Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

यह इश्क नहीं आसान ८ (अमर प्रेम)

यह इश्क नहीं आसान ८
यह इश्क नहीं आसान ८

 


      निलोफर म्हणाली," अगं माझ्या आजोबांनी माझं कॉलेज बंद केलं होतं ."
    " का बरं ?" माली ने विचारले.
    " माझं एका हिंदू मुलाशी प्रेम आहे म्हणून."
    " मग आता कसं पाठविलं तुला कॉलेज ला ? म्हणजे
आदि नकार होता तो आता होकार मध्ये बदली झाला का ?"
    " त्याबद्दल मला माहित नाही, पण पप्पानी रुद्र ला
आमच्या घरी बोलविले आहे."
    " अगं याचा अर्थ त्यांचा होकार आहे." मीना उद्गारली
    " ते काही माहीत नाही; पण पाहू ! खरं काय ते समजेलच संध्याकाळी." तेवढ्यात समोरून रुद्र पण येताना दिसला रुद्राला पाहून ती एकदम खुश झाली. मात्र रुद्राच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले होते. तो तिच्या जवळ आला तश्या तिच्या मैत्रिणी म्हणाल्या," बोला तुम्ही दोघे आम्ही वाट पाहतो तुझी वर्गामध्ये." तिच्या मैत्रिणी त्या दोघांना सोडून तिथून निघून गेल्या. तसा रुद्र तिला म्हणाला," तू कशी काय आज आलीस कॉलेज ला ? म्हणजे मला म्हणायचंय की तुझ्या आजोबांनी तुला मनाई केली होती ना, कॉलेज ला यायला."
    " हो."
    " मग आज कशी काय आलीस कॉलेजला ?"
     " माहीत नाही, परंतु वडील म्हणाले ,जा तू कॉलेज ला
म्हणून  मी आले . तुला नाही आवडलं का मी कॉलेजला
आलेलं ?" तिने मुद्दाम मस्करी ने विचारले.
    " अगं अशी काय बोलतेस तू , तू आलेली मला का नाही आवडणार ? तुला माहितेय मला कॉलेज मध्ये करमत नव्हतं."
    " मग घरी यायचं होतं."
    " घरी कसं येणार ?"
     " का ?"
     " अगं तुझा आजा हिटलर नाहीये का घरात ?"
     " माझ्या आजोबांना हिटलर म्हणतोस."
     " हिटलर नाहीतर काय ? सारखा सर्वांवर हुकूम
चालवत असतो."
     " त्या हिटलरानीच आपल्या लग्नाला परवानगी दिलीय
अशी वाटते. म्हणून तुला पप्पानी घरी बोलविले आहे."
    " खरं सांगतेस ?"
    " खरं की खोटं ते मला माहित नाही, परंतु मला असं
वाटतं."
    " असं वाटायचं कारण ?"
    " रात्री ना माझ्या लग्नावरून घरात बराच वाद झाला."
असे म्हणून तिने थोडक्यात सर्वकाही सांगितले. ते ऐकून
रुद्र म्हणाला ," मग मला नाही वाटत तुझा आजा तयार
झाला असेल."
    " मग तुला का बोलविले ?"
    "  ते आता मी कसं सांगणार तिथं गेल्यानंतरच कळेल
ना ?"
    " त्यांची परवानगी असो वा नसो पण मी लग्न तुझ्याशीत करणार ."
     " ते झालंच गं परंतु आई-वडिलांच्या परवानगी लग्न
करायचं म्हणजे......? मला नाही पटत हे."
    " मला तरी कुठं पटतंय , पण करणार काय ? मोठी
माणसं हट्टच धरून बसली तर !"
     " पण मी काय म्हणतो त्यांचं म्हणणं तरी काय आहे ?"
     " इस्लाम धर्माच्या मुलीचे इस्लाम धर्माच्या मुलाशीच
लग्न होईल असं त्यांचं म्हणणं आहे."
    " मग तू का करत नाहीस इस्लामी मुलाशी लग्न ?" चेष्टेने म्हणाला
    "  आणि तू काय करणार ?"
    " तुझ्या नावाचा जप दुसरे काय करणार ?"
    " मजनू काही गरज नाही त्याची तू संध्याकाळी ये घरी
पप्पांशी भेट घे. ते काय म्हणतात ते बघ मग पाहू काय
करायचं ते."
   
    संध्याकाळी ठरल्या प्रमाणे रुद्र निलोफर च्या घरी आला
नि निलोफरच्या वडिलांना भेटला. इब्राहिम खान ने त्याला
इस्लाम धर्म स्वीकारण्या विषयी सांगितले. रुद्र तयार ही झाला ; परंतु सायरा आणि निलोफर या दोघींचा त्या गोष्टीस विरोध होता. परंतु रुद्र ने त्या दोघींना समजावले
की इस्लाम धर्म स्वीकारल्याने काही फरक पडणार नाही.
कारण माझ्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत. आणि सर्वांचा
ईश्वर ही एक आहे, परंतु देवाला सुद्धा लोकांनी धर्मामध्ये
वाटून टाकले आहे. परंतु असमज लोकांच्या नादी आपण का लागायचं ?"
     त्यावर निलोफर म्हणाली ," ते ठीक आहे, परंतु तुझ्या
घरच्यांचे काय ? ते मान्य करतील का हे ?"
    " हे बघ माझे वडील काही भेदभाव मानत नाही. हां
आजी थोडी जुन्या विचार सरणीची आहे, त्यामुळे एखाद्या
वेळेस ती विरोध करेल ? करू दे पाहू नंतर काय करायचं
ते." त्यावर इब्राहिम म्हणाला," म्हणजे तू तयार आहेस  ना
इस्लाम धर्म स्वीकारायला ?"
    " हो." निलोफर आपल्या नजरेने तयार नको होऊस
असं ती सांगत असते. पण रुद्र आपल्या नजरेनेच तिला
जरा शांत रहा म्हणून सांगून तो इब्राहिम सोबत जफर
खान ला भेटायला बाजूच्या घरात गेला. इब्राहिम ने त्याची
ओळख आपल्या बापाला सांगितली. जफर खान ने त्याला पायापासून डोक्यापर्यंत  खालपर्यंत न्याहाळले नि मग त्याच्या कडे पाहून म्हणाले " तुझं नाव काय ?"
    " रुद्र विद्याधर खाडिलकर "
    " म्हणजे ब्राम्हण आहेस होय ना ?"
    " हो."
    " मग तुला मुसलमान मुलीशीच लग्न का करायचं आहे ?"
     " कारण आम्हां दोघांचे प्रेम आहे."
     " प्रेम मिळविण्यासाठी काय करू शकतोस ?"
     " काही वाट्टेल ते."
     " इस्लाम धर्म स्वीकारशील ?"
     " हो."
     " इस्लाम धर्मा विषयी तुला काय माहीत आहे ?"
     " म्हणजे ?"
      " म्हणजे तुला नमाज पडायला लागेल."
      " नमाज पडायला येतं मला."
      " अरे वा ! नमाज पडून दाखव."
      निलोफर ने त्याला नमाज कसं पडतात ते शिकविले
होते. म्हणून रुद्र ने नमाज पडून दाखविले. त्यावर जफर
खान म्हणाला ," कलमा म्हणता येतात का ?"
     " हो."
     " म्हणून दाखव बरं." रुद्र ने कलमा ही म्हणून दाखविली. त्यावर खुश होऊन जफर खान खुश होऊन
म्हणाला ," फार छान ! परीक्षेत पास झालास तू जावई
म्हणून आम्हाला पसंद आहेस. आता जाऊ शकतोस तू."
आपल्या बापाने परवानगी दिली म्हणून इब्राहिम ही खुश
झाला. रुद्राला घेऊन तो आपल्या घरी आला नि त्या साऱ्यांना खुश खबर दिली. तश्या त्या मायलेखी पण खुश
झाल्या. त्यानंतर रुद्र आपल्या घरी जायला निघाला.

    जफर खान ने परवानगी दिली म्हणून सलीम आणि
अनवर दोघेही नाराज झाले. परंतु त्या दोघांची समजूत
काढत जफर खान म्हणाला," हे सर्व नाटक होतं."
      " नाटक होतं ?" सलीम आश्चर्य व्यक्त करत उद्गारला.
      " हां नाटक. कारण तसं नसतं केलं तर इब्राहिम च्या
मुलीने आपल्या हातावर तुरी दिल्या असत्या. कारण काल
रात्रीच मी तिच्या डोळ्यात जिद्द पाहिली."
    " म्हणजे ?"
    " मुलगी पूर्ण बापावर गेली आहे, आपली जिद्द पूर्ण
केल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून त्या सर्वांना गाफील
ठेवायचे आहे. रुद्र सेहरा बांधून येईल इकडे. तेव्हा त्याला
एका खोलीत बंद करायचं नि त्याचा सेहरा सलीम च्या
चेहऱ्यावर बांधायचा. सेहराच्या आड कोण बसला आहे
हे फक्त आपल्या तिघांनाच माहीत असेल. एकदा का निकाह झाला की तलाक दिल्याशिवाय तिची सुटका नाही.
इस्लाम धर्मात तलाक देण्याचा अधिकार फक्त पुरुषांना
आहे, स्त्रियांना नाही. त्यामुळे सलीम ला स्वीकारण्या
पलीकडे तिच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. "
    " वा अब्बू ! आपण तर अमरीश पुरीचे पण बाप निघालात."
     " आता जा आणि शांत बसा. पण हां आपल्या प्लॅन
विषयी आपल्या तिघां व्यतिरिक्त अन्य कोणाला माहीत
पडता कामा नये." त्यावर ते दोघे बाप-लेक खुश होऊन
आपल्या खोलीत निघून गेले.

     रुद्र घरी आला तर त्याची आजी त्याच्यावर चिडली.
म्हणाली ," कॉलेज कधीचेच सुटले. तू अजून कोठे होतास
रे ?"
   " अगं आजी मित्रा सोबत होतो मी !"
   " खरं सांगतोस ना, नाहीतर तुझा काही भरवसा नाही.
मित्रा सोबत आहे म्हणून सांगशील नि भलतीकडेच
असशील."
    " आता तुझा माझ्यावर जर विश्वासच नसेल तर किती
खरं बोललो म्हणून तुला पटणार आहे का ते ? नाही ना ?"
     " बरं बरं जा लवकर कपडे बदली करून फ्रेश होऊन
ये. सांज आरतीची वेळ झाली आहे. आरतीला हजर रहा."
     रुद्रा ने फक्त मान डोलावली नि जिना चढून आपल्या
खोलीत निघून गेला . खोलीत आल्यानंतर कपडे चैज केलं नि बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन खाली आला. तोपर्यंत आरतीची सारी तयारी झाली होती. रुद्र खाली येताच आरतीला सुरुवात झाली. आरती पूर्ण होताच सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. त्यानंतर रुद्र आपल्या खोलीत निघून गेला. तेव्हा त्याच्या पाठोपाठ प्रेम सुध्दा त्याच्या खोलीत शिरला. प्रेम ला  पाहून रुद्र ने विचारले ,
    "  अरे वा !  आज तू माझ्या खोलीत आलास ,काय विशेष ?"
    " विशेष काही नाही दादा, पण मला कळलं."
    " काय कळलं तुला ?"
    " तू आज निलोफर वहिनी च्या घरी गेला होतास ना ?"
    रुद्र ने अगोदर आपल्या आजूबाजूला  कोणी नाही याची खात्री करून घेतली नि मग त्याला हळूच म्हणाला,
    "  अरे हळू बोल ना , कोणी ऐकेलं म्हणजे ?"
     " इथं कोण आहे माझ्या नि तुझ्या शिवाय ?"
     " का ? आजी नाहीये ?"
     "  आजी इथं कशाला येईल ?"
     " तिचा काही भरवसा नाही,नको तिथं हजर होते ती."
     " बरं हळू बोलतो." असे म्हणून एकदम हळू आवाजात
त्याच्या काना जवळ आपले तोंड नेऊन म्हणाला," कशाला
बोलविले होते  त्यांनी ?"
      " म्हणाला की निलोफर शी लग्न करायचं असेल तर
इस्लाम धर्म स्वीकारायला लागेल."
      " मग तू काय म्हणालास ?"
      " काय म्हणणार, हो म्हणालो."
      " काय तू धर्मांतर करायला तयार झालास ?"
      " हो !"
      " तुला वेड बीड तर नाही ना लागलं ?"
      " नाही. का रे ?"
      " आजीला जर कळलं ना, घरातून हाकलून देईल ती
तुला."
     " माहिती आहे मला."
     " तरी पण तयार झालास ?"
     " हो. कारण प्रेम करणारे परिणामाची अजिबात पर्वा
करत नाहीत कधी !"
     " आता तू निर्णय घेऊनच झालास तर मी काय बोलणार म्हणा. पण एक सांगू तुला दादा !"
     " बोल ना ?"
     " मला ना काहीतरी गडबड वाटते."
     " कशाची गडबड ?"
     " वहिनी चा आजोबा इतक्या सहजासहजी तयार
झाला यावर विश्वासच बसत नाहीये माझा."
     " अरे सुरुवातीला माझा ही बसला नव्हता विश्वास
पण नंतर बसला."
      " कशावरून ?"
       " मी कलमा म्हटल्या, नमाज पडून दाखविले तेव्हा
त्याचा विश्वास बसला माझ्यावर."
      " म्हणजे तू त्यांच्या धर्माच्या कलमा पण म्हटल्यास ?
      " हो."
      " आणि नमाज ही पडलास ?"
       " हो.'
       " पण हे कळत नाही तू हे शिकलास कधी ? आणि
कोणी शिकविले ?"
       " प्रेम सर्वकाही शिकविते. म्हणचे तू नव्हे ! नाहीतर
म्हणशील मी कधी शिकविले ? प्रेम हा शब्दच किती गोड
आहे , मग त्याचे वर्णन किती सुंदर असेल ? कल्पना कर."
     " दादा , एक विचारु ?"
     " अवश्य !"
     " आजी ने भटजी चे काम शिकायला सांगितले तर
अगोदर शिकायला तयार नव्हतास. मग कुणास ठाऊक
कसा तयार झालास ते. परंतु  इस्लाम धर्माचे ही
शिकशील असं मला स्वप्नात ही वाटलं नव्हते."
     " अरे मी कशाचा शिकतोय तुझ्या होणाऱ्या वहिनी ने मला ते शिकविले म्हणाली कधीतरी कामाला येईल. आणि
आज खरंच ते कामी आलं."
     " पण शिकल्या मुळे हा मोठा फायदा झाला ना ? म्हणजे वहिनीच्या आजोबांनी घेतलेल्या परीक्षेत आज पास झालास  हो की नाही ?"
      " खरं म्हटलं ना, तर सर्व भाषा शिकायला पाहिजेत.
आणि सर्व धर्माचे ग्रंथ  ही वाचायला पाहिजे. म्हणजे ग्रंथात काय लिहिलंय ते माहीत पडते. नाहीतर धर्माचे ठेकेदार काही पण सांगतात. म्हणजे जे सांगतात तसे ग्रंथात ही लिहिलेलं ही नसतं."
    " एक विचारू दादा."
    " विचार ना ?"
    " समजा वहिनीच्या आजोबा कडून परवानगी मिळाली
तुमच्या लग्नाला पण हे तू आपल्या आईला नि बाबांना
कसं सांगणार ? म्हणजे त्यांना सांगावं तर लागणारच ना ?"
     " आई-बाबा काय लगेच समत्ती देतील. प्रश्न त्यांच्या
संमत्तीचा नाहीये. खरा प्रश्न आहे तो आजीचा. परंतु आजी
पण मान्य करील. पण थोडा वेळ लागेल. इतकंच."
   " हे तू कशावरून सांगतोस ?"
   " त्यासाठी सर्वात मोठे उदाहरण आहे आई-बाबाचं !
आई-बाबाचं तरी तिने अगोदर कोठे ऍक्सेप्ट केलं होतं
पण नंतर केलं ना ? तसं माझं ही करेल."
    " केलं तर चांगलंच आहे म्हणा. पण मला जरा मुश्किल
वाटतं."
   " असं वाटायचं कारण ?"
   " आई-बाबांचा धर्म एकच होता. फक्त जात वेगळी होती. परंतु इथं धर्म ही वेगळा नि जात ही वेगळी.म्हणून थोडसं अवघड वाटतं."
    " सब ठीक हो जाएगा क्योंकि समय है बलवान. वक्त
के साथ साथ बडे बडे जखम भी भर जाते है ।"

क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.