वंशवेल - ५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंशवेल - ५ |
पुरुषोत्तम आता दुसऱ्या पत्नीकडे जाण्याचे टाळत असत.
परंतु प्रत्येक महिन्याला लागणारा किराणा माल दोन्ही ठिकाणी सारखाच भरून देत असत. पैशांची गरज लागली
की त्यांचा तो दत्तक पुत्र या घरी येई आणि बापाला चाकूचा धाक दाखवून पैसे घेऊन जाई ! स्वता मात्र काहीच करत नव्हता. फक्त उनाडक्या करणं आणि घरी येऊन दोन वेळचे जेवण गिळत असे. तो सरळ सांगायचा की तुम्हाला माझी गरज होती म्हणून तुम्ही मला आणलात मग आता पोसा मला आयुष्यभर ! " त्यावर कांताबाई त्याला समजविण्याच्या स्वरात म्हणे, अरे, पण आम्ही तुला लहानाचे मोठे केले याची तरी जाणीव ठेव." त्यावर बेधडक बोले की, काही उपकार नाही केले तुम्ही माझ्यावर , तुम्हालाच गरज होती म्हणून तुम्ही आणलेत मला. शिवाय तुमच्या अर्ध्या प्रॉपर्टीचा मालक आहे मी ! जसे म्हाताऱ्या ला काढलं ना घरातून तसे तुला ही काढेन. तेव्हा माझ्या कामात अजिबात दख्खल देऊ नकोस. काय म्हणतोय मी ?" कांताबाई मुकाट्याने हां म्हणाली.
त्यानंतर बरेच दिवसांनंतर मिराबाई आपल्या नवऱ्या सोबत कुठंतरी जात असताना मागून एका मोटारीने त्याना
धडक दिली. नि मागे न पाहता तो सरळ पळून गेला. पुरुषोत्तम ही घाईगडबडीत त्या मोटारीचा नंबर पाहू शकले
नाही. त्यांनी लगेच एका रिक्षे मध्ये त्याना घातले नि इस्पितळात त्याना ऍडमिट केले. डॉक्टरानी त्याना इमर्जन्सी वार्ड मध्ये दाखल करून घेतले नि लगेच वैद्यकीय उपचार सुरू केले. त्याच्या कमरेच्या खालचे हाड मोडले होते. ऑपरेशन करणे फार गरचे होते. प्रतीक्षाला दुर्घटनेची खबर लागताच ती आपल्या नवऱ्यासह इस्पितळात आली.
त्यांनी आपल्या सासऱ्या ला आश्वासन दिले की चिंता करू
नका. मम्मीच्या ऑपरेशन जो खर्च येईल तो सर्व मी करेन."
दिवसा ते स्वतः इस्पितळात राहत असत आणि संध्याकाळी मात्र प्रतीक्षा ला जावे लागे. परंतु कांताबाई किंवा
तिचा तो पुत्र एकदा सुध्दा चौकशी साठी इस्पितळात आले
नाहीत.पुरुषोत्तम संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वतःच्या
हाताने स्वयंपाक करत असत जेवत असत, सकाळी आपल्या
पत्नीसाठी काहीतरी नाश्ता बनवुन घेऊन जात आणि दुपारी
हॉटेल मधून काहीतरी घेऊन दोघे नवरा-बायको जेवण करत
असत.एके दिवशी एक पेशंट इस्पितळात आला. म्हातारी बाई होती. तिच्या सोबत तिचा नवरा आणि एक मुलगा होता.
परंतु मुलगा दिसायला सेम तू सेम पुरुषोत्तम सारखाच होता.
पुरुषोत्तम मोठ्या आश्चर्याने त्या मुलांकडे पाहू लागले नि
त्याच्या बापाकडे पाहून त्याना जाणवले की या माणसाला
आपण कुठंतरी पाहिलंय पण कुठं ते द्यानात येत नव्हते.
त्या मुलाच्या आईला कुणाचा तरी गर्दी मध्ये धक्का बसला ती जमिनीवर कोसळली होती. जख्मी अवस्थेत तिला इस्पितळात आणण्यात आले. तिला खूप लागलं होतं. इमर्जन्सी वार्ड मध्ये दाखल करून तिच्या ऑपरेशन तयारी सुरू झाली. तिला ब्लड ची गरज होती. तो ब्लड ग्रुप इस्पितळात उपलब्ध नव्हता. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला ,
" माझा ब्लड ग्रुप चेक करा नि पाहिजे तेवढे ब्लड घ्या. पण माझ्या आईला वाचवा." त्यांचे ब्लड चेक केले असता त्याचा ब्लड ग्रुप त्याच्या आईच्या ब्लड ग्रुप शी मँंच होत नव्हता. म्हणून डॉक्टरानी तिच्या नवऱ्याचा ब्लड ग्रुप चेक केला. तोही मॅच होत नव्हता. तेव्हा डॉक्टर आश्चर्याने म्हणाले ," हा मुलगा नक्की तुमचाच आहे ?" त्यावर गोंधळून त्या माणसाने विचारले , " हो आमचाच आहे परंतु तुम्ही असं का विचारता ?"
" मी यासाठी विचारतो की मुलाचा ब्लड ग्रुप आई-वडिलांच्या ब्लड शी मॅच व्हायलाच पाहिजे."
" म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला ? ब्लड ग्रुप मॅच नाही
झाले म्हणजे तो आमचा मुलगा नाही.असे कसं म्हणू शक्यता
तुम्ही ?" तेव्हा मघापासून चुपचाप डॉक्टरांचे ती त्याचे होत
असलेले संभाषण ऐकून पुरुषोत्तम आपल्या जाग्यावरून
उठले नि त्या माणसा जवळ येत म्हणाले ," डॉक्टर म्हणतात
ते बरोबर आहे , तो मुलगा तुमचा नाहीये. तुम्ही तो चोरला
आहे." तेव्हा मुलगा पुरुषोत्तम जवळ येत म्हणाला ," ओ काका तुम्ही माझ्या वडिलांवर भलतेच आरोप लावू नका."
" मी आरोप करत नाहीये तर खरं तेच सांगतोय. तू
त्यांचा मुलगा नाहीस तर माझा मुलगा आहेस ."
" कशावरून सांगता तुम्ही हे ?"
" त्याला दोन भक्कम पुरावे आहेत. ते म्हणजे तुझा " चेहरा माझ्या चेहऱ्याशी मॅच होतोय."
" त्यात काय एकाच चेहऱ्याची दोन माणसे असतात जगात. हा काय पुरावा होऊ शकत नाही."
" चेहरे एक सारखे असू शकतात. पण ब्लड ग्रुप एक
सारखे असू शकत नाही.शिवाय ह्या माणसाला मी ओळखतो." असे म्हणताच तो मनुष्य कावराबावरा झाला.
तुम्ही नदीच्या पुला जवळ राहता ना ?"
" हो मग त्याच काय झालं ?"
" पस्तीस वर्षांपूर्वी नदीच्या पुलावर माझ्या मोटारीला
अपघात झाला नि माझा मुलगा नदीत पडला. तोच हा मुलगा
विचार तुझ्या वडिलांना. मी ह्यांच्या घरी विचारायला गेलो
होतो की नाही ? " तसे त्या मुलाने आपल्या वडिलांना विचारले ," बाबा हे खरं आहे का ?" पण तो म्हातारा बोलायलाच तयार नाही. तसा तो पुढे म्हणाला ," बाबा तुम्ही
अजिबात घावरू नका. खरे काय ते सांगा."
" अजून एक पुरावा म्हणजे आम्हां दोंघांची DNA टेस्ट
करा लगेच सत्य उघडकीस येईल." तेव्हा त्या माणसाने
पुरुषोत्तम चे पाय धरत म्हटलं ," मला क्षमा करा. मला
मुलंबाळं नव्हते म्हणून तुमचा मुलगा मी परत नाही केला.
परंतु मी हे मुद्दाम नाही. जेव्हा तो पाण्यात पडला तेव्हा
पुलाच्या खाली पाण्यातच होतो. त्या मुलाला घेऊन तुम्हाला
देण्यासाठी तुमच्या मोटारी जवळ आलो तेव्हा मी पाहिले
की तुम्ही दोघेही बेशुध्द होता. मला वाटलं तुम्ही दोघेपण
मृत पावलात म्हणून मी त्या मुलाला स्वतःच्या घरी घेऊन गेलो. आम्हाला वाटलं की आम्हां निपुत्रिकाना देवानेच दिले
सांभाळायला. परंतु चार दिवसानंतर आपल्या मुलाचा
शोध घेत माझ्या घरी आला ; परंतु तोपर्यंत आम्हाला त्या
मुलाचा लळा लागला होता. आणि मोटारीत तुमच्या सोबत
एक मुलगी पाहिली होती, म्हणून मी म्हटलं एक आहे ना तुमच्याकडे मग हे बाळ माझयाकडे राहू दे. असा विचार करून मी तुम्हाला खोटे सांगितले. परंतु आता माझी पत्नी
मृत्यूशी झुंज देत अशावेळी माझ्यावर दया करा नि ह्या मुलाला तुम्ही आपला मुलगा म्हणू नका."
" असा कसा नाही म्हणू मी ! आम्हाला पण तर हा एकच
मुलगा आहे."
" आणि दुसरी मुलगी होती ती.?"
" तिचे लग्न झाले. ती आपल्या सासरी सुखाने नांदते आहे."
" पण हे बाळ आमच्याकडे राहू दे नाहीतर माझी पत्नी
वाचणार नाही."
" माझी पाणी या ऍडमिट आहे, तिला कळलं तर तीही
जिवंत राहणार नाही." तेव्हा डॉक्टर वैतागून म्हणाले ," ते
तुमचं तुम्ही नंतर बघा काय ते. अगोदर ब्लड चा बंदोबस्त
नाहीतर केस वाचणार नाही." तेव्हा तो मुलगा म्हणाला ,
" थांबा. मी माझ्या मित्राला फोन करतो, त्याचे बरेच मित्र
आहेत, कुणाचा तरी ब्लड ग्रुप आईच्या ब्लड शी मॅच होणार
असेल. " असे म्हणून त्याने आपल्या एका मित्राला फोन केला. आणि त्याने आपल्या आईचा ब्लड ग्रुप सांगितला.
तेव्हा त्याचा तो मित्र म्हणाला ," माझ्या एका मित्राचा ओ प्लस आहे ब्लड ग्रुप आहे आता घेऊन इस्पितळात ?
कोणते इस्पितळ ते सांग." मग त्याने इस्पितळाचे नाव आणि
पत्ता सांगितला. आणि थोड्याच तो आपल्या मित्राला घेऊन
हजर झाला. तो मुलगा दुसरा कुणी नसून पुरुषोत्तमचा दत्तक
पुत्र कुंज होता, त्याला पुरुषोत्तम मनातल्या मनात म्हणाले,
" नशीब तेवढी तरी माणुसकी आहे." आपल्या बापाला
पाहून त्याला वाटले की आपल्या सावत्र आईला ब्लड पाहिजे .अर्थात तो नाहीच म्हणणार होता. परंतु दीपक
पुढे होऊन म्हणाला ," माझ्या आईला ब्लडची गरज आहे."
तेव्हा त्याने आपले ब्लड दिले. परंतु आळीपाळीने आपल्या बापाकडे नि दीपक कडे पाहत होता दोघांचा चेहरा
दोघांच्या चेहऱ्या मध्ये एवढे साम्य कसे ? परंतु बोलला मात्र
काहीच नाही. दीपक ने त्याचे आभार मानले तसा तो निघून
गेला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा