Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

यह इश्क नहीं आसान ९ (अमर प्रेम)

यह इश्क नहीं आसान ९
यह इश्क नहीं आसान ९

 


         निलोफर चे लग्न रुद्र बरोबर ठरले. तेव्हा रुद्राला विचारण्यात आले की तुझ्या घरचे कोणी येणार आहेत का
लग्नाला ?" तेव्हा रुद्र म्हणाला," माझा फक्त धाकटा भाऊ
येईल लग्नाला." कारण रुद्राला माहीत असते की आपल्या घरचे कुणी येणार नाही. म्हणून घरच्यांना न सांगताच लग्न करायचं ठरलं. तेव्हा जफर खान ने विचारले ," तुझा निलोफरशी निकाह झाल्यानंतर तू राहणार कोठे ?" तसा इब्राहिम म्हणाला," माझ्याच घरी राहील, मी त्याला घर जावई करून घ्यायचा विचार केला आहे." तसा जफर खान म्हणाला," तू निर्णय घेऊन पण झालास मला न विचारता ?"
     " त्यात विचारायचे काय ? मुलगी माझी आहे.आणि
एकुलती एक आहे, तिचं लग्न झाल्यावर आम्हाला तरी
दुसरे कोण आहे, म्हणून मी विचार केला की रुद्राला
मी घर जावई करून घेतो." तेव्हा रुद्र म्हणाला," नाही पापा आम्ही दुसरीकडे कुठे तरी जाऊन राहू !"
    " काय गरज आहे दुसरीकडे जाण्याची ? आपलं घर
खूप मोठं आहे." इब्राहिम उद्गारला.
    " पापा रुद्र योग्य तेच बोलतोय. मला रुद्र घर जावई
झालेला नाही आवडणार." निलोफर म्हणाली.
   तेव्हा सलीम म्हणाला," लग्नाला फक्त दोन माणसं
असं लग्न झालंय का कुठं ?" तेव्हा अनवर हळूच त्याच्या
काना जवळ बोलला," अरे, चांगलं आहे, त्याच्या कडील
कोणी नसेल तर ! त्याच्याशी आम्ही धोका केलाय हे तो
सिद्धच करू शकणार नाहीये."
    " अरे हां हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं."
    " म्हणून सांगतोय शांत रहा जे होतंय ते चांगल्यासाठीच
होतंय." जफर खान ने पण अनवरला हळूच डोळा मारिला. गप्प रहा सर्वकाही आपल्या मना सारखेच होतेय.
असे जणू त्या संकेत मधून सुचवायचे असावे.

   निलोफरच्या वडिलांनी रुद्राला सांगितले की निकाह
करण्यासाठी दोन साक्षीदार लागलात. आणि ते देखील
मुस्लिम धर्माचे असायला पाहिजे."
    " दोन आहेत माझे मित्र ते देतील साक्षी !"
     " अजून एक नियम आहे, नवरीला  नवऱ्या ने
मेहर म्हणजे एक उपहार द्यायचा असतो. अर्थात पैसे किंवा वस्तू ! "
    " किती द्यावे लागतात ?"
    " आपल्या परिस्थिती नुसार, जसे नवरा मुलगा श्रीमंत
असेल तर लाख दोन लाख अथवा त्याही पेक्षा जास्त निश्चित आकडा नाहीये."
    " मग मी दहा हजार देईन."
    " नुसतं दहा हजार नाहीत तर दहा हजार एक .....हा एक रुपया फार महत्वाचा असतो बरं का ?
     " पप्पा मला काहीही नकोय रुद्र कडून.
      " पण बेटी ही परंपरा आहे."
      " ठीक आहे, परंतु मेहर ची रक्कम मागण्याचा अधिकार तर मलाच आहे ना ,  रुद्र तू चिंता करू नकोस मी काहीही मागणार नाही तुझ्याकडे. म्हणजे नंतर हक्काने मागेंन मी चालेल ना ?"
    " हो, अवश्य !" रुद्र हसून म्हणाला.
 
    ठरल्या दिवशी रुद्र आणि निलोफरचा विवाह इस्लाम
धर्माच्या पद्दती नुसार निकाह संपन्न झाला. इतक्यात
सलीम पळत आला नि हळूच अनवर च्या कानात
म्हणाला ," अब्बू आपल्या सोबत धोका झालाय." अनवर उद्गारला," तू इथं कसा ?" असा प्रश्न विचारून ते दोघेही
एका बाजूला जाऊन बोलू लागले. अनवर आपल्या
मुलाला विचारले ," मग सेहरा च्या आड कोण आहे ?"
    " रुद्र असणार "
    " पण हे झालं असं कसं ? तुला सांगितलं होतं त्याला
बेशुद्ध करायला ?"
    " हां पण त्याला आपल्या प्लॅन ची अगोदरच कल्पना
होती वाटतं, त्याचा माणूस अगोदरच तिथं लपलेला होता.
त्याने माझ्या नाकाला क्लोरोफार्म लावून मला बेशुध्द केलं."
    " पण आपल्या प्लॅन बद्दल आपल्या तिघांनाच माहीत
होतं मग त्या रुद्राला कसं कळलं ?" तेवढ्यात पाठीमागून
एक आवाज आला  - ' मी सांगितले." त्या दोघांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. सायरा ला पाहून ते दोघेही
दचकले. सलीम ने अडखळत विचारले , " चाची तू ?"
    " हां मी तुम्हां लोकांना काय वाटलं की तुम्ही माझ्या
मुलीच्या विरुध्द प्लॅन बनवाल नि मी गप्प बसेन. माझ्या
मुलीचे प्रेम रुद्रावर होतं नि  तिचं लग्न तिच्या पसंतीच्या
मुलाशीच होणार, असं मी ठरवलं नि त्या प्रमाणे मी करून
दाखविले."
   " पण तुला आमचं प्लॅन कळलं कसं ?" अनवर ने विचारले.
   " ज्या वेळी अब्बू तुम्हाला सांगत होते की हे सर्व नाटक
आहे, लग्न तुझ्याशीच होणार , ते मी चोरून ऐकलं होतं.
कारण मला माहित होतं तुम्ही बाप-लेक सहजासहजी
माझ्या मुलीचे लग्न रुद्र शी होऊ देणार नाही. मग मी
गाफील कशी राहीन बरं ? आम्ही रचले प्लॅन तुम्हा लोकांना तोंडघशी पाडण्यासाठी ! आणि त्याप्रमाणे तोंडघशी पाडलं ही !" तसा अनवर चिडला नि त्याने   तिला मारण्यासाठी आपला हात उगारला, तसा त्याचा हात वरचेवर पकडला गेला. आपला कोणी पकडला म्हणून रागाने त्या दिशेला पाहिले, तर समोर इब्राहिम उभा त्याला दिसला. इब्राहिम ला पाहून तो रागानेच म्हणाला,
    "  सोड माझा हात."
    " भाईजान आता सोडतो हात पण अशी चुकी पुन्हा करू नकोस. सायरा पत्नी आहे माझी !"
     " तुझ्या बायकोने काय गुन्हा केला हे माहीत आहे का
तुला ?"
     " तिने गुन्हा नाही केला तर तुमचं प्लॅन उद्ध्वस्त केलं."
     " फार महागाईत पडेल हे तुला ?"
     " मी स्वस्त वस्तूंचा शौकीन नाहीये भाईजान !"
     " आता त्याचा न्यायनिवाडा अब्बू च करतील."
    असे म्हणून दोघेही जफर खान कडे गेले. दोन्ही
मुलांना आणि त्यांच्या सोबत नातवाला पाहून जफर खान
गोंधळले. ते नकळत बोलून गेले की, असे, तू इथं आहेस
तर निलोफर सोबत कोण आहे ?"
    " तो रुद्र आहे,आजोबा ! आपल्या सोबत धोका झाला
आहे ."
    " धोका तुमच्या सोबत नाहीतर माझ्या मुली सोबत
होणार होता, पण वेळीच आम्हाला तुमचं प्लॅन समजले
नि जशास तसे उत्तर दिले." तसा जफर खान म्हणाला,
    " पण हे लग्न मी यशस्वी होऊ देणार नाही,मी आताच
काझी ला सांगून हे लग्न मोडायला सांगतो."
   " आता कसं मोडणार लग्न झालंय."
   " ते बघतो मी काय करायचं ते." असे म्हणून त्यांनी
लगेच काझीला आपल्या जवळ बोलविले नि सविस्तर
माहिती दिली. तेव्हा काझी म्हणाला," त्या दोघांचा निकाह
तर इस्लाम पद्दतीनुसार झाला आहे, त्यामुळे आता काहीही करू शकत नाहीये."
    " हां पण इस्लाम धर्मात दोन्ही व्यक्ती मुस्लिम पाहिजेत
आणि रुद्र एक हिंदू मुलगा आहे."
    " काय ? हिंदू मुलगा पण त्याने तर आपलं नाव असलम खान सांगितले."
    " खोटे आहेत." अनवर उद्गारला.
    " काझी साहेब, हे खरंय की तो हिंदू मुलगा आहे, परंतु
त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. आणि इस्लाम धर्मात
तरतूद आहे की दोघांपैकी एक जरी दुसरा धर्माचा असला
तरी त्याने किंवा तिने इस्लाम धर्म स्वीकारला तर त्या
दोघांचा निकाह होऊ शकतो. असाच नियम आहे ना, काझी साहेब."
     " होय."
     " मग त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. ?"
     " फक्त धर्म स्वीकारला म्हणून चालत नाही. त्या धर्माच्या नियमानुसार वागावे लागते. जसे कलमा यायला
हव्यात, नमाज पडायला यायला हवं." त्यावर रुद्र म्हणाला," मला कलमा म्हणायला पण येतात नि नमाज
ही पडता येतं." असे म्हणून त्याने कलमा म्हणून दाखविल्या." त्यावर काझी म्हणाले," ह्याला तर सर्वकाही
येतं अर्थात याच्या निकाह पद्दतीनुसार झाला आहे. तेव्हा
आता त्यात मी काहीच फेरबदल करू शकत नाही. आता
एकच होऊ शकतं ते म्हणजे ह्या मुलानं जर निलोफरला
तलाक दिला तरच साद्दतचा अवधी पूर्ण केल्यानंतरच तू
निलोफर शी निकाह करू शकतोस." असे सांगून काझी
निघून गेला. तेव्हा सलीम ने रागामध्ये सजवलेली सारी सजावट तोडून मोडून टाकली. तेव्हा जफर खान आपल्या मुलाला म्हणजेच इब्राहिम ला म्हणाला," तू आपल्या धर्मा विरुध्द कार्य केले आहेस, म्हणून मी तुला माझ्या प्रॉपर्टी मधून एक फुटी कवडी ही देणार नाही." तेव्हा इब्राहिम खान म्हणाला," अब्बू ! माझी मुलगीच माझी प्रॉपर्टी आहे,
तिच्या खुशी व्यतिरिक्त मला दुसरे काही नकोय." असे
म्हणून इब्राहिम खान आपल्या मुली,जावई सह आपल्या
घरी निघून आले. तेव्हा रुद्र म्हणाला, " पप्पा , मी आणि
निलोफर आता मंदिरात चाललोय. तुमची हरकत तर नाही
ना ?" तेव्हा इब्राहिम खान हसून म्हणाला," छे छे छे !
माझी कशालाच हरकत नाही, कारण माझ्या दृष्टीने
अल्लाह आणि  ईश्वर एकच आहेत . त्यामुळे तुम्ही कोठेही
जाऊ शकता."
    " पप्पा तुम्ही आणि मम्मी पण चला ना आमच्या बरोबर." निलोफर म्हणाली.
   " आम्ही कशाला गं ?" इब्राहिम ने विचारले.
   " आम्हां दोघांना आशीर्वाद द्यायला."
   " म्हणजे ?"
   " आता आम्ही इस्लाम पद्दतीनुसार  निकाह केला.
तसाच मंदिरात जाऊन  हिंदू पद्दतीनुसार लग्न करणार , म्हणजे त्यातून आम्हाला हेच दाखवून द्यायचे आहे ,दोन धर्म एकत्र नांदू शकतात. त्यासाठी काही धर्म बद्दलण्याची आवश्यकता नाहीये."
    " उत्तम ! असं आहे तर आम्ही येतोच." म्हणून ते सायरा कडे पाहत म्हणाले," चल सायरा आपण पण जाऊ !" त्यानंतर सर्वजण श्रीराम मंदिरात आले. रुद्राच्या
मित्रांनी अगोदरच सारी तयारी करून ठेवली होती. लगेच
विवाह सोहळा सुरू झाला. ब्राम्हण मंत्र म्हणत होता.

    सनातन पद्दती ने लग्न सुरू असल्याची खबर सलीम ला लागली. सलीम काही गुंडासह मंदिरात आला.परंतु
रुद्राच्या मित्रांनी त्या गुंडांना चांगलाच प्रसाद दिला. शेवटी
त्या लोकांनी तेथून पळ काढला. लग्न पार पडले. त्या
दोघांनी प्रथम ब्राम्हणांचे चरणस्पर्श केले. नंतर निलोफर च्या आई-वडिलांचे चरणस्पर्श केले. त्या उभयतांनी त्या
दोघांना आशीर्वाद दिला. त्यानंतर निलोफर ला घेऊन
रुद्र आपल्या घरी जायला निघाला. जेव्हा घरी पोचला
तेव्हा त्या दोघांना दुर्गाबाईंनी दरवाजात अडविले. म्हणाल्या ," तुम्ही दोघांनी ह्या घरात प्रवेश करायचा नाही."
तेव्हा रुद्राचे वडील आपल्या आईला म्हणाले," आई, हो
बाजूला दारी आलेल्या लक्ष्मीला असे लाथाडायचे नसते."
    " हे तू मला सांगतोस ?"
   " होय."
   " तुला माहितेय ह्याने परधर्माच्या मुली सोबत लग्न
करून आपल्या घराण्याला कलंकित केलंय. आपला
धर्म भ्रष्ट केलाय त्याने." त्यावर विद्याधरपंत म्हणाले,
    " काहीही धर्म भ्रष्ट वगैरे होत नाही. उगाचच धर्माचे
कारण पुढे केले जाते. कोणत्याही धर्मात असं सांगितलं
नाहीये की दुसऱ्या धर्मातील मुलगी असली तर धर्म भ्रष्ट
होतोय म्हणून." त्यावर त्या वैतागून म्हणाल्या," तुला सगळं चालेल रे, कारण तूच आधी खालच्या जातीतील
मुली सोबत लग्न केलेस, मग तुझ्या पोटी आलेला हा
कार्टा शुध्द कसा असेल ?" तेवढ्यात आरतीचे ताट घेऊन
शारदा बाई आल्या. तिच्या हातात आरतीचे ताट पाहून
त्या अजून खवळल्या नि तिच्या कडे रागाने पाहत म्हणाल्या," काय गं तू का आलीस ते आरतीचे ताट घेऊन ?"
    " मीच सांगितले तिला.......आण गं ?" त्यावर त्या चिडून म्हणाल्या," करा काय वाट्टेल ते करा, पण ह्या
घरात आता मी मात्र एक क्षण थांबणार नाहीये. " असे म्हणून त्या तणतणत घरात निघून गेल्या. त्यानंतर शारदा बाईंनी त्या दोघांना आरती ने ओवाळले. त्यानंतर उंबरठ्यावर माफ ठेविले ते पाडून आंत येण्यास सांगितले. त्या प्रमाणे निलोफर ने माफ पाडून आंत प्रवेश केला. त्यानंतर इतर विधी करण्यात आल्या. इब्राहिम आणि सायरा दोघेही डोळे भरून तो सोहळा पहात होते. दुर्गाबाईंनी आपली कपड्याची बॅग भरली नि बाहेर आल्या. तसे विद्याधरपंतानी विचारले ," आई, कुठं निघालीस ?"
   " मी कुठं ही जाईन तुला काय करायचं आहे त्याच्याशी ?"
   " आई, हा वेडा हट्ट सोड बरं आजपर्यंत मी तुझं ऐकलं.
पण आज नाही ऐकणार ,  कारण आजचा प्रश्न माझ्या मुलांचा आहे."
    " ह्या घरात आता एक क्षणही मी थांबणार नाही."
    " अगं पण जाणार कुठं तू ?"
   " कुठं पण जाईन आणि कुठं ही राहीन. पण धर्मभ्रष्ट
झालेल्या घरात मी एक क्षण ही थांबणार नाही."
   " मग तुझी मर्जी !" विद्याधरपंतांनी मुद्दाम असं म्हटलं. त्यांना माहीत होतं राग थंड झाल्यावर येईल आपोआपच घरी ! म्हणून त्यांनी काही त्यांना रोखले नाही. परंतु इब्राहिम खान तिला विनंती करत म्हणाले," आई साहेब घर सोडून जाऊ नका तुम्ही ! तुमच्या सुनेने मुसलमानांच्या घरी जन्म  घेतला असला तरी तिने आता हिंदू धर्म स्वीकारला आहे."
   त्यावर त्या चिडून म्हणाल्या," धर्म बदला म्हणजे काय रक्त  बदलते की काय ? "
    " आई साहेब रक्त तर सर्वांचे एक सारखेच असते म्हणूनच सर्वांच्या  रक्ताचा रंग ही लाल आहे."
    " हे तू मला शिकवू नकोस. रक्ताचा रंग लाल असला
तरी तुमच्या मुलीचे रक्त दूषित आहे,कारण मांस , मच्छी
खाणारी माणसं तुम्ही...... तुम्हां लोकांचे रक्त शुद्ध कसं असेल बरं ?" त्यावर इब्राहिम म्हणाले,  " जर  रक्त शुध्द नसतं आणि एकसमान नसतं तर इस्पितळात प्रत्येक बाटलीवर लेबल लावले गेले असते  की , हे हिंदू चे रक्त नि हे मूसलमानांचे रक्त हिंदू चे हिंदू माणसाला द्या नि मुसलमाचे रक्त मुसलमानांला द्या. असं म्हटलं असतं पण तसे म्हटले जाते का ? नाही ना बोलत कोणी ,कारण प्रत्येक माणसाला आपला जीव प्यारा असतो. मग रक्त कोणाचे असले तरी ते चालते. फक्त दोघांच्या रक्ताचा रक्तगट एक असावा लागतो. मग मला सांगा  जर रक्त कोणाचेही असले तरी चालते मग  माणसं का चालत नाहीत.?"
     त्यावर निरुत्तर झाल्या. परंतु कमीपणा घ्यायची सवय
नाही ना , तिथंच अडलंय सारे काम. त्यानंतर त्या घर सोडून गेल्या नाहीत पण आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून घेतला. इब्राहिम मुळे आपली आई घर सोडून गेली नाही म्हणून विद्याधरपंतांनी  त्यांचे आभार मानले.

   

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..