वंशवेल ६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंशवेल ६ |
घरी आल्यानंतर त्याने आपल्या आईला सांगितले की
आज मी एका मित्राच्या आईला ब्लडग्रुप ची गरज होती नि
माझा ब्लडग्रुप त्याच्या आईच्या ब्लडग्रुप शी मँच करत होता
म्हणून मी त्याच्या आईला माझं ब्लड दिलं परंतु मला हे कळत नाही की त्याची जर ती आई आहे तर त्याचा ब्लडग्रुप
त्याच्या आईच्या ब्लडग्रुपशी मँच व्हायला हवाय ना ?"
" त्यात काय विशेष नाही. त्याचा ब्लडग्रुप त्याच्या बापाच्या ब्लडग्रुपशी मँच होणारा असेल. आईचा नि बापाचा
सेम ब्लडग्रुप असणार नाहीये."
" अरे हां ,बरी आठवण केलीस. "
" कशाची आठवण ?"
" तुला एक सांगायचे राहिले. "
" काय ?"
" मी ज्याच्या आईला ब्लड द्यायला गेलो ना तो सेम
बाबा सारखाच दिसत होता. जणू तो बाबांचाच मुलगा."
तशी ती विचारात पडली. तेव्हा तिला आठवलं की तिचा
सवतीचा मुलगा त्यांच्या मोटारला अपघात झाला तेव्हा तो
नदीत पडला नि वाहून गेला होता. त्याचा मृतदेह सुध्दा सापडला नव्हता. अर्थात तोच तर हा मुलगा असेल ना ?
नाहीतर सेम चेहरा कसा असेल ? बहुधा तोच असावा. आणि
खरंच तो जर असला तर आपलं काही खरं नाही. लवकरच
खरं काय आहे ते शोधून काढले पाहिजे. असा विचार सुरू
असतानाच कुंज ने विचारले ,"अगं तू काय विचार करू लागलीस ? अशी असतात एकाच चेहऱ्यांशी माणसे."
" तुझी मोठी आई सुध्दा त्याच इस्पितळात ऍडमिट आहे
ना ?"
" हा मग काय झालं ?"
" त्यांनी पाहिलं नसेल का त्याला ?"
" त्याला कोणाला ?"
" अरे तू ज्याच्या आईला रक्त द्यायला गेलास ना त्याला?"
" बाबांच्या समोरच तर उभा होता."
" काय सांगतोहेस ? खरंच का ?"
" पण तू असं का विचारतेस मला ?"
" नाही काही नाही जा तू !" तो जसा बाहेर निघून गेला.
तश्या त्या स्वतःशीच विचार करू लागल्या. तिची आता पूर्ण
खात्री झाली की तो त्यांचा हरवलेलाच मुलगा असणार. खरं
काय ते इस्पितळातच जाऊन पाहायला हवं. असा विचार करून कुंज घरी आल्यावर त्याला समजावले की आपल्याला
इस्पितळात जायला हवं आहे."
" का गं आई ? कशासाठी ?"
" मला त्या मुलाला पाहायचं आहे."
" कशासाठी ?"
" कशासाठी काय ? तो तुझा हरवलेला भाऊ पण असू
शकतो ना ?"
" माझा हरवलेला भाऊ ....काय बोलतेस काय तू हे ?
नाही म्हणजे मला भाऊ कसा असेल ? मला तुम्ही अनाथालय मधून आणलेत ना ?" त्यावर त्यांनी मग घडलेली
सारी हकीगत सांगून टाकली. ते ऐकल्यानंतर कुंज म्हणाला,
" म्हणजे तुला म्हणायचंय की मी इस्पितळात ज्याच्या आईला मी ब्लड दिलं तो त्यांचा मुलगा नसून मोठ्या आईचा मुलगा आहे. म्हणजे माझा मोठा भाऊ !"
" हां ! म्हणून या पुढे तू आता शहाण्या माणसांना सारखा
वाग.नाहीतर तुझा बाप आपल्या हातावर अक्षता ठेवून हाकलून देईल घरातून."
" असं कसं हाकलून देतील ? त्यांनी लिहून दिली आहे
आपली अर्धी प्रॉपर्टी !"
" हो रे ,पण तू काही धंदा करत ही नाहीस पुढे कसं होणार याचा विचार केलास का कधी ? नाही ना ?"
" मग काय करायचं म्हणतेस ?"
" काही नाही फक्त माफी मागायची ! माफी मध्ये फार मोठी शक्ती आहे. माफी मागितल्याने सर्व गुन्हे माफ होतात."
" काय सांगतेस ?"
" खरं तेच."
" पण तू म्हणतेस तसं नसेल तर ! "
" ते नंतरचे नंतर पाहू ! नाहीतरी पण दोघे इस्पितळात तिला बघायला गेलो नाही. हे निमित्त सांगता येईल."
त्यानंतर ते दोघे मायलेक इस्पितळात गेले मोठीला पाहायला म्हणून गेले. तेथे त्यांनी त्या मुलालाही पाहिले. तेव्हा त्यांची पूर्ण खात्री झाली की हाच तो हरवलेला मुलगा.
परंतु खरे काय जाणून घेण्यासाठी त्यानी विचारले ," हा
तुमच्या सारखा सेम दिसतो नाही का ?"
" अगं दिसणारच मुलगा कोणाचा आहे ?"
" म्हणजे हरवलेला तो का ?"
" हां तोच आहे तो." तेव्हा त्यांनी कुंज ने आपल्या बापाचे चरणस्पर्श करून माफी मागितली. मी चुकलो.मला माफ करा. वगैरे-वगैरे पुरुषोत्तम ने त्याच्या खांद्याला पकडून वर उचलुन आपल्या मिठीत घेतले. त्यानंतर त्याची दीपकशी ओळख करून देत सांगितले की हा बघ तुझा मोठा दादा."
तसा तो खाली वाकून दिपकच्या ही पाया पडला. तेव्हा
त्याने त्याला आलिंगन दिले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा