Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाकाल १०

महाकाल १०
महाकाल १०


    दुसऱ्या दिवशी खरोखरच सौंदर्या घर सोडून आपल्या
आईच्या घरी निघून गेली तेव्हा तिच्या आईने तिला विचारले की , सौंदर्या , तू आज अचानक ....?"

  
    " मला माहित आहे,तुला काय विचारायचं आहे ते. पण
आता मी काही सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये. थोडा मला रेस्ट घेऊ दे, मग सांगते तुला सर्वकाही !" त्यावर तिची आई तिला काहीच बोलली नाही. ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली. तश्या त्या समजल्या की हिच्या
सासरी नक्कीच काहीतरी झाले असावे. लगेच काही
सांगणार नाही. थोडा वेळ जाऊ दे, मग विचारू तिला
काय झालं ते. असा विचार करून त्या गप्प राहिल्या.
सौंदर्या सरळ आपल्या बेडरूम मध्ये गेली नि बेडवर
पडून बिस्तर मध्ये नाक खुपसून मुसमुसत होती. थोड्या
वेळाने तिची आई सुशीला बाई तिच्या खोलीत आल्या
नि बेडवर तिच्या शेजारी बसल्या नि वात्सल्याने तिच्या
डोक्यावरून हात फिरवत विचारू लागल्या की काय
झालं बाळ ? " तशी ती उठली नि आपल्या आईला
बिलगली. थोड्या वेळाने तिने आपल्या आईला संपूर्ण
सविस्तर हकीकत सांगितली. ते ऐकून त्या म्हणाली,
   " त्याची ही हिंम्मत ? त्याला मी तांत्रिक महाराज
समोरच उभा करतो बघ."
   " त्याची काय गरज नाही मम्मी त्या तांत्रिकानेच हा
उपाय त्याला सांगितला."
   " होय काय मग मी त्या तांत्रिका लाच विचारते. माझ्या
पोरीचा संसार मोडतो म्हणजे काय ?"
   " अगं मम्मी विवेक मला घटस्फोट द्यायचे म्हणतोय त्याचं मला नाही वाटलं ; पण त्याने माझ्या बाळाला अनौरस म्हटलं त्याचं मला फार वाईट वाटलं."
    " अगं हो, पण तांत्रिक च्या सांगण्या वरूनच त्यानं असं
म्हटलं असेल. एक काम करू आजच आपण त्या तांत्रिका
कडे जाऊ ?"
    " अगं मम्मी कशाला ?"
   " कशाला म्हणजे ? त्याला त्याचा जाब नको का विचारायला ?"
   " त्यानं काय होणार आहे आता ?"
   " असं का केलं त्याने  ते तर कळेल आपल्याला."
  सौंदर्याच्या मनात तांत्रिकाकडे जायची अजिबात इच्छा
नव्हती. पण नाईलाजाने शेवटी जाण्यास तयार झाली. दुपारचे जेवणे झाल्यानंतर थोडा आराम केला नि चार वाजता ती दोघी माय लेकी तांत्रिकाकडे जायला निघाले. जेव्हा ते तांत्रिकाच्या गुहेत पोहोचले तेव्हा त्या दोघी
मायलेकीना पाहून तांत्रिक महाराज एकदम खुश होत
म्हणाले," या आईसाहेब, मी आपलीच वाट पाहत होतो."  त्या दोघी मायलेकीना त्याचं फार मोठे आश्चर्य वाटले.
      " काय ? आपण आमची वाट पाहत होता ? पण
आपल्या कसं कळलं की आम्ही आपल्या कडे येणार
आहोत ते."
    " आम्ही त्रिकालदर्शी आहोत आईसाहेब ? आम्हांला
सर्वकाही न सांगताच समजतं. आता तुम्ही आमच्या कडे
कशासाठी आला आहात, तेही आम्हाला माहीत आहे."
    " कशासाठी आलोय आम्ही ते सांगा बरं."
   " तुमच्या मुलीला तुमचा जावई घटस्फोट देणार आहे,
आणि त्याला हा उपाय मीच सुचविला आहे. तो का सुचविला हेच विचारायला आला असाल ना ?"
    " हो.अगदी बरोबर , आता मला हे सांगा, असं सांगण्या
मागचे कार काय ?"
     " तुमच्या मुलीच्या भल्यासाठीच."
    "  त्यात माझ्या मुलीचे काय भलं आहे ते सांगा बरं."
   " तुमच्या मुलीच्या पोटात जे बाळ ते सुखरूप जन्माला
यावे अशी तुमची पण इच्छा आहे ना ?"
     " हां पण त्यासाठी घटस्फोट घ्यायला कशाला पाहिजे ?" सुशीला बाई ने विचारले.
    " तुम्हांला माहीत नाहीये की तुमच्या मुलीची सासू किती कजाक बाई आहे ती ...तिने काही दिवसांपूर्वी काय केलं माहीत आहे का तुम्हांला ?"
   " ते मला कसं माहीत असणार ?"
   " तुमच्या मुलीला विचारून पहा."
   " काय केलं गं तुझ्या सासूनं ?" सुशीला बाईंनी आपल्या
मुलीकडे पाहत तिला विचारले.परंतु तिला काही सांगता
येईना. तेव्हा तांत्रिक महाराज आठवण करून देत म्हणाला, " आठव जरा सौंदर्या ?" असं म्हणताच ती
विचारात पडलेली दिसली. तेव्हा तांत्रिकच म्हणाला की
तुझ्या सासूबाई ने दुसऱ्या तांत्रिकाला तुझ्या घरी आणलं नव्हतं का ? "  असं विचारताच सौंदर्याला त्या दिवसाचा तो भयानक प्रसंग  आठवला. तशी ती लगेच म्हणाली," हो मम्मी ! ही खरी गोष्ट आहे."
   " आता त्या दिवशी काय घडलं ते पण सांग बरं."
   " काय घडलं गं त्या दिवशी ?"सुशीला बाईंनी लगेच
आपल्या लेकीला घाबरून विचारले. तेव्हा सौंदर्या ने
त्या दिवशी घडलेली इत्थंभूत सविस्तर माहिती आपल्या आईला दिली. ते ऐकून सुशीला बाईंच्या अंगावर काटाच उभा राहिला. त्या कापऱ्या आवाजात म्हणाल्या," म्हणजे तो महाकाल माझ्या मुलीचा पिच्छा सोडणारच नाही तर !"
    " त्यासाठी एकच उपाय आहे."
    " कोणता महाराज ?"
   " तुम्ही आपल्या मुलीचं लग्न माझ्या सारख्या एका
तांत्रिकाशीच करा, कारण महाकाल एक तांत्रिक होता.
अर्थात त्याच्याशी सामना करण्यासाठी माझ्या सारख्या
एका तांत्रिकाचीच गरज आहे."
   " समजा माझ्या मुलीचे लग्न तुम्ही सांगता त्या प्रमाणे
जर  एका तांत्रिकाशी केलं तर माझ्या मुलीचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा प्राण तर वाचेल ना ?"  असं
विचारताच त्याला काय बोलावे हे भान न राहून चट्कन
बोलून गेला. की, अहो प्राण वाचेल म्हणजे काय ? ती
सारी जबाबदारी माझीच असेल ना ?" पण चूक द्यानात
येताच तो म्हणाला," मला म्हणायचंय की ती सारी जबाबदारी त्या तांत्रिकाचीच असेल जो तांत्रिक तुमच्या मुलीशी लग्न करेल."
   " पण असा तांत्रिक शोधायचा कुठं ?"
   " शोधायला कशाला हवा ? तुमच्या समोर तर उभा आहे."
  " काय म्हणालात ?"
  " क्षमा असावी. मी चुकून बोललो, मला म्हणायचं होतं
की आपली हरकत नसेल तर मी स्वतः तुमच्या मुलींशी
लग्न कारायला तयार आहे."
    " माझ्या एकदम मनातलं बोललात बघा तुम्ही.मी सुध्दा
हाच विचारत होते. पण तुम्हीच बोललात ते बरं झालं."
    " नाही पण एकवेळ आपल्या मुलीला पण विचारून पहा. मी तिला नवरा म्हणून पसंद आहे का ते."
   तश्या सुशीला बाई म्हणाल्या," तिचा नकार असण्याचे
कारणच नाही.कारण तिची नि तिच्या मुलाची सुरक्षा तुमच्या पेक्षा अन्य कुणी चांगल्या प्रकारे करू शकणार नाहीये. मागच्या वेळी पण तुम्हीच त्या महाकाल पासून
माझ्या मुलीची रक्षा केली होती म्हणून या पुढे ही तिच्या
नि तिच्या बाळाच्या सुरक्षेतेची सारी जबाबदारी तुम्हीच ती स्वीकारावी अशी माझी इच्छा आहे." ते ऐकून तांत्रिक मनातून फार खुश झाला ; परंतु तसे न दाखविता तो म्हणाला," ते जरी खरं असलं तरी मला सौंदर्याची मर्जी जाणून घ्यायची आहे. तेव्हा सौंदर्या ने स्वतः सांगावे. ती माझ्याशी लग्न करण्यास तयार आहे किंवा नाही." तेव्हा राधाबाई म्हणाल्या, " काय गं काय म्हणणं आहे तुझं."
    " आई ,मला थोडा विचार करावा लागेल."
    " ठीक आहे, हवा तेवढा वेळ घ्या. पण मला तुझा निर्णय लवकर सांग. म्हणजे मला त्या प्रमाणे पुढचा निर्णय घ्यायला बरं पडेल."
   " म्हणजे ? मला समजलं नाही."
   " सौंदर्या लग्नास तयार झाली तर हा व्यवसाय सोडायला लागेल मला."
    " तो का बरं ?"
    " संसारात पडल्यानंतर हा व्यवसाय करून कसं बरं चालेल.? म्हणजे सौंदर्या ला देखील तांत्रिक नवरा आवडणार नाही ना ? म्हणून सुध्दा नोकरी करायची म्हणतोय ?"
   " ते ठीक आहे हो, पण तुम्ही  हा व्यवसाय सोडला तर माझ्या मुलीची नि तिच्या बाळाची सुरक्षा कशी करणार ?"
   " त्यासाठी तर मी अनुष्ठानाला बसणार आहे. ते अनुष्ठान
पूर्ण झालं की तो महाकाल तिचं काहीच वाकडं करू शकणार नाही."
   " अगं विचार कसला करतेस ? तुझ्यासाठी नि तुझ्या
बाळासाठी अनुष्ठानाला बसणार आहेत. असं कोण करतं का कुणासाठी ? तेव्हा नीट विचार कर तुझं कल्याण कशामध्ये आहे ते.एकदा संधी हुकली की ती पुन्हा मिळणार नाही." सौंदर्या ने विचार  केला की  काय करावं ?
ह्याला नाही म्हणावे का हो म्हणावे ? जर ह्याला आपण
नाही म्हटलं तर हा काही सुरक्षेतेची जबाबदारी स्वीकारणार नाही.आणि ह्याने जर आपली सुरक्षा केली
नाही तर आपल्या बाळाच्या जीवाला धोका आहे.आपलं
बाळ जर आपल्याला हवं असेल तर ह्याच्याशी लग्न करावेच  लागेल आपल्याला.मग काय करावे ? ह्याच्याशी
लग्न करण्या व्यतिरिक्त अन्य पर्याय आहे का आपल्या
जवळ ? शिवाय अजय अगदीच काही वाईट नाही.तरुण
आहे, शिवाय त्याचं आपल्या वर फार प्रेम आहे, त्याचं
प्रेम आज-काल च नाहीतर लहानपणापासूनचे आहे. मला
वाटतं हो म्हणायला हरकत नाही." असा विचार करून
ती स्पष्टपणे म्हणाली, मी तुमच्याशी लग्न करण्यास तयार आहे, परंतु मी अशी तुमच्या सोबत गुहेत राहणार नाहीये."
    " मला तरी कुठं आवडतं गुहेत राहायला ? " असा म्हणणार होता. पण जसे त्याच्या लक्षात येते तसा तो
आपली जीभ चावली नि म्हटलं," मला म्हणायचं होतं की
मी तुझ्या इच्छेखातर हा तांत्रिक वेष सोडून सामान्य
माणसा प्रमाणे तुझ्या सोबत येऊन राहीन. मग तर तुला
काही प्रॉब्लेम नाहीये ना ?" त्यावर सौंदर्या म्हणाली," तुम्ही
हा वेश सोडायला तयार असाल तर माझी काहीच हरकत
नाही."
    " ठीक आहे,तू अगोदर तुझ्या नवऱ्या पासून घटस्फोट
घे. तोपर्यंत माझ्या काही साधना अपूर्ण आहेत ते पूर्ण
करून घेतो. कमीत कमीत सहा महिने तरी लागतील."
    " काही हरकत नाही, मला ही घटस्फोट मिळायला
सहा महिने लागतील. मग आपण करू लग्न. परंतु मला
एक विचारायचं आहे."
   " अवश्य विचार."
   " माझ्या होणाऱ्या बाळाला आपलं नाव देणार ना ?"
   " म्हणजे काय , हे काय विचारने झाले !  तू एकदा माझी
झालीस की तुझं सर्वकाही माझंच की !"
    " मग ठीक आहे." असे म्हणून सौंदर्या त्या तांत्रिकाच्या
पाया पडते. तश्या सुशीला बाई सुध्दा त्याच्या पायी
पडण्यासाठी खाली वाकतात. तसे त्याना रोखत तांत्रिक
अजय म्हणाला ," अहो आईसाहेब हे तुम्ही काय करता ? मुलाच्या पाया पडतं का कोणी ? म्हणजे मला म्हणायचं आहे की आपण माझ्या आता सासूबाई होणार आहात, शिवाय आम्ही तुम्हाला आईसाहेब उगाच म्हणत नाही. आम्ही आपल्याला आमच्या आई सारखेच मानतो बरं."
    त्यानंतर त्या मायलेकी तेथून निघाल्या. त्यांच्या पाठमोरी आकृती कडे पाहून स्मित हास्य केले.
  
   विवेक ने लवकरच घटस्फोटाचे पेपर तयार करून सौंदर्याच्या घरी येऊन त्या पेपर वर सौंदर्याच्या सह्या
घेतल्या आणि कोर्टात केस दाखल केली. कोर्टाने दोघांना
पण सहा महिने एकत्र राहण्या विषयी फर्मावले. परंतु
सौंदर्या ने सहा महिने एकत्र राहण्यास ही नकार दिला.
परंतु शेवटी कोर्टाच्या म्हणण्यानुसार सहा महिने तिला
विवेकच्या घरी राहावे लागले. सहा महिन्यानंतर मात्र
त्या दोघांना घटस्फोट मिळाला. नऊ महिने पूर्ण झाल्याने
सौंदर्याला एका सुंदर पुत्र रत्नाचा लाभ झाला. मनोहरराव
आणि सुशीला बाई ह्यांना फार अत्यानंद झाला. त्यावेळी
अजय पण इस्पितळात उपस्थित होता. त्याने त्या बाळाला
असे उचलून घेतले नि जणू ते बाळ त्याचेच आहे. ते पाहून
सौंदर्या ला वाटले की आपली निवड चुकली नाही. त्यानंतर
नामकरण विधी फार मोठ्या थाटामाटात पार पडला.
लवकरच सौंदर्या आणि अजय चा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. अजय ने तिला जेव्हा आपल्या
मिठीत घेतले तेव्हा त्याचा तो स्पर्श तिला एकदम ओळखीचा वाटला. परंतु त्यावेळी ती काही बोलली नाही. काही दिवसानंतर मात्र तिने अजयला विचारले ," तुम्हांला एक विचारू ?"
    " अवश्य विचार."
    " महाकाल कोण होता ते मला समजलं आहे फक्त
तुमच्या कडून ऐकायचं आहे."
    " तुझा संशय खरा आहे, परंतु तू कसे ओळखलेस."
   " स्पर्शाने ! तुमचा आणि त्याचा स्पर्श एकच आहे."
   " अगदी बरोबर. समंध ही मीच आणि महाकाल ही मीच
होतो."
    " मला एक सांगा. तुम्ही विवेकच्या शरीरात कसे प्रवेश
करायचे ? नि शरीरातून काळी सावली बाहेर पडायची
ती कशी काय ? म्हणजे ही क्रिया कसे करायचे तुम्ही ?"
    " त्याचं काय आहे, मी महाकाल ला ठार मारल्यामुळे
वेताळ मला प्रसन्न झाले नि त्यांनी मला वर मागण्यास
सांगितला तेव्हा मी म्हणालो की महाकाल च्या सर्व शक्ती
मला प्राप्त व्हावात ! असे मी म्हटलं." तेव्हा त्यांनी मला विचारले की तू त्या शक्तीचा दुरुपयोग करणार नाहीस ना ?" तेव्हा मी म्हटलं की, नाही " तेव्हा त्यांनी तथास्तु म्हटलं."
    " परंतु तुम्ही तर तुमच्या शक्तीचा दुरुपयोग केला ना ?"
    " कुठं केला मी दुरुपयोग ? तुला मी जबरदस्तीच्या
जोरावर हासिल नाही केले. तर तुझ्या मर्जीने तुझ्याशी लग्न केले."
   " हो; पण लग्ना अगोदर मूल जन्माला घातलं त्याचं काय ?"
  " ते तुझ्या नवऱ्याच्या म्हणजे विवेकच्या मदतीने केले.
म्हणजे शरीर त्याचं. आणि आत्मा माझा."
    " ते कसे केलेत ते सांगा."
    " त्या शक्ती ला परकाया शक्ती असे म्हणतात. त्या शक्तीच्या द्वारे कुणाच्या ही शरीरात प्रवेश करता येते
अथवा एखाद्याचा प्राण काढून दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर
करता येतो. कारण मी एक तांत्रिक आहे तेव्हा मला सर्वकाही शक्य आहे. फक्त माणसाला जिवंत करू शकत
नाही.कारण ती शक्ती केवळ ईश्वराकडेच आहे."
    " आणि मला काळी आकृती दिसायची ते सारं काय
होतं."
   " तांत्रिक लोकांनी काही भुतांना वश केलेले असते. ती
भुतं आम्ही सांगू ती कामे करतात.अर्थात माझ्या आदेशानुसार ते भूत तुला काळी आकृतीच्या स्वरूपात दिसायचं. कारण तुला ती काळी आकृती दिसली नसती
तर  तुझा विश्वास तरी कसा बसला असता ? "
   " म्हणजे हे सर्व मला प्राप्त करण्यासाठी तुम्ही केलेलं
प्लॅन होतं. होय ना ?"
    " हां ! आता तुझ्या पासून मी काहीही लपवून ठेवू
इच्छित नाही म्हणून सांगतोय की हे सारे तुझ्यासाठीच केलं मी "
   " तुम्हाला असं नाही वाटत का ? की  तुम्ही जे केलं ते
फार चुकीचे होते."
  " माहितेय मला मी जे केलं ते फार चुकीचे केलं ; परंतु आपलं प्रेम प्राप्त करण्यासाठी मला हे सर्व करावं लागलं. कारण प्रेम आणि युद्धामध्ये सर्वकाही क्षम्य असतं. हो की नाही ?"
    " करेक्ट !" सौंदर्या हसून म्हणाली.

    समाप्त



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..