Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र २८

कुरुक्षेत्र २८
कुरुक्षेत्र २८

 

                                 क्रिश

     मी आणि रमा दोघ ही एका रेस्टॉरंट मध्ये चहा पीत बसलो होतो . त्याच वेळी आमच्या पाठीमागच्या बाकावर दोन व्यक्ती बोलत होते .त्यांचा आवाज मला ओळखीचा वाटला. म्हणून मी मागे वळून पाहिले. तेव्हा माझ्या अंदाज खरा ठरला . ते दुसरी कोणी नसुन धीरज कल्याण आणि त्याची रिकाम टेकडे  दोस्त गप्पा मारत बसले होते. ते  कुणालातरी धडा शिकविण्यात बद्दल बोलत होते.म्हणून मी ध्यान देऊन त्यांचे बोलणे ऐकू लागलो होतो. बोलता बोलता त्यांनी दामिनीच्या नावाचा उल्लेख केला. तसा  मी जास्तच लक्ष देऊन लागलो. दामिनी माझी मानलेली बहीण होती ; परंतु तिची माया माझ्या सख्ख्या बहिणी पेक्षा ही माझ्यावर जास्त होती रमाने मला  विचारले ," काय झाले म्हणून ?" मी देखील तिला खुणेनेच गप्प राहण्यास सांगितले. एकंदरीत तिला बदनाम करण्याचा विचार होता त्यांचा. म्हणून  मी हळूच माझ्या मोबाईल फोन ऑन करून त्या मध्ये सर्वांचा आवाज रेकॉर्डिंग करून घेऊ लागलो होतो. त्यांची संपुर्ण  योजना मी ऐकूनही घेतली नि आवाज रेकॉर्डिंग करून घेतली.
       त्यानंतर ते सर्वजण उठले आणि तिथून बाहेर पडले. मग मी आणि रमा दोघे ही उठलो. मी हॉटेलच्या बाहेर पडलो. तेव्हा रमाने मला विचारले ," आता सांग. काय बोलत होते ते
लोक ?"
     "  त्यांनी मोठा कट रचला आहे ; पण तो मी सफल होऊ देणार नाही. "
      " तू कशाला पडतोस त्याच्यामध्ये ?"
      " अगं माझ्या बहिणीच्या इभ्रतीचा प्रश्न आहे हा."
      "  सुमनच्या ?"
      " सुमनच्या नाही गं , दामिनी माझी मानलेली बहीण."
      " तिचं  काय करणार आहेत ते ?"
      "  ते नंतर सांगतो पण तू आधी  एक काम कर ."
      " कोणतं ?"
      " तू आताच्या आता माझ्या घरी जा ."
      " आणि काय करू ?"
      "  आमच्या घराच्या समोर बिल्डिंगमध्ये दामिनी राहते. पहिल्या माळ्यावर. तिला भेट आणि सांग मला ताबडतोब भेटायला."
      "  आणि तू कुठे जातोस  आता ?"
      "  मला एक जरुरी काम आहे, ते करतो आणि मी पण येतो घरी."
     "  अरे, पण तुझ्याकडे मोबाईल आहे ना , फोन करून सांग ना तिला ."
      "  मोबाईल चार्ज नव्हता केला. स्विच ऑफ झालाय तो."
      "   मग माझ्या मोबाईल वरून  कर ना ?"
      " आण  इकडे ?"
      " रमा ने आपला  मोबाईल माझ्या हातात दिला. मी त्यात दामिनीचा नंबर डायल केला ; परंतु फोन लागेच ना कव्हर क्षेत्राच्या बाहेर आहे. असा त्यावरुन मॅसेज येऊ लागला . मग मी तिला म्हणालो ," तिचा फोन लागत नाहीये. तू तिच्या घरी जाऊन सांग. " रमा  म्हणाली ," बरं." ती जशी निघून गेली. तसा मी अमर भेटायला त्याच्या कॉलेजात गेलो ; पण तो कॉलेजात न आल्याचे कळले .म्हणून मग मी फोनवर त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागलो . परंतु त्याचा फोन लागेना. म्हणून मी त्याच्या घरी गेलो पण तो घरात नव्हता . मित्रासोबत हिंदी चित्रपट पाहायला गेला होता .म्हणून मला वाटले दामिनी पण असेल त्याच्या बरोबर . म्हणून मी माझ्या घरी जायला निघालो. रस्त्या मध्येच रमा भेटली. माझ्याकडे तिचा फोन  राहिला होता.  तो मोबाईल घ्यायला आली होती. मी तिला विचारले ,"  सांगितले काय  दामिनीला ?"
    " ती घरी नाहीये."
    "  मग ?"
    "  कॉलेजात गेलीय.  अशी तिची आई म्हणालीय."
     मी समजलो या दोघांनी  कॉलेजात दांडी मारलीय आणि चित्रपट पाहायला गेले होते.

                              धिरज
  
   मी आणि कल्याण दोघेही पप्पांच्या ऑफिस मध्ये पार्ट टाईम काम करत होतो तरी पुढील शिक्षण सुरूच ठेवले होते. आणि कल्याण ने सुध्दा आता आमच्याच कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले होते आणि त्याच बरोबर दामीनीला मी धडा शिकविण्याचा बेत केला. कारण तिने माझा तर अपमान केलाच पण माझ्या मित्राचा सुध्दा तिने अपमान केला. त्या
गोष्टीचा आम्हां दोघानाही सुड घ्यायचाच होता. म्हणून मी
सर्वाना रेस्टॉरंट मध्ये बोलविले आणि  मी बनविलेली योजना
सर्वाना ऐकविली आणि  प्रत्येकाला प्रत्येकाचे काम समजावून दिले की , कुणी काय करायचे आहे ते. आम्ही सारे दबा धरून बसलो. ती कधी  एकटीच बाहेर येते याची वाट पाहत होतो. थोड्या वेळाने दामिनी सौचालय मध्ये जाण्यासाठी बाहेर आली. मी त्याच संधीची वाट पाहत होतो.  ती जशी सौचालय मध्ये  शिरली. तसा मी ही तिच्यापाठोपाठ आंत शिरलो. ती आतून दरवाजा बंद करणार होतीच तेवढ्यात मी जोर लावून दरवाजा उघडला आणि आंत शिरलो. ती रागाने मला म्हणाली ," हा काय चावटपणा आहे ? अगोदर दरवाजा उघड." त्यावर मी म्हणालो ," आता दरवाजा तेव्हाच उघडेल. जेव्हा तुझी सारी इज्जत मातीमोल होईल."  तेव्हा ती घाबरली आणि म्हणाली मला गयावया करत  म्हणाली ,
      " मला बेअब्रू करू नको सोड मला."
      तेव्हा मी म्हणालो ," मी  तुला स्पर्श सुद्धा करणार नाही.
पण इथून जेव्हा तू बाहेर पडशील तेव्हा तुझी इज्जत .... इज्जत राहणार नाही." तेव्हा ती फारच घाबरली आणि गयावया करत  म्हणाली ," मला बदनाम करू नको. प्लिज... पाया पडते मी तुझ्या." मी हसून म्हणालो ," पाया देवाच्या पडायचं असतं आणि मी देव नाही. हां पण देवांचा भाऊ राक्षस आहे आणि राक्षस कुणावर दया करत नाही. हां पण एक काम  करू शकतेस."
     " कोणतं ?" तिने विचारले. तेव्हा मी म्हणाली ," श्रीकृष्ण
देवांचा धावा कर. कदाचित तो तुझी मदत करायला येईल.
जशी त्याने द्रौपदी ची अब्रू वाचविली होती." तेवढ्यात दुसरी
मुलगी वाशरून मध्ये जाण्यासाठी तेथे येते. तिला पाहताच
माझा एक मित्र पँटीची चैन लावण्याचे नाटक करत सौचालयातून बाहेर पडतो. जाताना दुसऱ्याला खूण करून जातो. दरवाजाच्या बाहेर कल्याण उभा असतो .दरवाजा ठोठावून आंत मध्ये धीरजला  संकेत देतो की काम फत्य झाले म्हणून , आणि तो देखील तेथून निसटला . ती मुलगी
धावतच वर्गात शिरली नि ओरडून सर्वाना सांगितले की लेडीज सौचालयात जेन्ट्स शिरलेत म्हणून. तसे शिक्षक ,स्टुडन्ट सर्वच येतात तिथं आणि आवाज देतात की , आंत मध्ये कुणी आहे त्यांनी बाहेर या." मी दरवाजा उघडून बाहेर आलो आणि माझ्या मागोमाग दामिनी बाहेर आली.
      " बाई बाई ही तर बेशर्म पणाची हद्द झाली. " कीर्ती मॅडम
म्हणाल्या. प्रोफेसर राणे सर म्हणाले ," धीरज काय प्रकार
आहे हा ?" मी म्हणालो ," सर , माझा काही दोष नाही. दामिनीने मला स्वत: बोलविले होते." ती अजूनही लटलट कापत होती. अजुनही तिच्या मनावरची भीती दूर झाली
नव्हती. ती रडतच म्हणाली ," सर , हा खोटे बोलतोय. मला
बदनाम करण्यासाठी. " तेव्हा मी त्यांना माझ्या गालावरची
लिप्टिक दाखविली. म्हणालो ," सर , मी जर खोटं बोलत असेन तर हिच्या ओठांची लिप्टिक माझ्या गालावर कशी
उमटली. हे विचारा तिला ." तेव्हा प्रोफेसर राणे सर म्हणाले,
      " दामिनी काय म्हणतोय हा ,?"
      ती अगदी जिव तोडून सांगत होती की हे सर्व खोटे आहे. आणि खोटे ही होते ते. पण विश्वास कोण ठेवणार ?
पण तेवढ्यात तेथे क्रिश आला आणि त्याने सारा गेमच
बदलून टाकला. तो कुठं लपला होता हे कुणालाच ठाऊक
नाही. त्याच्या मोबाईल मध्ये संपूर्ण रेकॉर्डिंग होते. त्याने ते राणे सरांना दाखविले आणि राणे सरांनी ते मान्य ही केले.
पण त्यांनी विचारले की ,  परंतु तुम्हाला कसे कळाले ? की
इथं हे असं नाटक होणार आहे म्हणून ?" तेव्हा क्रिश म्हणाला," सर , काल संध्याकाळी धीरज आणि त्याचे मित्र
एका रेस्टॉरंट मध्ये बसून योजना बनवत होते. तेव्हा मी ही तिथंच होतो. तेव्हा ह्यांचा सारा प्लॅन ऐकले होते नि रेकार्डिग
सुध्दा मी केले होते. हे बघा." असे बोलून त्याने आम्ही केलेले
संभाषण त्यांना ऐकविले. ते ऐकल्या नंतर राणे सरांची पूर्ण
खात्रीच झाली की हा सर्व माझा डाव होता म्हणून. तेव्हा प्रोफेसर राणे सर म्हणाले ," तुम्हाला अगोदरच ह्यांचे प्लॅन
समजले होते तर तुम्ही अगोदरच ह्यांना सावध का केलं नाही.?"  तेव्हा क्रिश बोलला ," तेच सांगण्यासाठी मी ह्यांच्या घरी सुध्दा गेलो होतो. परंतु हे दोघेही भेटले नाहीत घरी."
      " घरी भेटले नाहीत ? "
      " हो ."
      " इथं कॉलेज मध्ये उपस्थित नाही. घरी नाही. मग हे
दोघेजण गेले होते कुठं ?" राणे सरांनी विचारले.
       " आम्ही दोघे चित्रपट पाहायला थिएटरमध्ये गेलो होतो." अमर बोलला. प्रोफेसर राणे पोलिसांना फोन करतात.
थोड्या वेळाने तेथे पोलीस येतात. तेव्हा प्रोफेसर राणे
मला आणि त्याच्या मित्रांना विनयभंग च्या आरोपाला खाली अटक करून न्यायला लावतात. मी लगेच आमच्या वकिलाला फोन केला नि पोलीस स्टेशनला बोलावून घेतले.
वकील आम्हाला जामीन देऊन सोडवून आणतो.
  क्रिश मुळे आमचा गेम फसला होता. मला भयंकर चीड आली. क्रिश ची पण इलाज नव्हता. क्रिश रुपात श्रीकृष्ण तर
आला नाही ना ? असा ही एक विचार माझ्या मनात येऊन गेला.

                             क्रिश

  अमर आणि दामिनी दोघेही माझे आभार मानत होते ; पण मला मात्र त्यात एवढे मोठे काही  शौर्य केले असे काही  वाटत नव्हते. परंतु मी  त्या दोघांवर ही चिडलो. नि  म्हणालो,   
      " काय रे तुमच्या दोघांच्या मोबाईल ला काय झाले ?
एवढे सारे तुम्हा दोघांना कॉल केले पण  एका चा ही फोन लागेल तर शपथ. " तेव्हा अमर बोलला," अरे माझा मोबाईल पाण्यात पडला तो दुरुस्ती साठी मोबाईलच्या दुकान टाकलाय. "
     " आणि  तुझा गं ?" मी दामिनी ला विचारले.  त्यावर ती मला म्हणाली ,"  माझा मोबाईल कालच क्लासरूम  मध्ये चोरीला गेलाय." तेव्हा माझ्या द्यानात आले की,सारे काम योजनाबद्ध केले गेलंय. ऐनवेळी दामिनी कुणाची मदत
मागू नये. हा त्या मागचा उद्देश होता. दामिनी तर खूप
घाबरली होती. परंतु तिच्या डोळ्यात कृतज्ञता मला जाणवली.  ती मला म्हणाली ," आज देवा सारखा धावून आलास बघ आणि आज माझी तू लाज राखलीस. नाहीतर
जगाला तोंड दाखवायला सुध्दा जागा राहणार नव्हती मला."
    तेव्हा मी तिला म्हणालो ," एवढे मनाला लावून घेऊ नकोस. जोपर्यंत देवाची मर्जी त्यात सामील नसेल तोपर्यंत
कुणी ही आणि किती ही प्रयत्न केले तरी काही ही बिघडणार नाही कुणाचे." तेव्हा अमर ने मला विचारले ,"  ते खरं रे, पण तू  कसा नेमका पोचलास तिथं ?" तेव्हा मी उत्तरलो ,"  नेमका कुठे त्यांनी योजना बनविली त्या त्या वेळा पासून मी त्याच्या मार्गावरच  आहे , तुझा फोन लागत नव्हता. मी तुझ्या घरी सुद्धा गेलो होतो पण तू सुध्दा मला भेटला नाहीस. रमा ला  दामीनीच्या घरी पाठविले होते. पण ती सुद्धा भेटली नाही घरी. मग मी त्यांच्या पाठलागावरच होतो . दामिनीच्या मागोमाग धीरज  जसा सौचानालया मध्ये शिरला. तसा  मी ही त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे जेन्ट्स  शौचालयातून भिंतीवर चढलो. पण त्या कुणाचाही  माझ्याकडे  लक्ष गेला नाही  आणि मी भिंतीवरून सारे शुटिंग  केले. त्यावर दामिनी  म्हणाली ," म्हणूनच आज माझी लाज राखलीस. आज  खऱ्या अर्थाने तू माझा भाऊ होण्याचे कर्तव्य निभावलेस."  तेव्हा मी तिला म्हणालो ,"   अगं मी नसतो आलो तर  दुसरा कुणी तरी आला असता. परमेश्वर कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येऊन मदत करतोच की  पण आपण ते समजू शकत नाही. नाहीतर मला सांग . त्यांनी योजना तयार होत होती त्याचवेळी मी नेमका तेथे हजर  होतो याला कारण काय ?  त्यावर अमर मला म्हणाला ,"  कारण काही असो ; पण तू आज महान कार्य केलेस  त्याची तोड नाहीये. तेव्हा दामिनी अमरला उद्देशून म्हणाली ,"  तू घरच्यांना घेऊन कधी येतोयेस माझ्या घरी."
     "  कशाला गं ? " अमर ने विचारले.
     " कशाला म्हणजे , आपले लग्न ठरवायला हवे ."
     " अगं पण माझ्या अगोदरच्या मोठ्या भावांचे लग्न तर व्हायला हवे ना ? "
     " पण आपण ठरवून  ठेवायला काय हरकत आहे ?"
     " अगं  पण का ? तुझा विश्वास नाही का माझ्यावर ?"     त्यावर ती त्याला   समजावत म्हणाली ,"  प्रश्न विश्वासाचा नाहीये . तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण परिस्थितीवर नाहीये . आज जे घडलं ते जर पुन्हा घडले तर मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये." तेव्हा मी तिची समजूत काढत म्हणालो , "  तसे पुन्हा  होण्याची शक्यता नाहीये. तू  अजिबात चिंता  करू नकोस. तो पुन्हा अशी आगळीक करण्याचा प्रयत्नही करणार नाहीये." तरी तिची भीती काही दूर होई ना , तेव्हा तिला अमर  म्हणाला,"  ठीक आहे मी आजच  डॅडीशी बोलतो या संदर्भात. मग तर झाले." त्यावर ती एकदम खुश झाली. आम्ही तर घडलेल्या
प्रसंगाची कुठेच वाच्छता.केली नाही. तरी देखील दामिनी च्या
आईला कसे कळे कुणास ठाऊक ? का दामिनी ने सांगितले ते माहित नाही. त्या आमच्या घरी येऊन मला म्हणाल्या ," फार उपकार झालेत बघ तुझें आमच्यावर. बहुतेक मागील जन्मात काहीतरी  ऋणानुबंध असतील तुझे नि आमचे , म्हणून देवासारखा धावून आलास माझ्या मुलीच्या रक्षणासाठी ! नाहीतर आज विष खाऊन मरायची पाळी आली होती आमच्यावर. केवळ तुझ्यामुळे ती आली नाही इतकच काही. तेव्हा मी त्यांना म्हणालो की , तुम्ही अजिबात चिंता करू नका. देव तारी त्याला कोण मारी. माणूस मात्र निमित्ताला  कारणीभूत असतो. बाकी त्या लिलाधरची लिला असते . त्याबद्दल वाद नाही ." असे मी म्हटले तसे   त्यांनी  वर पाहत  देवाला हात जोडले.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..