कुरुक्षेत्र ४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र ४ |
एक दिवस झाला. दोन दिवस झाले. असे लागोपाठ
पाच दिवस झाले. आईने काही दरवाजा उघडला नाही. शेवटी
नाईलाजाने दरवाजा मी तोडला. आई निर्विकार चेहऱ्याने अंथरुणावर निजलेली होती. मी तिचे चरण धरले आणि तिच्या चरणावर आपले डोके ठेऊन ढसढसा रडलो. आईने आपले डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहिले आणि
करुणामय स्वरात बोलले ," माझी शेवटी आज्ञा देखील मोडली ना तू ? तू कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण झाला नाहीस."
" आई तू मला मार माझा जीव घे. पण असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. प्लिज ऐक ना माझं ?" मी एकदम
आर्त स्वरात बोललो. त्यावर आई म्हणाली," शौनक रडू नकोस बाळ मला जायला हवं आता."
" आई तू असं नको ना बोलुस ? मला तू हवी आहेस ."
" किती स्वार्थी आहेस रे तू इतकी वर्षे राहिली मी तुझ्या
सोबत तरी अजुन रहा म्हणतोयस ? तुझ्या बाबांनी किती
वाट पहायची रे माझी. त्यांच्याकडे आता मला जायला नको का ?"
" आई ,मी तुझ्या इच्छे प्रमाणे करतो सारे,पण हा हट्ट सोड ना गं आई कृपा कर ना माझ्यावर एवढी." पण आई
काहीच बोलली नाही. एकदम स्तब्द झाली. म्हणून मी
डॉक्टराना फोन केला. डॉक्टर आले नि त्यांनी आईला तपासले आणि मग मला विचारले , " ह्यांनी अन्न पाणी वर्ज केले होते का ? " मी होकारार्थी मान आपली डोलावली.
डॉक्टर म्हणाले ," त्याना अशक्तपणा फार आलाय. तेव्हा
त्याना इस्पितळात ऍडमिट कारायला लागेल." मग मी लगेच
रुग्णवाहिका मागविली नि तिला इस्पितळात ऍडमिट केलं.
आणि वैधकीय उपचार सुरू झाले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि आई शुध्दीवर आली. परंतु थोडी ग्लांनीतच
होती. तिने डोळ्यांची उघड झाप केली. तसे मी तिच्या जवळ
बसत म्हणालो ," आई, तू रागवलीस ना माझ्यावर. मी खोटे
बोललो म्हणून."
" नाही रे,बाळ आईचा राग म्हणजे अळूच्या पानावरचे
पाणी. ते फार काळ ठिकत नाही पानावर. तसाच आईचा राग
पण असतो. बरं."
" आई हे तू खरे सांगतेस ना ?"
" अरे वेड्या मृत्यूच्या दारात उभी असलेली तुझी आई , तुझ्याशी खोटं का बोलेल ?"
" आई तू असं नको बोलुस , तुझ्या या बोलण्याने माझ्या
हृदयाला असंख्य वेदना होताहेत गं ? नको बोलुस ना असं."
" अरे वेड्या माझ्या न बोलण्याने सत्य बदलणार आहे का ?
" नाही आई मला तू हवी आहेस."
" वेडा आहेस का रे तू ? तुला जशी तुझी आई पाहिजे.
तसेच तुझ्या बाबांना त्यांची बायको नको का ? किती वाट
पहायची त्यांनी. अजुन किती दिवस तिष्ठत ठेऊ मी त्यांना.
ते तूच सांग बरं."
" आई तुला खरंच का गं दिसताहेत बाबा ?"
" हां ते बघ तेथे उभे आहेत. माझी वाट बघत." आईने बोट
केलेल्या दिशेने मी पाहिले. परंतु मला तेथे कुणीच दिसले नाही. तसे मी आईला म्हटले ," मला तर कुणीच दिसत नाही तेथे ? " तेव्हा आई म्हणाली ," तुला पण दिसतील. परंतु
आपल्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात त्याना पाहण्याचा प्रयत्न
केलास तर कदाचित दिसतील तुला." मग मी माझे दोन्ही
डोळे मिटून घेतले. तेव्हा माझ्या नेत्र चक्षुपटात एक धुरकट
आकृती दिसली. कदाचित ते बाबा असतील. कारण मी बाबांना व्यक्तीशः पाहिले नव्हते. फक्त त्यांचा लग्नाचा एक
फोटो भिंतीवर लटकत होता. तो फोटो फक्त मी पाहिला होता. तोच चेहरा माझ्या द्यानात होता. पण आता जी आकृती दिसत होती. ती फार तेजस्वी दिसत होती. मी पाहतच राहिलो. पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी ती
आकृती माझ्या नजरे समोरून नष्ट झाली. मग मी डोळे उघडून आईकडे पाहिले. तेव्हा मला आईने विचारले ," दिसले
का रे तुला तुझे बाबा ? " मी म्हणालो ," हो ,दिसले."
" आता मी काय सांगतो ते नीट ऐक ."
" ठीक. सांग."
" तू लग्न कर . अथवा करू नकोस. ती तुझी मर्जी ! लग्न
करच अशी कोणतीही जबरदस्ती मी तुझ्यावर करणार नाही. परंतु माझी शेवटची इच्छा म्हणशील तर ती एकच आहे आणि ती म्हणजे तू लग्न करावेस. बाकी तुझी इच्छा !"
असे म्हणून तिने आपली मान टाकली. ते पाहून अनामिक
भीतीने माझे मन एकदम थरथरले . मी लगेच डॉक्टराना पाचारण केले. डॉक्टरांनी तपासले नि म्हटले ," सॉरी ! शी इज मोर !" असे म्हणून त्यांनी आईचे उघडे असलेले डोळे झाकले आणि डॉक्टर तेथून निघून गेले. मी मात्र जडत्व झालेल्या नेत्राने आईच्या करुणामय चेहऱ्याकडे नुसता पाहतच राहिलो. माझे मन माझा धिक्कार करू लागले. ते मला म्हणू लागले की इतका कृतज्ञ कसा तू ? जन्मदात्या आईची एक इच्छा पूर्ण करू शकला नाहीस तू ? जन्मतःच आपल्या बापाचा जीव घेतलास तू आणि आता जन्मदात्या आईचा. जगात एकमेव पुत्र असेन मी की ज्याने आपल्या आई-वडिलांचा कर्दनकाळ ठरला. असा कुपुत्र जन्माला येण्यापेक्षा न आलेलाच बरा. आईचे ऋण फेडू शकलो
नाही मी. शेवटी कर्जदार ठरलो मी ! आपल्या आई-वडिलांचा.
मी आता पक्का निर्णय घेऊन टाकला. पत्नीला मरतेवेळी दिलेले वचन भंग झाले तरी चालेल. पण आईची
अखेरची इच्छा जरूर पूर्ण करायची असा विचार करून मी स्थळ पाहायला सुरुवात केली. पण प्रत्येक मुलगी एकाच गोष्टी मुळे नकार देवू लागली. ती गोष्ट म्हणजे माझ्याकडे असलेली प्रॉपर्टी माझ्या नावावर नसून माझ्या मुलाच्या नावावर होती. पण हे त्याना कसे कळले ? ते कुणास ठाऊक ? त्यांच्या पर्यंत ही कोण माहिती पूर्वत होता. ते काही
कळलं नाही. ही प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही हे फक्त काही लोकांनाच ठाऊक होते? जसा आमच्या कंपनीचा
सॉलिसिटर वकील मदनलाल चौधरी ! आणि त्याची एकुलती
एक मुलगी मानसी. मानसी दिसायला खूप सूंदर पण होती.
पण तिच्याकडे त्या दृष्टीने मी कधी पाहिले नाही. परंतु तिच्या मनात माझ्या विषयी काही नसेल ना ? म्हणजे, तिच्या मनात माझ्याशी लग्न करावयाचे असेल आणि मी दुसरीकडे स्थळ शोधतोय म्हणून ती किंवा तिचा बाप असे करत नसेल ना ? कुणी सांगावे ? करत ही असेल. नाहीतर आमच्या आधी आमच्या प्रॉपर्टी विषयी सारी माहिती वधू
पक्षाच्या घरी कशी पोहोचते ? प्रत्येक मुलीचा बाप मला हेच का विचारतो की ,तुम्हांला मुलगी द्यायला तुमचं स्वतःचं असं काय आहे ? तुमच्याकडे जे काय आहे ते तुमच्या सासऱ्यांच्या मालकीचे आहे आणि ते आता त्यांच्या नातवाच्या नावावर निश्चितच असणार आहे. अर्थात तुम्हांला आम्ही आमची मुलगी दिली तर आमच्या मुलीला होणाऱ्या बाळाचं काय ? तिच्या मुलांना त्या प्रॉपर्टी मधून फुटी कवढी पण मिळणार नाही. तेव्हा माफ करा ,आम्ही आमची मुलगी तुम्हांला देवू इच्छित नाही. असे अनेक वेळा झाले. मग मी ठरवले. खरे काय आहे हे जाणून घेण्यासाठी तिलाच प्रपोच केले. ती प्रथम लाजली नि म्हणाली ," सर, माझा नकार नाही
तुमच्याशी लग्न करायला उलट मी स्वतःला भाग्यवंत समजते. परंतु माझ्या वडिलांच्या संमत्ती मिळाल्याशिवाय मी तुमच्याशी लग्न करू शकणार नाही. तेव्हा प्रथम माझ्या वडिलांची भेट घ्या. त्याना विचारा त्यांचे मत काय आहे ते. जाणून घ्या. मगच माझ्याकडून येस वा नो उत्तर मिळेल तुम्हांला. " मी विचारात पडलो की अशी का म्हणाली असेल ? पण उत्तर नाही सापडले म्हणून मी तिला म्हणालो , " ठीक आहे , मी तुझ्या वडिलांची भेट घेतो."
त्यानंतर तिच्या वडिलांची मी भेट घेतली. तेव्हा तिच्या
वडिलांनी माझ्या जवळ पहिली अट ही ठेवली की ,
देवधरच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या मुलीच्या
नावावर व्हावी." त्यावर मी म्हणालो ," ती देवधरच्या नावावर आहे आणि त्या प्रॉपर्टीवर माझा काहीच अधिकार नाही. मला फक्त तो अठरा वर्षाचा होई पर्यंत सांभाळण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर संपूर्ण अधिकार देवधर चा राहील. माझा नव्हे !
" मग काय माझ्या मुलीच्या मुलानीे रस्त्यावर भीक मागावी
काय ? "
" भीक का मागतील ? माझा देवधर खूप गुणी मुलगा आहे. तो आपल्या भावंडांना उघड्यावर टाकणार नाही."
" सर , ही गोष्ट मला तुम्ही नका सांगू ? मी खूप अशा केसेस पाहिल्या आहेत. सख्खी भावंड एकमेकांचे कट्टर वैरी बनतात आणि हा तर सावत्र भाऊ आहे. त्याची खात्री कुणी द्यावी आणि कशी देऊ शकतो कुणी ? तेव्हा माफ करा हा मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे. मी असा इमोशनल होऊन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. "
मी लग्नाचा विषय मनातून काढून टाकला. त्यानंतर बरीच
वर्षे गेली परंतु मला पाहिजे तशी मुलगी काही सापडली नाही. देवधर आता पंधरा वर्षाचा झाला होता अजून तीन वर्षांनी तो अठरा वर्षाचा होणार होता. म्हणजे मी लवकरच पत्नीच्या वचनातून मुक्त होणार होतो. परंतु आईची इच्छा कशी पूर्ण करणार कारण प्रॉपर्टी माझ्या नावावर नसल्यामुळे
कुणीही आपली मुलगी मला द्यायला तयार नाही. मग माझ्या मनात एक भन्नाट कल्पना आली. ती अशी की अरेंज मॅरेज मध्ये जे होत नाही ते लव्ह मॅरेज मध्ये सहज होऊ शकते. प्रेम कधी संपत्ती ,पैसा अडका ,वय ,काही काही पाहत नाही. कारण प्रेम आंधळे असते. प्रेमात पडले युगल कोणतेही दिव्य करायला मागे पुढे पाहत नाही. अर्थात आपण अशी एखादी गरीब घरची मुलगी शोधावी म्हणजे ती आपल्या
प्रॉपर्टी वर नजर ठेवून प्रेम करणार नाही. अशी एखादी शोधू.
असा विचार करून मी अशा मुलीच्या शोधात होतो नि अशी
एक मुलगी सापडली. अत्यन्त गरीब घरची मुलगी होती.
म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये माझी प्राव्हेट सेक्रेटरी म्हणून
कामाला लागली. तिचे वय वीस वर्षअसावे. दिसायला सूंदर होती. चेहरा हसमुख होता. ती हसली की गालाला खळी पडत असे. कोणाशी ही बोलताना स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटत असे. तिचे नाव ही मानसी होते.
मानसी मला स्वतःकडे आकर्षित करू लागली. सुरुवातीला
मी तिला प्रतिसाद देत नव्हतो. परंतु नकळत मी सुध्दा तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो. का कुणास ठाऊक ?
दिवसरात्र माझ्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा दिसू लागला.
असं का व्हावे याचे कारण मला मिळेना. मग मी तिची चौकशी केली. तेव्हा मला समजले की ती एक गरीब घरची
मुलगी आहे. हीच आपली पत्नी बनण्यासाठी योग्य आहे, असे समजून मी ही तिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी
नवे नवे उपाय करू लागलो. तिला पार्टीला सोबत नेऊ लागलो. तिच्या बर्थडेला महागात महाग सोन्याचा हार गिप्ट
देऊ लागलो. त्या चाणाक्ष मुलीने ओळखले की मला काय
हवंय. मग तीही मला प्रतिसाद देऊ लागलो आणि खरे पाहायला गेले तर ती मला आपल्या जाळ्यात ओढत होती
नि मी समजत होतो की मी तिला आपल्या जाळ्यात ओढतोय. पण हे फार उशिरा कळले. पण त्या अगोदर
आमचे शारीरिक संबंध सुध्दा झाले.
त्यामुळे तिचे आता ऑफर वाढू लागलेत. चाळीत राहात होती म्हणून फ्लॅट घेऊन दिला. शँलरी वाढवून दिली. पण तिच्या ऑफर काही थांबत नव्हत्या. मी एके दिवशी तिला
म्हणालो ," असे किती दिवस नुसते प्रेमच करायचे ? चल लग्न
करून टाकू एकदाचे. " त्यावर ती म्हणाली ," लग्नाची काय
घाई आहे एवढी ? करू सावकाश. तुम्हांला हवंय ते मिळतंय ना ?" मला तिचा इशारा समजला. तिला काय म्हणावयाचे आहे ते. म्हणून मी तिला म्हटले ," एखादे वेळेस तुला दिवस गेले तर आपली बेअब्रू होईल." त्यावर ती म्हणाली ," त्याची
चिंता तुम्ही करू नका. मी पूर्ण सावधानता पाळून आहे."
मला समजले नाही. ती असं का म्हणाली. म्हणून मी तिला विचारले ," म्हणजे ? काय करतेस तू ?" त्यावर ती म्हणाली ,
" मी गर्भ निरोधक टॅबलेट घेते. त्यामुळे मला गर्भ राहण्याची
शक्यता नाहीये. " मला ऐकून माहीत होते की जास्त गर्भ निरोधक टॅबलेट खाणे पण चांगले नाही. नंतर गर्भधारणा होत नाही. मी तिला म्हणालो ," तू टॅबलेट घेऊ नकोस. त्या पेक्षा मी साधने वापरीत जाईन . पण लग्न करण्याचे मला कारण कळायला हवे." त्यावर ती मला म्हणाली ," मी माझ्या आईला वचन दिले आहे की माझी लहान भावंडे मोठी होऊन नोकरीला लागत नाही. तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तिला एक भाऊ आणि एक लहान बहीण होती. तिचा भाऊ माझ्या देवधरच्या वयाचा होता. तो मोठा होऊन नोकरीला लागे
पर्यंत थांबायचे म्हटले तर एका अर्थाने चांगलेच आहे म्हणा.
देवधर ही मोठा होईल ? म्हणजे माझ्या आईच्या नि
बायकोच्या वचनातून ही मी मुक्त होईन. असा विचार करून
मी लगेच तिला माझी संमत्ती दिली. ती पण खुश झाली. कारण तिच्या मना सारखे जे होत होते.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा