्या बाबांना गमावून बसलो आणि माझी प्रेयसी अलका हिला ही मी गमाववून बसलो. आता ही प्रॉपर्टी घेऊन काय करू मी ! त्यापेक्षा हिमालयात जाऊन तपश्चर्या करायला आवडेल मला. परंतु हे युग तपश्चर्या करण्याचे नाहीये , म्हणून मी इथंच राहून माझे दोन्ही भाऊ मोठे होऊन जोपर्यंत आपली जवाबदारी स्वीकारत नाही. तोपर्यंत मी ह्या प्रॉपर्टी चा फक्त सांभाळ करणार आहे. बस्स हेच माझ्या शेष जीवनाचे ध्येय राहील आणि उद्देश ही !"
" मी तुझ्या निर्णयाच्या आड कदापि येणार नाही. परंतु माझी अजून एक इच्छा आहे ती तू पूर्ण करावीस."
" कोणती ?"
" तू लग्न करावेस."
" कारण माहीत असून ही ?"
" हो ."
" ते शक्य नाही आई, मी अलका ला धोका देऊ शकत नाहीये. तुला ते माहितेय."
" अरे , पण आहे कुठे ती ?"
" मी जीवनाच्या अंता पर्यंत वाट पाहीन तिची."
" हे तर कस्तुरीसाठी मृगजळाच्या मागे धावण्या सारखेच आहे."
" माहितीये ते मला."
" पण हा तर शुद्ध गाढवपणा आहे. असं नाहीे वाटत तुला ?
" वाटते खूप पण त्याला काही इलाज नाही ."
" प्रत्येक रोगावर औषध असतेच देव."
" काही जखमा अशा असतात आई की, त्या कधीच भरून निघत नाहीत आणि यदाकदाचित त्या भरल्याच तर त्याचे वण कायम राहतात. "
" जखमा ही भरतील आणि त्याचे वण ही राहणार नाहीत. परंतु त्यासाठी प्रयत्न मात्र जरूर करायला पाहिजेत.
सर्व रोगावर एकच रामबाण औषध आहे आणि ते म्हणजे
काळ ....काळच मोठ्यात मोठी जखम भरू काढतो."
" मी त्या काळाचीच आतुरतेने वाट पाहतोय. तेव्हा आई
वाट पाहू दे ना मला. प्लीज !" त्याच्या या विधानावर मी एकदम स्तब्द झाली. काही बोलण्यासारखे नव्हतेच माझ्यापाशी काही ! देव ची कशी समजूत काढावी तेच मला
कळेनासें झालंय मला. बाल हट्ट ,स्त्री हट्ट , नि राज हट्ट ,ह्या
तीन हट्टा विषयी ऐकून होते. परंतु प्रेम हट्ट आज प्रथमच पाहत होते मी. वर्षा मागून वर्षे जात होती. परंतु देव चा हट्ट काही माघार घेईना नि बघता - बघता देवधर चे दोन्ही भाऊ
आता युवक बनले होते आणि आता ते कॉलेजात जाऊ
लागले होते.
....देवधर
माझे दोघेही भाऊ अभ्यासात हुशार होते ; परंतु दोघांच्या स्वभावात मात्र आकाश -पाताळाचा फरक होता. चेतनला पुढारीपणा करायला फार आवड असे. त्यासाठी त्याला कोणाशी ही लढावे लागले तरी तो मागे हटत नसे. पण विश्राम चे तसे नव्हते. कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपले काम बरे की आपण बरे. कुणाशी ही तो भांडण तंटा करत नसे. त्याच्या कुणी एका गालावर मारले तर तो लगेच आपला दुसरा ही गाल पुढे करत असे. त्यामुळे आपसात दोघांचे एकमत झालेच नाही कधी !
कॉलेजात पाऊल ठेवताच चेतन ने आपल्या स्वतंत्र गट बनविला आणि त्याच कॉलेजात एका आमदाराचा ही मुलगा शिकत होता. त्याचा ही एक स्वतंत्र ग्रुप होता. त्याला न मानणारी मुले चेतनच्या गटात सामील झाली होती. त्यामुळे तो भयंकर चिडला होता. त्याला आतापर्यंत शह देणारा कोणी भेटला नव्हता. तो शिनयर होता या कॉलेजमध्ये. फारच कमी उपस्थिती असायची त्याची. तो जास्त करून बिअर बार किंवा जुगाराच्या अड्यावर सापडायचा. त्याचा बाप कॉलेजचा चेअरमन असल्याने त्याला कोणीही कुठेही यायला जायला अडवत नसे. मनात येईल तेव्हाच कॉलेजमध्ये यायचे बसाय सारखे वाटले तर बसायचे , नाहीतर सरळ उठून चालायला लागायचे. त्याचे नाव मधुकर रामकृष्ण पराडकर असे होते. परंतु त्याला माया या नावाने सर्वजण ओळखत असत. आज प्रथमच त्याची गाठ चेतन बरोबर पडली. त्याने चेतन चा रस्ता अडवत विचारे ," नाव काय तुझं ?"
" माझे नाव चेतन घोरपडे ."
" आणि माझे नाव एम. आर. पी. जगातील प्रत्येक वस्तू माझ्या नावाने विकली जाते. शिवाय मी या कॉलेज चा पर्मनंट ली लीडर मीच आहे , तेव्हा आपलं नाव निवडणूकीतून वापस घ्यायचे. कळलं.
" आणि नाही घेतले तर ?" चेतन त्याच्या नजरेला नजर भिडवत बोलला.
" तू पुन्हा इथं दिसणार नाहीस. तुझी डेड बॉडी घ्यायला
सुद्धा तुझ्या घरच्यांना इस्पितळातच जावे लागेल. "
" इस्पितळात तू जातोस का मी हे कोण ठरविणार ?"
" अर्थात मीच ठरविणार. "
" मी तुझ्या धमक्यांना भिक घालीत नाही मी."
" जो डरता नहीं वो मर जाता है ,जैसे कि बच्चों को कभी भी असली गन से खेल खेलना नहीं चाहिये. वर्ना वही खेल उसके मौत का कारण भी बन सकता है। इसलिए समझदारी इसी में है .की तू अपना नाम चुनाव से हटा दे इसी में तेरी भलाई है ।"
" वो तो वक्त ही बतायेगा कि कौन कितने पानी में है ."
" काळाची पाऊल न सांगता येतात आणि कोणाच्या जीवावर उड्या मारतोयेस तू एवढ्या ?" चेतनच्या ग्रुप वर
आपले बोट नाचवत तो पुढे म्हणाला ," या फंटरांच्या sss "
उपहासपूर्ण पणे हसत बोलला," जे काल पर्वा पर्यंत बिगी बिल्ली होते ,ते आज अचानक जंगलाचे शेर बनलेत का ? कदापि नाही. इस जंगल में सिर्फ एक ही शेर है , और वो मै हूं । बाकी तो सब भेड़ बकरियां है । समझे. " असे म्हणत आपल्या शर्टाची कॉलर उडवत ऐटीत चालत निघून ही गेला.
परंतु चेतन त्याच्या धमकीकडे अजिबात लक्ष दिले नाही. प्रचार जोरात सुरू ठेवला. एक दिवस दोघांची जुंपली आणि
त्यात चेतन ची सरशी झाली. त्यामुळे तो भंयकर चिडला. कारण आता जो तो त्याची टिंगल करत असे. एक दिवस
तर एक मुलगी त्याला चक्क त्याच्या तोंडावर म्हणाली ," तू तो सिर्फ गर्जनेवाला बादल निकला रे, और गर्जनेवाले बादल कभी भी बरस ते नहीं । यही सच्चाई है अब." त्यावर अनेक
मुली फिदीफिदी हसल्या. हे त्याच्या एकदम जिव्हारी लागले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा