वंशवेल -४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंशवेल -४ |
कांताबाई जेव्हा जास्तच हट्टाला पेटली तेव्हा पुरुषोत्तम
उद्गारले ," प्रतीक्षा जेव्हा उपवर होऊन तिचे लग्न होईल तेव्हाच दत्तक मुलाचा मी विचार करीन. तोपर्यंत धीर धर."
जशी प्रतीक्षा मोठी झली तशी ती त्यांच्या मागे लागली.की आता प्रतीक्षा उपवर झाली. तिचे आता लग्न करा. "
कारण प्रतीक्षा आता २२ वर्षाची झाली. पदवीधर पर्यंत शिक्षण झाले होते तिचे. त्यामुळे तिच्या शिक्षणानुसार तिला
पदवीधर झालेलाच मुलगा हवा असा तिचा हट्ट होता. आणि
आज काल क्वचितच मुलं पदवीधर होतात. नाहीतर H.H.c. झाली की लगेच टेक्निकल डिप्लोमा करून सरळ नोकरी
पकडतात. त्यामुळे पदवीधर होण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. त्यामुळे लग्नाच्या वेळी प्रॉब्लेम होतो. कारण आजकाल मुलीचे शिक्षण जास्त असते. साहजिकच त्यांची इच्छा असते. आपल्या पेक्षा जास्त अथवा आपल्या एवढा तरी नवरा मुलगा शिकलेला असावा. त्यामुळे होते काय पदवीधर झालेला मुलगा मिळत नाही मग मुलीचे लग्न रकडते. आणि वय होऊन गेले की तिला स्थळं यायची बंद होतात. मग घोड नवरी होते. आणि एकदा का वय वाढलं की मग ती कुणा बरोबर पण लग्न करायला तयार असली तरी नवरा मुलगा मिळत नाही. तेव्हा कमी शिकलेली मुले सुद्धा तिच्या बरोबर लग्न करायला तयार होत नाहीत. आणि कुणी झालाच तयार तर तिच्या बापाकडे हुंडा मागतो. म्हणजे पैसे वगैरे नाही ,टू व्हीलर नाहीतर फोर व्हीलर किंवा
दहा तोळे सोने. वगैरे ...आता मला सांगा सोन्याचा भाव कमी आहे का ? ज्याची परिस्थिती बेताचीच असेल तो कुठून देणार हे सर्व ? काही जणांना शक्य असते ते कसेतरी नवऱ्या मुलाची मांगनी पूर्ण करतात.
एकंदरीत काय शिक्षण घ्यावे की न घ्यावे असाही प्रश्न निर्माण होतो. शिवाय असे पण नाही मुलगी कमी शिकलेली चालेल. स्वता कमी शिकलेला असला तरी चालेल परंतु मुलगी मात्र जास्त शिकलेली पाहिजे शिवाय सर्व्हिस करत असलेली पाहिजे. शिवाय घरचे काम देखील तिनेच करायला
हवे. अशा अटी असतात नवरे मंडळींच्या. त्यामुळे
काही मुलींची लग्नच होत नाहीत.
पूर्वी तरी बरं होतं चूल आणि मूल हीच कामे होती स्त्रियांना , परंतु आता चूल आणि मूल तर सांभाळायचंच आहे ; परंतु त्याच बरोबर सर्व्हिसला पण जायचंय आणि संध्याकाळी कामावरून सुटल्यावर गाडीतून धक्के खात
घरी यायचं मग कपडे वशिंग मध्ये टाका. सकाळची बेसिंग मध्ये भांडी पडलेली घासा नि मग स्वयंपाकाला लागा.
स्वयंपाक झाला की जेवण पुन्हा भांडी घासा. म्हणजे एकंदरीत स्त्रियांना हे पडले कितीला ? परंतु त्याकडे कुणाचे
लक्ष नाही. असो.
प्रतीक्षा वय वाढत चालले होते परंतु तिचे लग्न काही जुळत नव्हते. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी तिची
पण ही अवस्था काय करावे ? हा प्रश्न तिच्या वडिलांना पडला. स्थळ शोधता - शोधता एक स्थळ सापडले. त्याचे वय
जास्तच होते म्हणा. परंतु तिच्या वयाला अनुसरून होते.
तिचे होते २९ वर्षे तर त्याचे वय होते ३६ वय असावे. पेशाने वकील होता. त्याने सुद्धा आधी करियर करण्याच्या नादात लग्न लांबणीवर टाकले. शेवटी वय वाढल्या मुळे मुलीचे स्थळ
भेटत नव्हते. शेवटी दोघांचा योग जुळून आला नि झाले एकदाचे लग्न. मुलगी सासरी गेल्यानंतर आई- वडिलांना थोडेसे समाधान मिळते म्हणा. वरपक्षा कडील मंडळी चांगली असेल तर ठीकच आहे, नाहीतर मुलीला सासरच्या मंडळी कडून जाच होत असेल तर आई-वडिलांच्या जीवाला घोर असतोच म्हणा. परंतु त्यावेळी सासरच्या मंडळीला हे कळत नाही की आपल्या घरी सुध्दा मुलगी आहे, तिला देखील तिच्या सासरच्या मंडळीने असा त्रास दिला तर आपल्याला कसे वाटेल हा विचार देखील त्यांच्या मनाला शिवत नाही. म्हणूनच की काय म्हटलंय की घरोघरी मातीच्याच चुली ! "
ह्यांना जावई चांगला मिळाला . हे एका अर्थी चांगलेच झाले म्हणा. पण असे समाधान प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांच्या वाट्याला येतेच असे मात्र नाहीये. प्रतीक्षा संसार
सुखाचा सुरू झाला. हे त्यातल्या त्यात विशेष म्हणायला हवे
आहे. प्रतिक्षाचे लग्न झाल्यानंतर कांताबाई मात्र आता हट्टालाच पेटली .म्हणाली , तुमच्या मुलीचे लग्न ही झाले. आता दत्तक मूल घ्याच. शेवटी नाही होय करता करता त्यांनी होकार दिला नि अनाथालय मधून एक पाच वर्षांचा दत्तक मुलगा घेतला. मिराबाई म्हणाली,
" तिच्या वाट्याची प्रॉपर्टी फक्त लिहून द्या. माझ्या वाट्याची
प्रॉपर्टी माझ्या नंतर माझ्या मुलीला मिळेल. "
पुरुषोत्तम आंबेरकर ने तिच्या वाट्याला येणारा हिस्सा फक्त लिहून दिला . कारण अनाथालय वाले दत्तक मूल असे देत नाहीत. त्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी लिहून द्यावी लागते तेव्हाच दत्तक मूल देतात. मुलगा घेऊन आले. त्याचे नाव ठेवले कुंज ! कुंज लहान होता तेव्हा व्यवस्थित होता, परंतु
आईच्या अति लाडाने फार बिघडून गेला. शाळेत दांड्या मारणे , गृहपाठ पूर्ण न करणे, शाळेतील मुलाच्या कळी घरी
आणणे वगैरे त्याचे सुरू होते. शेजारीण बाई कधी तक्रार
घेऊन आली तर ही आपल्या मुलाचा पक्ष घेई , म्हणे माझा
मुलगा किती गुणांचा आहे, तुमच्याच मुलाने माझ्या मुलाची खोड काढली असेल. आपल्या मुलाला कधीच दम देत नसे.
त्यामुळे जास्तच बिघडत गेला. टपोरी मुलाची त्याने संगत
धरली. नाक्यावर उभे राहून रस्त्यावरुन चालणाऱ्या मुलींची
छेड काढणे इथपर्यंत त्याची मजल गेली. बाप त्याला काही
रीतीचे बोलायला गेला तर मध्ये कांताबाई पडायची. आणि ती नेहमी आपल्या मुलाची बाजू घेत असे. जाऊ दे गेला तर , करू दे केलं तर ! अशी ती नेहमी म्हणायची. त्यावर ते म्हणायचे की अगं त्याला आताच शिस्त लावली नाही तर तो फार वाया जाईल." त्यावर ती म्हणायची की, काही वाया बिया जात नाही. तुमचा नाहीये ना तो म्हणून तुमच्या डोळ्यात सलतोय तो. वगैरे वगैरे....
पुरुषोत्तम आंबेरकर काही कळेना की काय करायचं ते नाका पेक्षा मोती जड अशातला प्रकार झाला. मुलगा काही
बापाचे ऐकेना ! कारण मुलगा झाला जवान आणि ते ६५ वर्षाचे म्हातारे म्हटल्यावर त्यांचे काय चालणार म्हणा. तो त्यांच्याशी फार उद्गत बोलत असे. लहान होता तेव्हा त्यांना तो पप्पा म्हणायचा. परंतु आता सरळ सरळ म्हणतो ,ए म्हाताऱ्या गप्प बैस ! जास्त पिर पिर केलीस ना,तर ठेवून देईन एकच !
त्यामुळे पुरुषोत्तम बिच्चारे त्याला घाबरून राहू लागले.
न जाणो एखादी फाईट ठेवून दिली तर आपण काय करू
शकतो त्याचे ? आणि आता तर तो आपल्या आईला बसवून
ठेवत असे नि बापाला घर काम करायला लावत असे, कपडे
घुणे, भांडी घासणे, जेवण बनविणे सर्व काम तो आपल्या
बापा कडून करून घेत असे. नाही म्हणाले की लगेच त्याना
चाकु काढून दाखवत असे. म्हणे चुपचाप सांगितलेली कामे
करताय का घुसवू पोटात चाकू ? त्याच्या पुढे काही बोलण्याची सोय नव्हती. आता तर त्यांनी कांताबाई कडे
जायचे पण सोडून मोठी कडेच राहात होते. मिराबाई त्याना
म्हणाली ," तुम्ही आता इथून कुठं जायची नाही. तुम्ही माझ्या
पाशीच राहा. मी तुमची पत्नी अजून जिवंत आहे, तुम्हाला
काही काम करण्याची अजिबात गरज नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा