महाकाल ६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाकाल ६ |
रात्रीची जेवणे झाली नि सर्वजण आपापल्या खोलीत
झोपायला गेले. तशी सौंदर्या सुध्दा आपल्या खोलीत
झोपायला गेली तेव्हा तिला राहून राहून एकच गोष्टीची
चिंता होती की तांत्रिक महाराज जे म्हणाला ते खरंच
खरं होईल का ? विवेक खरंच येईल का आपल्या घरी ?
असा विचार करत सौंदर्या पलंगावर पडून विचार करत
होती. विचार करता करता तिचा डोळा लागला. आणि
थोड्या वेळाने खट्ट असा आवाज आला नि दरवाजा उघडला. तशी सौंदर्या ला पण जाग आली. भीतभित तिने
हळूच डोळे उघडले. बेडरूम मध्ये काळोख असल्याने
एक काळी आकृती तिच्या जवळ येत असलेली तिला दिसली. त्या आकृती ला पाहून तिच्या पोटात एक भीतीने गोळा उठला. काय करावे ते तिला सुचेना. इथून पळून जावे का इथंच थांबावे ? पण पळणार तरी कसं ? ती आकृती तिच्या अगदी जवळ आली होती. तशी तिच्या हृदयाची धडधड अधिक वाढली. तिला वाटले की आपण
मोठ्या ने ओरडावे म्हणजे कोणीतरी मदतीला पळत
येईल असा विचार करून ती मोठ्या ने ओरडणार होती.
पण त्या अगोदरच त्या काळ्या आकृतीने तिच्या तोंडावर आपला एक हात ठेवला नि ती काळी आकृती उद्गारली ,
" ओरडू नकोस मी आहे विवेक ?" आवाज
ओळखीचा वाटला तशी ती सुखावली आणि पटकन
उठून ती त्याला बिलगली. थोड्या वेळानंतर ती त्याला
आपल्यापासून दूर लोटत म्हणाली," चल बोलू नकोस
माझ्याशी ?" त्यावर विवेक ने विचारले ," का ? काय झालं ?"
" तू आधी मला हे सांग, तू असा चोरा सारखा का
आलास ? तुला माहितेय मी किती घाबरली होती ?"
" पण घाबरायचं काय कारण ?"
" इतक्या रात्री कुणी येतं का बायकोला भेटायला ?"
" रात्रीच तर भेटतात नवरा बायको नाहीतर वेळ कुठं
असतो त्या दोघांना एकत्र येण्याचा."
" त्या अर्थाने नाही म्हणत आहे मी !"
" मग कोणत्या अर्थाने म्हणतेस ?"
" अरे आता वाजले किती ?"
" किती म्हणजे बारा वाजले असतील."
" तेच तर म्हणतेय मी , तुला जर यायचंच होतं तर संध्याकाळी सगळ्यांसमोर यायचं होतं ना ? आता मम्मी-पप्पा काय म्हणतील बरं ?"
" काहीही म्हणणार नाहीत कारण त्या इथं यायच्या
अगोदर मी इथून निघून जाईन."
" पण असं का करतो आहेस तू ?"
" ते मला ही नाही सांगता येणार ?"
" म्हणजे तो तांत्रिक म्हणाला ते खरं आहे तर !"
" काय म्हणाला तांत्रिक ?"
" हेच की तुला त्या महाकाल ने झपाटले आहे म्हणून."
" मला का तुला ?"
" मला नाही तर तुला झपाटले आहे त्या महाकाल ने."
" खोटं साफ खोटं !"
" असं तू म्हणतेस माझ्या आईला तांत्रिक ने असं
सांगितले की तुला एका समंधाने झपाटले आहे म्हणून "
" आणि माझ्या आईला त्या तांत्रिका सांगितले की तुला
त्या महाकाल ने झपाटले आहे म्हणून."
" कोण महाकाल आणि त्याचा इथं काय संबंध ?"
" संबंध नाही कसा ? तुला आठवतं नाहीये का ?
ज्या महाकाल ने धनराज आणि त्याच्या मित्रांना जीवानिशी ठार मारलं होतं, आणि तुला ही ठार मारणार
होता.पण अजय ने तुला नि मलाही वाचवलं."
" गुहे मधल्या तांत्रिक महाकाल बद्दल बोलते आहेस का तू ? "
" हां ! मग तुला काय वाटलं ? "
" मला काय वाटलं ते महत्वाचे नाहीये. मला हे सांग
तो महाकाल इथं कसा येइल बरं ? म्हणजे मला म्हणायचंय
की तो महाकाल तर मेला होता ना ?"
" हां पण तो आता भूत बनला ना ? आणि त्याच्याच आत्म्याने आता तुला धरलं आहे."
" असं कोण म्हणतं ?"
" ज्या अजयने आपल्याला वाचविले होते ना, तोच आता तांत्रिक बनला आहे."
" काय सांगतेस ?"
" हां ना ? आज आम्ही गेलो होतो त्याच्याकडे.त्यानेच
आम्हांला हे सांगितले."
" मग त्याला सांगायचं ना की महाकाल चा बंदोबस्त
कर म्हणून."
" सांगितले ना ?"
" मग काय म्हणाला तो ?"
" बंदोबस्त नाही होणार म्हणून."
" का नाही होणार म्हणून विचारायचंस ना ?"
" विचारलं ना ?"
" मग काय म्हणाला तांत्रिक महाशय ?"
" म्हणाला की महाकाल महाशक्तीशाली आहे, त्याचा बंदोबस्त करणे माझ्या शक्तीच्या बाहेर आहे म्हणून."
" मग कसला तांत्रिक म्हणायचं त्याला ?"
" ते जाऊ दे. मला आधी ह सांग दरवाजा आतून बंद असताना तू आंत आलास कसा ?"
" दरवाजा बंद होता......कायपण काय सांगतेस ?"
" काय पण नाही सांगत..... खरे तेच सांगते."
" असं कसं होईल ? मी दरवाजाला हात लावताच
दरवाजा उघडला."
" तेच तर म्हणतेय मी, दरवाजा आंतून स्वतः मी बंद
केला होता. तो आपोआप उघडला कसा ?"
" ते माहित नाही मला; पण दरवाजा उघडा होता हे
खरं आहे."
" मला तर चांगले आठवते आहे की रूमचा दरवाजा मी
स्वतः बंद केला. तो उघडा कसा असेल शक्यच नाहीये.
बरं ते जाऊ दे .बाहेरचा दरवाजा कोणी उघडला ते तर
सांग. एक वेळ हा दरवाजा उघडा राहू शकतो पण बाहेरचा
दरवाजा तर उघडा राहणार नाही नाही ?" तेव्हा विवेक
आठवण्याचा प्रयत्न करतो की दरवाजा उघडा होता का बंद ? पण त्याला काहीच आठवेना. तशी सौंदर्या उद्गारली," नाही ना आठवत याचाच अर्थ तुझ्या शरीरावर त्याने ताबा मिळविला आहे आणि तो हे सर्व तुझ्या कडून करून घेतोय." त्यावर विवेक म्हणाला, " हां ग तू म्हणतेस ते थोडं थोडं मला पटू लागलं म्हणजे मी घरून केव्हा आणि कसा निघालो आणि इथं कसा येऊन पोहोचलो हे मला खरंच कळलं नाही; बेडरूम चा स्विच ऑन कर. आणि स्वतःची खात्री करून घे. दरवाजा उघडा आहे का बंद आहे , कारण मी तर दरवाजा बंद केलेला नाहीये."
असे म्हणताच सौंदर्या ने विद्युत बटन ऑन केला. रूममध्ये प्रकाश पडला. दरवाजा कडे दोघांनी पाहिलं तर दरवाजा आतून बंद होता. हे पाहून दोघांना आश्चर्याचा धक्का बसला. विवेकला पण प्रश्न पडला की असं कसं होईल ? मी आलो तेव्हा दरवाजा उघडा होता मग आपोआपच बंद कसा झाला ? विवेक पुरता गोंधळला. पण त्याला काहीच कळेना, की हा चमत्कार कसा घडला ? तेव्हा सौंदर्या म्हणाली," दरवाजा अजून ही बंद आहे, आणि तू दरवाजा बंद केला नाहीस असं ही म्हणतोस मग मला आता सांग दरवाजा आंतून बंद कोणी केला ?" परंतु या प्रश्नाचे उत्तर विवेक कडे नव्हते. तेव्हा सौंदर्या म्हणाली ," माझी मम्मी म्हणते ते खरंय. "
" काय म्हणाली मम्मी ?"
" हेच की तुला एका भुताने झपाटले आहे."
" पण माझी तर मम्मी म्हणतेय की तुला समंधाने झपाटले आहे."
" पण आता खरं काय आहे ते कळलं ना ?"
" ते खरं गं पण आता मम्मी-पप्पांना काय सांगायचं ?"
" जे खरं आहे ते सांगून टाकायचं."
" ठीक आहे; आता मम्मी-पप्पा झोपलेले असतील
आपण सकाळी बोलू त्यांच्याशी !" असे म्हणून सौंदर्या
त्याला बिलगली. तेव्हा विवेक ने तिला आपल्या मिठीत घेतले ; पण थोड्या वेळानंतर मात्र तिला त्याचा स्पर्श वेगळा जाणवू लागला तशी ती समजली की आता आपल्या सोबत जो आहे तो विवेक नाहीये. ती त्याला आपल्या पासून लोटू पाहते पण तिला ते शक्य नाही. त्याची पकड अजून घट्ट होत गेली मग काय इच्छा नसून तिला त्याच्या पुढे शरणागती पत्करावी लागली. कारण त्याचा तो स्पर्श तिला वेडावत होता. एकदम धुंद करत होता. क्षणापूर्वी नको हवा असलेला स्पर्श आता हवाहवासा वाटू लागला. त्याचे सर्वांगावर फिरू लागले होते. तशी ती ही त्याला साथ देऊ लागली होती. सर्वकार्य
भाग आटोपल्यानंतर विकेकच्या शरीरातून एक काळी आकृती बाहेर पडतांना तिला दिसली. तेव्हा तिला जाणीव झाली आपले शाररिक संबंध एका आत्म्याशी झालेत ; पण करणार काय त्याला काहीच इलाज नव्हता.
तिने वळून विवेक कडे पाहिले तेव्हा विवेक तिच्या शेजारी गाड झोपेत असल्याचे तिला जाणवले. तेव्हा तिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले की जर आपले शाररिक
संबंध एका प्रेत्म्याशी होत आहेत तर त्या प्रेत्म्यापासून आपल्याला दिवस गेलेत तर आपल्याला होणारे मूल
कसे असेल ? ते मूल भूतां सारखे भयंकर तर असणार नाही ना ? छे छे छे ! असं कसं होईल बरं ? पण तो
महाकाल तर आपल्याला म्हणाला आहे ना, त्याच्या पासून
मला मूल होईल म्हणून. नाही नको त्याना भूतांचे मूल नकोच आहे आपल्याला ? त्यापेक्षा मी गर्भपात करून टाकीन. ती विवेक ला उठविण्याचा प्रयत्न करते पण तो काही उठला नाही,उलट झोपेतच तो म्हणाला," झोप गं आता मी फार दमलो आहे." असे म्हणून त्याने आपली कूस बदलून तिच्या कडे पाठ केली नि झोपी गेला. तशी मनातल्या मनात वैतागून म्हणाली," काय करू मी विवेक चे ? कसं समजावू मी ह्याला ? की आपल्या सोबत काय घडतंय ते. विचार करता करता तिचा कधी डोळा लागला हे तिला कळलेच नाही. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तिला जाणवले की दरवाजा कोणीतरी ठोठावत आहे. तशी ती चट्कन उठली. तशी तिला जाणीव झाली की आपल्या
शरीरावर वस्त्रे नाहीत. तिने तिच्या बाजूला पडलेली वस्त्रे
उचलली नि परिधान केली नि विवेक ला उठविण्याचा
प्रयत्न केला ; परंतु विवेक काही उठेना, नाईलाजाने शेवटी
तिने त्याच्या अंगावर चादर ओढली नि आपले केस ठीक
ठाक करत दरवाजा जवळ गेली नि दरवाजा उघडला.
दरवाजात तिची आई सुशीला बाई होत्या. त्यांनी तिला
विचारले ," काय गं दरवाजा उघडायला इतका उशीर का
झाला ?" त्यावर ती सारवासारव करत म्हणाली," त्याचं
काय आहे ममी मला ना, रात्री झोपच लागत नव्हती.
फार उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला."
परंतु तिच्या आईला ती खोटं बोलत असल्याचे जाणवले.
कारण तिच्या कपाळावरील टिकली सुध्दा नेहमीच्या जागी नव्हती म्हणून त्यांना संशय आला नि त्याना त्या तांत्रिकाने
सांगितलेली गोष्ट पण आठवली तश्या त्या म्हणाल्या,
" जावई आले आहेत का रात्री ? " आता तिची पंचाईत झाली तिला नाही पण म्हणता येईना आणि हो पण म्हणता येईना ती काहीही उत्तर देत नाहीये हे पाहून सुशीला बाई समजल्या. त्यांनी तिला जबरदस्ती बाजूला केलं नि आंत शिरल्या. त्यांचा संशय खरा ठरला. पलंगावर झोपलेल्या विवेक ला पाहून सुशीला बाईंनी विचारले की जावई बापू किती वाजता आलेत गं रात्री ?" तेव्हा सौंदर्या अडखळत म्हणाली ," रात्री बारा वाजता." तश्या त्या उद्गारला," बघितलेस तांत्रिक महाराज काय म्हणाले होते
त्यांचे म्हणणे खरे ठरले ना ? "
" हो ममी !" सौंदर्या उद्गारली.
" बाहेरचा दरवाजा पण तूच उघडला असशील होय ना ?"
" नाही. मी नाही उघडला."
" मग कोणी उघडला ?"
" दरवाजा उघडाच होता, असं ते म्हणाले,
" शक्यच नाही.दरवाजा मी स्वतः बंद केला होता."
" नाही म्हणजे दरवाजा कोणी उघडला आणि ते कसे आंत आलेत या बद्दल मला काहीच माहीत नाही."
" दरवाजा तू नाही उघडलास नाही मी उघडता मग तुझा
नवरा आंत आला कसा ?"
" माहीत नाही मम्मी!"
" याचा अर्थ तांत्रिक महाराज म्हणाले ते खरं आहे."
" हां मम्मी ! ते खरंय पण आता काय करायचं आपण ?"
" त्याने तुला काही केलं तर नाही ना ?"
" नाही. तसं तर काही नाही केलं. पण मला ना, फार भीती वाटते."
" कशाची भीती वाटते ?"
" मी प्रेग्नेंट राहिली नि मला त्या महाकाल पासून मूल
झालं तर ?"
" काहीतरीच काय बोलतेस, भुता पासून मुलं होतात का
कधी ?"
" असं मी ऐकलंय कुठंतरी !"
" बरं बरं तू एक काम कर, त्याला अजिबात उठवू नकोस. त्याच्या आईला मी आता बोलावून घेते."
" ते कशासाठी ?"
" कशासाठी म्हणजे तिला दाखवून द्यायचे आहे, काल
तिने तुझ्यावर आरोप केला होता ना, की तुला समंधा ने
झपाटले आहे म्हणून. तिला आज मी दाखवून देईन की
माझ्या मुलीला नाहीतर तर तिच्याच मुलाला झपाटलेय
त्या महाकाल ने."
" अगं मम्मी त्याने काय फरक पडलाय ? समंधाने
मला झपाटले काय किंवा महाकाल ने विवेक ला झपाटले
काय ? अर्थ एकच ना ?"
" वा ! अर्थ एकच कसा ? प्रत्येकाला ज्याची त्याला
चूक दाखवून द्यायलाच हवी. म्हणून मी सांगते तसं कर.
त्याला उठविण्याच्या भानगडीत पडू नको. तू स्नान कर
आणि लवकर ये खाली मी पाहते काय करायचं ते." असे बोलून त्या मागे वळल्या. सौंदर्याच्या मनात आले की विवेक ला उठवायला हवं. कारण जे काही झालं त्यात विवेक चा काही दोष नाहीये. परंतु विवेक ला उठविले तर मम्मीला राग येईल. काय करूं ?" किंचित विचार करून ती स्वतःशीच उद्गारली," नाही नको असं केलं तर मम्मी रागवेल ? " तसा लगेच दुसरा विचार आला की , पण जर
विवेक ला आपण नाही उठविले तर त्याची पत्नी या नात्याने आपण आपले कर्तव्य केलं नाही असं होईल ना ?" असा विचार ती त्याला उठवायला जाते तसा तिच्या
आईचा आवाज तिच्या कानी पडला. तिची आई तिच्यावर
रागवत म्हणाली," अगं काय म्हणाली होती मी तुला त्याला
उठवू नकोस म्हणून ना ? पण तरी देखील.....?"
सौंदर्या नाईलाजाने प्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये शिरली. सुशीला बाई जिना उतरून खाली हॉल मध्ये आल्या. त्यांनी लॅन्ड लाईन वरून विवेकच्या आईला फोन केला नि त्याना सांगितले की तुमचा मुलगा या क्षणी आमच्या घरी आहे, प्रत्यक्ष येऊन पहा."
" असं कसं होईल. तो तर आपल्या खोलीत झोपला
आहे."
" हो का ? मग जाऊन पहा. आता आहे का तो आपल्या खोलीत ?"
" ठीक आहे, आता पाहून सांगते." असे म्हणून त्यांनी
रिसिव्हर बाजूला ठेवला नि विवेकच्या बेडरूमकडे गेल्या
पण विवेक आपल्या बेडरूम मध्ये नव्हता. हे पाहून त्यांच्या मानत एक विचार आला की सुशीला बाई म्हणतात
ते खरं तर नाही ? छे छे छे ! असं नसेल. लगेच त्यांच्या
मनात एक विचार आला की कदाचित बाथरूम मध्ये असेल म्हणून त्यांनी बाथरूम चेक केला. परंतु बाथरूम मध्ये ही कोणी नव्हता. तश्या त्या समजल्या की सुशीला बाई जे सांगत आहेत ते सत्य असावे. असा विचार करून त्या हॉल मध्ये आल्या नि रिसिव्हर उचलला नि हॅलो म्हटलं. तश्या सुशीला बाई उद्गारल्या," काय झालं ? जावई बापू घरी आहेत का ? नाही ना ? मग आता एक काम करा, आटो रिक्षेत बसा नि सरळ निघून या आमच्या घरी !" असे म्हणून त्यांनी फोन कट केला. राधाबाईचा आता नाईलाज होता. त्यांनी एक रिक्षा पकडली नि सुशीला बाईंच्या घरी आल्या. तश्या त्या सुशीला बाई त्याना घेऊन विवेक झोपलेल्या खोलीत आल्या. परंतु विवेक तेथे नव्हता. हे पाहून राधाबाईंना फार आनंद झाला. पण लगेच राग प्रगट करत त्या म्हणाल्या," कोठे आहे माझा मुलगा ? "
" अहो, आता थोड्या वेळापूर्वी तर इथंच होते जावई बापू !"
" इथंच होता तर गेला कुठं ?"
" थांबा. बाथरूम मध्ये असेल." असे म्हणून त्या दोघी
बाथरूम चेक करायला जातात. पण तिथं ही विवेक नव्हता. ते पाहून त्यांच्या मनात एक विचार आला की
थोड्या वेळापूर्वी इथं होता तर आता लगेच गेला कुठं ?" असा विचार करत असतानाच राधाबाई त्याना विचारू लागल्या की काय हो विहिनबाई कुठं आहे माझा पोरगा ? उगाच बदनाम करत असता माझ्या पोराला."
" तुमचा पोरगा काही धुतल्या तांदळाचा नाहीये. रात्रभर
इथंच होता तो, खोटं वाटत असेल तर माझ्या पोरीला विचारा."
" तुमच्या पोरीला काय विचारू ती तर हां च म्हणेल ना ?" राधाबाई उद्गारल्या.
" असं नाहीये." सुशीला बाई उद्गारल्या.
सौंदर्या ने विवेकला कपाटात लपायला सांगितले होते.
त्या प्रमाणे तो लपला होता.परंतु त्याला ते योग्य वाटले
नाही.कारण आज जर सासूबाईना खोटे ठरविले गेले तर
आपली आई सौंदर्या ला अपल्या घरी कदापि येऊ देणार
नाही.मग आपल्याला इथंच यावे लागेल.त्यापेक्षा जे सत्य
आहे, ते सर्वांसमोर यावे असा विचार करून तो स्वतःच
बाहेर आला. विवेक ला पाहून राधाबाईचा चेहरा पडला. पण सुशीला बाईंचा चेहरा मात्र खुलला. तशी सौंदर्या त्याला आपल्या डोळ्यांनी दटावत म्हणाली ," तू का आलास बाहेर ?" त्यावर विवेक ने तिला आपल्या नजरेनेच सांगितले की आई, तुझ्या बद्दल वाईट साईट बोलत होती
म्हणून मला बाहेर यावे लागले." पण त्या दोघींची मात्र
जुंपली. त्या दोघीं एकमेकांना दोष देऊ लागल्या. सुशीला बाई चे म्हणणे होते की , तुमच्या मुलाला महाकाल भुताने
झपाटले आहे, तर राधाबाई चे म्हणणे होते की तुमच्या
मुलीला एका समंधाने झपाटले आहे. शेवटी मोहनराव
म्हणाले," तुम्ही दोघी माझं ऐकता का ?"
" तुम्ही आम्हां बायकांच्या मध्ये पडू नका." सुशीला बाई
उद्गारल्या. पण तरी देखील मोहनराव म्हणाले की, " हे बघा.असं एकमेकांवर आरोप करून काहीही साध्य
होणार नाहीये. यातून बाहेर कसं पडता येईल या बद्दल विचार करायला पाहिजे."
" अगदी बरोबर म्हणालेत पप्पा तुम्ही !" विवेक उद्गारला.
" काय बरोबर ?" राधाबाई आपल्या मुलावर रागवत
म्हणाल्या.
" मम्मी, सासूबाई म्हणतात ते खरंय. मी रात्री इथं कसा
आलो ते मला माहित नाही.याचा अर्थ महाकाल भुताने
मला झपाटले आहे."
" असं कसं होईल ? मला तांत्रिक महाराजांनी सांगितले
आहे की समंधाने सुनबाई ला झपाटले आहे म्हणून."
" काहीतरी घोळ आहे बघा." मोहनराव म्हणाले," नाही
म्हणजे तुम्हांला एका तांत्रिकाने सांगितले की आमच्या
मुलीला समंधाने झपाटले आहे म्हणून.तर हिला तांत्रिकाने
सांगितले तुमच्या मुलाला झपाटले आहे. यातले खरे कोणते ?" तसा सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला.
तेव्हा विवेक ने आपल्या सासूबाई ना विचारले की तुम्ही
कोणत्या तांत्रिकाकडे गेले होते." तेव्हा त्या म्हणाल्या,
" गुहे मध्ये आहे ना त्याच्या जवळ." तश्या राधाबाई
म्हणाल्या," मीही त्याच्या जवळच गेली होती."
" याचा अर्थ तो तुम्हां दोघींची दिशाभूल करतोय."
मोहनराव उद्गारले.
" एकदम करेक्ट !" विवेक ने दुजोरा दिला.
" पण असं का करेल तो ?" सुशीला बाई उद्गारल्या.
" का ते माहीत नाही.पण नक्कीच या मागे काहीतरी
कारण असावे." मोहनराव उद्गारले.
" मला वाटतं कोणीच त्याच्या जवळ जायचं नाही.मग
पाहू काय होतंय ते." विवेक म्हणाला.
" त्यानं काय होईल ?" सुशीला बाईंनी विचारले.
" मला असं म्हणायचंय आम्हां दोघांपैकी कोणालाच
भुताने झपाटले नाहीये.फक्त तसा भास होतोय असं पण
तर असू शकतं ना ?" तशी सौंदर्या उद्गारली," मला पण तेच
वाटतंय की हा आपल्या मनाचा भास पण असू शकतो
म्हणजे मनी असे ते स्वप्नी दिसे अशी एक म्हण आहे.तसं
पण तर असू शकतं ? " पण सुशीला बाईंना काही त्यांचे
म्हणणे पटले नाही म्हणून त्या म्हणाल्या," असं मग मला
सांगा, जावई बापू तुम्ही आपल्या घरी झोपले होते ते इथं
कसं पोहोचलात ? नाही म्हणजे हा भास तर नाहीये ना ?"
" मम्मी म्हणते ते पण बरोबर आहे." सौंदर्या उद्गारली.
" काही जणांना झोपेत चालायची सवय असते.तसं तर
नसेल ना ?" मोहनराव म्हणाले.
" म्हणजे तुम्हांला काय म्हणायचंय की माझा पोरगा
झोपेत इथपर्यंत चालत आलाय का ?" राधाबाई उद्गारल्या.
" होऊ शकतं ना ?" विवेक उद्गारला.
" पण मला नाही वाटत असं असेल." सुशीला बाई उद्गारल्या.
" अगं मम्मी कशाला वाद घालतेस आता.जाऊ दे ना."
" हे बघ तुला जायचं तर जा सासरी, पण नंतर माझ्याकडे कोणती तक्रार करू नकोस."
" मी बरी येऊ देईन तिला ?" राधाबाई उद्गारल्या.
" मम्मी तू कशाला आता अडवतेस तिला ? तिचा काही
दोष नाही हे सिध्द झाले ना आता ?"
" हे सारं तुझ्या मुळे घडलं." असे बोलून त्या तेथून
चालत्या झाल्या . त्यांच्या पाठोपाठ सौंदर्या आणि विवेक
पण आपल्या घरी जायला निघाले आणि थोड्याच वेळात
घरी पोहोचले. घरी आल्यावर मात्र राधाबाईनी त्या दोघांवर
तोंडसुख घेतले.पण विवेक आणि सौंदर्या काही न बोलता
आपल्या बेडरूम मध्ये निघून गेले.आता त्या दोघांपुढे
एकच प्रश्न उभा होता की काय खरं असेल ? आपण
म्हणतोय ते खरं की रात्री जे पाहिलं ते खरं ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा