कुरुक्षेत्र - १८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र - १८ |
एके दिवशी काय झाले. त्यांच्या कुण्या जिवलग मित्राचा
लग्नाचा वाढदिवस होता. पूर्ण परिवारासह येण्याचे आमंत्रण
होते. परंतु देव ने काहीतरी निमित्त पुढे करून लग्नाला न येण्याचे टाळत होते ; मी कसे टाळू शकणार होती. अर्थात
लग्नाला जाणे भागच होते. आम्ही दोघेही जाण्याची तयारी करू लागलो होतो मी एक गुलाबी रंगाचा साडी नेसली आणि चेहऱ्यावर मेकअप करायचा होता म्हणून मी आरश्या समोर बसून साज शुंगार करत होती. तेवढ्यात तेथे
देवचे बाबा आले नि माझ्या सूंदर रुपाला न्याहाळत म्हणाले,
" वाव ! आज काय फार सूंदर दिसतेस तू ,स्वर्गातल्या अप्सरा वाणी !" तशी मी हर्षभरित होत म्हणाली ," खरंच ?"
" हो ; पण एक कमी आहे."
" काय ?" मी न समजून विचारले. तेव्हा ते हसून म्हणाले,
" ह्या कपड्यावर डायमंड नेकलेस हार फार छान दिसेल."
" मग घेऊन या ना जरा. प्लिज !" मी एकदम हर्षभराने बोलली. तेव्हा त्यांनी मला विचारले ," कुठं ठेवला आहेस ?"
" तो काय माझ्या कपाटात सुरक्षित ठेवला आहे."
" त्याची किल्ली ?"
" तिथेच लाँकरला लावलेली आहे."
" बरं आणतो हं !" असे म्हणून ते गेले आणि माझ्या ही
द्यानात राहिले नाही की त्याच कपाटात प्रॉपर्टी चे कागदपत्र
सुध्दा आहेत. माझ्या जसे हे द्यानात आले तशी मी पळतच
कपाटपाशी गेले आणि पाहते तर काय त्यांच्या हातात तेच
प्रॉपर्टी चे कागदपत्र होते नि ते वाचत होते. क्षणभर मला
वाटले की बावीस हजार होल्टेज चा विद्युत करंट चा झटका
मला बसलाकी काय मी जागच्या जागी पुतळ्यागत स्थिर झाली. काय करावे ते सुचेना. आता आपले काय होणार याचीच चिंता लागून राहिली होती. प्रॉपर्टी चे कागदपत्र वाचून होताच एक जळजळीत नेत्र कटाक्ष माझ्यावर टाकत ते गर्जले,
" मानसी हे कसले पेपर आहेत ?" माहीत असूनही माहीत
नसल्याचा आव आणत ते म्हणाले. मी गडबडलीच काय बोलावे ते कळेना. त्यानी पुन्हा मला विचारले. यावेळी त्यांच्या स्वरात क्रोध जाणवत होता. माझ्या तोंडून शब्दच उलटत नव्हता. मी अडखळत म्हणाली ," म..म..मा..झं ऐकून तर घ्या."
" तुझं तर ऐकतोय बोल ना ."
" हे प्रॉपर्टी चे पेपर आहेत."
" तुझ्या नावाचे होय ना ?"
" हां पण मी जबरदस्ती नाही केली. देव ने स्वतःच माझ्या
नावावर केली प्रॉपर्टी !"
" त्याने केली आणि तू करून घेतलीस. असंच ना ?"
" नाही. असं नाही."
" मग कसं ?" मला काय बोलावे ते कळेना. नाही म्हणजे
मी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या अगोदरच
ते उद्गारले ," चांडाळणी अखेर माझा विश्वासघात केलास.ना तू ."
" नाही हो. मी नाही केला तुमचा विश्वासघात." मी एकदम
आर्त स्वरात बोलली. तसे ते ओरडून बोलले," चूप ! नाटक बंद कर तुझे." मी रडवेल्या स्वरात गयावया करत बोलली,
" मी खरंच नाही काही केले हो. देव ने स्वतःच आपल्या मर्जीने सारी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली. विश्वास ठेवा माझ्यावर." तसे ते कुत्सित स्वरात बोलले ," विश्वास आणि
तुझ्यावर. कदापि नाही. एकदा केला होता मी विश्वास तुझ्यावर. त्याचे एवढे मोठे पारितोषिक देशील याची मी स्वप्नात ही कल्पना केली नव्हती. तेव्हा मी एकदम विनंती च्या स्वरात बोलली ," तुम्हाला खोटं वाटतं का माझे म्हणणे ?" ते उद्गारले , " हो. एकदम खोटे."
" मग माझ्या बाबांना च विचारून पहा ना !"
" तुझा बाप सुध्दा तुझ्या सारखाच खोटारडा आहे."
" मग देव लाच विचारा. तोच खरं काय ते सांगेल."
तेव्हा ते देव ची प्रशंसा करत बोलले ," देव ला काय विचारू ? तो तर भोळा शंकर च आहे. मागचा पुढचा विचार
न करता आपल्या बापाच्या सुखासाठी त्याने स्वाहा करून
टाकली सारी प्रॉपर्टी ! स्वतःच्या सुखाचा ही विचार केला नाही त्याने. पण मी काय केले ? पार आयुष्यातून उठविले त्याला. त्याच्या सुखाची राख रांगोळी करून टाकली मी. केवळ माझ्या छोट्याश्या एका अभिलेसेने .....बोलता बोलता
बाबांचा स्वर एकदम करुणामय झाला. किंचित आवाज चढवून ते पुढे म्हणाले ," तुझयावर निस्सीम प्रेम केल्याची एवढी मोठी शिक्षा मिळेल. याची कल्पना सुध्दा केली नव्हती
गं मी." आमच्या बेडरूम मधून आवाज बाहेर जाऊ लागला.
अचानक आमच्यात भांडण सुरू व्हायला काय झाले. हे पाहण्यासाठी देव आमच्या बेडरूम मध्ये धावत आला. त्याला पाहताच देव चे बाबा उद्गारले ," या पितामह भीष्म ,
आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. साष्टांग दंडवत माझे तुम्हाला." असे म्हणतच दोन्ही कोपरा पासून हात जोडतात. आणि त्याच क्षणी अचानक त्यांच्या छातीतून कळ येते नि ते
पलंगावर कोसळतात. मी पळतच त्याच्या जवळ पोहोचली.
पण तोपर्यंत ते बेशुध्द झाले होते. मी लगेच फँमेली डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतले. डॉक्टर आले नि त्यांनी त्यांची तपासणी केली नि सांगितले की, हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्याना. त्याना ताबडतोब इस्पितळात न्यायला हवं." देव ने त्याना अलगद उचलून मोटार मध्ये मागच्या शीट वर बसविले नि स्वतः सुधा त्यांच्या सोबत बसला नि बाजूला मी देखील बसले. मोटार इस्पितळाच्या दिशेने पळू लागली होती. थोड्याच वेळात आम्ही इस्पितळात पोहोचलो. लगेच त्याना इमर्जन्सी वार्ड मध्ये दाखल करण्यात आले आणि लगेच त्यांच्यावर वैधकीय उपचार सुरू झाले.
देवधर
मी मानसी आईला विचारले की, तुम्हां दोघांत नेमके
काय घडले ?" तेव्हा मानसी आईने स्फुंदत स्फुंदत सारी
हकीकत मला सांगितली. सर्व ऐकून घेतल्यावर मी मानसी
आईची समजूत काढत म्हणालो ," आई तू रडू नकोस. जे घडलं ते फार वाईट घडलं. बाबा जवळ सत्य उघडकीस नाही
यायला पाहिजे होते. परंतु होणाऱ्या गोष्टी होतच असतात.
त्याला कुणाचा इलाज नाही. पण चिंता करू नकोस. बाबांना काही ही होणार नाहीये."
" पण खरंच काही होणार नाही ना त्याना ?"
" हो हो नक्कीच ठीक होतील बाबा. देव असा अन्याय नाही करणार आपल्यावर."
" त्याना जर का काही झाले तर मी स्वतःला कधीच
माफ करू शकणार नाही."
" काहीही होणार नाही त्याना." तेवढ्यात च डॉक्टर अभय
ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येतात तसे मी आणि मानसी
आई दोघेही उठून त्यांच्या जवळ जातो. मी त्याना विचारले,
आता कशी तब्बेत आहे बाबांची ?" त्यावर डॉक्टर खंत पूर्ण
स्वरात म्हणाले ," सॉरी ! दँट इज नो मोर. " असे बोलता क्षणीच मानसी आईला एकदम शाँक सा बसला. ती एकदम
तिथंच पाषाण झाल्यागत स्थिर झाली. काहीच बोलेना. मी
लगेच डॉक्टराना सांगितले. डॉक्टरानी आईला तपासून पाहिले नि सांगितले की, तुमच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी
ऐकून त्याना जबरदस्त धक्का बसला आहे. तेव्हा कसं ही करून त्याना रडायला लावा." मी मानसी आईला रडविण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही.
मानसी आईचे वडील मनोहर मांडवकर पण मानसी आईला भेटायला आले होते. त्यांनी सुध्दा खूप प्रयत्न केला. मानसी आईला रडविण्याचा. पण सारेच प्रयत्न व्यर्थ ठरले. मानसी आईने फार मनाला लावून घेतले होते. मनोहर मांडवकर ना आपल्या मुलीची ही झालेली दुर्दशा पाहवली नाही. तसे ते सद्गतीत स्वरात बोलले , " पोरी मीच तुझा खरा अपराधी आहे. तुझ्या या अवस्थेला माझीच महत्वकांक्षा कारणीभूत ठरली. क्षमा कर मला." असे म्हणून एकदम जड अंतकरणाने तेथून निघून जात असतात. पण कसे कुणास ठाऊक ? एका स्टुलाला अडखळून धाडकन जमिनीवर कोसळले. ते दृश्य पाहून मानसी आई मोठ्याने किंचाळली आणि धावतच जाऊन तिने आपल्या वडिलांना हात देऊन वर उठवित विचारले ," बाबा फार लागले का तुम्हांला ?"
मनोहर मांडवकर पडल्याची जेवढे दुःख झाले नाही तेवढा आनंद त्यांना मानसी ठीक झाल्याबद्दलचा झाला होता. पण तरीदेखील मनाची पूर्ण खात्री करून घेण्याच्या इच्छेने
त्यांनी तिला विचारले ," मनू कसे वाटतेय तुला आता ?" तेव्हा मानसी आई त्यांना घट्ट मिठी मारून रडत म्हणाली, " बाबा असे कसे झाले हो हे ? प्रॉपर्टी च्या बदल्यात फार मोठी किंमत मोजावी लागली हो मला . तिची सांत्वन करत त्यांनी उत्तर दिले की, बाळ घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात.
त्याना कुणीही टाळू शकत नाही. फक्त प्रत्येक गोष्टीला घडण्यासाठी निमित्त मात्र काही ना काही जरूर असतं."
त्यावर मानसी आई म्हणाली ," नाही. बाबा ,त्याच्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे. त्यांची इच्छा नसताना त्यांच्या
मना विरुध्द त्यांच्या मुलाची प्रॉपर्टी धोकेबाजी ने मिळविली.
त्याचीच शिक्षा आहे ही मला." तेव्हा मनोहर मांडवकर दिलगिरी व्यक्त करत बोलले ," खरंय पोरी ; पण त्या साऱ्या
गोष्टीला मी जबाबदार आहे. माझ्या वेड्या हट्टा पाई हे घडले बरे सारे. तू नकोस स्वतःच्या मनाला लावून घेऊस." आई माणसात आलेली पाहून मला अत्यानंद झाला.
मानसी
" पण आता मी केलेली चूक पुन्हा सुधारणारआहे."
" म्हणजे काय करणार आहेस तू ?"
" देवधरची सारी प्रॉपर्टी पुन्हा त्याच्या नावावर करणार आहे मी ." तेव्हा बाबांनी घाबरून विचारले," आणि मग तुझ्या या दोन मुलांची काय ?" त्यावर मी उत्तरली ,"अहो, बाबा तुम्ही अजून देवधरला ओळखले नाहीये , म्हणून असे बोलताय. अहो त्याने एका झटक्यात आपली सारी प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाकली . तो माणूस किती मोठ्या दिलदार मनाचा आहे याचा विचार करा जरा , असा आज्ञाधारी आणि त्यागी पुत्र लाभयला फार मोठे भाग्य असावे लागते बाबा. खरंच ! मी किती भाग्यवान आहे , म्हणून मला देव सारखा
गुणी पुत्र लावला आणि आता राहिला माझ्या मुलांचा प्रश्न थोडा वेळ थांबून दीर्घ श्वास घेत ती पुढे म्हणाली ," त्यांची चिंता मला करायची गरज नाहीये. त्याचा मोठा भाऊ आहे , त्यांचे सारे काही पाहायला." त्यावर बाबा म्हणाले ," खरंय पोरी ! तुझेच म्हणणे खरे आहे ; पण हे शहाणपण फार उशीर सुचलंय. याचच दुःख होऊ लागले मला आता." तेव्हा
मी त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली ," हां बाबा हे
जर अगोदर सुचलं असतं तर कदाचित हा अनर्थ टळला
असता."
" होणीला कोण टाळू शकतो पोरी ? हे सारं घडसायचंच होतं, म्हणूनच आम्हाला दुर्बुद्धी सुचली ना ? "
" पण जन्माची अद्दल घडलीय मला . आता जगावेसे वाटत नाहीये."
" असे बोलू नकोस पोरी ! स्वतःचा नाहीतर त्या चिमुकल्या बाळांचा तरी विचार कर. त्यांचा काय अपराध आहे ? जी एवढी मोठी शिक्षा द्यायला निघालीस तू ." तेव्हा मी किंचित हर्षभराने म्हणाली ," त्यांची काळजी घ्यायला त्यांचा भाऊ समर्थ आहे बघा. किती चांगल्या प्रकारे काळजी घेतलीय त्याने. मला तर स्वतःचे भान नव्हते. कदाचित माझे म्हणणे बाबांना पटले असावे , म्हणून ते मग स्तुती करत बोलले ," हो पाहिलंय मी उत्तम प्रकारे काळजी घेतोय तो यात तिळमात्र शंका नाहीये."
" त्यांच्या अकस्मात जाण्याने माझ्या जीवनात जी पोकळी निर्माण झालीय ती आता दुसऱ्या कोणत्याही मार्गाने भरून निघणार नाही, म्हणून मी ठरविलंय की ही सारी प्रॉपर्टी
पुन्हा देवधरच्या स्वाधीन करून जगाचा निरोप घ्यावा . असे
म्हणताच बाबांचे मन एकदम हेलावल्या सारखे वाटले मला.
कारण एकदम समजविण्याच्या स्वरात म्हणाले ," असे वेड्यासारखं करू नकोस बाळ."
" नाही बाबा . आता कुणाचं ऐकणार नाही मी .माझा निर्णय ठरला . आता माघार नाही आणि आता जगण्यासारखं माझ्या जीवनात काहीच शिल्लक राहिलेले नाहीये." बाबा मला समजावत म्हणाले ," असे का बरे म्हणतेस तू ? आम्ही कुणीच नाही का तुझे ?"
" तुम्ही सर्व आहात माझे. पण मी मात्र कोणाचीत राहिलीय नाहीये आता. थोड्यावेळ थांबून मी पुढे म्हणाली,
" जिच्या नवरा या जगात नाहीये. तिला या जगाचा फायदा
काय बरे ? व्यर्थ आहे सारे बाबा. व्यर्थ आहे. " असे म्हणून
मी रडू लागली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा