कुरुक्षेत्र १६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र १६ |
कारण की पापाची निशाणी होती. त्या हरामखोर धनंजय बीज होतं ते. त्याचा नाश झाला, हे एका अर्थाने चांगले झाले म्हणायचे. या नि:ष्पाप पापभिरू माणसाना फसविणे माझ्या जीवावरच आले होते ; पण त्याला नाईलाज होता माझा. आपला मुख्य ध्येय साध्य करायचे म्हटले तर कुणाला ना कुणाला सुळावर चढविणे फार जरुरीचे होते आणि मी ते केले. त्यात माझा काय दोष आहे, असे मला तरी वाटत नाहीये. परंतु माझे हे नाटक फार दिवस चालले नाही. त्यांना सत्य माहित पडलेच. कारण मला नमाज पडता येत नव्हते आणि त्यांचा धर्मग्रंथ मला वाचता ही येत नव्हता. कारण मी उर्दू शिकलेली नव्हती. मग त्याना माझा संशय आला असावा.
मग मला ते लोक खोदून खोदून विचारू लागले. की ,तू कोण
आहेस का आणखीन कुणी आहेस ते आम्हाला खरं काय ते
सांग. आम्ही तुझ्यावर मुळीच रागावणार नाही."
मला त्यांच्या समोर खोटे ही बोलता येईना. मग मी त्यांना खरे काय आणि कसे घडले ते सारे सांगून टाकले. तेव्हा सलीम चे वडील म्हणाले," म्हणजे इन्स्पेक्टर म्हणत होता तेच खरे होते तर ! ती बॉडी दुसऱ्या कुण्या स्त्री ची नसून आमच्या सुनबाईची होती. अरेरे फार मोठा गुन्हा घडला आमच्या हातून . आमच्या सूनबाईचा अंत्यसंस्कार ही करू
शकलो नाही आम्ही ! ए परवरदिगार माफ कर दे हमे ।"
त्यानंतर ते माझ्याकडे पाहत बोलले ," देखो जो हुआ सो हुआ लेकीन अब मैं चाहता हुं की तुम इस्लाम धर्म कबूल कर
लो . फिर हम तुम्हें अपनी बहु के रुप मे स्वीकार कर लेंगे ।
मला जर देवधरशी बदला घ्यायचा नसता तर मी त्यांची ही ऑपर स्वीकारली सुध्दा असती. पण देवधरशी बदला घेण्याच्या इच्छेनेच मी " नाही. " म्हणाले. मग त्यांनी मला आपले घर सोडून जायला सांगितले. मी त्यांचे घर सोडले आणि प्रेमाला जाऊन भेटली.
प्रथम तिने मला ओळखलेच नाही. मग मी माझी ओळख सांगताच तिने ओळखले नि मग मला तिने कडकडून मिठी मारली . त्यानंतर माझा हेतू काय आहे हे मी तिला सांगितले. त्यावर ती म्हणाली ," देवधर बद्दल तुझा गैरसमज झालाय. तो मी आता दूर करते ." असे म्हणून तिने देवधर माझ्याशी तसा का वागला त्याबद्दलची सविस्तर माहिती तिने मला दिली. ते ऐकून मी खजिल झाली आणि माझ्या मधली सुड घेण्याची भावना तेव्हाच नष्ट झाली. तिने मला देवधरची भेट घ्यायला सांगितली. तेव्हा मी तिला म्हणाले ," एकदा निर्माल्य झालेले फुल देवाच्या चरणी चढविले जात नाहीत." त्यावर ती म्हणाली ," त्यात तुझा काही दोष ?" मी म्हणाली,"
दोष माझा जरी नसला तरी विटाळलेले शील मी देवधर सारख्या पुण्यवान माणसाच्या माथी मारु इच्छित नाही. आतापर्यंत मी त्याच्यावर प्रेम करत होती ,परंतु यापुढे माझ्या हृदयात मी त्याची पूजा करीन. येथे मी."
" बरं राहते कुठं तू ?"
" माहीत नाहीये. परंतु कुठं राहायचं हे निश्चित झालं की
तुला मी अवश्य सांगेन ." असे म्हणुन मी तेथून निघाली ती सरळ पोलीस स्टेशनला आली. त्यानंतर पोलिसांना जे काही सत्य होते ते सारे सांगून टाकले. तेव्हा मी दिलेल्या माहिती वरून इन्स्पेक्टर विशाल म्हणाला ," आता आले द्यानात की अपघात झालेल्या ठिकाणी म्हणजे मोटार घाट उतारावरून खाली कोसळली तेव्हा सलमा मोटारी मध्येच होती. पण त्यानंतर ती मोटारी मधून बाहेर फेकली गेली. तेव्हा मोटारी पासून थोड्याच अंतरावर एक अर्धवट जळालेली बॉडी मिळाली. परंतु ती बॉडी कुणीची आहे हे काही कळेना ? कारण सलीम च्या बापाचे म्हणणे होते की , आमच्या मोटारी
मध्ये आमची सून नि आमचा मुलगा होता आणि ड्रायव्हर होता आणखीन कुणी नव्हता. पण ती बॉडी कुणाची होती
हे आज उघकीस आले. अर्थात ती बॉडी सलमाची होती. त्यानंतर माझ्यावर खटला दाखल झाला आणि गुन्हा सिध्द होऊन मला कोर्टाने 14 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली.
देवधर
एक दिवस अचानक मला रस्त्यात प्रेमा भेटली. घाईघाईने कुठेतरी जात होती ती. मी तिला हांक मारली. तशी ती थांबली नि तिने मागे वळून माझ्याकडे पाहिले. मी तिच्या बाजूचा दरवाजा उघडला नि तिला आंत बसायला सांगितले आणि तिला म्हणालो ," चल बैस आंत मी तुला नेऊन सोडतो." तेव्हा ती म्हणाली ," बरे झाले, तुम्ही आज भेटलात ते . मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, अलका बद्दल."
तसे मी आश्चर्याने म्हटले ," अलका बद्दल .....कुठं भेटली ती तुला ?"
" मागच्या महिन्यात आमच्या घरी आली होती ती. प्रेमा बोलली. तसे मी तिला विचारले ," मग काय म्हणत होती ती ? आणि आता माझ्या वरचा राग गेला का नाही ? का अजुनही
तसाच आहे ?" त्यावर ती उत्तरली ,
" तेव्हा नव्हता गेला तर तुमच्यावर सूड घ्यायचा होता तिला . "
" मग का नाही घेतला नाही तिने सुड ?"
" कसा घेणार ."
" का ?"
" तोपर्यंत सत्य कळाले होते ना तिला ."
" सत्य कळले .....पण कसे ? कोणी सांगितले तिला ?"
" तुम्ही पण कमालच करताय ..... दुसरं कोण सांगणार माझ्या शिवाय !"
" मग काय म्हणाली ती . "
" काय म्हणणार .....दिलगिरी व्यक्त करत बोलली की
मी नाहक संशय घेतला देववर ....."
मी हर्षभराने म्हटले की, असे म्हणाली ती."
" हो !" प्रेमा उत्तरली.
" मग मला न भेटताच का गेली निघून." त्यावर प्रेमा म्हणाली ," ती आता स्वतःला तुमच्या लायक समजत नाही."
" असे समजण्याचे काय कारण ?"
मग प्रेमाने अलका घरातून पळून गेल्यापासून ते थेट असलम शी लग्न होण्यापर्यंत ची इत्थंभूत सविस्तर माहिती
दिली. ते ऐकून मला फार वाईट वाटले. फार दुःख तिने भोगले.... ते पण काही अपराध नसताना आणि हे केवळ
माझ्यामुळे घडले. तिचा खरा गुन्हेगार मीच आहे. असे मी स्वतःशीच म्हणून प्रेमाकडे पाहत म्हटले ," बरं ती राहते कुठं
त्याबद्दल माहीत आहे काही ?"
" नाही. ती म्हणाली अजुन ठिकाणा मिळाला नाहिये. मिळाल्यावर सांगते."
" बरं. पुन्हा जर ती तुला भेटली तर तिला म्हणावं
मला भेटावयाचे आहे तिला. " असे मी म्हणताच प्रेमाने होकारार्थी मान डोलावली. मी तिला तिच्या घरी सोडले नि निघालो आपल्या घरी. मनी अलका ला भेटण्याची आकांक्षा घेऊनच. परंतु लवकर निराशा पण झाली. कारण ती पुन्हा
ना प्रेमाला भेटली ना मला. कुठं गेली याबद्दल काहीच माहिती नाही. शिवाय प्रेमा आपल्या सासरी गेली होती. मग मी स्वतःला कंपनीच्या कामात गुंतवून घेतले. प्रॉपर्टी वरून दोन भावंडा मध्ये भांडणं व्हायला नकोत , म्हणून मी कंट्रक्शन व्यवसाया व्यतिरिक्त दुसरा नवीन व्यवसाय सुरू करावा असे मला वाटले. म्हणून मी हा माझा विचार मानसी आई जवळ बोलून दाखविला. आईला पण माझा हा विचार एकदम पसंत पडला. तिने लगेच परवानगी ही देऊन टाकलीे. आता राहिला बाबांचा प्रश्न आता त्याना कसे समजावे , त्याचा विचार मी करू लागलो. विचार करता करता मला एकदम एक कल्पना सुचली. तसा मी बाबांजवळ गेलो. बाबा वृत्तपत्र वाचत होते. मी त्यांना म्हणालो ," बाबा !"
"अंsss" त्यानी वृत्तपत्रातून डोके वर काढून माझ्याकडे पाहत नजरेनेच मला काय म्हणून विचारले.
" मी काय म्हणत होतो." पण पुढे काय बोलावे ते लगेच
न सुचल्याने मी बोलावयाचे थांबलो. तसे ते माझ्याकडे पाहत
बोलले ," काय म्हणत होतास ? बोल ना sss "
" मी म्हणत होतो की, एक केमिकल कंपनी स्वस्तात मिळतेय घेऊन टाकू. पुढे मागे आपला परिवार ही वाढणार
आहे. म्हणून.....
" हूं s s " ते माझ्या नजरेला नजर भिडवत म्हणाले ,
" विचार चांगला आहे." क्षणभर मला वाटले ,लहान
मुलासारखे नाचावे. पण मनाला होणारा मोह मी टाळला आणि एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे तोंड वर करून म्हणालो ," तुमची संमत्ती आहे ना पण ?" तसे ते मिश्कीलपणे
हसून म्हणाले ," अरे संमत्ती का असणार नाही .तू काही चुकीचे करशील असे मला स्वप्नात ही वाटणार नाहीये. ?" मी फक्त आपली मान
डोलावली. तसे ते पुढे म्हणाले ," हां पण एक काम कर."
" काय ?"
" ही कंपनी तुझ्या धाकट्या भावांच्या नावाने सुरू कर.
दुसरं काही देऊ शकत नाही मी त्या दोघांना." मला त्यांच्या
स्वरातला आर्त पणा कळला. बहुधा बाप म्हणून आपण
आपल्या दोन्ही मुलांना काही देऊ शकत नाही. याची दिलगिरी होती त्यांच्या स्वरात आणि सत्य काय आहे ते मी त्यांना सांगू शकत नव्हतो . ही माझी मजबुरी होती. लाचारी पण एक भयंकर रोगा सारखी असते. ती माणसाला आतल्या
आंत कुसळ सारखी टोचत असते ती. मी काही न बोलता जायला वळलो. तेवढ्यात बाबा पुढे म्हणाले ," अरे थांब. कुठे चाललास लगेच ?" मी थांबलो आणि त्यांच्याकडे वळत विचारले," मला काही सांगावयाचे आहे का तुम्हाला ?"
" मला थोडे बोलायचे आहे तुझ्यावर ."
" माझ्याबरोबर ?"
" होय ."
" मग बोला ना , काय बोलायचे आहे ते ."असे बोलून मी
निमूटपणे त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. तसे ते म्हणाले ," उभा नको राहूस, बैस इथं. " मी बसलो. तेवढ्यात तिथे माणसी आई पण आली . तिला पाहून बाबा म्हणाले ,
" बरं झालं. तू पण आलीस ती,बैस तू पण इथं." मानसी आई आणि मी दोघंही गोंधळलेल्या स्थितीत एकमेकांकडे पहात खुणेनेच एकमेकांना विचारू लागलो की काय
म्हणून ? परंतु ही गोष्ट बाबांच्या द्यानात आल्यावाचून राहिली नाही. ते मिश्कीलपणाने थोडे हसले आणि आम्हां
दोघांकडे पाहत बोलले की , मला वाटतं आता आपल्या देवचे लग्न करायला हवं." तसे लगेच माणसीे आई ने हसून त्याना प्रतिसाद देत म्हणाली ," एकदम माझ्या मनातले बोललात तुम्ही ! " तेव्हा मी लगेच म्हणालो," नाही नाही मला नाही लग्न करायचं. " तसे ते दोघेही प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहू लागले आणि मग बाबांनी मला लगेच विचारले ," लग्न नाही करायचं पण का ?" मी नकळत चट्कन बोलून गेलो. परंतु आता पंचाईत झाली ना , लग्न न करण्याचे कारण काय सांगावे ? आणि उत्तर तर द्यावेच लागेल. त्या शिवाय ते गप्प राहणार नाहीत. मग काय उत्तर देऊ बरं ? मी स्वतःलाच प्रश्न केला. पण उत्तर काही मिळेना. मी काही बोलत नाही हे पाहून बाबांनीच मला विचारले , " अरे बोल ना , का नाही करायचं लग्न ?" तसे मी स्वतःला सावरून म्हटले ," नाही. मला म्हणावयाचे होते की , लग्न करावयाचे आहे , पण एवढ्यात नाही." तेव्हा ते हसून म्हणाले , " एवढ्यात नाही , मग काय म्हातारपणी करणार आहेस ?" मी म्हटले ," अजुन लग्नाचं वय गेलंय का माझं ?"
" वय नाही गेलंय रे , पण लग्ना सारखी गोष्टी वेळीच
व्हायला हव्यात. नाही काय गं ?" ते मानसी आईकडे पाहत
बोलले. तशी मानसी आई पण दुजोरा देत म्हणाली ," हो ना !"
मी वैतागून म्हटले ," थांबा ना , एवढी काय घाई आहे ?"
" अजून किती थांबायला सांगतोयस बाबा ?" बाबांनी विचारले. तेव्हा मी म्हटले ," चेतन आणि विश्राम मोठा होऊ
दे. मग करतो मी लग्न."
" त्यांच्या मोठे होण्याचा तुझ्या लग्नाशी काय संबंध ?"
" संबंध कसा नाही ? " मी स्पष्टीकरण देत म्हटले ," उद्या
काका नि पुतण्या सारखेच वयाचे नाही का वाटणार ?"
" मग त्यात काय झालं ?"
" लोक हसणार नाहीत का ?" उगाचच काहीतरी कारण पुढे करायचे म्हणून मी केले.पण बाबा कशाचे ऐकताहेत ते
मला म्हणाले , " कशाला हसतील ? जगामध्ये काय फक्त
आपल्याच घरात अशी परिस्थिती आहे का ? असे कित्येक जण असतील. " बाबांचे म्हणणे अगदी बरोबर होते. परंतु
माझ्याकडे दुसरा उपाय ही नव्हता आणि उत्तर ही नव्हते.
त्यांच्या प्रश्नाचे . मी काही न बोलता गप्प राहिलो. मानसी
आई मघापासून माझा चेहरा निरखून पाहत होती. मी लग्नाला नकार का देतोय बहुतेक त्याचेच उत्तर ती शोधत
असावी. मग माझ्याकडे पाहत विचारले ," कारण फक्त तेच
आहे का दुसरे काही ? नाही म्हणजे प्रेम वगैरे भंग तर नाही
ना झाले तुझे ?" तिच्या या प्रश्नाने मी गडबलोच. काय उत्तर
द्यावे ते मला कळेना. पण लगेच स्वतःला सावरून मी म्हटले,
" नाही. तसे काहीही नाही."
" तसे नाही तर मग आणखीन काय कारण आहे ?"
" मला थोडा विचार करू द्या. प्लिज ! "
" ठीक आहे. तू पूर्ण विचार कर नि मग मला सांग. तोपर्यंत
मी मुलगी पाहून ठेवतो."
" आधीच कशाला ?"
" अरे पाहिली म्हणजे लगेच लग्न करायलाच हवे असे नाही. लग्न तू सांगशील तेव्हाच होईल." त्यावर मी काहीच
बोलू शकलो नाही. गुपचुप उठलो नि आपल्या खोलीत
निघून गेलो. पण यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार
करू लागलो . विचार करता करता एक उपाय सुचला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा