Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाकाल ४

     
महाकाल ४
महाकाल ४


    सकाळी लवकर उठली नि बाजूला पडलेली आपली
वस्त्रे उचलली नि आपले नग्न शरीर झाकले. नि प्रथ
बाथरूम मध्ये गेली नि मनसोक्त  स्नान करून बाहेर आली आणि आरशासमोर उभी राहिली नि स्वतःच स्मित हास्य करत स्वतःच स्वतःचं अंग न्याहाळू लागली. देवाने अगदी सौंदर्याची मुक्त हस्ताने उघळण केली होती तिच्यावर.गोऱ्यापान नितळ रंगावर केवळ तिळाचेच गालबोट.बाकी तिचे सौंदर्य म्हणजे निसर्गाने केलेले कोरीव काम. प्रत्येक अवयव साचेबद्ध होता. स्वतःच रूप न्याहाळत तिने स्वतःच आपला हात हळुवार आपल्या सर्वांगावरून फिरविला. इतक्यात तिच्यास मानेवर गरम उसासे जाणवले. तशी ती दचकली आणि तिने मागे वळून पाहिले तर विवेक अजून झोपलेला होता. तिच्या कमरेत कुणीतरी हात घातल्या सारखे जाणवले.तशी ती भयभीत होऊन विचार करू लागली की, म्हणजे त्याने अजून माझा पाठलाग सोडला नाहीतर  " तसा तिच्या कानात आवाज पडला," कसा सोडणार तू फक्त माझी आहेस !"
    " म्हणजे रात्री सुध्दा....?"
    " मीच होतो फक्त शरीर तुझ्या नवऱ्याचं."
    " बाप रे , हे तर फार भयंकर आहे.आईला सांगायला पाहिजे ."
    " खबरदार, यातले आईला काही सांगितलेस तर !"
    " काय करशील तू ?"
    " तुझ्या नवऱ्याचा मी जीव घेईन. जसा काल घेतला होता अगदी तसाच कायमचा त्याला मी पक्षी बनवून

टाकीन."

   " पण तू का छळतोयेस मला ?"

   " छळत नाही तर तुझ्यावर मी निस्सीम प्रेम करतोय मी

जर तुला छळायचं माझ्या मनात असतं तर तुला कधीच

ठार करून माझ्या सोबत घेऊन गेलो असतो."

 " म्हणजे तू माझा पिच्छा कधीच सोडणार नाही का ?"    " तुझा पिच्छा या जन्मात तर नाहीच नाही."

    " पण तुझा मी  अपराध तरी काय केला आहे ?"
    " तुझी सुंदरता हाच तुझा अपराध आहे, कारण
तुझ्या सौंदर्या ने मला भुरळ घातली.म्हणून तुझ्यावर मी
फिदा झालोय.आता माझ्यापासून तुझी कुणीच सुटका करू शकणार नाही आणि जर का तू तसा प्रयत्न केल्यास तर माझं काहीच बिघणार नाही, परंतु तुझ्या नवऱ्याचा जीव मात्र नक्की जाईल. म्हणून कुणाला काही न सांगता फक्त माझ्याशी प्रेम कर, तुझं कुणी काही वागडं करू शकणार नाही."
    " परंतु मला तुझी भीती वाटते त्याचं काय ?"
     " माझी भीती बाळगायची गरज नाही तुला.कारण
मी तुला काही त्रास देणार नाहीये.फक्त तुझ्या सोबत मी
सदैव असेन नि तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणाला मी दिसणार ही नाही." सौंदर्याच्या मनात अशी भीती निर्माण
झाली की तिला कुणाला सांगता ही येईना त्याचा सहवास
ही तिला सहन होईना.म्हणजे तिला सतत असे वाटे की
तो आपल्या सोबत आहे,आपल्याला तो पाहतोय.स्नान
करायला गेली तरी तिला वाटे की तो आपल्याला पाहतोय म्हणून ती अंगावरील वस्त्रे न काढताच स्नान
करत असे. रात्री बेडरूम मध्ये गेली तरी तिला वाटे की
आपल्याला स्पर्श विवेक करत नसून तो आत्मा करतोय.
म्हणून ती शक्य तो त्याच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न
करीत असे.त्यामुळे विवेक गोंधळात पडे. एके दिवशी
विवेक तिला म्हणाली," सौंदर्या आज काल तू माझ्याशी
अशी काय वागतेस ते कळत नाहीये मला.मी कुणी परका आहे का, जी माझ्या पासून पळतेस ." मग तिची
खात्री होई की हा आपला विवेकच आहे , असा विचार
करून मग ती त्याच्या मिठीत जात असे. पण लगेच तिच्या कानात आवाज पडत असे की, तू फक्त माझी आहेस हे विसरलीस का ? " असे म्हणताच ती त्याला दूर लोटत असे. तेव्हा विवेक ला कळत नसे की ही अशी आपल्याशी का वागते ?" असे त्याच्या सोबत नेहमी
घडत असे. त्याने मग एके दिवशी आपल्या आईला ही
गोष्ट सांगितली. तसा त्याना ही आता  संशय निर्माण झाला की हिला एका  समंधाने झपाटले होते असे जे 
आपण ऐकले होते ते खरे  तर नसेल ना ? बहुधा  तोच समंधच असावा.असा विचार त्यांच्या मनात आला
तसे त्यांचे मन भीतीने थरथर कापले. मग यातून उपाय
काय तर कुण्या तांत्रिकाची मदत घ्यावी लागेल. असा
विचार मनात येताच त्यांनी आपल्या दोन तीन मैत्रिणी 
कडे चौकशी केली तेव्हा दोघी तिघींनी सुचविले की
गुहे मध्ये एक नवीन तांत्रिक आला आहे , तो असली 
कामे करतो म्हणून तुम्ही त्यांच्या कडे जाऊन पहा काय
गुण येतोय का ते पहा.मग काय राधाबाई त्या तांत्रिका
 कडे गेल्या. ज्या तांत्रिका कडे सौंदर्याची आई जात होत्या. राधाबाईंना पाहताच त्या तांत्रिका ने ओळखले नि त्यांना आपण विवेकच्या माता आहात ना ?"
    " हां महाराज पण आपण कसे ओळखले ?"
    " आम्ही त्रिकालदर्शी आहोत , आम्हाला जगात कुठं
काय घडत आहे, हे सर्व ही इथं बसून सांगू.म्हणूनच आम्ही तुम्हाला हे पण सांगू शकतो की आपण आमच्याकडे कशासाठी आला आहात ? अर्थात आपल्या सुनेला एका समंधाने झपाटले आहे." 
    " मग त्यावर काही उपाय नाही का ?"
    " तसा त्यावर काहीच उपाय नाही, कारण समंध ज्या
स्त्री ला झपाटतो तिला तो सोबत घेऊनच जातो." 
    " तिला नेलं तर नेऊ दे, पण माझ्या मुलाला तर काही
करणार नाही ना तो ?"
     " तुमच्या मुलाने त्याला विरोध केला नाही तर तो तुमच्या मुलाला काहीच करणार नाही.पण तिच्या जवळ  येण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र तो तुमच्या मुलाचा जीव घेतल्या शिवाय तो राहणार नाही."
    " नाही नाही माझा मुलगा तिच्या सोबत एका खोलीत
झोपणारच नाही.मग तर काही होणार नाही ना ?"
    " असं मात्र करू नका.असं केलात तर तो संबंध तुमच्या मुलाच्या शरीरात शिरेल.म्हणून मी हा तावीज देतोय तो फक्त त्याच्या दंडावर बांधा." असे म्हणून तांत्रिकाने एक तावीज मंतरुन त्यांच्या जवळ देत म्हणाला," हा घ्या तावीज "
    राधाबाई आपल्या घरी परतल्या नि त्यांनी आपल्या
मुलाच्या दंडावर तांत्रिकाने दिलेला तावीज बांधला आणि
म्हणाल्या ," तू शक्य तो तिच्या पासून दूरच रहा." 
      " का गं ?"
      " तिला तिच्या बालपणी एका समंधा ने पकडलं तो
समंध अजूनही तिला सोडून गेलेला नाहीये."
    " काय सांगतेस ?" 
    " खरं तेच सांगते."
    " पण महाकाल तर म्हणत तिला समंधा ने तिला 
झपाटलेच नव्हते." 
    " मग मी काय खोटे सांगते."
    " खोटं नाही गं समंधाने धरलं आहे तर तो तिला सोडणार नाही. असं मी ऐकून आहे, खरं की खोटं ते
माहीत नाही."
    " खरंय. नाहीच सोडत तो, आपल्याला काय करायचंय ? ती मेली तर बरंच आहे ना, आम्हांला तुझं लग्न दुसऱ्या मुली सोबत करता येईल."
   " असं का ग म्हणतेस आई, मी तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतोय तिला असं मरू देणं मला 
योग्य वाटत नाही."
     " मला तरी कुठं वाटतंय ती मरावी म्हणून.परंतु जगून तरी  तिचा उपयोग काय आहे का तुला ? नाही ना ? मग
असली मेलीलीच बरी ना ?"
     " नाही आई, सौंदर्या साठी आपल्याला काहीतरी
करायला हवं ?" 
    " उपाय असता तर मी नसता का केला ? मी इतकी
वाईट नाही आहे रे."
    " तांत्रिक काय म्हणाला ते सांग."
    " तांत्रिक म्हणाला समंध ज्या स्त्री ला पकडतो तिला
तो स्वतः सोबत घेऊनच जातो.म्हणून आता तिचा विचार
करायचा सोडून तिच्यापासून सुटकारा कसा मिळेल तो
बघ.आणि तुझ्या दंडात तावीज बांधले आहे ते तिला
अजिबात दाखवू नकोस.तुझ्या हातात जोपर्यंत हे तावीज
आहे तोपर्यंत तो तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही." असे म्हणताच विवेक ने फुल हाताचे शर्ट घातले.
        तेवढ्यात किचनमध्ये काम करत असलेली सौंदर्या
बाहेर आली नि तिने आपल्या सासूला विचारले की, जाऊन आले का सासूबाई , काय म्हणाला तो तांत्रिक ?"
असे विचारताच ह्या दोन माय लेकरांना धक्काच बसला.
राधाबाईंना फार गडबडल्या. काय बोलावे ते सुचेना.
पण काहींना काही उत्तर तर द्यावेच लागेल.शिवाय खोटं
बोलून चालणार नव्हतं. कारण तिने एकदम अचूक मर्मावरच बोट ठेवले होते. म्हणून त्या म्हणाल्या," काही
नाही म्हणाले सर्वकाही ठीक आहे." सौंदर्या ने विचारले,
   " बस इतकंच म्हणाला की अजून काही ?"
   " अजून....अजून काही नाही म्हणाला तो."
  " पुन्हा जाऊ नका त्या तांत्रिका कडे. कारण ते तुमच्या हिताचं ठरणार नाही." असे म्हणून सौंदर्या किचनमध्ये निघून गेली. तश्या त्या आपल्या मुलाला म्हणाल्या,
   "  पाहिलंस कशी बोलून गेली ती , याचा अर्थ हे ती बोलत नाहीये. तिच्या अंगात जो आहे ना, तो बोलतोय हे सारं. आता तरी तुझी खात्री पटली ना ?" 
    " मग आई आता काय करायचं ?"
    " आता फक्त वाट पाहणं एवढंच आहे आपल्या हातात."
    " कशाची वाट गं ?" 
    " तुझ्या बायकोला तो समंध घेऊन जात नाही तोपर्यंत
गप्प राहायचं. काही बोलायचं नाही."
    " आई असं करणं योग्य आहे का ?"
    " दुसरं काही आहे का आपल्या हातात ?"
    " पण आई मला नाही पटत हे."
    " आता तिचा विचार करून नकोस.स्वतःचा विचार कर, जा आपल्या खोलीत नि आराम कर."
    " अगं झोपून कसं चालेल ? मला रात्रपाळीला जायचंय."
    " मग बरंच झालंय , तिच्यापासून दूर तरी राहशील."
    " हो गं आई , बरोबर बोललीस तू ?"
    " आता जा आपल्या खोलीत तिच्या जवळ काय बोलू
नकोस." विवेक आपल्या खोलीत गेला आणि पलंगावर
बसून विचार करू लागला की सौंदर्याला न सांगता कामावर जाणं योग्य ठरणार आहे का ? खूप विचार केला पण त्याची हिंम्मत काही होईना.शेवटी कपडे घालून कामावर जायला तयार झाला. तेवढ्यात तिथं सौंदर्या आली नि तिच्या हातात टिपिन होती. ते पाहून विवेक ला तर एकदम धक्काच बसला.पण तसे न दाखविता तो तिला हसून म्हणाला,
    " सौंदर्या तुला कसं कळलं की मी आज रात्र पाळीला
जाणार आहे ते ." 
    " त्यात काय सोपं आहे, सकाळी तू कामावर गेला
नाहीस याचा अर्थ आजपासून तुझी रात्रपाळी असणार.
एवढं आम्हां स्त्रियांना कळतं म्हटलं मिस्टर विवेक."
   " फार हुशार आहेस." असे म्हणून त्याने तिच्या हातातून  टिपिन घेतली नि तो जाऊ लागला तशी सौंदर्या म्हणाली," चाललास ?"
   " हो. " 
   " माझं बक्षीस कुठं आहे ?"
   " बक्षीस ?"
   " विसरलास ना ? ते पण या वयात ? म्हटलं साठी नाही झाली अजून."
   विवेकच्या लगेच लक्षात आले की बक्षीस मध्ये तिला
काय हवे आहे.तो लगेच तिच्या जवळ आला नि तिला
आपल्या  मिठीत घेतले नि तिच्या ओठावर किस केले. तिला बाय बाय म्हणत तेथून निघाला. पण मनात त्याच्या विचारांचे काहूर मांजले.  मघाशी पाहिलेले तिचे रूप वेगळे नि आताचे पाहिलेले तिचे रूप वेगळे होते. एकूण हा काय प्रकार आहे ? आता तिच्या अंगात नव्हता का तो ? कसा नसणार , मी तर ऐकलंय की तो तर तिच्या सोबत सावली सारखा असतो. मग आता कोठे गेला  ? होता म्हणायचा तर त्याने मला विरोध कसा केला नाही ? आणि नव्हता म्हणायचा तर तिला सोडून कुठं बरं गेला
असेल बरं हा ? काय खरं नि काय खोटं हे काही
कळंणासं झालंय.क्षणभरच  लगेच दुसऱ्या क्षणी मनात
एक विचार आला की असं तर नसेल ना, म्हणजे या क्षणी
सुध्दा तो सौंदर्या च्या शरीरावर ताबा मिळवून आहे, परंतु
आपल्या दंडात तांत्रिका ने दिलेले तावीज आहे म्हणून तो
आपल्यावर त्याचं काही चाललं नाही.बहुधा असेच असावे.आणि असं जर असेल तर तो यापुढे आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही." असा विचार करत करतच तो ऑफिस ला पोहोचला.
       रात्रीचे अकरा वाजले तशी त्याची अचानक तब्बेत
खराब झाली.म्हणून तो घरी परतला. दरवाजावरील बेल
वाजली तशी राधाबाईंनी दरवाजा उघडला.समोर विवेकला पाहून विचारले," अरे तू वापस का आलास ?"
   " अचानक पोटात दुखायला लागलं म्हणून घरी आलो.
पण जसा आपल्या घरा जवळ पोहोचलो तसे माझ्या
पोटात दुखायचे बंद झाले.
    "  समजलं मला तुझ्या पोटात का दुखायला लागले ते.
तू आता एक काम कर इथंच झोप हॉल मध्ये ."
    " हॉल मध्ये का गं आई ?"
     " तुला माहितेय ना, वरती तुझ्या बेडरूम मध्ये तुझ्या
बायको सोबत कोण असेल ते."
     " इथं झोपलो म्हणून ती मला सोडणार आहे का ?"
    " मग काय करतोस ?"
     " जावेच लागेल मला तिच्या बेडरूम मध्ये ?"
     " पण तुला तो काही करत नाही ना ?"
     " नाही कसा माझ्या शरीरात शिरतो ना तो."
     " अरे बाप रे, तुझ्या शरीरात शिरतो नि मग ?"
     " मग काय त्याला जे हवे असते ते तो करतो."
     " अरे बापरे, फार भयंकर आहे हे." 
      " नुसतं भयंकर नाही अति भयंकर."
      " अरे देवा,आता मी काय करू ?"
      " तू काही काळजी करू नकोस, माझ्या दंडाला...?
असे म्हणून दंडाला चाचपून पाहतो नि मोठ्या ने शॉक
बसल्यागत म्हणाल्या, " अरे बाप रे, तू मघाशी बांधलेले 
तावीज कुठं आहे ? बहुतेक कुठं तरी पडलं असावं ."
    राधाबाई आपल्या डोक्यावर हात मारून घेत म्हणाल्या," अरे देवा ! तावीज पण पाडलेस, तरी तुला सांगितले होते सांभाळ म्हणून. आता काय करू मी ! " 
    " तू चिंता नको करुस मला काही ही नाही होणार."
    " कशी नको चिंता करू ?त्याने तुझा जीव घेतला
म्हणजे ?"
    " तो असं काही करणार नाही , कारण त्याला कुणाचे
ना कुणाचे शरीर हवंय.त्यामुळे तो मला काहीच करणार
नाही.तू अजिबात चिंता करू नकोस, तू आपल्या
खोलीत जाऊन निवांत झोप मी बघतो काय ते." असे 
म्हणून विवेक आपल्या बेडरूमच्या दिशेने निघाला.

     क्रमशः

टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..