Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

![]() |
कुरुक्षेत्र १४ |
मी आता पूर्वीची भित्री आणि डरपोक अलका राहिली नव्हती. माझा नवीन जन्म झाला होता. अलकाची आता मी शिरीन परांजपे झाली होती. मॉडेलिंगमध्ये माझे बस्तान आता चांगलेच बसले होते . पैशाचा तर नुसता पाऊस पडू लागला होता. मी माझ्या नशिबावर फारच खुश झाली होती. मला स्वप्नातही वाटले नव्हते की , माझ्या जीवनात अशी काही उत्क्रान्ती होईल. मी फार खुश होती , पण त्याच बरोबर मनाला एक खतं ही लागून राहिली होती आणि ती खंत म्हणजे देवधरशी माझे लग्न करण्याची जी इच्छा अपुरी राहिली होती ; परंतु काही हरकत नाही. त्याला सुद्धा एक दिवस मी हस्तगत करीन. कारण तसे वेताळ ने सांगितलेच आहे की, तो माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाशी लग्न करू शकणार नाही. वेताळाचे नाव आठवताच त्या तांत्रिकाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला आणि एका क्षणात अनामिक भीतीने मन थरथरलेे नि अंगावर काटा उभा राहीला. मी स्वतःला सामान्य स्थितीत आणण्याचा प्रयत्न करू लागली होती. तेवढ्यात मला कोणीतरी हांक मारली. मी भानावर आले आणि मान वळवून मी त्या आवाज्याच्या दिशेने पाहिले. तो आवाज धनंजय वाघमारेचा होता. तो माझ्याजवळ येत म्हणाला ," कसला विचार करतेस आहेस ?" मी लगेच स्वतःला सावरुन म्हणाली ," नाही कसला."
" मग चल ,आज तुझी मी एका अश्या व्यक्तीची ओळख करून देतो की तुझं नाव फक्त इथंच नाहीतर साऱ्या जगात
फेमस होईल . मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि मनात विचार केला की अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याचे धनंजय सारखा माणूस एवढे गुणगान गात आहे. मला अश्या व्यक्तीची भेट घ्यायलाच पाहिजे. असा विचार करून मी त्याच्या सोबत गेली. त्यांने माझी ओळख त्या व्यक्तीशी करून दिली . तेव्हा त्या व्यक्तीने हॅलो म्हणून माझे स्वगत केले आणि हस्तांदोलन साठी हात पुढे केला. पण मी हात
न पुढे हात जोडून नमस्ते केला. बहुधा ते त्याला आवडले नसावे. पण त्याने तसे न दाखविता त्याने आपला परिचय
करून देत म्हणाला ," आय एम अनंत लांडगे . मिलन इंडस्ट्रियल चे मालक." तेव्हा मी माझा परिचय देत म्हटले ,
" माय सेल्फ शिरीन परांजपे." पण त्याची नजर काही मला ठीक वाटली नाही. तो वासनात्मक नजरेने मला न्याहाळीत होता, म्हणून मी काहीतरी निमित्त करून तेथून
सटकली. परंतु त्याच्या तोंडून निघालेले असभ्य बोल माझ्या कानावर आदळलेच. तो माझ्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत म्हणाला ," क्या माल है तबियत एकदम खुश हो जायेगी ,अगर आज ये अपने पंजे मे आ जायेगी तो ? क्या बहार आ जायेगी ! " मला ते सहन न झाल्याने मी गर्रकन
मागे वळली नि एक थप्पड त्याच्या श्रीमुखात भडकवली. आणि म्हणाली ," अपने माँ और बहन को भी देखकर ऐसा ही बोलता है क्या तू ? तुला आई बहीण नाहीत काय रे भडव्या ! त्यांना सुध्दा पाहिल्यावर असेच बोलतोयेस का रे तू ? भडवा साला ! " तो भयंकर चिडला नि रागाने लालबुंद झाला नि मला म्हणाला की , दो टके की औरत तेरी यह मजाल !" तेव्हा मी अधिकच चिडून म्हणाले ," मेरी मजाल तुने अब देखी ही कहाँ है ? अगर देखता तो ऐसी बात करने की जरूरत नहीं करता ? चुवा साला !" तसा धनंजय माझ्यावर रागवत म्हणाला ," ए शिरीन वेडी आहेस का गं तू ? एवढ्या मोठ्या बिझनेसमन माणसाचा अपमान कतेस तू ? चल अगोदर माफी माग त्याची. " त्यावर मी चिडून बोलली, " माफी और इस भडवे की ....कभी नहीं. " त्यावर तो चिडून बोलला ओ," ए जास्त बोलू नकोस. तुला ह्या पोजिशनला मीच आणलंय. नाहीतर तुझी औकातच काय ? दीड दमडीची तू . मला ते सहन न झाल्याने मी त्याला म्हणाली ," हो . मी दीड दमडीचीच ; परंतु इज्जतदार आहे. माझी इभ्रत तुझ्या लाखो करोडो रुपयांच्या पेक्षा ही जास्त
मोलाची आहे. समजलं." असे म्हणून मी तेथून निघालीच होते. पण मागावून माझ्यावर झडप घालून त्या दोघांनी मला गच्च पकडले. मी त्यांच्या हातून सुटण्याच्या खूप प्रयत्न केला . परंतु त्या दोघांनी ओढतच मला एका रूम मध्ये नेले आणि त्यानंतर त्या लोकांनी माझे हातपाय बांधले आणि दोघे ही भुकेलेल्या लांडग्या सारखे माझ्या अंगावर तुटून पडले. माझ्या शरीराचे त्या दोघांनी लचके तोडले . मी असाह्य अबला नारी त्याचं काहीच करू शकले नाही. किती वेळ तरी माझ्या शरीराशी ते खेळत होते . ते देवच जाणे ! कारण माझी शुध्दी हरपली होती. जेव्हा मी शुध्दीवर आले, तेव्हा मला जाणवले की जाताना त्या लांडग्यानी माझा एक हात मुक्त केला होता आणि मग मी स्वतःच्या हातांनी हात पाय सोडले .बाजुलाच पडलेले कपडे अंगावर चढविले. त्यानी माझ्या उशा जवळ काही नोटा ठेवल्या होत्या. त्यांना पाहताच मला त्या नोटांचा तिटकारा आला . कारण या नोटांसाठी मी आज माझं सर्वस्व घालून बसले . पण लगेचच एक विचार माझ्या मनात आला. या पैशातून त्या दोघांसाठी आपण कफन खरेदी करू. बस्स ! निर्णय ठरला. मी बाहेर आली तेव्हा हॉटेलचा मॅनेजर मिश्किलपणे माझ्याकडे पाहून हसत होता . मला त्याचा भयंकर राग आला. जवळ असलेल्या सोडा वॉटरची बाटली उचलली आणि त्याच्या डोक्यातच घातली. त्याचे डोके फुटले आणि बाटलीही फुटली. फुटलेल्या बाटलीचे ते एक टोकदार हिस्सा पकडून मी त्याला म्हणाले ," बोल, कुठे आहेत ते दोघे ? मरण्याच्या भीतीने त्याने मला सांगितले की ते बाजूच्या खोलीत झोपले आहेत म्हणून. मग मी त्याच्याकडे त्या रूमची किल्ली मागितली आणि त्याने ती निमूटपणे दिली आणि मी ती किल्ली घेतली आणि त्या रुममध्ये गेली. ज्या रुम ते दोघे मस्त आरामात झोपलेले होते. बाजूलाच टेबलावर एका डिश मध्ये काही सफरचंद आणि एक चाकू सुद्धा होता . मी तो चाकू उचलला आणि सपासप दोघांच्याही पोटात वार केले. आणि तेथून फरार झाली आणि सरळ माझ्या रूमवर आली. आणि एका बॅगेत माझे सर्व कपडे भरले नि तेथून ही निघाली. रस्त्यावर आली. तेवढ्यात समोरून पोलिसांची जीप येताना मला दिसली. लगेच मी एका झाडाच्या आडोशाला उभी राहिली. जशी पोलिसांची जीप पुढे गेली तसा मी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि मी पुढे निघाली .सर्वात प्रथम मला वेषांतर करणे जरुरीचे होते म्हणून मी एका कपड्याच्या दुकानात शिरली नि एका मुसलमान तरुणीचा काळा पोशाख खरेदी केला आणि मी घातलेल्या कपड्यावरच तो काळा गाऊन घातला आणि तोंडावर काळा बुरका ओढून घेतला नि प्रथम रेल्वे स्टेशन गाठले. परंतु तेथे माझ्या आधी पोलीस पोहोचले होते. मी वेषांतर केले होते तरी ही पोलिसांसमोर जाण्याची माझी हिंम्मत झाली नाही. मी तेथून मागे फिरली नि मग बस स्थानक वर आली. तेथे ही मला पोलीस दिसले. याचा अर्थ पोलिसांनी पूर्ण शहराची नाकाबंदी केली होती. मग मी तेथून ही मागे फिरली आणि सरळ रस्त्याने चालू लागली. परंतु हा
रस्ता कोठे जातोय ते ठाऊक नव्हते आणि कोठे जावे हेही सुचत नव्हते. म्हणून पाय नेतील त्या दिशेला चालली होती.
देवधर
आम्ही दोघे शिवाजीनगर रेल्वे टेशन वर उतरलो. स्थानकाच्या बाहेर येताच आम्ही एक रिक्षा केली. प्रथम एका हॉटेल वर गेलो तेथे मी सिंगल बेड असलेले दोन रुम बुक केल्या. प्रवासाचा थोडासा शीण घालवावा , म्हणून पलंगावर आडवा झालो आणि लगेच निद्रादेवतेच्या स्वाधीन झालो. अचानक जाग आली. बाहेर काहीतरी लोकांचा गदारोळ चालू होता, म्हणून उठून बाहेर आलो . समोर पाहतोय तर इन्स्पेक्टर विशाल सावंत आपले एक खास पोलीस पथक घेऊन पुण्याच्या पोलिसा सोबत येथे आलेला. काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी मी एका मनुष्याला विचारले ," काय भानगड आहे ही , आणि इथं पोलीस कशासाठी आले आहेत ? " तेव्हा तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला ," पोलीस पकडायला आले आहेत."
" कुणाला ?"
" एका मुलीला त्या मुलीने दोन माणसांचा खून केला आणि त्या हॉटेल हॉटेलचे मॅनेजरला ही तिने जखमी केले. आणि ती मुलगी आपल्याच या हॉटेलमध्ये १११ नंबर रूम मध्ये राहात होती." तो मनुष्य म्हणाला. त्या मी त्याला विचारले ," मग सापडली का ती तिथं ? "
" कुठली सापडते ती ? " तो मनुष्य हसून म्हणाला ," पोलीस येण्याची वाट पाहत बसेल का ती अजूनही ? ती कधीच फरार झाली ,पोलिसांच्या हातावर तुरी देऊन." किंचित थांबून तो पुढे म्हणाला ," नाहीतरी पोलीस अपराध
घडून गेल्यानंतरच सर्वांच्या मागून येतात. कसे सापडणार गुन्हेगार त्याना ? " असे म्हणून तो स्वतःशीच हसला आणि तिथून निघून गेला . मला समजायला जरासा ही वेळ लागला नाही की ती मुलगी दुसरी कोणी नसुन अलकाच असावी. म्हणजे माझा संशय खरा ठरला तर. तिच्या शोधार्थ इन्स्पेक्टर विशाल सावंत खास पोलीस पथक घेऊन आला होता इथं. म्हणजे मी पहाटे इथं आलो, तेव्हा अलका इथेच होती. या हॉटेलमध्ये . ...... इतक्या जवळ येऊन ही मी तिला भेटू शकलो नाही. किती अभाग्यी आहे मी . मी पुन्हा आपल्या खोलीत येऊन बसलो होतो. बरे झाले . मी रेल्वे ने पुण्याला आलो ते. जर स्वतःची कार घेउन आलो असतो. तर माझी कार पाहून पोलिसांना नक्की संशय घेतला असता माझ्यावर. मी इथे कशाला आलो वगैरे . काय सांगणार होतो मी त्यांना . तसे बिजनेस टूर्र साठी आलो म्हणून सांगता आले असते त्यांना. पण तरी देखील त्याने डाऊट खाल्लाच असता. नाहीतरी सुतावरून स्वर्ग गाठण्याची सवय आहेच त्यांना. असे म्हणून मी आपल्या रुम मध्ये जायला वळलो होतो तेवढ्यात मला मानसी आईची आठवण झाली म्हटलं, मानसी आई उठली का ते पाहू ? असा विचार करून मी ती झोपलेल्या रुमचा दरवाजा ठोठावला. पण आईने दरवाजा उघडला नाही. मला वाटलं प्रवासाने थकून आलीय तेव्हा गाढ झोप लागली असेल तिला. झोपू दे थोड्या वेळ तिला. असा विचार करून मी माझ्या रुम मध्ये पुन्हा येऊन बसलो होतो. प्रवासाच्या अजून शीण अजून गेला नव्हता. डोळे ही दुखत होते माझे आणि डोके बधीर झाले सारखे वाटत होते. वाटले थोडासा आराम करावा. असा विचार करून पुन्हा बेडवर लवंडलो आणि थोड्याच वेळात निद्रादेवते ने माझ्यावर ताबा मिळविला.
अलका उर्फ शिरीन
पोलिसांनी तर पूर्ण पुणे शहराची नाकाबंदी केली होती. पुण्याच्या बाहेर जाणे शक्यच नव्हते. मी हायवेवर उभी राहून हात दाखवून लिफ्ट मागू लागली. पण कुणीही हायवे वर गाडी थांबवायला तयार नाही. तेवढ्यात एक कार येताना मला दिसली. तशी मी त्यांना एक विशिष्ट खूण केली. तशी त्याने कार थांबविली. मी पुढील दरवाजा उघडून आंत बसली. तशी कार पुढे निघाली. मागील सीटवर एक कपल बसले होते. मला समजायला जरासाही अवधी लागला नाही की माझा मुस्लिम पेहराव असल्यानेच त्यांनी लिफ्ट दिली असावी . पुढे चेक नाक्यावर पोलीस गाड्यांची झडती घेत असलेले मला दिसले . माझ्या पायाखालची जमीन सरकल्याचा मला भास झाला. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला आता काय करावे ? असा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. तेवढ्यात एक मन म्हणाले की पळून जावे इथून. पण लगेच मनात दुसरा विचार आला की , पळून पळून पळणार कुठं ? आणि इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण पकडले जाऊ. त्यापेक्षा निर्भयपणे पोलिसांच्या समोर जाऊ. बाकी सर्व नशिबावर
सोडून देऊ. आजपर्यंत जशी नशिबाने साथ पुरवली, तशी पुढेही साथ पुरविल. असा विचार करून मी तशीच बसून राहिली. थोड्या वेळाने आमचा नंबर आला तसा मागच्या सीटवर बसलेल्या पुरुषांने आपल्या बाजूची काच खाली करून विचारले ," काय झाले साहेब ? कशाची चेंकिंग सुरू आहे ?" तेव्हा कॉन्स्टेबल फोटो दाखवत म्हणाला ," या मुलीला पाहिलंत का कुठं रस्त्यामध्ये ? म्हणजे लिफ्ट मागताना ?" माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. जर त्या
पुरुषांने माझ्याकडे बोट केले तर आपला खेळ खल्लास ! पण त्यांनी " नाही साहेब. " म्हणताच माझ्या जीवात जीव आला. पण त्या पुरुष व्यक्तीं ने त्या कॉन्स्टेबल ला विचारले
की , काय केले त्या बाई ने ?" त्यावर तो कॉन्स्टेबल बोलला ," अहो , ह्या बये ने दोन बिझनेसमन माणसांचा खून केला आणि एका हॉटेल च्या मॅनेजर ला जखमी केले नि तेथून फरार झाली आहे. त्यासाठी झडती सुरू आहे." आता मी समजून गेले की हा तो माझं नाव नक्कीच सांगेल." हा
विचार मनात येताच माझ्या अंगाचा नुस्ता थरकाप झाला.
काय घडतंय ते कुणास ठाऊक ? मी मनातल्या मनात देवाचा
धावा करू लागले. तेवढ्यात एका आमदाराची मोटार तेथून
आली. त्या गाडीला रस्ता मोकळा करून देण्यासाठी आमच्या गाडीला त्याने लवकर हटवायला सांगितले. मी सुटली एकदाची त्याच्या तावडीतून. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. थोड्या वेळा नंतर आमची मोटार
खंडाळा घाट उतरू लागली. अचानक काय झाले कुणास
ठाऊक ? मोटार चालक मागे वळून म्हणाला ," शेटजी मोटार का ब्रेक नादुरुस्त झाला. " असे म्हणताच सर्वांच्या चेहऱ्यावर
काळमृत्यू चे सावट समोर दिसू लागले. त्या माणसाची
बायको तर घाबरून ओरडलीच .या अल्ला रहम कर, जान
बक्स दे हम सबकी !" माझ्या डोळ्यासमोर तर अंधार पसरला. एका संकटातून बाहेर पडत न पडतेे तोच दुसरे संकट लगेच तयार. आज दैवाने काय माझी परीक्षा घ्यायचीच ठरविली आहे की काय ? ते कोण जाणे .आता या संकटातून स्वतःला कसे वाचवावे याचा विचार मी करू लागले होते. एवढ्यात तो ड्रायव्हर म्हणाला ," अभी परवरदिगार का नाम लो और एक एक करके नीचे खूद जाओ . बस यही एक तरीका है जान बचान का ,मग तो
माझ्याकडे पाहत म्हणाला ,"मोतरमा आप भी खुद जाईए अगर अपनी जान बचानी है तो , मग मी मागचा पुढचा विचार न करता दरवाजा उघडला आणि स्वतःला झोकून दिले बाहेर. तेवढाच पाठीमागे मोठा आवाज झाला. काय झाले ते मलाही कळले नाही. कारण त्यावेळी माझी शुद्ध हरपली होती.
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा