यह इश्क नहीं आसान ११( अमर प्रेम)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
यह इश्क नहीं आसान ११ |
सलीम कुत्सित पणे हसत रुद्रा जवळ आला नि म्हणाला,
" आखिर तुम्हारे बीवी को मैंने अपना बेगम बना ही दिया अब वह तेरे पास कभी नहीं आएगी, जानते है क्यों ?
नहीं मालूम है तो मैं बताता हूँ हमारे मुस्लिम समाज में तलाक देने का हक सिर्फ शौहर को है बीवी को तलाक देने का हक नहीं है, इसलिए निलोफर चाहकर भी मुझसे तलाक नहीं दे सकती , समझे इसलिए निलोफर को अब हमेशा के लिए भूल जाओ !" त्यावर रुद्र म्हणाला," तुने भले ही निलोफर शी लग्न केलेस परंतु लवकरच तुला
प्रश्चात्ताप होणार आहे त्याचा. म्हणशील उगाचच लग्न केलं मी निलोफर शी !"
" असं होय मग बघतोच मी कोण प्रश्चात्ताप करतोय ते.
मी का तू ?" असे म्हणून निलोफर चा त्याने हात पकडला नि तिला ओढतच घेऊन गेला. त्यानंतर सलीम च्या त्या भाडोत्री गुंडानी त्या सर्वाना सोडले. तेव्हा इब्राहिम म्हणाला," रुद्र बेटा, चिंता करू नकोस. निलोफर शी निकाह जोर जबरदस्तीने केला.अर्थात त्या निकाह ला समाज बिलकुल मान्यता नाहीये. मी हा प्रश्न जमातीत मांडणार आहे."
रुद्र आपल्या घरी आला तेव्हा प्रेम ने विचारले," काय
झालं दादा , वहिनी भेटली का ?"
" हो भेटली."
" काय म्हणत होती ?"
" काय म्हणणार , तिच्या बरोबर जबरदस्तीच्या जोरावर
लग्न केलं." बस दुर्गाबाईंना आयती संधी मिळाली बोलण्याची ! त्या म्हणाल्या ," बघितलेत ना, मी काय म्हणाले होते, तिने लग्न केलं ही असेल , झालं ना खरं माझं."
" आजी मी गेलो नसतो ना, म्हणजे लग्न झालं नसतं
तिचं माझ्यामुळे लग्न करावे लागले तिला ?"
" म्हणजे ?" सर्वांनी एकदम म्हटलं. त्यानंतर रुद्र ने तेथे
घडलेला सारा वृतांत ऐकवीला. तेव्हा सर्वजण खंत व्यक्त
करू लागले तर दुर्गाबाईं म्हणाल्या," मग त्यात काय नवल प्रत्येक स्त्री चं कर्तव्यच असतं ते आपल्या नवऱ्याचा प्राण वाचविने ." परंतु आजीच्या ह्या बोलण्याकडे सर्वांनी दुर्लक्ष
केलं. कारण काही लोकांना सवय असतं की काही झालं
तरी आपलेच म्हणणे खरे करायचे. जर तिने तसे नसतं केलं तर आजी म्हणाली," बघितलेत तिला आपल्या नवऱ्याची किती पर्वा आहे ती , दुसरी कोणी असती तर नवऱ्यासाठी स्वतःचा प्राण ही दिला असता तिने . म्हणजे दोन्हीकडून बोलायचे. अशी असते काही लोकांची सवय. असो.
दुर्गाबाईंनी विचार केला की ही संधी बरी आहे, रुद्राला
लग्न करण्यास भाग पाडण्याची म्हणजे कसं आहे त्याच्या
बायकोने दुसरे लग्न केलं ना, मग आता रुद्राला लग्न करण्यास काहीच हरकत नाही. असा विचार करून त्या
सर्वाना उद्देशून म्हणाल्या," मी काय म्हणते रुद्राच्या
बायकोने दुसरे लग्न केलं ना, आता रुद्राला पण दुसरे
लग्न करायला हरकत नाहीये." तसा रुद्र म्हणाला,
" अजिबात नाही. माझं लग्न एकदा झालंय , दुसरे कदापि लग्न होणार नाहीये."
" मग काय आयुष्यभर पहिल्या बायकोच्या आठवणीतच सारे जीवन घालविणार आहेस की काय ?"
" हां ! कारण निलोफर चे स्थान माझ्या हृदयात आहे,
अन्य कोणाला मी ते स्थान देऊ शकणार नाहीये."
" अरे वेडा आहेस का तू ? असं कुणी करतं का ?
एक बायको मेली की लगेच दुसरी बायको करतात लोक."
" मेली तर ना, माझी बायको जिवंत आहे अजून."
" अरे आता ती दुसऱ्याची झाली. आता ती मेली काय
आणि जिती काय तुझ्या काय उपयोगाची आहे ? म्हणून
तिचा नाद आता सोड नि दुसरे लग्न कर. म्हातारा झाला नाहींयेस अजून."
" नवरा मेला तर बायका आयुष्यभर एकाच नवऱ्याची
बायको बनून राहतात ना ?"
" अरे तो बायकांचा प्रश्न आहे, पुरुषांचा नव्हे ! पुरुषांना दुसरे लग्न करण्याचा अधिकार आहे."
" मग बायकांना तो अधिकार का नाही ? त्यांनी काय
एकाच नवऱ्या वर सारे आयुष्य काढायचं ?"
" अरे ती परंपरा आहे."
" मग ती परंपरा बदलायला पाहिजे."
" ती कोण बदलणार ?"
" कोण बदलणार म्हणजे, आपण बदलायची असते.
दुसरे कुणी येतं का बदलायला ? आपण स्वतःहून पुढे यायला पाहिजे."
" पण मी म्हणते गरज काय त्याची ?"
" गरज कशी नाही ? एकाला एक न्याय दुसऱ्याला
दुसरा न्याय ही काय पद्दत झाली ? अन्याया विरुद्ध आवाज उचलायला पाहिजे."
" हे बघ रुद्र तू म्हणतोस तेवढं सोपं नाहीये ते काम. फार पूर्वीपासून जे चालत आहे ते इतक्या सहजासहजी बदली होणार नाही. म्हणून मी काय सांगते आमचा नाहीतर त्या छोट्या बाळाचा तरी विचार कर , त्या मुलाला
आईचं प्रेम नको आहे का ?"
" आईचं प्रेम फक्त जन्मदात्री आईच देऊ शकते.सावत्र
आई कदापि देऊ शकत नाही ते प्रेम."
" अरे, सगळ्याच सावत्र आई काही वाईट नसतात."
" पण मला विषाची परीक्षा घ्यायचीच नाही ना ? म्हणून
त्या छोट्या मुलाचाच विचार करून सांगतोय की मला
दुसरे लग्न करायचं नाहीये म्हणून."
" ठीक आहे, रहा असाच. आम्ही तुझ्या धाकट्या
भावाचे लग्न करून टाकतो तर !"
" अगदी आनंदाने करा." त्यानंतर प्रेमचं लग्न करायचं ठरलं. त्याच्यासाठी एक मुलगी पाहण्यात आली. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मुली कडच्या मंडळीला
सांगण्यात आले की आम्ही अमुक दिवसाला येतो म्हणून."
निलोफर ने रुद्राला फोन केला नि आपल्या मुलाची चौकशी केली. तिने विचारले," नाव काय ठेवले माझ्या मुलाचे ? " तेव्हा रुद्र म्हणाला," वेदांत ." नाव ऐकून
खुश होत निलोफर म्हणाली ," खूप छान नाव ठेवलंय." तेवढ्यात तिथं सलीम आला. ती कोणाशी तरी बोलतेय
हे पाहून त्याला तिचा संशय आला नि तिच्या हातून फोन खेचून घेतला. मोबाईल च्या स्क्रीन वर रुद्राचे नाव पाहिले नि चिडून म्हणाला," लाज नाही वाटत, लग्न झालं तरी आपल्या यार शी गप्पा मारतेस " तेव्हा निलोफर म्हणाली," तो माझा यार नाही, शौहर आहे."
" अजून शौहर मानतेस त्याला ? मग मी कोण ?"
" माहीत नाही मला." निलोफर एकदम निर्भयपणे म्हणाली. त्यावर सलीम भयंकर चिडला. दोन बोटांमध्ये
तिचे तोंड पकडून म्हणाला की , माहीत नाही की माहीत करून देऊ मी तुला ." असे म्हणून त्याने अगोदर बेडरूम चा दरवाजा आंतून बंद केला. तशी निलोफर ने विचारले,
" दरवाजा का बंद केलास ?" परंतु त्याने तिच्या प्रश्नाचे
उत्तर न देता आपल्या गळ्यातील टाय काढून एका बाजूला
फेकला. त्यानंतर शर्ट काढले. तशी निलोफर समजली की हा काय करू इच्छित आहे, हे लक्षात येताच तिने आपल्या
मनात विरोध जर केला तर हा आपल्यावर जबरदस्ती
करणार , जर ह्याला रोखायचे असेल तर ह्याला दाखवून
द्यायला हवं की मला काहीही फरक पडत नाही. मृत
शरीराशी काही करा काय फरक पडतोय त्या शरीराला ?
असा विचार करून ती म्हणाली, " अच्छा म्हणजे तुला माझ्यावर हक्क गाजवायला आहे तर ! हरकत नाही
तुला माझं शरीरच हवंय ना, तर ते अवश्य घे." असे म्हणून आपल्या खांद्यावरील पदर खाली घेतला. पण त्यातून
तुला प्रेम कदापि मिळणार नाही, कारण त्यातील प्रेम मी रुद्राला कधीच बहाल करून टाकलंय. आता आहे ते फक्त माझं निर्जीव शरीर अर्थात तुला जर निर्जीव शरीराचा
उपभोग घ्यायांचा असेल तर तो अवश्य घे." तेव्हा त्याने विचार केला की नाही. निर्जीव शरीराशी शारीरिक संबंध
करून काय लाभ होणार , कारण प्रेम हे दोन्ही कडून सारखाच प्रतिसाद मिळायला हवा तर ते फुला सारखे
फुलून सुगंध दरवळेल सर्वत्र , आणि तसे जर नसेल तर त्या मिलनाला काहीच अर्थ उरत नाहीये. मृत प्रेता सोबत सेक्स केलं असाच त्याचा अर्थ होईल. असा विचार मनात येताच तो म्हणाला," जोपर्यंत तू स्वतःहून माझ्या जवळ येत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्श सुद्धा करणार नाहीये. परंतु एवढी खात्री जरूर आहे की एक ना एक दिवस मी तुला आपली करीन यात तिळमात्र शंका नाही." असे म्हणून तो जाऊ लागला तेव्हा निलोफर म्हणाली," वो दिन कभी नहीं आएगा , क्योंकि मैं रुद्र की थी, है और हमेशा
रहूंगी ।" असे म्हणताच त्याला भयंकर राग आला. तो म्हणाला," अगर मैं चाहूं वो अब इसी समय तुम्हें हासिल कर सकता हूँ, लेकिन मैं ऐसा करूँगा नहीं बल्कि तुम्हारे फैसले का इंतजार करूँगा । कभी ना कभी तुम्हारा फैसला बदलेगा ही । यह मुझे यकीन हैं ।"
" फिर तो तुम्हे मरते दम तक इंतजार ही करना पड़ेगा ."
" देखते हैं, तुम्हारी जिद जीतती है, या मेरा सब्र फैसला
तो होकर ही रहेगा ।" असे बोलून तिच्या खोलीतून बाहेर
पडला आणि त्याने मित्रांना बार मध्ये बोलवून घेतले.
तिथं त्यांच्या सोबत ड्रिंक केली.तेव्हा त्याच्या एका मित्राने
त्याला विचारले," अरे सलीम आज तो तुम्हारी सुहागरात
थी ना, फिर तुम यहां कैसे ? और ज्यादा उदास भी लग रहा है, क्या बात है यार ?" तेवढ्यात दुसरा मित्र म्हणाला," अरे , दुसरे काय होणार , बायकोने काढलं असेल बेडरूम मधून बाहेर. होय ना,सलीम असेच झालंय ना तुझ्या सोबत ? अब छुपा मत हम तेरे दोस्त है।"
सलीम ला आपल्या मित्रांचा भयंकर राग आला. कारण मित्रांनी सहानुभूती द्यायची असते. पण इथं तर त्याचे मित्र त्याची थट्टा करत आहेत. त्याच्या ओल्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. हे पाहून त्याला अजूनच राग आला. तो दोघांची गचेंडी पकडत म्हणाला," थट्टा कसली करताय साल्यानो ? एकतर मी अपमानाच्या अग्नीत होरपळत आहे, तुम्ही मला सांत्वन देण्या ऐवजी माझ्या ओल्या जखमेवर मीठ चोळायचे काम करत आहात ? "
" तसं नाही यार, तू असा मुळीच गैरसमज करून घेऊ
नकोस.आम्ही तुझ्या ओल्या जसखमेवर मीठ चोळत नसून तुझं नेमकं काय चुकलं याची तुला जाणीव करून
देत आहोत."
" काय चुकलं माझं ?"
" अरे, ती तुझ्यावर प्रेम करत नाहीये, मग तिला आपल्या बेडरूम मधून बाहेर नाही काढेल तर दुसरे
काय करेल ती ?"
" मग तुला काय म्हणायचंय की मी तिच्यावर जबरदस्ती करायला हवी होती ?"
" अर्थात जबरदस्ती केल्याशिवाय ती तुला स्पर्श ही करू देणार नाही."
" अरे पण अशी जबरदस्ती करून काय फायदा , जर
तिथं प्रेमाच्या भावनाच नसतील तर काय उपयोग आहे ?"
" तुला काय वाटतं ती तुझ्यावर प्रेम करेल आणि स्वतःहून तुझा स्वीकार करेल ?"
" हो, तसं झालं तरच ते प्रेम म्हणत येईल ना , जबरदस्तीच्या जोरावर तिला हासिल केलं तर तो बलात्कार नाही का ठरणार ? "
" मग तर तुला आयुष्यभर वाटच पहावी लागेल तिची !"
दुसरा मित्र म्हणाला.
" मग त्यात काय...... पाहीन वाट." सलीम उद्गारला.
" वेडाच आहेस तू , असं करून ती तुला कधीच हासिल
होणार नाहीये. कारण कुठलीही स्त्री पाहिलं प्रेम विसरत नाही कधी ! ती कायम रुद्रावरच प्रेम करत राहील. तुझी
ती कदापि होणार नाही."
" मग काय करू म्हणतोस ?"
" जे मागून मिळत नाहीत तर जबरदस्तीने मिळवायचं
असतं." तिसरा मित्र म्हणाला.
" म्हणजे तुला म्हणायचंय की मी तिच्यावर जबदस्ती
करूं ?"
" त्यात जबरदस्ती कसली तू शौहर आहेस तिचा, अर्थात तुला तो पूर्ण अधिकार आहे." मुबारक म्हणाला.
" अरे पण ती मेलेल्या मुडद्या सारखी नुसती पडून
राहणार, तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही.
अश्या मध्ये मला सेक्स ची मजा काय येणार, उलट ते मला असं वाटेल की मी आपल्या बेगम शी शाररिक संबंध करत नसून एका प्रेताशी करत आहे. मला नाही आवडणार ते. मला कसं पाहिजे माहितेय तिने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे सेक्स मध्ये तर ना खरी मजा येईल."
" मग यासाठी एक उपाय करावा लागेल."
" कोणता ? सांग पटकन ." सलीम अधीरतेने म्हणाला.
तसे त्याच्या कानात सांगितले. ते ऐकून सलीम म्हणाला,
" ही चिटिंग नाही का होणार ? "
" अरे , प्रेम आणि युद्धामध्ये सर्वकाही क्षम्य आहे. आणि जोपर्यंत तू तिच्या बरोबर शाररिक संबंध प्रस्थापित करत नाहीस तोपर्यंत ती तुझी पत्नी म्हणून सिद्ध होत नाही. एकदा का तुम्हां दोघांचे शाररिक संबंध प्रस्थापित झाले की तिला मजबुरीने का होईना तुझा स्वीकार करावाच लागेल. आपल्या सारखे त्यांच्यात नाहीये. आपल्यात कसं हलाला केल्यानंतर त्या शौहर ने जर तिला तलाक दिला तर पहिलावाला शौहर तिच्या बरोबर परत निकाह करू शकतो. तसे त्यांच्यात नाहीये. दुसऱ्या ने वापरलेल्या स्त्रीचा स्वीकारत ते कधीच करत नाहीत. म्हणजे असं पूर्वी होतं पण आता लोक विधवा स्त्रीशी
पुनर्विवाह करतात म्हणा. पण पूर्वी असं नव्हतं. विधवा झालेली स्त्री परत लग्न करत नसायची त्यावेळी ! पण काळानुसार त्यांच्या परंपरेत बदल झाला म्हणा. ही चांगली गोष्ट आहे. मात्र आपल्या परंपरेत तसा बदल होण्याची शक्यता अजिबात नाहीये. हे एक त्यातल्या त्यात बरं आहे, कारण त्यामुळे आपल्या लोकांना आपल्या बायकांवर अधिकार तर गाजवायला मिळतो. तलाक च्या भीतीने आपल्या बायका आपल्या शौहर विरुध्द ब्र अक्षर ही काढत नाहीत."
" म्हणजे तू म्हणतोस तसं केलं तर ती स्वीकार करेल
माझा ?"
" म्हणजे काय स्वीकार करावाच लागेल तिला , कारण दुसरा पर्यायच नाही मुळी तिच्या पुढे. पण हां तिला काही न सांगता ती झोपलेली असताना तिला नर्स मार्फत इंजेक्शन द्यायचे नि आपल्या बेडरूम मध्ये झोपून राहायचे. थोड्याच वेळात ती स्वतःहून तुझ्या बेडरूम मध्ये येईल आणि मग जे होईल ते सांगायलाच नको." त्याच्या मित्राने दिलेली आयडिया त्याने अजमावून पाहण्याचा मनात विचार केला नि घरी परतला. घरी येऊन आपल्या बेडरूम मध्ये पाहिलं तर निलोफर बेडरूम मध्ये
नव्हती. तेव्हा त्याच्या मनात एक शंका आली की निलोफर
पळून तर गेली नाही ना ? म्हणून बाहेर येऊन त्याने आपल्या अम्मी ला विचारले की अम्मी निलोफर कुठे आहे ?"
" कुठं आहे म्हणजे , झोपली आहे ती आपल्या खोलीत."
" बेडरूम मध्ये नाहीये ती. मी आताच बघून आलो."
" अरे तुझ्या बेडरूम मध्ये कशी असेल ती ? तिने
सेपरेट रूम घेतलाय स्वत:साठी !"
" सेपरेट रूम ? कोणी दिला तिला ?"
" मी दिला तिला. का म्हणून विचार ."
" का दिलास ?"
" अरे, जरा धीर धर, पाहिलं प्रेम विसरायला जरा वेळ
लागेल तिला, लगेच जबरदस्ती करू नकोस तिच्यावर."
" पण अम्मी ...?"
" एकदा सांगितलं ना धीर धर म्हणून."
" ठीक आहे." असे म्हणून तो आपल्या खोलीत निघून
गेला. आणि विचार करू लागला की मित्रांनी सांगितलेली
युक्ती कधी वापरायची. त्यासाठी योग्य संधीची वाट पहावी
लागेल." असे त्याला त्याच्या दुसऱ्या मनाने सांगितले.
निलोफर सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामकाज करायची. घरात ती कोणाशी फारशी बोलत नसे. बोलली तरी कामापुरतेच बोलायची. फक्त सासू बरोबर तिचं चांगलं जमायचं कारण तिने सासुशी गोड बोलून स्वत:साठी सेपरेट रूम मागून घेतली. म्हणाली," अम्मी तुम्हीच समजून सांगा त्यांना. मला पाहिलं प्रेम विसरायला थोडा वेळ लागेल म्हणून. तोपर्यंत माझ्यावर जबरदस्ती करू नका ." आणि शबाना बेगम ने आपल्या मुलाला समजावले. आणि शौहरला ही त्यामुळे सर्वच गप्प होते. दिवसामागून दिवस जात होते. पण सलीम ला हवी असलेली संधी मिळत नव्हती.
एके दिवशी मात्र सलीम ला हवी असलेली संधी चालून
आली.जफर खान काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
अनवर आणि शबाना एका मित्राच्या घरी गेले होते. त्याच्या
मित्राच्या घरी पार्टी होती. सर्वाना आमंत्रीत केलं होतं. सलीम ने आपले डोके दुखत असल्याचे खोटे नाटक करून घरीच राहणे पसंद केले. निलोफर त्यांच्या सोबत जाण्यास तयार झाली तर सलीम म्हणाला," निलू ला पण सोबत घेऊन गेलात तर मला काही हवं झालं तर कोण देईल ?" तेव्हा अनवर समजला आपल्या मुलाचे काय म्हणणे आहे ते. तो म्हणाला," बेटी निलू तू नको येऊस.
रहा इथं सलीम सोबत." खरं तर तिला सलीम सोबत राहायचे नव्हते.पण जाहिरपणे ती तशी सांगू पण शकत
नव्हती.म्हणून नाईलाजाने तिने आपली मान होकारार्थी डोलावली. ते लोक निघून गेले नि निलोफर आपल्या खोलीत निघून गेली. तसे सलीम ने कोणालातरी फोन करून घरी बोलावले. सोबत ते इंजेक्शन ही आणायला सांगितले. आणि थोड्याच वेळात एक नर्स तिथं आली. तसा सलीम निलोफर च्या खोली जवळ जाऊन हळूच दरवाजा ढकलून आंत डोकावून पाहिले. तेव्हा निलोफर ची पाठ दरवाजा कडे होती नि ती बेडवर झोपली होती. पावलांचा आवाज न करता तो नर्स जवळ आला नि म्हणाला," पावलांचा आवाज न करता हळूच तिच्या बेडरूम मध्ये जा नि ते इंजेक्शन दे तिला." नर्स एकदम संथ पावलाने आंत शिरली नि निलोफरच्या अगदी जवळ आली नि आदी वाकून पाहिलं की ती जागी आहे का ? त्यावेळी निलोफरचे डोळे तर मिटलेले होते. परंतु तिच्या चेहऱ्यावर एकदम गोड स्माईल होते. याचा अर्थ ती मधुर स्वप्न पाहत असावी. त्या नर्स ने ते इंजेक्शन हळूच तिच्या दंडाला टोचले. काय टोचले म्हणून तिने डोळे उघडले समोर पाहते तर एक नर्स उभी आहे नि तिच्या हातात एक इंजेक्शन आहे. पण ती नर्स थरथर कापत होती. निलोफर चटकन उठून बसली नि विचारले की कोण आहेस तू ? आणि हे इंजेक्शन मला द्यायला कोणी सांगितले तुला ? " तेव्हा ती भीतभितच म्हणाली, " सलीम साहेबांनी हे इंजेक्शन द्यायला सांगितले."
" पण आहे कशाचे हे इंजेक्शन ?"
" हे लव्ह ड्रॅग चे इजेक्शन आहे." असे म्हणताच निलोफरला सलीम चे षड्यंत्र लक्षात आले.तशी सी नर्स ला तू पट्कन निघून जा नि तुझ्या साहेबांनी विचारले तर
सांगायचं की नशा चढायला थोडा वेळ लागेल. ती स्वतःहूनच तुमच्या बेडरूम मध्ये येईल असं सांग आणि
निघून जा. नर्स एकदम निलोफर ने सांगितल्या प्रमाणे
केले नि ती चट्कन तेथून निघून गेली. सलीम आपल्या
बेडरूममध्ये गोड स्वप्न पाहत वाट पाहत राहिला. इथं
निलोफर ने नर्स बाहेर पडताच आतून दरवाजा कडी घालून घेतली नि लगेच रुद्राला फोन केला नि त्याला सविस्तर सांगितले की आपल्या सोबत काय घडलंय ते तू असशील तसा इकडे निघून ये मागच्या खिडकीतून आंत ये मी ती खिडकी उघडून ठेवते." असे म्हणून ती बेडवर पडून राहिली. एवढ्यात ड्रॅग ने आपलं काम करायला सुरुवात केली होती. रूद्राने कपडे घातले नि ताबडतोब निघाला. रस्त्यावर येताच त्याने एक आटो रिक्षा केली. आणि निघाला निलोफरच्या घरी यायला. निलोफर त्याची वाट पाहून थकली.
निलोफर फार उत्तेजित झाली तिला काय करावे ते
सुचेना रुद्राची वाट पाहून ती दमली. तिला फार असह्य झालं तशी ती स्वतःच उठून दरवाजा जवळ आली नि
दरवाजा उघडून बाहेर पडली. तिची पाऊले आपोआपच
सलीम च्या बेडरूम च्या दिशेने वळली आणि थोड्याच
वेळात बेडरूममध्ये शिरली. सलीम तिची वाटच पाहत
होता. तो उठला तसे तिने त्याला धक्का देऊन बेडवर
पाडले नि ती त्याच्यावर स्वार झाली. तो उगाचच वरकर्णी
म्हणत होता की , अगं निलू तू काय करतेस हे ? पण निलोफर त्याच्यावर एकदम तुटून पडली नि मग काय सलीम सांगून सवरून पुरुषच तो काय गप्प बसणार त्याने खूप आनंद उपभोगला आणि दोघेही तृप्त होऊन बाजूला झोपले. सलीम चे डोळे मिटलेले होते पण चेहऱ्यावर समाधानाचे स्मित हास्य उमटले होते. तेवढ्यात तेथे रुद्र आणि निलोफर येतात . त्याच्या चेहऱ्यावरचे स्माईल पाहून रुद्र म्हणाला," सलीम सुखद स्वप्न पाहत असावा. आता तू एक काम कर, आपले केस विस्कटून त्याच्या बाजूला रडत बैस. तुझ्या रडण्याने तो गोड स्वप्नातून जागा होईल. तू मग त्याला रडून सांग की तू मला लव्ह ड्रॅग देऊन इज्जत लुटलीस. आता मी तुझं तोंड ही पाहणार नाही. आणि तुझ्या विरुध्द कोर्टात केस करिन. बरं आता येतो मी !" असे म्हणताच निलोफर त्याला मिठी मारते. रुद्र
तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या कपाळावर किस करतो. तेव्हा निलोफर म्हणाली," बरं झालं तू वेळेवर
आलास नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं."
" अगं कसा नाही येणार , तुम बुलाया और हम न आया ऐसा कभी हो सकता है क्या ?" असे म्हणून त्याने तिला परत आपल्या मिठीत घेतले. तशी निलोफर त्याला म्हणाली,
" बरं तू आता तुला इथं कुणी पहायच्या अगोदर निघ इथून."
तसा रुद्र तेथून निघाला. तो गेला तशी निलोफर ने
आपले केस विस्कटले नि बेडवर बसून मोठ्या ने रडू लागली त्याच्या रडण्याने सलीम उठला नि तिला रडताना
पाहून तो समजला की आपले कार्य साधले. पण उगाचच
सावपणा दाखवत म्हणाला," निलू मी काहीच केलं नाही.
तूच माझ्या अंगावर तुटून पडली. मी नको नको म्हणत
होतो तरी तू ऐकली नाहीस. पण तरी देखील मी तुझी माफी मागतो." त्यावर निलोफर चिडून म्हणाली," आता
माफी मागून काय उपयोग एकदा अपवित्र झालेले माझं
शरीर परत पवित्र होणार आहे का ?" सलीम तिला समजावत म्हणाला," पण अपवित्र कसं होईल तुझं शरीर ? आपण दोघे मियाँ बिवी आहोत ना ? " असे बोलून तिच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचा त्याने प्रयत्न केला. तशी निलोफर रागाने त्याचा हात झिडकारत म्हणाली," अपने गंदे हाथोंसे मुझे छूना भी नहीं सच पूछो तो मुझे तुम्हारे शरीर से गिन आती हैं ।" असे म्हणून ती त्याच्या
बेडवरून खाली उतरली. त्यावर तो म्हणाला," पण मी
काय केलं ? तूच आलीस माझ्या खोलीत."
" परंतु मला लव्ह ड्रॅग चे इजेक्शन कोणी दिलं , तूच ना ? मला त्या नर्स सर्वकाही सांगितले. मी तुला असा सोडणार नाही तुला मी कोर्टात खेचनार आहे."
" पण तू माझी पत्नी आहेस ना ?"
" पत्नी असली तरी पत्नीच्या परवानगीशिवाय तिच्या
शरीराला स्पर्श करणे पण कायद्याने अपराध आहे. आणि
ह्या अपराधाची शिक्षा तुला मी दिल्याशिवाय राहणार नाही." असे म्हणून ती त्याच्या खोलीतून बाहेर पडली.
तेव्हा तिच्या चेहऱ्यावर युद्ध जिंकल्याचे विकट.हास्य उमटले होते.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा