पंखरूपी मानव - ९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव - ९ |
त्याच्या केविलवाणा चेहरा पाहून बॉडीलेस बोलला ,
झालं समाधान ? का अजून बाकी आहे ? " त्यावर डॉ. डेव्हिड काय बोलणार ? तो गप्पच झाला. तसा बॉडीलेस
बोलला ," अभी कुछ काम की बात करे ? या अभी कुछ शेष है ? तो बोलो ." परंतु डॉ डेव्हिड काहीच बोलला नाही.
बॉडीलेस बोलला ," आता डॉ. विश्वजित जवळ घेऊन जाणार
आहेस ? तुझ्या या साऱ्या सैनिकांचा बळी तुला बक्षिसाच्या रुपात देवू ? का एक नमुना पाहायचाय का तुला ? असे म्हटले नि एका बंदूकधारी माणसाकडे फक्त हाताचे बोट केले
त्याच्या अंगाला चिटकलेली गोळी सरळ निघाली नि त्याने
ज्याच्या वर निशाणा साधला होता त्याला जाऊन ती लागली. तसे सर्वजण घाबरले नि आपल्या हातातल्या ए के ४७ खाली टाकल्या. आणि भयभीत चेहऱ्याने ते बॉडीलेस कडे पाहू लागले. तसा बॉडीलेस डॉ. डेव्हिड कडे पाहत बोलला ,
" आता स्वतः घेऊन जाणार आहेस का ? मी स्वतः जाऊ ?"
तसा डॉ. डेव्हिड स्वतः घेऊन गेला त्या तळघरा मध्ये जिथे
डॉ. विश्वजित ला कोंडून ठेवले होते. त्या कोठडी चा दरवाजा उघडताच डॉ. विश्वजित हसून म्हणाला ," डॉ. डेव्हिड ,पाहिलंत माझा शिपाई काय करू शकतो ते ?"
त्यावर डॉ. डेव्हिड काहीच बोलला नाही. तसा बॉडीलेस
बोलला ," डॉक्टर चला." असे म्हटले नि डॉ. विश्वजित सोबत
त्या तळघराच्या बाहेर आला ; परंतु त्या दोघांना रोखण्याची
कोणालाच हिंमत झाली नाही. सर्वजण पुतळ्या सारखे स्थिर
उभे होते. बॉडीलेस डॉ. विश्वजित सह रिपोर्टर मशीन पाशी आले नि डॉ. डेव्हिड कडे वळून पाहत डॉ. हा फार्म्युला तुम्ही
माझा चोरला ; परंतु या पुढे तो तुमच्या कामी येणार नाही. असे बोलून त्या मशीनचा पासवर्ड बदली केला. त्यानंतर
डॉ. विश्वजित , डॉ. डेव्हिड कडे पाहत म्हणाले ," आता मी आणि बॉडीलेस दुसऱ्या जगात जात आहोत कोणाला यायचे
असेल आमच्या सोबत तर आमच्या मागोमाग या परंतु पंखरूपी मानवांच्या दुनियेत बंदिस्त व्हायचे नसेल तर ! कारण माझे जन्मदाते वडील पंखरूपी मानवांच्या दुनियेत कैद आहेत , तेव्हा मी माझ्या वडिलांना भेटायला त्या दुनियेत
जात आहे. आणि तेथे गेल्यावर मी देखील कैदी बनू शकतो.
किंवा परत येऊ पण शकतो. कारण काय माहितेय ? " असे
म्हणून सर्वांकडे नजर फिरविली. परंतु कोणीच काही बोलला
नाही. तसा डॉ. विश्वजित बोलला ," कारण माझ्या जवळ बॉडीलेस आहे, आणि बॉडीलेस एकटा काय करू शकतो
याची कल्पना आलीच असेल तुम्हां सर्वांना. का अजून काही पाहायचे आहे ? " परंतु कोणीच काही बोलले नाही. सर्वजण
मंत्रमुग्ध होऊन डॉ. विश्वजित चे वक्तव्य ऐकत होते. त्यानंतर
डॉ. विश्वजित ने तेथील एक ऑक्सिजन चे सिलेंडर घेतले नि
बॉडीलेसच्या खांद्यावर बसले. तसा बॉडीलेस ने पक्षा सारखी आकाशात उंच भरारी मारली. तसा डॉ .डेव्हिड ने आपल्या साथीदार सह एका यान मध्ये बसले .त्या दोघांचा पाठलाग सुरु केला. खूप उंच उंच अंतराळात पाठलाग सुरू होता. नि
अचानक बॉडीलेस दिसेनासा झाला. तेव्हा डॉ. डेव्हिड च्या
ध्यानात यायला यत्किंचितही वेळ लागला नाही. बॉडीलेस
पंखरूपी मानव रहात असलेल्या ग्रहावर उतरला. अर्थात त्या
ग्रहावर उघडपणे उतरणे धोकेदायक आहे, कारण डॉ. विश्वजित ने सांगितलेली गोष्ट द्यानात आली की पंखरूपी
मानव त्यांच्या दुनियेत प्रवेश करणाऱ्याला कैद करून तुरुंगात डांबतात म्हणून. ही गोष्ट द्यानात त्याने यान चालकाला थांबण्याचा इशारा केला. दूर पल्ल्याच्या दुर्बिणीतून त्यांनी त्या ग्रहाचे निरीक्षण केले. तेव्हा त्यांना
पंखरूपी मानव सर्वत्र फिरत असल्याचे जाणवले. त्यांनी त्यांचे फोटो शूट केले नि वापस मायदेशी परतले.
बॉडीलेस ,डॉ. विश्वजित ना सरळ कैद खाण्यात घेऊन
गेले. तेथे गेल्यावर त्यांची भेट डॉ. विश्वनाथ शी करून देण्यात
आली. आपल्या वडिलांना पाहून डॉ. विश्वजितिचा आनंद पारावर राहिला नाही. त्यानी आपल्या वडिलांचे चरणस्पर्श
केले . तसे त्यांनी त्यांच्या दंडाला पकडून वर उठविले नि
कडकडून मिठी मारली. हे दृश्य बाहेर उभे असलेल्या पारेकऱ्यानी पाहिले . तसे पळतच चंद्रसेन महाराजा जवळ गेला नि त्याने काय पाहिले याचे वर्णन केले. तेव्हा चंद्रसेन
महाराज समजून चुकले की डॉ. विश्वनाथ चे सुपुत्र बॉडीलेस
सोबत आले असावेत. असा विचार करून चंद्रसेन महाराज
म्हणाले ," सेनापती जी ?
" हुकूम महाराज ?"
" चला , आताच्या आता कैदखान्या मध्ये जाऊ ?"
" पण त्यांनाच इथं आणलं तर ?"
" इथं कसं आणणार त्याना ? ऑक्सिजन इथं कुठं मिळणार त्याना ?"
" अरे हो ,हे विसरलोच मी ! इथला ऑक्सिजन घेण्याची
त्यांच्यात क्षमता नाहीये. जसा पाण्यातील ऑक्सिजन
फक्त मासे घेऊ शकतात. परंतु ते जमिनीवर जगू शकत
नाहीत. तसेच आहे आपलं सुध्दा. आपण त्यांच्या पृथ्वीवरील
ऑक्सिजन घेऊ शकणार नाही."
" म्हणूनच म्हणतोय आपण स्वतःच जाऊ त्याना भेटायला." असे म्हणून दोघेही निघाले. कैदखान्या जवळ
पोहोचतात. चंद्रसेन महाराज म्हणाले ," आमच्या राज्यात
तुमचे स्वागत आहे." तसे डॉ. विश्वजित म्हणाले ," दुश्मनाचे स्वागत करण्याची प्रथा आज मी नव्याने पाहत आहे."
" आम्ही आमच्या देशात दुश्मनाचे स्वागतच करतो. म्हणूनच आपले वडील वीस वर्षे जिवंत राहू शकले. कारण
आम्ही त्यांच्यासाठी ह्या रूम मध्येच ऑक्सिजन ची
व्यवस्था केली आहे, नाहीतर आमच्या या देशात पृथ्वीवरील
मनुष्य जगू शकणार नाही."
" त्या बद्दल मी आपला आभारी आहे." डॉ. विश्वजित ने
चंद्रसेन महाराजांना हात जोडले. नि पुढे म्हणाले ," माझ्यावर
अजून एक उपकार करा."
" आम्ही काय करावे अशी आपली इच्छा आहे ?"
" मला माझ्या पित्याला घेऊन आपल्या मायदेशी जाऊ द्या."
" ते आता शक्य नाही."
" का बरं ?"
" तुम्ही पृथ्वीवर गेलात तर पृथ्वीवरील माणसे तुम्हाला
सुखाने जगू देणार नाही. शिवाय तुम्ही आता आमचा देश
पहायलाय तेव्हा तुमच्या कडून माहिती घेऊन पृथ्वीवरील
मनुष्य या ग्रहावर आल्या शिवाय राहणार नाही. कारण तुमच्या पृथ्वीवरील सर्व माणसं लालची नि धोकेबाज आहेत.
त्यांना फक्त एकच माहीत असते आणि ते म्हणजे आपले ते
आपलेच ; परंतु दुसऱ्यांचे ही आपलेच. तेव्हा तुम्ही आता
इथंच आमचे मेहमान बनून रहा."
" असे कैदेत ?"
" नाही."
" मग ? "
" लवकरच तुमच्या साठी एक भवन बांधले जाईल. त्या
भवना मध्ये तुमच्या साठी ऑक्सिजन ची सोय केलेली असेलच .त्या भवनात तुम्ही सर्वांनी राहायचं नि आमच्या साठी बॉडीलेस सारखे शक्तिशाली अजून बॉडीलेस
बनविले जावेत. केवळ आमच्या देशाच्या रक्षणासाठी !"
" तुम्हाला कोणा पासून धोका आहे ?"
" पृथ्वीवरच्या लोकांपासून."
" पण असं का वाटतं तुम्हाला ?"
" आजच आमच्या हेर खात्याने माहिती आणली की
तुमचा पाठलाग करत पृथ्वीवरील काही मनुष्य आले होते .
परंतु आमचा कडक बंदोबस्त पाहून ते माघारी गेले आहेत ;
परंतु सर्व तयारी करून पुन्हा चढाई करतील ते आमच्यावर."
" मग तुमची काय अपेक्षा आहे ?"
" तुम्ही आमच्या देशातच राहून संशोधनचे काम करत राहायचं. वाटल्यास पृथ्वीवरील तुमच्या साऱ्या परिवाराला
इथं घेऊन या."
" परंतु आम्ही इथंला श्वास घेऊ शकत नाही. मग आम्ही
जगणार कसे ?"
" त्यासाठी सर्व सोय केली जाईल." चंद्रसेन बोलला.
" म्हणजे कैदखाण्यात रवानगी केली जाईल आमची ?"
डॉ. विश्वजित उद्गारले.
" नाही."
" मग ?"
" तुमच्यासाठी एक सूंदर भवन बांधले जाईल. आणि त्या
भवनांचे नाव असेल भारतभवन ."
" खरं सांगताय ?"
" अगदी खरं."
" आणि त्या बदल्यात आम्हाला काय करावे लागेल ?"
" फार काही नाही. भारतात राहून जे करणार होता.
ते फक्त इथं करायचं आहे. बस्स ! "
" आणि नाही केलं तर ?"
" फार काही नाही. फक्त आम्हाला दुःख होईल. की ज्या व्यक्तीला आम्ही वीस वर्षे जिवंत ठेवले. त्या मनुष्याच्या
नातेवाईकानी आमच्या उपकाराची जाणीव ठेवली नाही.'
क्रमश:
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा