Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

कुरुक्षेत्र -१५

कुरुक्षेत्र -१५
कुरुक्षेत्र -१५

 


       जेव्हा मला शुध्दीवर आली.  त्यावेळी मला पूर्वायुष्यातील काहीच आठवत नव्हते. मी इस्पितळात होते. माझ्या डोक्याला बँडेज केलेले होते. नि माझ्या समोर एक मुसलमान पेहराव केलेले एक मुसलमान जोडपे होते.  ४५ ते ५० वर्षांमध्य ले असावे.  त्यांचे म्हणणे होते की, मी त्यांची सून आहे . आणि मी माझ्या नवऱ्या बरोबर पुण्याला  आपल्या माहेरी गेली होती. तिथून येत असताना आमच्या गाडीला अपघात झाला. त्यात माझे पती आणि ड्रायव्हर दोघे ठार झाले .  फक्त मी तेवढी वाचली. पण मला कसे आठवत नाही. माझा स्मृतीभ्रश झाला होता का ?  मला माझे स्वतःचे नाव सुध्दा आठवत नव्हते . ते लोक मला सलमा या नावाने संबोधत होते. पुण्यावरून  माझे आई वडील , भाऊ ,बहिण, भावजय सर्वजण आले होते. पण मी कोणालाच ओळखत नव्हती. माझ्या सासऱ्यांचे नाव इब्राहिम शेख असे होते.
त्यांच्या मुंबई मज्जीत बंदरला घाऊक कपड्याचे दुकान होते. आणि  स्वतःचा मोठा फ्लॅट होता. मला मुंबईतल्या मोठ्या प्रायव्हेट रुग्णालयात दाखल केले होते . अपघातात माझा पूर्ण चेहरा खराब झाला होता. म्हणून त्यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली. मला माझाच  म्हणजे सलमाचा चेहरा देण्यात आला होता. थोड्या दिवसात मी पूर्ण बरी होऊन घरी परतली. परंतु मला तेथे अवघडल्यासारखे होऊ लागले. मला त्यांच्या रिवाजा प्रमाणे काहीच करता येईना. त्यांनी मला नमाज पडायला सांगितले तर मी देवाची आरती म्हणू लागली. त्यांना काहीच कळेना. माझ्यात असा कसा बदल झाला अचानक. त्यांनी मला कुराआन  वाचायला दिले तर मला वाचता  येईना मी त्याना सांगू लागली की,  मला गीता वाचायला आणून द्या. मला गीता वाचायला येते. माझे सासू-सासरे आणि इतर नातेवाईक मोठ्या संभ्रमात पडले . असा कसा विचित्र बदल झाला माझ्यात. कोणी म्हणे मला मागील जन्मांचे आठवते. मी मागील जन्मात हिंदू असावी. तर काही जणांचे म्हणणे होते की मला खंडाळा घाटातील कुणी हिंदू भुताने झपाटले असावे .म्हणून मला दर्ग्यात नेऊन माझी झाडनी करून घेतली. पण कशा कशाचा ही फरक नाही. शेवटी मला माझ्या आई-वडिलांकडे म्हणजे पुण्याला पाठवून दिले. मी आता पुण्याला राहूं लागली होती. पण तिथेही मला घरातील सर्व माणसे कंटाळली. मग त्यांनी मला वेड्यांच्या रुग्णालयात पाठविण्याचा निश्चित केले . पण माझ्या आईने मला जाऊ दिले नाही. ती म्हणाली मी जिवंत असेपर्यंत माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करू नका. मला एका खोलीत बंदिस्त करून ठेवले . मला त्या खोलीच्या बाहेर  येऊ देत नसत. आणि  पक्षासारखे बंदिस्त जीवन झाले होते माझे. पण थोड्या दिवसात , मला दिवस गेले आहेत ,याची जाणीव झाली. सर्वप्रथम ही खुशखबर मी माझ्या आईला दिली. मग आईने घरात सर्वांना सांगितले . सर्वांना अत्यानंद झाला आणि माझ्यात ही बदल झालेला त्यांना दिसला, म्हणून मग त्यांनी माझ्या सासरी ही शुभ वार्ता कळविली. त्यांच्या मुलाचा अंश माझ्या उदरात वाढतोय म्हणून त्याना कोण आनंद झाला. म्हणून मग मला सासू- सासरे  आपल्या घरी घेऊन जायला आले . मग आईने मला प्रेमाने समजाविले ,ती मला म्हणाली ," जा बाळ , सासर हेच तुझं खरं घर आहे, तुझे सासू- सासरे तुला न्यायला आले आहेत. त्यांच्या सोबत तू जा आपल्या सासरी.आणि
जरा  नीट वाग तिथं. वेड्यासारखे काही करू नकोस. नाहीतर त्याचा परिणाम तुझ्या पोटातील बाळावर होईल. घरातील माझे भाऊ बहिण आईला  अम्मी म्हणत असत, म्हणून मी देखील अम्मी म्हणू लागलेे आईला. मी अम्मी ला म्हणाले ," अम्मी  तू माझी अजिबात चिंता करू नकोस माझी. मी हळूहळू  काही शिकेन सारे.
  

    मी सासरी आल्यानंतर घरच्या माणसांनी मला पूर्व आयुष्याबद्दल आठवून देण्याचा खूप प्रयत्न केला ; परंतु मला काहीच आठवेना. मग मी पण स्वतःला सलमा समजु लागली. मी तरुण होती त्यात करून पोटीशी होती ,म्हणून मग माझ्या सासू-सासर्‍यांनी माझे लग्न माझ्या धाकट्या दीराशी लावून देण्याचे ठरविले. त्यांनी तो आपला उदात्त विचार माझ्या आई-वडिलांनाही ऐकविला . त्यांनीही त्यास संमत्ती दिली; परंतु आधी माझी संमत्ती  घ्यायला सांगितली. त्यांनी मला विचारले असता मी सुद्धा लग्नाला होकार देऊन टाकला . कारण आठवत नसलेल्या नवऱ्याच्या आठवणी मध्ये  संपूर्ण जीवन जगणे मलाही मंजूर नव्हते. मी माझी संमत्ती दर्शविली, तर त्यांनी माझा असलमशी मुस्लिम पद्धतीनुसार निकाह  कळविला. मी गर्भवती असल्याने माझी सासू ही फार काळजी घेत असे . कोणतीही जड वस्तू मला उचलू देत नसे. माझे सारे डोहाळे  व्यवस्थित पुरविले जाते होते. असलम तर माझ्यावर खुप जिव टाकायचा. माझ्या होणाऱ्या बाळासाठी त्याने आतापासूनच खेळणी आणायला सुरुवात केली. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
 

देवधर

    पुण्यावरून वापस येऊन मला सहा महिने झाले होते. पण
त्या सहा महिन्यात अलकाची  काहीच माहिती मिळाली नव्हती. एक-दोन वेळा मला पोलीस स्टेशनला बोलविले होते चौकशीला. मला काही माहित नव्हते तिच्याबद्दल तर मी काय सांगणार होतो त्याना. पण त्यांच्याकडून एक माहिती
जरूर मिळाली . ती ही की,  त्या तांत्रिकाचा खून अलकानेच केला आहे , हे फिंगर एक्सस्पट च्या पुराव्यावरून सिध्द झाले. कारण  तलवारीवर मिळालेले हाताचे ठसे आणि
चाकूवर मिळालेले ठसे एकाच व्यक्तीचे आहे हे सिद्ध झाले.
अलका उर्फ शिरीन  कुठे गायब झाली हे मात्र पोलिसांना कळू शकले नाही.
        आता मी सारे विसरून कंपनीच्या कामात लक्ष देऊ लागलो होतो. जीवनातल्या कोणत्याही वळणावर जर तिची भेट झालीच तर आपण तिचे नक्कीच स्वागत करू, परंतु ती आता आपली कधीतरी सहचारिणी होईल ही आशा मात्र कायम राहिली उदरी. ती अपराधी आहे ,सापडली तरी तिला पोलीस सोडणार नाहीत. तुरुंगवास घडेल तिला. मला माहित
असूनही माझ्या वेड्या मनाला ते पटत नव्हते. कारण प्रेमाला
दुसरी भाषा कळत नाही. हेच खरे !

मानसी

       नऊ महिने पूर्ण होतास मला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. देव ने मला खाजगी रुग्णालयात ताबडतोब दाखल केले. थोड्या वेळानंतर मी दोन बालकाना जन्म दिला . आणि
देवधरने दोन्ही बाळांना एकदम उचलून घेतले नि  त्या दोघांना उद्देशून म्हणाला ," तुम्ही दोघे माझे भाऊ नाहीत तर मागे दोन
हात आहात. लवकर मोठे व्हायचे आणि मला माझ्या जबाबदारीतून मोकळे करायचे . काय म्हणतोय मी कळले का ?
    मला देवाच्या बोलण्याचे मला हसू आले. नुकत्याच जन्मलेल्या बालकांना देवची काय बरे भाषा समजली असेल ? पण  त्याच्या अंतरातील तळमळणारी भावना समजली आणि  त्याचे तरी काय चुकले होते  म्हणा ? तो जे काय म्हणाला ते योग्यच तर होते. माझी दोन्ही मुले मोठी होईपर्यंत कंपनीची सारी सूत्रे देवाच्या ताब्यात राहणार होती. तो आपल्या वचनाला जागला होता. माझे लग्न त्याच्या
वडिलांशी होताच त्याने माझ्या नवी केलेले प्रॉपर्टी चे ओरिजनल कागदपत्रे माझ्या स्वाधीन केले जाते त्याने. आणि खरे सांगायचे तर मीच स्वार्थीपणा केला. नव्हे माझ्यातल्या
आईने तो करायला भाग पाडला. प्रत्येक आईला आपल्या
मुलांचे कल्याण व्हावे असेच वाटत असते ना ? मग मी माझ्या
मुलांच्या कल्याणासाठी जर हे पाऊल चुकले तर बिघडले कुठे ?

अलका उर्फ सलमा

     सकाळी स्नान करण्यासाठी सासू न्हाणीघरात गेली होती. आणि मला शिरा बनवायचा होता. त्यासाठी मला रवा पाहिजे होता. पण रव्याचा डबा स्वयंपाक घरात बनविलेल्या उंच कपाटात  ठेवलेला होता. आणि तो काढण्यासाठी माझा हात  तिथपर्यंत पोचत नव्हता ,  म्हणून पायाखाली छोटे स्टूल घेतले . नि  स्टुलावर चढून त्या डब्यापर्यंत होत पोचवू पाहत होती परंतु  डब्यापर्यंत जेमतेम कसे तरी माझे हात पोचत होते माझे. मी तो डबा हळूहळू पुढे सरकवू लागली होती.
पुढच्या तळव्यावर मी उभी असल्याने  अचानक माझा तोल गेला. आणि डब्यासाहित मी जमिनीवर  कोसळले. नि रव्याचा डबा माझ्या डोक्यावर पडला. माझ्या तोंडातून
जोरदार किंकाळी बाहेर पडली. आणि क्षणभरात मी बेशुध्द
झाले.

      मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी इस्पितळात असल्याचे मला जाणवले. मी इथे कशी आले मला काही केल्या आठवेना. मग मला एकदम आठवले की मी मुंबईला पळून येत असताना अचानक कार चे ब्रेक फेल झाले. आणि ड्रायव्हरने आम्हाला बाहेर उडी मारायला सांगितले आणि मी बाहेर उभी मारली. आणि कठड्यावरून मी खाली कोसळली. एवढेच मला आठवत होते. त्या पुढचे मला काही आठवत नव्हते. मी शुध्दीवर आल्याची पाहताच डॉक्टर मला विचारू लागले की , अब कैसी तब्येत है आपकी, मिसेस सलमा ? मला  सलमा या नावाने का  संबोधत आहेत असा जर प्रश्न  माझ्या मनाला पडला तर त्यात नवल ते काय ?  मी डॉक्टराना विचारणार होते की माझे नाव तर अलका पुजारी आहे मग हे लोक मला सलमा म्हणताहेत ? पण तेवढ्यात
मला सारे काही आठवले. म्हणजे हॉटेलमध्ये आपण  दोन माणसांचा खून केला नि तेथून पलायन केले. रेल्वेच्या स्टेशनवर गेलो तर तेथे पोलीस दिसले आपल्याला म्हणून
बस स्थानक वर गेले तर तेथेही पोलिसांचा पहारा म्हणून
मग शेवटी हायवेवर एका मोटारीला हात दाखविला नि त्यात आपण बसलो. त्या मोटारी मध्ये मुसलमान कपल होते. कदाचित त्या बाईचे नाव सलमा असावे. म्हणजे ती बाई जिवंत नाही का ? कदाचित नसेल ही. म्हणून काय झाले ?
निदान माझ्या चेहऱ्यावरुन तरी ओळखायचे होते. असा विचार मनात येताच मी माझा चेहरा चाचपू लागली. माझा चेहरा विद्रुप तर झाला नाही ना ? अशी माझ्या मनात शंका
आली. परंतु माझ्या चेहऱ्यावर जखम ओरखडा वगैरे काहीच
नव्हते. मग हे लोक मला सलमा का समजताहेत ? मला
काहीच कळेना . मी पुरती गोंधळून गेली होती. मी काहीच बोलत नाही असे पाहून डॉक्टरांनी माझ्या खांध्याला पकडून हलवत विचारले ," मिसेज सलमा आपको कुछ याद आया क्या ? " मी भानावर येत  म्हणाली ,"  डॉक्टर सहाब मुझे कुछ याद नहीं आ रहा है  की मैं यहाँ कैसे पहुंच  गई मैं तो पुनासे अपने पति के साथ आ रही थी। फिर अचानक हमारे मोटार का ब्रेक फेल हो गया . फिर आगे क्या हुआ यह पता नहीं है ." मी डॉक्टराना खोटेच सांगितले. कारण खरे जर सांगायला गेले तर  हे लोक मला सरळ पोलिसांच्या हवाली
करतील . त्या पेक्षा सध्या तरी सलमा बनून राहण्यातच खरी मजा आहे. तेव्हा डॉक्टर समजले की मला पूर्व  आयुष्य संबंधित थोडे थोडे आठवू लागले आहे, असे समजून  त्यानी
मला नेमके काय घडले ते सांगू लागले. ते मला म्हणाले ," आपकी मोटारी का  एक्सीडेंट हुआ था. आपको यहां बहुत
जख्मी हालत में लाया गया था . आपका चेहरा पूरी तरह खराब हो चुका था . इसलिए आपके चेहरेपर प्लास्टिक सर्जरी कर दी गई . आपको आपका ही चेहरा दिया गया है .
और दुख की बात एक  और है  ,की उस अँक्सिडंट में आपके पति और खुद ड्राइवर बच नहीं पाये. और आपके पेट में जो बच्चा था वो स्टूल से गिरने के वजह से चल बसा. आता माझ्या पूर्ण लक्षात आले की हे लोक मला सलमा का संबोधतात. एका अर्थाने जे झाले ते चांगलेच झाले म्हणा.
आता  आपल्यापर्यंत  पोलीस कधीच पोहोचू शकणार नाहीत. परंतु माझ्या पोटात बाळ कुठून आले ? मी आठवण्याचा खूप प्रयत्न केला . परंतु मला काही आठवेना.
म्हणून मीच डॉक्टराना विचारले की माझे अक्सिडंट किती दिवसांपूर्वी झाले होते ?" तेव्हा डॉक्टर म्हणाले ," नवं महिन्यांपूर्वी !" म्हणजे नवं महिने मी सलमा बनून राहतेय
त्यांच्या घरात. पण सलमा चा नवरा अँक्सिडंट मध्ये मेला ना ? मग त्याचे मुल माझ्या पोटात कसे ? डोक्याला जरा
ताण दिल्यावर मला आठवले की नवं महिन्यांपूर्वी आपल्या
सोबत त्या हॉटेल मध्ये काय घडले होते. हे जसे आठवले तशी मी मनात म्हणाली ," चांगलेच झाले ते मुल जन्माला नाही आले ते. त्या दोघांच्या पापाची निशाणी होती ती.
तेवढ्यात डॉक्टरानी बाहेर उभ्या असलेल्या माझ्या नव्हे !
सलमा च्या सासू-सासऱ्यांना आंत बोलवून घेतले.
त्यांच्याबरोबर एक विशीतला तरुण सुध्दा होता . कदाचित तो सलमानचा दीर असावा. मी मनातल्या मनात अंदाज लावला. तेव्हा सासू गळा काढून म्हणाली ,"  फार वाईट झाले ग पोरी ! तुझ्या पोटात माझ्या सलीम शेवटची निशान  होती, ती सुद्धा नाही राहिली आता. ये परवरदीगार ये तूने क्या किया ? तिच्या म्हणण्याचा उद्देश मला अगोदर कळला नाही. परंतु लगेच द्यानात असले की,  बहुतेक त्या सलीम ची पत्नी गर्भवती असेल तिच्या संबंधित बोलत असतील त्या. मी माझ्या मनाची समजूत घालत होती . इतक्यात सलीम चे वडील म्हणाले," बहु  कैसे लग रहा अब ? सब याद तो आ रहा है ना ? " मी समजली त्याना काय म्हणावयाचे  आह तेे
पण उत्तर कोणत्या भाषेत देऊ हे कळत नव्हते. म्हणजे सासू मराठीत बोलतेय माझ्याशी पण सासरा  हिंदीत बोलतोय.
मग  मी बोलू कोणत्या भाषेत मी काय बोलू ? कुठून आणि
कोणत्या भाषेत  बोलायला सुरुवात करु हे कळत नव्हते.
पण नंतर एकदम ट्यूब पेटली. तशी मी म्हणाली ," ते नाही आलेत का ?"  कारण त्यांच्यात कसं बोलतात ते मला माहित
नाही. पण तरी देखील अंधारात तीर मारला. पण त्याना म्हणण्याचा अर्थ बरोबर कळाला होता. म्हणून त्यांनी सांगितले की, तुम्हांरा शोहर अल्ला को प्यारी हो गया . " सासऱ्यांने उत्तर दिले. तशी मी किंकाळी मारली," नहीं sss"
     तशी सासू म्हणाली ," हां बहु अब असलम ही तुम्हांरा शोहर है." तशी मी ओरडून म्हणाली ," ऐसा नहीं हो सकता ."
  " अभी यही सच्चाई है ."
  " लेकिन मेरी मर्जी पूछा बिना आपने मेरा निकाह असलम
मियां से क्यों करवाया ?"
    " यह सब तुम्हारी मर्जी से ही हुआ है बहु ."
    " लेकीन उस वक्त  मैं अपने आप में नहीं थी तो आपने क्यों करवा दी  मेरी शादी देवर से ?"
      " बहु अब जो हुआ उसे बदला तो नहीं जा सकता और
वैसे भी हमने यह सब तुम्हारी भलाई के लिए तो कर दिया."
    " नहीं मैं ऐसी शादी को हरगिज नहीं मानती."
    " अभी मानने या माननेसे क्या होगा बहु. अब सच्चाई यही
की असलम ही अब तुम्हारा शोहर है ? "
     हे ऐकून माझ्या पाया खालची जमीन सरकल्याचा मला
भास झाला. काय करावे ते सुचेना , मी मनातल्या मनात स्वतःला दोष देऊ लागली होती. म्हणाली ," हाय रे दैवा किती
क्रूर डाव खेळलास माझ्याशी ! ज्यांच्याशी मी जिवापाड प्रेम
केले .तो देवधर मला मिळाला नाही. त्याच्या शिवाय अन्य
कुणाशी लग्न करणार नाही . ही  मी केलेली प्रतिज्ञाही तू भंग केलीस. काय साधलेस तू माझ्याशी हा असा क्रूर डाव खेळून ? असे म्हणून मी स्वतःलाच दोष दिसून येऊ लागली. त्यापेक्षा त्या अपघातात सलमा ऐवजी मला मरण आले असते तर फार चांगले झाले असते. निदान अपवित्र तर  झाले नसते मी. पण लगेच माझे दुसरे मन मला म्हणाले, का उगाच
पश्चाताप करते आहेस तू त्या देवधर साठी ! त्यांने  काय दिले तुला  धोकाच ना ?  नाहीतर इथं का यावे लागले असते तुला ? तुझा  कार अपघाता स्मृतीभ्रश तरी झाला असता का ? नाही ना ? मग साऱ्या  गोष्टीला देवधरच कारणीभूत आहे .  सुड घे त्याचा. त्याला जिवंत सोडू नकोस. त्याला सुध्दा तसाच तडपवत ठेव. जसे त्याने तुला तडपवत ठेवले आहे. माझे सारे अंग क्रोधाने पेटले होते. या क्षणी जर देवधर
माझ्या समोर असता तर जाळून भष्म केले असते मी. पण
बोलण्या एवढे सोपे असते तर कुणी दु:खीच राहिला नसता.
आणि त्याच क्षणी मायेची नि आणि वात्सल्याची अमृतधारा
सलमाच्या सासूने माझ्यावर उधळली. माझ्या डोक्यावरून आईच्या मायेने हात फिरवून म्हणाली ," सुनबाई , रागावू नकोस. आमच्याकडून चूक झाली बरं , तुझी स्मृती परत
येईपर्यंत थांबायला हवे होते. घाईघाईने लग्नाचा निर्णय
घ्यायला  नाही पाहिजे होता. पण आता चूक झाली. तेव्हा
असलम चा स्वीकार कर नवरा म्हणून."
    माझ्या पुढे दुसरा पर्याय नव्हता पोलीस आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मला एक इथं राहणे जरुरीचे होते. मी
मी परिस्थितीपुढे हार मानली. मी त्यांच्या घरी राऊ लागली
सलमा बनून.  परंतु असलमची पत्नी म्हणून मी अजून असलम चा  स्वीकार  केला नव्हता. मोठ्या चातुर्याने  मी
असलमच्या गळी ही गोष्ट उतरवली होती की माझं नकळत
तुझ्याशी लग्न झालय तेव्हा मी अजुनही तुमच्या भावाला
विसरलेली नाहीये. तेव्हा मला तुमचा स्वीकार करायला थोडा
वेळ लागेल." त्यावर तो मला म्हणाला ," हरकत नाही, जोपर्यंत तू माझा पती म्हणून स्वीकार करत नाहीस तोपर्यंत
मी तुला स्पर्श सुध्दा करणार नाहीये."
     माझा हेतू सफल झाला होता. आता निर्भयपणे या घरात
कितीही काळ राहता येणार होते. माझा गर्भपात झाला . ही एक चांगली गोष्ट झाली होती. अर्थात माझ्यासाठी !

क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.