|
यह इश्क नहीं आसान १२ |
सलीम ला वाटले की , आपण जे केलं ते योग्यच केलं भले थोडे दिवस निलोफर आपल्याशी राग राग करेल परंतु एक ना एक दिवस तिला माझा स्वीकार करावाच लागेल.पण निलोफर ने कोर्टात आपल्या विरुद्ध खटला दाखल केला तर ! असा विचार मनात
येताच त्याचे मन एक अनामिक भयाने थरथर कापले.
क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर कोर्ट आणि आरोपी
पिंजऱ्यात स्वतः उभा आहे, नि सरकारी वकीलाने
आपल्याला अपराधी ठरवून सात वर्षाचा तुरुंगवासाची
शिक्षा ठोठावली.हे ऐकताच त्याचे मन एकदम भीती ने
थरथर कापले.नाही नाही मी काही नाही केलं.असा मोठ्या ने ओरडला तसा तो भानावर आला की आपण
स्वप्न पाहत आहोत ह्याची त्याला जाणीव झाली.तसा
तो स्वतःशीच उद्गारला," नुसत्या स्वप्नाने आपली ही अवस्था झाली तर प्रत्यक्षात जर असं घडलं तर आपलं
काय होईल.असा विचार मनात येताच तो स्वतःशीच
उद्गारला," छे छे छे असं कदापि होता कामा नये.मग त्या
साठी आपल्याला काय करावे लागेल.? क्षणभर विचारमग्न झाला. लगेच त्याच्या दुसऱ्या मनाने उत्तर
दिलं की तिची तू माफी माग. कारण माफी हा शब्द
फार छोटा असला तरी काम मात्र फार मोठे करतो हं !
कायपण चुकीचे काम करा नि त्याची लगेच माफी मागा.
माफी मिळालीच म्हणून समजा.म्हणून आपल्याला सुध्दा
माफी या शस्त्राचा वापर करायला हवा.म्हणजे मनापासून जरी माफी मागायची नसेल तर माफी मागण्याचे नाटक तर करू शकतोच ना ?आणि हा एक
चांगला उपाय आहे पहा.माफी मागणारा नाटक करतोय
का खरं बोलतोय हे देखील कळत नाही.म्हणूनच असं
म्हटलं असावं की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. विचार करून तो उठला नि आपल्या बेडरूम मधून बाहेर पडला नि तिच्या बेडरूम गेला तेव्हा ती आरश्या समोर उभी राहून ती स्वतःला न्याहाळत असते.तोच सलीम चे प्रतिबिंब तिला त्या आरश्यात दिसते.क्षणापूर्वी तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य गायब होऊन ती जागा क्रोधाने घेतली नि मागे वळून त्याला म्हणाली ," तू आलास परत
इतकं सारं होऊन.तुला लाज कशाची नाहीच. होय ना ?"
" लाज आहे म्हणून तर तुझी माफी मागायला आलोय मी !"
" खरं सांगतोस का ?"
" हो अगदी खरं !"
" पण आता मागून काय होणार आहे, जे झालं त्यात काही बदल होणार आहे का आता ?"
" बदल नाही होणार हे माहितेय मला. परंतु माफी
मागितल्याने अल्लाह पण क्षमा करतो तर तू पण मला
माफ करावे अशी माझी विनंती आहे तुला."
" ठीक आहे, पण यापुढे लक्षात ठेवायचं माझ्या समोर
तर नाहीच यायचे नि जवळपास ही यायचे नाही."
" नाही येणार पण तू माझ्या विरुध्द कोर्टात खटला
तर दाखल करणार नाही ना ?"
" अगर तुमने मुझे दिया हुआ वादा निभाया तो मैं भी
सोच लूँगी, फिर हाल तुम अपना वादा किस तरह निभाते
हो इसपर डिफेंड हैं , चलो अब जाओ यहाँसे । " सलीम
चुपचाप निघून गेला तिकडून.तो गेल्यावर तिने रुद्राला
फोन केला नि सविस्तर सांगितले. तेव्हा रुद्र म्हणाला,
" म्हणजे त्याची खात्री झाली तर ! की त्याच्याकडून
अपराध घडला म्हणून."
" हो तर !"
" मग आता पुढे काय करायचं ठरविलं आहेस."
" पुढे त्याला स्वतःला वाटेल की झक मारली नि
निलोफर शी निकाह केला.आणि शेवटी वैतागून तो
स्वतःच मला तलाक देईल.आणि खऱ्या अर्थाने तोच
आपल्या दोघांच्या मिलनाचा दिवस असेल.बरं ठेवते
आता फोन." असे म्हणून फोन कट केला.
एक महिनाचा कालावधी लोटला.अचानक एके
दिवशी निलोफर ला उलट्या होऊ लागल्या.त्याचा अर्थ
सर्वांनी एकच लावला की निलोफर प्रेग्नेंट आहे.त्यामुळे
सर्वजण खुश झाले.सर्वात खुश सलीम झाला होता. आता निलोफर आपल्या बाळाची आई होणार ? अर्थात तिला एक ना एक दिवस आपला स्वीकार करावाच लागेल. यासाठी खुश होता. परंतु निलोफर च्या मनात त्यावेळी दुसराच विचार सुरू होता. निलोफर चेकप साठी इस्पितळात जायला निघाली. तसा सलीम म्हणाला ," मी पण येतो तुझ्या सोबत." तसा जळजळीत तिरफा कटाक्ष तिने त्याच्याकडे टाकला.तसा तो चट्कन म्हणाला," बरं बरं तू जा एकटीच !" त्याच्या ह्या वागण्याचा अर्थ मात्र अनवर आणि जफर खान ला कळला नाही.पण त्यावेळी ते दोघेही गप्प राहिले.कारण त्यांना झालेल्या आनंदात
विरजण नव्हते घालवायचे. निलोफर एकटीच गेली
इस्पितळात पण तिथं रुद्र तिची वाट पाहत असल्याचा
दिसला.डॉक्टर ने तिची तपासणी केली नि सांगितले की
तू प्रेग्नेंट आहेस." तेव्हा तिला विचार पडला की आता
काय करायचं ? तिने ही गोष्ट रुद्राला सांगितली. तेव्हा
रुद्र म्हणाला ," हे बाळ आपल्याला नकोय, कारण हे
बाळ आपल्या पुढील कामात अडसर बनेल."
" मग काय करायचं म्हणतोस ?"
" गर्भपात कर."
" काय ? आपल्या बाळाचा जीव घ्यायला सांगतोस."
" बाळ अजून तयार झालं नाहीये फक्त संचार झाला
आहे म्हणून इतक्यातच त्याला दूर करणे योग्य आहे.
नंतर ते अशक्य आहे."
" खरं मला माझ्या बाळाला मारायचं नव्हतं.परंतु माझा
उद्देश पूर्ण करण्या करता ह्याचा जीव घ्यावाच लागेल मला." असे म्हणून ती डॉक्टराना म्हणाली," डॉक्टर आम्हाला हे मूल नकोय."
" का नकोय ?"
" आमचं बाळ अजून छोटं आहे. म्हणून आम्हाला
इतक्यात मूल नकोय."
" मग लागलीच कॉपर टी बसवून घ्या.म्हणजे जेव्हा
तुम्हाला वाटेल की आता आपल्याला मूल हवंय ते कॉपर
टी काढून टाकायची."
" पण त्याने काही त्रास नाही होणार नाही ना ?"
" नाही.काही त्रास होणार नाही.फक्त नियमाचे पालन
करायचे म्हणजे ?"
" म्हणजे ?"
" म्हणजे अधून मधून तपासणी करून घ्यायची म्हणजे माहीत पडते त्रास कशामुळे होतोय."
" मग ठीक आहे, बसवून टाका कॉपर टी !"
" आंत जाऊन बसा." असे म्हणून डॉक्टरानी स्पेशालिस्ट बोलविले नि गर्भपात करून घेतला नि कॉपर टी पण बसवून दिली. त्यानंतर रुद्राने तिला तिच्या घराच्या जरा दूर आणून सोडले.नि विचारले," आता इथून
जाशील ना ?" तिने होकारार्थी मान डोलावली.तसा रुद्र
म्हणाला," आणि हां स्वत:ची काळजी घे.आणि तसाच
काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन कर." असे म्हणून
रुद्राने रिक्षावाल्याला म्हणाला ," चल पुढे."
प्रेमचं लग्न ठरलं नि लवकरच झाले सुध्दा प्रेम च्या
पत्नीचं नाव होतं प्रिती .....प्रिती दिसायला फार सुंदर
होती, गोरीपान, केस कंबरेपर्यंत लांबसडक होते. चालताना तिचे केस तिच्या नितंबावर पडत असत. तिचा स्वभाव पण फार प्रेमळ होता.त्यामुळे दुर्गाबाई फार खुश
होत्या. प्रेम ने वेदांत ची ओळख करून देताना प्रिती ला
सांगितले की दादा आणि वहिनी ची ही आखरी निशाणी
आहे, नि आपल्या दोघांना ह्याला आई-बापाचं प्रेम द्यायचे
आहे." तेव्हा प्रिती ने विचारले," ह्याची आई आय मिन
आपली वहिनी आता ह्या जगात नाहीये का ?"
" असं नको म्हणुस माझी वहिनी ह्या जगात ही आहे
नि सुखरुप पण आहेत."
" मग आता आहेत कुठं त्या ? म्हणजे आपल्या लग्नात पण उपस्थित नव्हत्या त्या. म्हणून विचारते.
" ती फार मोठी कहाणी आहे,सवड असेल तेव्हा कधीतरी ऐकविन मी ती तुला.आता फक्त इतकंच द्यानात
ठेवायचं की वेदांत ची काळजी आपल्याला घ्यायची आहे." त्यावर प्रिती म्हणाली," ठीक आहे , मी वेदांत ला
त्याच्या आईची कमी भासू देणार नाहीये." असे म्हणून
तिने आपले दोन्ही हात पसरून म्हणाली," बाळा माझ्या
जवळ ये." असे म्हणताच वेदांत ने एक नजर आपल्या
बापाकडे पाहिले तसा रुद्र म्हणाला," काकी बोलावते
आहे, ना मग विचार कसला करतोस , जा ना काकी कडे." असे म्हणताच जणू त्याला रुद्राची भाषा समजली
नि तो प्रिती कडे झेपावला.मग प्रिती ने त्याला घेतले
नि त्याच्या गालाचा गोड गोड पापा घेतला.
निलोफर घरी आल्यानंतर सायरा ने विचारले की
काय सांगितले डॉक्टर ने ? त्यावर निलोफर म्हणाली,
" मला दिवस गेले होते, पण ....?"
" पण काय ?" तिच्या आई ने घाबरून विचारले.
" मला इतक्यात मूल नकोय म्हणून.....?" बोलता
बोलता मध्ये थांबली.तसे सायरा ने विचारले," म्हणून
काय ?" निलोफर उत्तरली," मी गर्भपात करून आली."
" काय ?" एकदम धक्का बसल्यागत म्हणाल्या," अगं
काय करून आलीस तू ?"
" आई, तू अजिबात चिंता करू नकोस.मी काय
केलं ते पूर्ण विचार करूनच केलं आहे."
" आता सासू-सासऱ्या ला काय सांगशील ?"
" मी काय सांगायचं ते सांगेन.तू मात्र कुणाला काही
सांगू नकोस बाकी मी बघते काय करायचं ते." असे
निलोफर उठली नि आपल्या घरी गेली.तेव्हा सासूबाई ने
म्हणजे शबाना ने विचारले की , डॉक्टर काय सांगितलं ?" निलोफर ने खोटेच सांगितले की मी आई होणार म्हणून.तिला फार आनंद झाला.ही गोष्ट जेव्हा सलीम ला
कळली तेव्हा त्याचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.
तो तडक तिच्या बेडरूम मध्ये आला नि तिला म्हणाला,
" खरं तर मी तुझ्या बेडरूम मध्ये येणार नव्हतो, परंतु
अम्मी ने जी खुशखबर दिली.ती ऐकून मी स्वतःला रोखू
शकलो नाही मी निलोफर.तू माझ्या मुलाची आई होणार
हे ऐकून मला फार आनंद झाला बघ."
" पण हा आनंद फार दिवस ठिकायचा नाही बघ."
" म्हणजे ? काय करणार आहेस तू ? माझ्या मुलाचा
जीव तर घेणार नाहीस ना ?"
" जरूरत पडली तर ते पण करायला मी माग पुढं पाहणार नाहीये !"
" तू आई आहेस का डायन."
" दोन्ही !"
" काय बोलतेस ते कळतंय का तुला ?"
" मला तर कळलं पण तुला अजून कळलं नाही याचंच
वाईट वाटतंय."
" निलू बघ तुला एक सांगतो जर का तू माझ्या होणाऱ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या
सारखा वाईट नाही कुणी दुसरा ."
" ते तू कशाला सांगायला पाहिजेस मला माहित आहे
ते.तुझा सारखा वाईट नाहीच आहे कुणी दुसरा."
" तरी पण हिंम्मत करतेस माझ्या बाळाचा जीव घेण्याचा."
" ते बाळ केवळ तुझं असतं तर त्याला कधीच संपवलं
असतं पण ते बाळ माझं पण आहे ना, म्हणून गप्प आहे
मी." निलोफर उद्गारली.
" एवढं मानतेस ना, ते बाळ आपल्या दोघांचे आहे."
" तुला जर तुझं बाळ हवं असेल तर यापुढे तू माझ्या
बेडरूम मध्ये यायचं नाही."
" ठीक आहे, नाही येणार, परंतु मला ही तुझ्या कडून
एक वचन हवंय की तू माझ्या बाळाच्या जीवाला काही
घोका होईल असं तू काही करणारं नाहीस."
" एकदा सांगितले ना, ते बाळ माझं पण आहे,मी त्याला माझ्याकडून तर काही होऊ देणार नाही, परंतु
नियती लाच ते नको हवं असेल तर ?"
" नियतीचा इथं काय संबंध ?"
" संबंध कसा नाही, नियतीचा तर हा खेळ आहे सारा."
" तू एक मुस्लिम असून असं म्हणतेस ? आपल्या
धर्मात अल्लाहच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही विधाता नाहीये."
" हेच तर तुला माहीत नाही ना, अल्लाह सुध्दा नियतीच्या कामात कधी हस्तक्षेप करत नाही.जाऊ दे
तुला सांगून त्याचा काही उपयोग नाहीये.उपडी घागरीवर
कितीही पाणी ओतले तरी त्याचा काहीही उपयोग नाहीये."
" हे बघ तू स्वतःहून काही करू नकोस, बाकी मी पाहीन काय करायचं ते.येतो मी ." असे म्हणून तो तेथून
चालता झाला.त्यावर निलोफर कुत्सित पणे हसून म्हणाली," तू फक्त स्वप्नं पाहत बैस.कारण स्वप्ने कधी पूर्ण
होत नसतात. जे पोटातच नाही ते बाहेर तरी कोठून येणार म्हणा ? पण ते तुला कळायला अजून वेळ आहे.
आणि जेव्हा ते तुला कळेल तेव्हा तुझ्या पाया खालील
जमीनच सरकेल आणि तेव्हा तुझ्या मुखातून आपोआपच तलाक तलाक शब्द बाहेर पडतील.आणि तो क्षण खऱ्या अर्थाने तो दिवसच माझ्यासाठी आनंद
व्यक्त करण्याचा असेल." असे म्हणून स्मित हास्य करते.
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा