पंखरूपी मानव १०
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव १० |
त्यावर डॉ. विश्वजित बोलले ," तुम्ही माझ्या वडिलांना जिवंत ठेवले त्या बद्दल मी आपला आभारी आहे, आणि त्या उपकाराची जाणीव ठेवून मी आपली ऑपर स्वीकारत आहे, परंतु मला भारतातून काही माणसांना म्हणजे माझे असिस्टंट
आहेत त्यांना आणण्याची परवानगी मिळावी."
चंद्रसेन महाराज म्हणाले," तुम्हांला ज्याला कोणाला आणावयाचे त्याला आणा. परंतु ती माणसं प्रामाणिक असणे
जरुरीचे आहे."
" त्या बद्दल चिंता नसावी. ती माणसं एकदम विश्वासू आहेत. याची ग्वाही मी देतो."
" ठीक आहे, त्यासाठी आमची तुम्हाला पूर्ण अनुमती आहे."
" महाराज ,एक विचारू ?"
" अवश्य."
" पृथ्वीवर सर्वत्र लोकशाही सुरू झाली तरी तुमच्याकडे
अजून राज्यशाहीच सुरू आहे."
" होय. कारण लोकशाही मध्ये फक्त निवडणूकी पुरताच
लोकांचा विचार केला जातो आणि त्यानंतर निवडून आणलेली माणसेच म्हणजेच राज्यकर्ते त्यांच्या वर शासन करतात. काय अर्थ आहे अश्या लोकशाहीचा ? त्या पेक्षा आमची राज्यशाहीच चांगली. असे आम्हाला वाटते. आणि
आमच्या जनतेला ही वाटते. लोकांना विचारून पहा."
" ठीक आहे,महाराज त्या बद्दल आमची काही तक्रार
नाहीये. फक्त आमची एक विनंती आहे, की आम्हां भारतीयांना इथं राहण्याची परवानगी द्यावी."
" तुम्ही इथं राहू शकता ; परंतु आमचे आश्रित बनून."
" नाही. महाराज इथले आश्रित बनून नव्हे ! "
" मग ?"
" इथले नागरिक बनून."
" मग त्यासाठी तुम्हाला आमच्या देशातील कन्येशी विवाह
करावा लागेल. आणि दोघांपासून जी उत्पप्ती होईल. ती इथल्या वातावरणात नि भारतातील वातावरणात राहू शकते."
" वा ! ही तर फारच चांगली गोष्ट आहे."
" परंतु भारतातील लोक आमच्या लोकांना राहू देतील काय ?"
" भारत हा एक असा देश आहे की, तेथे कोणी पण येऊन गुण्या- गोविंदाने राहू शकतो. फक्त त्याला भारत देशा विषयी
प्रेम असायला हवे. परंतु भारतात असे काही घुसखोर येऊन राहू लागले आहेत की राहतात भारतात, खातात भारताचे पण गुण गातात आपल्या देशाचे. अशी माणसं भारतालाच काय कोणाला ही गरज नाहीये. परंतु तरीही अशी लोक राहताहेत आणि त्यांच्यावर कार्यवाही पण होत नाही. खरी तर हीच शोकांतिका आहे."
" खरे आहे तुमचं म्हणणे , आम्हांला सर्व ठाऊक आहे ते. म्हणूनचं आमच्या देशात कोणाला ही प्रवेश दिला जात नाही. तुम्हाला केवळ ह्यासाठी प्रवेश दिलाय की तुम्ही चांगले वैज्ञानिक आहात. शिवाय प्रामाणिक आहात असं आम्हाला वाटतं म्हणून."
" तुम्ही आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी आपला
अत्यन्त आभारी आहे. पण मला एक गोष्ट कळली नाही."
" कोणती ?"
" आमच्या घडलेल्या घटनेची माहिती तुम्हाला कशी
काय मिळते ?"
" जसे तुमचे वैज्ञानिक अंतराळात शोध घेत आहेत. तसे
आमचे ही वैज्ञानिक अंतराळात शोध घेत आहेत नि आमची
सर्व उपकरणे सूर्य ऊर्जेवर चालणारी आहेत. जसा तुमचा
बॉडीलेस सूर्य ऊर्जेवर चालतो. परंतु तुमचा बॉडीलेस मध्ये जरा अँडव्हास टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे रात्री सुध्दा तेवढ्याच पॉवरपुल ने तो काम करू शकतो. मात्र ती पॉवर आमच्या पाशी नाही. सूर्य अस्तला गेल्यानंतर आमची पॉवर
एकदम शीण होत जातेे ती सूर्य उदय होईपर्यंत. त्या अवधीत आमच्या देशावर कोणी आक्रमण केलं तर तो नक्कीच आमच्या देशावर विजय मिळवू शकतो,म्हणूनच आम्ही तुम्हाला इथं ठेवून घेण्याचे मुख्य कारण आहे . कारण तुमच्या शत्रूनी आता आमचा देश पाहिला आहे,अर्थात त्यांनी आमच्यावर आक्रमण करण्याची तयारी जोरात सुरू केली असेल , तेव्हा आपल्याला सुध्दा स्वत:चा बचाव करण्यासाठी जोरदार तयारी सुरू करायला पाहिजेल."
" ठीक आहे,मी लगेच त्या कामाला लागतो ; पण त्या
अगोदर मला लागणारे साहित्य आणायला पूर्वीवर जावे लागेल."
" अवश्य जा. त्यासाठी आमच्याकडे एक अद्भुभूत यान आहे. ते सूर्य ऊर्जेवर चालते. त्यात बसून तुम्ही पृथ्वीवर जाऊ शकता. अर्थात ते यान तुमच्या वडिलांचेच आहे, वीस वर्षांपूर्वी ते त्या यान मध्ये बसून इथं आले होते."
" म्हणजे तुम्हाला कळलं होतं की माझे वडील एक वैज्ञानिक आहेत. तरी तुम्ही त्याना कैद करून ठेवलेत इतकी
वर्षे , का बरं ?"
" नाही. ते एक वैज्ञानिक आहेत हे आम्हाला आता तुमच्या कडून समजले. आम्ही त्याना पृथ्वीवरील जासूद समजून कैद करून ठेवले. कारण वैज्ञानिक कधी एकटा येत
नाही. शिवाय त्याच्या बरोबर इतर काही उपकरणे असतात. म्हणजे अंतराळातील फोटो काढण्यासाठी कॅमेरा वगैरे... पण त्यांच्या जवळ तर काहीच नव्हते. मग आम्हाला त्यांचे म्हणणे खरे कसे वाटावे बरे ?"
" ठीक आहे, आता आपली परवानगी असेल तर आम्ही
बॉडीलेस ला पृथ्वीवर पाठवू शकतो का ?"
" अवश्य पाठवा. पण काम लवकर झालं पाहिजे."
" काम सुरू लगेच सुरू केले जाईल ; परंतु त्यासाठी लागणारे साहित्य .....
" ते इथं ही भेटेल."
" खरं ?"
" हो . इथं सर्वकाही आहे, फक्त त्याचा वापर करणारा
इथं पाहिजे. "
" इथं पाणी आहे ?"
" हो. पृथ्वीवर पाऊस पडतो. तसा इथं ही पाऊस पडतो. फरक फक्त इतकाच आहे, तुमच्याकडे काळे ढग पाऊस पाडतात. नि इथे पांढरे ढग पाऊस पाडतात."
" व्हेरी गुड."
" काय म्हणालात ?"
" चांगले आहे."
" ठीक आहे, सद्या तुम्ही ह्याच रूम मध्ये संशोधन सुरू करा. लवकरच तुमच्यासाठी एक भव्यदिव्य वाडा म्हणजे
प्रयोगशाळा बांधली जाईल. फक्त एक विनंती आहे तुमच्या जवळ आणि ती म्हणजे तुमचा बॉडीलेस आम्हाला पहायचा आहे."
" बरं." असे म्हणून डॉ. विश्वजित ने बॉडीलेस ला आदेश
दिला की प्रगट हो. " असे म्हणता क्षणी बॉडीलेस प्रगट झाला. त्याला पाहून सर्वांनी आपल्या तोंडात बोटे घातली. कारण बॉडीलेस सेम टू सेम दिसायला त्यांच्या सारखाच होता. ते पाहून त्या सर्वांनी डॉ. विश्वजित ची स्तुती केली. त्यानंतर बॉडीलेस ला सलीम आणि जॉन ला घेऊन येण्यासाठी पृथ्वीवर पाठविले. आणि स्वतः डॉ. विश्वजित आपल्या वडीला सोबत पंखरूपी मानवांच्या देशात फिरून अनेक बॉडीलेस बनविण्यासाठी त्याला लागणारे साहित्य गोळा करायला गेलं. परंतु त्याना हवे असणारे साहित्य तेथे सापडले नव्हते. म्हणून ते दोघे त्या जेट विमानात बसून पृथ्वीवर अवतरले. सर्व साहित्य घेऊन पुन्हा पंखरूपी मानवांच्या देशात परतले नि काम सुरू केले. तोपर्यंत बॉडीलेस सुध्दा सलीम आणि जीन ला पंखरूपी मानवांच्या देशात घेऊन आला. त्यानंतर काम जोरात सुरू झाले. दुसरीके प्रयोगशाळा पण बांधण्याचे काम सुरू झाले.
डॉ डेव्हिड अंतराळातून आपल्या धर्तीवर उतरताच
दुसऱ्या दुनिये बद्दल माहिती दिली. त्यामुळे वर्तमान पत्रात
रखानेचे रखाणे भरू लागले. सर्वत्र ही खबर पोहोचली.
त्यामुळे पंखरूपी मानवांच्या देशात जाण्यासाठी प्रत्येक देश
तयारी करू लागला. अमेरिका त्यात अग्रेसर होती त्यांनी
पंखरूपी मानवांना कैद करण्यासाठी एक विनाशकरी हत्यार
बनविले नि पंखरूपी मानवांच्या देशावर चढाई केली सुध्दा; परंतु डॉ. विश्वजित ने सर्वात प्रथम रिपोर्टर मशीन बनविली.
त्यामुळे पंखरूपी मानवांच्या देशावर अमेरिका आक्रमण
करणार आहे याची सूचना डॉ. विश्वजित ना अगोदरच मिळाली. त्यामुळे त्यानी लगेच बॉडीलेस ला आदेश की
संकटाचे निवारण कर. बॉडीलेस ते लोक आक्रमण करण्यापूर्वीच त्यांचे शस्त्र निकामी करून टाकली. आणि
डॉ. डेव्हिड पकडून चंद्रसेन महाराजा पुढे हजर केले.
चंद्रसेन महाराजांनी त्या लोकांना दोषी करार देऊन कारावासात डांबून ठेवण्याचा आदेश जाहीर केला. लगेच
सैनिकांनी त्याना पकडून तुरुंगात बंद केले. इकडे हा हा कार
उडाला म्हणजे अंतराळात गेलेले अंतराळवीर आहेत कुठे ?
ते त्यांच्या याना सहित गायब कुठे झाले ? का मारले गेले
असे अनेक प्रश्न पडले ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा